Tag: खासदार प्रतिभा धानोरकर

  • Pratibha Dhanorkars public service example । खऱ्या लोकसेवेचा अर्थ काय असतो?, असा असतो लोकप्रतिनिधी!

    Pratibha Dhanorkars public service example

    Pratibha Dhanorkars public service example : चंद्रपूर : बल्लारपूर रोडवरील एका अपघातग्रस्त पीयूष उमेश पेंदोर यांना, खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या विशेष प्रयत्नातून एकात्मिक आदिवासी विकास विभागाकडून तात्काळ ५० हजार रुपयांची आर्थिक मदत मिळाली आहे.

    शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू, खासदाराने केली मदत

    खासदार प्रतिभाताई धानोरकर यांना पीयूष उमेश पेंदोर यांच्या अपघाताची माहिती मिळताच, त्यांनी जराही वेळ न घालवता प्रशासनाशी संपर्क साधला. पीयूष यांना लवकरात लवकर आर्थिक मदत मिळावी यासाठी त्यांनी पाठपुरावा केला. त्यांच्या या संवेदनशील आणि वेगवान कार्यवाहीमुळे एकात्मिक आदिवासी विकास विभागाने तातडीने दखल घेत पीयूष यांना ही मदत मंजूर केली. member of parliament helping accident victims

    त्या मदतीने आधार

    या मदतीमुळे पीयूष आणि त्यांच्या कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे. उपचारासाठी आवश्यक असलेल्या खर्चाची सोय झाल्याने त्यांना मोठा आधार मिळाला आहे. खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी नेहमीच सामान्य नागरिक आणि गरजूंच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे, हे या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

    याप्रसंगी बोलताना खासदार प्रतिभाताई धानोरकर म्हणाल्या, “आपल्या लोकसभा क्षेत्रातील कोणताही नागरिक अडचणीत असेल तर त्याला मदत करणे हे आपले कर्तव्य आहे. एकात्मिक आदिवासी विकास विभागाच्या सहकार्याने या युवकाला वेळेत मदत मिळाली याचा मला खूप आनंद आहे. भविष्यातही नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी मी नेहमीच कटिबद्ध असेन.”

  • Pratibha Dhanorkar help for tiger attack victim । शेतकऱ्यांचे अश्रू पाहून हेलावल्या खासदार प्रतिभा धानोरकर

    Pratibha Dhanorkar help for tiger attack victim

    Pratibha Dhanorkar help for tiger attack victim : चंद्रपूर : काळजावर घाव घालून गेलेल्या वाघाच्या हल्ल्याने ज्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आणले होते, त्या टेकाडी (ता. भद्रावती) येथील प्रत्येक बाधित कुटुंबाला आता खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या संवेदनशील पुढाकारामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. वाघाच्या हल्ल्यात आपले आधारस्तंभ बैल गमावलेल्या या शेतकरी बांधवांना तात्काळ आर्थिक मदत मिळवून देण्यात खासदार प्रतिभाताई धानोरकर यांना यश आले आहे. विशेष म्हणजे, त्या पुढेही पाठपुरावा करून अधिक भरीव आर्थिक मदत मिळवणार आहेत. relief for farmers after animal attacks

    चंद्रपुरातील रिसॉर्ट मध्ये चाकू कांड

    गेल्या काही दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्यात वाघांच्या हल्ल्यांनी थैमान घातले आहे, ज्यामुळे बळीराजाचे अतोनात नुकसान होत आहे. आपल्या जीवाभावाच्या जनावरांना गमावल्याने शेतकरी पार कोलमडून गेले आहेत. टेकाडी (ता. भद्रावती) येथील चार कुटुंबांवर तर दुःखाचा डोंगरच कोसळला होता, जेव्हा त्यांचे कष्टाचे साथीदार असे एकूण पाच बैल वाघाच्या हल्ल्यात ठार झाले. हातावर पोट असलेल्या या कुटुंबांसाठी ही केवळ जनावरांची हानी नव्हती, तर जगण्याचा आधारच हिरावला गेला होता.

    यामध्ये गणेश विठ्ठल गायकवाड यांना ५२००० रुपये मंजूर करण्यात आले, भाऊराव कवडू नन्नावरे यांना ४८७५० रुपये मंजूर करण्यात आले, रमेश आनंदराव श्रीरामे  यांना ५२५०० रुपये मंजूर करण्यात आले आणि रवींद्र श्रीहरी अलाम यांना तात्काळ ५० हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. यावेळी भद्रावती पोलीस ठाण्याचे ठाणेदार लता वाढीवे, वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे तसेच ग्रामस्थांची उपस्थिती होती. 

    तात्काळ मदत

    या हृदयद्रावक घटनेची माहिती मिळताच, खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी क्षणाचाही विलंब न लावता, या पीडित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धाव घेतली. प्रशासनाकडे त्यांनी तळमळीने पाठपुरावा केला, शेतकऱ्यांचे दुःख आणि त्यांच्या डोळ्यातील आसवे शासनासमोर मांडली. त्यांच्या अथक प्रयत्नांना यश आले आणि प्रशासनाने संवेदनशीलता दाखवत, प्रत्येक बाधित शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत जाहीर केली. याबाबत वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे यांनी देखील सहकार्य केले असून, पुढील मदतीकरिता त्वरित पाठपुरावा करून भरीव मदत करण्यात येणार आहे.

    आभार

    या मदतीमुळे या कठीण प्रसंगातून सावरण्यासाठी शेतकऱ्यांना नक्कीच हातभार लागेल. खासदार प्रतिभाताई  धानोरकर यावेळी भावूक होऊन म्हणाल्या, “शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसणे, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हे आपले कर्तव्य आहे. वाघांच्या हल्ल्यांमुळे त्यांची होणारी परवड पाहून मन हेलावते. या संकटाच्या काळात त्यांना तात्काळ आधार मिळणे महत्त्वाचे आहे आणि त्यासाठी मी सदैव कटिबद्ध राहीन.”

    खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या या तत्परतेमुळे आणि त्यांच्या माणुसकीच्या भूमिकेमुळे, टेकाडी येथील शेतकऱ्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.

  • Implementation of the Disha Committee । सरकारच्या योजना हवेत की जमिनीवर? दिशा समितीचा खासदार धानोरकरांनी घेतला आढावा

    Implementation of the Disha Committee

    Implementation of the Disha Committee : चंद्रपूर : केंद्र सरकारच्या अखत्यारीत येत असलेले विषय तसेच केंद्राच्या योजनांची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) कार्यरत आहे. या समितीच्या कामाच्या प्रगतीचा आढावा खासदार धानोरकर यांनी आज (दि. 16) घेतला. Disha Committee

    नियोजन सभागृह येथे पार पडलेल्या या बैठकीला दिशा समितीचे सहअध्यक्ष खा. डॉ. नामदेव किरसान, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी गिरीश धायकुटे व विविध यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.

    दालमिया सिमेंट कंपनीने ३० कामगारांना केले बेरोजगार, दोष काय तर…

    पीक विम्याची रक्कम तात्काळ द्या

    यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर म्हणाल्या, प्रधानमंत्री पीक विमा योजनेत अनेक लाभार्थी पीक विम्यापासून वंचित राहिले आहेत. पात्र लाभार्थ्यांना पीक विम्याची रक्कम (crop insurance payment) लवकर देण्यात यावी. तसेच वाढीव किमतीने बी- बियाणे, खतांची विक्री होत असेल तर त्यांच्यावर कारवाई करून परवाने रद्द करावे. जलजीवन मिशन मध्ये कंत्राटदारांनी सिमेंट काँक्रेटचे रस्ते फोडून टाकले आहे. नागरिकांना ये-जा करण्यासाठी त्रास होत आहे. त्यामुळे संबंधित कंत्राटदारांनी रस्त्याची डागडुजी करावी, तसे आदेश संबंधित विभागाने कंत्राटदारांना द्यावे. कुपोषण मुक्त जिल्ह्यासाठी एकात्मिक बालविकास विभागाने प्रभावी योजना राबवाव्यात. जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्यांचे बांधकाम त्वरीत पूर्ण करावे.

    घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू उपलब्ध होत असली तरी रेतीघाटापासून वाहतुकीचा खर्च खुप जास्त येत आहे, याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे. मोबाईलची रेंज राहण्यासाठी भारत संचार निगम लिमिटेडने टॉवरचे काम गतीने करावे. वरोरा ते माजरी रेल्वे स्टेशन दरम्यान टाकण्यात येणा-या तिस-या रेल्वे लाईनचे काम भुसंपादनासाठी दिलेल्या जमिनीवरच करावे, अतिरिक्त जागेवर काम करू नये. राष्ट्रीय महामार्गाचे काम करतांना कंत्राटदारांकडून रस्त्यावरील प्रवासी निवा-याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. सदर प्रवासी निवारा कंत्राटदारांनी बांधून द्यावे.

    वरोरा –चिमूर महामार्ग अतिशय उंच असल्यामुळे रस्त्यालगत असलेल्या शेतक-यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नाही. शिवाय महामार्गावरील सर्व पाणी लगतच्या शेतात जात असल्यामुळे पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. यावर राष्ट्रीय महामार्ग आणि प्रशासनाने उपाययोजना करावी, अशा सुचना खासदार प्रतिभा धानोरकर यांनी दिल्या.

    यावेळी त्यांनी इतरही विषयांचा आढावा घेतला. बैठकीत खा. डॉ. नामदेव किरसान यांनी आणि जिल्हाधिकारी विनय गौडा यांनीसुध्दा संबंधित विभागाला सुचना केल्या. संचालन आणि सादरीकरण उपमुख्य कार्यकारी अधिकारी गिरीश धायकुडे यांनी केले.

    या विषयांचा आढावा

    दिशा समितीच्या बैठकीत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग, खनीज विकास, ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण, दिनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, महानेट, विशेष सहाय्य योजनेंतर्गत राज्य आणि केंद्र पुरस्कृत योजनांचे अनुदान, प्रधानमंत्री आवास योजना, स्वच्छ भारत मिशन, अमृत योजना, एकात्मिक बालविकास योजना, प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजना, प्रधानमंत्री उज्वला योजना, जलजीवन मिशन, प्रधानमंत्री पीक विमा योजना, शिक्षण व इतर विषयांचा आढावा घेण्यात आला.

  • Implement the old pension scheme |अनुकंपा कर्मचाऱ्यांवर अन्याय! जुनी पेन्शन योजना लागू होणार का?

    Implement the old pension scheme

    खासदार प्रतिभा धानोरकर यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र 

    Implement the old pension scheme : चंद्रपूर: अनुकंपा तत्त्वावर शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शन योजनेच्या (OPS) प्रलंबित मागणीकडे तातडीने लक्ष देण्याची विनंती खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आज (शुक्रवार, १४ जून २०२५)  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एका महत्त्वाच्या पत्राद्वारे (पत्र क्र. ५४३/२०२५)  केंद्र शासनाच्या धर्तीवर त्यांना न्याय देण्याची मागणी केली आहे.

    या पत्रात खासदार  प्रतिभा धानोरकर यांनी स्पष्ट केले आहे की, १ नोव्हेंबर २००५ पूर्वी सरळ सेवा प्रवेशाने रिक्त जागेवर अनुकंपा तत्त्वावर निवड झालेल्या, परंतु १ नोव्हेंबर २००५ रोजी किंवा त्यानंतर सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांवर अन्याय झाला आहे. या कर्मचाऱ्यांनी आज वरोरा येथे खासदार प्रतिभा धानोरकर यांची भेट घेऊन अनुकंपा पेन्शन संघर्ष समितीच्या वतीने निवेदन सादर केले. यावेळी गुरुदास गुरनुले, नितीन साखरे, वीरेंद्र पिल्लेवान, हरीश मांढरे, नितीन उमरे, गजानन बोरकुटे यांची उपस्थिती होती. (Old Pension Scheme for Compassionate Appointment Cases)

    खासदार  प्रतिभा धानोरकर यांनी पत्रात नमूद केले आहे की, ०२ फेब्रुवारी २०२४ रोजीच्या वित्त विभागाच्या शासन निर्णयात १ नोव्हेंबर २००५ पूर्वी अनुकंपा तत्त्वावर शासकीय सेवेसाठी निवड झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्तीवेतन योजना देण्याबाबत विचार करण्यात आलेला नाही. हे सर्व कर्मचारी केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्तीवेतन घेण्यासाठी पात्र आहेत, परंतु महाराष्ट्र शासनाने अनुकंपा धारकांसाठीच्या धोरणाचा शासन निर्णय काढताना या महत्त्वाच्या बाबीचा विचार केलेला नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. government decision on OPS for compassionate employees 2025

    चंद्रपूर जिल्ह्यात वयोवृद्ध शेतकऱ्याला मारहाण, शेतकऱ्याचा मृत्यू

    अनुकंपा कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करा

    त्यामुळे, केंद्र शासनाने त्यांच्या अनुकंपा धर्तीवर जुनी निवृत्तीवेतन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे, त्याच धर्तीवर महाराष्ट्र शासनाने देखील निर्णय घेऊन १ नोव्हेंबर २००५ पूर्वी सक्षम अधिकारी मार्फत सरळ सेवा प्रवेशाने रिक्त जागेवर निवड झालेल्या अनुकंपा कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करावी, अशी शिफारस खासदार प्रतिभा धानोरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

    खासदार  प्रतिभा धानोरकर यांनी मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे की, अनुकंपा कर्मचाऱ्यांनी केलेली मागणी रास्त असून, त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला न्याय मिळावा यासाठी केंद्र शासनाच्या धर्तीवर त्यांना न्याय देण्याची मागणी केली आहे.

  • Political creditism in Chandrapur । लेंडाळा तलाव राजकीय श्रेयवाद, प्रकल्प तुमच्या काळातील पण मंजुरी माझ्या कार्यकाळात

    Political creditism in Chandrapur

    Political creditism in Chandrapur : भद्रावती – लेंडाळा तलाव पुनरुज्जीवन योजनेला नुकतीच अमृत २.० योजनेंतर्गत अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर, या पार्श्वभूमीवर खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केलेल्या फुकटचे श्रेय घेऊ नये या वक्तव्याला आता नगर परिषदेच्या अधिकृत नोंदीतूनच प्रत्युत्तर मिळाले आहे.


    सन 2022 मध्ये अमृत – 2.0 योजने अंतर्गत महाराष्ट्रातील नगरपालिकांना पाणी पुरवठा योजना, सांडपाणी व्यवस्थापन, तलाव खोलीकरण, ग्रीन पार्क  या अंतर्गत प्रस्ताव मागविण्यात आले होते. त्या अनुषंगाने भद्रावती नगर परिषद कडुन वाढीव पाणी पुरवठा योजना आणि  लेंडाळा तलाव सौणदर्यीकरणाचे प्रस्ताव ऑनलाईन दाखल करण्यात आले. ते मंजूर होऊन दोन्ही प्रकल्पा साठी DPR बनवण्या करिता शासनाकडून कळवण्यात आले आणि दोन्ही प्रकल्पाचे DPR बनवून तांत्रिक मान्यता घेऊन सदर प्रकल्प अंतीम मंजुरीकरीता सादर करण्यात आले. lake restoration projects

    भद्रावती लेंडाळा तलाव पुनरुज्जीवन प्रकल्पावरून आमदार-खासदाराच्या श्रेयवाद रंगला

    या दोन्ही प्रकल्पापैकी वाढीव पाणी पुरवठा योजनेला मा प्रधान सचिव यांच्या स्तरावर असलेली SLTC (state Level technical commitee) ची मान्यता भेटून वाढीव पाणी पुरवठा योजना ला तेव्हाच प्रशासकीय मान्यता देखील भेटली. तसेच लेंडाळा तलाव खोलीकरण व सौंदर्यीकरणाच्या प्रस्तावाला देखील SLTC ची मान्यता दि. 4/02/2023 ला भेटली, परंतु प्रशासकीय मान्यता भेटलेली नव्हती.


    करण देवतळे वरोरा भद्रावती विधानसभा मतदारसंघाचे आमदार (mla karan deotale) म्हणून नियुक्त झाल्यावर त्यांनी भद्रावती नगर परिषदेची आढावा बैठक घेतली. या बैठकित जिल्हास्तरावर, मंत्रालयीन स्तरावर कोण कोणते कामे प्रलंबित आहेत याचा रितसर आढावा घेतला. या बैठकीत नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनी स्पष्टपणे नमूद केले की, लेंडाळा प्रकल्पास तांत्रिक मान्यता मिळालेली असूनही त्यानंतरही तब्बल 2 वर्षाचा कालावधी होऊनसुध्दा अंतिम मंजुरी म्हणजेच प्रशासकिय मान्यता मिळालेली नाही असे सांगितले. तसेच त्यासोबतच मुख्याधिकारी यांनी जिल्हा स्तरावर पर्यटन निधी अंतर्गत असलेले प्रस्ताव, नावीन्यपूर्ण योजनेअंतर्गत प्रलंबित E – अभ्यासिकेचा प्रस्ताव तसेच इतरही कामासंबधी आढावा सभेत माहिती दिली. lake restoration projects

    पाठपुरावा करीत प्रशासकीय मान्यता आमच्यामुळे


    भद्रावती नगर परिषदेच्या समवेत सेलू नगर पंचायत पाणी पुरवठा ,पवनी  नगर परिषद अंतर्गत तलाव सौंदरीकरण या नगर पालिका आणि इतरही  5 नगर परिषदा यांचे प्रस्ताव होते त्यांच्या प्रस्तावांना दोन वर्षापुर्वीच प्रशासकीय मान्यता देखील भेटली केवळ भद्रावती नगर परिषदेच्या लेडाळा तलाव खोलीकरण व सौंदर्यीकरणाच्या प्रस्तावाला प्रशासकिय मान्यता भेटलेली नव्हती आणि गेल्या 2 वर्षापासून सदर प्रकरणाची फाईल मुख्यमंत्री कार्यालयाकडे प्रलंबित होती.
          प्रकल्प जरी त्यांच्या काळातील असला तरी सतत बैठका घेऊन, मंत्रालयीन संबंधित अधिकारी, नगर विकास मंत्री, मुख्यमंत्री यांचेशी बैठक लावून आमदार करण देवतळे यांनी प्रशासकीय मान्यता प्राप्त केली.

    १७ कोटींचा प्रकल्प


    भद्रावतीच्या विकासाच्या दृष्टीने तसेच एक नवोपक्रम म्हणुन हि बाब महत्वाची असल्याने आमदार देवतळे यांनी विभागीय आणि मंत्रालयीन पातळीवर सातत्याने पाठपुरावा करून ही प्रक्रिया मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले.
    या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे अखेर १७ कोटी रुपये खर्चाचा भव्य प्रकल्प मंजूर झाला. केवळ सौंदर्यवृद्धी न करता पर्यावरणीय, सामाजिक आणि नागरिकांच्या दृष्टीने उपयुक्त असा एकात्मिक विकास साधण्याचा हेतू या प्रकल्पामागे आहे. त्यामुळे या प्रकल्पाला मंजुरी मिळवून देणे ही केवळ श्रेय घेण्याची नव्हे, तर भद्रावतीच्या भविष्यासाठी आवश्यक पावले उचलण्याची बाब होती. Bhadravati Municipal Council


    खासदार म्हणून यापूर्वी काम पाहिलेल्यांचे योगदान अमान्य नाही. मात्र, जेव्हा प्रस्तावास तांत्रिक मान्यता मिळूनही दीर्घकाळ अंतिम मंजुरी प्रलंबित राहते, तेव्हा ती मंजुरी मिळवून देणे ही स्वतंत्र आणि ठोस कृती ठरते. त्यामुळे फुकटचे श्रेय घेण्याचा आरोप निरर्थक असून, भद्रावतीच्या जनतेच्या हितासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी समवेत काम करण्याची गरज असल्याचे आमदार कार्यालयातून स्पष्ट करण्यात आले आहे.

  • Bhadravati lake development news । भद्रावतीच्या तलावावरून ‘श्रेयी’ झुंज!, धानोरकरांनी लगावला टोला

    Bhadravati lake development news

    Bhadravati lake development news : चंद्रपूर : भद्रावती शहरातील अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असलेल्या लेंडाळा तलावाच्या पुनरुज्जीवन प्रकल्पाला केंद्र शासनाच्या अमृत २.० योजनेअंतर्गत अखेर मंजुरी मिळाली आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी १७ कोटी रुपयांचा निधी (Lendala lake funding approved)नुकताच शासन निर्णयाद्वारे मंजूर झाल्याने भद्रावतीच्या विकासाला एक नवी दिशा मिळणार आहे. 

    फुकटचे श्रेय घेऊ नका

    विशेष म्हणजे, या प्रकल्पाला राज्यस्तरीय तांत्रिक मान्यता समितीच्या ३ फेब्रुवारी २०२३ रोजी झालेल्या बैठकीतच तांत्रिक मंजुरी मिळाली होती. त्यावेळी विद्यमान खासदार बाळूभाऊ धानोरकर व प्रतिभाताई धानोरकर या विद्यमान आमदार होत्या. त्यामुळे, या निर्णयात काही महिन्यांपूर्वी झालेल्या आमदारांनी कोणताही फुकटचे श्रेय घेऊ नये, असा स्पष्ट टोला खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी लगावला आहे.

    भाजप आमदार देवराव भोंगळे यांचा कांग्रेसला दे धक्का

    या प्रकल्पाला अंतिम मंजुरी मिळण्यामागे खासदार प्रतिभाताई धानोरकर यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि नगर परिषद भद्रावतीमार्फत वेळोवेळी शासन दरबारी सादर केलेले प्रस्ताव यांचा मोलाचा वाटा आहे. आमदार असतानाच, २०१९-२० मध्ये त्यांनी हा विषय विधानसभेत मांडून त्याची आवश्यकता अधोरेखित केली होती. लोकसभा खासदार म्हणूनही त्यांनी नगर परिषदेच्या प्रस्तावाला पूर्ण पाठिंबा दिला आणि मंत्रालयीन पातळीवर विविध बैठकांमध्ये हा मुद्दा सातत्याने मांडत प्रकल्पाच्या मंजुरीसाठी अथक प्रयत्न केले.

    लेंडाळा तलावाच्या पुनरुज्जीवनाचे स्वप्न भद्रावतीच्या जनतेने पाहिले होते आणि आता त्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकले गेले आहे. या प्रकल्पाचे यश हे केवळ कोणत्याही एका राजकीय व्यक्तीच्या श्रेयवाद पुरते मर्यादित नसून, ते भद्रावतीच्या जनतेच्या हितासाठी आहे. त्यामुळे, यामध्ये खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या योगदानाला नाकारून केवळ राजकीय प्रसिद्धीसाठी श्रेय घेण्याचे प्रयत्न अत्यंत खेदजनक आहेत.

  • international standard museum proposal । चंद्रपूरच्या वारशाला ‘घर’ मिळणार? खासदारांनी मांडला ऐतिहासिक प्रस्ताव

    international standard museum proposal

    international standard museum proposal : चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्याच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी एका भव्य आंतरराष्ट्रीय दर्जाचे संग्रहालयाची उभारणी करावी, अशी मागणी खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केंद्रीय पर्यटन व सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत आणि सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. आज जिल्हाधिकारी विनय गौंडा यांची भेट घेऊन या  संग्रहालयचा प्रस्ताव तयार करण्याची विनंती केली आहे.  

    चिमूर तालुका हादरला

    चंद्रपूर हा ऐतिहासिक जिल्हा

    खासदार प्रतिभाताई धानोरकर म्हणाल्या, “चंद्रपूर जिल्हा हा ऐतिहासिक, पुरातत्त्वीय आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून एक समृद्ध व गौरवशाली परिसर आहे. येथे प्राचीन मंदिरांचे अवशेष, शिलालेख, धातू व दगडी मूर्ती, प्राचीन वास्तू आणि स्थापत्यशैलीचा अनमोल ठेवा आजही अस्तित्वात आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात ऐतिहासिक मूर्ती व पुरावस्तू सापडल्या आहेत.” tourism potential of Chandrapur

    Powered by myUpchar

    त्या पुढे म्हणाल्या, “जिल्ह्यात एक सुसज्ज संग्रहालय नसल्यामुळे अनेक ऐतिहासिक वस्तू आणि कलाकृती योग्य देखभालीअभावी दुर्लक्षित आहेत. त्यामुळे या सर्वांना एकाच ठिकाणी आणून त्यांचे योग्य प्रदर्शन करणे गरजेचे आहे. या संग्रहालयातून केवळ जिल्ह्याच्या इतिहासाची माहिती मिळेल असे नाही, तर ते शिक्षण आणि संशोधनाचे केंद्र म्हणूनही विकसित होऊ शकेल.”

    केंद्र व राज्य सरकार सोबत पाठपुरावा

    खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकार आणि संबंधित विभागांना तातडीने या मागणीची दखल घेऊन चंद्रपूर जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे संग्रहालय उभारण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याची विनंती केली आहे. त्यांनी यासाठी आवश्यक असणारा निधी उपलब्ध करून देण्याची आणि जागेची निवड प्रक्रिया त्वरित पूर्ण करण्याची गरज व्यक्त केली आहे.

    या संग्रहालयाच्या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्याची पर्यटन क्षमता वाढण्यास मदत होईल, तसेच स्थानिक कलाकारांना आणि कारागिरांना प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी व्यक्त केला आहे. त्यांनी जिल्ह्यातील नागरिकांना आणि सामाजिक संस्थांना या महत्त्वपूर्ण मागणीत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे.

  • ST bus service resumed in Gadchandur । गडचांदूर-नगराळा-येल्लापूर मार्गावर ST धावली, खासदार प्रतिभाताईंच्या पाठपुराव्याला यश

    ST bus service resumed in Gadchandur

    ST bus service resumed in Gadchandur : चंद्रपूर: गडचांदूरवरून पहाडावर जाण्यासाठी नगराळा मार्गे राजुरा-गडचांदूर-येल्लापूर ही एसटी बस गेल्या सव्वा महिन्यांपासून बंद असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती. विद्यार्थी, शेतकरी, कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिकांना गडचांदूर येथे रस्त्यावर रात्र काढावी लागत होती. या गंभीर समस्येची दखल घेत pratibha dhanorkar खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी तातडीने महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ, चंद्रपूर यांच्याकडे पाठपुरावा केला.

    चंद्रपूर जिल्हा वाघाच्या हल्ल्याने पुन्हा हादरला, दोघांचा मृत्यू

    पाठपुराव्याला तात्काळ यश

    खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाला पत्र क्र. 1794/2025 द्वारे निवेदन दिले होते. या निवेदनात त्यांनी गडचांदूर-नगराळा-येल्लापूर-जिवती ही महत्त्वपूर्ण बस सेवा तसेच गडचांदूर येथून जिवती मार्गे धावणाऱ्या सर्व बंद बस सेवा तात्काळ पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली होती. तसेच या बससेवेमुळे परिसरातील नागरिक आणि विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत असल्याचे जिवती येथे झालेल्या आढावा बैठकीत नागरीकणी खासदार प्रतिभाताई धानोरकर यांना सांगितले होते. 

    Powered by myUpchar

    खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या मागणीची तातडीने दखल घेत राजुरा आगार प्रमुख राकेश बोधे यांनी त्वरित कार्यवाही करत बंद असलेली गडचांदूर-नगराळा-येल्लापूर बस सेवा आजपासून पूर्ववत सुरू केली आहे. यामुळे आता या मार्गावरील शेकडो प्रवाशांना पूर्वीप्रमाणे एसटी बसचा मोठा आधार मिळाला आहे.

  • land acquisition issues in Maharashtra । स्थानिक शेतकऱ्यांचे रक्षण हेच प्राधान्य – खासदार प्रतिभा धानोरकर

    land acquisition issues in Maharashtra

    शेतकऱ्यांच्या भूमीसाठी लढा! खासदार धानोरकरांची नागपूर बैठक ठरली निर्णायक

    land acquisition issues in Maharashtra : चंद्रपूर – वणी क्षेत्रातील गाडेगाव, खैरगाव, टाकळी, चिखली आणि सोनुर्ली या गावांमधील शेतकऱ्यांची जमीन पैनगंगा प्रकल्पाच्या अनुषंगाने अधिग्रहित करण्यात आली आहे. मात्र, काही शेतकऱ्यांच्या जमिनी अद्याप अधिग्रहण प्रक्रियेत समाविष्ट झालेल्या नाहीत.

    यामुळे भविष्यात त्यांच्या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे, तसेच त्यांना आर्थिक व सामाजिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

    या पार्श्वभूमीवर, चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार मा. प्रतिभाताई धानोरकर यांनी वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडचे (वेकोली) व्यवस्थापकीय संचालक जयप्रकाश द्विवेदी यांच्याशी नागपूर येथे बैठक घेऊन चर्चा केली. Western Coalfields land acquisition news

    नरभक्षक वाघिणीचा बछडा जेरबंद

    या बैठकीस काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार सुभाष धोटे, निदेशक (कार्मिक) हेमंत पांडे, जी.एम. (आयआर), जी.एम. (भुराजस्व) तसेच संबंधित भूधारक शेतकरी उपस्थित होते.

    शेतकऱ्यांच्या शिल्लक जमिनीचे अधिग्रहण करा

    बैठकीदरम्यान खासदार धानोरकर यांनी लेखी मागणी सादर करत स्पष्ट केले की, वणी क्षेत्रातील उकणी खंड क्र. 1 ची जमीन नीलजई डीप विस्तार प्रकल्पासाठी अधिग्रहित करण्यासंदर्भात चर्चा झाली असून, पैनगंगा प्रकल्पाच्या अनुषंगाने वरील गावांतील शेतकऱ्यांच्या शिल्लक जमिनीही तातडीने अधिग्रहित करण्यास परवानगी देण्यात यावी.

    खासदार धानोरकर म्हणाल्या, “स्थानिक शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करणे हे माझे सर्वोच्च प्राधान्य आहे. त्यामुळे या संदर्भात तात्काळ निर्णय घेऊन शेतकऱ्यांच्या समस्या दूर कराव्यात.”

    Powered by myUpchar

    या बैठकीत वेकोली कामगारांच्या पदस्थापना, रोजगार आणि शैक्षणिक पात्रतेनुसार नेमणूक या मुद्द्यांवरही सविस्तर चर्चा झाली. वेकोलीच्या व्यवस्थापनाने या सर्व मुद्द्यांवर सकारात्मक कारवाई केली जाईल, असे आश्वासन यावेळी दिले.

  • shivaji maharaj history in new education policy । शिवाजी महाराजांचा इतिहास NEP मध्ये; खासदार प्रतिभा धानोरकर यांची मागणी पूर्णत्वास

    shivaji maharaj history in new education policy

    shivaji maharaj history in new education policy : चंद्रपूर : महाराष्ट्राच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्तीची भावना जागृत करण्यासाठी, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात (NEP) छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रेरणादायी इतिहास समाविष्ट करण्याची मागणी खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केली होती. या मागणीला केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान आणि राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिल्ली येथे झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत सकारात्मक प्रतिसाद देत ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. national education policy 2025 latest updates

    चंद्रपुरात ब्लॅकआउट?

    छत्रपती शिवाजी महाराज देशातील युवांसाठी प्रेरणास्रोत

    खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी आपल्या पत्र क्र. १७३२/२०२५, दिनांक १४ एप्रिल, २०२५ द्वारे मागणी केली होती की, छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन आणि कार्य केवळ महाराष्ट्रासाठीच नव्हे, तर संपूर्ण देशातील युवा पिढीसाठी प्रेरणास्रोत आहे. त्यांची शौर्यगाथा, कुशल प्रशासन आणि प्रजाहितदक्ष धोरणे विद्यार्थ्यांना राष्ट्रनिर्माण आणि नैतिक मूल्यांची शिकवण देतील. त्यामुळे, त्यांचा इतिहास राष्ट्रीय शैक्षणिक अभ्यासक्रमात समाविष्ट करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. educational reforms in india 2025

    केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान आणि राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी या मागणीची दखल घेत, छत्रपती शिवाजी महाराजांचे योगदान देशाला नेहमीच प्रेरणा देत राहील आणि त्यांच्या कार्याचा समावेश अभ्यासक्रमात केल्यास विद्यार्थ्यांमध्ये योग्य दृष्टिकोन निर्माण होईल, असे स्पष्ट केले होते.

    या महत्त्वपूर्ण प्रयत्नांमुळे, आता लवकरच राष्ट्रीय शैक्षणिक अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा समावेश होणार आहे, ज्यामुळे देशभरातील विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या महान कार्याची माहिती मिळू शकेल. हा निर्णय युवा पिढीला राष्ट्रभक्ती आणि नैतिक मूल्यांची शिकवण देण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरेल, असे खासदार धानोरकर यांनी म्हटले आहे.