Tag: खासदार प्रतिभा धानोरकर

  • Encroachment : जिल्हाधिकारी यांना खासदार धानोरकरांनी दिला आंदोलनाचा इशारा

    Encroachment : जिल्हाधिकारी यांना खासदार धानोरकरांनी दिला आंदोलनाचा इशारा

    Encroachment घुग्गुस येथे राजकीय पक्षाने अतिक्रमण केलेल्या जागेवरून खासदार प्रतिभा धानोरकर यांनी जिल्हाधिकारी विनय गौडा यांना समान न्याय द्या अशी विनंती केली, अन्यथा आम्हाला आंदोलन करावे लागेल असा इशारा सुद्धा धानोरकर यांनी दिला आहे.

    Encroachment चंद्रपूर जिल्हîात सर्वत्र अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरु असून काही राजकीय पक्षांना जाणिवपुर्वक सुट दिली जाते का? असा प्रश्न खासदार प्रतिभा धानोरकर यांनी जिल्हाधिकारी यांना पत्र लिहून घुग्घुस येथील सर्व्हे क्र. 17 मधील राजकीय पक्षाद्वारे अतिक्रमीत केलेल्या जमिनीवरुन केला आहे.

    अवश्य वाचा : चंद्रपूर जिल्ह्यातील ओयो हॉटेल का आले चर्चेत

    चंद्रपूर शहर (chandrapur) तसेच घुग्घुस शहरात देखील प्रशासनाद्वारे न्यायालयाचा दाखला देत अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरु आहे. यामध्ये सामान्य नागरीकांचे अतिक्रमण सरसकट काढत आहेत. परंतु, घुग्घुस येथील सर्व्हे क्र. 17 मधे एका राजकीय पक्षाचे सेवा केंद्र सुरु असून त्याला शासनाचे अभय का? खासदार प्रतिभा धानोरकर यांनी उपस्थित केला आहे. सदर जागेची मागणी एका राजकीय पक्षाशी संबंध असलेल्या व शिक्षकी पेशा असून शाळेत न जाणाऱ्या   पदाधिकाऱ्यांच्या पत्नीच्या नावे असलेल्या संस्थेने सदर जागेची मागणी केली. या जागेचा नोटीस 08 ऑगस्ट रोजी प्रसिध्द झाला असतांना तो जाणीवपुर्वक नोटीस बोर्डाच्या दर्शनीय भागात लावण्यात आला नाही. दि. 02 सप्टेंबर रोजी आक्षेप नोंदविण्याची अंतिम तारीख असतांना 31 ऑगस्ट व 01 सप्टेंबर रोजी सुट्टीचे औचित्य साधून कोणीही आक्षेप घेऊ नये यासाठी 30 ऑगस्ट रोजी लावण्यात आला. सदर बाब जाणीपूर्वक केली का? असा प्रश्न खासदार धानोरकर यांनी उपस्थित केला आहे.

    चंद्रपूर शहरात आला बिबट्या

    एकीकडे सामान्य नागरिकांना जागा मिळत नसत नसुन दुसरीकडे एखाद्या संस्थेला 0.43 हे.आर. जागा भाडेपट्ट्याने देणे हा कुठला न्याय? असा प्रश्न देखील खासदार धानोरकर यांनी उपस्थित केला आहे. सदर प्रकरणात जिल्हाधिकारी महोदयांनी तात्काळ अतिक्रमण काढून वरील प्रकरणात दोषींवर कार्यवाही करावी अन्यथा आंदोलनाचा मार्ग हाती घ्यावा लागेल असा ईशारा देखील खासदार प्रतिभा धानोरकर यांनी दिला आहे.

  • Pratibha Dhanorkar : खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या मागणीची दखल

    Pratibha Dhanorkar : खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या मागणीची दखल

    pratibha dhanorkar मालवण येथील शिवरायांच्या पुतळा कोसळल्या प्रकरणी खासदार धानोरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रत्र लिहून चौकशी समिती गठीत करण्याची मागणी केली होती.

    काल दि. 28 ऑगस्ट 2024 रोजी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवास स्थानी झालेल्या बैठकीत नौदल व राज्य सरकार यांच्या संयुक्त समिती गठीत करण्यात आली.

    अवश्य वाचा : चंद्रपूर-बल्लारपूर बायपास मार्गावर मोठी दुर्घटना टळली

    Pratibha dhanorkar सिंधदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील शिवरायांचा आठ महिन्यांपुर्वी उद्घाटन पुतळा कोसळला. याप्रकरणी संपुर्ण शिवरायांचा अवमान झाल्याची भावन खासदार प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केली होती. या प्रकरणी सरकार ने कंत्राटदारावर कार्यवाही करुन चालणार नाही तर यासाठी चौकशी समिती गठीत करुन संबंधीत अधिकाऱ्यांवर देखील कार्यवाही ची मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केली होती. याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नौदल व राज्य सरकार यांच्या संयुक्त समिती गठीत करण्यात आली. त्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी संबंधीतांवर काठोर कार्यवाही करण्याचे आदेश देखील दिले आहे. या चौकशी समितीत काय निष्पन्न होते हे बघने महत्वाचे ठरणार आहे. 

  • Pratibha Dhanorkar : तक्रार प्राप्त होताच खासदार धानोरकर यांनी 3 वर्षे जुनी समस्याचं सोडवली

    Pratibha Dhanorkar : तक्रार प्राप्त होताच खासदार धानोरकर यांनी 3 वर्षे जुनी समस्याचं सोडवली

    Pratibha Dhanorkar खासदार प्रतिभा धानोरकर या आपल्या लोकसभा क्षेत्रातील नागरीकांच्या मदतीसाठी तत्पर असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. आज त्यांच्या प्रयत्नांतून सलग 3 वर्षा आधीच्या रानडुकराच्या हल्ल्यातील जखमींना आपल्या प्रयत्नातून मदत मिळवून दिली.

    अवश्य वाचा : वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या मुनीम च्या कुटुंबाला मिळाली वनविभागाच्या वतीने आर्थिक मदत

    Pratibha dhanorkar चंद्रपूर जिल्हा हा वन व्याप्त जिल्हा असल्याने वन्य प्राण्यांच्या हल्ल्याच्या अनेक घटना जिल्ह्यात घडत असतात. या हल्ल्यात जखमी नागरीकांना वन विभागाकडून आर्थिक मदत दिली जात असते. परंतु हि मदत अनेकदा वेळेवर मिळत नसल्याची तक्रार खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या कडे प्राप्त झाली होती.

    Pratibha dhanorkar सन 2021-22 मध्ये वरोरा तालुक्यातील विविध घटनेत पाच नागरीक रानटी डुकरांच्या हल्ल्यात जखमी झाले होते. परंतु तीन वर्ष लोटूनही त्यांना वन विभागाकडून मदत मिळाली नव्हती. या संदर्भात खासदार प्रतिभा धानोरकर यांनी विशेष प्रयत्न करुन जखमींना तात्काळ मदत मिळण्यासाठी अधिकाऱ्यांना आदेश दिले. त्याची फलश्रृती म्हणून आज दि. 24 ऑगस्ट रोजी वन विभागाच्या उपस्थितीत रानटी डुकाराच्या हल्ल्यात जखमी झालेल्ल्या त्या पाच नागरीकांना प्रत्येकी 1 लक्ष 25 हजार रुपयांच्या धनादेशाचे वाटप खासदार धानोरकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांच्या या कामाने जखमी कुटूंबातील सदस्यांनी खासदार प्रतिभा धानोरकर यांचे आभार मानले.

    आंदोलन : महिला अत्याचाराविरोधात चंद्रपुरात महाविकास आघाडीचे तोंडाला काळ्या फिता लावीत निषेध आंदोलन

    यावेळी वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा संचालक राजु चिकटे, वरोरा काँग्रेस कमेटीचे ग्रामीण तालुकाध्यक्ष मिलिंद भोयर त्या सोबतच वन विभागाचे अधिकारी व नागरीकांची उपस्थिती होती.

    विशेष बाब म्हणजे चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार वनमंत्री सुद्धा आहे, त्यांना याबाबत वनविभागाच्या वतीने माहिती देण्यात आली नव्हती काय? त्यांच्याकडे त्या नागरिकांनी आर्थिक मदतीसाठी कधी भेट घेतली की नाही? हे अनेक प्रश्न यावरून उपस्थित झाले असले तर खासदार प्रतिभा धानोरकर यांनी तक्रार प्राप्त होताच संबंधितांना मदत का दिली नाही याबाबत वनविभागाला जाब विचारला आणि काही दिवसात 3 वर्षांपासून मदतीपासून वंचित राहिलेल्या नागरिकांना मदत मिळाली.

  • Fair grain shopkeeper : रास्त धान्य दुकानदारांना न्याय द्या – खासदार प्रतिभा धानोरकर

    Fair grain shopkeeper : रास्त धान्य दुकानदारांना न्याय द्या – खासदार प्रतिभा धानोरकर

    Fair grain shopkeeper खासदार प्रतिभा धानोरकर यांनी लोकसभा क्षेत्रातील अनेक समस्या सोडविण्याचा प्रयत्न सुरु केला असून आज दि. 21 ऑगस्ट रोजी रास्त धान्य दुकानदारांच्या समस्यांसंदर्भात त्यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री यांची भेट घेतली.

    महत्वाची सूचना : चंद्रपूर जिल्ह्यातील ही पर्यटन स्थळे बंद

    Fair grain shopkeeper पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 80 कोटी नागरिकांना प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेमध्ये पाच वर्षांकरीता मोफत धान्य देण्याची घोषणा केली आहे. परंतु हे धान्य ज्या दुकानदारांच्या माध्यमातून नागरीकांपर्यंत पोहचविण्यात येते त्या दुकानदारांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने चंद्रपूर व यवतमाळ जिल्हयातील रास्त धान्य दुकानदार संघटनेने खासदार प्रतिभा धानोरकर यांची भेट घेत आपल्या समस्यांचे निवेदन दिले. यावर आपण तोडगा काढण्याचे प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन संघटनेला दिले होते.

    सुरक्षा : महिला सुरक्षेसंदर्भात कठोर कायदे करा – खासदार प्रतिभा धानोरकर

    त्या समस्ये संदर्भात खासदार धानोरकर यांनी आज अन्न व नागरी पुरवठा मंत्री यांची भेट घेऊन रास्त भाव दुकानदारांच्या समस्या संदर्भात चर्चा केली. यामध्ये प्रामुख्याने वाढवा आयोगाच्या शिफारशीनुसार 460 रु. प्रति क्विंटल कमीशन करणे, 4G ई-पास मशिन यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या कायमस्वरुपी सोडविणे, वरोरा तालुक्यातील दुकानदारांचे कमीशन चे पैसे तात्काळ देणे व ऑफलाईन धान्य वाटप संदर्भात सर्व मागण्यांवर मंत्री महोदयांसोबत चर्चा केली. या सर्व समस्या लवकरच सोडविणार असल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

    खासदारपदी निवडून आल्यावर खासदार प्रतिभा धानोरकर ह्या आपल्या माध्यमातून अनेक समस्यांना वाचा फोडत न्यायासाठी थेट शासनदरबारी जात आहे, जातनिहाय जनगणना, बाबूपेठ रेल्वे उड्डाणपूल, मूर्ती विमानतळ याबाबत धानोरकर सतत पाठपुरावा करीत आहे.

  • Mahila Suraksha : महिला सुरक्षेसंदर्भात प्रत्येक राज्याने कठोर कायदे करावे – खासदार प्रतिभा धानोरकर

    Mahila Suraksha : महिला सुरक्षेसंदर्भात प्रत्येक राज्याने कठोर कायदे करावे – खासदार प्रतिभा धानोरकर

    Mahila Suraksha कलकत्ता येथील मेडीकल कॉलेज मध्ये घडलेली घटना निंदनिय असून आरोपींवर कडक कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तथा गृह मंत्री अमित शाह यांचे कडे केली आहे.

    अवश्य वाचा : आता आपण ही बनू शकता व्यावसायिक पायलट, चंद्रपुरात होणार प्रशिक्षण

    Mahila suraksha कलकत्ता येथील घटना मन हेलावणारी असून या घटनेचा कितीही निषेध केला तरी कमी आहे. या घटनेच्या संदर्भाने पुन्हा एकदा महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून यासाठी प्रत्येक राज्याने देखील प्रयत्न केला पाहिजे. यासंदर्भात खासदार प्रतिभा धानोरकर यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री तसेच आरोग्य मंत्री जे.पी. नढ्ढा यांना प्रत्र लिहून आरोग्य यंत्रणेला सुरक्षा प्रदान करुन आरोपींना देखील कडक सजा व्हावी अशी भावना खासदार प्रतिभा धानोरकर यांनी पत्रातून व्यक्त केली आहे.


    महिला ह्या प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहेत. देशाच्या विकासात महिलांचा वाटा मोठा आहे परंतु त्या जर सुरक्षी राहील्या नाही. तर देशात अराजकता निर्माण होईल. याकरीता प्रत्येक राज्यातील सरकार ने देखील तसेच सरकार ने देखील महिला सुरक्षेसंदर्भात कडक कायदे करावेत, असे मत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केले आहे. महाराष्ट्र राज्यात महिला सुरक्षेसंदर्भात शक्ती कायदा लागू करण्याकरीता खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आमदार असतांना विधानसभेत मागणी केली होती. वरील प्रकरणी केंद्र सरकार ने दखल घेऊन तत्काळ कार्यवाही करावी अशी मागणी खासदार प्रतिभा धनोरकर यानी केली आहे.

    कलकत्ता येथील प्रकरण काय?

    कोलकाता येथील आर. जी कर मेडिकल महाविद्यालय आणि रुग्णालयात एका डॉक्टरची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. त्याआधी तिच्यावर बलात्कार करण्यात आला. तिच्या मृतदेहावर अनेक जखमा होत्या. या घटनेचा देशभरातून निषेध केला जातो आहे. या घटनेवरुन देशभरातले डॉक्टर हे त्यांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर आक्रमक झाल्याचं शनिवारी पाहण्यास मिळालं. अशातच या महविद्यालय आणि रुग्णालयातील डॉक्टरांनी या प्रकरणात काही प्रश्नही उपस्थित केले आहेत.

    पोलीसांनी एकच आरोपी संजय रॉय याला अटक केली आहे. रॉय हा एक 33 वर्षीय सिव्हिक वॉलंटियर असून त्याला हॉस्पिटलच्या विविध विभागात प्रवेश होता. पोलिसांनी त्याच्याकडून ब्लूटूथ इयरफोनचा तुकडा जप्त केला. CCTV फूटेजच्या आधारावर आरोपीला ओळखण्यात आले. संजय रॉयला न्यायालयाने 14 दिवसांची न्यायिक कोठडी सुनावली आहे. त्याला बलात्कार आणि हत्या या कलमानुसार आरोपित केले आहे.

  • Mp Pratibha Dhanorkar : खासदार धानोरकर यांची पालकमंत्री मुनगंटीवार यांच्यावर जोरदार टीका

    Mp Pratibha Dhanorkar : खासदार धानोरकर यांची पालकमंत्री मुनगंटीवार यांच्यावर जोरदार टीका

    mp pratibha dhanorkar गुरू गुरनुले मूल :- बल्लारपूर विधानसभा ही क्षेत्राचे आमदार राज्याचे वनमंत्री असताना सुदधा तालुक्यातील समस्या सुटलेल्या नाही. ठेकेदाराचे काम देताना सुद्धा भेदभाव करतात. म्हणूनच लोकसभेमध्ये त्यांना मतदारांनी नाकारले. आणि ही गर्दी पाहून आताही विधानसभेमध्ये मतदार नाकारतील. असे मत नवनिर्वाचित खासदार प्रतिभा बाळुभाऊ धानोरकर यांनी व्यक्त केले.

    गांधी चौक मुल येथे तालुका कॉंग्रेस पक्षातर्फे महिला कांग्रेस तर्फे त्यांचा शाल, श्रीफळ,सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला यावेळी सत्काराला उत्तर देताना त्या बोलत हौत्या. वनांच्या संदर्भात अनेक समस्या उदभवल्या असताना वनमंत्री त्यावर कोणत्याच उपाय योजना आखताना दिसत नाही, अशी टिका त्यांनी यावेळी केली. वाघ व रान डुकरे यांच्या रोजच्या हल्ल्यामुळे शेतकरी , शेतमजूर आणि गुराख्यां मध्ये भितीचे निर्माण झाली आहे. शेतकरी शेती करणे सोडत आहेत ही भिती दूर करण्याची नैतिक जबाबदारी पालक मंत्र्यांची आहे. असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्याबाबत वरिष्ठ अधिका-यांची आढावा बैठक बोलावून यावर तोडगा काढला जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली.जिल्हयात सुडबुदधीचे राजकारण केल्या जात असल्याने क्षेत्राच्या विकासासाठी आपल्या हक्काचा आमदार आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

    राजकारण : हजारो युवकांचा कांग्रेस पक्षात प्रवेश

    लोकसभेचे क्षेत्र मोठे असल्याने या क्षेत्राच्या विकास कामांसाठी केंद्र शासनाने प्रत्येक खासदाराचा निधी तीस कोटी वाढवून दयावा ,अशी मागणी करणार असल्याचे सांगितले. सत्काराला उत्तर देताना त्यांनी मतदारांच्या विश्वासाला तडा जाणार नाही,असा शब्दही दिला.मतदारांनी आपल्या कडे हक्काने आपले प्रश्न मांडावेत असेही त्या म्हणाल्या.


    कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा कांग्रेस अध्यक्ष आमदार सुभाष धोटे .प्रमूख पाहूणे म्हणून चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत, वी.परिषदेचे आ.अभिजीत वंजारी, माजी आ.देवराव भांडेकर, मा.न.प.अध्यक्ष घनश्याम मुलचंदानी,माजी जि.प.अध्यक्ष प्रकाश मारकवार, डॉ.अभिलाषा गावतूरे,सभापती राकेश रत्नावार, उपसभापती राजेंद्र कन्नमवार, जिल्हा कांग्रेस महासचिव घनश्याम येनुरकर,तालुका अध्यक्ष गुरु गुरनूले, राजू पाटील मारकवार, संचालक किशोर घडसे, महिला अध्यक्ष रूपाली संतोषवार, माजी.जीप.सदस्य मंगला आत्राम, लीना फुलझेले, उपस्थित होते.

    गोळीबार : गोळीबार प्रकरणी राजकीय पदाधिकाऱ्याला अटक

    मतदार संघाचा इतिहास प्रास्तविकामधून तालुका अध्यक्ष गुरू गुरनूले यांनी मांडला. यावेळी संतोषसिंह रावत यांनी निधी अभावी ग्रामपंचायत क्षेत्रातील विकास ठप्प आहे. अशा ग्रामपंचायतींना न्याय देण्याची मागणी केली.रोज होणारे मानव वन्यजीव संघर्ष,धनगरांचा चराईचा निस्तारहक्क, वन जमीन पटटे, रानडुक्करांमुळे होणारे शेतपीकांचे नुकसान याबाबत आपण न्याय मिळऊन देण्यासाठी प्रयत्न करावे. असे मत संतोष सिंह रावत यांनी खासदारांपुढे व्यक्त केले.

    Mp pratibha dhanorkar यावेळी आ.अभिजीत वंजारी यांनीही परखड शब्दात मनोगत व्यक्त केले. राज्यात मविआचे सरकार आल्यास लाडकी बहिण योजना आम्ही बंद करणार नाही.उलट तीन हजारांऐवजी पाच हजार रूपये प्रत्येकी देवू अशी ग्वाही आ.सुभाष धोटे यांनी अध्यक्षस्थानावरून बोलताना दिली. कार्यक्रमाचे संचालन शहराध्यक्ष सुनिल शेरकी यांनी ,तर आभार महिला शहर अध्यक्ष नलिनी आडेपवार यानी मानले. सभेला मविआ घटक पक्षाचे पदाधिकारी, यांचेसह हजारच्या वर नागरिक उपस्थित होते.

    युवक काँग्रेसचे संदीप मोहबे,प्रशांत उराडे,अतुल गोवर्धन,विष्णू सादमवर कैलाश चलाख, शामला बेलसरे,समता बंसोड,सीमा भसारकर, यांनी सहकार्य केले. सात युवकांचा कांग्रेस मध्ये प्रवेश काँग्रेसची पुढची वाटचाल पाहून संतोषसिंह रावत यांचे नेतृत्व मानून अनंत लेनगुरे, शेंडे, काळंबंधे, बावनथडे, यांचे सोबत अनेक युवकांनी गळ्यात कांग्रेस दूपट्टा टाकून प्रवेश केला नवनिर्वाचित खासदार प्रतिभाताई बाळुभाऊ धानोरकर यांचे ग्रामीण सरपंच,सोसायटी अध्यक्ष,संचालक,ग्राम काँग्रेसचे पदाधिकारी यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

  • Mp Pratibha Dhanorkar : लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनात खासदार धानोरकरांची जोरदार बॅटिंग

    Mp Pratibha Dhanorkar : लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनात खासदार धानोरकरांची जोरदार बॅटिंग

    mp pratibha dhanorkar सध्या लोकसभेचे पावसाळी अधिवेशन सुरु असून 23 जुलै रोजी देशाचा अर्थसंकल्प वित्त मंत्री निर्मला सितारमण यांनी सभागृहात सादर केला. या अर्थसंकल्पावर विरोधी पक्षाने सरकारला चांगलेच घेरले. काल चंद्रपूर-वणी-आर्णी क्षेत्राच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी देखील सभागृहात अर्थसंकल्पावर भाषण देत मोदी सरकार विविध आघाड्यांवर कसे अपयशी ठरले याकडे लख वेधले.

    Mp pratibha dhanorkar खासदार धानोरकर यांनी आपल्या भाषणा दरम्यान महाराष्ट्र राज्याला अर्थसंकल्पात सावत्र वागणूक मिळाल्याची खंत देखील व्यक्त केली. त्यासोबतच शेतकरी आत्महत्या रोखण्यात हे सरकार अपयशी ठरल्याचे देखील सांगितले. 2005 नंतर सेवेत दाखल झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागू करावी, अशी मागणी देखील सभागृहात केली. शेतकऱ्यांच्या शेतमाला ला हमीभाव मिळावा यासाठी देखील प्रयत्न करावे अशी मागणी केली.

    अवश्य वाचा : चंद्रपुरातील युवक आता पायलट बनणार

    चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील पूर परिस्थितीच्या संदर्भाने देखील सभागृहात चर्चा करुन तात्काळ मदतीची मागणी केली. प्रधानमंत्री पिक विमा योजनेची रक्कम तात्काळ मिळावी, शेतकऱ्यांच्या मागण्यासंदर्भात केंद्र सरकार ने सभागृहात चर्चा करावी अशी मागणी केली. शेतकऱ्यांच्या बी-बियाणावर व साहित्यांवर लावलेला जीएसटी चुकीचे असल्याचा घणाघात देखील खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केला. नीट मधील पेपर फुटीच्या प्रकरण व आस.ए.एस. अधिकारी पुजा खेडेकर यांच्या संदर्भाने देखील सभागृहाचे लक्ष वेधले. जातनिहाय जणगणना करावी अशी मागणी देखील खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केली.

    अवश्य वाचा : गडचांदूर चा बॉम्ब निकामी, जुळ्या भावांना अटक

    महाराष्ट्रातील आरक्षणाचा तिढा केंद्र सरकार ने सोडवावा, अशी देखील मागणी यावेळी करण्यात आली. दरवर्षी दोन कोटी युवकांना रोजगाराचे आमिष दाखवून सरकार ने युवकाची दिशाभूल केल्याचे खासदार प्रतिभा धानोरकर यांनी सांगितले. देशात महिलांवर होणाऱ्या अन्याय व अत्याचारासंदर्भात सरकार ला चांगलेच धारेवर धरले. कोळसा खाणी संदर्भात प्रकल्पग्रस्तांना वाढीव मोबदल्याची मागणी देखील अर्थसंकल्पावरील भाषणात केली. या सोबतच भारत जोडो यात्रे संदर्भात राहुल गांधीनी इतिहास घडविल्याचे वक्तव्य देखील खासदार प्रतिभा धानोरकर यांनी सभागृहात सांगितले. 

  • Chandrapur : गृहमंत्री साहेब चंद्रपुरात गुन्हेगारी वाढतेय – खासदार प्रतिभा धानोरकर

    Chandrapur : गृहमंत्री साहेब चंद्रपुरात गुन्हेगारी वाढतेय – खासदार प्रतिभा धानोरकर

    Chandrapur चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील जंगलराज संपुष्टात यावे, अवैध धंद्यांमुळे वाढणारा अग्नीशंस्त्रांचा वापर यावर नियंत्रण करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याच्या मागणीसाठी तसेच चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील वाढत्या गुन्हेगारी वर चर्चा करण्यासंदर्भात खासदार प्रतिभा धानोरकर यांनी गृहमंत्री अमित शाहा यांची भेट घेतली. वारंवार होणाऱ्या गोळीबारीच्या घटना व निरपराध नागरीकांचे गेलेले जीव यावर देखील खासदार धानोरकर यांनी चर्चा केली. जिल्ह्यातील गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी राज्य सरकार ला आदेश द्यावे, अशी विनंती देखील यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केली.

    अवश्य वाचा : लाडक्या बहिणींना मिळणार 3 मोफत सिलेंडर

    Chandrapur तसेच देश प्रगतीच्या दिशेने जात असतांना डिजिटल वर्ल्ड हि संकल्पना समोर आल्याने अनेकजन ऑनलाईन च्या माध्यमातून खरेदी करत असतांना दिसत असतात. हळूहळू सर्व व्यवहार मोबाईल किंवा लॅपटॉप मध्ये करत असतांना त्यातून ऑनलाईन फसवणूकीच्या घटना घडत आहेत. धावपळीच्या काळात अनेकजन मोबाईल च्या माध्यमातून आपले व्यवहार पार पडत असतात. परंतु याचाच फायदा घेऊन अनेकांना ऑनलाईन फसवणूकीचा सामना करावा लागत आहे. या संदर्भात चंद्रपूर  जिल्ह्यासह देशात अनेक गुन्ह्यांची नोंद देखील झाली आहे. अनेक ग्राहकांना चुकीचे कारण सांगुन ओटीपी मागुन ऑनलाईन फसवणूक केली जाते.

    महत्त्वाचे : चंद्रपूर जिल्ह्यातील युवक बनणार पायलट

    देशभरात जाने. 2024 ते एप्रिल 2024 या काळात 1750 करोड रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाली असून या संदर्भात 7 लाख 40 हजार तक्रारी प्राप्त झाल्या असल्याकडे खासदार महोदयांनी गृहमंत्र्यांचे लक्ष वेधले.

    या संदर्भात दोन्ही विषयांवर सकारात्मक प्रतिसाद देत निर्णय घेणार असल्याचे गृह मंत्री अमित शाहा यांनी सांगितले. 

  • Cast Wise Census : राज्यातील आरक्षणाचा तिढा सुटणार?

    Cast Wise Census : राज्यातील आरक्षणाचा तिढा सुटणार?

    cast wise census महाराष्ट्रात मराठा समाज मनोज जंरागे याचे नेतृत्वात आरक्षणाच्या मागणीसाठी आदोंलन करित असतानां खा.प्रतिभा धानोरकर यांनी राष्ट्रपती भवनात मा. राष्ट्रपती र्द्रोपदी मुर्मु यांची भेट घेत जातीनिहाय जनगणेची मागणी केली.


    विविध जातीचा आरक्षणासाठी लढा सुरु असुन अनेक आदोंलने महाराष्ट्रात सुरु आहेत. मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात मराठा समाजाचे आरक्षणासाठी आदोंलन सुरु आहे. या आदोंलनाचा तिढा अदयापही राज्य शासन  सोडवु शकले नाही. अनेक आदोंलन कर्त्यानी आरक्षणासाठी प्राण देखिल गमावले. मागिल 14 वर्षापासून अदयापही केंद्र सरकारने जातनिहाय जनगणना केली नाही. यामुळे सरकारकडे कुठलीही आकडेवारी उपलब्ध नाही.

    अवश्य वाचा : चंद्रपुरात युवकांचा जीवघेणा स्टंट

    Cast wise census या पार्शभूमीवर खा. प्रतिभा धानोरकर यांनी मा. राष्ट्रपती र्द्रोपदी मुर्मु यांची भेट घेत, महाराष्ट्रातील तिढा सोडविण्याची मागणी या वेळी केली.राज्यातील आरक्षणाचा तिढा सोडविण्यासाठी राज्य सरकार कढुन केंद्र सरकारने अहवाल मागवुन जातनिहाय जनगणना करुन 50 टक्के अरक्षणाची मर्यादा वाढवावी अषी मागणी देखिल यावेळी करण्यात आली.

    अवश्य वाचा : ओबीसींच्या 18 जातींचा केंद्रीय सूचित समावेश होणार – हंसराज अहिर

    या संदर्भात राष्ट्रपती यांनी सकारात्मक चर्चा होवुन भविष्यात या मध्ये सरकारला मार्ग काढण्याचा प्रयत्न करण्याच्या सुचना करणार असल्याचे सांगितले. यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या सोबत खासदार वंसतराव चव्हाण, खासदार नागेश पाटील, खासदार संजय जाधव याची देखिल उपस्थिती होती.

  • Pratibha dhanorkar speech : शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर खासदार धानोरकर यांनी संसद गाजवली

    Pratibha dhanorkar speech : शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर खासदार धानोरकर यांनी संसद गाजवली

    Pratibha dhanorkar speech लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनाला 22 जुलै पासून सुरुवात झाली असून लोकसभेत पहिल्यांदाच चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्रातून बहूमतांनी निवडून गेलेल्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आज आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार ला जाब विचारुन आपल्या पहिल्या भाषणाला सुरुवात केली.

    अवश्य वाचा :शेतकऱ्यांच्या मदतीला धावले शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे

    Pratibha dhanorkar speech वरोरा विधानसभेच्या आमदार पदाच्या काळात विविध आयुधांचा वापर करुन मतदार संघातील विविध प्रश्न मार्गी लावणाऱ्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी लोकसभेत शून्य तासात शेतकरी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारला धारेवर धरले. खासदार धानोरकर म्हणाल्या कि, 2014 मध्ये उत्पन्न दुप्पट करुन देण्याचे वचन मोदी सरकार ने दिले. पण हे सरकार संपुर्ण अपयशी ठरले असून शेतकरी कुटूंबांची परिस्थिती भयावह असल्याचे देखील मत यावेळी व्यक्त केले.

    बघा संपूर्ण भाषण

    मागील पाच वर्षाच्या कार्यकाळात चंद्रपूर जिल्हîात 444 तर यवतमाळ जिल्हîात 1641 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. चंद्रपूर जिल्हîातील 444 शेतकऱ्यांपैकी 122 तर यवतमाळ जिल्हîातील 1641 पैकी 819 शेतकरी अपात्र ठरल्याचे आज सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. हे सरकार पोकळ घोषणा करणारे असून फक्त आपल्या उद्योग मित्रांच्या पाठिशी असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांप्रती असणारी उदासिनता दुर करुन शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यापासून परावृत्त करावे अशी मागणी देखील खासदार प्रतिभा धानोरकर यांनी सभागृहात केली.