Tag: MH34

  • criminal caught with stolen vehicle । गडचिरोली मध्ये चैन स्नॅचिंग पण दुचाकी चोरीत चंद्रपुरात अडकला

    criminal caught with stolen vehicle

    criminal caught with stolen vehicle : चंद्रपूर – जिल्ह्यात वाहनांच्या चोरी प्रकरणी पोलीस अधीक्षकांनी सदर गुन्ह्यांचा छडा लावावा असे निर्देश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोहीम राबवित खबरीद्वारे गोपनीय माहिती मिळवली असता रेकॉर्डवरील आरोपी एसटी वर्कशॉप जवळ दुचाकी वाहन विक्री करण्यासाठी येत असल्याचे कळताच पथकाने सापळा रचत एकाला अटक केली. vehicle theft cases solved by police

    तुकूम अपघात प्रकरणी युवती सेनेने केली लक्षवेधी मागणी

    स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रेकॉर्डवरील आरोपी ४५ वर्षीय जनरलसिंग उर्फ मन्नूसिंग टाक राहणार समतानगर नेरी चौक ऊर्जानगर याला अटक केली. जनरलसिंग ने महिनाभरापूर्वी नायडू हॉस्पिटल तुकूम जवळून स्प्लेंडर प्रो क्रमांक MH ३४ AX ३८४८ छोटी केली होती.

    गडचिरोली मध्ये चैन स्नॅचिंग

    आरोपीने जनरलसिंग ने गडचिरोली मध्ये महिलेकडून सोन्याची चैन हिसकावत जबरी चोरी केल्याची कबुली दिली. याबाबत गडचिरोली पोलिसांना माहिती देण्यात आली आहे. दुचाकी चोरी प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने दुचाकीसहित ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

    सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पोउपनि विनोद भुरले, सुनील गौरकार, पोलीस कर्मचारी सुभाष गोहोकार, नितीन साळवे, नितीन कुरेकार, सतीश अवथरे, दीपक डोंगरे, गोपाल आतकुलवार, किशोर वाकाटे, शशांक बदामवार व प्रसाद धुळगंडे यांनी केली.

  • eid celebration with politicians । ईद-उल-अजहा (बकरी ईद) निमित्त लष्करी ईदगाह कमेटीच्या कार्यक्रमात आमदार किशोर जोरगेवार यांची उपस्थिती

    eid celebration with politicians

    eid celebration with politicians : चंद्रपूर – आज चंद्रपूर जिल्ह्यात ईद-उल-अजहा (बकरी ईद) हा पवित्र सण मुस्लिम बांधवांकडून मोठ्या श्रद्धा, एकता आणि उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त लष्करी ईदगाह कमेटी तर्फे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात आमदार किशोर जोरगेवार यांनी उपस्थित राहून मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या.

    तुकूम अपघात प्रकरणातील आरोपी चालक सहित मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

    यावेळी अनवर खान, साबिर सर, जहिर काजी, इजहार काजी, अफिसुर रहमान, राशिद हुसेन, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, पोलिस उपविभागीय अधिकारी सुधारकर यादव, शांतता समितीचे रमजान अली घायल, खत्री, इमरान शेख, सय्यद अबरार व मुस्लिम बांधवांची उपस्थिती होती.

    political leaders on eid festival

    यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी ईदगाहमध्ये येणाऱ्या मुस्लिम बांधवांना गुलाबाचे फूल देत ईदच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमादरम्यान लष्करी ईदगाह कमेटीच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार किशोर जोरगेवार यांचे स्वागत केले.

    ईद-उल-अजहा हा सण त्याग, समर्पण आणि सामाजिक ऐक्याचे प्रतीक आहे. विविध धर्मांचे, संस्कृतींचे लोक जेव्हा एकत्र येतात, तेव्हाच खऱ्या अर्थाने ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ ही संकल्पना साकार होते, असे यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले.

  • Amma Ki Chhaya । गावाला मायेची सावली – ‘अम्मा की छाया’चे भूमिपूजन थाटात

    Amma Ki Chhaya

    अम्मा की छाया सामाजिक सभागृह आईच्या मायेचा स्पर्श देणारी ग्रामविकासाची नवी वाट ठरेल – आ. किशोर जोरगेवार

    Amma Ki Chhaya : चंद्रपूर – आजचा हा दिवस फक्त एक भूमिपूजन नाही, तर आपल्या गावात आईच्या मायेचा स्पर्श घेऊन नव्या वाटेवर पडलेलं एक पाऊल आहे. अम्मा की छाया, सावली मायेची हे नाव उच्चारताच एक मायेची छाया मनात दरवळते. गावाचा खरा विकास रस्त्यांनी किंवा इमारतींनी होत नाही, तर तो संस्कारांमधून, समविचारातून आणि एकत्र येण्याच्या जागांमधून होत असतो. त्यामुळे येथे साकार होत असलेले अम्मा की छाया समाज भवन आईच्या मायेचा स्पर्श देणारी ग्रामविकासाची नवी वाट ठरेल, असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. Community Hall

    जेष्ठ नागरिकाला अधिकारी म्हणतो ‘गेट आउट”

    ग्रामविकास निधीतून मायेची सावली उपक्रमांतर्गत वेंडली येथे मंजूर सामाजिक सभागृहाच्या कामाचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे जिल्हा महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, भारतीय जनता पार्टीचे नेते प्रकाश देवतळे, नामदेव डाहुले, सरपंच प्रतिमा अलवलवार, प्रकाश अलवलवार, माजी सरपंच कैलास चिवंडे, आशिष माशिरकर, आनंदराव पिंपळशेंडे, पोलिस पाटील संजय पाटील, विनोद खेवले, श्रीरंगपाटील वरारकर, मेश्राम आदींची उपस्थिती होती.

    हि एकतेची वास्तू

    यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, सामाजिक सभागृह म्हणजे केवळ भिंती नाहीत, ही आपल्या संस्कृतीची, आपुलकीची आणि एकतेची वास्तू आहे. या जागेवरून अनेक माऊल्यांचे आशीर्वाद पसरतील, इथे मुलांना शिकण्यासाठी आधार मिळेल, महिलांना आत्मनिर्भरतेची दिशा सापडेल, तर युवक-युवतींना आपली कला, क्रीडा आणि विचार व्यक्त करण्याची संधी मिळणार आहे. या जागेचा उपयोग समाज घडवण्यासाठी व्हावा, नात्यांना जोडण्यासाठी व्हावा आणि पुढच्या पिढ्यांना नवा विचार देण्यासाठी व्हावा. Amma Ki Chhaya

    kishor jorgewar update news

    या भवनामध्ये सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि क्रीडा उपक्रमांचे आयोजन करता येईल. स्थानिक युवक-युवतींना, कलाकारांना आणि नागरिकांना स्वतःला व्यक्त करण्यासाठी एक भक्कम मंच मिळेल. संघटन, समता आणि संस्कृतीचे मूल्य जपणारे हे केंद्र भविष्यात गावाच्या सर्वांगीण विकासाचे प्रतीक ठरेल. हा उपक्रम समाजाला एकत्र बांधणारा, प्रेरणा देणारा आणि नवचैतन्य निर्माण करणारा ठरेल, असा विश्वास यावेळी बोलताना आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केला. यावेळी येथीलच सामाजिक न्याय विभागाच्या निधीतून तयार करण्यात आलेल्या समाज भवनाचेही आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी गावकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. 

  • municipal officer misconduct । मनपा कार्यालयातच लोकशाहीची गळचेपी? ज्येष्ठ नागरिकाला म्हटले ‘गेट आउट”

    municipal officer misconduct

    पालकमंत्री उईके यांच्याकडे तक्रार, पालकमंत्र्यांनी दिले ‘हे आदेश”

    municipal officer misconduct : चंद्रपूर – महानगरपालिका चंद्रपूर येथील वाघोबा चौक तुकूम, नोकरकर ले आउट येथील 76 वर्षीय जेष्ठ नागरिकांस उप आयुक्तांनी मनपा कार्यालयातून गेट आउट केल्यामुळे अपमानित झालेल्या व्ही. वाय. लिचडे यांनी चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांचेकडे तक्रार नोंदवून मनपा उपआयुक्त खवले यांचेवर कारवाईची मागणी केलेली आहे.

    तुकूम अपघात प्रकरणातील दोषी वाहन चालक व मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

    मनपा अतिक्रमण विभाग कर्मचाऱ्याने अतिक्रमणाचे कारण पुढे करून नाहरकत ठिकाणी असलेली संरक्षण भिंत कां पाडली याची शहानिशा करण्यासाठी दिनांक 07/04/2025 रोजी मनपा कार्यालयात “लोकशाही” दिनी आपली तक्रार घेवून गेलेल्या जेष्ठ नागरिक व्ही. वाय. लिचडे यांना मनपा उपायुक्तानी कार्यालयातून गेट आउट केले.

    लोकशाही दिनी आपली कैफियत प्रभाविपणे मांडण्याचा संवैधानिक अधिकार असतांना तक्रारकर्ते लिचडे यांना गेट आउट करने म्हणजेच त्यांच्या अधिकारावर घाला घालणे होय. constitutional rights of senior citizens

    पालकमंत्र्यांचे आदेश काय?

    जेष्ठ नागरिक व्ही. वाय. लिचडे यांच्या म्हणण्यानुसार मनपा अतिक्रमन विभागातील अधिकाऱ्यांनी तक्रारकर्त्यांची नाहरकत संरक्षण भिंत नकळत पाडली असेल तर त्याची नुकसान भरपाई त्यांना मिळणे स्वाभाविक आहे आणि ते लिचडे यांना अविलंब मिळाले पाहिजे. मनपा उपायुक्त खवले यांनी जेष्ठ नागरिकांस लोकशाही दिनी कार्यालयातून गेट आउट म्हणून अपमानास्पद वागणूक दिल्याबद्दल संबंधित बाबींची तपासणी करून कार्यवाही करावी.असे आदेश जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा.डॉ.अशोक उईके यांनी मनपा आयुक्त महानगरपालिका चंद्रपूर यांना दिले आहे.

  • The crime of culpable homicide । तुकूम अपघात – ट्र्क चालक व मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा – युवतीसेना चंद्रपूर

    The crime of culpable homicide

    मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत मृतक व जखमीला आर्थिक मदत द्या – रोहिणी पाटील

    The crime of culpable homicide : चंद्रपूर – चंद्रपूर शहरातील तुकूम येथे २ जून रोजी अनियंत्रित हायवा ट्र्क ने वाहनांना धडक देत २ तरुणींना चिरडले यामध्ये एका तरुणीचा जागीच मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाली. या दुर्दैवी घटनेनंतर सुद्धा हायवा ट्र्क चालक व मालकावर अजूनही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला नाही, यावर चंद्रपूर युवतीसेनेने जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांची भेट घेतली. ubt yuvatisena

    पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी ग्रामीण भागातून सानिका कुमरे व काजल आत्राम या चंद्रपूरमध्ये राहत होत्या, २ जून रोजी अभ्यासिकेतून परत जाताना तुकूम येथे सानिका कुमरे ला हायवा ट्रक ने चिरडले. या अपघातात सानिका जागीच ठार झाली तर काजल गंभीर जखमी झाली होती. पोलीस बनण्याचे स्वप्न बघणाऱ्या दोन्ही तरुणींचे स्वप्न धुळीस मिळाले. यावर ठाकरे गट शिवसेना युवासेनेच्या सहसचिव व युवती सेना जिल्हाधिकारी रोहिणीताई पाटील यांनी याबाबत जखमी काजल आत्राम ची भेट घेत तिला धीर दिला. culpable homicide accidental death

    ठोस पुरावे तरीपण कारवाई नाही, आप ने दिला आंदोलनाचा इशारा

    युवतीसेना ने घेतला पुढाकार

    ६ जून रोजी रोहिणी पाटील यांनी पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांची भेट घेत या घटनेला जबाबदार ट्रक चालक व मालक यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. घटनेला जबाबदार ट्र्क चालकावर दारूचे गुन्हे दाखल असल्याची माहिती सुद्धा पोलीस अधीक्षकांना दिली, जर घटनेच्या वेळी चालकाला फिट आली होती तर अनफिट चालकाला कामावर ठेवणाऱ्या मालकावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे अशी मागणी पाटील यांनी यावेळी केली. यावर पोलीस अधीक्षकांनी चौकशी करण्याचे आश्वासन दिले. news chandrapur

    जिल्हाधिकारी विनय गौडा यांची रोहिणी पाटील यांनी भेट घेत मृतक सानिका कुमरे व जखमी काजल आत्राम यांना मुख्यमंत्री सहायता निधी मार्फत आर्थिक मदत देण्याची मागणी केली. तसेच जखमी काजल आत्राम यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला परंतु तिची चालण्याची सुद्धा परिस्थिती नव्हती ही बाब जिल्हाधिकारी यांच्या समोर मांडली त्यांनी तात्काळ आदिवासी प्रकल्प अधिकारी यांना हॉस्पिटलला जाऊन चौकशी करायला सांगितले. The crime of culpable homicide

    प्रोजेक्ट ऑफिसर विकास नक्षलवार यांनी स्वतः जखमी काजल आत्राम यांची परिस्थिती बघितली व त्यांनी हॉस्पिटल मधे डॉक्टरांशी बोलून परत काही दिवस जोपर्यंत ती ठीक होईल तोपर्यंत रुग्णालयात ठेवण्याचे सांगितले .दोघांच्या घरची परिस्थिती हि बेताची आहे. त्यांना लवकरात लवकर मदत मिळावी याकरिता जिल्हाधिकारी यांनी पुढाकार घ्यावा अशी मागणी करण्यात आली. गौडा यांनी यावर सकारात्मकता दर्शवित याबाबत लवकर पाठपुरावा करू असे आश्वासन दिले.

    जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना भेटण्याकरिता गेलेल्या शिष्टमंडळात युवासेना सहसचिव, युवती सेना जिल्हाधिकारी रोहिणीताई पाटील, युवतीसेना उपजिल्हा अधिकारी धनश्री प्रभा हेडाऊ, युवती जिल्हा चिटणीस रोशनी ध्रुव गोलदार, सौरभ बोढे, सानिका फरकडे, पायल लसंते, शिव राठोड, लोचना वेलके, निधी झाडे, कुणाल मासिरकर, अतुल वांढरे, गौरव आव्हडे, अभिषेक त्रिशूले, निलेश वनकर, वैशू दादांजे, साहिल शेख, संदीप राठोड, आतिष टेकाम, सूरज मोरे, मनीष भोयर, संजना पेंदाम, दिलीप आत्राम, मुकेशकुमार इचारवार, गोविंदा मडावी, प्रीती सलाम व काजल वेलादी उपस्थित होते.

    “२ जून रोजी तुकूम भागात झालेल्या या दुर्दैवी अपघातात पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणीला आपला जीव गमवावा लागला, एक तरुणी जखमी झाली मात्र ट्र्क चालक हा राजकीय पक्षाशी संबंधित असल्याने त्याला वाचविण्याचे प्रयत्न युद्ध पातळीवर सुरु झाले. एकही राजकीय पक्ष या घटनेवर स्पष्ट बोलू शकत नाही आहे, कारण राजकीय दबाव, ती गरीबाची लेक होती म्हून तिला न्याय मिळणार नाही का? पोलीस बनण्याचे स्वप्न धुळीस मिळाले आता न्यायासाठी मृत्यूनंतर सुद्धा तिला यातना सहन कराव्या लागत आहे. चंद्रपुरातील वातावरण हे गलिच्छ राजकारणामुळे नासून गेले.’

  • no FIR filed despite evidence । ठोस पुरावे असूनही FIR नाही; आप ने दिला खळखळ्खट्याक आंदोलनाचा इशारा

    no FIR filed despite evidence

    no FIR filed despite evidence : चंद्रपूर महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराचा (chandrapur mahanagarpalika corruption)अजून एक काळा अध्याय समोर आला आहे. कोहिनूर ग्राउंड येथील नागरिकांच्या फिरण्यासाठी तयार केलेल्या ट्रॅकवरील शासकीय पेव्हर्स अर्बन एनव्हायरॉन कंपनीने चोरून स्वतःच्या खासगी कार्यालयात लावले आहेत. यासंदर्भात दि. १६ मे रोजी पालिका आयुक्तांना तक्रार व ठोस पुरावे (फोटो, व्हिडीओ) सादर करूनही अद्याप कोणतीही FIR नोंदवण्यात आलेली नाही.

    माजी सैनिकाने दिला आमरण उपोषणाचा इशारा

    गाडीत टाकून नेले ती चोरी नाही

    याप्रकरणी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री. चंदन पाटील यांची भेट घेतली असता, त्यांनी अत्यंत उद्धटपणे व निष्काळजीपणे उत्तर दिले की, “पेव्हर्स गाडीत टाकून नेले, त्याला चोरी म्हणता येत नाही.” हे उत्तर म्हणजे जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रयत्न आहे आणि यामधून पालिका प्रशासनाचा भ्रष्ट चेहरा पुन्हा एकदा उघड झाला आहे.

    महानगरपालिकेतील संपूर्ण यंत्रणा भ्रष्टाचाराने पोखरलेली असून, हे अधिकारी स्वतःला कोणीही वाकडं करू शकत नाही अशा भ्रमात आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांकडून महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराबाबत सातत्याने आवाज उठवला जात आहे. मात्र अधिकारी वर्गाची मानसिकता इतकी बधीर झाली आहे की, सामान्य जनतेच्या हक्कांची खुलेआम पायमल्ली केली जात आहे.

    शासकीय संपत्तीवर डल्ला

    ही घटना केवळ पेव्हर्स चोरीची (Pavers theft) नसून, ती सामान्य जनतेच्या हक्कांवर आणि शासकीय संपत्तीवर डल्ला मारण्याची लक्षणीय घटना आहे. जर सामान्य नागरिक काही चूक करतो, तर प्रशासन त्याच्यावर कठोर कारवाई करते. पण एवढा मोठा प्रकार उघडपणे घडूनही महानगरपालिका शांत का आहे? यामागे गुप्त सांठगांठ व भ्रष्टाचाराचा गंभीर वास येतो.

    आज दिनांक ६ जून २०२५ रोजी आम आदमी पक्षाच्या (Aam Aadmi party) वतीने जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना या गंभीर घटनेबाबत सविस्तर तक्रार अर्ज सादर करण्यात आला.
    या वेळी उपस्थित होते:
    👉 मयूर राईकवार (जिल्हाध्यक्ष),
    👉 राजू कूडे (युवा जिल्हाध्यक्ष),
    👉 योगेश गोखरे (शहर अध्यक्ष),
    👉 प्रशांत सिदुरकर (जिल्हा सचिव),
    👉 संतोष बोपचे (महानगर संगठन मंत्री),
    👉 एड. तबस्सुम शेख (शहर महिला अध्यक्ष),
    👉 हांडेकर गुरुजी (शहर पदाधिकारी),
    👉 विशाल बिरमवार (शहर पदाधिकारी)
    आणि इतर पदाधिकारी व कार्यकर्ते.

    या घटनेबाबत जर पुढील ८ दिवसांत कोणतीही शासकीय कार्यवाही झाली नाही, तर आम आदमी पक्ष चंद्रपूर जिल्हा तर्फे अभिनव आणि बहिरे असल्याचे सॉन्ग करणाऱ्या भ्रष्ट अधिकार्‍यांचा विरोधात तीव्र व ‘खडकट्याक आंदोलन’ करण्यात येईल, असा जबरदस्त इशारा आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांनी दिला आहे.

    हा लढा केवळ भ्रष्टाचाराविरोधात नाही, तर सामान्य जनतेच्या न्यायासाठी आहे. आम आदमी पक्ष शेवटच्या श्वासापर्यंत या लढ्याला न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहे.

  • local security guards losing jobs । स्थानिकांना डावलले! सुरक्षा रक्षकांसाठी अन्नत्याग आंदोलनाचा इशारा

    local security guards losing jobs

    local security guards losing jobs : चंद्रपूर – टाकळी जेनाच्या अरविंदो रियल्टी एंड इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने (Aurobindo Realty and Infrastructure Private Limited Company) माजी सैनिक आणि सामाजिक कार्यकर्ते मनोज ठेंगणे यांच्या मेपल 365 सुरक्षा सेवा प्रा. लि. मधील सर्व सुरक्षा रक्षकांना काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे 74 स्थानिक सुरक्षा रक्षकांना बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे. या संदर्भात, मनोज ठेंगणे यांनी पत्रकार परिषदेत संकेत दिले आहेत की जर संबंधित सुरक्षा रक्षकाची नोकरी कायम केली नाही तर 20 जून रोजी कंपनीसमोर उपोषण केले जाईल. Fast unto death

    विद्यार्थ्यांसाठी एक खिडकी योजना राबवा – आमदार जोरगेवार


    पत्रकार परिषदेत मनोज ठेंगणे यांनी सांगितले की, टाकळी जेनाच्या अरविंदो रियल्टी अँड इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ही कोळसा खाण कंपनी आहे. या कंपनीने ऑगस्ट 2023 मध्ये मॅपल 365 सिक्युरिटी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडचे ​​संचालक आणि (ex-serviceman) माजी सैनिक मनोज ठेंगणे यांच्याशी सुरक्षेसाठी करार केला होता. या सुरक्षा कंपनीअंतर्गत टाकळी आणि जेना गावातील स्थानिक नागरिकांमधून एकूण 74 रक्षक कंपनीच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले होते.

    करार रद्द केला

    सर्व स्थानिक लोक सुरक्षा एजन्सीमध्ये कार्यरत आहेत. परंतु अलीकडेच कंपनीने या सुरक्षा कंपनीसोबत केलेला करार रद्द केला आहे. या संदर्भात एक मेल देखील पाठवण्यात आला आहे. सुरक्षा सेवा कंपनीचे संचालक मनोज ठेंगणे यांनी आरोप केला आहे की अरविंदो कंपनीच्या अशा प्रकारच्या धोरणामुळे सुरक्षेसाठी तैनात असलेले 74 स्थानिक सुरक्षा रक्षक बेरोजगार होतील. त्यांनी सांगितले की अरविंदो कंपनी आता बिहारच्या एसआयएस सिक्युरिटी एजन्सीसोबत करार करणार आहे.

    74 स्थानिक सुरक्षा रक्षकांवर अन्याय

    संबंधित कंपनीने नागपूर, यवतमाळ, वर्धा, भंडारा येथील 60 सुरक्षा रक्षकांना कंपनीच्या आवारात आणले आहे. कोणत्याही कंपनीत स्थानिकांना प्राधान्य देण्याच्या सरकारने दिलेल्या सूचना असूनही, अरविंदो कंपनी त्याकडे दुर्लक्ष करत आहे. अरविंदो कंपनी आता विस्तार वाढत आहे. अशावेळी इतर राज्यांतील सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करून आम्हा 74 स्थानिक सुरक्षा रक्षकांवर अन्याय केला जात आहे. स्थानिक सुरक्षा रक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी 20 जूनपासून कंपनीसमोर अन्नत्याग उपोषण करणार असल्याचा इशारा माजी सैनिक आणि सामाजिक कार्यकर्ते मनोज ठेंगणे यांनी पत्रकार परिषदेद्वारे दिला आहे.

  • how to reduce acidity in morning naturally । सकाळच्या आम्लतेमुळे त्रस्त आहात? हे उपाय तुमचं जीवन बदलू शकतात!

    how to reduce acidity in morning naturally

    how to reduce acidity in morning naturally : आरोग्यवार्ता – सकाळी पोटात अ‍ॅसिडिटीची समस्या केवळ शारीरिक अस्वस्थता निर्माण करत नाही तर आपल्या कार्यक्षमतेवर आणि मूडवरही वाईट परिणाम करते. या लेखात आपण ती त्वरित बरी करण्यासाठी काही उपायांबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया.

    आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे आणि अनियमित दिनचर्येमुळे आपल्या आरोग्यावर अनेक नकारात्मक परिणाम झाले आहेत, त्यापैकी एक सामान्य समस्या म्हणजे सकाळी उठताच पोटात जळजळ किंवा आम्लता येणे. ही केवळ एक छोटी समस्या नाही तर दिवसाची सुरुवात पूर्णपणे खराब करू शकते आणि आपल्याला अस्वस्थ वाटू शकते. रात्रीच्या विश्रांतीनंतर जेव्हा तुम्हाला तीव्र जळजळ, आंबट ढेकर किंवा पोटात जडपणा जाणवतो, तेव्हा तुम्ही हे समजून घेतले पाहिजे की हे अनियमित खाण्याच्या सवयी, वाढता ताण आणि चुकीच्या जीवनशैलीचा थेट परिणाम आहे. ayurvedic remedies for acid reflux in morning

    पुरेशी झोप झाली तरीही शरीर थकलेलं? हे उपाय करा

    या समस्येमुळे केवळ शारीरिक अस्वस्थताच येत नाही, तर आपल्या कार्यक्षमतेवर आणि मनःस्थितीवरही वाईट परिणाम होतो. पोटात आम्ल उत्पादन सामान्यपेक्षा जास्त झाल्यावर आम्लपित्त येते, ज्यामुळे घशात जळजळ होते. ही स्थिती टाळण्यासाठी, आपल्या सवयींकडे लक्ष देणे खूप महत्वाचे आहे. योग्य वेळी योग्य अन्न, पुरेशी झोप आणि ताण व्यवस्थापन या समस्येपासून मुक्तता मिळवू शकते. परंतु जर तुम्हाला त्वरित उपाय हवा असेल, तर या लेखातील काही सोप्या उपायांबद्दल आम्हाला माहिती द्या जेणेकरून तुम्ही या समस्येपासून कमी वेळात मुक्त होऊ शकाल. best foods to eat in morning for acidity

    थंड दुधाचे सेवन करा

    थंड दूध हे आम्लपित्त त्वरित कमी करण्यासाठी एक प्रभावी उपाय आहे. दुधात असलेले कॅल्शियम आणि प्रथिने पोटातील अतिरिक्त आम्ल निष्क्रिय करतात, ज्यामुळे छातीत जळजळ आणि आंबट ढेकर कमी होतात. सकाळी रिकाम्या पोटी किंवा आम्लपित्त झाल्यावर हळूहळू एक ग्लास थंड दूध प्या. लक्षात ठेवा की दूध कमी चरबीयुक्त असावे, कारण जास्त चरबीयुक्त दूध पचनक्रिया मंदावू शकते. morning acidity home treatment without medicine

    आल्याचा चहा

    आल्यामध्ये दाहक-विरोधी आणि पाचक गुणधर्म असतात, जे आम्लता कमी करतात. आल्याचा चहा पोटात आम्ल उत्पादन नियंत्रित करतो आणि पचनसंस्थेला शांत करतो.

    बडीशेप

    बडीशेप पाणी हे पचनसंस्थेसाठी रामबाण औषध आहे. बडीशेपमध्ये अॅनेथोल आणि इतर संयुगे असतात, जे पोटाची जळजळ कमी करतात आणि गॅस आणि अपचन कमी करतात.

    कोमट पाणी

    सकाळी होणाऱ्या अ‍ॅसिडिटीपासून आराम मिळवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे कोमट पाणी पिणे. ते पोटात साचलेले विषारी पदार्थ बाहेर काढते आणि पचनसंस्थेला आराम देते.

    NEWS ३४ लेखात दिलेल्या माहितीसाठी कोणताही दावा करत नाही किंवा कोणतीही जबाबदारी घेत नाही. वरील लेखात नमूद केलेल्या संबंधित आजाराबद्दल अधिक माहितीसाठी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

  • tobacco smuggling news update । बाबुपेठ येथील युवकाकडून लाखोंचा तंबाखू जप्त

    tobacco smuggling news update

    tobacco smuggling news update : राजुरा – ५ जून रोजी राजुरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलिसांनी ५ लक्ष ९९ हजारांचा सुगंधित तंबाखू सहित एकाला अटक करण्यात आली आहे. याबाबत राजुरा पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती. police tobacco seizure

    आज ५ जून रोजी राजुरा पोलिसांनी संविधान चौकात नाकेबंदी केली होती, यादरम्यान ऑटो क्रमांक MH३४ D ६३३९ ला थांबवित त्याची झडती घेतली असता त्यामध्ये प्रतिबंधित सुगंधित तंबाखू ईगल हुक्का, होला हुक्का, विमल पान मसाला असा एकूण ५ लक्ष रुपयांच्या मालासहित गुन्ह्यात वापरलेला ऑटो एकूण किंमत ५ लक्ष ९९ हजार ३२६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

    महिलांनो सावध व्हा- भद्रावतीमध्ये चैन स्नॅचिंग ची घटना

    यावेळी पोलिसांनी ऑटो चालक अविनाश आबाजी शेंडे राहणार बाबुपेठ चंद्रपूर याला ताब्यात घेतले आहे.आरोपीविरुद्ध अन्न व सुरक्षा मानके कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास राजुरा पोलीस करीत आहे.

    प्रशासनाचे दुर्लक्ष

    वर्ष २०१२ पासून राज्यात प्रतिबंधित असणारा सुगंधित तंबाखू चंद्रपूर जिल्ह्यात सर्रासपणे विकल्या जात आहे, चंद्रपूर शहरातील प्रत्येक चौकात खर्रा यामध्ये हा सुगंधित तंबाखू मिक्स करण्यात येतो. मात्र अन्न व औषध प्रशासन या माफियांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे.

    सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सुमित परतेकी यांच्या नेतृत्वात पोउपनि भीष्मराज सोरते, पोलीस कर्मचारी पांडुरंग हाके, विक्की निवार्ण, प्रभाकर कोराम, जुमनाके, महेश बोलगोडवार,अविनाश बांबोळे, शफिक शेख, आनंद मोरे व शरद राठोड यांनी केली.

  • Chain snatching incident Bhadravati । सावध व्हा! भद्रावतीत चेन स्नॅचिंगची घटना, तीन आरोपी पकडले

    Chain snatching incident Bhadravati

    Chain snatching incident Bhadravati : भद्रावती – २० मे रोजी भद्रावती शहरातील शास्त्रीनगर भागात महिलेच्या गळ्यातील सोन जबरीने हिसकावून नेल्याची घटना घडली होती, याबाबत पोलिसात तक्रार दिल्यावर भद्रावती पोलिसांनी या प्रकरणात २ आरोपीसह विधिसंघर्ष बालकाला ताब्यात घेत त्यांच्याकडून सोन्याची चैन जप्त करण्यात आली. Bhadravati police arrest chain snatchers

    राज्यातील पहिले वन नियंत्रण कक्ष चंद्रपुरात

    २० मे रोजी भद्रावती शहरातील शास्त्रीनगर वार्ड मध्ये रात्री ८ ते ८.३० च्या दरम्यान फिर्यादी महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन अज्ञात युवकांनी जबरीने हिसकावली, याबाबत महिलेने भद्रावती पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

    अल्पवयीन बालकाचा गुन्ह्यात समावेश

    पोलिसांनी गुन्हा दाखल करीत तपास सुरु केला असता या प्रकरणी १९ वर्षीय थॉमस अशोक दुधे राहणार नवीन सुमठाना, दानिश बेग राहणार डोलारा तलाव व एका १७ वर्षीय विधी संघर्ष बालकाला ताब्यात घेण्यात आले.

    आरोपीजवळून पोलिसांनी चोरी गेलेली १५ ग्राम सोन्याची चैन असा एकूण १ लक्ष ५० हजार रुपयांचा माल हस्तगत केला. घटनेचा पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे.

    सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू, उपविभागीय पोलीस अधिकारी न्योमी साटम यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक लता वाडिवे यांच्या नेतृत्वात पोउपनि गजानन तुपकर, पोलीस कर्मचारी महेंद्र बेसरकर, अनुप आसटूनकर, जगदीश झाडे, विश्वनाथ चुदरी, खुशाल कावळे व योगेश घाटोळे यांनी केली.