ST bus service resumed in Gadchandur
ST bus service resumed in Gadchandur : चंद्रपूर: गडचांदूरवरून पहाडावर जाण्यासाठी नगराळा मार्गे राजुरा-गडचांदूर-येल्लापूर ही एसटी बस गेल्या सव्वा महिन्यांपासून बंद असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती. विद्यार्थी, शेतकरी, कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिकांना गडचांदूर येथे रस्त्यावर रात्र काढावी लागत होती. या गंभीर समस्येची दखल घेत pratibha dhanorkar खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी तातडीने महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ, चंद्रपूर यांच्याकडे पाठपुरावा केला.
चंद्रपूर जिल्हा वाघाच्या हल्ल्याने पुन्हा हादरला, दोघांचा मृत्यू
पाठपुराव्याला तात्काळ यश
खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाला पत्र क्र. 1794/2025 द्वारे निवेदन दिले होते. या निवेदनात त्यांनी गडचांदूर-नगराळा-येल्लापूर-जिवती ही महत्त्वपूर्ण बस सेवा तसेच गडचांदूर येथून जिवती मार्गे धावणाऱ्या सर्व बंद बस सेवा तात्काळ पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली होती. तसेच या बससेवेमुळे परिसरातील नागरिक आणि विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत असल्याचे जिवती येथे झालेल्या आढावा बैठकीत नागरीकणी खासदार प्रतिभाताई धानोरकर यांना सांगितले होते.
Powered by myUpchar
खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या मागणीची तातडीने दखल घेत राजुरा आगार प्रमुख राकेश बोधे यांनी त्वरित कार्यवाही करत बंद असलेली गडचांदूर-नगराळा-येल्लापूर बस सेवा आजपासून पूर्ववत सुरू केली आहे. यामुळे आता या मार्गावरील शेकडो प्रवाशांना पूर्वीप्रमाणे एसटी बसचा मोठा आधार मिळाला आहे.
Leave a Reply