Tag: खासदार प्रतिभा धानोरकर

  • Telangana Maharashtra border villages dispute । १४ सीमावादग्रस्त गावांचे भविष्य ठरणार, खासदार धानोरकरांची निर्णायक भेट

    Telangana Maharashtra border villages dispute

    Telangana Maharashtra border villages dispute : चंद्रपूर :  चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील १४ गावांच्या सीमांकन आणि भूमी अभिलेखाचा अनेक दशकापासून प्रलंबित असलेला प्रश्न अखेर मार्गी लागण्याची चिन्हे दिसत आहेत. खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आज दिल्ली येथे केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेऊन या गंभीर विषयावर चर्चा केली.

    चंद्रपुरात अम्मा चौकाचा वाद, कांग्रेसने केली पुरातत्व विभागाकडे तक्रार

    १९९७ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राच्या बाजूने निकाल दिला असला, तरी या गावांची अधिकृत सीमांकन प्रक्रिया अजूनही पूर्ण झाली नाही, हे त्यांनी मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारला समन्वय साधून यावर तातडीने उपाययोजना करण्याची विनंती केली. या भेटीत, मंत्र्यांनी यावर लवकरच सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. यामुळे या गावांच्या विकासाचा आणि गावकऱ्यांच्या हक्कांचा मार्ग मोकळा होणार आहे. Maharashtra Telangana 14 villages boundary resolution Jiwati

    शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी अडचणी

    यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी जिवती तालुक्यातील ८६४९.८०९ हेक्टर क्षेत्राला वादग्रस्त वनक्षेत्रातून वगळण्याची मागणी केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून चुकीच्या नोंदींमुळे वनक्षेत्र म्हणून गणल्या गेलेल्या या जमिनींमुळे शेतकरी आणि स्थानिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या संदर्भात, उप वनसंरक्षक आणि तहसीलदारांच्या संयुक्त अहवालानुसार हे क्षेत्र वनक्षेत्र नसल्याचे सिद्ध झाले आहे, तरीही हा प्रस्ताव अद्याप प्रलंबित आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून, त्यांना शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी अडचणी येत आहेत. 

    तसेच यावेळी १४ गावांच्या प्रश्न तसेच वनजमिनी प्रश्न संदर्भातील अडचणी केंद्र सरकारच्या स्तरावरच सोडविल्या जाऊ शकत असल्यामुळे, केंद्राने या प्रश्नांमध्ये हस्तक्षेप करून ते तात्काळ निकाली लावण्याची आग्रहाची विनंती खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केली.  Jiwati taluka land title forest pattas dispute

    याप्रसंगी मंत्री महोदयांनी दोन्ही गंभीर विषयांवर लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे. या बैठकीत जिवती येथील काँग्रेस नेते सुग्रीव गोतावळे, तिरुपती पोले, सीताराम मडावी, दत्ता गायकवाड, चंद्रकांत बिऱ्हाडे आणि बंडू राठोड यांचीही उपस्थिती होती. खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या या प्रयत्नांमुळे दोन्ही प्रश्नांवर लवकरच सकारात्मक तोडगा निघेल, अशी आशा व्यक्त केली.

  • GST exemption on eye care devices in India । 🏛️ 78 लाख पेन्शनधारकांसोबत डोळ्यांच्या उपकरणांवरील जीएसटी हटवण्याची मागणी!

    GST exemption on eye care devices in India

    खासदार प्रतिभा धानोरकरसह शिष्टमंडळाची केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट

    GST exemption on eye care devices in India : चंद्रपूर : सार्वजनिक आरोग्याची निकड आणि देशातील कोट्यवधी नागरिकांची गरज लक्षात घेऊन दृष्टी-बचत करणाऱ्या डोळ्यांच्या उपकरणांवरील जीएसटी आणि सीमाशुल्क माफ करण्याची शिफारस केली आहे. तसेच  सहकारी आणि खाजगी क्षेत्रातील  निवृत्त झालेल्या सुमारे ७८ लाख पेन्शनधारकांच्या मागण्यांची दखल घेण्याची विनंती खासदार प्रतिभा धानोरकर सह शिष्टमंडळाची केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेऊन केली आहे.  EPS 95 pensioners demand 2025 update

    महामार्गावरील जीवघेणे खड्ड्याबाबत खासदार धानोरकर यांचं नितीन गडकरी यांना निवेदन

    याच मागणीला पाठिंबा देत, खासदार प्रतिभा धानोरकर यासह खासदार डॉ. शिवाजी काळगे, खासदार डॉ. शोभा बचाव, खासदार प्रा. वर्षा गायकवाड, खासदार डॉ. कल्याण काळे, खासदार बळवंत वानखेडे यांच्यासह अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली. 

    खासदार प्रतिभा धानोरकर यांनी त्यांच्या पत्रात नमूद केले आहे की, ‘ऑल-इंडिया ऑप्थल्मोलॉजिकल सोसायटी’ (AIOS) ने या उपकरणांवरील कर पुन्हा लागू केल्यामुळे त्यांच्या किमतीत मोठी वाढ झाली असून, त्यामुळे गरीब आणि गरजू रुग्णांना डोळ्यांची योग्य काळजी घेणे अवघड झाले आहे. देशात करोडो लोकांना दृष्यदोष किंवा अंधत्वाचा त्रास होत आहे, ज्यापैकी बहुतांश लोक आर्थिकदृष्ट्या दुर्बळ आहेत.

    मोफत नेत्रसेवा पुरवण्यात अडचणी

    या उपकरणांवरील ७.५-१०% सीमाशुल्क आणि १२% जीएसटीमुळे आवश्यक उपचारांचा खर्च वाढला आहे. याचा थेट परिणाम धर्मादाय आणि सार्वजनिक आरोग्य संस्थांच्या कार्यावर होत असून, त्यांना अनुदानित किंवा मोफत नेत्रसेवा पुरवण्यात अडचणी येत आहेत.

    खासदार प्रतिभा धानोरकर यांनी पत्रात पुढे म्हटले आहे की, भारत सरकारने यापूर्वी ‘नोटिफिकेशन ६९/९३-CE’ अंतर्गत या उपकरणांना सूट दिली होती. ही सूट पुन्हा लागू केल्यास ‘राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम’ आणि ‘व्हिजन २०३०’  यांसारख्या राष्ट्रीय उपक्रमांना बळ मिळेल.

    तसेच यावेळी  ‘ईपीएस अंतर्गत १८६ सार्वजनिक, सहकारी आणि खाजगी क्षेत्रातील  निवृत्त झालेल्या सुमारे ७८ लाख पेन्शनधारकांच्या मागण्यांची दखल घेण्याची विनंती करण्यात आली आहे. या पेन्शनधारकांना सन्मानपूर्वक जीवन जगता यावे यासाठी त्यांच्या मागण्यांचा तातडीने विचार करण्याची विनंती शिष्टमंडळाने केली. 

  • Maharashtra Government Social Media Circular । 🛑 “शासकीय कर्मचाऱ्यांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात?”, खासदार धानोरकर आक्रमक!

    Maharashtra Government Social Media Circular

    Maharashtra Government Social Media Circular : चंद्रपूर : महाराष्ट्र शासनाच्या २८ जुलै २०२५ रोजीच्या सोशल मीडिया वापरासंदर्भातील परिपत्रकामुळे नवा वादंग निर्माण झाला आहे. हे ‘जुलमी’ परिपत्रक तात्काळ रद्द करावे, अशी मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. हे परिपत्रक शासकीय कर्मचाऱ्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर थेट गदा आणणारे असून, लोकशाही मूल्यांच्या विरोधात असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. freedom of speech for government employees maharashtra

    चंद्रपुरातील या मार्गाची दयनीय अवस्था

    खासदार धानोरकर यांनी यातील ‘प्रतिकूल टीका करू नये’ किंवा ‘स्वयं-प्रशंसा होणार नाही’ यांसारख्या अटी अत्यंत जाचक असल्याचे म्हटले आहे. यामुळे कर्मचाऱ्यांवर अनावश्यक दबाव येईल आणि त्यांची सर्जनशीलता मारली जाईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. गोपनीय माहितीचा प्रसार रोखणे आवश्यक असले तरी, त्याचा अर्थ अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेणे नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. “हे केवळ एक परिपत्रक नसून, संविधानाने दिलेल्या अधिकारांवर गदा आणण्याचा प्रकार आहे,” असे नमूद करत, कर्मचाऱ्यांच्या घटनात्मक अधिकारांसाठी आपण लढा देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. maharashtra social media rules for government employees

    परिपत्रक रद्द करा

    महाराष्ट्र शासनाने ‘महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १९७९’ च्या आधारावर हे परिपत्रक काढले आहे. गोपनीय माहितीचा प्रसार, खोटी माहिती पसरवणे आणि राजकीय,शासकीय धोरणांवर प्रतिकूल अभिप्राय व्यक्त करण्याच्या गैरवापरावर नियंत्रण ठेवणे हा यामागील उद्देश आहे. यात प्रतिकूल टीका टाळणे, वैयक्तिक व कार्यालयीन सोशल मीडिया खाते स्वतंत्र ठेवणे, बंदी घातलेल्या ॲप्सचा वापर न करणे आणि गोपनीय दस्तऐवज शेअर न करणे अशा अनेक अटींचा समावेश आहे. या सूचनांचा भंग केल्यास शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असेही नमूद आहे.

    Somayya institute of technology

    खासदार धानोरकरांनी हे परिपत्रक तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे, जेणेकरून शासकीय कर्मचाऱ्यांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित राहील आणि लोकशाही मूल्यांचे रक्षण होईल. या मागणीवर राज्य सरकारची भूमिका काय राहते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

  • Central government misleads railway passengers । 🚨 रेल्वे प्रवाशांची फसवणूक? केंद्र सरकारच्या घोषणा आणि वास्तवात फरक!

    Central government misleads railway passengers

    Central government misleads railway passengers : चंद्रपूर – रेल्वे मंत्रालयाने 1 जुलै 2025 पासून रेल्वे भाड्यांमध्ये केलेल्या बदलांबाबत आणि प्रवासी सेवा सुधारण्यासाठी उचललेल्या पावलांबाबत दिलेल्या स्पष्टीकरणामुळे सामान्य जनतेमध्ये निर्माण झालेल्या अनेक प्रश्नांची केवळ असमाधानकारक उत्तरे देऊन केंद्र सरकारने जनतेची दिशाभूल केली आहे. खासदार प्रतिभा धानोरकर यांनी लोकसभेत उपस्थित केलेल्या अतारांकित प्रश्न क्रमांक 656 च्या उत्तरात रेल्वे मंत्रालयाने सविस्तर माहिती दिली असली तरी, ही माहिती जनतेच्या मूळ मुद्द्यांना दूर करण्यात कमी पडली आहे. रेल्वे मंत्रालय प्रवाशांना परवडणारी आणि दर्जेदार वाहतूक सेवा प्रदान करण्यासाठी कटिबद्ध असल्याचा दावा करत असले, तरी प्रत्यक्षातील परिस्थिती वेगळीच आहे.

    महावितरणचा नवा नियम, अशी होणार वीज बिल वसुली

    भारतीय रेल्वेचे भाडे जगातील सर्वात कमी भाड्यांपैकी एक असल्याचा आणि शेजारील देशांच्या तुलनेतही कमी असल्याचा मंत्र्यांचा दावा केवळ आकडेवारीचा खेळ वाटतो. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये प्रवाशांना ₹60,466 कोटींची अंदाजित सबसिडी देण्यात आल्याचे सांगितले जात असले तरी, वाढत्या भाड्यांचा सामान्य प्रवाशांवर होणारा आर्थिक भार दुर्लक्षित केला जात आहे. 1 जुलै 2025 पासून भाड्यांचे तर्कसंगतीकरण करण्यात आले असून, यात प्रति किलोमीटर अर्धा पैसा ते दोन पैसे प्रति किलोमीटर अशी किरकोळ वाढ करण्यात आल्याचे म्हटले असले तरी, या वाढीमुळे सामान्य नागरिकांच्या खिशावर येणारा ताण मोठा आहे.

    वाढीव दरांचा फटका

    द्वितीय श्रेणी सामान्य, शयनयान श्रेणी सामान्य, प्रथम श्रेणी सामान्य, मेल एक्सप्रेसमधील गैर-वातानुकूलित श्रेणी आणि आरक्षित वातानुकूलित श्रेणींमध्ये ही वाढ लागू होईल. मासिक पास (MST) आणि उपनगरीय प्रवासाच्या भाड्यांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असे सांगून कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या कुटुंबांना दिलासा देण्याचा प्रयत्न असला तरी, लांब पल्ल्याच्या प्रवाशांना मात्र वाढीव दरांचा फटका बसणार आहे.

    अधिकृत एजंटना तिकिटे बुक करण्याची परवानगी नाही

    तत्काळ तिकीट बुकिंग प्रणालीमध्येही काही बदल करण्यात आले आहेत; 1 जुलै 2025 पासून, आधार-प्रमाणित वापरकर्त्यांनाच IRCTC वेबसाइट/ॲपद्वारे तत्काळ तिकिटे बुक करता येतील. अधिकृत एजंटना बुकिंग सुरू झाल्यानंतर पहिले तीस मिनिटे तत्काळ तिकिटे बुक करण्याची परवानगी नसेल. (IRCTC agent restrictions tatkal booking) हे बदल प्रवाशांच्या सोयीसाठी नसून, अधिक कडक निर्बंध लादणारे आहेत, ज्यामुळे सामान्य प्रवाशांना तत्काळ तिकिटे मिळवणे अधिक कठीण होणार आहे. IRCTC tatkal booking Aadhaar rules

    प्रवाशांना सुरक्षित, आरामदायक आणि दर्जेदार सेवा देण्यासाठी अमृत भारत स्टेशन योजना, वंदे भारत आणि अमृत भारत रेल्वेगाड्यांची सुरुवात, रेल मदतद्वारे उत्तम देखरेख, आणि डिजिटल उपक्रम जसे की रेल वन ॲप आणि यूटीएस ऑन मोबाईल ॲप यांसारख्या विविध उपाययोजना रेल्वे मंत्रालयाने केल्या असल्याचा दावा आहे. मात्र, या उपायांमुळे प्रवाशांच्या समाधानात वाढ झाली असल्याचे रेल्वे मंत्रालयाने नमूद केले असले तरी, अनेक मूलभूत समस्या आजही कायम आहेत. Central government misleads railway passengers

    भारतीय रेल्वेचे उद्दिष्ट सेवांची गुणवत्ता सुधारणे आणि आर्थिक स्थिरता सुनिश्चित करण्यासोबतच प्रवासी भाडे परवडणारे ठेवणे असल्याचे सांगितले जात असले तरी, सध्याची भाडेवाढ आणि सेवेतील कमतरता या दाव्यांशी विसंगत आहेत. केंद्र सरकार खासदार प्रतिभा धानोरकर यांनी विचारलेल्या सामान्य जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर निरुत्तर राहिले आहे.

  • bsnl 4g launch update in chandrapur । 💥 प्रायव्हेट कंपन्यांना टक्कर देणार BSNL? चंद्रपूरमध्ये 4G सेवा सुरू होणार

    bsnl 4g launch update in chandrapur

    खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्याकडून बीएसएनएलला ‘अच्छे दिन’ आणण्याचे निर्देश

    bsnl 4g launch update in chandrapur : चंद्रपूर :  जिल्ह्यात भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) च्या सेवांचा आढावा घेण्यासाठी दूरसंचार सल्लागार समितीची बैठक खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत बीएसएनएलच्या सध्याच्या स्थितीवर चिंता व्यक्त करत, जिल्ह्यातील प्रत्येक गावात मोबाइल सेवा आणि ब्रॉडबँड सुविधा पोहोचवण्यावर भर देऊन बीएसएनएलला ‘अच्छे दिन’ आणण्याचे निर्देश (pratibha dhanorkar) खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी दिले.

    आप जिल्हाध्यक्ष राईकवार यांचा मोठा खुलासा

    खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी “कर्मचाऱ्यांनी केवळ नोकरी म्हणून न पाहता जनसेवा व बीएसएनएल ला परिवार मानून काम केल्यास निश्चितच चित्र बदलेल,” असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. ग्रामीण भागात ऑनलाइन कामांची वाढती गरज लक्षात घेऊन अविरत इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देण्यासंबंधात चर्चा करून अधिकाऱ्यांना सेवा सुधारण्याच्या सूचना दिल्या.  bsnl vs private telecom

     यावेळी बीएसएनएलचे वरिष्ठ महाप्रबंधक प्रांजल ठाकूर, उपमहाप्रबंधक मुख्यालय एन. एम. टेंगशे, उपमहाप्रबंधक ऑपरेशन डी. जी. घोंगडे, मुख्य लेखा अधिकारी काजल डे. तसेच  दूरसंचार सल्लागार समितीचे सदस्य पांडुरंग आगलावे, देविदास सातपुते, ताजुद्दीन शेख, पवन मेश्राम यांची उपस्थिती होती. 

    बैठकीत बीएसएनएलच्या अनेक समस्यांवर चर्चा झाली, ज्यात पावसाळ्यात सेवा विस्कळीत होणे, खोदकामामुळे तारा तुटून सेवा खंडित होणे आणि काही ठिकाणी बँकांमधील सेवा ठप्प होणे या प्रमुख समस्या होत्या. विसापूर येथील बीएसएनएल टॉवर सतत बंद असल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली आणि तात्काळ उपाययोजनांची मागणी केली. तसेच जिवती तालुक्यातील बीएसएनएल सेवे संदर्भात चिंता व्यक्त  करीत सेवेत सुधारणा करण्याच्या सूचना केल्या. 

    ४ जी सेवा लवकर सुरु करा

    यावेळी ४जी सेवा संपूर्ण जिल्ह्यात लवकरच पूर्णपणे सुरू करावी आणि ५जी कडे वाटचाल करणाऱ्या खाजगी कंपन्यांशी स्पर्धा करण्यासाठी बीएसएनएलने आपल्या सेवांची गुणवत्ता सुधारण्यावर लक्ष केंद्रित करावे, असेही खासदार प्रतिभाताई  धानोरकर यांनी सांगितले. भारत नेट आणि महानेट-१ प्रकल्पांचा प्रभावीपणे वापर करून ग्रामपंचायतींपर्यंत पोहोचलेल्या फायबर कनेक्शनचा पूर्ण उपयोग व्हावा यासाठी लोकांना डिजिटल साक्षर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

    यावेळी खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी जुनी उपकरणे तात्काळ बदलून प्रचार व प्रसाराच्या माध्यमातून दर्जेदार सेवा पुरवण्यासाठी युद्धपातळीवर काम करण्याचे निर्देश दिले.

  • chandrapur nagpur highway pothole issue । टोल थांबवा, आधी रस्ता दुरुस्त करा! खासदार धानोरकरांचा इशारा

    chandrapur nagpur highway pothole issue

    chandrapur nagpur highway pothole issue : चंद्रपूर: चंद्रपूर-नागपूर महामार्गाच्या दयनीय अवस्थेविरोधात आणि सुरू असलेल्या टोलवसुलीच्या विरोधात चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रतिभा धानोरकर (MP Pratibha Dhanorkar)यांनी तीव्र आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंडळाच्या (PWD) अधीक्षक अभियंत्यांना पत्र लिहून या गंभीर समस्येकडे लक्ष वेधले असून, रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्याची आणि रस्ता सुस्थितीत येईपर्यंत टोलवसुली थांबवण्याची मागणी केली आहे.

    चंद्रपूर मनपाने पाडली ६५ वर्ष जुनी इमारत

    खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की, चंद्रपूर-नागपूर महामार्गावर अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. पावसाळ्याला सुरुवात झाल्याने ही समस्या अधिकच गंभीर झाली असून, वाहनचालकांना आणि नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या दुरावस्थेमुळे भविष्यात मोठे अपघात होण्याची आणि जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही त्यांनी अधोरेखित केले आहे. Chandrapur-Nagpur highway bad condition

    महामार्गाची दुरावस्था

    हा महामार्ग बीओटी (बांधा-वापरा-हस्तांतरित करा) तत्त्वावर बांधण्यात आला आहे. या तत्त्वानुसार चांगल्या प्रतीच्या रस्त्यासाठी टोल आकारणे अपेक्षित असताना, सद्यस्थितीत महामार्गाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. एका बाजूला रस्त्यावर मोठमोठे खड्डे असताना, त्याच खराब रस्त्यासाठी टोलवसुली सुरू असणे हे पूर्णपणे चुकीचे धोरण असून, यामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे, असे खासदार प्रतिभा धानोरकर यांनी ठणकावून सांगितले आहे.

    टोल वसुली थांबवा

    या पार्श्वभूमीवर, खासदार प्रतिभा धानोरकर यांनी अधीक्षक अभियंत्यांना विनंती केली आहे की, चंद्रपूर-नागपूर महामार्गाची तात्काळ आणि प्राधान्याने दुरुस्ती करण्यात यावी. तसेच, जोपर्यंत रस्त्याची दुरुस्ती पूर्ण होऊन तो वाहतुकीसाठी सुस्थितीत येत नाही, तोपर्यंत सदर महामार्गावरील टोलवसुली थांबवण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, असेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे. demand to stop toll collection

    या गंभीर प्रश्नावर खासदार प्रतिभा धानोरकर यांनी घेतलेली आक्रमक भूमिका चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांसाठी दिलासादायक असून, त्यांच्या या प्रयत्नांमुळे चंद्रपूर-नागपूर महामार्गावरील प्रवासाचा अनुभव सुरक्षित आणि सुखकर होईल, अशी अपेक्षा आहे. या पत्राची प्रत कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग क्र. १, चंद्रपूर आणि प्रकल्प संचालक, महामार्ग प्राधिकरण, चंद्रपूर यांनाही पाठवण्यात आली आहे.

  • middle class suffering due to inflation । 😡 महागाईने नाकीनऊ आले! मध्यमवर्गीयांचे बजेट कोलमडले, दरवाढ मागे घ्या – खासदार धानोरकर

    middle class suffering due to inflation

    middle class suffering due to inflation : चंद्रपूर : १ जुलै २०२५ पासून रेल्वे तिकीट, एटीएम व्यवहार शुल्क, पॅन कार्ड नियम आणि गॅस सिलेंडरच्या दरांमध्ये करण्यात आलेल्या प्रचंड वाढीमुळे सामान्य जनता होरपळून निघत आहे. केंद्रातील मोदी सरकारने घेतलेल्या या अन्यायकारक निर्णयांचा खासदार प्रतिभा धानोरकर (mp pratibha dhanorkar) यांनी तीव्र शब्दांत निषेध केला असून, ही दरवाढ तात्काळ मागे घेण्याची मागणी केली आहे. railway ticket price hike July 2025

    चंद्रपुरात मोठा आर्थिक घोटाळा

    खासदार प्रतिभा धानोरकर म्हणाल्या, “देशातील जनता महागाईने (inflation) त्रस्त असताना, मोदी सरकारने १ जुलैपासून विविध सेवांवर लादलेली ही दरवाढ म्हणजे जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे. रेल्वे हे सामान्य माणसाच्या प्रवासाचे प्रमुख साधन आहे. त्यात वाढ करून सरकारने गरिबांचा प्रवास आणखी महाग केला आहे. तात्काळ तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये केलेले बदल आणि ओटीपीची सक्ती यामुळे सामान्य प्रवाशांना, विशेषतः ग्रामीण भागातील लोकांना अडचणींचा सामना करावा लागेल.”

    डिजिटल इंडियाच्या नावाखाली आर्थिक लूट

    त्या पुढे म्हणाल्या, “एटीएममधून पैसे काढण्यावरील वाढीव शुल्क हा डिजिटल इंडियाच्या (digital india) नावाखाली सामान्य नागरिकांच्या खिशातून पैसे काढण्याचा प्रकार आहे. बँका आणि वित्तीय संस्थांना याचा फायदा होईल, पण सर्वसामान्यांसाठी रोख व्यवहार करणे अधिक खर्चिक होईल. पॅन कार्डसाठी आधार अनिवार्य करणे आणि नवीन नियम लागू करणे हे लोकांना अधिक त्रासात टाकणारे आहे. तर, गॅस सिलेंडरच्या दरांत वाढ करणे म्हणजे गृहिणींच्या बजेटवर दर महिन्याला महागाईची टांगती तलवार ठेवण्यासारखे आहे.”

    खासदार धानोरकर यांनी ठामपणे सांगितले की, “मोदी सरकार (modi government) केवळ धनदांडग्या उद्योजकांचे सरकार बनले आहे. त्यांना सामान्य जनतेच्या समस्यांशी काहीही देणे घेणे नाही. निवडणुकीपूर्वी अच्छे दिनाची स्वप्ने दाखवून आता जनतेला महागाईच्या खाईत लोटले जात आहे. मी मोदी सरकारला विनंती करते की, त्यांनी तातडीने या सर्व दरवाढीचा निर्णय मागे घ्यावा आणि जनतेला दिलासा द्यावा. अन्यथा, काँग्रेस पक्ष आणि इतर समविचारी पक्ष जनतेच्या हितासाठी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील.”

  • financial help for accident victim । अपघातग्रस्त आई, गरीब मुलगा आणि खासदाराची माणुसकी – हृदयाला भिडणारी कहाणी!

    financial help for accident victim

    financial help for accident victim : चंद्रपूर: चंद्रपूर येथील रेल्वे क्रॉसिंगजवळ काही दिवसांपूर्वी झालेल्या एका भीषण अपघातात रामकला रामचंद्र सिडाम रा. मुधोली ता. भद्रावती ही महिला गंभीर जखमी झाली. या अपघातात तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, मेंदूत रक्तस्राव झाल्याने तिची प्रकृती चिंताजनक बनली आहे. ही माहिती मिळताच खासदार प्रतिभा धानोरकर यांनी तात्काळ रामकलाला मदतीचा हात पुढे केला. त्यांच्या माध्यमातून सुयोग भोयर यांनी तिच्या मुलगा धर्माला आर्थिक मदत दिली आहे.

    चंद्रपुरात बायपास मार्गाची गरज – खासदार धानोरकर

    अपघातग्रस्त रामकला यांचा मुलगा धर्मा याची कौटुंबिक आणि आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. तो सध्या चंद्रपूर येथे BSW च्या द्वितीय वर्षाचा विद्यार्थी आहे आणि शासकीय वसतिगृह क्रमांक २ मध्ये राहून शिक्षण घेत आहे. त्याच्या कुटुंबाकडे कोणतीही स्थावर मालमत्ता नाही.

    संघर्ष आणि अपघात

    २०१७ मध्ये धर्माचे वडील वारले असून, रामकला स्वतः मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होत्या. एकीकडे स्वतःचे शिक्षण आणि दुसरीकडे आपल्या आईच्या उपचाराची आणि कुटुंबाची जबाबदारी, अशा दुहेरी परिस्थितीत धर्मा संघर्ष करत असतानाच हा दुर्दैवी अपघात घडला आहे.

    सध्या रामकलावर दीक्षित हॉस्पिटल, चंद्रपूर येथे उपचार सुरू आहेत. तिच्या उपचारासाठी मोठ्या आर्थिक मदतीची आवश्यकता असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. खासदार प्रतिभा धानोरकर यांनी तातडीने मदत करून माणुसकीचा आदर्श घालून दिला आहे. 

  • need for bypass road in Chandrapur । वाहतुकीचा जंजाळ तोडण्यासाठी चंद्रपूरला हवे बायपासचे कवच!, गडकरींना खासदारांचं थेट पत्र

    need for bypass road in Chandrapur

    need for bypass road in Chandrapur : चंद्रपूर : शहराची वाढती लोकसंख्या आणि बाहेरील वाहनांची वाढती वर्दळ यामुळे चंद्रपूरमध्ये वाहतुकीची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. यावर उपाय म्हणून खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहिले आहे. या पत्राद्वारे त्यांनी चंद्रपूर शहरातील पडोली फाटा ते शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय या दरम्यान बायपास मार्गाच्या तातडीने बांधकामाची मागणी केली आहे.

    चंद्रपुरात भरदिवसा चाकू हल्ला, दोघांना अटक

    सध्या NH ९३० आणि NH ९३०D या राष्ट्रीय महामार्ग दरम्यानची वाहतूक थेट चंद्रपूर शहरातून जाते. गडचिरोली, तेलंगणा, यवतमाळ, वर्धा आणि नागपूर यांसारख्या विविध ठिकाणांहून येणारी आणि जाणारी वाहने चंद्रपूर शहरातून सातत्याने ये-जा करत असल्याने शहरात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. या वाढत्या वाहतुकीमुळे शहरात अपघातांचे प्रमाण चिंताजनक पातळीवर वाढले आहे, ज्यामुळे नागरिकांना मोठा त्रास आणि धोका सहन करावा लागतो. NH 930 city congestion

    या गंभीर समस्येवर तातडीने उपाययोजना म्हणून, खासदार धानोरकर यांनी पडोली फाटा ते शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय दरम्यान बायपास मार्गाचे बांधकाम करण्याची मागणी केली आहे. हा बायपास मार्ग NH ९३० ते NH ९३०D दरम्यानच्या वाहतुकीला शहराबाहेरून वळवावे. 

    या त्रासातून चंद्रपूरला मुक्त करा

    खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना विनंती केली आहे की, या अत्यंत महत्त्वाच्या मागणीवर सकारात्मक विचार करून त्वरित कार्यवाही करावी आणि चंद्रपूरकरांना वाहतूक कोंडी आणि अपघातांच्या त्रासातून मुक्त करावे. चंद्रपूरच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी हा बायपास मार्ग अत्यंत महत्त्वाचा ठरेल, असे त्यांनी म्हटले आहे.

  • structural audit of old bridges in chandrapur । चंद्रपूरमधील पुलांची स्थिती धोकादायक?, चंद्रपूरच्या पुलांची सखोल तपासणी होणार?

    structural audit of old bridges in chandrapur

    structural audit of old bridges in chandrapur : चंद्रपूर  – चंद्रपूर जिल्ह्यामधील सर्व पुलांचे सखोल संरचनात्मक परीक्षण (structural audit) करण्याची मागणी खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे केली आहे. सध्याच्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर, अस्तित्वातील पुलांच्या सुरक्षिततेबाबत आणि संरचनात्मक अखंडतेबाबत वाढत्या चिंता लक्षात घेता, ही मागणी करण्यात आली आहे.

    खासदार धानोरकरांची जनसेवा

    आपल्या निवेदनात, खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी प्रवाशांची सुरक्षितता सुनिश्चित करणे आणि संभाव्य अपघात टाळणे यावर भर दिला. जिल्ह्यातील अनेक पूल जुने असून, जास्त वाहतूक, हवामानाची परिस्थिती आणि नियमित देखभालीच्या अभावामुळे त्यांची कालांतराने झीज झाली असण्याची शक्यता त्यांनी अधोरेखित केली. MP Pratibha Dhanorkar news today

    नागरिकांची सुरक्षा महत्वाची

    “आपल्या नागरिकांची सुरक्षा सर्वात महत्त्वाची आहे,” असे खासदार प्रतिभाताई धानोरकर म्हणाल्या. “पुलांमधील कोणतीही कमतरता किंवा नुकसान ओळखण्यासाठी आणि आवश्यक दुरुस्ती किंवा पुनर्रचना त्वरित करण्यासाठी सखोल संरचनात्मक परीक्षण आवश्यक आहे. यामुळे केवळ अपघातच टळणार नाहीत, तर जिल्ह्यातील सुरळीत कनेक्टिव्हिटी देखील सुनिश्चित होईल.”

    खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी मंत्र्यांना या प्रक्रियेला गती देण्याचे आणि या महत्त्वाच्या परीक्षणासाठी आवश्यक संसाधने उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले आहे. चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासासाठी आणि सुरक्षिततेसाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

    चंद्रपूर शहरातील बस स्थानक ते प्रियदर्शिनी चौक नवीन रेल्वे पुलासाठी खासदार प्रतिभाताई धानोरकर यांची बांधकाम मंत्र्यांकडे आग्रही मागणी

    चंद्रपूर  – खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी बस स्थानक ते प्रियदर्शिनी चौक या मार्गावर नवीन रेल्वे पूल बांधण्याच्या प्रस्ताव तयार करून तातडीने मंजुरी देण्याची मागणी सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांकडे केली आहे. जुना रेल्वे पूल अनेक वर्षांचा असल्यामुळे त्याला लागूनच नवीन रेल्वे पूल उभारणे अत्यंत गरजेचे असल्याचे खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी निवेदनात म्हटले आहे.

    सध्या अस्तित्वात असलेला रेल्वे पूल जुना आणि अरुंद असल्यामुळे या मार्गावर नेहमीच वाहतूक कोंडी होते. यामुळे प्रवाशांना, विशेषतः विद्यार्थी आणि दैनंदिन प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो. हा प्रश्न तातडीने सोडवणे आवश्यक आहे. नवीन आणि प्रशस्त रेल्वे पूल झाल्यास शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सुरळीत होईल, प्रवासाचा वेळ वाचेल आणि अपघात कमी होण्यास मदत होईल. खासदार धानोरकर यांनी मंत्र्यांना या प्रकल्पाला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आवाहन केले आहे.