Blog

  • On the Spot Teacher Approvals Chandrapur । आमदार सुधाकर अडबाले यांच्या पुढाकाराने शिक्षक-शिक्षकेत्तरांच्या ४ प्रकरणांना तत्काळ न्याय

    On the Spot Teacher Approvals Chandrapur

    On the Spot Teacher Approvals Chandrapur : चंद्रपूर (३ ऑक्टोबर २०२५) : माध्यमिक शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्या आस्थापनेची तात्काळ चौकशी करण्यात यावी व जे अधिकारी, कर्मचारी शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची प्रकरणे वेळेत निकाली काढण्यास महाराष्ट्र सेवा हमी कायदा २०१५ चे उल्लंघन करीत असतील, त्यांच्यावर शिस्तभंगाची कार्यवाही करण्याच्या सूचना बुधवारी पार पडलेल्या सहविचार सभेत आमदार सुधाकर अडबाले यांनी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) श्री. पातळे यांना दिल्या. Chandrapur Teachers Grievance Redressal

    शेतकऱ्यांच्या प्रश्नावर खासदार धानोरकर यांचं चक्काजाम आंदोलन

    आमदार सुधाकर अडबाले यांच्या पुढाकाराने विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या ‘समस्या तुमच्या, पुढाकार आमचा’ या उपक्रमाअंतर्गत शिक्षणाधिकारी (माध्य.), जि.प. चंद्रपूर यांच्याकडे चंद्रपूर जिल्ह्यातील खासगी अनुदानित माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळेत कार्यरत शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या समस्या निवारणार्थ समस्या निवारण सभा बुधवारी मा. सा. कन्नमवार सभागृह, चंद्रपूर येथे पार पडली. यावेळी ४ प्रकरणांना ‘ऑन द स्पॉट’ मान्यतेचे पत्र देण्यात आले. मागील प्रत्येक सभेत ‘ऑन द स्पॉट’ प्रकरणे निकाली काढली जात असल्याने आमदार सुधाकर अडबाले यांच्या कामगिरीवर शिक्षक – कर्मचाऱ्यांत समाधान व्यक्त केले जात आहे. Sudhakar Adbale Teacher Meeting

    ऑन द स्पॉट मान्यतेचे पत्र

    सभेत प्रवीण धोटे (नेहरू विद्यालय तथा विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय चंद्रपूर) यांना मुख्याध्यापक पदास सुधारित वेतन श्रेणी, दर्शन गोरंटीवार (जनता विद्यालय पोंभुर्णा), योगेश पाचभाई, प्रीती लांडे (जनता विद्यालय चंद्रपूर) यांना शिपाई पदास सेवासातत्यास ‘ऑन द स्पॉट’ मान्यतेचे पत्र देण्यात आले.

    सभेत जिल्ह्यातील अनुकंपा प्रकरण, मान्‍यता वर्धित व मंडळ मान्‍यताबाबत, शिक्षक – कर्मचाऱ्यांचे समायोजन, वेतन, वैद्यकीय देयके, वरिष्ठ / निवड श्रेणी अश्या ७० च्यावर सामूहिक व वैयक्तिक समस्यांवर चर्चा करण्यात आली.

    सभेला शिक्षणाधिकारी (माध्य.) राजेश पातळे, उपशिक्षणाधिकारी गणेश येडणे, वेतन पथक अधीक्षक निकीता ठाकरे, लेखाधिकारी श्री. वडेट्टीवार, म. रा. माध्यमिक शिक्षक महामंडळाचे सदस्य लक्ष्मणराव धोबे, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्‍हाध्यक्ष सुनील शेरकी, जिल्‍हा कार्यवाह दीपक धोपटे, महानगर अध्यक्ष दिगांबर कुरेकार, महानगर कार्यवाह सुरेंद्र अडबाले, जिल्हा उपाध्यक्ष आनंद चलाख, हेमंतकुमार किंदरले, सहकार्यवाह हरिहर खरवडे, जिल्हा कोषाध्यक्ष नितीन जीवतोडे, डॉ. विजय हेलवटे, प्रज्ञा बारेकर, आसमा खान, श्रीहरी शेंडे, शेखर जुमडे, सुरेश डांगे, प्रभाकर पारखी, अनिल कंठीवार, विजय भोगेकर व मोठ्या संख्येने जिल्ह्यातील विमाशि संघाचे सदस्‍य, समस्‍याग्रस्‍त शिक्षक उपस्‍थित होते.

  • Ola Dushkal Jahir Kara Demand । “सातबारा कोरा” फसवी आश्वासन! – खासदार धानोरकरांचा महायुती सरकारवर हल्ला

    Ola Dushkal Jahir Kara Demand

    Ola Dushkal Jahir Kara Demand : चंद्रपूर – अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या महायुती सरकारला जाग आणण्यासाठी आज खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने नागपूर-चंद्रपूर महामार्ग ठप्प पाडला.”ओला दुष्काळ जाहीर करा आणि सरसकट कर्जमाफी द्या” या प्रमुख मागणीसाठी वरोरा येथील रत्नमाला चौकात हजारो शेतकरी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी ‘चक्काजाम’ आंदोलन केले. सरकारने निवडणुकीपूर्वी दिलेली “सातबारा कोरा” करण्याची घोषणा खोटी ठरल्याचा संतप्त आरोप करत, खासदार प्रतिभा धानोरकर यांनी थेट बैलबंडीने तहसील कार्यालयात जाऊन प्रशासनाला धारेवर धरले. Chandrapur Nagpur Highway Blocked

    विजयादशमीला चंद्रपुरात रावण दहन नाहीच, कारण काय?

     यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी सरकारवर थेट हल्ला चढवत, निवडणुकीपूर्वी भाजपानं जाहीरनाम्यात केलेली ‘सातबारा कोरा’ करण्याची घोषणा निव्वळ फसवी ठरल्याचे ठणकावले. “महाराष्ट्रातील बळीराजा संकटात आला असून कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत, पण तरीही महायुती सरकार मात्र फक्त मोठमोठ्या वल्गना करून रिकाम्या आश्वासनांची फसवी नाटकं करत आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. राज्यात तातडीने ओला दुष्काळ जाहीर करण्याची आणि शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्याची प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली. तसेच, चंद्रपूर जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादकांना विशेष पॅकेज देऊन कापूस उत्पादकांना हेक्टरी १ लाख, तर सोयाबीन उत्पादकांना हेक्टरी ५० हजार नुकसानभरपाई शासनाने त्वरित द्यावी, अशी ठाम भूमिका या आंदोलनातून घेण्यात आली. Chandrapur Kisan Andolan Marathi

    दोन तास वाहतूक ठप्प

    यावेळी चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी मोठया संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते. चंद्रपूर महामार्ग खासदार प्रतिभा धानोरकर आणि काँग्रेसचे कार्यकर्ते तसेच शेतकरी यांनी खाली बसून अडवून धरल्यामुळे तब्बल दोन तास वाहतूक ठप्प झाली होती. मात्र रुग्णवाहिकेंना मार्ग मोकळा करून दिला जात होता. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल, तहसीलदार योगेश कोटकर, ठाणेदार तांबडे यांनी खासदार प्रतिभा धानोरकर यांना आश्वासन देऊन आंदोलन संपवण्याची विनंती केली मात्र प्रशासनाने ठोस आश्वासन द्यावे याकरता त्यानंतर खासदार प्रतिभा धानोरकर व आंदोलक हे बैलबंडीने तहसील कार्यालयात गेले आणि तहसीलदार योगेश कोटकर यांना निवेदन दिले.

            या आंदोलनात खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यासह प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव संजय खाडे,चंद्रपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश तिवारी, प्रवीण काकडे,अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष सोहेलभाई रजा शेख,इंटक युवक काँग्रेस नेते प्रशांत भारती, वरोरा ग्रामीण तालुकाध्यक्ष मिलिंद भोयर, भद्रावती तालुकाध्यक्ष प्रशांत काळे, वरोरा शहराध्यक्ष विलास टिपले, भद्रावती शहराध्यक्ष सूरज गावंडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती राजू चिकटे, गोपाल अमृतकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती  विशाल बदखल, ऐश्वर्या खामनकर, संध्या पोडे, दिपाली माटे, सरीता सूर, छोटू शेख, राजू महाजन, अनिल झोटिंग, गणेश चवलेदिलीप टिपले, लक्ष्मण बोधाले, दिनकर ठेंगणे, वसंत विधाते, गिरीधर कष्टी यांसह काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

  • Chandrapur Foreign Liquor Seized | ड्राय डे च्या दिवशी चंद्रपुरात दारूविक्री

    Chandrapur Foreign Liquor Seized

    Chandrapur Foreign Liquor Seized : चंद्रपूर ३ ऑक्टोबर २०२५ – २ ऑक्टोबर गांधी जयंतीला देशभरात ड्राय डे असतो त्यानंतरही काहीजण अवैधरित्या दारूची विक्री करतात, असाच एक प्रकार चंद्रपूर शहरातील एकोरी वार्डात घडला. पोलिसांनी यावेळी १ लाख ५४ हजार ४९० रुपयांचा विदेशी दारूसाठा पकडला.

    चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने पकडला देशी दारूचा साठा

    २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंती निमित्त ड्राय डे असतो, त्यानंतरसुद्धा छुप्या पद्धतीने दारू विक्री केल्या जाते, चंद्रपूर शहरातील एकोरी वार्डात छुप्या पद्धतीने दारू विक्री होत असल्याची गोपनीय माहिती शहर पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय कोलटें यांना मिळाली.

    घरून सुरु होती दारूविक्री

    माहितीच्या आधारे शहर पोलिसांनी एकोरी वॉर्डातील ५६ वर्षीय सुनीलकुमार राजकुमार मुल्ले यांच्या राहत्या घरी धाड मारली असता त्याठिकाणी विदेशी दारूचा १ लाख ५४ हजार ४९० रुपयांचा दारूसाठा जप्त करण्यात आला. शहर पोलिसांनी आरोपी मुल्ले ला अटक करीत महाराष्ट्र दारी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला.

    सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनात शार पोलीस निरीक्षक निशिकांत रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि राजेंद्र सोनवणे, पोउपनि कोलटें, निकोडे, पोलीस कर्मचारी लक्ष्मण रामटेके, संजय धोटे, सचिन बोरकर. निकेश ढेंगे, जावेद सिद्दीकी, भावना रामटेके, कपूरचंद खरवार, रुपेश पराते, प्रफुल भैसारे, योगेश पिदूरकर, निलेश ढोक, विक्रम मेश्राम, दीपिका झिंगरे व सारिका गौरकार यांनी केली.

  • Chandrapur Ravan Dahan Cancelled । परंपरेला ब्रेक! विजयादशमीला रावण दहन न झाल्याने नागरिक हताश; कारण जाणून तुम्हीही म्हणाल ‘योग्य निर्णय’

    Chandrapur Ravan Dahan Cancelled

    Chandrapur Ravan Dahan Cancelled : चंद्रपूर – चंद्रपुरात मागील अनेक वर्षांपासून सतत रावण दहनाचा कार्यक्रम महाकाली मंदिर परिसरात केल्या जातो मात्र यंदा रावण दहन कार्यक्रम झाला नाही, नागरिक विजयादशमी २ ऑक्टोबर रोजी महाकाली मंदिर परिसरात मोठ्या संख्येत पोहोचले मात्र त्यांच्या हाती केवळ निराशा आली.

    अवघ्या ४ तासात आरोपी अटक, वाहनचालक मास्टरमाइंड

    रावण दहनाचा कार्यक्रम का रद्द झाला? महाकाली महोत्सवाच्या पेंडाल मुळे तर कार्यक्रम रद्द झाला नाही ना? अशी चर्चा कार्यक्रम बघायला आलेल्या हताश नागरिक करीत होते. समाज माध्यमांवर कार्यक्रम का खंडित झाला अश्या विविध चर्चा रंगल्या होत्या. नागरिकांना आधी वाटलं कि महाकाली महोत्सवाच्या पंडाल मुळे कार्यक्रम रद्द झाला असेल पण तस काहीच झालेलं नव्हतं.

    अतिवृष्टी मुळे कार्यक्रम रद्द

    याच उत्तर सार्वजनिक दसरा महोत्सव मंडळाने २ ऑक्टोबर रोजीच दिले, सध्या राज्यात सर्वत्र पावसामुळे हाहाकार माजला आहे. अनेकी जिल्ह्यात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाल्याने लाखो नागरिकांचे जीवन विस्कळीत झाले आहे. या पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला. त्यामुळे राज्यातील अतिवृष्टी बघता महाकाली मैदानात साजरा होणार दसरा महोत्सव आयोजकांनी रद्द केला. याबाबत शहरात त्यांनी बॅनर लावलेले होते.

    flood relief

    सण उत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात नागरिक साजरे करतात, मात्र त्या पूरग्रस्त नागरिक व शेतकरी व नागरिकांच्या पाठीशी उभे राहत आपण यंदा महोत्सव साजरा करायचा नाही असा विचार मनात आणत दसरा महोत्सव मंडळाने घेतलेला निर्णय कौतुकास्पद आहे. रावण दहन बघण्यासाठी आलेले नागरिक हताश झाले होते मात्र आयोजक मंडळाच्या निर्णय कळल्यावर त्यांनी त्यांचे कौतुक केले.

  • Prajakta Mali speech on Sudhir Mungantiwar | चंद्रपूरच्या विकास कामांची प्राजक्ता माळीने घेतली दखल, मुनगंटीवारांचा गौरव

    Prajakta Mali speech on Sudhir Mungantiwar

    Prajakta Mali speech on Sudhir Mungantiwar : मुल २ ऑक्टोबर २०२५ -‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून प्राजक्ता माळी तुमच्या चेहऱ्यावर जे हास्य आणतात, तेच हास्य मॉं दुर्गादेवी आणि माता महाकालींनी तुमच्या चेहऱ्यावर सदैव ठेवावे. नवरात्रोत्सव चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्यासाठी आहेच, पण कृती अशी करा की माझ्या आणि तुमच्यामुळे वंचित आणि गरीबांच्या चेहऱ्यावरही हास्य उमटले पाहिजे. गरिबांच्या चेहऱ्यावरील आनंद हेच माझ्या कामाचे समाधान आहे, अश्या भावना राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केल्या.

    धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाचा जिल्हाधिकारी गौडा यांनी घेतला आढावा

    मुल येथे आयोजित ‘भाऊंचा गरबा’ महोत्सवात ते बोलत होते. यावेळी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’फेम सुप्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. या कार्यक्रमाला भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्याताई गुरनुले, महाराष्ट्र निसर्ग पर्यटन विकास मंडळ सदस्य प्रकाश धारणे, रत्नमाला भोयर,नंदू रणदिवे, प्रभाकर भोयर, हरीश ढवस, चंद्रकांत आष्टणकर, अखिल गांगररेड्डीवार, अमोल चुदरी,प्रशांत बोबाटे, सूरज मांदाडे, रुपेश निकोडे, राकेश ठाकरे,विद्या बोबाटे,भावना चौखुंडे भाजपा मुल शहर व ग्रामीणचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. Prajakta Mali Bhaucha Garba Chandrapur

    आ. मुनगंटीवार यांनी कार्तिकी प्रभाकर भोयर आणि जान्हवी नंदू रणदिवे या दोघींनी अतिशय नियोजनबद्ध महोत्सवाचे आयोजन केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले.

    आ. श्री. मुनगंटीवार म्हणाले, ‘सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि नृत्यांगना हेमा मालिनी एकदा येथे आल्या होत्या. तेव्हा त्यांनी मुल शहराचे भरभरून कौतुक केले. येथील लोक खूप चांगले आहेत, असे त्या म्हणाल्या. माझ्याही मतदारसंघात असंच काम करायचं आहे, त्यासाठी तुम्हाला तेथे यावं लागेल आणि तुम्ही या, असे म्हणत त्यांनी या शहराचं महत्त्व विषद केलं होते.’

    चंद्रपुरातील लोक हे सोन्यासारखे आहे

    ‘जेव्हा भारत आणि चीनचं युद्ध सुरू झालं, तेव्हा स्व. यशवंतराव चव्हाण हिमालयाच्या मदतीला धावून गेले. तेव्हा याच मुलचे कर्मवीर स्व. मा. सा. कन्नमवार सह्याद्रीच्या मदतीला धावून गेले. ते मुख्यमंत्री झाले. तेव्हा भारत- चीनच्या युद्धासाठी शस्त्र घ्यायची आहेत आणि त्यासाठी पंडित नेहरूंनी सुवर्णदान करा असे आवाहन केले. तेव्हा देशात सर्वात जास्त सोनं दान करणारा जिल्हा चंद्रपूर होता. येथे केवळ सोनं दान करणारी लोक नाहीत, तर सोन्यासारखी लोक आहेत,’ असे म्हणत आमदार मुनगंटीवार यांनी गौरव केला. Sudhir Mungantiwar achievements

    prajakta mali bhaucha garba chandrapur

    ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’फेम सुप्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी आपल्या भाषणात आ. मुनगंटीवार यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले. त्या म्हणाल्या, राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केवळ चंद्रपूर जिल्ह्यासाठीत नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी भरपूर काम केले आहे. संपूर्ण देशाला हेवा वाटावा, असं बॉटनिकल गार्डन येथे आहे. वन खात्यासाठी, ताडोबासाठी त्यांनी केलेलं काम सगळ्यांना माहिती आहेच. टाटा कॅन्सर हॉस्पिटल, मेडिकल कॉलेज, आर्थिक, आरोग्य, सांस्कृतिक, वने सगळ्या क्षेत्रांमध्ये त्यांनी भरीव कार्य केले आहे. महिला सक्षमीकरणासाठी त्यांनी केलेले कार्य कौतुकास्पद आहे. Chandrapur political news 2025

    आ.सुधीर मुनगंटीवार यांना विकासपुरुष का म्हटलं जातं?

    त्या पुढे म्हणाल्या, ‘आ.सुधीर मुनगंटीवार यांना विकासपुरुष का म्हटलं जातं याची प्रचिती चंद्रपूर जिल्ह्यातील विकास बघून येते. त्यांनी केलेल्या विकास कामांमुळे मी प्रेरीत झाले आहे. मुल शहरात येत असताना चौपदरी सिमेंटचे रस्ते बघितले. या शहरात सुंदर, सुसज्ज नाट्यगृह, क्रीडा संकुल, जलतरण तलाव, सिंचन सुविधा आहे. आ. सुधीर मुनगंटीवार यांनी सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.’ Prajakta Mali speech on Sudhir Mungantiwar

    आमदार श्री. मुनगंटीवार यांच्यासोबत माझी पहिली भेट नागपुरात झाली होती. त्यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि माॅं जिजाऊंवर भाषण दिले होते. ते भाषण ऐकून मी थक्क झाले. कारण इतिहासाचा इतका दांडगा अभ्यास असलेला नेता मी पहिल्यांदा पाहिला. त्यांनी फक्त भाषणच दिले नाही, तर आपल्या कृतीतून या आदर्शांवर प्रत्येक पाऊल टाकत छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं त्यांनी लंडनहून मातृभूमीत परत आणून दाखवली. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आध्यात्मिक आणि देशप्रेम ओतप्रोत भरून असलेलं एकत्रित रसायन म्हणजे आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार आहेत.आमदार मुनगंटीवार या जिल्ह्याचे नेतृत्व करतात आणि मी येथे राहात नाही, याचे दुःख आहे. तुम्ही लोक भाग्यवान आहात. मला तुमचा हेवा वाटतो, असेही प्राजक्ता माळी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

  • Swachh Bharat mission Tadoba forest । ताडोबा व्याघ्र प्रकल्पात स्वच्छतेचा अनोखा संदेश; पर्यटक व ग्रामस्थांचा सहभाग

    Swachh Bharat mission Tadoba forest

    Swachh Bharat mission Tadoba forest : चंद्रपूर 2 ऑक्टोबर 2025: ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या सर्व वनपरिक्षेत्र कार्यालयांमध्ये आज राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त ताडोबा व भोवतालच्या परिसरात विशेष स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेत वनविभागाचे अधिकारी, वनरक्षक व इतर कर्मचारी, जिप्सी चालक, मार्गदर्शक, ईडीसी सदस्य व स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. Tadoba Gandhi Jayanti celebration 2025

    ४ तासात आरोपीला अटक, मास्टरमाइंड वाहनचालक

    शाळेतील विद्यार्थ्यांची प्रभातफेरी

    महात्मा गांधी यांच्या साधेपणा व सेवाभाव या मूल्यांची जोपासना करत मोहर्ली, कोळसा, खडसंगी, शिवणी, कारवा, चोडमपल्ली यांसह विविध कार्यालयांचा परिसर स्वच्छ करण्यात आला. तसेच आगरझरी फुलपाखरु उद्यान, जुनोना, नवेगाव, अलिझंजा, सिरकाडा, पांगडी, झरी या निसर्ग पर्यटन प्रवेशद्वारांच्या परिसरातील कचराही गोळा करण्यात आला. मोहर्ली, शिवणी, नलेश्वर, चकबामणी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची प्रभातफेरी काढून स्वच्छतेचे महत्व विषद करण्यात आले.

    tadoba gandhi jayanti


    याशिवाय मुधोली, शिवणी व अन्यत्र मानव-वन्यजीव संघर्षाबाबत स्थानिक ग्रामस्थांमध्ये जनजागृती करण्यात आली. आगरझरी येथे श्रमदानातून वनराई बंधारा बांधण्यात आला. निमढेला येथे जिप्सी चालक, मालक व मार्गदर्शक यांच्या श्रमदानातून पर्यटन रस्ता दुरुस्त करण्यात आला. कळमगाव, तुकूम, मोहाळी येथे ग्रामस्थांना धूरविरहित चुलींचे वाटप करण्यात आले. या उपक्रमांमधून वन्यजीव संवर्धन, स्वच्छता आणि शाश्वततेसाठी सामूहिक जबाबदारीचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

  • Chandrapur LCB liquor raid । चंद्रपूर LCB ची कारवाई; ₹6.82 लाखांचा अवैध दारूचा साठा जप्त

    Chandrapur LCB liquor raid

    Chandrapur LCB liquor raid : चंद्रपूर: चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) अवैध देशी दारूची वाहतूक आणि विक्री करणाऱ्या इसमांविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी 38 पेट्या देशी दारू आणि एक टाटा सुमो वाहन असा एकूण ₹6,82,000/- किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

    ४ तासात आरोपी ताब्यात, वाहनचालकाने रचला जबरी चोरीचा कट

    मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 02/10/2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरचे अधिकारी व कर्मचारी पोलीस ठाणे कोरपना हद्दीत गस्त घालत असताना, त्यांना एका टाटा सुमो वाहनातून अवैधरीत्या देशी दारू विक्रीसाठी नेली जात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. LCB Chandrapur operation news

    या माहितीच्या आधारे पोलिसांनी माथा फाटा, कोरपना रोड येथे सापळा रचला आणि संबंधित टाटा सुमो वाहन (क्र. MH 14 CG 6143) ताब्यात घेतले. वाहनाची तपासणी केली असता, त्यामध्ये देशी दारूच्या 90 एम.एल.च्या 38 पेट्या (एकूण 38,000 नीप) आढळून आल्या. या दारूची अंदाजे किंमत ₹1,52,000/- आहे. यासह, दारू वाहतुकीसाठी वापरलेले अंदाजे ₹5,30,000/- किमतीचे टाटा सुमो वाहनही जप्त करण्यात आले. Chandrapur crime news liquor

    आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

    या प्रकरणी खालील चार आरोपींविरुद्ध पोलीस ठाणे कोरपना येथे गुन्हा क्रमांक 240/2025 कलम 65(अ)(ई), 83 महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे:

    1. प्रफुल पुरुषोत्तम खेलुरकर, वय 25 वर्ष, रा. आंतरगाव, ता. कोरपना
    2. प्रशांत नारायण मेश्राम, वय 25 वर्ष, रा. वानसडी
    3. अमर व्हेट्टी, रा. कुराई, ता. वणी, जि. चंद्रपूर
    4. आरिफ शेख, रा. कुराई, ता. वणी, जि. चंद्रपूर

    कारवाईत सहभागी पथक

    ही यशस्वी कारवाई राजुरा व गडचांदूर उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि दीपक कांक्रेडवार, सपोनि बलराम झाडोकर, पो.हवा. स्वामीदास चालेकर, पो.हवा. किशोर वैरागडे, पो.शी. गोपीनाथ नरोटे, पो.शी. शेखर माथनकर, आणि चालक पो.शी. ऋषभ बाराशिंगे यांनी पार पाडली.

    जप्त केलेल्या मुद्देमालासह आरोपींना पुढील तपासासाठी पोलीस ठाणे कोरपना यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलीस ठाणे कोरपना या गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहे.

  • Swachhata Hi Seva 2025 Gandhi Jayanti । चंद्रपूर: स्वच्छता ही सेवा 2025 अभियानाचा गांधी जयंतीनिमित्त समारोप

    Swachhata Hi Seva 2025 Gandhi Jayanti

    Swachhata Hi Seva 2025 Gandhi Jayanti : चंद्रपूर, 2 ऑक्टोबर – शासन निर्देशानुसार 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात आलेल्या ‘स्वच्छता ही सेवा 2025’ या अभियानाचा समारोप चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे 2 ऑक्टोबर रोजी विविध कार्यक्रमांनी करण्यात आला.

    6 शस्त्रक्रिया आणि ती म्हणते धन्यवाद सुधीरभाऊ

    देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनी 17 सप्टेंबर रोजी सुरुवात होऊन, महात्मा गांधी यांच्या जयंती दिनी 2 ऑक्टोबर रोजी पूर्ण झालेल्या या अभियानात नागरिकांच्या सहभागातून विविध उपक्रम घेण्यात आले. “स्वच्छोत्सव” या थीमनुसार सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, कचरा झेंडींचे रूपांतरण, सफाईमित्र सुरक्षा शिबिरे, स्वच्छ-हरित उत्सव तसेच जनजागृती उपक्रम राबविण्यात आले. Chandrapur municipal corporation Swachhata campaign

    स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सत्कार

    कार्यक्रमाची सुरुवात अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून झाली. त्यानंतर जटपुरा गेट भागात मनपा शाळेतील विद्यार्थी तसेच चंद्रपूर बचाओ संघर्ष समितीच्या सदस्यांनी स्वच्छतेवर आधारित पथनाट्य सादर केले. यावेळी जटपुरा गेट ते गांधी चौक परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. त्यानंतर मनपा कार्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून जयंती साजरी करण्यात आली. या प्रसंगी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सत्कारही करण्यात आला.

    chandrapur cmc

    सदर कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपायुक्त मंगेश खवले, उपायुक्त संदीप चिद्रवार, शहर अभियंता रवींद्र हजारे, सहायक आयुक्त शुभांगी सूर्यवंशी, सहायक आयुक्त अनिलकुमार घुले, सहायक आयुक्त संतोष गर्गेलवार, मुख्य लेखापरीक्षक मनोज गोस्वामी, नगरसचिव नरेंद्र बोबाटे, समाज विकास अधिकारी सचिन माकोडे, डॉ. अमोल शेळके, मनीषा नैताम तसेच मनपा अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • Chandrapur Dhammachakra Pravartan Din 2025 । भोजनदान तसेच इतर कोणत्याही प्रकारचे स्टॉल रस्त्यावर नको; धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाच्या पूर्वतयारीचा आढावा

    Chandrapur Dhammachakra Pravartan Din 2025

    Chandrapur Dhammachakra Pravartan Din 2025 : चंद्रपूर २ ऑक्टोबर २०२५ –  दिनांक 15 आणि 16 ऑक्टोबर रोजी चंद्रपूर येथील दीक्षाभुमी वर साज-या होणा-या धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाच्या पूर्वतयारीचा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी आज (दि. 1) आढावा घेतला.

    जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या बैठकीला अतिरिक्त जिल्हा पोलिस अधिक्षक ईश्वर कातकाडे, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, तहसीलदार विजय पवार, महानगर पालिकेच्या प्र. आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, उपविभागीय पोलिस अधिकारी सुधाकर यादव, वाहतूक पोलिस निरीक्षक प्रवीणकुमार पाटील, महावितरणचे कार्यकारी अभियंता सुहास पडोळे, यांच्यासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरीअल सोसायटीचे अध्यक्ष अरुण घोटेकर, उपाध्यक्ष अशोक घोटेकर आदी उपस्थित होते. Dikshabhumi festival Chandrapur preparations

    नागपूर-चंद्रपूर चार पदरी सिमेंट महामार्गाला हिरवा कंदील

    यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, चंद्रपूर शहरात होणा-या धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाच्या दोन दिवसीय कार्यक्रमासाठी तीन बाबी अतिशय महत्वाच्या आहेत. यात गर्दीचे योग्य नियंत्रण, स्टॉल व्यवस्था आणि वाहतूक व्यवस्था. गर्दी नियंत्रणासाठी योग्य नियोजन करावे. तसेच भोजनदान व इतर कोणतेही स्टॉल हे चांदा क्लब ग्राऊंडच्या आतमध्ये लावण्यात यावे. गाड्या तसेच बसेसची पार्किंग व्यवस्था, शहरातील पुतळ्याची स्वच्छता, दीक्षाभुमी परिसराची स्वच्छता, पाणी पुरवठा, मोबाईल टॉयलेट, वीज पुरवठा आदी कामे संबंधित विभागांनी गांभिर्याने पूर्ण करावीत. Vinay Gauda collector festival review

    कार्यक्रमादरम्यान या परिसरातील वीज पुरवठा खंडीत होऊ नये,  तसेच रस्त्यावर किंवा झाडांवर लटकणा-या विद्युत तारांची त्वरीत तपासणी करावी. बाहेर गावावरून येणा-या बसेसच्या पार्किंगची ठिकाणे आत्ताच निश्चित करावी. रोडनिहाय पार्किंग प्लान तयार करून त्यानुसार कार्यवाही करावी. पार्किंगस्थळ दर्शविणारे फलक लावावे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशासह निघणा-या रॅलीदरम्यान चोख बंदोबस्त ठेवावा. महानगर पालिकेने दीक्षाभुमी परिसरातील आजुबाजुच्या रस्त्यांची दुरुस्ती तसेच साफसफाईची कामे करावी. मोबाईल टॉयलेट, हायमास्ट लाईट, कार्यक्रमाच्या ठिकाणी अग्निशमन गाड्या उपलब्ध करून द्याव्यात.

    रस्त्यावर स्टॉल नको

    : धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त विविध सामाजिक संघटनांकडून भोजनदानाचे तसेच इतर स्टॉल लावण्यात येतात. सदर स्टॉल रस्त्यावर न लावता चांदा क्लब ग्राऊंडच्या आतमध्ये लावावेत, याची सर्व सामाजिक संघटनांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

    प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन

     : धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त, सर्व यंत्रणांनी योग्य समन्वय ठेवून आपापली जबाबदरी पार पाडावी. येणा-या नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यावी. सामाजिक संघटना, नागरिकांनी जिल्हा प्रशासनाला योग्य सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले. 

  • Rajura police quick action robbery । ४ तासात पोलिसांनी केली आरोपीना अटक, वाहनचालक निघाला मास्टरमाइंड

    Rajura police quick action robbery

    Rajura police quick action robbery : राजुरा २ ऑक्टोबर २०२५ – मार्केटिंगची रोख रक्कम घेऊन राजुरा हायवे रोडने येत असताना अनोळखी ३ व्यक्तींनी लोखंडी रॉड चा धाक दाखवीत तब्बल ९३ हजारांची रक्कम पळविली, याबाबत राजुरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविली असता पोलिसांनी अवघ्या ४ तासात आरोपीना अटक केली.

    घरफोडीच्या आरोपीला अटक, साथीदार फरार

    २४ सप्टेंबर रोजी ५५ वर्षीय हंसराज किसनराव दिघाडे राहणार तुकूम चंद्रपूर हे गडचांदूर वरून मार्केटिंगची रोख रक्कम घेऊन चारचाकी वाहनाने आपल्या चालकासोबत येत असताना राजुरा हायवे रोडवर अनोळखी ३ व्यक्तींनी वाहन थांबवित लोखंडी रॉड चा धाक दिघाडे यांना दाखवीत त्यांच्याजवळील रोख रक्कम जबरीने पळविली.

    वाहनचालक निघाला मास्टरमाइंड

    याबाबत दिघाडे यांनी राजुरा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद नोंदविली, पोलिसांनी गुन्हा दाखल करताच तपास सुरु केला असता आधी वाहन चालकाची विचारपूस केली असता त्याने आपल्या साथीदारांसह कट रचत हा गुन्हा केला असल्याचे कबूल केले. पोलिसांनी या प्रकरणात २३ वर्षीय सौरभ देविदास निलेवार, २५ वर्षीय जाकीर सादिक शेख, २४ वर्षीय अरबाज जाकीर शेख व २६ वर्षीय मुजाहिद आव्हाद शेख सर्व राहणार चंद्रपूर यांना अटक केली. Road robbery case police update

    आरोपीकडून पोलिसांनी चोरी केलेल्या रोख रकमेपैकी ४२ हजार ३०० रुपये सह गुन्ह्यात वापरलेली दुचाकी किंमत ७० हजार असा एकूण १ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून पुढील तपास राजुरा पोलीस करीत आहे.

    सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सुमित परतेकी यांच्या नेतृत्वात सपोनि हेमंत पवार, पोउपनि दीपक ठाकरे, पोलीस कर्मचारी किशोर तुमराम, विक्की निर्वाण, रामेश्वर चहारे, महेश बोलगोडवार, शफिक शेख, आनंद मोरे, बालाजी यामजवार, शरद राठोड व राजू दुबे यांनी केली.