Blog

  • crime news Maharashtra house robbery । रामनगर पोलीस हद्दीत घरफोडी; एक आरोपी अटकेत, साथीदार फरार

    crime news Maharashtra house robbery

    crime news Maharashtra house robbery : (२ ऑक्टोबर २०२५) – चंद्रपूर: स्थानिक गुन्हे शाखेने (Local Crime Branch) रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत झालेल्या एका घरफोडी आणि चोरीच्या गुन्ह्यातील एका आरोपीला अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीस गेलेल्या सुमारे दीड लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या अंगठ्या जप्त करण्यात आल्या आहेत.

    ३१३ किलोग्रॅम अंमली पदार्थाचा साठा नष्ट

    कारवाईचा तपशील

    गुन्हा नोंद: रामनगर पोलीस ठाण्यात अप क्र. ७६५/२०२५, कलम ३०५(अ), ३३१(३), ३३४(४) भारतीय न्याय संहिता २०२३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Gold rings worth 1.5 lakh recovered burglary

    अटक आरोपी:

    कामरान कदीर शेख, वय २४, रा. रहमतनगर वॉर्ड, चंद्रपूर

    फरार आरोपी:

    नमीर नजीर शेख, वय २३, रा. रहमतनगर वॉर्ड, चंद्रपूर (फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.)

    जप्त माल:

    ५ नग सोन्याच्या अंगठ्या, अंदाजे वजन १५ ग्रॅम.

    किंमत: रु. १,५०,०००/-

    कसे पकडले?

    स्थानिक गुन्हे शाखेचे पथक प्रोव्हिजन जुगार आणि गुन्ह्यातील पाहिजे आरोपींच्या शोधार्थ चंद्रपूर शहर परिसरात गस्त घालत असताना, त्यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली. कामरान शेख नावाचा एक संशयित इसम सराफा बाजार, चंद्रपूर येथे सोन्याचे दागिने विकण्याच्या प्रयत्नात फिरत असल्याची ही माहिती होती.

    पथकाने तत्काळ त्या इसमाला ताब्यात घेऊन विचारपूस केली. चौकशीदरम्यान, आरोपी कामरान शेख याने आपला साथीदार नमिर नजीर शेख याच्या मदतीने दिनांक १८/०९/२०२५ रोजी एका बंद घराचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. आरोपीच्या कबुलीवरून पंचांसमक्ष चोरीस गेलेला १,५०,०००/- रुपये किमतीचा सोन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

    अटक आरोपी आणि जप्त करण्यात आलेला माल पुढील कायदेशीर कारवाईसाठी रामनगर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आला आहे. सदरची यशस्वी कारवाई चंद्रपूर उपविभागाच्या कारवाई पथकाने केली. पोलीस आता या गुन्ह्यातील फरार आरोपी नमिर शेख याचा कसून शोध घेत आहेत.

  • Nagpur Chandrapur highway project । नागपूर–चंद्रपूर 204 किमी चार पदरी सिमेंट महामार्गाला हिरवा कंदील; फडणवीसांची घोषणा

    Nagpur Chandrapur highway project

    Nagpur Chandrapur highway project : मुंबई / चंद्रपूर, दि. 0२ : नागपूर ते चंद्रपूर या 204 किलोमीटर लांबी असलेल्या चार पदरी सिमेंट काँक्रीट महामार्गाला आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी झालेल्या मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. तसेच चंद्रपूर ते मुल दरम्यान महामार्ग निर्मितीचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिल्या. 

    राहुल गांधी यांना गोळ्या घाला, कांग्रेस आक्रमक

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भविष्यामध्ये कुठलाही रस्ता बांधताना रस्त्याच्या परिसरात विकासाची ‘ इकोसिस्टीम’ (परिसंस्था) निर्माण करण्यात यावी. त्यासाठी आधीपासूनच भूसंपादन करून नियोजन करण्याचे निर्देशही दिले. नागपूर ते चंद्रपूर महामार्ग नवेगाव मोरेपर्यंत करण्यात येत असल्याने पुढे सुरजागड लोह प्रकल्पापर्यंत या महामार्गाची लांबी वाढवण्यात यावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, मुख्य सचिव राजेश कुमार उपस्थित होते. Chandrapur Mul new highway proposal

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, विकासाचे प्रकल्प पूर्ण करताना कालमर्यादेचे बंधन असावे. प्रकल्प रेंगाळला किंवा विलंब झाल्यास किंमत वाढीमुळे  विनाकारण राज्यावर आर्थिक भुर्दंड बसत असतो. सध्या राज्यात १० लाख कोटींच्या पायाभूत सोयी – सुविधा प्रकल्पांची कामे सुरू आहेत. या कामांच्या प्रगतीची गती कुठेही कमी पडू देऊ नये. ही कामे पूर्ण झाल्यानंतर अर्थव्यवस्थेला गती मिळणार आहे. त्यामुळे ही सर्व कामे नियोजनबद्ध विहित कालमर्यादेत पूर्ण करावी.

    राज्यामध्ये यापुढे पायाभूत सुविधांची कामे घेताना ती आधी गतिशक्ती पोर्टलवर आणावी. गतिशक्ती पोर्टलवर घेतल्याशिवाय प्रकल्पाचे काम सुरू करू नये. यासाठी शासन निर्णय निर्गमित करण्याचे निर्देश देत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, सिंचन प्रकल्पांची कामे घेतानाही भविष्यात येणाऱ्या अडचणी बघून सुरुवातीपासूनच नियोजन करावे. या प्रकल्पांचे भूसंपादन आधीच करून नंतर कामाला सुरुवात करावी.

    महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने प्रकल्पांच्या सहज क्रियान्वयनकरिता आपला विस्तार करीत वेगवेगळे विभाग निर्माण करावे. पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांना गती मिळण्यासाठी बाह्य स्त्रोतांद्वारे संबंधित क्षेत्रातील तज्ञ मनुष्यबळ घ्यावे. पायाभूत सोयी सुविधा प्रकल्पांना दिलेल्या आयडीमुळे देयकातील अनियमिततेवर निर्बंध येतील, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. CM Devendra Fadnavis infrastructure projects

    सार्वजनिक बांधकाम आणि पाणीपुरवठा विभागाने जुनी देयके अदा करण्यासाठी दायित्वानुसार कालबद्ध कार्यक्रम राबवावा. विभागांनी  झालेल्या कामांचीच देयके अदा होतील,  यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने व्यवस्था उभारावी. देयकांच्या तपासणीसाठी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने यंत्रणा विकसित करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

    निधी उभारणीचे नवीन मॉडेल विकसित करा

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, समृद्धी महामार्गावर स्वच्छतागृहांची व्यवस्था करावी. या महामार्गावर 16 ठिकाणी व्यवस्था उभारण्यात येत आहे.  तसेच पेट्रोल पंप, फूड मॉलची सुविधा असावी.  स्वच्छतागृहांच्या ठिकाणी पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्यात यावा. यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने सल्लागार नियुक्त करावा. महामार्गावर 16 पैकी किमान चार ठिकाणी तरी एमएसआरडीसीने पर्यटनाच्या दृष्टीने केंद्र निर्माण करावी. राज्यात पायाभूत सोयी सुविधांच्या प्रकल्पांकरिता निधी उभारण्यासाठी इच्छुक असलेल्या  गुंतवणूकदारांच्या निधीतून भूसंपादनासह विकास प्रक्रिया राबवावी. पुढील विकासात त्यांचा सहभाग घेऊन निश्चित मोबदला त्यांना मिळण्याची व्यवस्था करावी. निधी उभारणीचे नवीन मॉडेल विकसित करावे.

    बैठकीस अपर मुख्य सचिव (सार्वजनिक बांधकाम) मनीषा म्हैसकर, अपर मुख्य सचिव (वित्त) ओ. पी गुप्ता, प्रधान सचिव (नियोजन) सौरभ विजय, प्रधान सचिव (विधी व न्याय) सुवर्णा केवले, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड आदी उपस्थित होते. Nagpur Chandrapur highway project

    पूर्व विदर्भातील पायाभूत रस्ते प्रकल्पांविषयी  :

    1) नागपूर ते चंद्रपूर चार पदरी सिमेंट काँक्रिटीकरण  महामार्ग, लांबी २०४ किलोमीटर, चंद्रपूर शहराला जोड रस्ता ११ किलोमीटर, भूसंपादनासह एकूण खर्च २३५३.३९ कोटी. Nagpur Chandrapur 204 km cement road

    2) नागपूर ते गोंदिया १६२ किलोमीटर लांबीचा चार पदरी द्रुतगती महामार्ग, भूसंपादन संयुक्त मोजणी आणि परवानग्या घेण्याची प्रक्रिया सुरू. अंदाजित किंमत १८,५३९ कोटी.

    3) भंडारा ते गडचिरोली चार पदरी द्रुतगती महामार्ग, लांबी ९४ किलोमीटर, अंदाजित एक रक्कम दहा हजार २९८ कोटी.भूसंपादन संयुक्त मोजणी आणि परवानग्या घेण्याची प्रक्रिया सुरू.

  • Kerala BJP leader Pintu Mahadevan controversy । काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप उफाळला; भाजपा नेत्याच्या प्रतिमेला शेण फासून निषेध

    Kerala BJP leader Pintu Mahadevan controversy

    Kerala BJP leader Pintu Mahadevan controversy : घुग्घूस : केरळमधील भाजपाचे प्रवक्त्ता पिंटू महादेवन याने लाईव्ह टीव्हीवरील चर्चेदरम्यान काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी दिली. ‘राहुल गांधींच्या छातीत गोळी घालू’, असे विधान केरळ भाजपा नेते, प्रवक्ते पिंटू महादेवन यांनी टीव्हीवरील चर्चेत केले आहे. BJP spokesperson threatens Rahul Gandhi

    चंद्रपुरात पोलिसांची दादागिरी, आप युवा जिल्हाध्यक्षाची पकडली कॉलर

    कांग्रेस संतप्त

    संघ आणि भाजपा हे विषारी विचारांचे घृनीत राजकारण करीत असतात, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना देखील संघाच्या लोकांनी गोळ्या घातल्या होत्या. त्याच विचारांच्या लोकांनी राहुल गांधी यांना देखील गोळ्या घालण्याची धमकी दिल्याने घुग्घूस शहर काँग्रेस ही संतप्त झाली असून राहुल गांधींच्या आधी आमच्या छातीत गोळ्या घाला असे आवाहन काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यांनी दिला आहे.

    काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपा प्रवक्त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत त्यांच्या प्रतीमेला शेण फासले व जोड्या चप्पलने मारहाण करीत निषेध व्यक्त केला.

    घुग्गुस कांग्रेसच्या आंदोलनात काँग्रेस नेते सैय्यद अनवर,ज्येष्ठ नेते शामराव बोबडे, जिल्हा महासचिव अलीम शेख, शेख शमिउद्दीन,सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष रोशन दंतलवार, जिल्हा सचिव अजय उपाध्ये,इंटक जिल्हा उपाध्यक्ष शहजाद शेख,जिल्हा महासचिव पदमा त्रिवेणी, जिल्हा सचिव दुर्गा पाटील, शहर कार्याध्यक्ष दिप्ती सोनटक्के,संध्या मंडल, जोया शेख,रोहित डाकूर,दिपक पेंदोर, सचिन नागपुरे, बालकिशन कुळसंगे,दिपक कांबळे,सुनील पाटील,दिपक पेंदोर, शहशाह शेख,निखिल पुनघंटी,अरविंद चहांदे, कपील गोगला,अनवर सिद्दीकी,अंकुश सपाटे, रंजित राखुंडे,
    व मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.

    चंद्रपुरात सुद्धा तक्रार

    चंद्रपूर NSUI जिल्हा उपाध्यक्ष पिंटू महादेवन विरोधात पोलीस अधीक्षकांकडे तक्रार देण्यात आली, महादेवन यांनी लाईव्ह डिबेट दरम्यान राहुल गांधी यांच्या छातीत गोळ्या घालू अशी उघडपणे धमकी दिली, देशात अराजकता माजणार असे वक्तव्य नेहमी भाजपकडून केल्या जाते अश्या हिंसक वृत्ती विरोधात कांग्रेस पक्षाने जिल्ह्यात विविध ठिकाणी तक्रारी दिल्या आहे.

  • Heart-touching story of girl । मानवी मूल्यांची जिवंत साक्ष: ११ वर्षांची वैष्णवी आणि तिच्या जीवनाचे रक्षक

    Heart-touching story of girl

    Heart-touching story of girl : चंद्रपूर – ‘मी आज तुमच्यामुळे जिवंत आहे… आपण सहकार्य केलं नसतं तर मी आज या जगात नसते’… हे शब्द आहेत ११ वर्षांच्या वैष्णवीचे. राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी तिच्या बालपणी अत्यंत क्लिष्ट अशी शस्त्रक्रिया आणि अवघड अश्या उपचारासाठी केलेली मदत वैष्णवीने लक्षात ठेवली. आणि आपल्या जीवनाचे रक्षण करणाऱ्या नेत्याला भेटल्यानंतर भावनांना वाट मोकळी करून दिली. हे शब्द ऐकताच आ. श्री. मुनगंटीवार देखील भारावून गेले. नवरात्र सुरू असताना देवीचे रूप असलेल्या कुमारिकेने आपल्याबद्दल या व्यक्त केलेल्या भावना त्यांच्या हृदयाला स्पर्श करून गेल्या. आणि वैष्णवीच्या डोक्यावर हात ठेवून त्यांनी यशस्वी आयुष्यासाठी आशीर्वाद दिलेत. Emotional meeting politician child

    बाबुपेठच्या अपघातावरून आप-पोलीस आमनेसामने

    चंद्रपूरच्या भिवापूर वॉर्डात राहणाऱ्या वैष्णवी कुमारस्वामी पोतलवारची कहाणी ही खऱ्या अर्थाने माणुसकीची आणि संवेदनशील नेतृत्वाची जिवंत साक्ष आहे. २०१४ मध्ये चंद्रपूरच्या सामान्य रुग्णालयात वैष्णवीचा जन्म झाला. पण जन्मत:च गंभीर शारीरिक अडचण घेऊन ती या जगात आली. तिच्या शरीरात शौचाचा मार्गच नव्हता. हा धक्का मध्यमवर्गीय पोतलवार कुटुंबासाठी फारच मोठा होता. जन्मानंतर काही तासांतच वैष्णवीची प्रकृती ढासळू लागली. तिचे पोट फुगत होते आणि आई-वडील असहाय झाले. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने उपचाराची मोठी चिंता समोर होती. Sensational Chandrapur news life story

    ५ शस्त्रक्रिया अयशस्वी सहाव्यांदा यश

    अशा वेळी मित्रांच्या सल्ल्याने वैष्णवीचे वडील कुमारस्वामी यांनी आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या जनसंपर्क कार्यालयाचा दरवाजा ठोठावला. सर्वसामान्यांच्या दु:खाशी एकरूप होणारे नेते म्हणून ओळखले जाणारे आमदार श्री. मुनगंटीवार यांनी तात्काळ मदतीचा हात पुढे केला. फारच क्लिष्ट अशा या आजारावर एक-दोन नाही तर तब्बल पाच वेळा शस्त्रक्रिया अयशस्वी झाल्या. कुटुंब खचले, पण आ. श्री. मुनगंटीवार यांनी ‘आता सहाव्या शस्त्रक्रियेत नक्की यश मिळेल’, असा विश्वास दिला. आणि नागपूरच्या गेटवेल हॉस्पिटलमध्ये उपचाराची व्यवस्था करून दिली. सहावी शस्त्रक्रिया यशस्वी झाली आणि वैष्णवीला नवे आयुष्य मिळाले.

    अखेर भाऊ ची भेट

    आज वैष्णवी अकरा वर्षांची आहे. आपली ही वेदनादायी कहाणी ती आई-वडिलांकडून ऐकत आली आहे. त्यामुळे तिला मनोमन इच्छा होती की, ज्या नेत्यामुळे आपण आज या जगात आहोत, त्यांना एकदा प्रत्यक्ष भेटावे. ही इच्छा 29 सप्टेंबर 2025 रोजी पूर्ण झाली. भिवापूर येथे झालेल्या बदकम्मा कार्यक्रमावेळी वैष्णवीची आमदार श्री. मुनगंटीवार यांच्याशी भेट झाली. Heart-touching story of girl

    वैष्णवीच्या डोळ्यात अश्रू होते आणि तिच्या ओठांवर शब्द होते… ‘मी आज तुमच्यामुळे जिवंत आहे. आपण मला सहकार्य केले नसते तर मी या जगात नसते. आपले मन:पूर्वक आभार.’ या भावनिक क्षणी आमदार मुनगंटीवार यांनीही तिच्या डोक्यावर हात ठेवला. ‘मी कायम तुझ्या सोबत आहे. शिक्षण घे, मोठी हो आणि आयुष्यात प्रगती कर,’ असा आशीर्वाद दिला. या भेटीनंतर पोतलवार कुटुंबाचा आनंद शब्दातीत होता. ‘आपल्या मुलीची जीवनयात्रा आज निरंतर आहे, हे फक्त आणि फक्त आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या संवेदनशीलतेमुळे’, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

    ही कहाणी एका मुलीच्या वेदनांची आहे. त्या वेदनांमधून तिला मिळालेल्या नव्या आयुष्याची आहे. आणि त्याचवेळी लोकांच्या वेदनांना जिव्हाळ्याने समजून घेणाऱ्या संवेदनशील नेतृत्वाची देखील आहे. आ. श्री. मुनगंटीवार यांनी केलेली मदत ही केवळ राजकीय प्रतिनिधित्वापुरता मर्यादित नसून, ती खऱ्या अर्थाने मानवी मूल्यांची जपणूक असल्याचे यातून अधोरेखित झाले.

  • Maharashtra narcotics disposal drive । चंद्रपूर पोलिसांची मोठी कारवाई! ३१३ किलो अंमली पदार्थांचा नाश

    Maharashtra narcotics disposal drive

    Maharashtra narcotics disposal drive : चंद्रपूर (१ ऑक्टोबर २०२५) – राज्य शासनातर्फे १६ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर पर्यंत अंमली पदार्थाचा नाश करण्याकरिता विशेष मोहीम राबविण्यात आली होती, सदर मोहिमेअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशन अंतर्गत एकूण १७ दाखल गुन्ह्यातील ३१३ किलो ९३६ ग्राम अंमली पदार्थ नष्ट करण्यात आले.

    बाबुपेठ अपघातावरून पोलीस आणि आप आमनेसामने

    ३०५ किलो गांजा सह ८ किलो डोडा

    न्यायालय चंद्रपूर व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांची परवानगी घेत, महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लिमिटेड बुटीबोरी नागपूर मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये दाखल १६ गुन्ह्यांमधील ३०५ किलो ८८६ ग्राम गांजा व १ गुन्ह्यातील ८ किलो ५० ग्राम डोडा पावडर असे एकूण १७ गुन्ह्यातील अंमली पदार्थ नष्ट करण्यात आले.

    सदर कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनात अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे, पोलीस कर्मचारी अरुण खारकर, प्रमोद डंभारे, सुधीर मत्ते, दीपक डोंगरे, प्रदीप मडावी, अमोल सावे, मिलिंद टेकाम यांच्या उपस्थितीमध्ये ३० सप्टेंबर रोजी अंमली पदार्थ नष्ट करण्यात आले.

  • Ramnagar police misconduct case । पोलिसांची दादागिरी?, पोलीस निरीक्षकांवर गंभीर आरोप, पोलीस म्हणतात; आमची कारवाई कायद्याच्या चौकटीत

    Ramnagar police misconduct case

    Ramnagar police misconduct case : चंद्रपूर (१ ऑक्टोबर २०२५) – मंगळवारी शहरातील बाबूपेठ परिसरातील साईबाबा मंदिर ते जुनोना चौक या अत्यंत गर्दीच्या परिसरात एका थार चालकाच्या बेजबाबदारपणामुळे एका 3५ वर्षीय व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला. या घटनेमुळे परिसरातील रहिवासी संतप्त झाले.

    बाबुपेठ मध्ये अपघात, युवकाचा मृत्यू, पोलिसांनी पकडले आप जिल्हाध्यक्षाचे कॉलर

    आप युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे यांनी रस्ता रोको करून विविध मागण्या मांडल्या. तेव्हा रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी अनादरपूर्ण कुडे यांचेशी वर्तन करत थोड्या अंतरापर्यंत ओढत नेले. परिणामी रहिवासी आणि आप पदाधिकायांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला. संबंधित पोलीस अधिकारी शेख यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी पत्रकार परिषदेद्वारे कुडे यांनी पुलिस प्रशासनाकडे केली आहे. road accident protest Chandrapur

    काही वर्षांपूर्वी याचं मार्गावर अपघात

    पत्रकार परिषदेत राजू कुडे यांनी सांगितले की, साईबाबा मंदिर ते जुनोना चौक या रस्त्यावर शालेय विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांची ये-जा असते. काही वर्षांपूर्वी याच रस्त्यावर एका वडिलांसोबत ७ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला होता. या घटनांनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकायांकडे रस्त्यावर स्पीड ब्रेकर बसवण्याची वारंवार मागणी करण्यात आली होती, परंतु प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे.

    १० लाख रुपयांची मदत द्या

    मंगळवारी दुपारी थार वाहन क्रमांक एमएच 34 सीजे 1455 चा चालक भाजपा युवा मोर्चा आघाडी चा उपाध्यक्ष यांच्या निष्काळजीपणाने वाहनाचा दरवाजा उघडल्याने दुचाकी चालक राकेश तेलंग यांचा तोल गेला आणि मागून येणाया बसच्या मागील चाकात येऊन त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उडाली. या घटनेची माहिती मिळताच आप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजू कुडे यांनी रस्त्यावर चक्का जाम आंदेालन करत स्पीड ब्रेकर बसवण्याची आणि मृताच्या कुटुंबाला १० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची मागणी केली.

    घटनास्थळी रामनगर पोलिस निरीक्षक आसिफ रझा शेख पहुचले व आंदोलकांचे म्हणणे न ऐकता दादागिरी दाखवत उध्दटपणे आपचे पदाधिकारी राजू कुडे यांची कॉलर धरून गैरवर्तन केले. रामनगर पोलिसांनी कुडे यांना ताब्यात घेतल्यानंतर भाजपा च्या पदाधिकायांचा थार वाहनचालकावर कारवाई न करण्यासाठी पोलिस अधिकायांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप कुडे यांनी केला. police officer harassment allegation

    घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन रामनगर पोलिसांनी रात्री उशिरा थार वाहनचालकावर गुन्हा दाखल केला. तथापि, सार्वजनिक न्यायासाठी लढणायांशी पोलिस अधिकायांचे अनादरपूर्ण वर्तन पाहून पत्रकार परिषदेत पोलिस प्रशासनाचा निषेध करण्यात आला. कुडे यांनी रामनगर पोलिस अधिकायांवर वाळू तस्करांना अटक करण्याऐवजी त्यांच्याशी सौम्य वर्तन केल्याचा आरोपही केला.

    पत्रकार परिषदेद्वारे कुडे यांनी रामनगर पोलिस अधिकारी शेख यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली. त्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष मयूर रायकवार, राजू कुडे, सुनील मुसळे आदी उपस्थित होते.

    पोलीस म्हणतात आम्ही कायद्याच्या चौकटीत…

    या संपूर्ण प्रकरणावर रामनगर पोलीस स्टेशनचे निरीक्षक आसिफ राजा शेख म्हणाले कि मृतकाचे कुटुंब व आप चे राजू कुडे यांनी जे आंदोलन सुरु ठेवले होते, त्यामुळे इतर वाहनधारकांना त्रासाचा सामना करावा लागला, आम्ही या प्रकरणी एसटी बस व थार वाहनचालकांवर गुन्हे दाखल केले आहे. आम्ही कायद्याच्या चौकटीत राहून परिसरातील शांतता भंग न व्हावी याकरिता कायदेशीर मार्गाचा वापर केला. राजू कुडे यांनी आमच्यावर केलेले आरोप पूर्णतः खोटे आहे.


  • Tadoba Safari Discount for Locals | ताडोबा सफारी फी वाढ रोखा! धानोरकरांचा इशारा – स्थानिकांसाठी स्वस्तात एन्ट्री हवीच

    Tadoba Safari Discount for Locals

    Tadoba Safari Discount for Locals : चंद्रपूर: तीन महिन्यांच्या पावसाळी विश्रांतीनंतर आजपासून (दि. १ ऑक्टोबर) ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे (TATR) गेट पर्यटकांसाठी उघडले. मात्र, याच वेळी ताडोबा प्रशासनाच्या जिप्सी सफारी शुल्कवाढीच्या निर्णयाविरोधात काँग्रेसने तीव्र आंदोलन छेडले. खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या नेतृत्वाखाली मोहरली गेटसह इतर पाच गेटवर हे जोरदार आंदोलन करण्यात आले, ज्यात काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.

    चंद्रपुरात भेसळयुक्त अन्नसाठा जप्त

    वनविभागाने अलीकडेच कोअर झोनमध्ये शनिवार आणि रविवारसाठी जिप्सी सफारीचे शुल्क वाढवून ते १२,८०० इतके केले आहे. याच दरवाढीविरोधात खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आक्रमक भूमिका घेतली. चंद्रपूर जिल्ह्याची ओळख असलेल्या ताडोबाचे दर्शन घेण्यासाठी येथीलच नागरिकांना इतके भरमसाट पैसे मोजावे लागणे अन्यायकारक आहे, असा युक्तिवाद आंदोलकांनी केला. जिल्ह्यात आधीच मानव-वन्यजीव संघर्ष मोठ्या प्रमाणात असताना, स्थानिकांकडून अधिक शुल्क आकारणे पूर्णपणे अयोग्य आहे. आंदोलनादरम्यान सर्व वाहनांची वाहतूक थांबवून प्रशासनावर त्वरित शुल्कवाढ मागे घेण्याचा दबाव आणण्यात आला. Tadoba Safari Price Hike

    एक दिवस सवलतीचा विचार केल्या जाणार

    यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी प्रशासनासमोर स्थानिकांसाठी ठोस मागणी मांडली. या महत्त्वपूर्ण मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक अनंत रेड्डी यांनी स्थानिकांना आता पाच हजार रुपये (सफारी शुल्कापोटी) आकारण्यात येईल, असे आश्वासन दिले. गाईड शुल्क वाढवण्यास आक्षेप नसून, जिल्ह्यातील सर्वसामान्यांना ताडोबा सफारी परवडेल, हीच आपली प्रमुख भूमिका असल्याचे खासदार प्रतिभा धानोरकर यांनी स्पष्ट केले. या चर्चेत प्रशासनाने स्थानिकांसाठी आठवड्यातून एक दिवस सवलतीचा विचार केला जाईल आणि हा मुद्दा समितीसमोर ठेवला जाईल, असेही आश्वासन दिले. त्याचबरोबर, स्थानिक ड्रायव्हरच्या इन्शुरन्सचा मुद्दा देखील सकारात्मक पद्धतीने स्वीकारण्यात आल्याचे सांगण्यात आले. Chandrapur MP Pratibha Dhanorkar

    तसेच प्रशासनाकडून ठोस आश्वासन मिळाल्यानंतर खासदार प्रतिभा धानोरकर यांनी तात्पुरते आंदोलन मागे घेत पर्यटकांचा ताडोबात जाण्याचा मार्ग मोकळा केला. मात्र, त्यांनी ताडोबा प्रशासनाला आठ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. “आम्ही आठ दिवस प्रशासनाच्या निर्णयाची वाट पाहू. जर उपसंचालकांनी दिलेले आश्वासन पूर्ण झाले नाही आणि योग्य तसेच जनहितार्थ निर्णय झाला नाही, तर पुढील काळात आणखी कठोर आंदोलन करून जिप्सी प्रवेश पूर्णपणे रोखू,” असा इशारा त्यांनी दिला आहे. खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या या दणक्यामुळे ताडोबा प्रशासनावर मोठा दबाव वाढला असून, आता ८ दिवसांत नेमका कोणता अंतिम निर्णय होतो, याकडे जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे.

  • Chandrapur sweets oil ghee adulteration । आता खायचं तरी काय? चंद्रपूर जिल्ह्यात रिफाईड सोयाबीन तेल, व्हाईट बर्फी, शेंगदाना, तुप व टोस्ट् सर्व भेसळ

    Chandrapur sweets oil ghee adulteration

    17 लक्ष 26 हजार किमतीचा साठा जप्त

    Chandrapur sweets oil ghee adulteration : चंद्रपूर – ३० सप्टेंबर २०२५ – अन्न व औषध प्रशासन, चंद्रपूर कार्यालयाने सणासुदीच्या कालावधीत भेसळयुक्त अन्नपदार्थांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तूप,  खाद्यतेल,  मिठाई,  भगर,  शेंगदाना, बेसन व इतर असे एकूण 52 अन्नपदार्थांचे नमुने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेला पाठविले. यात रिफाईड सोयाबीन तेल, व्हाईट बर्फी, शेंगदाना, तुप व टोस्ट् इत्यादी अन्नपदार्थाचा 14627 कि. ग्रॅ. वजनाचा किंमत 17 लाख 26 हजार 853 रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला.

    गोंडपिपरी मध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार

    यात 6 लाख 382 रुपये किमतीचे रिफाईंड सोयाबीन, 1 लाख 75 हजार 560 रुपयांची व्हाईट बर्फी, 49 हजार 840 रुपये किंमतीचे खुले रिफाईंड सोयाबीन तेल, 6 हजार 240 रुपये किंमतीचे तूप, 1 लाख 20 हजार रुपये किंमतीचे टोस्ट्, 6 लाख 74 हजार 600 रुपये किमतीचा शेंगदाना, 1 लाख 221 रुपये किंमतीचे बेसन इत्यादी अन्नपदार्थांचा साठा भेसळीच्या संशायावरून जप्त करण्यात आला आहे. सदर अन्नपदार्थाचे नमुने विश्लेषणाकरीता प्रयोगशाळेस पाठविण्यात आले आहेत. सदर अन्नपदार्थाचे विश्लेषण अहवाल प्राप्त होताच अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006, नियम व नियमन 2011 नुसार पुढील कारवाई घेण्यात येईल. Chandrapur festival food safety inspection

    कारवाई कुणावर?

    जीवाणी अँड कम्पनी ब्रम्हपुरी, श्रीहरी डेअरी प्रोडक्ट midc चंद्रपूर , चांदणी इंटरप्रयझेस चंद्रपूर, गुप्ताजी ट्रेडिंग कम्पनी चंद्रपूर, पायल किराणा स्टोर्स ब्रह्मपुरी, ज्ञानेश्वरी किराणा स्टोर्स , शर्मन फूड प्रोडक्ट चंद्रपूर

    अन्न व्यावसासिकांनी अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006, नियम व नियमन 2011 च्या अंतर्गत नियमांचे  पालन करूनच अन्न व्यवसाय करावा. तसेच ग्राहकांनी सुध्दा कोणत्याही प्रकारच्या अन्न पदार्थांची तक्रार असल्यास त्यांनी सहायक आयुक्त यांचे कार्यालय, अन्न व औषध प्रशासन, श्री. राजमलजी पुगलीया नगर, मुठाळ हॉस्पीटल जवळ, कोतपल्लीवार पेट्रोल पंपच्या मागे, नागपूर रोड, सिव्हील लाईन, चंद्रपूर येथे संपर्क साधावा,  असे तथा सहायक आयुक्त (अन्न) प्र. अ. उमप यांनी कळविले आहे.

  • Gondpipri minor sexual assault । गोंडपिपरीमध्ये धक्कादायक घटना, अल्पवयीन मुलीवर अत्याचार

    Gondpipri minor sexual assault

    Gondpipri minor sexual assault : गोंडपिपरी: प्रेमाचे नाटक करून एका अल्पवयीन शाळकरी तरुणीवर अत्याचार केल्याची आणि त्यानंतर तिचे अश्लील फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन वारंवार लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना गोंडपिपरी तालुक्यात उघडकीस आली आहे. पीडित तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी युगल राकेश मुंजनकर (वय १८) या युवकाविरुद्ध ‘POCSO’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

    न्याय मागणाऱ्या आप युवा जिल्हाध्यक्षाची पोलिसांनी पकडली कॉलर

    प्रेमाच्या जाळ्यात ओढून अत्याचार

    पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गोंडपिंपरी तालुक्यातील ही फिर्यादी अल्पवयीन तरुणी सन २०२४ मध्ये गोंडपिपरी येथील जनता विद्यालयात इयत्ता १० वीत शिक्षण घेत होती. शाळेला ये-जा करण्यासाठी ती बसचा वापर करत असे. आरोपी युगल मुंजनकर हा देखील त्याच बसने सकमूर येथून शिक्षणासाठी येत असल्याने त्यांची ओळख झाली. आरोपीने तिच्याशी जवळीक साधून प्रेमाची विचारणा केली. सुरुवातीला नकार असतानाही आरोपीने वारंवार पाठपुरावा केल्याने अखेर तिने ‘होकार’ दिला आणि दोघांचे बोलणे-चालणे सुरू झाले. POCSO case Gondpipri

    फोटो-व्हिडीओच्या धमक्यांनी वारंवार शोषण

    जानेवारी २०२५ मध्ये आरोपी युगलने तरुणीला ‘काहीतरी बोलायचे आहे’ असे सांगून मोटारसायकलने गोंडपिपरी येथील फलके यांच्या हॉटेलवर घेऊन गेला. तिथे रुममध्ये नेत आरोपीने जबरदस्तीने तिच्यावर शारीरिक संबंध प्रस्थापित केले. एवढ्यावरच न थांबता आरोपीने त्यावेळी तिचे फोटो आणि व्हिडीओ देखील मोबाईलमध्ये काढून ठेवले.

    जानेवारी २०२५ पासून ते १२ ऑगस्ट २०२५ पर्यंत आरोपीने काढलेले हे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत पीडित अल्पवयीन तरुणीवर प्रत्येक महिन्यात वारंवार जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

    आरोपीवर गुन्हा दाखल

    अखेर पीडित तरुणीने हा सगळा प्रकार पालकांना सांगितला आणि त्यांनी सोमवारी (२९ सप्टेंबर) गोंडपिपरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

    उपविभागीय अधिकारी सत्यजित आमले, ठाणेदार रमेश हत्तीगोटे, पीएसआय मंगेश कराडे, वर्षा नैताम यांनी घटनेची गांभीर्याने नोंद घेऊन, आरोपी युगल मुंजनकर याच्यावर m२१४/२०२५ कलम (६४)२(i),६४(२)(m),(६५)१,३५१(२) अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे.

    या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार रमेश हत्तीगोटे यांच्या मार्गदर्शनाखाली गोंडपिपरी पोलीस करत आहेत.

  • Tadoba safari price hike protest । ताडोबातील जिप्सी सफारी थांबणार?, खासदार प्रतिभा धानोरकरांचा वनमंत्र्यांना इशारा

    Tadoba safari price hike protest

    Tadoba safari price hike protest : चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात (TATR) स्थानिकांना होणाऱ्या आर्थिक अन्यायाविरोधात, खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या नेतृत्वाखाली उद्या, १ ऑक्टोबर २०२५ पासून तीव्र आंदोलन सुरू होणार आहे. स्थानिकांसाठी प्रवेश शुल्क कमी न केल्यास, नवीन पर्यटन हंगामाच्या पहिल्याच दिवशी ताडोबातील जिप्सी सफारी पूर्णपणे थांबवण्यात येईल, असा स्पष्ट आणि अंतिम इशारा खासदार प्रतिभा धानोरकर यांनी थेट वनमंत्री गणेश नाईक यांना दिला आहे.

    बाबुपेठमध्ये अपघात, पोलिसांनी आप युवा जिल्हाध्यक्षाची पकडली कॉलर

    वाघांच्या हल्ल्यात जीव गमावणाऱ्या स्थानिकांवरच आर्थिक भुर्दंड

    चंद्रपूर जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्षाची समस्या गंभीर असताना, त्याच जिल्ह्यातील नागरिकांकडून कोर झोनमध्ये शनिवार-रविवारसाठी तब्बल १२,६०० इतके अवाच्यासवा प्रवेश शुल्क आकारले जात आहे. या अन्यायामुळे स्थानिक नागरिकांसाठी ताडोबा दर्शन हे केवळ ‘स्वप्न’ बनले आहे. Chandrapur Tadoba safari fee issue

    खासदार प्रतिभा धानोरकर यांनी पत्रात नमूद केले आहे की, “जे नागरिक वाघांच्या हल्ल्यांमुळे जीव गमावत आहेत, त्यांनाच वाघाचे दर्शन घेण्यासाठी हजारो रुपये मोजावे लागत आहेत. ताडोबामुळे जिल्ह्याची ओळख आहे, पण आज ताडोबा येथील लोकांनाच परका झाला आहे. हा अन्याय आम्ही कदापि सहन करणार नाही.”

    खासदार प्रतिभा धानोरकर यांनी ठामपणे सांगितले आहे की, हा इशारा केवळ एक मागणी नसून, चंद्रपूरच्या नागरिकांच्या हक्कांसाठी उभारलेले मोठे आणि निर्णायक आंदोलन असेल. शासनाने तातडीने दखल घेऊन स्थानिकांना न्याय द्यावा, अशी तीव्र अपेक्षा आहे.