Tag: खासदार प्रतिभा धानोरकर

  • खासदार प्रतिभा धानोरकरांच्या पाठपुराव्याला यश; आयुध निर्माणी चांदातील अनुकंपा नियुक्ती मार्गी लागणार

    Compassionate appointment : चंद्रपूर १५ डिसेंबर २०२५ (News३४) : आयुध निर्माणी चांदा येथील अनुकंपा तत्वावरील नियुक्तीच्या प्रलंबित प्रश्नावर खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर मोठे यश मिळणार आहे. गेली अनेक वर्षे न्याय मिळण्याची वाट पाहणाऱ्या आणि आपल्या कुटुंबातील सदस्याला गमावलेल्या कामगार कुटुंबियांच्या या प्रश्नाला खासदार प्रतिभा धानोरकर यांनी सातत्याने केंद्र सरकारच्या निदर्शनास आणून दिले होते. यावर निर्णय घेण्यासाठी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी दिल्ली येथे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेऊन या विषयावर चर्चा केली आणि तात्काळ हा प्रश्न मार्गी काढण्याची विनंती केली. त्यांच्या या मागणीची दखल घेत संरक्षण मंत्र्यांनी चांदा येथील कामगार कुटुंबियांना मोठा दिलासा देणारे आश्वासन दिले आहे. (हे हि वाचा – चंद्रपूर मनपा आयुक्तांनी दाखविला शिस्तीचा IAS पॅटर्न)

    संरक्षण मंत्र्यांनी खासदार प्रतिभा धानोरकर यांची मागणी मंजूर करून असे आश्वासन दिले असून, आयुध निर्माणी चांदा येथील अनुकंपा धारकांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. या महत्त्वपूर्ण आश्वासनानुसार, गेल्या तीन वर्षांपासून नियुक्ती पत्राच्या प्रतीक्षेत असलेल्या आणि आवश्यक लिखित परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण केलेल्या २३ अनुकंपा धारकांना कोणतीही दिरंगाई न करता त्वरित नियुक्ती देण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. तसेच, निगमीकरण प्रक्रियेमुळे नियुक्तीसाठी पात्र नसलेल्या उर्वरित सर्व अनुकंपा धारकांना देखील दिलासा मिळाला आहे. Compassionate appointment

    या सर्व उर्वरित अनुकंपा धारकांना ‘वन-टाईम रिलॅक्सेशन’ च्या माध्यमातून १००% अनुकंपा तत्वावर समायोजित करण्याची मागणी देखील संरक्षण मंत्र्यांनी स्वीकारली आहे. ती त्वरित पूर्ण करण्याचे आश्वासन दिले असून संबंधित यंत्रणेला हा प्रश्न त्वरित मार्गी काढण्याचे निर्देश यावेळी संरक्षण मंत्र्यांनी दिले. 

    या आश्वासनाबद्दल खासदार प्रतिभा धानोरकर यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे मनःपूर्वक आभार मानले. त्या म्हणाल्या, “हा निर्णय केवळ २३ किंवा त्याहून अधिक कुटुंबांना नोकरी देणारा नाही, तर अनेक वर्षांपासून न्याय मिळण्याची वाट पाहणाऱ्या शेकडो कुटुंबांना सामाजिक आणि आर्थिक आधार देणारा आहे. त्यांच्या संघर्षाला अखेर यश येणार असून, त्यांचे शोषण थांबले आहे.” हे आश्वासन चांदा येथील कामगार कुटुंबियांसाठी अत्यंत महत्त्वाचे असून, प्रलंबित असलेल्या अनुकंपा नियुक्तीच्या प्रक्रियेतील सर्व अडथळे दूर होणार आहेत.

  • लोकसभेत खासदार धानोरकरांच्या प्रश्नावर धक्कादायक वास्तव समोर

    lung cancer in women : चंद्रपूर : भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदेच्या राष्ट्रीय कर्करोग पंजीकरण कार्यक्रमाच्या अभ्यासामध्ये देशातील महिलांमधील फुफ्फुसांच्या कर्करोगाशी संबंधित महत्त्वपूर्ण आकडेवारी समोर आली आहे. या अभ्यासानुसार, महिलांमधील फुफ्फुसांच्या कर्करोगाच्या एकूण प्रकरणांपैकी जवळपास ५३% प्रकरणे ‘एडेनोकार्सिनोमा’ या प्रकाराची आहेत, जो “गैर-धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींमध्ये आढळणारा सर्वात सामान्य हिस्टोपॅथोलॉजिक प्रकार” आहे. (हे हि वाचा – खासदार धानोरकरांचा पाठपुरावा यशस्वी, चंद्रपूर मनपात आता IAS दर्जाचा अधिकारी आयुक्त)

    १९८२ ते २०१६ या दीर्घ कालावधीत महानगरांमध्ये फुफ्फुसांच्या कर्करोगाच्या घटनांमध्ये लक्षणीय वार्षिक वाढ नोंदवली गेली आहे. या गंभीर सार्वजनिक आरोग्य समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी, खासदार प्रतिभा धानोरकर यांनी दिनांक १२ डिसेंबर २०२५ रोजी लोकसभेत अतारांकित प्रश्न संख्या २२८२ अंतर्गत केंद्र सरकारला महत्त्वपूर्ण प्रश्न विचारला होता. त्यात हि गंभीर आकडेवारी समोर आली आहे. 

    खासदार प्रतिभा धानोरकर यांनी फुफ्फुसांच्या कर्करोगाची लक्षणे क्षयरोगाशी (टीबी) मिळतीजुळती असल्याने निदानात होणाऱ्या विलंबाचा महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. यावर शासनाने स्पष्ट केले की, ‘टीबी मुक्त भारत अभियान’ अंतर्गत, क्षय रोगाच्या तपासणीदरम्यान कर्करोगाची शंका आल्यास, रुग्णांना त्वरित पुढील निदान व उपचारांसाठी विशिष्ट केंद्रांमध्ये पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच, कर्करोगाच्या रुग्णांना टीबीसाठी संवेदनशील मानले जाऊन त्यांच्या नियमित तपासणीवर विशेष लक्ष केंद्रित केले जात आहे. कर्करोगाच्या उपचारांसाठी देशभरात ३९ संस्थांना मंजुरी देण्यात आली असल्याची आकडेवारीही सभागृहात सादर करण्यात आली. lung cancer in women

    फुफ्फुसांच्या कर्करोगाचे एक अप्रत्यक्ष कारण म्हणून वायू प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने जानेवारी २०१९ मध्ये राष्ट्रीय स्वच्छ वायु कार्यक्रम लागू केला आहे. हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम सध्या २४ राज्ये/संघ राज्य क्षेत्रांमधील १३० शहरांमध्ये वायू गुणवत्ता सुधारण्यासाठी कार्यरत आहे. खासदार प्रतिभा धानोरकर यांनी लोकसभेत उपस्थित केलेला हा गंभीर सार्वजनिक आरोग्य विषय आणि त्यावरील शासनाच्या उपाययोजना महत्त्वपूर्ण ठरल्या आहेत. संबंधित समस्या सोडविण्यासाठी शहर, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील स्वच्छ वायू कृती योजनांच्या माध्यमातून अंमलात आनंत असल्याचे केंद्र सरकारने सांगितले आहे. 

  • Ratan Tata Cancer Hospital Chandrapur । चंद्रपूर कॅन्सर हॉस्पिटलला ‘पद्मविभूषण स्व. रतन टाटा’ यांचे नाव द्या!

    Ratan Tata Cancer Hospital Chandrapur

    Ratan Tata Cancer Hospital Chandrapur : चंद्रपूर ४ ऑक्टोबर (News३४) : महाराष्ट्र शासन आणि टाटा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने चंद्रपूर येथे मध्य भारतातील सर्वात मोठे कर्करोग निदान आणि उपचार रुग्णालय उभारले जात आहे. या मानवतावादी आणि महत्त्वपूर्ण प्रकल्पात उद्योगपती आणि थोर दानशूर व्यक्तिमत्त्व पद्मविभूषण स्व. रतन टाटा यांचे अमूल्य योगदान आहे.

    Also Read : चंद्रपूर जिल्ह्यातील सुगंधित तंबाखू माफियांवर होणार कारवाई

    खासदार प्रतिभा धानोरकर यांनी या अत्याधुनिक रुग्णालयाला ‘पद्मविभूषण स्व. रतन टाटा कॅन्सर रुग्णालय’ असे नाव देण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे, त्यांनी या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देऊन ही लोकहितकारी मागणी केली आहे आणि राज्य सरकार तसेच टाटा ट्रस्टकडे विशेष आग्रह धरला आहे.

    कॅन्सर हॉस्पिटलमुळे रुग्णांना मिळेल आधार

    स्व. रतन टाटा यांनी चंद्रपूरसारख्या दुर्गम भागात एवढे मोठे आणि अद्ययावत रुग्णालय उभे करण्यासाठी पुढाकार घेतला, ज्यामुळे विदर्भासह मध्य भारतातील लाखो गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. खासदार प्रतिभा धानोरकर यांनी पत्रात नमूद केले की, रतन टाटा हे चंद्रपूरच्या माता महाकालीच्या पावन भूमीवर येऊन गेले आहेत, ज्यामुळे चंद्रपूरकरांसाठी हा प्रकल्प अधिक महत्त्वपूर्ण ठरतो. Pratibha Dhanorkar appeal Ratan Tata hospital name

    खासदार धानोरकर म्हणाल्या, “रतन टाटा हे केवळ मोठे उद्योगपती नाहीत, तर ते माणुसकी आणि निस्वार्थ समाजसेवेचे मूर्तिमंत उदाहरण आहेत. त्यांनी चंद्रपूरला दिलेले हे रुग्णालय विदर्भासाठी एक वरदान आहे. त्यांच्या या महान योगदानाचा यथोचित गौरव करण्यासाठी, या रुग्णालयाला त्यांचे नाव देणे ही कृतज्ञता व्यक्त करण्याची योग्य पद्धत ठरेल.”त्यांच्या नावाने हे रुग्णालय ओळखले गेल्यास, ते रतन टाटांच्या समाजसेवेच्या विचारांना कायम प्रेरणा देत राहील आणि इतरांनाही सामाजिक बांधिलकीची जाणीव करून देईल, असे भावनिक आवाहनही खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केले आहे.

  • Chandrapur Road Safety Initiative | चंद्रपूरमध्ये वाढत्या अपघातांवर उपाय; रस्त्यांवर ‘कन्वेक्स मिरर’ बसवण्याची धानोरकरांची मागणी

    Chandrapur Road Safety Initiative

    Chandrapur Road Safety Initiative : चंद्रपूर 13 ऑक्टोबर (News34 वृत्तसेवा) : चंद्रपूर शहर महानगरपालिका (मनपा) क्षेत्रातील अपघातांवर नियंत्रण मिळवण्यासाठी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी जिल्हाधिकारी तथा रस्ता सुरक्षा समितीचे  सचिव यांच्याकडे आक्रमक भूमिका घेत तातडीच्या उपाययोजनांची मागणी केली आहे. विशेषतः ‘ब्लॅक स्पॉट’ आणि अंध वळणांवर दृश्यमानता वाढवण्यासाठी त्यांनी परावर्तक रोड स्टड्स सोबतच ‘कन्वेक्स मिरर’ तातडीने बसवण्याची मागणी केली आहे.

    Also Read : दीक्षाभूमीवर राजकीय भाषण नकोचं

    शहरवासीयांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत, खासदार प्रतिभा धानोरकर यांनी रस्ते अपघात रोखण्यासाठी प्रमुख कामांना तातडीने मंजुरी देऊन त्यांची अंमलबजावणी त्वरित सुरू करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

    तातडीने कन्व्हेक्स मिरर बसवा

    शहरातील मुख्य चौक, अरुंद वळण मार्ग आणि वारंवार अपघात होणाऱ्या ‘ब्लॅक स्पॉट’वर वाहनचालकांना बाजूने येणारे वाहन स्पष्टपणे दिसावे यासाठी तातडीने कन्वेक्स मिरर बसवावेत. हे आरसे ‘ब्लाइंड स्पॉट्स’वरील दृश्यमानता वाढवून संभाव्य मोठे अपघात टाळण्यास मदत करतील. याच ठिकाणी परावर्तक रोड स्टड्स बसवून रात्रीच्या वेळी रस्त्याच्या कडेचा अंदाज स्पष्ट होईल, त्यासोबतच शहरातील मुख्य रस्त्यांवरील झेब्रा क्रॉसिंग, लेन मार्किंग व थांबा रेषा रात्रीच्या वेळी अतिशय स्पष्टपणे दिसाव्यात यासाठी थर्मोप्लास्टिक पेंटचा वापर करून नवीन मार्किंग करावे. यामुळे वाहनचालकांना रहदारीच्या नियमांचे पालन करणे सोपे होईल. Convex Mirror Installation Chandrapur

    चंद्रपूर शहर महानगर पालिका हद्दीतील सर्व प्रमुख दवाखाने आणि शाळांच्या परिसरामध्ये ‘शांतता क्षेत्र’ निश्चित करावे. या संवेदनशील भागांमध्ये वाहतूक नियमन सुधारण्यासाठी ‘शांतता क्षेत्र’ आणि ‘सावकाश चला ‘ दर्शवणारे स्पष्ट व परावर्तक सावधानता फलक तातडीने लावण्याचे निर्देशही खासदार प्रतिभा धानोरकर यांनी दिले आहेत.

    खासदार प्रतिभा धानोरकर यांनी सदर कामे रस्ता सुरक्षा समितीच्या माध्यमातून प्राधान्याने आणि तातडीने मंजूर करून नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करावी, अशी विनंती जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.

  • MP Dhanorkar demands IAS posting cmc chandrapur | खासदार प्रतिभा धानोरकरांची मागणी – चंद्रपूर महापालिकेसाठी IAS अधिकारी आवश्यक

    Mp Dhanorkar demands IAS posting cmc chandrapur

    Mp Dhanorkar demands IAS posting cmc chandrapur : चंद्रपूर 17 सप्टेंबर 2025 – भ्रष्टाचाराने बरबटलेल्या आणि ड दर्जाची महानगरपालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंद्रपूर शहर महानगरपालिकेची अवस्था सुधारण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. लोकहिताच्या दृष्टीने या महानगरपालिकेच्या आयुक्त पदावर एका कर्तव्यदक्ष भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, अशी आग्रही विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे. Pratibha Dhanorkar IAS officer request

    अभियंता ओली पार्टी प्रकरण, जिल्हा परिषदेने दिले चौकशीचे आदेश

    चंद्रपूर महानगरपालिका ही सध्या शिस्त आणि कार्यक्षमतेच्या बाबतीत खूपच मागे पडली आहे. नागरिकांच्या मूलभूत सुविधांबाबत मोठ्या प्रमाणावर तक्रारी येत आहेत, आणि अनेक विकासकामे कागदोपत्रीच दिसत आहेत. कामांच्या निविदा प्रक्रियेत अनियमितता, प्रशासकीय दिरंगाई आणि गैरव्यवहाराच्या तक्रारींमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.

    तर पारदर्शकता येणार

    या गंभीर परिस्थितीची दखल घेत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे थेट हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. “चंद्रपूर महानगरपालिकेच्या कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी आणि नागरिकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी एका सक्षम IAS अधिकाऱ्याची नेमणूक करणे अत्यावश्यक आहे. सध्याच्या प्रशासनात दिसून येणारी शिस्तीची कमतरता आणि भ्रष्टाचाराचा विळखा यामुळे शहराचा विकास खुंटला आहे,” असे खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.

    आता या मागणीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय निर्णय घेतात, याकडे चंद्रपूर शहरातील नागरिकांचे लक्ष लागून आहे. एका IAS अधिकाऱ्याच्या नेमणुकीमुळे महानगरपालिकेच्या कामकाजात शिस्त आणि पारदर्शकता येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

  • Korpana Tehsil Issues Discussed । कोरपना तहसील : अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करण्याच्या खासदार धानोरकर यांच्या सूचना

    Korpana Tehsil Issues Discussed

    Korpana Tehsil Issues Discussed : चंद्रपूर (२ सप्टेंबर २०२५) : कोरपना येथील तहसील कार्यालयात आज खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या अध्यक्षतेखाली विविध ज्वलंत प्रश्नांवर एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. माजी आमदार सुभाष धोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत स्थानिक नेते आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

    अतिवृष्टीमुळे पडोली मधील २५० घरात पाणी, आमदार जोरगेवार यांची तत्परता

    यावेळी सर्व मुद्द्यांवर सखोल चर्चा करून त्यांच्या निराकरणासाठी तातडीने उपाययोजना करण्याचा सूचना करण्यात आल्या.जिल्ह्यात सध्या खताची तीव्र टंचाई असून, विशेषतः युरिया उपलब्ध नसल्याची गंभीर बाब निदर्शनास आणून देण्यात आली. ऑनलाईन अर्जांमध्ये कागदपत्रांच्या साईजची मर्यादा असल्याने शेतकऱ्यांची मोठी अडचण होत असून, कृषी सहायकांनी यावर तातडीने कार्यवाही करणे आवश्यक असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.

    विविध समस्यांवर चर्चा

    विकासकामांच्या स्थितीवरही सकारात्मक चर्चा झाली. पॉवर हाऊस ते नंदाफाटा पर्यंतचे काम अद्याप अपूर्ण असून, कोरपना तालुक्यातील रस्त्यांचे बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचे असल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. घरकुल धारकांना जवळच्या घाटातून रेती उपलब्ध करून देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. तसेच, अनेक अपूर्ण बांधकामे तात्काळ पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली. Pratibha Dhanorkar addresses urea shortage Korpana

    meeting pratibha dhanorkar

    याशिवाय, बँक ऑफ इंडियामध्ये कर्मचाऱ्यांचा अभाव असल्यामुळे कामकाजावर परिणाम होत असल्याचेही निदर्शनास आणून देण्यात आले.या सर्व समस्यांवर बोलताना खासदार प्रतिभा धानोरकर म्हणाल्या की, “नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी एकत्र येऊन काम करणे आवश्यक आहे. या सर्व समस्यांवर तात्काळ उपाययोजना करून कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

    या बैठकीला माजी आमदार सुभाष धोटे, उपविभागीय अधिकारी रवींद्र माने, तहसीलदार पल्लवी आखरे, विस्तार अधिकारी पाल, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विजय बावणे, काँग्रेस तालुका अध्यक्ष उत्तम पेचे, पोलीस निरीक्षक कदम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता अडपेवार, काँग्रेस नेते सुरज ठाकरे, नितीन बावणे, आशिष देरकर, शैलेश लोखंडे, अशोक बावणे, आणि संतोष महाडोळे यांची उपस्थिती होती.

  • online gaming regulation bill India । ऑनलाइन मनी गेम्सवर बंदी, खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या प्रयत्नांना मोठे यश

    online gaming regulation bill India

    online gaming regulation bill India : चंद्रपूर : भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेतील एक महत्त्वाचे आणि वेगाने वाढणारे क्षेत्र असलेल्या ऑनलाइन गेमिंगमुळे निर्माण झालेल्या गंभीर समस्यांवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी कर्तव्यदक्ष खासदार प्रतिभा धानोरकर यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. संबंधित आमदार असताना देखील विधानसभेत याबाबतच्या आवाज उठवला होता. सत्यासोबतच विद्यमान मंत्र्यांना याबाबत पत्र व्यवहार करण्यात आला होता. त्यासोबत कठोर कारवाई करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र व्यवहार केला होता. त्यांच्या या कठोर परिश्रमामुळे आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मोठे यश मिळाले आहे. या गंभीर समस्येची दखल घेत, आज लोकसभेत माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स मंत्रालयाचे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ‘ऑनलाइन गेमिंगचे नियमन आणि प्रोत्साहन विधेयक, २०२५’  सादर केले आहे. legislation banning real money gaming India

    नालीच्या चेंबरमध्ये कोसळला युवक, व्हिडीओ व्हायरल

    हे विधेयक अनेक महत्त्वपूर्ण उद्दिष्टांसह आणले गेले आहे. ऑनलाइन मनी गेम्समुळे अनेक लोक कर्जबाजारी झाले असून, काही ठिकाणी व्यसनाधीनतेमुळे आत्महत्या करण्यासारख्या गंभीर घटना घडल्या आहेत. हे विधेयक अशा ऑनलाइन मनी गेम्सवर पूर्णपणे बंदी घालण्याची तरतूद करण्यात आली आहे, जे वापरकर्त्यांकडून आर्थिक लाभाच्या अपेक्षेने खेळले जातात. याचा मुख्य उद्देश, विशेषतः तरुण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बळ व्यक्तींना व्यसनाधीनतेपासून आणि सामाजिक, आर्थिक व मानसिक हानीपासून संरक्षण देण्यात आले आहे. तसेच, या विधेयकात ऑनलाइन मनी गेम्सशी संबंधित आर्थिक फसवणूक, मनी-लॉण्ड्रिंग आणि करचोरी यांसारख्या बेकायदेशीर कृत्यांना प्रतिबंध घालण्यात येणार आहे. 

    ऑनलाइन मनी गेमिंग सेवांचा वापर दहशतवादाला निधी पुरवण्यासाठी

    या विधेयकात ई-स्पोर्ट्स, शैक्षणिक आणि सामाजिक खेळांना प्रोत्साहन देण्याची तरतूद आहे. यासाठी एक स्वतंत्र ‘ऑनलाइन गेमिंग प्राधिकरण’ स्थापन केले जाईल, जे या खेळांना मान्यता देईल आणि त्यांचे नियमन करण्यात येणार आहे. ऑनलाइन मनी गेमिंग सेवांचा वापर दहशतवादाला निधी पुरवण्यासाठी केला जात असल्याच्या अहवालांच्या पार्श्वभूमीवर, हे विधेयक राष्ट्रीय सुरक्षेसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. सध्या या क्षेत्रासाठी कोणतीही समर्पित संस्था किंवा कायदेशीर चौकट नाही. हे विधेयक एकसमान आणि राष्ट्रीय स्तरावरील कायदेशीर चौकट तयार करेल, ज्यामुळे या उद्योगाची रचनाबद्ध वाढ होईल. ban on money games India bill

    खासदार प्रतिभा धानोरकर यांनी संसदेत आणि संसदेबाहेर ऑनलाइन मनी गेम्सच्या धोक्याबद्दल सातत्याने आवाज उठवला होता. त्यांनी या खेळांमुळे कुटुंबांमध्ये निर्माण झालेल्या समस्या, युवकांवर होणारे नकारात्मक परिणाम आणि आर्थिक नुकसानीकडे सरकारचे लक्ष वेधले होते. त्यांच्या या योगदानामुळेच केंद्र सरकारने या विषयाची गंभीर दखल घेतली आणि आज हे महत्त्वाचे विधेयक संसदेत सादर झाले. हे विधेयक ऑनलाइन गेमिंग क्षेत्राला सुरक्षित, जबाबदार आणि प्रगतीशील बनवण्यासाठी एक मैलाचा दगड ठरणार आहे.

  • Pratibha Dhanorkar on human-wildlife conflict । ‘फक्त कागदी योजना नकोत!’ मानव-वन्यजीव संघर्षावर प्रतिभा धानोरकरांचा प्रश्न

    Pratibha Dhanorkar on human-wildlife conflict

    Pratibha Dhanorkar on human-wildlife conflict : चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील मानव-वन्यजीव संघर्ष गंभीर स्वरूप धारण करत असून, गेल्या सात महिन्यांत २५ लोकांचा मृत्यू झाला आहे, तर १०८ लोक जखमी झाले आहेत. खासदार प्रतिभा धानोरकर यांनी लोकसभेत विचारलेल्या प्रश्नावर पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने दिलेल्या उत्तरातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.

    बघता बघता तो थेट नालीत कोसळला, व्हिडीओ व्हायरल

    केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, या गंभीर परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने विविध उपाययोजना केल्याचा दावा केला आहे. यात मानव-वन्यजीव संघर्ष रोखण्यासाठी एआय (AI) युक्त कॅमेरे बसवणे, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या सीमेवरील गावांमध्ये तातडीच्या मदतीसाठी प्राथमिक प्रतिसाद गट (Quick Response Teams) तयार करणे, तसेच जंगली जनावरांच्या हल्ल्यातील पीडितांना वेळेवर आर्थिक सहाय्य देणे यांचा समावेश आहे. मात्र, या उपाययोजना सुरू असतानाही मृतांचा आणि जखमींचा वाढता आकडा पाहता, या उपाययोजना किती प्रभावी ठरत आहेत, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

    केवळ कागदोपत्री उपाययोजनांची माहिती

    या गंभीर समस्येवर केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघांनीही ठोस आणि परिणामकारक पाऊले उचलणे अपेक्षित असताना, केवळ कागदोपत्री उपाययोजनांची माहिती देऊन प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न होत असल्याचा सूर उमटत आहे. वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ अंतर्गत, मानवी जीवनासाठी धोकादायक ठरलेल्या वन्य प्राण्यांच्या शिकारीची परवानगी देण्याचा अधिकार राज्याच्या मुख्य वन्यजीव रक्षकांना असला, तरी या अधिकाराचा वापर करून नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी तातडीने कठोर निर्णय घेतले जात नसल्याचे दिसून येत आहे.

    केंद्र सरकारकडून दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीचा उपयोग सौर कुंपणे आणि भौतिक अडथळे उभारण्यासाठी होत असल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्ष परिस्थितीत हे अडथळे वन्यप्राण्यांना रोखण्यात अपयशी ठरत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

  • aadhaar card dual surname for women । 💥 महिलांसाठी मोठी बातमी! आता आधार कार्डवर दोन्ही आडनावे शक्य!

    aadhaar card dual surname for women

    खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केंद्र सरकारसमोर मांडली महिलांसाठी मोठी मागणी!

    aadhaar card dual surname for women : चंद्रपूर: शासकीय किंवा निमशासकीय कामकाजात महिलांना लग्नानंतर कागदपत्रामुळे नाहक त्रासाला सामोरे जावे लागते. परिणामी त्यांचा वेळ आणि पैसा वाया जातो. ही समस्या दूर करण्याकरिता महिलांच्या आधार कार्डवर लग्नापूर्वीचे (वडिलांचे ) आणि लग्नानंतरचे (पतीचे ) दोन्ही नावे नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची लोकहितकारी मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांना दिल्ली येथे भेट घेऊन केली आहे.  add father’s and husband’s name in aadhaar card

    अनेक समस्यांचा सामना

                 सध्याच्या नियमांनुसार, आधार कार्डवर फक्त एकच नाव नोंदवता येते. त्यामुळे, लग्नानंतर महिलांना त्यांच्या माहेरचे आडनाव सोडून पतीचे आडनाव लावावे लागते. या प्रक्रियेमुळे अनेक प्रशासकीय आणि भावनिक समस्या निर्माण होत आहेत. खासदार प्रतिभा धानोरकर यांनी निदर्शनास आणून दिले की, अनेक महिलांचे शैक्षणिक दस्तऐवज, पदवी प्रमाणपत्र, जुने बँक खाते आणि मालमत्तेची कागदपत्रे त्यांच्या लग्नापूर्वीच्या नावावर असतात, ज्यामुळे आधार कार्डवरील नावाशी ते जुळत नाही. या विसंगतीमुळे त्यांना विविध सरकारी आणि खाजगी कामांमध्ये अडचणी येतात.

    राज्यात गाजलेल्या शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी एसआयटी गठीत

    याव्यतिरिक्त, सांस्कृतिक आणि भावनिक कारणांमुळे अनेक महिलांना त्यांच्या वडिलांचे आडनाव कायम ठेवायचे असते, परंतु आधार कार्डवर ही सुविधा नसल्यामुळे त्यांना आपली एक ओळख सोडावी लागते. या प्रक्रियेमुळे वेळ आणि पैसा वाया जातो, तसेच अनावश्यक कायदेशीर गुंतागुंत निर्माण होते. aadhaar name change after marriage for women

    आधार वर सुविधा उपलब्ध करा

    खासदार प्रतिभा धानोरकर यांनी पॅन कार्डचे उदाहरण दिले, जिथे वडिलांचे आणि लग्नानंतरचे असे दोन्ही नावे नोंदवण्याची सोय आहे. त्यामुळे महिलांची दोन्ही ओळख सुरक्षित राहते. त्याचप्रमाणे, आधार कार्डवरही ही सुविधा उपलब्ध करून दिल्यास महिलांना त्यांची ओळख जपण्याचा हक्क मिळेल, विविध कागदपत्रांमध्ये एकसारखेपणा येईल आणि प्रशासकीय अडचणी कमी होतील, असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

    खासदार प्रतिभा धानोरकर यांनी मंत्र्यांना या महत्त्वाच्या मागणीवर सहानुभूतीपूर्वक विचार करून आवश्यक निर्देश देण्याची विनंती केली आहे. त्यांनी या प्रकरणी तातडीने लक्ष घालून कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

  • Demand for More Navodaya Schools । 🎓 “फक्त एक नवोदय शाळा पुरेशी नाही!, खासदार प्रतिभा धानोरकर यांची मागणी!

    Demand for More Navodaya Schools

    Demand for More Navodaya Schools : चंद्रपूर  – खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची दिल्ली येथे भेट घेऊन दोन महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. जवाहर नवोदय विद्यालयांमुळे आजवर हजारो गरीब मुलांना गुणवत्तेच्या आधारावर चांगले शिक्षण मिळाले आहे, आणि अनेक विद्यार्थ्यांनी मोठे हुद्दे मिळवले आहेत. मात्र सध्या प्रत्येक जिल्ह्यात केवळ एकच नवोदय विद्यालय असल्याने अनेक होतकरू विद्यार्थ्यांना या विद्यालयात शिक्षण घेणे शक्य होत नाही. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात दोन किंवा त्याहून अधिक विद्यालये उभारण्याची लोकहितकारी मागणी त्यांनी यावेळी केली. त्यासोबतच, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अभ्यासक्रमात भावी पिढीला भारतीय महान व्यक्तींच्या योगदानाचे महत्त्व कळावे आणि भविष्याकडे बघताना इतिहासाची जाणीव राहावी यासाठी महान व्यक्तींच्या योगदानाचा समावेश करण्याची प्रमुख मागणी देखील त्यांनी केली आहे. need for more Navodaya Vidyalayas

    चंद्रपुरात खड्डेयुक्त मार्गाचे कांग्रेसने केले नामकरण

    यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी मंत्र्यांना सांगितले की, जवाहर नवोदय विद्यालये ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थ्यांसाठी उत्कृष्ट शिक्षणाचे केंद्र आहेत. या विद्यालयांमुळे अनेक गरीब आणि हुशार विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळाले आहे. सध्या महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात एक जवाहर नवोदय विद्यालय आहे, पण ग्रामीण विद्यार्थ्यांची वाढती संख्या पाहता ही संख्या अपुरी आहे. यामुळे अनेक पात्र विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहतात.

    जिल्ह्यात २ नवोदय विद्यालय

    ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे आणि त्यांना राष्ट्रीय स्तरावर स्पर्धा करता यावे यासाठी प्रत्येक जिल्ह्यात किमान दोन किंवा अधिक नवोदय विद्यालये सुरू करण्याची मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केली आहे. यामुळे अधिक विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल आणि ग्रामीण भागाच्या शैक्षणिक विकासाला चालना मिळेल. Navodaya Vidyalaya for rural students

    तसेचनवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबद्दल बोलताना खासदार प्रतिभा धानोरकर यांनी सामाजिक विज्ञान अभ्यासक्रमात (इयत्ता ५ वी ते १० वी) भारतातील महान व्यक्तींचे विचार आणि कार्य समाविष्ट करण्याची विनंती केली आहे. त्यांनी विशेषत्वाने संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि संविधानातील महत्त्वाच्या घटकांचा समावेश करण्याची गरज असल्याची भावना व्यक्त केली, जेणेकरून युवा पिढीला संविधानाची मूल्ये आणि तत्त्वे समजू शकतील. quality education for rural children

    याचबरोबर, छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य, विचार आणि त्यांची कुशल प्रशासन प्रणाली अभ्यासक्रमात समाविष्ट केल्यास विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल आणि ते राष्ट्रनिर्माणाच्या दिशेने पुढे जातील. तसेच, महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे समाजसुधारक आणि शैक्षणिक क्षेत्रातील योगदान अभ्यासक्रमात असावे, जेणेकरून विद्यार्थी सामाजिक न्याय आणि महिला सक्षमीकरणाचे महत्त्व शिकू शकतील.

    या मागण्यांमुळे विद्यार्थ्यांना भारताच्या समृद्ध वारशाची आणि वैविध्यपूर्ण इतिहासाची सखोल माहिती मिळेल. खासदार प्रतिभा धानोरकर यांनी शिक्षणमंत्र्यांना या दोन्ही महत्त्वपूर्ण प्रस्तावांवर सकारात्मक विचार करण्याची विनंती केली आहे.