MSEDCL safety awareness week । वीज सुरक्षा सप्ताहात बाईक रॅलीने वीज अपघातांबाबत जनजागृती

MSEDCL safety awareness week

MSEDCL safety awareness week : चंद्रपूर : वीज ग्राहकांच्यात वीज अपघाता बाबत जागरूकता निर्माण व्हावी, वीज अपघातांचे प्रमाण शून्यावर यावे म्हणून महावितरणने ‘विदयूत सुरक्षा सप्ताह’ (बाईक रॅली) चे आयोजन केले होते. चंद्रपूरचे मुख्य अभियंता श्री.हरीश गजबे, संध्या चिवंडे अधिक्षक अभियंता चंद्रपूर मंडळ, रमेश सानप अधीक्षक अभियंता (पा.आ.) यांच्या हस्ते या ‘विदयूत सुरक्षा सप्ताह'(बाईक रॅली) ला झेंडा दाखवून सुरुवात झाली. bike rally for safety awareness

चंद्रपुरात राष्ट्रीय वन महिला परिषदेचे उदघाटन


दि. 05 जून 2025ला ‘विदयूत सुरक्षा सप्ताह’ (बाईक रॅली) ला चंद्रपूर परिमंडल कार्यालयाचे मुख्य अभियंता श्री. हरीश गजबे, चंद्रपूर मंडल कार्यालयाच्या अधीक्षक अभियंता संध्या चिवंडे, रमेश सानप अधीक्षक अभियंता (पा.आ.), विदयूत निरीक्षक कोलते, सहाय्यक महाव्यवस्थापक (मा.सं.) श्री. सुशिल विखार, आणि श्री. विशाल पिपरे उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी तसेच कार्यकारी अभियंते सर्वश्री. दारव्हेकर, वंदिले, शहाडे, निचत (चाचणी विभाग), सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने बाईक रॅलीत उपस्थित होते.


“आम्ही सुरक्षेचे शिल्पकार शुन्य अपघाताने करू महावितरणचे ध्येय साकार” हे ब्रीद घेऊन चंद्रपूर महावितरणच्या सर्व क्षेत्रिय कार्यालयात दि.१ ते ६ जून २०२५ दरम्यान विद्युत सुरक्षा सप्ताहात विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच भाग म्हणून चंद्रपूर महावितरणचे अधिकारी व कर्मचारी चंद्रपूर परिमंडळ मुख्यालय बाबूपेठ ते जटपुरा गेट, वन अकॅडमी व परत मुख्यालय बाबूपेठ पर्यंत बाईक रॅलीदवारे विदयूत सुरक्षा सप्ताह विषयी जनजागृती करण्यात आली.
यावेळी कर्मचाऱ्यांनी वीज सुरक्षेचे संदेश देणारे फलक हातात पकडले होते तसेच वीज सुरक्षेबाबत विविध घोषणाही देण्यात आल्या. Mahavitaran electricity safety program

bike rally for safety awareness

‘विद्युत भवन’ या परिमंडल कार्यालयात आल्यानंतर मुख्य अभियंता श्री.हरीश गजबे व संध्या चिवंडे, अधिक्षक अभियंता चंद्रपूर मंडळ, यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना वीज सुरक्षेबाबत व वसुंधरा अभियान माध्यमातून नैसर्गिक परिसंस्थाचे जतन व संवर्धन करण्यासाठी विविध महावितरणच्या कार्यालयातील परिसरात वक्षारोपन करण्यात आले त्यानंतर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय चंद्रपूर येथे श्री उपाध्याय व देशमुख अंबुजा सिमेंट यांनी विद्युत सुरक्षा बद्दल मार्गदर्शन व प्रात्यक्षिक करून दाखविले आणि कार्यक्रमाचे सांगता करण्यात आली.

1. MSEDCL Safety Awareness Week काय आहे?

MSEDCL Safety Awareness Week ही महावितरण कंपनीने आयोजित केलेली एक विशेष मोहीम आहे ज्यामध्ये वीज अपघातांबद्दल जनजागृती केली जाते.

2. या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट काय आहे?

या आठवड्याचे उद्दिष्ट म्हणजे “शून्य अपघात धोरण” राबवणे आणि वीज सुरक्षा नियमांचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचवणे.

3. कोणकोणत्या उपक्रमांचा समावेश असतो?

या आठवड्यात बाईक रॅली, वीज सुरक्षा प्रात्यक्षिके, फलक प्रदर्शन, वृक्षारोपण व जनजागृतीपर भाषणे यांचा समावेश असतो.

4. सामान्य नागरिक यामध्ये कसे सहभागी होऊ शकतात?

स्थानिक कार्यालयातून माहिती घेऊन, जनजागृती उपक्रमात सहभाग घेता येतो. वीज सुरक्षा नियमांचे पालन करून आपण या मोहिमेस हातभार लावू शकतो.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *