Tag: MH34

  • Air India 787 crash Ahmedabad । अहमदाबादमध्ये एअर इंडिया 787 कोसळले! उड्डाणाच्या क्षणीच स्फोट – 242 प्रवाशांचा मृत्यू?

    Air India 787 crash Ahmedabad

    Air India 787 crash Ahmedabad : गुजरातमधील अहमदाबादमध्ये एका विमानाला अपघात झाला आहे. लंडनला जाणारे हे विमान विमानतळ परिसरातच कोसळले, त्यामुळे मोठा स्फोट झाल्यानंतर धुराचे लोट चहुबाजूने पसरले.

    गुरुवारी (१२ जून) दुपारी गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाचे प्रवासी विमान बोईंग ड्रीमलायनर ७८७ कोसळले, ज्याचे भयानक फोटो समोर येत आहेत. अहमदाबादच्या मेघानीनगर भागात आगीच्या प्रचंड ज्वाळा दिसल्या. त्याच वेळी दूरवरून काळ्या धुराचे लोट दिसत होते. या विमानात २४२ प्रवासी होते. सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. Ahmedabad plane crash London flight

    सोनम बेवफा है

    हे ड्रीमलायनर बोईंग ७८७ लंडनला जात होते. अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण करताना जवळच्या इमारतीला किंवा भिंतीला धडकल्याने विमान कोसळले.

    सुरुवातीच्या माहितीनुसार, सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर हा दुर्दैवी अपघात झाला. विमानतळाच्या सीमेजवळ विमान कोसळल्याचे मानले जात आहे. समोर आलेल्या सुरुवातीच्या छायाचित्रांमध्ये विमानाचे तुकडे झाले असल्याचे दिसून येते. मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. Air India plane crash residential area Ahmedabad

    विमानाचा पंख तुटला

    चित्रात दिसत आहे की विमानाचा एक पंख तुटून पडला आहे. अग्निशमन दलाचे जवान पाणी फवारून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. सध्या आग काही प्रमाणात आटोक्यात आली आहे. ही दुर्घटना घडली तेव्हा विमान विमानतळावरून उड्डाण घेत होते.

    सर्वत्र गोंधळाचे वातावरण आहे, हा भीषण अपघात पाहून लोक घाबरले आहेत आणि इकडे तिकडे धावत आहेत. विमान पूर्णपणे खराब झाले आहे. विमानाचा बहुतांश भाग जळून राख झाला आहे. ज्या इमारतीवरून विमान पडले त्या इमारतीचेही नुकसान झाले आहे.

    विमानतळाजवळ एक सिव्हिल हॉस्पिटल आहे, जिथे सर्व डॉक्टरांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत उपलब्ध माहितीनुसार, अहमदाबादहून उड्डाण केलेले हे विमान लंडनच्या दिशेने जात होते.

  • Illegal school in Chandrapur । चंद्रपूरच्या विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात? शाळेवर कारवाईचा अल्टीमेटम!

    Illegal school in Chandrapur

    Illegal school in Chandrapur : चंद्रपूर – शासकीय सैनिक शाळेच्या जवळच “SSCN सैनिक स्कूल चंद्रपूर” नावाने बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या खासगी शाळेविरोधात आम आदमी पार्टी, चंद्रपूर यांच्यावतीने शिक्षण विभागाला निवेदन देत कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. सदर शाळेस कोणतीही शासकीय मान्यता, परवाना अथवा UDISE क्रमांक नसतानाही ती निर्बंध न पाळता खुलेआम प्रवेश प्रक्रिया राबवते आहे. unauthorised school in Chandrapur SSCN

    या गंभीर प्रकाराची माहिती मिळताच राजू कुडे – युवा जिल्हाध्यक्ष, आम आदमी पार्टी, चंद्रपूर यांनी शिक्षण अधिकारी (प्राथमिक) यांना निवेदन सादर केले. त्यानंतर शिक्षण अधिकारी (प्राथमिक), शिक्षण अधिकारी (माध्यमिक) आणि SSCN शाळेचे प्रतिनिधी यांच्यासोबत आम आदमी पार्टीच्या शिष्टमंडळाची संयुक्त बैठक पार पडली.

    माझी आई बेपत्ता, चंद्रपूर पोलिसांवर गंभीर आरोप

    या बैठकीत, सदर शाळेला नव्या प्रवेशांना मनाई करण्यात आली असून, लवकरच कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन शिक्षण अधिकारी (माध्यमिक) यांनी दिले.

    तर शिक्षण विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन

    पालकांची फसवणूक आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी बेकायदेशीर शाळांविरोधात तात्काळ कारवाई होणे आवश्यक आहे. नियमबाह्य शिक्षण संस्था चालवणे हे कायद्याच्या चौकटीत गुन्हा असून अशा प्रकारांवर ठोस पावले उचलणे आवश्यक आहे. जर ८ दिवसांत योग्य कारवाई न झाल्यास आम आदमी पार्टीच्या वतीने शिक्षण विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा स्पष्ट इशारा राजू कुडे यांनी दिला आहे.


    यावेळेस आपचे वरिष्ठ नेते सुनील मुसळे, जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार, युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे, महानगर अध्यक्ष योगेश गोखरे, महिला महानगर अध्यक्षा ऍड. तब्बसूम शेख, महानगर संघटनमंत्री संतोष बोपचे, प्रशांत सिदूरकर, स्नेहल नगराळे, इत्यादी उपस्थित होते.

  • dispute over money । “हिशोब दे ना!” एवढंच म्हणणं जीवावर बेतलं… चौकातच झाली हत्या!

    dispute over money

    dispute over money : मूल:-पैशाच्या हिशोबावरून झालेल्या क्षुल्लकशा कारणावरून कोंबडी कापण्याच्या सत्तूरणे सपासप वार करून एका युवकाची भर चौकात हत्या करण्यात आली. घटनेने तालुक्यात एकच खळबळ माजली आहे. ही घटना मूल तालुक्यातील मारोडा येथे बुधवारी दुपारी १२ वाजता दरम्यान घडली. man killed in broad daylight with cleaver

    शंतनु मूर्लिधर येरणे वय २२ वर्ष रा.मारोडा असे मृत व्यक्तीचे नाव आहे.तर अमित अनिल निकेसर वय ३२ वर्ष रा.मारोडा असे आरोपीचे नाव आहे.अमित निकेसर यांचे मारोडा येथे अमित चिकन सेंटर नावाने चिकन विक्रीचे दुकान असून रेतीचा व्यवसाय आहे. शंतनु येरणे हा अमितकडे दिवांजीचे काम करीत होता.

    सोनम बेवफा है

    महसूल विभागाकडून घरकुल लाभार्थ्यांना रेती वाटप सुरू असल्याने अमितने घरकुल लाभार्थ्यांना रेतीचा पुरवठा केला होता.शंतनु सकाळी रेतीची वसुली करून अमितकडे हिशोब देत असताना दोघांमध्ये किरकोळ शाब्दिक बाचाबाची झाली.वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्याने अमितने चिकन सेंटर मधील कोंबड्या कापण्याच्या सत्तूरने शंतनुच्या पोटावर,छातीवर सपासप वार जागीच ठार केले.

    वाद सोडविण्यासाठी आलेल्या शंतनुचे वडील सुध्दा जखमी झाले.घटनेनंतर आरोपीने मूल पोलीस स्टेशन गाठून पोलिसांना घटनेची आपबिती सांगीतली.पोलिसांनी आरोपीला अटक करून घटनेचा पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मूल उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.पुढील तपास मूल पोलीस करीत आहेत.

    गुन्हेगारी रोखण्याचे पोलिसांसमोर आव्हान

    मूल तालुक्यातील ११ महिन्यात चार हत्येच्या घटना घडल्या.गुन्हेगारीच्या घटनांनी नागरिकांत दहशतीचे वातावरण पसरले असून गुन्हेगारी रोखण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.सध्या मूल पोलीस स्टेशन मधील पोलीस निरीक्षकांचे पद रिक्त असून प्रभारी अधिकाऱ्यांच्या खांद्यावर कारभार हाकणे सुरू आहे.त्यामुळे प्रभारी अधिकारी वाढती गुन्हेगारी रोखण्याचे आव्हान पेलतील काय?असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

  • sonam raghuwanshi । होय “मीचं मारलं राजा ला’, गुन्ह्याची कबुली! सोनम बेवफा

    sonam raghuwanshi

    sonam raghuwanshi : NEWS३४ वृत्तसेवा – मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या चर्चित राजा रघुवंशी हत्याकांडात सोनम ने गुन्हा कबूल करीत आपण हत्येत सहभागी असल्याचे मेघालय पोलिसांना सांगितले. तिने प्रियकर राज कुशवाहा समोर आपला गुन्हा कबूल केल्याची माहिती पुढे आली आहे. honeymoon murder case

    चंद्रपुरातील टायगर सफारी होणार जागतिक दर्जाची

    इंदूरहून पत्नीसोबत हनिमून साजरा करण्यासाठी शिलाँगला गेलेल्या राजा रघुवंशीच्या हत्येप्रकरणी एक मोठा खुलासा झाला आहे. एसआयटी चौकशीदरम्यान आरोपी सोनम रघुवंशीने तिचा गुन्हा कबूल केला आहे. सर्व पुरावे सादर करून सोनमची चौकशी केली जात आहे आणि चौकशीदरम्यान सोनम म्हणाली की हो, तिचा पती राजा रघुवंशीच्या हत्येच्या कटात तिचा सहभाग होता. मेघालय पोलिसांनी सोनम रघुवंशी आणि तिचा प्रियकर राज कुशवाह यांना समोरासमोर आणले तेव्हा सोनम खचून पडली आणि तिने तिचा पती राजा कुशवाहाच्या हत्येच्या कटात सहभागी असल्याचे कबूल केले. पोलिसांनी दोघांनाही ठोस पुराव्यांसह समोरासमोर बसवून चौकशी केली. shocking honeymoon crime in Shillong

    honeymoon murder

    लग्नानंतर पत्नी सोनम रघुवंशीसोबत हनिमून साजरा करण्यासाठी २३ मे रोजी शिलाँगमधील सोहरा येथे गेलेल्या राजा रघुवंशीच्या हत्येच्या तपासात मेघालय पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. पोलिसांनी ४२ सीसीटीव्ही फुटेज, रक्ताने माखलेले जॅकेट, सोनमचा रेनकोट आणि सर्व प्रकारचे पुरावे सादर केले आणि राज कुशवाहालाही समोर बसवले. हे सर्व पुरावे पाहून सोनम पूर्णपणे खचली आणि तिने कबूल केले की तिने राज कुशवाहा आणि इतर तीन आरोपींसह राजाच्या हत्येचा कट रचला होता आणि त्याची हत्या करण्यात आली.

    सात जन्माची साथ ?

    पोलिस तपासात असे दिसून आले की सोनम राजाला हनिमूनच्या बहाण्याने शिलाँगला घेऊन गेली होती, तिने तिच्या सासूला खोटे सांगितले की ती अपरा एकादशीचे व्रत करत आहे, तर हॉटेलच्या रेकॉर्डवरून तिने जेवण केल्याचे दिसून आले. यासोबतच, हत्या केल्यानंतर, सोनमने राजाच्या सोशल मीडिया अकाउंटवरून ‘सात जन्मों का साथ है’ असे पोस्ट करून तपासाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. गुवाहाटी रेल्वे स्थानकाजवळून पोलिसांनी हत्येत वापरलेले शस्त्र देखील जप्त केले.

    कोण कोण या कटात सामील?

    मेघालयातील सोहरा येथे राजाच्या हनिमून दरम्यान हत्या करण्याचा कट रचल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी सोमवारी सोनमला अटक केली. सोनमने सुपारी दिलेल्या माणसांनी राजाची हत्या केल्याचा आरोप आहे. सोनमने उत्तर प्रदेशातील गाजीपूरमधील नंदगंज पोलिस ठाण्यात पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. यापूर्वी आकाश राजपूत (१९), विशाल सिंग चौहान (२२) आणि राज सिंग कुशवाह (२१) या तीन हल्लेखोरांना अटक करण्यात आली होती.

  • tiger safari project in Chandrapur । 🌏 ऑस्ट्रेलियन व अफ्रिकन प्राण्यांचं आकर्षण – चंद्रपूर सफारी बनणार जागतिक दर्जाचं ठिकाण!

    tiger safari project in Chandrapur

    tiger safari project in Chandrapur : चंद्रपूर – चंद्रपूरमध्ये प्रस्तावित असलेल्या टायगर सफारी प्रकल्पास गती देण्यासाठी मुंबई येथील मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या बैठकीत आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूरच्या पर्यटनवाढीसाठी आणि स्थानिक युवकांसाठी रोजगारनिर्मितीच्या दृष्टीने या प्रकल्पाची अत्यंत आवश्यकता असल्याचे स्पष्टपणे मांडले. त्यांच्या सूचनांनुसार वनमंत्री गणेश नाईक यांनीही या प्रकल्पाबाबत सकारात्मकता दर्शवत निधी वितरणाची प्रक्रिया गतीमान करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

    आंब्याचा मोह जीवावर बेतला, वाघाच्या हल्ल्यात वृद्ध ठार

    या बैठकीस आमदार किशोर जोरगेवार, राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक आणि वन बल प्रमुख शोमिता बिस्वास, अप्पर मुख्य सचिव (वने) मिलिंद म्हसेकर, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक व समन्वय अधिकारी नरेश झुरमुरे, वनविकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर बोडे, महाव्यवस्थापक (मुख्यालय) बेऊला माथी, चंद्रपूरचे मुख्य वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर, उपवनसंरक्षक विवेक होसिंग तसेच महाराष्ट्र इको टुरिझम डेव्हलपमेंट बोर्डाचे सदस्य अरुण तिखे यांची उपस्थिती होती.

    chandrapur safari park development update

    चंद्रपूरच्या मूल रोडवरील वन अकादमीच्या मागील बाजूस १७१ हेक्टर क्षेत्रात टायगर सफारी प्रकल्प उभारण्यात येणार आहे. यासाठी 580 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. सदर प्रकल्पाचा आराखडा महाराष्ट्र वन विकास महामंडळाच्या अधिनस्त एफडीसीएम गोरवाडा झू लिमिटेड यांच्याकडे तयार करण्यासाठी देण्यात आला आहे.

    🎯 चंद्रपूरच्या टायगर सफारी प्रकल्पात कोणते प्राणी दिसणार? संपूर्ण यादी वाचाच!

    या प्रकल्पात ऑस्ट्रेलियन, साउथ अमेरिकन, साउथ आफ्रिका आणि इंडियन ट्रेल अश्या वेगवेगळ्या थीमवर आधारित प्राणीदर्शन झोन असतील. यामध्ये कॅंगारू, जग्वार, माकडे, कॅपीबारा, विविध रंगीबेरंगी पक्षी अशा अनेक विदेशी व देशी प्राणी पर्यटकांना पाहता येणार आहेत. याशिवाय ४४ हेक्टर क्षेत्रात वाहन सफारी आणि २० एकर क्षेत्रात चिल्ड्रन पार्क व इतर पर्यटकांसाठी सुविधा विकसित केल्या जाणार आहेत. Chandrapur safari park development update

    स्थानिकांना रोजगाराच्या संधी

    या प्रकल्पामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्रात मोठी वाढ होणार असून स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील. या संदर्भात आमदार किशोर जोरगेवार यांनी ताडोबाच्या सफारीसाठी लाखो पर्यटक चंद्रपूरला येतात. मात्र अनेकदा वाघाचे प्रत्यक्ष दर्शन होत नाही. नव्या टायगर सफारीमुळे पर्यटकांना हमखास वाघाचे दर्शन होईल, तसेच विदेशी प्राणीही पाहायला मिळतील. त्यामुळे चंद्रपूरच्या पर्यटनात लक्षणीय वाढ होऊन  जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल असा विश्वास व्यक्त केला. wildlife tourism jobs for locals

    या बैठकीत पुढील टप्प्याचे नियोजन आणि निधी वितरणाबाबत निर्णय घेण्यात आले. यावेळी वनमंत्री गणेश नाईक यांनी अधिकाऱ्यांना एफडीसीएम गोरवाडा झू लिमिटेडने तयार केलेल्या आराखड्याची सखोल व तांत्रिक तपासणी करण्यात यावी, कोणतीही त्रुटी राहू नये, याची पूर्ण काळजी घ्यावी. प्रस्तावित ट्रेल्समध्ये स्थानिक जैवविविधतेचा विचार करून पर्यावरणाचे संतुलन राखले जावे असे निर्देश दिले आहे. Chandrapur tourism new attractions

    ना. नाईक यांनी पुढे म्हणाले की, प्रकल्पातील प्रत्येक टप्प्यात पर्यटक, प्राणी आणि कर्मचारी यांची सुरक्षा सर्वोच्च असावी, चिल्ड्रन पार्क, भोजनगृहे, विश्रांतीगृहे, स्मृतीचिन्ह विक्री केंद्रे यासारख्या सर्व सुविधा जागतिक दर्जाच्या असाव्यात. तसेच प्रकल्पाची अंमलबजावणी नियोजनबद्ध व ठरलेल्या वेळेत पार पडावी, यासाठी सक्षम कार्ययोजना राबवली जावी असे ते म्हणाले.

  • dialysis machine in government hospital । चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयातील डायलेसिस विभागातील विस्तारीत कक्षाचे उद्घाटन

    dialysis machine in government hospital

    dialysis machine in government hospital : चंद्रपूर – जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपुर येथे डायलेसिस विभागातील विस्तारीत कक्षाचे उद्घाटन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते व आमदार किशोर जोरगेवार यांच्या उपस्थितीत नुकतेच करण्यात आले.

    १२ जून रोजी बालकामगार विरोधी दिवस


    कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग, मा.सां. कन्नमवार शास. वैद्य. महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, ताडोबा प्रकल्पाचे उपसंचालक (कोर) आनंद रेड्डी, अति. जिल्हा शल्य चिकित्सक भास्कर सोनारकर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमचंद कन्नाके आदी उपस्थित होते.

    free dialysis treatment in government hospital


    उद्घाटनप्रसंगी पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी डायलेसिस विभागातील वैद्यकिय अधिकारी व कर्मचारी यांच्या कामाची प्रशंसा करून पुढेही अशाच प्रकारचे काम करीत राहावे. तसेच रुग्णालयात आलेल्या रुग्णांवर वेळेत आणि चांगले उपचार करावे, अशा सुचना त्यांनी दिल्या. free dialysis treatment in government hospital


    डायलेसिस विभागामध्ये मासिक 550 ते 600 डायलेसिस होतात. सन 2024-25 या वर्षात एकूण 6368 डायलेसिस करण्यात आले. यासाठी चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयाने राज्यस्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त केला. जिल्हा रुग्णालयामध्ये सुरुवातीला 9 डायलेसिस मशीन कार्यान्वित होत्या. रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे 20 ते 24 रुग्ण हे प्रतिक्षाधीन होते. रुग्ण हा आरोग्य सेवेपासून वंचित राहू नये, या उदे्शाने पालकमंत्री डॉ. अशोक उईके तसेच जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा नियोजन समितीमधून 4 नवीन डायलेसिस मशीन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. डायलेसिस विभागाचे विस्तारीकरण झाल्यामुळे आता सर्व डायलेसिस रुग्णांना सेवा देता येईल व कोणत्याही रुग्णांना आर्थिक भुदंड बसणार नाही. dialysis facility in district hospital

    सध्या रुग्णालयात १३ डायलिसिस मशीन

    सामान्य रुग्णालयात सद्यस्थितीत 13 डायलेसिस मशीनद्वारे सेवा देण्यात येत असून प्रशिक्षित वैद्यकीय अधिकारी व नर्सिंग कर्मचारी येथे रुग्णांची सेवा बजावत आहेत. ही सेवा पूर्णपणे मोफत आहे. गरीब व गरजू रुग्णांना याचा मोठा लाभ होणार आहे. डायलेसिस विभाग हा जिल्ह्यातील आरोग्य सुविधांसाठी मैलाचा दगड ठरणार आहे. यामुळे अनेक रुग्णांना वेळेवर आणि योग्य उपचार मिळतील. तरी जास्तीत जास्त डायलेसिस रुग्णांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आरोग्य प्रशासनाने केले आहे. dialysis machine in government hospital

    चार रुग्णवाहिकांचेही लोकार्पण


    : जिल्हा सामान्य रुग्णालयात नव्याने दाखल झालेल्या चार नवीन रुग्णवाहिकांचे लोकार्पण पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर, खासदार डॉ. नामदेव किरसान, आमदार सर्वश्री किशोर जोरगेवार, किर्तीकुमार भांगडीया, देवराव भोंगळे, करण देवतेळे, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे आदी उपस्थित होते.

  • tiger attack in forest areas । आंब्याचा मोह जीवावर बेतला, मूल तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात एक ठार

    tiger attack in forest areas

    tiger attack in forest areas : मूल (चंद्रपूर) : समाजसेवक बाबा आमटे यांच्या सोमनाथ प्रकल्पात गेल्या ४० वर्षांपासून वास्तव्यात असलेले जयदेव पोतलू करनेकर (६०) रा. विसोरा ता. वडसा जिल्हा गडचिरोली यांना वाघाने ठार केले. ते सोमनाथ प्रकल्पात नेहमीप्रमाणे आंबे तोडण्यासाठी गेले होते. अशातच वाघाने हल्ला चढविल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. सततच्या घटनेने या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

    ashok jiwtode

    दुचाकीवर कोसळल झाड, एकाचा मृत्यू, चंद्रपुरातील घटना

    जयदेव हे आंबे तोडण्यासाठी सोमनाथ प्रकल्पात रविवारी दुपारी ३ वाजता गेले होते. दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला चढवून ठार केले. घरच्या मंडळींनी जयदेव परत आला नसल्याची माहिती वनविभागाला दिली. वनविभागाने शोध घेतला मात्र उपयोग झाला नाही. human wildlife conflict in Maharashtra

    जयदेवच्या मृतदेहाचे तुकडे आढळले

    सोमवारी सकाळी वाघाने जयदेवला ओढत वन विभाग कक्ष क्रमांक ७९२ येथे नेले होते. सोमवारी सकाळी ८:३० वाजता मूल वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल कारेकर, क्षेत्र सहाय्यक आर.सी. पेदापल्लीवार यांनी कर्मचाऱ्यांना घेवून जंगलात शोध मोहीम सुरू राबविली असता ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कक्ष क्रमांक ७९२ जयदेवच्या मृतदेहाचे तुकडे आढळून आले.

    रात्रभरात वाघाने मृतदेहाचा बराच भाग खाल्ल्याचे दिसून आले. जयदेव हा आपल्या पत्नीसह सोमनाथ प्रकल्पात राहत होता. वनविभागाने मृतकाच्या नातेवाईकाला २० हजार रुपये सानुग्रह म्हणून मदत दिली आहे. वनविभागाने कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत. चालू वर्षात वाघाच्या हल्ल्यात आतापर्यन्त एकूण २४ नागरिकांच्या बळी गेला आहे.

  • obc women empowerment programs । ओबीसी समाजाची ठरणार आदर्श आचारसंहिता, चंद्रपूरातून होणार शंखनाद

    obc women empowerment programs

    चंद्रपुरात ओबीसी महिलांचे विदर्भस्तरीय अधिवेशन, डॉ. अशोक जिवतोडे यांचा पुढाकार

    obc women empowerment programs : चंद्रपूर – ओबीसी महिलांचे प्रथमच विदर्भस्तरीय अधिवेशन माता महाकाली नगरीत चंद्रपूर येथे होऊ घातले आहे. सदर अधिवेशन स्थानिक जनता महाविद्यालयाच्या पटांगणावर बुधवार दिनांक ११ जूनला दुपारी १२ वाजेपासून सुरु होणार आहे. या अधिवेशनाकरिता विदर्भातील सर्व जिल्ह्यातून प्रातिनिधिक स्वरूपात सामाजिक चळवळीतील महिला उपस्थित राहणार आहेत. Model code of conduct for OBC community

    धावत्या दुचाकीवर कोसळले झाड, दुचाकीस्वाराचा मृत्यू


    या ओबीसी महिला अधिवेशनात महिलांशी निगडित विविध विषयांवर चर्चा करुन ठराव पारित करण्यात येणार आहे. ओबीसी समाजाकरीता केंद्र तथा राज्य शासनाकडून निघालेल्या शासन निर्णयाची माहिती देण्यात येणार आहे. हुंडाबळी ठरलेल्या स्व. वैष्णवीताई हगवणे व आजवर हुंडाबळी ठरलेल्या सर्व महिलांना श्रध्दांजली अर्पण करण्यात येईल.

    ओबीसी समाजाकरीता आदर्श आचारसंहिता

    हुंडाबळी तथा महिलांवरील अत्याचाराच्या न्यायालयीन केसेस फास्टट्रॅक कोर्टात चालविण्याची मागणी करण्यात येणार आहे. ओबीसी समाजातील अनिष्ठ परंपरा व महिलांवरील अन्यायकारक रूढींना बंद करण्याबाबत चर्चा करुन ओबीसी समाजाकरीता आदर्श आचारसंहिता तयार करण्यात येईल. सर्व क्षेत्रातील महिलांना समान संधी मिळावी यासाठी केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्यासाठी ठराव घेण्यात येईल. social awareness programs for obc women

    महिलांच्या सद्यस्थितीवर चर्चा करण्यात येईल, ओबीसी समाजाच्या राज्य व केंद्र शासनाशी निगडीत मागण्यांवर चर्चा करुन त्यासंदर्भातही ठराव घेण्यात येणार आहे. तथा पुढील ओबीसी महिला अधिवेशन महाराष्ट्र स्तरावर घेण्याबाबत चर्चा करण्यात येणार आहे.

    महिला अत्याचारांवर चर्चा


    विदर्भस्तरावर ओबीसी महिलांचे अधिवेशन घेऊन सद्यस्थितीत महिलांवर वाढत चाललेल्या अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर ओबीसी महिलांमध्ये जागृती निर्माण करणे, त्यांच्यात आत्मविश्वास जागवून, स्त्री सुरक्षितता व स्त्री-पुरुष समानतेला सर्व स्तरावर प्राधान्य देणे, स्त्री शक्तीचा सन्मान करणे, विशेषत: ओबीसी समाजात सामाजिक विषयांवर आदर्श आचारसंहिता घालून देणे, या उद्देशाला घेऊन सदर ओबीसी महिला अधिवेशन घेण्यात येत असल्याचे अधिवेशनाचे मुख्य संयोजक डॉ. अशोक जीवतोडे यांनी सांगितले आहे.


    या विदर्भ स्तरीय ओबीसी महिलांच्या अधिवेशनाच्या निमित्ताने प्रथमच एक ऐतिहासिक सामाजिक प्रयोग करण्यात येत असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.

  • district planning committee fund allocation । निधीचं राजकारण नको, विकास हाच मुख्य उद्देश – पालकमंत्री उईके

    district planning committee fund allocation

    district planning committee fund allocation : चंद्रपूर : जिल्हा नियोजन समितीचा निधी हा विकासाच्या कामासाठी उपयोगात आणला जातो. या निधीचे वितरण करताना जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊनच वाटप करण्यात येईल. तसेच जिल्ह्याशी संबंधित सर्व महत्त्वाच्या मुद्यांवर सर्व लोकप्रतिनिधींना घेऊन मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेण्यात येईल, जेणेकरून जिल्ह्यातील सर्व प्रश्न तातडीने मार्गी लागावे, असे राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी सांगितले. district fund distribution transparency meeting

    चंद्रपुरात धावत्या दुचाकीवर कोसळले झाड, दुचाकीस्वाराचा मृत्यू

    नियोजन भवन येथे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीला खासदार सर्वश्री प्रतिभा धानोरकर, डॉ. नामदेव किरसान, आमदार तथा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, आमदार सर्वश्री सुधाकर अडवाले, अभिजीत वंजारी, किशोर जोरगेवार, कीर्तीकुमार भांगडीया, करण देवतळे, देवराव भोंगळे, जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग, पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, जिल्हा नियोजनअधिकारी संजय कडू तसेच इतर विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

    आरोग्य हा अतिशय महत्वाचा विषय

    सन 2024 – 25 मध्ये सर्वसाधारण योजनेचे 456 कोटी, आदिवासी उपयोजनेचे 103 कोटी, अनुसूचित जाती उपयोजनेचे 75 कोटी असे एकूण 634 कोटी 42 लक्ष निधी विकास कामांवर खर्च करण्यात आला आहे, असे सांगून पालकमंत्री डॉ. अशोक उईके म्हणाले, आरोग्य हा अतिशय महत्त्वाचा विषय असून जिल्ह्यातील सर्व प्राथमिक केंद्र व उपकेंद्रासाठी निधी दिला जाईल. तसेच अद्यावत सोयी सुविधा या केंद्रामधून देण्यात येईल. त्यासाठी विशेष प्रस्ताव पाठवावा. जिल्ह्यातील अंगणवाड्यांचे बांधकाम आवर्जून पूर्ण करावे. नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्रातील अंगणवाड्यांना सुद्धा निधी देण्यात येईल.

    ग्रामीण भागातील नागरिक योजनांपासून वंचित राहू नये, त्यासाठी जिल्ह्याचा एक चांगला प्रस्ताव तयार करावा. सर्व तालुका स्तरावर क्रीडा विकासासाठी आणि व्यायामशाळांसाठी वाढीव निधीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. कर्मवीर मा.सां. कन्नमवार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासह ग्रामीण भागात औषधींसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. planning committee meeting inscriptions 2025

    शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून मृतदेह मोफत घरी नेण्यासाठी शववाहिकांची संख्या वाढवावी. जिल्ह्यातील ‘ब’ आणि ‘क’ दर्जाच्या तीर्थक्षेत्रांना सुध्दा निधी देण्यात येईल. सर्व लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊनच या निधीचे वाटप करण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी दिली. तसेच आजच्या बैठकीला जे अधिकारी गैरहजर असतील, त्यांना कारणे दाखवा नोटीस देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. यावेळी खासदार आणि आमदारांनीसुद्धा आपापल्या सूचना मांडल्या.

    राजशिष्टाचारानुसारच विकासकामांचे लोकार्पण व्हावे

    शासनाच्या निधीतून विकासकामांचे लोकार्पण होत असतांना ते राजशिष्टाचारानुसारच व्हावे. लोकप्रतिनिधींची नावे कोनशिलेवर टाकावी. असे निर्देश पालकमंत्री डॉ अशोक उईके यांनी दिले. district planning committee fund allocation

    या विषयांवर झाली चर्चा : पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत कृषी, आरोग्य, वने, पर्यटन, शिक्षण, अवकाळी पावसाने नुकसान झालेले पंचनामे, कृषी पंप जोडणी, जिल्हा परिषद, पोलीस विभाग व इतर सर्व विषयांचा विस्तृत आढावा घेण्यात आला. तसेच 1 फेब्रुवारी 2025 रोजी संपन्न झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचे इतिवृत्त कायम करणे व इतिवृत्तावरील अनुपालनास मान्यता प्रदान करणे, जिल्हा वार्षिक योजना सन 2024 -25 अंतर्गत खर्चास मान्यता देणे, सन 2025 -26 अंतर्गत खर्चाचा आढावा यावेळी घेण्यात आला.

  • tree fall accident during storm । “थोडा वेळ थांबलो असतो तर…” चंद्रपुरात धावत्या दुचाकीवर कोसळले झाड

    tree fall accident during storm

    tree fall accident during storm : चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यात सध्या सर्वत्र वादळी वारा व पावसाने थैमान घातले आहे, ९ जून रोजी चंद्रपुरात आलेल्या वादळी पावसात धावत्या दुचाकीवर झाड कोसळल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.

    ५२ वर्षीय एकनाथ अनिल कुमरे राहणार नवीन सिनाळा असे मृतकाचे नाव आहे, सायंकाळच्या सुमारास अचानक चंद्रपूरच्या वातावरणात बदल झाला, काही क्षणात वादळी वारा व पाऊस सुरु झाल्याने नागरिकांची पळापळ सुरु झाली.

    चंद्रपूर जिल्ह्यात धक्कादायक घटना, मायलेकींचा रस्ते अपघातात मृत्यू

    धावत्या दुचाकीवर कोसळले झाड

    सुमारे अर्धा तास मुसळधार पाऊस आला, त्यानंतर विजेच्या कडकडाटाने चंद्रपूर हादरले, ऊर्जानगर-दुर्गापूर मार्गावर एकनाथ कुमरे हे आपल्या दुचाकी वाहनाने पावसात ओलेचिंब होत जात होते, पाऊस सुरु असल्याने दुचाकींचा वेग कमी होता मात्र त्याक्षणी एक भलं मोठं झाड कुमरे यांच्या धावत्या दुचाकीवर कोसळले.

    झाड कोसळल्याने कुमरे हे मार्गावर कोसळले, त्यांच्या डोक्यावर गंभीर मार लागल्याने कुमरे जागीच गतप्राण झाले, पाऊस व विजेचा कडकडाट असल्याने त्यावेळी मार्गावर वाहनांची वर्दळ कमी होते, काही वेळ कुमरे हे मार्गावर तसेच पडून राहिले, याबाबत दुर्गापूर पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तात्काळ कुमरे यांना रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.