Blog

  • Ahetesham Ali joins Congress । वरोरा-भद्रावतीत भाजपला मोठा धक्का; माजी नगराध्यक्ष अहेतेशाम अली काँग्रेसमध्ये!

    Ahetesham Ali joins Congress

    Ahetesham Ali joins Congress : चंद्रपूर : चंद्रपूर -वणी- आर्णी लोकसभा क्षेत्राच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या कार्यशैलीवर प्रेरित होवून वरोरा नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष, भाजपचे माजी जिल्हा सचिव तसेच भाजप अल्पसंख्यांक आघाडीचे माजी प्रदेश उपाध्यक्ष अहेतेशाम अली यांनी समर्थकांसह काँग्रेसमध्ये रविवारी पक्षप्रवेश केला. नागपूर येथील प्रेस क्लबमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

    Also Read : खासदार धानोरकर यांच्या मागणीवर ताडोबा प्रशासन नरमल, स्थानिकांना जंगल सफारी मध्ये सवलत

    मागील काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत तब्बल २१ हजारांहून अधिक मते मिळवून अहेतेशाम अली यांनी आपला मजबूत जनाधार सिद्ध केला होता. एनएसयूआय व युवक काँग्रेसमधून राजकारणाची सुरुवात करून ते वरोरा शहर काँग्रेसचे अध्यक्षही राहिले. मात्र, २०१४ साली माजी मंत्री स्व. संजय देवतळे यांच्या सोबत त्यांनी भाजपात प्रवेश केला होता. गेली दहा वर्षे ते भाजपमध्ये सक्रिय होते. २०१६ च्या वरोरा नगरपरिषद निवडणुकीत त्यांनी भाजपचे उमेदवार म्हणून जिल्ह्यातील सर्वाधिक मतांनी नगराध्यक्षपद मिळवले होते. Warora Bhadrawati political news

    लोकशाही वाचविण्यासाठी कांग्रेस पक्षात प्रवेश

    भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी, खासदार प्रियंका गांधी, तसेच महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या सर्वसमावेशक कार्यशैलीवर प्रभावित होऊन त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. लोकशाही वाचविण्याच्या लढ्यात सहभागी होण्याचा निर्णय त्यांनी घेतल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. Pratibha Dhanorkar leadership

    यावेळी भद्रावती भाजपा तालुकाध्यक्ष तुळशीराम श्रीरामे, दादापाटील झाडे (संचालक, नंदोरी सेवा सहकारी संस्था), अशरफ खान (जिल्हा महासचिव, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, माजरी), आशिष ठाकरे, बंडूभाऊ लभाने, सादिक अली, शाहिद अली, धर्मेंद्र हवेलीकर, अनिल खडके (माजी सरपंच), मारोती झाडे (माजी सरपंच, टेमुर्डा), गणेश जोगी (ग्रामपंचायत सदस्य, फत्तापूर), जयंत चंदनखेडे, सुभाष वाटकर (पंचायत समिती प्रमुख, बोर्डा), सौ. चंद्रकलाताई मते (अध्यक्ष, महिला गुरुदेव सेवा मंडळ, वरोरा), जितुभाऊ कांबळे (ग्रामपंचायत सदस्य, बोर्डा) यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

    माजी नगराध्यक्ष अली हे भाजप पक्षातून निलंबित असले तरी त्यांचे पक्षात मोठे स्थान होते.

    अहेतेशाम अली यांच्यासह समर्थकांच्या काॅंग्रेस प्रवेशामुळे वरोरा-भद्रावतीसह संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला बळ मिळणार असून खासदार प्रतिभाताई धानोरकर यांचे हात आणखी बळकट होणार आहेत.

  • Bhisi police swift crime resolution । प्राथमिक आरोग्य केंद्राच्या निवासस्थानी सापडले चोरीचे साहित्य; भिसी पोलीसांची तत्पर कारवाई

    Bhisi police swift crime resolution

    Bhisi police swift crime resolution : चंद्रपूर ४ ऑक्टोबर २०२५ – प्राथमिक आरोग्य केंद्र भिसी मधील शासकीय निवासस्थानी चोरीचा मुद्देमाल ठेवत ते गिऱ्हाईक शोधत होते मात्र त्यापूर्वी भिसी पोलिसांनी अट्टल गुन्हेगारांना अटक केली.

    ४ ऑक्टोबर च्या मध्यरात्री भिसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेले राकेश ऑटो अँड हार्डवेअर व शरण्या ईलेकट्रीकल या दुकानांचे अज्ञातांनी शटर तोडत रोख ७ हजार ३०० सह १५०० रुपये आणि तीन टेबल फॅन लांबवीले. याबाबत राकेश विजय खोब्रागडे व श्रीकांत सोहनलाल ठोंबरे यांनी भिसी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद नोंदविली.

    Also Read : शेतकऱ्याने तहसील कार्यालयात घेतले विष, तात्काळ तहसीलदार व नायब तहसीलदार निलंबित

    पोलिसात तक्रार नोंद झाल्यावर भिसी पोलिसांनी तपासाला सुरुवात करीत रात्री दरम्यान संशयास्पद फिरत असलेला प्रज्वल उर्फ नागेश वामन तुंबेकर याला पोलिसांनी ताब्यात घेत विचारपूस केली असता त्याने सदर गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याने साथीदार दीपक संजय छापेकर व आयुष उर्फ गट्टू खोब्रागडे सोबत चोरी केल्याचे सांगितले. पोलिसांनी तात्काळ दीपक संजय छापेकर ला अटक करीत चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. Bhisi shop burglary night arrested

    शासकीय निवासस्थानी चोरीचा मुद्देमाल

    आरोपी आयुष गट्टू खोब्रागडे पसार झाला असून त्याचा शोध घेण्यासाठी पथके तयार करण्यात आले आहे. सदर चोरीचा मुद्देमाल प्राथमिक आरोग्य केंद्र भिसी मधील युवराज खोब्रागडे यांच्या शासकीय निवासस्थानी आढळून आला. चोरीचा माल विक्री करीत मिळालेले पैसे वाटप करण्याचे ठरविले होते. भिसी पोलिसांच्या कौशल्यपूर्ण तपासणे अवघ्या काही तासात या गुन्ह्याचा उलगडा झाला.

    सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर ठोसरे यांच्या मार्गदर्शनाखाली भिसी चे ठाणेदार सपोनि मंगेश भोंगाडे , पोउपनि रवींद्र वाघ, पोउपनि भारत थिटे, पोलीस कर्मचारी हिरोज हनवते, सतीश झिलपे, श्रीकांत वाढई, स्नेहल खोब्रागडे, हर्षल दडमल व साद शेख यांनी पार पडली.

  • Tadoba-Andhari new safari scheme for locals । प्रतिभाताई धानोरकरांचा पुढाकार; ताडोबाच्या बफर गेटवर स्थानिकांना आरक्षित जिप्सी सफारी

    Tadoba-Andhari new safari scheme for locals

    Tadoba-Andhari new safari scheme for locals : चंद्रपूर (दिनांक ०४ ऑक्टोबर २०२५): ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाने चंद्रपूर जिल्ह्यातील स्थानिक नागरिकांसाठी एक महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या पुढाकाराने, ताडोबाच्या बफर विभागात आता स्थानिकांना जिप्सी सफारी साठी विशेष व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे.

    Also Read : भाऊंचा दांडिया, विजेत्यांना मिळाली लाखोंची बक्षिसे

    या निर्णयानुसार, आगरझरी बफर गेटवर आता दर बुधवारी सकाळच्या सत्रासाठी सर्वच्या सर्व सहा जिप्सी सफारी वाहने (६ सीटर) केवळ चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कार्यकारी समितीने दिनांक ०३ ऑक्टोबर २०२५ रोजी झालेल्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. Tadoba local jeep safari booking Chandrapur

    जिप्सी बुकिंग आणि शुल्क तपशील

    • कोणासाठी: केवळ चंद्रपूर जिल्ह्यातील स्थानिक नागरिक
    • कुठे: आगरझरी बफर गेट
    • कधी: दर बुधवारी (सकाळच्या सत्रासाठी)
    • वाहन संख्या: एकूण ६ जिप्सी (६ सीटर)
    • शुल्क: एका जिप्सीसाठी (६ सीटर) ₹ ५००० (पाच हजार रुपये)
    • अंमलबजावणी: बुधवार, दिनांक ०८ ऑक्टोबर २०२५ पासून.

    बुकिंगची प्रक्रिया

    या जिप्सी सफारीची बुकिंग पर्यटनाच्या ७ दिवस आधीपासून एक दिवस आधीपर्यंत करता येणार आहे. बुकिंगसाठी नागरिकांना उपसंचालक (कोर), ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर यांच्या कार्यालयातील क्रुझर बुकिंग काउंटर येथे सकाळी ११:०० ते सायंकाळी ०५:०० वाजेपर्यंत संपर्क साधावा लागेल.

    क्रुझर सफारीची सवलत कायम

    स्थानिक नागरिकांच्या सोयीसाठी ताडोबा प्रशासनाने यापूर्वीच ९ सीटर क्रुझर सफारी सेवा सुरू ठेवली आहे. मोहर्ली प्रवेशद्वारासाठी ४ क्रुझर आणि कोलारा प्रवेशद्वारासाठी ३ क्रुझर सध्या कार्यरत आहेत. या क्रुझरद्वारे दररोज एकूण १२६ पर्यटकांना सकाळ आणि दुपारच्या फेरीत प्रवेश मिळतो. या क्रुझर सफारीचे शुल्क केवळ ₹ ७२०/- असून, यावर कॅमेरा शुल्कामध्ये १०० टक्के सूट देण्यात आली आहे.

    हा नवीन जिप्सी उपक्रम सध्या प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात येत आहे. याला मिळणाऱ्या प्रतिसाद आणि यशावर आधारित पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प प्रशासनाने स्पष्ट केले आहे. वन्यजीव पर्यटन आणि स्थानिकांचे हित यांचा समन्वय साधण्याचा हा एक महत्त्वाचा प्रयत्न आहे.

  • Kishor Jorgewar graduate voter initiative । पदवीधर मतदार नोंदणी मोहिमेत चंद्रपूर अव्वल ठेवण्याचा आमदार किशोर जोरगेवारांचा निर्धार!

    Kishor Jorgewar graduate voter initiative

    Kishor Jorgewar graduate voter initiative : चंद्रपूर ४ ऑक्टोबर २०२५ – पदवीधर हा समाजातील सुशिक्षित घटक आहे. त्याचे मत केवळ मतदानापुरते मर्यादित नसते, तर ते समाजाला दिशा देणारे असते. त्यामुळे प्रत्येक पदवीधर मतदार म्हणजे लोकशाहीचा बळकट दुवा आहे. या दुव्यांना जोडल्याशिवाय लोकशाहीची साखळी मजबूत होणार नाही. त्यामुळे उत्तम नियोजन करत प्रत्येक पदवीधर मतदारांची नोंदणी करून नोंदणी प्रक्रियेत चंद्रपूर मतदार संघ अव्वल ठेवा, असे आवाहन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

    Also Read : चंद्रपुरात २८५ जणांना शासकीय नोकरीचे नियुक्तीपत्र वाटप

    भारतीय जनता पार्टीच्या वतीने पदवीधर निवडणुकीसाठी नोंदणी अभियान राबविण्यात येणार असून, शुक्रवारी आमदार किशोर जोरगेवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात नियोजन बैठक पार पडली. या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला भारतीय जनता पक्षाचे महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, माजी उपमहापौर अनिल फुलझले, ओबीसी नेते अशोक जिवतोडे, भाजप नेते प्रकाश देवतळे, दशरथसिंह ठाकुर, महामंत्री सविता दंढारे, अरुण तिखे, मंडळ अध्यक्ष अॅड. सरिता संदुरकर आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. Chandrapur BJP graduate voter enrollment campaign

    भारतीय जनता पार्टीच्या भविष्यातील राजकीय प्रवासाचा पाया

    यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, पदवीधर मतदार नोंदणी अभियान ही केवळ औपचारिकता नसून, भारतीय जनता पार्टीच्या भविष्यातील राजकीय प्रवासाचा पाया आहे. पदवीधर मतदार नोंदणीमध्ये आपला जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर राहिला पाहिजे. आजच्या या बैठकीत आपण उत्तम नियोजन करून पुढे जाण्याचा निर्धार करा. नोंदणी मोहिमेत दैनंदिन आढावा घेणे आवश्यक आहे. प्रत्येक दिवसाची आपली प्रगती, आलेल्या अडचणी यांचा दैनंदिन आढावा घ्यावा, संघटित नियोजन करावे, अशा सूचना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी सदर बैठकीत कार्यकर्त्यांना केल्या.

    प्रत्येक पदवीधर मतदाराचा सहभाग ही लोकशाहीची ताकद आहे. आपण संघटित नियोजन, सातत्यपूर्ण प्रगती आणि कार्यकर्त्यांच्या उत्साहाने ही मोहीम यशस्वी करू. पदवीधर म्हणजे केवळ शिक्षणाची पदवी मिळालेली व्यक्ती नव्हे, तर समाजाला मार्गदर्शन करण्याची क्षमता असलेला नागरिक आहे. त्यामुळे पदवीधर मतदार संघासाठीच्या निवडणुकीत पदवीधरांचा सक्रिय सहभाग गरजेचा आहे, असे ते यावेळी म्हणाले. यावेळी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

  • Chandrapur anukampa and direct recruitment । अनुकंपाधारक उमेदवारांना मोठा दिलासा; चंद्रपूरमध्ये नियुक्तीपत्र वाटपाचा सोहळा

    नोकरीचा आधार कुटुंबासाठी मोठा – पालकमंत्री डॉ. अशोक वुईके

    Chandrapur anukampa and direct recruitment

    Chandrapur anukampa and direct recruitment : चंद्रपूर, दि. 04 : राज्यामध्ये अनुकंपाधारकांच्या नोकरीचा विषय अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. या कुटुंबांना आर्थिक व भावनिक मदत करणे ही शासनाची जबाबदारी आहे, या संकल्पनेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धोरणात्मक निर्णय घेतला. त्यामुळेच आज संपूर्ण राज्यात एकाचवेळी अनुकंपाधारक व सरळसेवा भरती उमेदवारांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात येत आहे. शेवटी नोकरी ही उपजिविकेचे साधन असून कुटुंबासाठी अतिशय मोठा आधार आहे, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांनी केले. Chandrapur anukampa and direct recruitment

    Also Read : शेतकरी विष प्राशन प्रकरण, तहसीलदार व नायब तहसीलदार निलंबित

    जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह येथे अनुकंपाधारक व सरळ सेवा भरती उमेदवारांना नियुक्ती आदेश वितरण करताना ते बोलत होते. यावेळी मंचावर आमदार सर्वश्री सुधीर मुनगंटीवार, किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, जिल्हा पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार आदी उपस्थित होते.

    राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रोजगार उपलब्ध करून देण्याची संकल्पना मांडली आणि प्रशासनाने यावर तात्काळ कारवाई करत नियुक्तीपत्र देण्याचे नियोजन केले, असे सांगून पालकमंत्री डॉ. वुईके म्हणाले, आज चंद्रपूर जिल्ह्यातील 202 अनुकंपाधारक व 83 सरळसेवा भरती उमेदवार असे एकूण 285 जणांना शासकीय नोकरीचे नियुक्तीपत्र देण्यात आले आहे. यापूर्वी अनुकंपा या विषयासंदर्भात 40 शासन निर्णय होते. या सर्व शासन निर्णयांना एकत्रित करून अनुकंपाबाबत सुलभ धोरण तयार व्हावे, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनव संकल्पना मांडली. त्यामुळेच आज अनेक कुटुंबांना शासकीय नोकरीचा आधार मिळाला आहे. Anukampa recruitment job orders

    अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या उमेदवारांची यादी जिल्हा प्रशासनाने अतिशय पारदर्शकपणे आणि प्रामाणिकपणे तयार केली आहे. जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या मार्गदर्शनात चंद्रपूर जिल्ह्यात अतिशय चांगले काम जिल्हा प्रशासन करत आहे. अनुकंपाधारक तसेच नवीन उमेदवारांनीही यात आपले योगदान देऊन निष्ठेने काम करावे. नोकरीत आपले ध्येय आणि उद्दिष्ट ठरवून नागरिकांची सेवा करावी, असे आवाहन पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांनी केले.

    anukampa recruitment job orders

    प्रास्ताविकात जिल्हाधिकारी विनय गौडा म्हणाले, शासनाच्या नवीन धोरणानुसार जिल्ह्यातील 202 अनुकंपाधारक व 83 लिपिक टंकलेखकांना आज नोकरीचे नियुक्तीपत्र देण्यात येत आहे. सर्व विभागातील रिक्त पदांची माहिती घेऊन एकत्र यादी तयार करण्यात आली. त्यानुसार कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. उमेदवारांसाठी हा अतिशय आनंदाचा दिवस आहे. नवीन उमेदवारांनी आपल्या संपूर्ण क्षमतेने, प्रामाणिकपणे आणि निष्ठेने काम करावे, असे जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी सांगितले. 285 new government jobs appointments Chandrapur

    कार्यक्रमाचे संचालन अजय मेकलवार यांनी तर आभार निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार यांनी मानले. यावेळी सर्व विभागप्रमुख, वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

    लोकांच्या हृदयात आपले स्थान निर्माण करण्यासाठी काम करा – आमदार सुधीर मुनगंटीवार

    कार्यक्रम अनेक होतात, मात्र आजचा कार्यक्रम नेहमी आठवणीत राहील, असा आहे. जगातील केवळ 28 देशात स्थायी नोकरी आहे. शासकीय नोकरी ही ईश्वराची सेवा आहे, असे समजून लोकांच्या हृदयात आपले स्थान निर्माण होईल, या भावनेने काम करावे. आपल्या हातून कोणतीही चूक होता कामा नये. जे काम मिळेल त्या कामांमध्ये तज्ज्ञ होण्यासाठी प्रयत्न करावा, असे आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले. Chandrapur anukampa and direct recruitment

     अधिकारी आणि कर्मचा-यांनी चंद्रपूरचे नाव मोठे करावे : आमदार किशोर जोरगेवार

    राज्यात पहिल्यांदा एकाचवेळी 10309 उमेदवारांना शासकीय नेाकरीचे नियुक्तीपत्र देण्यात येत आहे. यात चंद्रपूर जिल्ह्यातील 285 जणांचा समावेश आहे. जिल्ह्यातील सर्व अधिकारी – कर्मचा-यांनी तसेच नवनियुक्त उमेदवारांनी चंद्रपूरचे नाव मोठे करावे, असे आमदार किशोर जोरगेवार म्हणाले. सरकारने अतिशय पारदर्शक पद्धतीने ही भरती केली आहे. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नामुळे चंद्रपूर जिल्हा अग्रेसर राहील. शासकीय नोकरीत रुजू होणाऱ्या उमेदवारांनी अनेक नवीन नवीन गोष्टी शिकून घ्याव्यात, असे आवाहनही त्यांनी केले. Chandrapur anukampa and direct recruitment

    उमेदवारांना नियुक्तीपत्रांचे वाटप :  चंद्रपूर जिल्ह्यातील 202 अनुकंपाधारक आणि 83 सरळसेवा भरती उमेदवार, असे एकूण 285 जणांना शासकीय नोकरीची नियुक्तीपत्रे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यात मनिष दहिवले, सरिता मेश्राम, संदीप किटे, दिवेश भैसारे, समित्र कुमरे, राज सलामे, नम्रता करमळकर, राकेश आष्टेकर, प्रगती मार्लेवर, संतोष घाटोडे, शितल पाटोळे, शितल पुल्लावार, कविता उमरे, शिवम मडावी, कृष्णा सातपुते, विश्वास इटणकर, सिद्धेश तायडे, सरोज ब्राह्मणे, तन्वी सिडाम, यांच्यासह सेवा पंधरवडा अभियानातील लाभार्थ्यांना प्रमाणपत्र तसेच सर्वांसाठी घरे अंतर्गत आदेश वाटप, वन हक्क पट्टे वाटप करण्यात आले.

  • Chandrapur Bhaucha Dandiya Winners 2025 । चंद्रपूरमध्ये ‘भाऊचा दांडिया’ महोत्सवाचा भव्य समारोप; विजेत्यांना लाखोंची बक्षिसे

    Chandrapur Bhaucha Dandiya Winners 2025

    Chandrapur Bhaucha Dandiya Winners 2025 : चंद्रपूर (४ ऑक्टोबर २०२५) – “दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांची प्रेरणा आणि चंद्रपूरकरांचे प्रेम यांमुळेच हा महोत्सव दरवर्षी अधिक उत्साहाने पार पडतो,” अशा भावनिक शब्दांत आपल्या भावना व्यक्त करत खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘खासदार सांस्कृतिक महोत्सव-भाऊचा दांडिया’ या सोहळ्याचे चौथे वर्ष दिनांक २ ऑक्टोबर रोजी  थाटामाटात संपन्न झाले. दिवंगत बाळूभाऊ धानोरकर यांच्या स्मृतीला वंदन करत सलग अकरा दिवस (२२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर) चांदा क्लब मैदानावर दांडियाचा मनसोक्त आनंद लुटला. यावेळी गुणवंत कलाकारांना दुचाकीसह लाखो रुपयांच्या रोख पुरस्कारांचे वितरण करून त्यांच्या कलागुणांना सन्मानित करण्यात आले.  Bhaucha Dandiya Festival Chandrapur

    Also Read : खासदार धानोरकर यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केले चक्काजाम आंदोलन

    हा अकरा दिवसांचा रंगारंग कार्यक्रम केवळ दांडियाचा मनमुराद आनंद देणारा नव्हता, तर शिक्षण, क्रीडा, कला, पत्रकारिता आणि सामाजिक कार्य अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत मान्यवरांचा गौरव करण्याचा एक महत्त्वाचा मंच ठरला.

    अनुराग घोरपडे आणि मनीषा सरकार चॅम्पियन

    समारोपावेळी दांडिया स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले. खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते चॅम्पियन पुरुष गटातून अनुराग घोरपडे आणि चॅम्पियन महिला गटातून मनीषा सरकार यांनी दुचाकी आणि सन्मानचिन्ह पटकावले. याशिवाय, किंग मध्ये धनंजय मेश्राम आणि क्वीन मध्ये सुष्मिता मलिक यांनी पारितोषिक मिळवले.

    bhaucha dandiya festival chandrapur

    यावेळी रील स्पर्धा, ग्रुप दांडिया, लहान गट आणि ३५ वर्षांवरील महिला गटातील स्पर्धकांनाही रोख बक्षिसे देऊन प्रोत्साहन देण्यात आले. मराठा चॅरिटेबल ट्रस्ट आणि बाळू धानोरकर मित्र परिवार चॅरिटेबल सोसायटीच्या वतीने आयोजित या महोत्सवामुळे चंद्रपूरकरांना एकत्र येऊन आनंद साजरा करण्याची आणि दांडिया खेळण्याची उत्तम संधी मिळाली. या यशस्वी आयोजनाबद्दल स्पर्धकांनी व नागरिकांनी आयोजकांचे आभार मानले. यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यासह शहरातील काँग्रेसचे विविध पदाधिकारी आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.

  • Nitin Bhatarkar Efforts Chandrapur । राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांच्या पाठपुराव्याला यश; सभागृह नूतनीकरणासाठी मंजुरी

    Nitin Bhatarkar Efforts Chandrapur

    Nitin Bhatarkar Efforts Chandrapur : चंद्रपूर (५ ऑक्टोबर २०२५):- वेकोली च्या दुर्गापूर वसाहत क्षेत्रातील पुर्णपणे तुटलेले कामगार मनोरंजन केंद्र अद्ययावत करणेबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांनी केलेल्या सततच्या प्रयत्नाला यश आले असून कामगार मनोरंजन केंद्राचे आता अद्ययावत नूतनीकरण होणार आहे.

    Also Read : तहसील कार्यालयात शेतकऱ्याने केले विष प्राशन, तहसीलदार व नायब तहसीलदार निलंबित

    वेस्टर्न कोलफिल्डस लिमीटेड चंद्रपूर क्षेत्रातील दुर्गापूर वसाहतीतील कामगार मनोरंजन केंद्र असलेल्या एकमेव सभागृहात वेकोली वसाहतीतील कामगारांच्या परिवारातील तसेच कॉलनी लगत असलेल्या परिसरातील नागरिकांचे लग्नसोहळयांसह सुखदुःखाचे मोठ्या स्वरुपात कार्यक्रम होत असते. यासंपुर्ण परिसरात ते एकमेव सभागृह असल्याने अनेकांचा प्राधान्य याच सभागृहात कार्यक्रम करण्याकरीता असतो. Chandrapur Western Coalfields colony social hall

    यामुळे सततचा पाठपुरावा

    मात्र जवळपास २०-२५ वर्षापासून या सभागृहाची डागडुगी वा नव्याने दुरुस्ती झालेली नाही. सभागृहावरील असलेले टिनपत्रे तुटून असल्याने मोठ्या प्रमाणात त्यामधून पाण्याची गळती होत असते तसेच भिंतीला सुध्दा अनेक ठिकाणी तडे गेलेले असून दरवाजे सुध्दा तुटलेल्या अवस्थेत होते यामुळे पुर्णपणे नादुरुस्त असलेल्या व जीर्ण झालेल्या सभागृहात भविष्यात दुर्घटना सुध्दा घडण्याचे नाकारता येत नव्हते व म्हणूनच सदर सभागृहाचे नुतनीकरण करण्या संदर्भात सतत पाठपुरावा करण्यात आला.

    सतत पत्रव्यवहार

    राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांनी याबाबत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणविस साहेब, खासदार श्री प्रफुल पटेल साहेब, चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री अशोक उईके साहेब, मा. व्यवस्थापकीय संचालक, वेकोली, नागपूर, मा. क्षेत्रीय व्यवस्थापक वेकोली चंद्रपूर क्षेत्र, स्थानिक खासदार व आमदार यांच्याशी सतत पत्रव्यवहार करत पाठपुरावा केला.

    आजपर्यंत केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून वेस्टर्न कोलफिल्डस लिमिटेड कंपनी कार्यालयाचे पत्र क्रमांक वेकोली / चक्षे / महाप्र / सिविल / अम्लाधिकारी / डीपी – १३६३ / ६११५ दिनांक २३.०९.२०२५ रोजी सदर सभागृहाच्या नूतनीकरणासाठी कंत्राट देण्यात आलेला असून सदर कंत्राटाची किंमत ५९ लाख ८४ हजार ९७० रुपये ६६ पैसे इतकी आहे. लवकरच या सभागृहाचे अद्ययावत नूतनीकरणाच्या कामाला सुरुवात होणार असून नागरिकांच्या सेवेत उपलब्ध होईल.

  • Tehsildar and Naib Tehsildar suspended । भद्रावती शेतकरी विषप्राशन प्रकरण: तहसीलदार व नायब तहसीलदार निलंबित

    Tehsildar and Naib Tehsildar suspended

    Tehsildar and Naib Tehsildar suspended : भद्रावती (३ ऑक्टोबर २०२५) – शेती संबंधित प्रकरणात न्याय न मिळाल्याने हताश झालेल्या शेतकऱ्याने तहसील कार्यालयात विषप्राशन केल्याच्या गंभीर घटनेनंतर, महाराष्ट्र शासनाने तातडीने कठोर कारवाई केली आहे. या प्रकरणी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत तहसीलदार राजेश भांडारकर आणि नायब तहसीलदार सुधीर खांडरे यांना तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. शासनाचे अवर सचिव प्रवीण पाटील यांनी या निलंबनाचे आदेश जारी केले आहेत.

    शेतकऱ्याला न्याय नाकारल्याने उचलले टोकाचे पाऊल

    मोरवा येथील परमेश्वर विश्वनाथ मेश्राम (वय ५५) या शेतकऱ्याने तालुक्यातील कुरोडा येथील गट क्रमांक ८६, ८७, ९५ आणि ९८ मधील जमिनीच्या अभिलेखात वारसांची नावे नोंदवण्यासाठी सातत्याने मागणी केली होती. यासाठी त्यांच्याकडे २०१५ चा न्यायालयीन आदेश देखील होता. मात्र, निलंबित करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांनी या आदेशाची अंमलबजावणी न करता, “मालकी हक्काबाबत वाद आहे” असे कारण देत अर्ज फेटाळून लावला.

    Also Read ; चंद्रपुरात ड्राय डे च्या दिवशी दारूविक्री, पोलिसांनी केली कारवाई

    अनेक वर्षांच्या पाठपुराव्यानंतरही न्याय न मिळाल्याने निराश झालेल्या मेश्राम यांनी २६ सप्टेंबर २०२५ रोजी भद्रावती तहसील कार्यालयातच विषारी द्रव्य प्राशन केले. त्यांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. Bhadravati land dispute government officer suspension

    महसूल विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह

    या अत्यंत दुर्दैवी घटनेची शासनाने गंभीर दखल घेतली. महसूल अधिनियम १९६६ आणि महाराष्ट्र नागरी सेवा आचारसंहिता नियम १९६९ चे उल्लंघन केल्याबद्दल दोन्ही अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. या कारवाईमुळे महसूल विभागाच्या जनसामान्य विरोधी कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

    वादग्रस्त कार्यकाळामुळे राजेश भांडारकर चर्चेत

    निलंबित झालेले तहसीलदार राजेश भांडारकर यांचा कार्यकाळ आधीपासूनच वादग्रस्त ठरला होता. त्यांच्यावर अवैध रेती उत्खनन, मुरूम उत्खनन प्रकरणे, कार्यालयात गैरहजेरी, शेतकऱ्यांच्या लोकअदालतीत अनुपस्थिती आणि नागरिकांच्या तक्रारी प्रलंबित ठेवण्याचे अनेक आरोप होते. नागरिकशास्त्र संरक्षण समितीचे अध्यक्ष विठ्ठल बदखल यांनी त्यांच्या विरोधात वारंवार वरिष्ठांकडे तक्रारी केल्या होत्या. शेतकरी आत्महत्येच्या प्रयत्नानंतर प्रशासनाला अखेर कठोर भूमिका घ्यावी लागली, असे चित्र आहे.

  • Chandrapur government recruitment news । चंद्रपूरमध्ये 285 जणांना शासकीय नियुक्तीपत्रे; अनुकंपाधारकांना दिलासा

    Chandrapur government recruitment news

    Chandrapur government recruitment news : चंद्रपूर, दि. 03 : राज्य शासनाने 150 दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत अनुकंपाधारकांना नियुक्ती देणे, या बाबीचा समावेश केला आहे. विशेष म्हणजे सर्व जिल्ह्यांमध्ये ही कार्यवाही पूर्ण करण्याकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. त्या अनुषंगाने चंद्रपूर जिल्ह्यातील 202 अनुकंपाधारक आणि 83 सरळसेवा भरती उमेदवार, असे एकूण 285 जणांना शासकीय नोकरीची नियुक्तीपत्रे, राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांच्या हस्ते देण्यात येईल. या कार्यक्रमाचे आयोजन 4 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात करण्यात आले आहे. 

    Also Read : चंद्रपूर महाकाली महोत्सवाची सांगता

      अनेक वर्षांपासून नोकरीच्या प्रतिक्षेत असलेल्या गरजू कुटुंबांसाठी शासनाकडून एक अत्यंत महत्वाचा  निर्णय घेण्यात आला. अनुकंपा तत्वावरील नियुक्ती प्रक्रियेला गती देऊन जिल्हा प्रशासनाने शेकडो कुटुंबांच्या जीवनात आशेचा नवा किरण आणला आहे. या नियुक्तीमुळे केवळ नोकरीच नाही, तर ज्या कुटुंबाने आपल्या कर्त्या पुरुषाला गमावले आहे, त्या कुटुंबांना मोठा भावनिक आणि आर्थिक आधार मिळाला आहे. हे नियुक्तीपत्र म्हणजे केवळ एक शासकीय कागद नसून, ते एका कुटुंबाच्या उज्वल भविष्याची पुनर्स्थापना आहे. Chandrapur compassionate appointment 2025

    285 जणांना शासकीय नोकरीची नियुक्तीपत्रे

    जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या मार्गदर्शनात चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या परिश्रमांमुळे अनेक प्रलंबित प्रकरणे मार्गी लागली आहेत. यात जिल्ह्यातील अनुकंपा तत्वावरील गट – 3 आणि गट – 4 च्या 202 उमेदवारांना तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत निवड झालेल्या लिपीक – टंकलेखक (गट – 3) च्या 83 उमेदवारांना असे एकूण 285 जणांना शासकीय नोकरीची नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात येणार आहे.

                अनुकंपाधारक उमेदवारांमध्ये राज्य शासनाच्या वतीने गट – ‘क’ चे 59, गट – ‘ड’ चे 69 (दोन्ही मिळून 128 उमेदवार), जिल्हा परिषद ग्रामविकास विभागाच्यावतीने गट – ‘क’ चे 21, गट – ‘ड’ चे 26 (47 उमेदवार), नगर विकास विभाग, महानगरपालिका / नगरपालिका / नगर परिषदेच्या वतीने गट – ‘क’ चे 12, गट – ‘ड’ चे 15 (27 उमेदवार) असे 202 अनुकंपाधारक तर सरळ सेवा भरती द्वारे लिपीक – टंकलेखक म्हणून नियुक्ती झालेले 83 उमेदवार असे एकूण 285 जणांचा समावेश आहे.

    यापूर्वी, चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी, अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार आणि अधीक्षक नरेश बहिरम यांच्या मार्गदर्शनात 3 सप्टेंबर 2025 रोजी अनुकंपाधारकांचा मेळावा आणि 13 सप्टेंबर 2025 रोजी सरळसेवा अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली होती. यात उपलब्ध पदे, शैक्षणिक अहर्ता, पात्रता, वेतनश्रेणी, कामाचे स्वरूप, पदोन्नतील संधी, विशेष प्राविण्य, तंत्रज्ञ, शासकीय सेवेची जबाबदारी व कर्तव्य आदी माहिती देण्यात आली होती. या समुपदेशनामुळे शासकीय नोकरीत येणा-या नवनियुक्त उमेदवारांचे मनोबल उंचावण्यास मदत झाली.

  • Sonali Kulkarni at Mahakali Mahotsav । सोनाली कुलकर्णींची महाकाली महोत्सवाला भेट; भक्तिरसाने भारलेले वातावरण

    Sonali Kulkarni at Mahakali Mahotsav

    Sonali Kulkarni at Mahakali Mahotsav : चंद्रपूर ३ ऑक्टोबर २०२५ – श्री माता महाकाली महोत्सव केवळ भक्तीचा उत्सव नसून लोकउत्सव आहे. समाजातील प्रत्येक घटक, प्रत्येक धर्म, प्रत्येक जात या महोत्सवात सहभागी होते. ही एकता म्हणजेच आपल्या संस्कृतीचे सामर्थ्य आहे. महाकाली महोत्सवाच्या माध्यमातून आपले धार्मिक महत्त्व देशपातळीवर पोहोचविण्याचे कार्य आपण करत असून यात चंद्रपूरकरांची मिळत असलेली साथ उत्साहवर्धक आहे. हा महोत्सव म्हणजे भक्ती, संस्कृती आणि सामाजिक ऐक्याचा लोकउत्सव असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. Chandrapur Cultural Tourism

    ओला दुष्काळ जाहीर करा, खासदार धानोरकरांचं चक्काजाम आंदोलन

    आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून आयोजित पाच दिवसीय श्री माता महाकाली महोत्सवाचा बुधवारी नवदाम्पत्य यांच्या हस्ते यज्ञ आणि महाप्रसादाने समारोप करण्यात आला. या समारोपीय कार्यक्रमात महोत्सव समितीचे अध्यक्ष आमदार किशोर जोरगेवार बोलत होते. यावेळी महोत्सवात सेवा देणाऱ्या सर्व समाज आणि सेवकांचा आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

    या कार्यक्रमात बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, या पाच दिवसांत आपण कन्यापूजन, नवदाम्पत्यांच्या हस्ते होमहवन, सुहासिनींना सौभाग्याचा चुडा, ज्येष्ठ मायमाऊलींचा सन्मान, सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रम, समाजजागृती उपक्रम, महिला सक्षमीकरण, स्थानिक कलाकारांचे कार्यक्रम अशा असंख्य उपक्रम घेण्यात आले. हे सर्व उपक्रम फक्त धार्मिक कर्तव्य नसून, ते आपल्या समाजजीवनात संस्कार रुजवणारे दीपस्तंभ आहेत.

    पालखी सोहळ्यात भक्तांचा महासागर

    नगर प्रदक्षिणा पालखी सोहळ्यात भक्तांचा महासागर उफाळून आला. शहरातील प्रत्येक रस्ता, प्रत्येक गल्ली माता भक्तांच्या जयघोषाने दुमदुमून गेला. संपूर्ण चंद्रपूर या दिवसांत भक्तिरसाने ओतप्रोत भरून गेले. महोत्सवामुळे चंद्रपूरची कीर्ती दूरवर पोहोचली आहे. बाहेरगावाहून येणाऱ्या पर्यटकांची संख्या वर्षागणिक वाढत आहे. धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीनेही चंद्रपूरचे महत्त्व वाढत असून, आपल्या शहराचा गौरवशाली इतिहास, सांस्कृतिक वारसा आणि भक्तिभावाची परंपरा जगासमोर पोहोचत आहे. हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी असंख्य संस्था, स्वयंसेवक, कलाकार, महिला मंडळे, महोत्सव समितीचे पदाधिकारी यांनी अहोरात्र परिश्रम घेतले. त्यांच्या या सेवेला मी वंदन करतो. त्यांचा सन्मान म्हणजे आपल्या महोत्सवाचा सन्मान असल्याचे ते यावेळी म्हणाले. Kishor Jorgewar Mahakali Mahotsav

    चंद्रपूर हे इतिहासाचा, संस्कृतीचा आणि श्रद्धेचा ठेवा आहे. गोंडवाना साम्राज्याची ही राजधानी, ‘काळ्या सोन्या’चे भांडार असलेल्या या भूमीला ताडोबाच्या व्याघ्र प्रकल्पाने आंतरराष्ट्रीय पातळीवर मान मिळवून दिला आहे. माता महाकालीच्या मंदिराला वर्षानुवर्षे भाविक येथे येतात, त्यामुळेच हा महोत्सव केवळ उत्सव नसून भक्तीचा दीपोत्सव असल्याचे ते यावेळी म्हणाले.

    यावेळी महोत्सव समितीचे उपाध्यक्ष अॅड. विजय मोगरे, सुनील महाकाले, सचिव अजय जयस्वाल, सहसचिव बलराम डोडाणी, कोषाध्यक्ष पवन सराफ, सहकोषाध्यक्ष राजेश शास्त्रकार, विश्वस्त मिलिंद गंपावार, प्रभाकर मंत्री, जयश्री कापसे–गावंडे, वंदना हातगावकर, आशा महाकाले, सविता दंडारे आदींची उपस्थिती होती. Mahakali Palkhi Yatra

    mahakali mahotsav

    श्याम धोपटे, मुक्ता बोझावार, एकता पित्तूलवार, अलका ठाकरे, सुमेधा श्रीरामे, राजश्री मार्कंडेवार, रजनी पॉल, श्रद्धा एडलावार, भारती कोटकर, सरोज चांदेकर, प्रज्ञा जीवनकर, धनंजय तावडे, सुरक्षणा गायवकवाड यांनी पाच दिवस संचालनाची व्यवस्था सांभाळली. तर आरती संचामध्ये मनीषा पडगीलवार, राज ताटपल्लीवार, सार्थक उत्तरवार, मैथील कुंभरे, सुचिता पद्मावार, रिद्धी राऊत आदींची उपस्थिती राहिली. ज्येष्ठ नागरिक संघ, गायत्री परिवार, निर्मला माता सहज योग ध्यान साधना केंद्र यांच्या सहकार्याने अनेक कार्यक्रम झाले. मंच व्यवस्था डॉ. आम्रपाली देवगडे, अतिथी गडकरी, प्रीती बिंद यांनी सांभाळली.

    सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी महोत्सव स्थळी

    महोत्सवाच्या चौथ्या दिवशी सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी महाकाली महोत्सवाला भेट दिली. यावेळी त्यांच्या हस्ते मातेची महाआरती करण्यात आली. त्यांना पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. नियोजनबद्ध आयोजन आणि विविध सामाजिक उपक्रम याबद्दल सोनाली कुलकर्णी यांनी आयोजनाचे कौतुक केले.