VJNT Ashram School Staff Promotion : चंद्रपूर : राज्यातील इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत चालविल्या जाणाऱ्या अनुदानित विजाभज आश्रमशाळांमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना एकस्तर पदोन्नती व प्रोत्साहन भत्ता सुरू करण्याबाबत आमदार सुधाकर अडबाले यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधीद्वारे मागणी केली होती. अखेर शासनाने दखल घेऊन सदर मागणी मंजूर करून त्याबाबतचा शासननिर्णय दिनांक ०४ जून २०२५ रोजी निर्गमित केला त्यामुळे राज्यातील अनुदानित विजाभज आश्रमशाळांमधील कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. Maharashtra Ashram School Promotion
आदिवासी नक्षलग्रस्त भागात काम करणाऱ्या विजाभज आश्रमशाळा कर्मचाऱ्यांना एकस्तर पदोन्नती ही योजना सामाजिक न्याय विभागाचा शासननिर्णय ३ डिसेंबर २००७ नुसार सुरू केली. मात्र दिनांक १३ मार्च २०२० ला विभागाने शासननिर्णय काढून हे कर्मचारी या लाभास पात्र नाही म्हणून ही योजना बंद करून घेतलेल्या लाभाची वसूली करण्याचे आदेश दिले. या आदेशाविरोधात राज्यभरातील कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त करत या आदेशाविरोधात उच्च न्यायालय नागपुर/औरंगाबाद खंडपीठात रिट याचिका दाखल केल्या. Maharashtra Ashram School Staff Promotion GR
याचिकेचा निर्णय कर्मचाऱ्यांच्या बाजूने देऊन विभागीय अधिकाऱ्यांनी सहा महिन्याच्या आत निर्णय घेऊन कर्मचाऱ्यांना लाभ देण्याचे निर्देशित केले. मात्र, दोन वर्षाचा कालावधी होऊनही शासन आपणास हे लाभ मंजुर करत नाही हे लक्षात आल्यावर व्यथित होऊन शिक्षक संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार सुधाकर अडबाले यांची भेट घेऊन न्याय मिळवून देण्याची मागणी केली.
शेवट्पर्यंत पाठपुरावा
जिल्हा स्तरापासून तर मंत्रालय स्तरापर्यंत याबाबत पाठपुरावा केला. मात्र, या विभागाचा अनागोंदी कारभार लक्षात आल्यामुळे आमदार सुधाकर अडबाले यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात याबाबत लक्षवेधी लावली. विभागाचे मंत्री अतुल सावे यांनी सकारात्मक उत्तर देऊन अधिकाऱ्यांना तात्काळ आदेश निर्गमित करण्याच्या सूचना दिल्या. अखेर शासननिर्णय निर्गमित करून आदिवासी नक्षलग्रस्त भागात काम करणाऱ्या सर्व पात्र विजाभज आश्रमशाळा कर्मचाऱ्यांना एकस्तर पदोन्नतीचे लाभ मंजूर करण्यात आले. त्यामुळे आश्रमशाळा कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे.
Chandrapur wildlife protection control room : चंद्रपूर – चंद्रपूर वनवृत्त अंतर्गत वने आणि वन्यजीव संरक्षण व संवर्धन प्रभावीपणे होण्यासाठी तसेच मानव – वन्यजीव संघर्षाच्या घटनेची माहिती मिळाल्याबरोबर लगेच घटनास्थळी पोहचण्यास लागणारा प्रतिसाद वेळ कमी करण्याच्या उद्देशाने चंद्रपूर येथे सुसज्ज वन नियंत्रण कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. या नियंत्रण कक्षाचे तसेच सायबर सेलचे उद्घाटन राज्याचे वन मंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. Forest control center wildlife protection
यावेळी आमदार देवराव भोंगळे, अपर मुख्य सचिव (वने) मिलिंद म्हैसकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा वनबल प्रमुख शोमिता विश्वास, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) एम. श्रीनिवास राव, चंद्रपूरचे मुख्य वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे संचालक प्रभुनाथ शुक्ला, उपवनसंरक्षक कुशाग्र पाठक, आनंद रेड्डी, श्वेता बोड्डू आदी उपस्थित होते.
वनमंत्री श्री. नाईक म्हणाले, पोलिस नियंत्रण कक्षाच्या धर्तीवर वन विभागाने वन नियंत्रण कक्ष तयार केला आहे. वनांशी संबंधित जिल्ह्यात घडणा-या घटना, वाघांचे व बिबट्यांचे हल्ले, आगी लागण्याचे प्रमाण आदी माहिती मिळाल्यानंतर सर्व यंत्रणा ॲक्टीव्ह करण्याचे काम येथून केले जाईल. चंद्रपूरचा हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर राज्यातील इतरही संवेदनशील भागात व प्रत्येक सर्कलमध्ये नियंत्रण कक्ष तयार करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी वनमंत्र्यांच्या हस्ते जागतिक पर्यावरण दिनानिमित्त परिसरात वृक्षारोपन करण्यात आले.
वन नियंत्रण कक्षाची माहिती
सदर नियंत्रण कक्षाचा टोल फ्री क्रमांक (१८००३०३३) हा आहे. या कक्षातून चंद्रपूर वनवृत्तातील विभागाविषयी माहिती, विभागातील कामकाजाविषयी माहिती मिळण्यास मदत होते. तसेच काही तक्रार असल्यास त्याचे निराकरण या कक्षाच्या माध्यमातून केले जाईल. या कक्षाच्या माध्यमातून चंद्रपूर वनवृत्त व ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प मधील सर्व वन कर्मचाऱ्यांचे तसेच शासकिय वाहनांचे रिअल टाईम लोकेशन मिळण्यास मदत होते. जेणेकरून कुठे घटना घडल्यास जवळपास असलेल्या कर्मचाऱ्यांचे लोकेशन बघून घटनास्थळी लवकर पोहचता येईल. Forest control room incident management system
वन नियंत्रण कक्ष 24 तास कार्यरत असून येथे 24 तास कमर्चारी उपस्थित आहेत. सदर कक्षामार्फत वन कमर्चाऱ्यांकरीता फॉरेस्ट कंट्रोल नावाचे ॲन्ड्राईड ॲप तयार करण्यात आले आहे. सदर एप्लीकेशन हाताळण्याबाबत वनरक्षक ते वनपरिक्षेत्र अधिकारी पर्यंतच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. नियंत्रण कक्षाला एखाद्या घटनेची माहिती मिळाल्यास सदर घटनेची माहिती तात्काळ संबंधित वनरक्षक, वनपाल, वनपरिक्षेत्र अधिकारी यांना ॲपच्या माध्यमातून लगेच प्राप्त होते. त्यानुसार मिळालेल्या माहितीच्या आधारे वनरक्षकास तात्काळ घटनास्थळी पोहचून कार्यवाही करण्यात मदत मिळते. Wildlife human conflict rapid response
कार्यवाही पूर्ण झाल्यावर ॲपच्या टिकिटमध्ये घटनेविषयी संपूर्ण माहिती भरली जाते. तसेच सदर माहिती कर्मचाऱ्यांनी व्यवस्थित भरली किंवा नाही याची खात्री संबंधित वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी करून नंतर टिकिट बंद केल्या जाते. वन नियंत्रण कक्षाद्यारे शासकीय वाहनांमध्ये सुद्धा कन्सोल स्क्रीन बसविण्याचे काम करण्यात आले आहे. या स्क्रीनमध्ये फॉरेस्ट कंट्रोल ॲपचे लॉगिन करण्यात आले आहे. यामुळे अधिकारी दौऱ्यावर असल्यास त्यांच्या कार्यक्षेत्रात घडणाऱ्या घटनांची माहिती शासकीय वाहनात मिळण्यास मदत होते. तसेच एखाद्या ठिकाणी मोठी घटना घडल्यास सदर घटनास्थळाच्या जवळपास असणाऱ्या वाहनास नियंत्रण कक्षाद्यारे माहिती देऊन लवकरात लवकर घटनास्थळावर पोहचता येईल.
1. चंद्रपूर वन्यजीव नियंत्रण कक्ष म्हणजे काय?
हा एक सुसज्ज नियंत्रण कक्ष आहे जो वन व वन्यजीवाशी संबंधित आपत्कालीन घटनांवर वेळीच प्रतिसाद देतो.
2. या नियंत्रण कक्षाची आवश्यकता का भासली?
मानव-वन्यजीव संघर्ष, आगीची माहिती, वाघ/बिबट्याचे हल्ले यावर तत्काळ प्रतिसाद देण्यासाठी ही यंत्रणा आवश्यक ठरली.
3. नियंत्रण कक्षात कोणकोणत्या सुविधा आहेत?
टोल-फ्री नंबर, रिअल टाईम लोकेशन ट्रॅकिंग, अँड्रॉईड अॅप, 24 तास सेवा व शासकीय वाहनांमध्ये स्क्रीन बसविण्याची सोय.
4. सामान्य नागरिकांना याचा फायदा कसा होतो?
कोणतीही वन्यजीव घटना घडल्यानंतर टोल-फ्री क्रमांकावर माहिती दिल्यास वन अधिकारी तात्काळ घटनास्थळी पोहोचू शकतात.
5. ही प्रणाली इतर जिल्ह्यांत सुरू केली जाणार आहे का?
होय, चंद्रपूरचा यशस्वी प्रयोग पाहून ही संकल्पना राज्यातील अन्य संवेदनशील भागांतही राबवली जाणार आहे.
MSEDCL safety awareness week : चंद्रपूर : वीज ग्राहकांच्यात वीज अपघाता बाबत जागरूकता निर्माण व्हावी, वीज अपघातांचे प्रमाण शून्यावर यावे म्हणून महावितरणने ‘विदयूत सुरक्षा सप्ताह’ (बाईक रॅली) चे आयोजन केले होते. चंद्रपूरचे मुख्य अभियंता श्री.हरीश गजबे, संध्या चिवंडे अधिक्षक अभियंता चंद्रपूर मंडळ, रमेश सानप अधीक्षक अभियंता (पा.आ.) यांच्या हस्ते या ‘विदयूत सुरक्षा सप्ताह'(बाईक रॅली) ला झेंडा दाखवून सुरुवात झाली. bike rally for safety awareness
दि. 05 जून 2025ला ‘विदयूत सुरक्षा सप्ताह’ (बाईक रॅली) ला चंद्रपूर परिमंडल कार्यालयाचे मुख्य अभियंता श्री. हरीश गजबे, चंद्रपूर मंडल कार्यालयाच्या अधीक्षक अभियंता संध्या चिवंडे, रमेश सानप अधीक्षक अभियंता (पा.आ.), विदयूत निरीक्षक कोलते, सहाय्यक महाव्यवस्थापक (मा.सं.) श्री. सुशिल विखार, आणि श्री. विशाल पिपरे उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी तसेच कार्यकारी अभियंते सर्वश्री. दारव्हेकर, वंदिले, शहाडे, निचत (चाचणी विभाग), सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने बाईक रॅलीत उपस्थित होते.
“आम्ही सुरक्षेचे शिल्पकार शुन्य अपघाताने करू महावितरणचे ध्येय साकार” हे ब्रीद घेऊन चंद्रपूर महावितरणच्या सर्व क्षेत्रिय कार्यालयात दि.१ ते ६ जून २०२५ दरम्यान विद्युत सुरक्षा सप्ताहात विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच भाग म्हणून चंद्रपूर महावितरणचे अधिकारी व कर्मचारी चंद्रपूर परिमंडळ मुख्यालय बाबूपेठ ते जटपुरा गेट, वन अकॅडमी व परत मुख्यालय बाबूपेठ पर्यंत बाईक रॅलीदवारे विदयूत सुरक्षा सप्ताह विषयी जनजागृती करण्यात आली. यावेळी कर्मचाऱ्यांनी वीज सुरक्षेचे संदेश देणारे फलक हातात पकडले होते तसेच वीज सुरक्षेबाबत विविध घोषणाही देण्यात आल्या. Mahavitaran electricity safety program
‘विद्युत भवन’ या परिमंडल कार्यालयात आल्यानंतर मुख्य अभियंता श्री.हरीश गजबे व संध्या चिवंडे, अधिक्षक अभियंता चंद्रपूर मंडळ, यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना वीज सुरक्षेबाबत व वसुंधरा अभियान माध्यमातून नैसर्गिक परिसंस्थाचे जतन व संवर्धन करण्यासाठी विविध महावितरणच्या कार्यालयातील परिसरात वक्षारोपन करण्यात आले त्यानंतर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय चंद्रपूर येथे श्री उपाध्याय व देशमुख अंबुजा सिमेंट यांनी विद्युत सुरक्षा बद्दल मार्गदर्शन व प्रात्यक्षिक करून दाखविले आणि कार्यक्रमाचे सांगता करण्यात आली.
1. MSEDCL Safety Awareness Week काय आहे?
MSEDCL Safety Awareness Week ही महावितरण कंपनीने आयोजित केलेली एक विशेष मोहीम आहे ज्यामध्ये वीज अपघातांबद्दल जनजागृती केली जाते.
2. या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट काय आहे?
या आठवड्याचे उद्दिष्ट म्हणजे “शून्य अपघात धोरण” राबवणे आणि वीज सुरक्षा नियमांचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचवणे.
3. कोणकोणत्या उपक्रमांचा समावेश असतो?
या आठवड्यात बाईक रॅली, वीज सुरक्षा प्रात्यक्षिके, फलक प्रदर्शन, वृक्षारोपण व जनजागृतीपर भाषणे यांचा समावेश असतो.
4. सामान्य नागरिक यामध्ये कसे सहभागी होऊ शकतात?
स्थानिक कार्यालयातून माहिती घेऊन, जनजागृती उपक्रमात सहभाग घेता येतो. वीज सुरक्षा नियमांचे पालन करून आपण या मोहिमेस हातभार लावू शकतो.
Van Shakti 2025 forest women’s conference details : गत महिन्यात चंद्रपूर जिल्ह्यात वाघांच्या हल्ल्यात अनेक जणांचे जीव गेले आहेत, ही अतिशय दु:खद घटना असून शासनस्तरावरून याची दखल घेण्यात आली आहे. भविष्यात अशा प्रकारचे हल्ले रोखण्यासाठी अलार्मिंग सिस्टीम अधिक प्रभावशाली करणार असल्याची ग्वाही राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली. Women’s empowerment in forestry sector
वन अकादमी येथे वनक्षेत्रातील महिलांची राष्ट्रीय परिषद ‘वनशक्ती – 2025’ चे उद्घाटन करतांना ते बोलत होते. यावेळी मंचावर आमदार सर्वश्री देवराव भोंगळे, किशोर जोरगेवार, करण देवतळे, अपर मुख्य सचिव (वने) मिलिंद म्हैसकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा वनबल प्रमुख शोमिता विश्वास, तेलंगणाच्या वनबल प्रमुख श्रीमती सुवर्णा, भारतीय वनीकरण संशोधन संस्थेच्या महासंचालक कंचनदेवी, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) एम. श्रीनिवास राव, वनविकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संजीव गौड, चंद्रपूरचे मुख्य वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर आदी उपस्थित होते.
मानव – वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी अलार्मिंग सिस्टीम अधिक प्रभावशाली करू, असे सांगून वनमंत्री श्री. नाईक म्हणाले, यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. सोबतच वन्यजीवांपासून शेतमालाचे होणारे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांना कुंपण व सोलर कुंपनाचा लाभ देण्यात येईल. वनविभाग हा एक महत्त्वाचा विभाग असून जंगलात मजबूत गाड्यांची आवश्यकता आहे. अशा गाड्या उपलब्ध करून दिल्या जातील. तसेच वनपाल, वनरक्षक, आरएफओ यांच्या स्तरावरील कर्मचा-यांना स्वरक्षणासाठी हत्यारे देण्यात येतील. वनविभाग हा एक परिवार आहे. या परिवारांमध्ये सर्वांची काळजी घेण्याची वनमंत्री म्हणून आपली जबाबदारी आहे. Van Shakti 2025 forest women’s conference details
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर्षी 10 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे. यात वनविभाग अग्रेसर राहील. तसेच पुढील वन विभागाच्या भरतीमध्ये 50 टक्के भरती महिलांची (Forest-based employment opportunities in Maharashtra) करण्यात येईल. सध्या जिल्हास्तरावर मानद वन्यजीव रक्षक कार्यरत आहे. हे पद प्रत्येक तालुक्यात नेमण्यात येईल. तसेच महाराष्ट्र वन विकास महामंडळाच्या माध्यमातून चांगले प्रकल्प वनविभागात राबविण्यात येणार आहे. वन विभागाने तीन-चार अधिकाऱ्यांची टीम तयार करावी व वनांशी संबंधित अभ्यास करण्यासाठी त्यांना विदेशात पाठवावे. चंद्रपूरच्या योगदानातून वनांचे चांगले संरक्षण होत आहे. भद्रावती तालुक्यातील खुटवंडा प्रवेश गेट अतिशय चांगले करू, अशी ग्वाही त्यांनी दिली. Van Shakti 2025 forest women’s conference details
कार्यशाळेतून एक नवीन आत्मविश्वास मिळेल
वनविभागात कार्यरत असलेल्या महिलांची राष्ट्रीय परिषद चंद्रपूर जिल्ह्यात घेण्यासाठी सुमिता विश्वास यांनी एक चांगला पुढाकार घेतला आहे. राज्यात पहिल्या प्रमुख तीन पदांवर महिला विराजमान आहेत. यात राज्याच्या मुख्य सचिव, पोलीस महासंचालक व वनबल प्रमुख यांचा समावेश असून मंत्रालयात मोठ्या प्रमाणात महिला सचिव आहेत. चंद्रपूर येथे होणाऱ्या दोन दिवसीय कार्यशाळेतून एक नवीन आत्मविश्वास जागृत होण्यास मदत होईल.
वनांवर आधारीत उद्योग यावेत : आमदार किशोर जोरगेवार
चंद्रपूर जिल्ह्यात महिलांची राष्ट्रीय परिषद होत आहे, ही अभिमानची गोष्ट आहे. या दोन दिवसात कार्यशाळेत चांगले मंथन होईल. ज्या कामात महिलांचा सहभाग असतो ते काम उत्कृष्टच असते. वनांचे संवर्धन व्हायला पाहिजे, मात्र मानव वन्यजीव संघर्ष हा मोठा प्रश्न आहे. पोलीस पाटील पदाच्या धर्तीवर वनपाटील आणि वनपाटलीन अशी नियुक्ती करावी. वनांवर आधारित उद्योग जिल्ह्यात यावे. त्यातून येथील नागरिकांना रोजगार उपलब्ध होण्यास मदत होईल, असे आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगितले.
महिला हे शक्तीचे रूप : आमदार देवराव भोंगळे
महिलांच्या या कार्यशाळेला वनशक्ती असे नाव देण्यात आले आहे. ख-या अर्थाने महिला म्हणजे शक्तीचे रुप आहे, असे आमदार देवराव भोंगळे म्हणाले. आज प्रत्येकच क्षेत्रात महिलांनी आपले अस्तित्व निर्माण केले आहे. पर्यावरणाला पुढे नेण्यासाठी महिलांनी काय करावे, यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात मानव वन्यजीव हा प्रश्न अतिशय गंभीर असून पर्यावरणाचा ऱ्हास ही सुद्धा समस्या आहे. तसेच वन्यजीवांकडून शेतमालाचे होणारे नुकसान याबाबत वनविभागाने चांगल्या उपाययोजना कराव्यात, असे ते म्हणाले.
महिलांनी कार्यशाळेचा लाभ घ्यावा : आमदार करण देवतळे
आपल्या विधानसभा क्षेत्रात येणारे खुटवंडा सफारी गेट अतिशय प्राचीन आहे. त्याचे सुशोभीकरण करून येथे सफारींची संख्या वाढविण्यात यावी. वनविभागात मोठ्या प्रमाणात महिला कार्यरत आहे. महिलांना प्रोत्साहन देणे, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे सर्व महिलांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार करण देवतळे यांनी केले.
अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर म्हणाले, आज सर्वच क्षेत्रात महिलांची प्रगती झाली आहे. वनविभागात काम करणे हे एक मोठे आव्हान आहे. कारण विस्तीर्ण भूप्रदेश, वन्यजीव यांचा मोठा धोका असतो. वनविभागाची नोकरी ही दुर्मिळ क्षेत्रातील नोकरी आहे. महिलांना एक संधी देण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. Van Shakti 2025 forest women’s conference details
कार्यक्रमाच्या सुरवातीला स्वागतपर भाषण वनबल प्रमुख शोमिता विश्वास यांनी केले. तर राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी दूरदृष्यप्रणाली द्वारे मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. सुवर्णा आणि कांचन देवी यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन श्रेया खाडीलकर यांनी तर आभार चंद्रपूरचे मुख्य वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी मानले.
Van Shakti 2025 national forest women conference : चंद्रपूर – वन हे आपल्या जीवनाचे फुफ्फुस आहे, पर्यावरणाचे संतुलन राखणारे शक्तिस्थान आहे. मात्र आजच्या काळात जंगल केवळ पर्यावरणपूरक बाब नाही, तर ते स्थानीक अर्थव्यवस्थेचा आणि रोजगारनिर्मितीचा आधार ठरू शकते. त्यामुळे वनावर आधारित उद्योगांना चालना देण्यासाठी राज्य शासनाने विशेष धोरण राबवावे. यामुळे जंगलालगतच्या भागातील युवक-युवतींना गावातच रोजगार मिळेल, स्थलांतर थांबेल आणि त्याच वेळी वनपर्यटनालाही नवे बळ मिळेल अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी बोलतांना वनमंत्री गणेश नाईक यांना केली. women leadership in forest conservation India
राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते वनशक्ती 2025, वन क्षेत्रातील महिलांची राष्ट्रीय परिषद या दूरदृष्टीपूर्ण उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमात आमदार किशोर जोरगेवार बोलत होते. या कार्यक्रमाला राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार देवराव भोंगळे, वरोरा भद्रावती विधानसेभेचे आमदार करण देवतळे यांच्यासह वन विभागातील सर्व अधिका-यांची उपस्थिती होती.
यावेळी पूढे बोलताना आ. किशोर जोरगेवार म्हणाले कि, वनांचे ‘सर्वांगीण वनसंवर्धन’ करण्यासाठी स्थानिकांचा सहभाग अत्यावश्यक आहे. यासाठी “वनपाटील आणि वनपाटलीन” ही संकल्पना राबविण्यात यावी. ग्रामपंचायत स्तरावर वनपाटील आणि वनपाटलीन पदासाठी निवडणुका घेतल्या गेल्या तर त्या गावातील नागरिकांना वनसंवर्धनाच्या निर्णयप्रक्रियेत थेट सामावून घेता येईल.
या पदांना महिलांचे प्रतिनिधित्व दिल्यास हुमन इज फॉरेस्ट लिडरशिप या महत्वाकांक्षी संकल्पनेला चालना मिळेल. या संकल्पनेतून जंगलालगतची गावे फक्त वनसंवर्धक नव्हे, तर विकासाचे केंद्र बनतील. जंगल आणि गाव एकमेकांचे पूरक बनून या भागातील लोकांचा आत्मविश्वास वाढेल असा विश्वास यावेळी बोलतांना आमदार किशोर जोरगेवार व्यक्त केला.
1. What is Van Shakti 2025?
Van Shakti 2025 is a national-level initiative focused on empowering women in the forest sector, promoting sustainable forest conservation, and boosting forest-based employment in India.
2. How can forests support local village economies?
Forests can support village economies by promoting eco-tourism, forest produce-based industries, and community-led conservation programs. These create jobs locally and reduce migration.
4. What is the concept of Forest Patil and Patilin?
This is a proposed model where villagers elect a Forest Patil (male) and Forest Patilin (female) to participate directly in local forest management and conservation decision-making at the Gram Panchayat level.
swayam portal hostel admission last date : चंद्रपूर – एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपुर अंतर्गत अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्याकरीता मुलांचे 12 (चंद्रपुर – 2, राजुरा – 2, गडचांदूर, कोरपना, जिवती, सिंदेवाही, मुल, सावली, पोंभुर्णा व गोंडपिपरी येथे प्रत्येकी एक) व मुलींचे 11 (चंद्रपुर – 2, राजुरा, गडचांदूर, कोरपना, जिवती, सिंदेवाही, मूल, सावली, पोंभुर्णा व गोंडपिपरी येथे प्रत्येकी एक) असे एकूण 23 वसतिगृह कार्यरत आहेत. सन 2025-26 करीता रिक्त जागांवर प्रवेशाकरोता www.swayam.mahaonline.gov.in या प्रणालीवर फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावा. how to apply for government tribal hostel online
जिल्हास्तरावर चंद्रपुर येथे मुलांचे 2 व मुलींचे 2 असे एकूण 4 वसतिगृह कार्यरत असून या वसतिगृहांमध्ये इयत्ता 11 ते पदवी, पदव्युत्तर तसेच व्यावसायीक अभ्यासक्रमांस प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या आधारे प्रवेश मिळणार आहे. तसेच उर्वरीत 19 वसतिगृहांमध्ये वर्ग 8 वी पासून पुढे शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या आधारे प्रवेश दिला जाणार आहे.
वरील संकेतस्थळावर विद्यार्थ्यांनी अर्ज भरतांना सदर प्रणालीमध्ये दिलेल्या सुचनांचे काळजीपूर्वक वाचन करावे व त्यात दिलेल्या कागदपत्रांची जोडणी करण्यात यावी. वसतिगृहातील ज्यांचा अभ्यासक्रम पूर्ण झालेला नाही, अशा विद्यार्थ्यांनी आपला अर्ज फक्त रिनीव्हल करायचा आहे, नविन विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर त्या अर्जाची प्रिंट काढून योग्य त्या कागदपत्रांसह अर्ज भरलेल्या दिनांकापासुन आपण निवडलेल्या वसतिगृहात एक आठवड्याच्या आत सादर करावे. how to apply for government tribal hostel online
वसतिगृह प्रवेशाचे संकेतस्थळ पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी 31 जुलै 2025 पर्यंत व व्यावसायीक अभ्यासक्रमांकरीता 31 ऑगस्ट 2025 पर्यंत सुरू राहणार आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर अर्ज सादर करावेत, असे प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी कळविले आहे.
1. What is the last date for hostel admission on Swayam Portal?
The last date for submitting hostel admission applications for degree and postgraduate courses is 31st July 2025. For professional courses, it is 31st August 2025.
2. Who can apply for hostel admission through the Swayam Portal?
Scheduled Tribe (ST) students from Maharashtra who are studying in class 8th and above, including degree, postgraduate, and professional courses, are eligible.
3. Where should I apply for tribal hostel admission in Maharashtra?
armyworm attack in rice and cotton crops : चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यात खरीप हंगामामध्ये धान व कापूस पिकांवर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. लष्करी अळीमुळे बाधित झालेल्या जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी ठाम मागणी राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी कृषी राज्यमंत्री श्री. आशिष जयस्वाल यांच्याकडे केली.
चंद्रपूर जिल्ह्यातील लष्करी अळीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी ४ जून रोजी मंत्रालयात राज्याचे कृषी राज्यमंत्री ना. श्री. आशिष जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. यावेळी आ. सुधीर मुनगंटीवार, संबधित अधिकारी तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा व जिल्हा कृषी अधिकारी शंकर तोटावार आदिंची उपस्थिती होती. government relief scheme for farmers
३७,००० हेक्टर क्षेत्र बाधित
चंद्रपूर जिल्ह्यात खरीप हंगाम २०२४-२५ मध्ये सुमारे ३७,००० हेक्टर क्षेत्रावर लष्करी अळीमुळे पीक मोठ्या प्रमाणावर बाधित झाले आहे. या आपत्तीजन्य परिस्थितीचा सामना करत असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ आणि योग्य नुकसान भरपाई मिळावी, अशी ठाम मागणी राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्यमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आढावा बैठकीत केली. लष्करी अळीमुळे हजारो शेतकऱ्यांचे संपूर्ण उत्पन्न संकटात आले. म्हणूनच संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी आग्रही मागणी आ. मुनगंटीवार यांनी केली.
या आढावा बैठकीत कृषी राज्यमंत्री जयस्वाल यांनी आ. मुनगंटीवार यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत, लवकरच यासंदर्भातील प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करण्यात येईल, असे आश्वासन दिले. शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे. त्यांना न्याय मिळेल, याची आम्ही पूर्ण काळजी घेऊ, अशी ग्वाही कृषी राज्यमंत्र्यांनी दिली.
Forest Control Room Chandrapur : चंद्रपूर : चंद्रपूर वनवृत्त अंतर्गत वने व वन्यजीव संरक्षण अधिक प्रभावीपणे पार पाडण्यासाठी, तसेच मानव-वन्यजीव संघर्षाच्या घटनांवर तातडीने प्रतिसाद मिळावा यासाठी, रामबाग वसाहतीत अत्याधुनिक वन नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी या नियंत्रण कक्षाला भेट देऊन यंत्रणेची माहिती घेतली. real-time forest monitoring system
नियंत्रण कक्षाचा टोल फ्री क्रमांक 18003033 हा आहे. सदर कक्षातून चंद्रपूर वनवृत्तातील वनविभागाविषयी माहिती पाहिजे असल्यास ती तात्काळ प्राप्त होते. विभागाच्या कामकाजाविषयी माहिती मिळण्यास मदत होते. तसेच काही तक्रारी असल्यास त्याचे निराकरण देखील या कक्षाच्या माध्यमातून केल्या जाते. नियंत्रण कक्ष उभारणीसाठी 11 ऑक्टोबर 2024 रोजी शासन आदेश निर्गमित झाला होता. आता हा कक्ष स्थापन झाला आहे. forest department toll free number
घटनांची माहिती एकाच ठिकाणी:
‘वन नियंत्रण कक्ष’ हा चंद्रपूर वनवृत्ताच्या मध्यवर्ती ठिकाणी असून चंद्रपूर वनवृत्तातील घटनांची माहिती एकत्रितरित्या एकाच ठिकाणी साठवून ठेवण्यास मदत होते. या कक्षाच्या माध्यमातून चंद्रपूर वनवृत्त व ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील सर्व वनकर्मचाऱ्यांसह शासकीय वाहनांचे रियल टाईम लोकेशन मिळते. मानव-वन्यजीव संघर्षाच्या घटना घडल्यास वनविभागात कार्यरत असलेल्या आर.आर.टी पथकाचा संबंधित विभागाशी समन्वय साधण्यास मदत होते.
शासकीय वाहनात फॉरेस्ट कन्सोल स्क्रीन:
वन नियंत्रण कक्ष 24 तास कार्यरत असते. या कक्षामार्फत वन कर्मचाऱ्यांकरिता फॉरेस्ट कंट्रोल नावाचे अँड्रॉइड ॲप तयार करण्यात आले आहे. हे ॲप हाताळण्यासाठी वनरक्षक ते वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांपर्यंतच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. एखाद्या घटनेची माहिती मिळाल्यास सदर माहिती संबंधित वनरक्षक, वनपाल आणि वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना ॲपच्या माध्यमातून लगेच प्राप्त होते. वन नियंत्रण कक्षाद्वारे शासकीय वाहनांमध्ये सुद्धा फाॅरेस्ट कन्सोल स्क्रीन बसविण्यात आले आहे. अधिकारी दौऱ्यात असल्यास त्यांच्या कार्यक्षेत्रात घडणाऱ्या घटनांची माहिती शासकीय वाहनात मिळण्यास मदत होते.
वनविभागाच्या या पुढाकारामुळे वने आणि वन्यजीव संरक्षण, तक्रारीचे निराकरण व प्रभावी समन्वय साधण्यास मदत होणार आहे.
Chandrapur Bakrid law and order update : चंद्रपूर – जिल्ह्यात 7 जून रोजी बकर ईद हा सण साजरा करण्यात येणार आहे. चंद्रपूर हा शांतताप्रिय जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्याचा हा नावलौकिक कायम राहावा तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी सर्वांनी शांततेत सण उत्सव साजरे करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले. District administration role during Bakrid
जिल्हा प्रशासन आणि पोलिस विभागाच्या वतीने नियोजन सभागृह येथे जिल्हा शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी, तहसीलदार, पोलिस निरीक्षक, मुख्याधिकारी, पोलिस पाटील तसेच शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते.
कुर्बाणीचे फोटो सोशल मिडीयावर
शांतता समितीमध्ये ज्येष्ठ सदस्यांचा समावेश आहे, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, आजची तरुण पिढी अनिर्बंधपणे सोशल मिडीयाचा वापर करतात. कृत्रीम बुध्दीमत्तेमुळे (एआय) त्यात भर पडल्याचे चित्र आहे. त्यामुळे आपापल्या परिसरातील तरुण पिढीला शांतता समितीच्या सदस्यांनी समजावून सांगावे. आपल्या पोस्टमुळे काही अघटीत घडणार नाही, याची सर्वांनी दक्षता घ्यावी. कुर्बाणीचे फोटो सोशल मिडीयावर अपलोड करू नये. त्यामुळे सर्वांनी जबाबदारीचे भान ठेवावे. सोशल मिडीयासंदर्भात काही शंका आल्यास तात्काळ प्रशासनाला कळवावे किंवा 112 वर कॉल करून माहिती द्यावी. Peace committee meeting before Bakrid festival
सणांच्या कालावधीत नियमित पाणी पुरवठा आणि वीज पुरवठा होण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी योग्य नियोजन करावे. वीज पुरवठा खंडीत होणार नाही, याची काळजी घ्यावी. बकर ईदच्या कालावधीत कुर्बाणी झाल्यानंतर अनावश्यक असलेले पदार्थ/ साहित्यांची योग्यप्रकारे विल्हेवाट लावावी, जेणेकरून कोणचाही आक्षेप येणार नाही. तसेच कोणीही कायदा हातात घेऊ नये, अशा सुचना जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी दिल्या. यावेळी पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांनी सुध्दा मार्गदर्शन केले.
अशा आहेत सदस्यांच्या सुचना
यावेळी जिल्हा शांतता समितीच्या सदस्यांनी आपले म्हणणे मांडले. सद्या सणासुदीच्या दिवसांत नियमित पाणी पुरवठा व्हावा, वीज पुरवठा खंडीत होऊ नये, कुर्बाणीमुळे कोणालाही त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अफवांवर वेळीच निर्बंध घालावे, उभारण्यात येणा-या तात्पुरत्या कत्तल खान्यात लाईट आणि पाण्याची व्यवस्था चांगली असावी. मांसची वाहतूक उघडपणे न करता ती झाकून करावी, आदी सुचना सदस्यांनी मांडल्या.
cdcc bank elections : चंद्रपूर – तब्बल १३ वर्षांनंतर होणाऱ्या चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीबाबत आमदार किशोर जोरगेवार यांनी मुंबईतील मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन महत्त्वपूर्ण चर्चा केली. याआधीही त्यांनी वेळोवेळी मुख्यमंत्री यांचे निवडणूक प्रक्रियेतील अनियमितता व गैरप्रकारांकडे लक्ष वेधले होते.
२०१२ नंतर आता २०२५ मध्ये होत असलेल्या बँकेच्या निवडणुकीबाबत न्यायालयाने निवडणूक प्रक्रियेदरम्यान कोणतेही धोरणात्मक निर्णय न घेण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, बँकेच्या सध्याच्या व्यवस्थापनाने हे आदेश धाब्यावर बसवत काही निर्णय घेतले आहेत, असा आरोप होत आहे.
दरम्यान, काही महिन्यांपूर्वी बँकेवर सायबर हल्ला झाला होता. या हल्ल्यात ३ कोटी ७५ लाख रुपयांची फसवणूक झाली होती. त्यापैकी केवळ १ कोटी रुपये परत मिळाले असून उर्वरित २ कोटी ७५ लाख रुपये बँकेने ग्राहकांना परस्पर परत केले. हा निर्णय बँकेचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कोणतीही अधिकृत परवानगी न घेता घेतल्याचा गंभीर आरोप आहे. या प्रकरणातही अनेक वित्तीय गैरप्रकार झाल्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (cm Devendra fadnavis) यांच्याशी झालेल्या बैठकीत आमदार जोरगेवार यांनी या सर्व प्रकारांबाबत माहिती दिली. तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया पारदर्शक व न्याय्य होण्यासाठी मुख्यमंत्री यांनी लक्ष घालावे, अशी मागणी केली.
अपघातात मृत्यू झालेल्या विद्यार्थिनीसाठी ५ लाख रुपयांची मदतीची मागणी.
तुकूम येथे काही दिवसांपूर्वी हायवा वाहनाच्या धडकेत मृत्यू झालेल्या सानिका कुमरे या २२ वर्षीय विद्यार्थिनीच्या कुटुंबाला मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पाच लाख रुपयांची आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.
हायवा वाहन चालकाला फिट आल्याने त्याचे वाहन रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या नागरिकांवर घसरले. या दुर्घटनेत सानिकाचा जागीच मृत्यू झाला, तर तिची मैत्रीण काजल गंभीर जखमी झाली. आमदार जोरगेवार यांनी अपघातानंतर घटनास्थळी भेट दिली होती. तसेच रुग्णालयात जात काजलची प्रकृतीची विचारपूस केली होती.
सावनेर खान पर्यटन पाहणीचा दिला मुख्यमंत्र्यांना आढावा
नुकतीच आमदार किशोर जोरगेवार यांनी नागपूर येथील सावनेर येथील भूमिगत खान पर्यटन प्रकल्पाची पाहणी अधिकाऱ्यांसह केली होती. या धर्तीवर चंद्रपूर येथील महाकाली कॉलरीच्या बंद भूमिगत खाणीत पर्यटन सुरू करण्याचा संकल्प त्यांनी केला आहे.