villagers protest for road construction । हक्काचा रस्ता द्या! पालगावकरांचे अल्ट्राटेक सिमेंट कंपनीसमोर ठिय्या आंदोलन

villagers protest for road construction

villagers protest for road construction : कोरपना तालुक्यातील पालगाव येथील नागरिकांनी तब्बल 40 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्याच्या मागणीसाठी एल्गार पुकारत अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या आवाळपूर येथील मुख्य कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

सायकलच्या चाकात अडकला मृत्यू, चंद्रपुरात भयावह दुर्घटना

अल्ट्राटेक सिमेंट कंपनीची खदान पालगाव परिसरात असूनही, गावात जाण्यासाठी वापरला जाणारा एकमेव मार्ग कंपनीच्या हद्दीतून जातो. या 3 किलो मिटर मार्गाची अवस्था अत्यंत खराब असून तो केवळ पायवाटीतच आहे. गावकऱ्यांनी वारंवार कंपनीकडे काँक्रीट रस्ता बनवून देण्याची मागणी केली; मात्र मागणीकडे दुर्लक्षच करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. ultra tech cement road controversy

गेल्या चार दशकांपासून हे दुर्लक्ष सहन करत अखेर गावकऱ्यांचा संयम सुटला असून, त्यांनी एकत्र येत सिमेंट कंपनीच्या मुख्य कार्यालयासमोर जोरदार आंदोलन सुरू केले आहे. “आमच्या हक्काचा रस्ता मिळाल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही,” असा ठाम पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे.

सध्या आंदोलन सुरूच असून, प्रशासन आणि कंपनी व्यवस्थापन काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *