Blog

  • Shri Mata Mahakali festival Chandrapur । माता महाकाली मंदिर परिसराचा विकास करण्यासाठी कटिबद्ध – ना. उईके

    Shri Mata Mahakali festival Chandrapur

    श्री माता महाकाली महोत्सवात पलक मुच्छल यांच्या भक्तिरसात भाविक मंत्रमुग्ध!

    Shri Mata Mahakali festival Chandrapur : चंद्रपूर (२८ सप्टेंबर २०२५) – भक्तिरसाच्या अखंड झऱ्याने ओथंबलेल्या श्री माता महाकाली महोत्सवात सुप्रसिद्ध गायिका पलक मुच्छल यांच्या गोड सुरांनी वातावरण भारावून गेले. त्यांच्या स्वरातून उमटलेली प्रत्येक ओळ भक्तांच्या अंतःकरणातील प्रार्थना ठरली. यावेळी पलक मुच्छल यांनी ही आपल्या भक्तिसंगीताने भाविकांना मंत्रमुग्ध केले. तर महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी आदिवासी विकास मंत्री प्रा.डॉ. अशोक उईके यांनी महोत्सवाला भेट दिली. यावेळी त्यांच्या हस्ते 999 ज्येष्ठ मायमाऊलींचा सन्मान करण्यात आला.

    एसटी बस मध्ये दिव्यांगांना राखीव जागेवर जागा न दिल्यास होणार कारवाई

    या कार्यक्रमाला श्री माता महाकाली महोत्सवाचे अध्यक्ष आमदार किशोर जोरगेवार, भद्रावती वरोरा विधानसभा क्षेत्राचे आमदार करण देवतळे, डॉ. विजय देवतळे,माता महाकाली महोत्सव समितीचे सचिव अजय जयस्वाल, कोषाध्यक्ष पवन सराफ, विश्वस्त जयश्री कापसे, बलराम डोडाणी, भारतीय जनता पक्षाचे महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, भाजपचे जेष्ट नेते प्रकाश देवतळे, नामदेव डाहुले, दशरथसिंह ठाकूर, तुषार सोम, वंदना हातगावकर, रवी गुरुनले, अरुण तिखे आदि मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती. Mahakali festival cultural programs

      महोत्सवाच्या पहिल्या दिवशी रात्री आठ वाजता सुप्रसिद्ध गायिका पलक मुच्छल यांच्या सुरेल भक्तीगीत कार्यक्रमाला सुरुवात झाली. तत्पूर्वी माता महाकालीची महाआरती पार पडली. मंद वार्यात हेलकावणाऱ्या पताकांप्रमाणे शेकडो भाविकांचे मन पलक मुच्छल यांच्या गाण्यांच्या लयीवर झुलत होते. जय माता दी च्या घोषणांनी महोत्सवाचे वातावरण अधिकाधिक पवित्र झाले. संगीताच्या दरबारात स्वरांच्या आरतीने मातेचे  पूजन भाविकांना घडले.

    palak muchhal bhakti songs live

    महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी सकाळच्या आरतीनंतर ११ वाजता महिलांचे जागर कवितेचे कवी संमेलन पार पडले. यात कवयित्रींनी कवितांच्या माध्यमातून जनजागृती करत मातेची भक्ती केली. दुपारी २ वाजता ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने आयोजित ९९९ ज्येष्ठ मायमाऊलींचा पालकमंत्री डॉ.प्रा अशोक उईके यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तत्पूर्वी ना. उईक यांनी चित्र प्रदर्शनिचे उद्घाटन केले. त्यानंतर ना. उईक आणि आमदार करण देवतळे यांच्या हस्ते माता महाकालीची आरती करण्यात आली.  दुपारी ३ वाजता स्थानिक कलावंतांचा नृत्यजल्लोष कार्यक्रम पार पडला. Palak Muchhal bhakti songs live

    माता महाकाली मंदिर परिसराचा विकास करण्यासाठी कटिबद्ध – ना. उईके

    आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून महाकाली महोत्सवाला सुरुवात झाली आहे. यंदाचे हे चौथे वर्ष असून सदर महोत्सवाच्या माध्यमातून येथील संस्कृती देशभरात पोहोचवली जात आहे. महोत्सवात भक्तीसह सामाजिक उपक्रमांना देखील मोठ्या प्रमाणात स्थान देण्यात आले आहे.राजकारणात समाजकार्य करणारे नेते म्हणून किशोर जोरगेवार यांची ओळख असून मंदिर परिसराच्या विकासासाठी आमदार जोरगेवार प्रयत्न करत आहे. मंदिर परिसराचा विकास करण्यासाठी आम्ही सुद्धा कटिबद्ध आहोत, असे या कार्यक्रमात बोलताना आदिवासी विकासमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक उईके म्हणाले.

      आदिवासी समाजाचा गौरवशाली इतिहास सांगणारे हे मातेचे मंदिर आहे. मातेच्या आशीर्वादामुळे आम्ही आज सक्षम आहोत. नवरात्र हा नारीशक्तीचा उत्सव असून या महोत्सवाच्या माध्यमातून नारीशक्तीचा सन्मान होत असल्याचे त्यांनी सांगितले. महाकाली महोत्सव ही केवळ धार्मिक परंपरा नाही, तर ती आपल्या संस्कृतीचा श्वास आणि समाजाची ताकद आहे. देवीची आराधना ही स्त्रीशक्तीचे, मातृत्वाचे आणि धैर्याचे प्रतीक आहे. महाकाली म्हणजे अन्यायाविरुद्धचा संघर्ष आणि सत्यासाठीची निष्ठा आहे. Mata Mahakali festival cultural & devotional events

    या महोत्सवाच्या निमित्ताने आपण एकत्र येतो; विविध जात, धर्म, भाषा असलेले लोक एका मातेच्या छत्राखाली नतमस्तक होतात हीच खरी भारतीय संस्कृती आहे. महोत्सवाच्या काळात आयोजित होणारे सांस्कृतिक कार्यक्रम, भक्तिगीतांचे गायन, धार्मिक विधी आणि सामाजिक उपक्रम हे आपल्या समाजाला नवचैतन्य देणारे आहेत. या परंपरेतून आपल्या पिढ्यांना श्रद्धा, शिस्त आणि सामूहिकतेचा धडा मिळतो, असे सांगत त्यांनी महाकाली महोत्सवातील विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे कौतुक केले. Shri Mata Mahakali festival Chandrapur

    उद्याचे कार्यक्रम

    संध्याकाळी आरतीनंतर रात्री ७ वाजता फिल्मफेअर पुरस्कृत, सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका साधना सरगम यांचा भक्ती संगीत कार्यक्रम

    सकाळी ९ वाजता श्री माता महाकाली आरती व महेश भजन मंडळाचे भजन

    दुपारी लखमापूर हनुमान मंदिर यांच्या वतीने सुंदरकांडाचे आयोजन

  • MSRTC reserved seats for disabled | MSRTC चा कडक आदेश: दिव्यांगांना आरक्षित सीट न दिल्यास अधिकारी अडचणीत

    MSRTC reserved seats for disabled

    MSRTC reserved seats for disabled : चंद्रपूर २८ सप्टेंबर २०२५ – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) बसेसमध्ये दिव्यांगांसाठी आसन क्रमांक ३, ४, ५ आणि ६ आरक्षित ठेवण्यात आले आहेत. कुठल्याही थांब्यावरून दिव्यांग प्रवासी बसमध्ये चढल्यास त्यांना ही आरक्षित सीट उपलब्ध करून देण्याची संपूर्ण जबाबदारी बस कंडक्टरची आहे. मात्र, बस कंडक्टरकडून सीट उपलब्ध करून दिली जात नसल्याच्या वाढत्या तक्रारींची गंभीर दखल वाहतूक महाव्यवस्थापकांनी घेतली आहे.

    औद्योगिक विकासामुळे समृद्ध अर्थव्यवस्था निर्माण होणार  : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    या पार्श्वभूमीवर, २६ सप्टेंबर रोजी एक महत्त्वपूर्ण आदेश जारी करण्यात आला आहे. या आदेशानुसार, यापुढे अशी कोणतीही तक्रार आल्यास संबंधित विभागीय वाहतूक अधिकारी (DTO) आणि डेपो व्यवस्थापक (DM) यांच्यावर थेट कारवाई करण्याची चेतावणी देण्यात आली आहे.

    बसमध्ये दिव्यांगांना येणाऱ्या अडचणी

    सामान्यतः, महिला आणि इतर प्रवाशांकडून बसमधील पुढील सीट क्र. ३ ते ६ वर बसण्यास प्राधान्य दिले जाते. जेव्हा दिव्यांग प्रवासी कंडक्टरला आरक्षित सीटची विनंती करतात, तेव्हा अनेकदा त्यांना सहकार्य मिळत नाही आणि कंडक्टर आपली जबाबदारी टाळतात. यामुळे दिव्यांगांना सामान्य प्रवाशांसमोर उभे राहून प्रवास करावा लागतो. अनेकदा कंडक्टर UDID कार्डाची मूळ प्रत किंवा झेरॉक्स असूनही तिकीट देण्यास नकार देतात आणि त्यांच्याकडे हीन भावनेने पाहिले जाते. २६ सप्टेंबरच्या नवीन आदेशात या सर्व बाबी तातडीने थांबवण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. what to do if bus conductor denies reserved seat to disabled

    नवीन आदेशानुसार कंडक्टरला काय करावे लागेल?

    नवीन आदेशात खालील गोष्टी स्पष्ट करण्यात आल्या आहेत:

    • सवलतीचे तिकीट: दिव्यांग प्रवाशाने दिलेले UDID कार्डाची मूळ प्रत किंवा झेरॉक्स पाहून कंडक्टरला रियायती (सवलतीचे) तिकीट देणे बंधनकारक आहे.
    • आरक्षित सीट: मार्गावरील कोणत्याही थांब्यावरून दिव्यांग प्रवासी बसमध्ये चढल्यास, त्याला त्याची आरक्षित सीट उपलब्ध करून देणे ही कंडक्टरची जबाबदारी असेल.
    • प्रवाशांना सूचना: दिव्यांग प्रवाशांच्या आरक्षित सीटवर बसलेल्या (सामान्य) प्रवाशांना कंडक्टरने स्पष्टपणे सूचना देणे आवश्यक आहे की, “आत्ता तुम्ही बसू शकता, पण कोणताही दिव्यांग प्रवासी आल्यास तुम्हाला ही आरक्षित सीट सोडावी लागेल“.
    • सहयोग आणि सन्मान: रियायती तिकीट देताना हीन भावना न बाळगता, दिव्यांग प्रवाशांना सन्मान द्यावा आणि त्यांना चढताना व उतरताना सहकार्य करावे. bus conductor liability to provide seat for disabled

    या निर्देशांचे पालन न केल्यास आणि तक्रार प्राप्त झाल्यास, संबंधित कंडक्टर, तपास अधिकारी आणि पर्यवेक्षकाची जबाबदारी निश्चित केली जाईल. तसेच, भविष्यात अशा तक्रारी वारंवार आल्यास थेट विभागीय वाहतूक अधिकारी आणि डेपो व्यवस्थापक यांच्यावर कारवाई केली जाईल, अशी स्पष्ट चेतावणी मुंबईतील वाहतूक महाव्यवस्थापकांनी दिली आहे.

    डिव्हिजनल ट्राफिक ऑफिसर, चंद्रपूर

    पुरुषोत्तम व्यवहारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, “आदेश मिळाल्यानंतर बसमध्ये स्टिकर (सूचनापत्र) लावले जात आहेत. दिव्यांगांच्या आरक्षित सीटवर बसलेल्या सामान्य प्रवाशांना सूचना देण्याची जबाबदारी बस कंडक्टरची आहे. त्याचप्रमाणे महिला आणि ज्येष्ठांसाठी आरक्षित सीट्स बस सुरू होण्याच्या ठिकाणापासून उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. प्रवाशांना सहयोग न केल्यास कंडक्टरवर कारवाई करण्यात येईल.”

    तथापि, ५ सप्टेंबर रोजी आदेश येऊनही वर्षभरात २० हून अधिक तक्रारी आल्याने हा दुसरा आदेश काढावा लागला, त्यामुळे या आदेशाची अंमलबजावणी किती प्रभावीपणे होते हे येणारा काळच ठरवेल. MSRTC reserved seats for disabled

  • industrial growth chandrapur and gadchiroli । चंद्रपूर-गडचिरोलीत इंडस्ट्रियल मॅग्नेट तयार; दीड लाख रोजगाराची संधी – मुख्यमंत्री फडणवीस

    industrial growth chandrapur and gadchiroli

     जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या वतीने कॉफी टेबल बुकचे अनावरण

    industrial growth chandrapur and gadchiroli : चंद्रपूर,  दि. 28 : चंद्रपूर जिल्ह्यात खनिज विकास निधीतून अनेक मोठे उपक्रम राबविण्यात येत आहे.  यात टाटा ट्रस्टच्या माध्यमातून कॅन्सर हॉस्पिटल, कौशल्यावर आधारित रोजगार, आरोग्य ,पायाभूत सुविधांचा विकास, शिक्षण आणि नाविन्यपूर्ण उपक्रमाचा समावेश आहे.  विशेष म्हणजे चंद्रपूर आणि गडचिरोली मध्ये इंडस्ट्रियल मॅग्नेट तयार होत असून औद्योगिक विकासामुळेच समृद्ध अर्थव्यवस्था निर्माण होणार आहे, असे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

    ताडोबा जंगल सफारी शुल्काबाबत महत्वाची माहिती

    मुल (जि. चंद्रपूर) येथील विश्रामगृहात, जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या वतीने तयार करण्यात आलेल्या कॉफी टेबल बुकचे अनावरण करताना मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके, आमदार सर्वश्री सुधीर मुनगंटीवार, किशोर जोरगेवार, देवराव भोंगळे यांच्यासह जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, जिल्हा खनिकर्म अधिकारी रोहन ठवरे व इतर अधिकारी उपस्थित होते. Chandrapur Industrial Growth

    cm devendra fadnavis

    खनिज निधीचा फायदा झाला पाहिजे

    ज्या ठिकाणी उत्खनन होते, तेथील नागरिकांना खनिज निधीचा फायदा झाला पाहिजे,  अशी संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आहे, असे सांगून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले,  खनिज उत्खनन आणि वाहतुकीमुळे जो त्रास स्थानिकांना होतो. त्यामुळे सर्वात जास्त वाटा स्थानिक लोकांनाच मिळाला पाहिजे.

    चंद्रपूर जिल्ह्याने खनिज  क्षेत्रात अनेक चांगले उपक्रम हाती घेतले आहेत. विशेष म्हणजे खनिज विकास निधीमधून रोजगार निर्मिती, आरोग्य, विकास, शिक्षण,  कौशल्य आधारित  नाविन्यपूर्ण प्रकल्प चंद्रपूर जिल्ह्यात अतिशय चांगल्या पद्धतीने राबविण्यात येत आहे.

    चंद्रपूर आणि गडचिरोली हा परिसर इंडस्ट्रियल मॅग्नेट

    चंद्रपूर आणि गडचिरोली हा परिसर इंडस्ट्रियल मॅग्नेट म्हणून तयार होत आहे. त्यामुळे दीड लक्ष लोकांना रोजगार मिळणार आहे. पर्यावरणाचे संतुलन राखून हा विकास आपल्याला करायचा आहे. औद्योगिकरणासोबतच चंद्रपूरने पर्यावरण संतुलन राखले, असा संदेश गेला पाहिजे. कौशल्य विकास आणि रोजगारावर भर देऊन 100  टक्के स्थानिकांना रोजगार मिळेल, अशी व्यवस्था आपण उभी करणार आहोत. Devendra Fadnavis Chandrapur Announcement

    गतकाळात आपण 50 कोटी वृक्ष लागवड मोहीम यशस्वीरीत्या राबवली. यावेळी सुद्धा चंद्रपूरने वृक्ष लागवडीचे मोठे उद्दिष्ट गाठावे. संपूर्ण भारतात केवळ महाराष्ट्र राज्याने ग्रीन कव्हर वाढवले असून आपला परिसर नैसर्गिक समृद्ध आहे. मात्र आता आपल्याला संपूर्ण महाराष्ट्राचे वनक्षेत्र 33 टक्क्यांच्या वर नेण्याकरिता करिता विशेष लक्ष द्यायचे आहे. चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने खनिज विकास निधीतून अतिशय चांगले काम केल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

    कार्यक्रमाचे संचालन अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांनी तर आभार जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी मानले.

  • Tadoba Jungle Safari Price Maharashtra । ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्प: जंगल सफारी शुल्काबाबत स्पष्टीकरण

    Tadoba Jungle Safari Price Maharashtra

    Tadoba Jungle Safari Price Maharashtra : चंद्रपूर २७ सप्टेंबर २०२५ – चंद्रपूर ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पातील सफारीच्या शुल्कात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून आता सामन्यांसाठी जंगल सफारी हे दिवा स्वप्नच आहे. शुल्कात झालेली भरमसाठ वाढीने स्थानिकांना जंगल सफरीमध्ये सूट द्यावी अशी मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केली, मागणी मान्य न झाल्यास १ ऑक्टोम्बर पासून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात जिप्सी प्रवेश होऊ देणार नाही असा इशारा सुद्धा देण्यात आला, यावर ताडोबा प्रशासनाने खुलासा केला कि शुल्कात भरमसाठ वाढ करण्यात आली नाही. याबाबत त्यांनी स्पष्टीकरण सुद्धा दिले आहे.

    सावली तालुक्यात घरात शिरले अस्वल

    जगप्रसिद्ध ताडोबा व्याघ्रप्रकल्पात दरवर्षी लाखो पर्यटक वन्यप्राणी बघायला येत असतात, मात्र काही दिवसांपूर्वी ताडोबा जंगल सफारी महागली आहे, यावरून ताडोबा सफारी चर्चेचा विषय बनली. मात्र ताडोबा व्यवस्थापनाने यावर स्पष्टीकरण दिले असून प्रयत्न शुल्कात भरीव वाढ करण्यात आली नाही, विशेष म्हणजे सवलतीच्या दारात आतापर्यंत चंद्रपूर जिल्ह्यातील अंदाजे ४०,००० लोकांनी जंगल सफारी केलेली आहे. Tadoba tiger reserve entry fee update

    हे आहे ताडोबा व्याघ्रप्रकल्पातील पर्यटन शुल्क

    उपस्थितपूर्वीचे शुल्क (कोअर)आताचे शुल्क (कोअर)पूर्वीचे शुल्क (बफर)आताचे शुल्क (बफर)
    दिवस०-५९ दिवसाकरीता६०-१२० दिवसाकरीता०-५९ दिवसाकरीता६०-१२० दिवसाकरीता
    शनिवार ते रविवारशुक्रवारशनिवार ते रविवारशुक्रवारशनिवार ते रविवार
    प्रवेश शुल्क१२००२२००४२००४२००
    जिप्सी शुल्क३०००३०००३०००३०००
    गाईड शुल्क६००६००६००६००
    एकूण४८००५८००७८००११४००
  • Sudhir Mungantiwar farmer initiatives । शेतकऱ्यांसाठी ठोस पावले – सुधीर मुनगंटीवार यांचा निर्धार

    Sudhir Mungantiwar farmer initiatives

    Sudhir Mungantiwar farmer initiatives : चंद्रपूर, दि. २७ : राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी ठोस पावले उचलण्यासाठी कटिबद्ध असल्याचा ठाम निर्धार व्यक्त केला. शेती ही केवळ व्यवसाय नसून शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देणारे साधन आहे, असे सांगत त्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी कायम तत्पर राहण्याचा विश्वास व्यक्त केला. Sudhir Mungantiwar farmer initiatives

    पैसे देण्यास नकार चंद्रपुरात केंद्र प्रमुखाची हत्या

    राज्यातील तसेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी कृषी पंप, धानाचा बोनस, कर्जमुक्ती, कृषी यांत्रिकीकरण, प्रशिक्षण केंद्रे, कृषी महाविद्यालय आणि कृषी हाट अशा अनेक योजनांद्वारे उत्पादन खर्च कमी करणे आणि उत्पन्न वाढवणे यावर विशेष भर देण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या आयुष्यात शेती हा केवळ मजबुरीचा व्यवसाय नव्हे, तर आर्थिक स्थैर्य व मजबुती देणारा व्यवसाय व्हावा, यासाठी त्यांच्या समस्यांवर तत्पर उपाययोजना करणे आणि प्रश्न प्राधान्याने सोडविणे हा ठाम निर्धार आहे, अशी ग्वाही आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

    डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय येथे कृषी पंप विज जोडणीच्या प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेऊन उपाययोजना करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी भाजपा किसान मोर्चा अध्यक्ष बंडू गौरकार, महामंत्री भालचंद्र वडस्कर, महावितरण तज्ञ माधव जीवतोडे, युवा किसान मोर्चाचे अध्यक्ष पलींद्र सातपुते, अनिल मोरे, प्रभाकर ताजणे, विजय गुरनुले, रवींद्र चहारे आदींची उपस्थिती होती. Chandrapur agriculture development schemes

    शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करण्याचा प्रयत्न

    आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार म्हणाले,  ‘आज जिल्हा वार्षिक योजनेच्या बैठकीत ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने चर्चिले गेले. मी विधानसभेत शेतकऱ्यांची बाजू मांडताना स्पष्ट केले की, कृषी पंप हा चंद्रपूरकरांचा हक्क आहे. विदर्भाचा अनुशेष १ लाख २६ हजारांहून अधिक आहे. पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर मागेल त्याला कृषी पंप देण्यात आले. विदर्भातील शेतकऱ्यांचे हक्क त्यांना पूर्णपणे दिले जाणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. अर्थमंत्री असताना छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना सुरू केली. या योजनेद्वारे शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करण्याचा प्रयत्न केला.’ Shetkari samruddhi initiatives Chandrapur

    farmer development

    देशात पहिल्यांदाच कोरोमंडल कंपनीविरुद्ध एफआयआर

    महाराष्ट्राच्या निवडणुकीचा जाहीरनामा तयार करणाऱ्या समितीचा मी अध्यक्ष असतांना, आग्रहाने शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा मुद्दा जाहीरनाम्यात समाविष्ट केला. शेतकऱ्यांच्या आयुष्यात शेती ही मजबुरी नव्हे, तर मजबुतीचा व्यवसाय व्हावा, शेतकऱ्यांसाठी जे काही करता येईल ते प्राधान्याने करण्याचा निर्धार आहे.  शेतकऱ्यांनी वीज कनेक्शनसाठी डिमांड भरले असूनही विभागाकडून त्यांचे चेक परत करण्यात येत आहेत. मात्र, हे चेक परत करण्यामागचे कारण महावितरणच्या अधिकाऱ्यांना सांगता आले नाही. चंद्रपूर जिल्ह्यासाठी 7,000 मेट्रिक टन युरिया खताचे आवंटन करण्यात आले. महाराष्ट्रातच नव्हे, तर देशात पहिल्यांदाच कोरोमंडल कंपनीविरुद्ध एफआयआर दाखल करून गुन्हा दाखल केला गेला. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी कायद्याच्या चौकटीत राहून लढण्याचा ठाम निर्णय केला. पोभुर्णा तालुक्यातील 7 शेतकऱ्यांना राज्य कृषी पुरस्कार प्राप्त झाला असून, ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब असल्याचेही आ. श्री. मुनगंटीवार म्हणाले.

    ते पुढे म्हणाले, मी सांस्कृतिक कार्यमंत्री असताना चंद्रपूरमध्ये 80 कोटी रुपये खर्च करून शेतकऱ्यांसाठी कृषी हाट करण्यात येत आहे. या हाटच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उत्पादनांना थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवता येईल. मुल येथे कृषी महाविद्यालय उभारण्यात येत असून, पंजाब नॅशनल बँकेच्या माध्यमातून अजयपूर येथे शेतकरी प्रशिक्षण केंद्र स्थापन केले जात आहे. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करणे आणि उत्पादन वाढवणे या दोन महत्त्वाच्या उद्दिष्टांवर विशेष काम केले जात आहे. शेतकऱ्यांना धानाचा बोनस मिळावा यासाठी विधानसभेत आवाज उठवला. सुमारे ८० ते ९० टक्के शेतकऱ्यांच्या खात्यात धानाचा बोनस जमा झाला असून, धान चुका-याचे पैसेही दिले गेले. धान खरेदी केंद्र सुरू करण्याबाबत लवकरच मुख्यमंत्री महोदयांशी सकारात्मक चर्चा करण्यात येईल. मतदारसंघातील काही गावे ‘पोखरा’ तर काही गावे ‘किसान समृद्धी’ योजनेत समाविष्ट आहेत. Farmer subsidy and crop bonus Maharashtra

    शेतकऱ्यांच्या व्यक्तिगत लाभाच्या योजना, यांत्रिकीकरणाच्या योजना आणि जमिनीची सुपीकता वाढविणाऱ्या योजनांबाबत मतदारसंघातील प्रत्येक गावात जनजागृती करा. मतदारसंघ कृषी क्षेत्रात प्रथम क्रमांकावर राहावे यासाठी सतत कार्य करा. महाराष्ट्रातून ‘पोखरा’ आणि ‘समृद्धी’ योजनेत सर्वात जास्त प्रस्ताव बल्लारपूर मतदारसंघातून जावेत याची दक्षता घ्या. पालकमंत्री असताना ५,००३ किलोमीटरच्या शेतकऱ्यांच्या पानंद रस्त्यांचा निर्णय घेतला. मतदारसंघातील प्रत्येक गावातील पानंद रस्ते याच ५,००३ किलोमीटरच्या आराखड्यात समाविष्ट आहेत. माविमच्या माध्यमातून महिला बचत गटांचे यांत्रिकीकरण करा आणि पुरुष बचत गट स्थापन करण्यात यावे. Sudhir Mungantiwar farmer initiatives

    जिल्ह्यातील कृषी क्षेत्राचा विकास इतका आदर्श असावा की पंतप्रधान नरेंद्र मोदीजी ‘मन की बात’ कार्यक्रमात म्हणतील, खेती करने का तरीका हो तो बल्लारपूर विधानसभा क्षेत्र जैसा हो. असेही ते आवर्जून म्हणाले. कृषी पंप विज जोडणीच्या प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेऊन उपाययोजना करण्यासाठी आज बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीस शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने हजेरी लावली. स्वतःच्या हक्काची जाणीव ठेवून शेतकरी या ठिकाणी सहभागी झाले. शेतकऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने सुटावे यासाठी प्रयत्नशील असल्याचेही आमदार श्री. मुनगंटीवार म्हणाले.

  • Sunil Kalidas Gedam murder case । ६ लाख रुपयांच्या उसनवारीवरून घडलेली खळबळजनक घटना

    Sunil Kalidas Gedam murder case

    Sunil Kalidas Gedam murder case : नक्कीच, ही बातमी SEO-फ्रेंडली स्वरूपात येथे दिली आहे:

    उसनवार पैशाच्या वादातून सेवानिवृत्त केंद्रप्रमुखाची हत्या; मृतदेह नाल्यात फेकला, आरोपीला अटक

    मूल, चंद्रपूर (महाराष्ट्र) | उसनवार (कर्ज) घेतलेले पैसे परत देण्यास नकार दिल्याने सेवानिवृत्त केंद्र प्रमुखाची निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना मूल तालुक्यातील टेकाडी येथे उघडकीस आली आहे. आरोपीने हत्या केल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह नाल्यात फेकून दिला होता.

    घरात शिरले अस्वल

    ६ लाख रुपयांच्या वादातून हत्याकांड

    • मृतक: सुनील कालिदास गेडाम (वय ६०, रा. भीमवाडी वॉर्ड क्र. १४, मूल), सेवानिवृत्त केंद्र प्रमुख.
    • आरोपी: किस्मत मोहम्मद अल्ली सय्यद (वय २४, रा. टेकाडी).

    मिळालेल्या माहितीनुसार, मृतक सुनील गेडाम आणि आरोपी किस्मत सय्यद हे शुक्रवारी (२६ सप्टेंबर २०२५) रात्री ७ वाजताच्या सुमारास मूल-गडचिरोली महामार्गावरील रानसंपन्न हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेले होते.

    हत्या करून मृतदेह नाल्यात फेकला

    जेवणानंतर मूलकडे परत येत असताना आरोपीने महत्त्वाचे काम असल्याचे सांगून गेडाम यांना टेकाडी येथे नेले.

    • रात्री ८.३० वाजताच्या सुमारास टेकाडी वरून एमआयडीसी मार्गाने मूलकडे येत असताना, उसनवार घेतलेले सहा लाख रुपये परत देण्यास गेडाम यांनी नकार दिला.
    • याच कारणावरून आरोपी किस्मत सय्यद याने कथितरित्या आपल्या काही मित्रांच्या मदतीने सुनील गेडाम यांच्या डोक्यावर लोखंडी सळाखीने वार केले आणि त्यांची हत्या केली.
    • हत्येनंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपीने मृतदेह मरेगाव-टेकाडी मार्गावरील नाल्यात फेकून दिला.

    कुटुंबीयांची तक्रार आणि आरोपीची कबुली

    सुनील गेडाम हे घरी परत न आल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी शोध सुरू केला. त्यांना सोबत घेऊन गेलेल्या किस्मत सय्यद याच्यावर शंका आल्याने मुलगा पंकज गेडाम यांनी मूल पोलीस स्टेशनमध्ये हरवल्याची तक्रार नोंदवली.

    दरम्यान, आकापूरजवळील वळण मार्गावर गेडाम यांची पल्सर दुचाकी (MH ३४ AX ८३२३), मोबाईल, चष्मा आणि चप्पल पोलिसांना आढळून आली.

    तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी संशयित आरोपी किस्मत मोहम्मद सय्यद अली याला ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशीदरम्यान त्याने सहा लाख रुपये परत देण्यास नकार दिल्याने हत्या केल्याची आणि प्रेत लपविल्याची कबुली दिली. Kismat Ali Sayyed arrested Mul

    पुढील तपास सुरू

    पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून फॉरेन्सिक टीमच्या मदतीने तपासणी केली आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय, मूल येथे पाठविला आहे.

    मूल पोलीस स्टेशनमध्ये आरोपी किस्मत अली विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यजित आमले आणि पोलीस निरीक्षक विजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुबोध वंजारी पुढील तपास करत आहेत.

  • Maharashtra tribal land lease policy 2025 । आदिवासी जमिनी भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय रद्द करा – जनजाती सुरक्षा मंचाची मागणी

    Maharashtra tribal land lease policy 2025

    Maharashtra tribal land lease policy 2025 : चंद्रपूर २७ सप्टेंबर २०२५ : शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार आदिवासींच्या जमिनी भाडेतत्त्वावर देण्यास परवानगी देणाऱ्या शासन निर्णयाचा (जी.आर.) जनजाती सुरक्षा मंचाने तीव्र विरोध दर्शविला आहे. यासंदर्भात चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक वुईके यांना जनजाती सुरक्षा मंच, तर्फे गोपाल घोटी विभाग संघटनमंत्री वि. व. क. आ. चंद्रपूरचे जिल्हा संयोजक भारत आत्राम सह संयोजक धनराज कोवे,ॲड.मडावी, यांनी निवेदन सादर करून चर्चा केली. यावेळी हा निर्णय तातडीने रद्द करण्याची मागणी करण्यात आली.

    चंद्रपुरात डेंग्यूचा धोका वाढला

    या प्रसंगी आदिवासी समाजाचे नेते व भाजपा प्रदेश महिला मोर्चा महामंत्री कु. अल्का आत्राम, भाजप जिल्हाध्यक्ष अरुण मडावी,भाजप महामंत्री प्रमोद कोडापे,तालुकाध्यक्ष अशोक अलाम,मयूर आत्राम,वर्षा परचाके,लीना कुसराम,दीक्षा मडावी,विक्रम,मंगल भादिकर,अनिल सुरपाम,शुभम गेडाम, विक्की मेश्राम, मनोज तुमराम,सागर धुर्वे आदी मान्यवर उपस्थित होते. tribal land leasing Maharashtra government policy

    तर आदिवासी समाज बेघर होणार

    मंचाच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, आदिवासींच्या जमिनी या त्यांच्या पारंपरिक हक्काच्या असून त्या त्यांच्या उपजीविकेचा मुख्य आधार आहेत. अशा जमिनी उद्योगपती, भू-माफिया किंवा इतरांना भाडेतत्त्वावर दिल्यास आदिवासी समाज बेघर होईल तसेच त्यांच्या अस्तित्वावर गंभीर संकट निर्माण होईल.

    “आदिवासी समाजाचे आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक जीवन या जमिनींशी घट्टपणे जोडलेले आहे. त्यामुळे शासनाने घेतलेला हा निर्णय अन्यायकारक असून तातडीने मागे घ्यावा,” अशी मागणी जनजाती सुरक्षा मंचाने आपल्या निवेदनाद्वारे केली आहे.

    सदर निवेदन जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री तसेच महसूलमंत्री यांना पाठविण्यात आले असून, शासन यावर सकारात्मक निर्णय घेईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

  • Dengue mosquito breeding checkers । चंद्रपूरमध्ये डेंग्यूचा धोका! मनपाची डासोत्पत्तीविरोधी मोहीम सुरु

    Dengue mosquito breeding checkers

    Dengue mosquito breeding checkers : चंद्रपूर : २७ सप्टेंबर – काही दिवसापासून शहरात संततधार पाऊस सुरु असल्यामुळे डेंग्यूच्या उद्रेकाची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे महानगरपालिकेतर्फे सावधगिरी बाळगण्याचे आवाहन सर्व नागरिकांना करण्यात येत आहे.

    गुंतागुंतीची शस्त्रक्रिया, चंद्रपूर मेडिकल कॉलेजच्या डॉक्टरांनी केली यशस्वी शस्त्रक्रिया

    महानगरपालिकेतर्फे प्रतिबंधात्मक योजना सुरु असल्यातरी नागरिकांना स्वतःचा संरक्षणासाठी पुढील उपाय योजना करणे आवश्यक आहे.
    घराच्या आत आणि बाहेर दोन्ही ठिकाणी पाणी साचू देऊ नये, ज्या भांड्यात तुम्ही पाळीव प्राण्यांना पाणी देता ते भांडे स्वच्छ ठेवने, पाण्याची टाकी चांगल्या प्रकारे झाकून ठेवने, कुलर आणि पाण्याच्या टाकीत आठवड्यातून एकदा थोडे पेट्रोल टाकने, तसेच रेफ्रिजरेटरच्या तळाशी असलेला पाण्याचा ट्रे दररोज रिकामे करणे आवश्यक आहे. Chandrapur dengue prevention campaign

    कीटकजन्य आजार प्रतिबंधासाठी मनपातर्फे डासोत्पत्ती स्थाने तपासणी मोहीम राबविली जात असुन 28 ब्रिडींग चेकर्स,32 एएनएम, 22 एमपीडब्लु,170 आशा वर्कर व स्वच्छता निरीक्षक पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत. ब्रिडींग चेकर्सद्वारा अधिकाधिक घरांची दररोज तपासणी केली जात असुन प्रत्येक घरामध्ये सतर्कता बाळगण्याचे इशारा दिला जात आहे.

     पावसात मोकळे भूखंड, बंद घराची छते, चालु बांधकामाची ठिकाणे, घरी वापर नसलेली ठिकाणे, कूलर,टायर, भंगारातील वस्तु,डबे इत्यादी ठिकाणी पाणी साचुन राहते व याच जागा डासांची उगमस्थाने बनतात. या उगमस्थानांचा शोध घेऊन ती नष्ट करणे व नागरीकांना सचेत करणे यासाठी डासोत्पत्ती स्थाने तपासणी मोहीम सुरु करण्यात आली असुन नागरीकांनी आपल्या घरी साचलेले पाणी राहु नये यांची काळजी घेण्याचे आवाहन मनपा प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.  Mosquito breeding control rainy season

    डेंग्युची लक्षणे –

    डासांमुळे पसरणाऱ्या आजारांमध्ये डेंग्यूताप व डेंग्यू रक्तस्रावी ताप हे मुख्य आजार आहेत. ताप येणे, अंगावर पुरळ येणे, डोळ्याच्या खोबणीमधे दुखणे, पाठदुखी, डोकेदुखी, स्नायूमध्ये वेदना, सांधेदुखी ही डेंग्यूची प्रमुख लक्षणे आहेत. वस्तुतः डेंग्यू हा सामान्य आजार आहे परंतु या रोगाबाबत माहिती नसल्याने किंवा अपुरी माहिती असल्याने काही वेळा तो जीवघेणा ठरू शकतो. म्हणून प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे.

    डेंग्यु टाळण्यास उपाययोजना –

    डेंग्यु डास हा स्वच्छ व साचलेल्या पाण्यात आढळतो त्यामुळे आपल्या घराची तपासणी करावी . पाणी साठवण्याची भांडी कोरडी करणे,डासअळी आढळल्यास अबेट द्रावण टाकणे, पाणी साठा मोठा असले तर त्यात गप्पी मासे टाकणे आवश्यक आहे. गप्पी मासे पाण्यातील डासांची अंडी संपवितात ज्याने डासांचा प्रादुर्भाव कमी होतो. आठवड्यातून एक दिवस हा कोरडा दिवस पाळावा.


     



  • Pratibha Dhanorkar Chandrapur development । चंद्रपूरच्या विकासासाठी खासदार प्रतिभा धानोरकरांचे ज्वलंत मुद्दे, पालकमंत्र्यांचे तत्काळ आदेश!

    Pratibha Dhanorkar Chandrapur development

    Pratibha Dhanorkar Chandrapur development : चंद्रपूर 27 सप्टेंबर 2025: जिल्हा नियोजन विकास समितीच्या (DPDC) बैठकीत चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या सोयीसाठी अनेक अत्यंत महत्त्वाचे आणि ज्वलंत मुद्दे अत्यंत प्रभावीपणे उपस्थित केले. यावर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी तत्काळ कार्यवाही करण्याचे ‘ऑन द स्पॉट’ आदेश संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले असून, हे सर्व प्रश्न लवकरात लवकर निकालात काढण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.

    घरात शिरलं अस्वल, वनविभागाचे रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी

    खासदार प्रतिभा धानोरकर यांनी यावेळी सांगितले की, स्वस्त धान्य दुकानांत मिळणाऱ्या तांदळा संदर्भात मोठा घोटाळा असून, शासनाकडे विविध वाणांचे तांदूळ उपलब्ध असताना, सर्व स्वस्त धान्य दुकानांमध्ये एकाच वाणाचा तांदूळ उपलब्ध असतो, याची सखोल चौकशी करण्यात यावी. त्यासोबतच, डीपीडीसीमधील महिलांच्या सक्षमीकरणासाठी असलेल्या ३ टक्के राखीव निधीतून मोठ्या ग्रामपंचायतींमध्ये सॅनिटरी व पॅड डिस्पोजेबल मशीन लावण्यात यावी. तसेच ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात स्थानिक नागरिकांसाठी प्रवेश शुल्क कमी करण्यात यावे, जेणेकरून स्थानिकांना या प्रकल्पाचा लाभ घेता येईल, अशी महत्त्वपूर्ण मागणीही त्यांनी केली. rice distribution scheme scam

    मोफत शववाहिका उपलब्ध करा

    याशिवाय, शासकीय महाविद्यालयांतून उपचारादरम्यान मृत पावलेल्या रुग्णांना घरापर्यंत पोहोचविण्याकरिता मोफत शववाहिका जिल्हा वार्षिक योजनेतून खरेदी करून उपलब्ध करून द्यावी. पडोली ते पठाणपुरा, जुनोना चौक ते गांधी चौक मार्गे दुर्गापूर, बंगाली चौक ते नवीन चंद्रपूर तसेच बंगाली कॅम्प ते एमआयडीसी या नवीन शहरांतर्गत धावणाऱ्या ई-बसेस जिल्हा वार्षिक योजनेतून खरेदी कराव्या. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळण्याकरिता व ग्राहकांना थेट योग्य माल मिळण्याकरिता कृषी विभागाच्या माध्यमातून धान महोत्सव डिसेंबर महिन्यात साजरा करण्याकरिता जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली. reduced wildlife park entry fee for locals

    जिल्हा वार्षिक योजनेतून १० वी आणि १२ वी मध्ये सीबीएसई व स्टेट बोर्डमधून प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात यावे आणि जिल्हा संग्रहालयाला नाविन्यपूर्ण योजनेतून निधी व जागा उपलब्ध करून देण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांना देण्याची विनंती त्यांनी पालकमंत्र्यांना केली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या मुलांच्या पालकांना ग्रामपंचायतीच्या घर टॅक्स व पाणी करात १० टक्के सूट देण्यात यावी, ज्यामुळे झेडपी शाळांमधील विद्यार्थी संख्या वाढेल, असा महत्त्वाचा प्रस्ताव त्यांनी मांडला. पालकमंत्री डॉ. उईके यांनी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी उपस्थित केलेले हे सर्व मुद्दे गांभीर्याने घेतले असून, अधिकाऱ्यांनी या सर्व विषयांवर कालमर्यादेत कार्यवाही करून अहवाल सादर करावा, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत.

  • Bear Entered House Chandrapur । घरात शिरलं अस्वल, वनविभागाने केले जेरबंद

    Bear Entered House Chandrapur

    Bear Entered House Chandrapur : सावली २७ सप्टेंबर २०२५- चंद्रपूर वनविभाग अंतर्गत सावली वनपरिक्षेत्रातील उपवनक्षेत्र व्याहाड, नियतक्षेत्र गायडोंगरी येथील मौजा विरखल चक च्या शेतशिवार आणि गाव शिवारात मागील चार-पाच दिवसांपासून वन्यप्राणी अस्वलाचे अस्तित्व गावकऱ्यांच्या निदर्शनास येत होते. याची माहिती मिळताच वनविभागाने तातडीने कार्यवाही सुरू केली होती.

    ताडोब्यातील पर्यटन सेवेत वाढ करा – आमदार सुधीर मुनगंटीवार

    अस्वलावर वनविभागाची करडी नजर

    गेल्या चार ते पाच दिवसांपासून नियत क्षेत्र वनरक्षक गायडोंगरी आणि PRT टीम निफंद्रा या अस्वलावर लक्ष ठेवून होत्या.

    भीतीने अस्वल झाडावर, नंतर थेट घरात!

    • दिनांक २६ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ८.०० वाजताच्या सुमारास अस्वल गावाजवळ आली. गावकऱ्यांनी आरडाओरड केल्यामुळे घाबरून ती गावालगतच्या चिंचेच्या झाडावर चढून बसली.
    • अस्वल रात्रभर झाडावरच होती. मात्र, पहाटे ५ वाजताच्या सुमारास ती झाडावरून खाली उतरली आणि विरखल येथील श्री भास्कर लक्ष्मण मारभते यांच्या नवीन बांधकाम सुरू असलेल्या घरात शिरली.
    • यावेळी गस्तीवर असलेल्या वनकर्मचाऱ्यांनी हे दृश्य पाहिले आणि तात्काळ घराचे दरवाजे बंद करून अस्वलाला घरातच बंद केले. Chandrapur Animal Rescue News

    वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात यशस्वी रेस्क्यू ऑपरेशन

    या घटनेची माहिती तातडीने वरिष्ठ वनाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात आली. विकास तरसे, सहाय्यक वनसंरक्षक चंद्रपूर वन विभाग, चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली; विनोद धुर्वे, वनपरिक्षेत्र अधिकारी सावली यांच्या नेतृत्वाखाली; श्री घनश्याम नायगावकर, वनपरिक्षेत्र अधिकारी चंद्रपूर; कु. इंगळे, परिविक्षाधीन वनपरिक्षेत्र अधिकारी; डॉ. कुंदन पोडचेलवार, पशुधन विकास अधिकारी टीटीसी चंद्रपूर; आणि RRU टीम चंद्रपूर यांनी मिळून हे बचाव कार्य हाती घेतले.

    अखेरीस, वनविभागाच्या या टीमने सदरच्या अस्वलास पिंजऱ्यात सुरक्षितपणे जेरबंद केले.

    मोलाचे सहकार्य

    या यशस्वी ऑपरेशनमध्ये राखुंडे (क्षेत्र सहाय्यक व्याहाड), पाटील (क्षेत्र सहाय्यक पाथरी), एकनाथ खुडे (वनरक्षक गायडोंगरी), वनरक्षक भोला सोनेकर, अविनाश नाने, महादेव मुंडे, डांगे, कराड, सुषमा मेश्राम तसेच PRT निफंद्रा, गवरला, शिरसी आणि ईश्वर गंडाटे आणि इतर वन कर्मचारी व गावकऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.

    उपचारासाठी TTC चंद्रपूर येथे हलवले

    जेरबंद केलेल्या या अस्वलास पुढील उपचाराकरिता TTC चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे. अस्वलाला पकडल्यामुळे विरखल चक च्या गावकऱ्यांनी सुटकेचा श्वास घेतला असून परिसरातील भीतीचे वातावरण दूर झाले आहे.