Blog

  • radical cystoprostatectomy surgery Chandrapur । चंद्रपुरातील कर्मवीर कन्नमवार रुग्णालयात गुंतागुंतीची मूत्राशय शस्त्रक्रिया यशस्वी

    radical cystoprostatectomy surgery Chandrapur

    radical cystoprostatectomy surgery Chandrapur : चंद्रपूर, 26 : चंद्रपूर जिल्ह्याच्या आरोग्य क्षेत्रात एक अभूतपूर्व यश मिळाले आहे. कर्मवीर मा.सां. कन्नमवार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथील शल्यचिकित्साशास्त्र विभागाने जिल्ह्यातील पहिलीच ‘रेडिकल सिस्टो-प्रोस्टेक्टॉमी विथ इलियल कॉन्ड्युट’ ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. ही शस्त्रक्रिया 72 वर्षीय शंकर अणकुलवार या रुग्णावर करण्यात आली. त्यांना प्रगत अवस्थेतील मूत्राशयाचा कर्करोग (Advanced Bladder Cancer) असल्याने ही शस्त्रक्रिया आवश्यक होती.

    ताडोबा पर्यटनासाठी आधुनिक सुविधा उपलब्ध करा – आमदार सुधीर मुनगंटीवार

    रेडिकल सिस्टेक्टॉमीमध्ये संपूर्ण मूत्राशयासह प्रोस्टेट व दोन्ही बाजूचे पेल्विक लिम्फ नोड्स काढले जातात आणि त्यानंतर रुग्णासाठी सुरक्षित लघवीसाठी इलियल कॉन्ड्युट (डायव्हर्जन युरोस्टॉमी) तयार केला जातो. ही शस्त्रक्रिया अतिशय अवघड मानली जाते. ज्यासाठी उच्च तांत्रिक कौशल्य, सुसंवादी टीमवर्क आणि विशेष शस्त्रक्रियेनंतरची काळजी आवश्यक असते. Government Medical College Chandrapur surgery

    रुग्ण सध्या अतिदक्षता विभागात

    या ऐतिहासिक शस्त्रक्रियेसाठी शल्यचिकित्साशास्त्र विभागप्रमुख डॉ. सरिता दुर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली, डॉ. अमित चिद्दरवार (युरोसर्जन) यांच्या नेतृत्वात बधिरीकरण विभागप्रमुख डॉ. राजेश नगमोथे व डॉ. तृप्ती बेलेकर, तसेच निवासी डॉक्टर डॉ. शंतनू कल्पल्लिवार, डॉ. कल्पक गरमाडे, डॉ. फुरकान अहमद, डॉ. अजित पावरा, डॉ. अजिंक्य गव्हाणे, डॉ. शोएब शेख आणि परिचारिका वर्ग यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. अणकुलवार यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून रुग्ण सध्या अतिदक्षता विभागात स्थिर आहे व त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. Chandrapur radical cystoprostatectomy

    रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे यांनी संपूर्ण टीमचे अभिनंदन करताना सांगितले की, हा चंद्रपूर जिल्ह्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. आतापर्यंत अशा उच्च दर्जाच्या शस्त्रक्रियेसाठी रुग्णांना नागपूर, हैदराबाद किंवा मुंबईसारख्या दूरवरच्या शहरांत जावे लागत होते. आता अशा सुविधा आपल्या जिल्ह्यातच उपलब्ध होत आहेत, ही मोठी क्रांती आहे. हे यश केवळ शस्त्रक्रिया कौशल्य दाखवते असे नाही, तर कर्मवीर मा.सां.कन्नमवार, शासकीय वैद्येकीय महाविद्यालय व रुग्णालय, हे प्रगत वैद्यकीय सेवांचे केंद्र म्हणून झपाट्याने पुढे जात असल्याचेही अधोरेखित करते. या ऐतिहासिक शस्त्रक्रियेमुळे हजारो रुग्णांना स्थानिक पातळीवरच उच्च दर्जाची उपचार सुविधा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

  • Tadoba park safe e-bus tourism | ताडोब्यातील पर्यटनासाठी आधुनिक सुविधा लागू करा – माजी वनमंत्र्यांची मागणी

    Tadoba park safe e-bus tourism

    Tadoba park safe e-bus tourism : चंद्रपूर, दि. २६ – ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हा केवळ महाराष्ट्राचाच नव्हे तर जागतिक पातळीवरील सुप्रसिद्ध व्याघ्र पर्यटन स्थळ आहे. दरवर्षी लाखो पर्यटक येथे वन्यजीव आणि निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी येतात. याकरिता सर्व गेटवर चार्जिंग स्टेशन, माहिती केंद्र, , सुरक्षित प्रवासासाठी ई-बसेस या  सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात, अशी ठोस मागणी राज्याचे माजी वनमंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी वनमंत्री मा. गणेशजी नाईक यांच्याकडे केली आहे.

    मुसळधार पावसाचा इशारा

    आ. मुनगंटीवार यांनी निवेदनात म्हटले आहे की, सध्या कोर व बफर क्षेत्रातील सर्व गेटवर सफारीसाठी केवळ जिप्सी वाहनांचा वापर होतो. मात्र हे दर मध्यमवर्गीय व अल्प उत्पन्न गटातील पर्यटकांना आर्थिक दृष्ट्या परवडणारे नाहीत. येत्या १ ऑक्टोबरपासून सफारी शुल्कात पुन्हा वाढ होत असल्याने या घटकांतील लोकांना ताडोबातील वन्यजीव व निसर्ग  सौंदर्य पासून वंचित राहतील ही खेदजनक बाब आहे,या वाढीव शुल्कावर पुनर्विचार करण्याची मागणी आ.सुधीर मुनगंटीवार यांनी केली. Tadoba tourism infrastructure demands

    ई-बसेसची व्यवस्था करणे गरजेचे

    म्हणूनच पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि स्वच्छ पर्यटनासाठी ई-बसेसची व्यवस्था करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. प्रत्येक गेटवर चार्जिंग स्टेशन, बसमधील जीपीएस व सीसीटीव्ही कॅमेरे, प्रशिक्षित गाईड व माहिती प्रणाली या सुविधा उपलब्ध करून देता येतील. १८, २२ व २६ प्रवासी क्षमतेच्या बसेस उपलब्ध झाल्यास मध्यमवर्गीयांना सफारी सहज परवडेल. यामुळे हरित पर्यटनाला चालना मिळून ताडोबा पर्यटनाला नवी दिशा मिळेल.

    यासाठी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात ई-बसेसची तातडीने व्यवस्था करावी, अशी आग्रही मागणी करताना आ. मुनगंटीवार म्हणाले की, “पर्यावरणस्नेही सुविधा उभारल्या गेल्यास ताडोबा पर्यटनाच्या नव्या दिशेचा मार्ग खुला होईल व जगभरातून येणाऱ्या पर्यटकांना अविस्मरणीय अनुभव मिळेल.”

  • Chandrapur district planning committee meeting । चंद्रपूर जिल्हा नियोजन समिती बैठक : विकासकामांना गती देण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश

    Chandrapur district planning committee meeting

    Chandrapur district planning committee meeting : चंद्रपूर, दि. 25 : जिल्ह्याच्या सर्वंकष विकासासाठी जिल्हा नियोजन समिती कार्यरत असते. यात जिल्ह्यातील सर्व खासदार आणि आमदारांचा समावेश असतो. आपापल्या मतदारसंघातील विकास कामांबाबत तसेच नागरिकांच्या प्रश्नांबाबत लोकप्रतिनिधींकडून नियोजन समितीच्या बैठकीत मुद्दे उपस्थित केले जातात. त्यांनी दिलेल्या सुचनांची सर्व विभाग प्रमुखांनी गांभीर्याने दखल घ्यावी, असे निर्देश राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी दिले.

    रोड स्वीपिंग मशीन खरेदी घोटाळा, आप ची तक्रार

                नियोजन भवन येथे जिल्हा नियेाजन समितीच्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीला खासदार सर्वश्री प्रतिभा धानोरकर, डॉ. नामदेव किरसान, आमदार सर्वश्री सुधाकर अडबाले, सुधीर मुनगंटीवार, किशोर जोरगेवार, किर्तीकुमार भांगडीया, देवराव भोंगळे, करण देवतळे, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, प्रभारी मुख्य वनसंरक्षक प्रभुनाथ शुक्ला, नागपूर येथील उपायुक्त (नियोजन) अनिल गोतमारे, प्रभारी जिल्हा नियोजन अधिकारी सुभाष कुमरे आदी उपस्थित होते. Chandrapur annual development plan 2025

                नियोजन समितीच्या बैठकीमध्ये केलेल्या सुचनांची नोंद आणि अनुपालन अहवाल लोकप्रतिनिधींना पोहचविला जाईल, असे सांगून पालकमंत्री डॉ. उईके म्हणाले, सर्व विभागांनी आपापले प्रस्ताव सप्टेंबर अखेरपर्यंत सादर करावे. जेणेकरून प्रशासकीय मान्यता वेळेत देणे सोयीचे होईल. सेवा पंधरवड्यात जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्यांचा विषय प्राधान्याने घ्यावा. शहरी व ग्रामीण अंगणवाडीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी. सर्व शासकीय कार्यालयांमध्ये अभ्यागतांसाठी स्वच्छ पिण्याचे पाणी, शौच्छालय व इतर मुलभुत सोयीसुविधा असणे आवश्यक आहे, तसेच जिल्ह्यातील शाळांमध्ये स्वतंत्र स्वच्छता गृहासाठी निधी उपलब्ध करून देऊ. सामान्य रुग्णालयात मृत्यु झाल्यास मृतदेह घरी नेण्याकरीता खनीज निधीमधून शववाहिकेसाठी निधी दिला जाईल.

    शेतक-यांच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या पाणंद रस्त्याचा प्रश्न सेवा पंधरवड्यात मार्गी लावावा. घरकुला पासून कुणीही वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. चंद्रपूर जिल्ह्यात सिकलसेल / ॲनिमियाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आहे. आपला जिल्हा सिकलसेल मुक्त करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेतला जाईल. त्यासाठी कृती आराखडा सादर करावा. तसेच विद्युत कनेक्शनकरीता ज्यांनी अर्ज केले व पैसे भरले, त्यांच्याबाबत विशेष बाब म्हणून योग्य निर्णय घेण्यात येईल, असे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी सांगितले. Chandrapur rural road development

    development plan

    यावेळी सर्व खासदार व आमदारांनी सुचना केल्या.  तत्पुर्वी जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या गणित विषयाच्या विशेष पुस्तकाचे पालकमंत्री डॉ. उईके व इतर मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. प्रभारी जिल्हा नियोजन अधिकारी सुभाष कुमरे यांनी सादरीकरण केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी मुजीब शेख यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.

    जिल्ह्यासाठी एकूण मंजूर नियतव्यय

     : जिल्हा वार्षिक योजना सन 2025-26 साठी चंद्रपूर जिल्ह्यासाठी एकूण 700 कोटी 80 लक्ष रुपये नियतव्यय मंजूर आहे. यात सर्वसाधारण योजनेकरीता 510 कोटी, आदिवासी उपयोजनेकरीता 115 कोटी 80 लक्ष तर अनुसूचित जाती उपयोजनेकरीता 75 कोटी मंजूर नियतव्यय आहे. यावेळी, जून 2025 रोजी पार पडलेल्या बैठकीच्या इतिवृत्तावरील अनुपालनास मान्यता प्रदान करणे, जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) संदर्भात कार्यपध्दती निश्चितीकरण, नाविन्यपूर्ण योजना, सप्टेंबर 2025 अखेरपर्यंत खर्चाचा आाढावा घेण्यात आला.

  • Chandrapur road sweeping machine scam | चंद्रपूर मनपातील रोड स्वीपिंग मशीन खरेदीत मोठा भ्रष्टाचार? – आपचे गंभीर आरोप

    Chandrapur road sweeping machine scam

    Chandrapur road sweeping machine scam : चंद्रपूर २५ सप्टेंबर २०२५ : चंद्रपूर महानगरपालिकेद्वारे खरेदी करण्यात आलेल्या व्हॅक्युम असिस्टेड रोड स्वीपिंग मशीन व त्याच्या देखभाल-दुरुस्ती निविदेमध्ये कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप आम आदमी पार्टी, चंद्रपूरने केला आहे. या संदर्भात आम आदमी पार्टीचे चंद्रपूर महानगर अध्यक्ष योगेश दे. गोखरे यांच्या नेतृत्वाखाली आज मा. जिल्हाधिकारी यांना लेखी तक्रार सादर करण्यात आली.

    तक्रारीतील मुख्य मुद्दे :

    महागडी खरेदी – महानगरपालिकेने GEM पोर्टलवरून मशीन ₹१,०९,५०,०००/- मध्ये खरेदी केले, तर त्याच पोर्टलवर जास्त चांगल्या वैशिष्ट्यांची मशीन ₹५४ ते ₹६५ लाखात उपलब्ध होती. तरीही महागडी मशीन खरेदी करून मोठा संशय निर्माण केला गेला.

    मेंटेनन्स निविदा घोटाळा –

    मशीनच्या ऑपरेशन व देखभालीसाठी ₹८० लाखांची निविदा मंजूर करण्यात आली. गणनेनुसार, ७ कर्मचाऱ्यांचा वार्षिक पगार सुमारे ₹१२,६०,०००/-, मशीनच्या देखभालीसाठी व सर्व्हिसिंगसाठी सुमारे ₹२०,००,०००/- ते ₹२५,००,०००/- एवढा खर्च होतो. एकूण खर्च साधारण ₹३२ ते ₹३५ लाख एवढाच अपेक्षित असताना निविदा ₹८० लाखांना मंजूर करण्यात आली. महत्त्वाची बाब म्हणजे मशीनला लागणारा डिझेल खर्च हा महानगरपालिकेकडे आहे. त्यामुळे कंत्राटदाराला सुमारे ₹४० लाखांचा अतिरिक्त लाभ मिळाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

    १ ऑक्टोबर पासून ताडोबा मधील जिप्सी बंद

    घोटाळ्याचा अंदाज – मशीन खरेदी व देखभाल निविदा प्रक्रियेत मिळून सुमारे ₹१ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे आप, चंद्रपूरने निदर्शनास आणले.

    आम आदमी पार्टी, चंद्रपूर महानगर अध्यक्ष योगेश गोखरे यांनी सांगितले:

    “महानगरपालिकेने लोकांच्या पैशांचा उघड उघड गैरवापर केला आहे. कमी किमतीत व जास्त चांगल्या वैशिष्ट्यांची मशीन उपलब्ध असूनही महागडी मशीन खरेदी करून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आला आहे. त्यातच मशीनच्या देखभाल व ऑपरेशनसाठी अनावश्यकपणे दुपटीने खर्च दाखवून कंत्राटदाराला फायदा करून दिला आहे. या दोन्ही प्रकरणांत मिळून सुमारे एक कोटी रुपयांचा घोटाळा झालेला दिसतो. आम्ही या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व दोषींवर कठोर कारवाईची मागणी करतो. जर कारवाई झाली नाही, तर आम्हाला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल.” Road sweeping machine tender fraud

    तक्रार अर्ज देताना आम आदमी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सहसचिव सुनील मुसळे, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार, महानगर अध्यक्ष योगेश गोखरे, युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे, महानगर महिला अध्यक्ष तब्बसूम शेख, महानगर संघटणमंत्री संतोष बोपचे, महानगर शिक्षण आघाडी अध्यक्ष एकनाथ हांडेकर सर, विशाल बिरमवार, जितेंद्र भाटिया व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित होते.

  • Hansraj Ahir WCL meeting । सास्ती-गोवरी प्रकल्पातील जमीन अधिग्रहण व मोबदला प्रश्न सोडविण्यासाठी हंसराज अहीर यांचा पुढाकार

    Hansraj Ahir WCL meeting

    Hansraj Ahir WCL meeting : चंद्रपूर (२६ सप्टेंबर २०२५) बल्लारपूर वेकोली क्षेत्रीय कार्यालय येथे माननीय हंसराजजी अहिर, अध्यक्ष राष्ट्रीय मागासवर्ग आयोग यांचे द्वारा, मुख्य महाप्रबंधक, बल्लारपूर क्षेत्र व अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समवेत ऍड.संजय धोटे व सुदर्शन निमकर माजी आमदार यांच्या प्रमुख उपस्थितीत, गोवरी सेंट्रल, गौरी-पौनी विस्तारीकरण, गोवरी-पौनी एकत्रीकरण, बल्लारपूर नॉर्थ-वेस्ट,धोपटला यु.जी.टू ओसी, सास्ती विस्तारीकरण, धोपटाळा यु.जी. टू ओ.सी.येथील प्रकल्पग्रस्त बहुसंख्येने उपस्थित होते.

    पावसाचा जोर पुन्हा वाढणार

    वेकोली प्रकल्पातील जमीन अधिग्रहण, करारनामे, आर्थिक मोबदला,नोकरी मंजुरी, पुनर्वसन प्रस्तावित, सास्ती, पोनी, चिंचोली गावातील उर्वरित जमीन अधिग्रहण, गोवरी सेंट्रल प्रकल्पातील कलम 7 नंतर काही जमीन कलम 9 पासून वंचित राहणार असल्याबद्दल बैठकीत चर्चा झाली, सीएमपीडीआयएल द्वारा प्रस्तावित करण्यात आल्यानंतर,ही जमीन अधिग्रहनापासून वंचित होत असल्यामुळे प्रकल्पग्रस्तांवर अन्याय होत असल्याने याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश आयोगाद्वारे देण्यात आले. Ballarpur WCL project news

    क्षेत्रीय प्रबंधनाला विविध सूचना

    धोपटाळा प्रकल्पात तुकडेबंदी कायदा अवहेलना अंतर्गत, जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचेद्वारा ऑक्टोबर 2024 आणि एप्रिल 2025 रोजी पारित आदेशाच्या पार्श्वभूमीवर, नोकरी प्रस्ताव लवकरात लवकर मंजूर करण्यात यावे या विषयावर नागपूर मुख्यालयात झालेल्या बैठकीदरम्यान विस्तृत चर्चा झाल्याचे बैठकीदरम्यान सांगण्यात आले आणि परत आलेले नोकरी प्रस्ताव त्रुटींची पूर्तता करून त्वरित मुख्यालयाची मंजुरी प्राप्त करावी, पाच वर्षाच्या मर्यादेमुळे प्रलंबित ठेवण्यात आलेले क्षेत्रीय कार्यालयातील सर्व नोकरी प्रस्ताव मुख्यालयाला अंतिम मंजुरीसाठी पाठवण्यात यावे, तसेच भडांगपूर येथील काही शेतकऱ्यांचा प्रलंबित आर्थिक मोबदला, नोकरी यासाठी कार्यवाही करावी अशा सूचना अहीर यांचेद्वारे बैठकीदरम्यान क्षेत्रीय प्रबंधनाला देण्यात आल्या. WCL compensation and jobs

    निव्वळ न्यायालय प्रलंबिततेच्या कारणासाठी, अधिग्रहित जमिनीचे करारनामे, आर्थिक मोबदला, नोकरी प्रदान न करण्याच्या मुद्द्यावरही बैठकीत चर्चा झाली, उच्च न्यायाल मुंबई, नागपूर खंडपीठाने २०२२ मध्ये एका प्रकरणात दिलेल्या निर्णयानुसार, केवळ न्याय प्रलंबिततेच्या कारणासाठी 7/12 धारकाला अधिग्रहणाच्या लाभांपासून वंचित ठेवता येणार नाही, असे सर्व प्रकरनाना लागू होणारा स्पष्ट निकाल दिला आहे, अशी माहिती प्रकल्पग्रास्तांकडून देण्यात आली. मुख्यालय बैठकीत झालेल्या चर्चेनुसार, भूमीचा सिंचित दर्जा निश्चित करण्यासाठी, केवळ उपग्रह सर्वेक्षणावर अवलंबून न राहता, 7/12 तील सिंचित क्षेत्राच्या नोंदी, मोटार पंपाचे वीज बिल या आधारे सिंचीत दर्जा निश्चित करावा अशा सूचना करण्यात आल्या. WCL land acquisition Maharashtra

    बल्लारपूर भूमिगत खानीलगत वेकोलीच्या लीजप्राप्त भूमीलगत शेतकऱ्यांना शेती करणे अशक्य होत आहे, या संदर्भात बैठकीत चर्चा झाली, या ठिकाणी खुल्या खदानीसाठी विस्तारीकरण होणे हे शेतकरी व वेकोली दोन्हीसाठी हिताचे असल्याने याबाबत प्रस्ताव मुख्यालयाला पाठवण्याबद्दल तसेच जमिनीच्या भाव वाढीबाबत सुरू असलेल्या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर, वंशावळ देणे, कलम 14 (1) चा करारनामा करणे याबाबत विस्तृत चर्चा झाली. वंशावळ दिल्यानंतर भावघोषित झाल्यास तो शेतकऱ्यांना लागू राहावा यासाठी मसुद्यात बदल करण्यात यावा अशा सूचना आयोगाच्या माध्यमातून देण्यात आल्या.

    पर्यावरण संरक्षणासाठी आवश्यक उपाययोजनांचे नियोजन करणे,यामुळे नुकसान होणाऱ्या शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी वरिष्ठ पातळीवर झालेल्या चर्चेनुसार धोरण आखने, त्याची अंमलबजावणी करणे, ओबी कंपनीत राज्य सरकारच्या धोरणानुसार 80 टक्के स्थानिकांना, एचपीसी नुसार वेतनावर रोजगार उपलब्ध करून देणे, बुद्धा कंपनितील कामगारांचे गेल्या तीन-चार महिन्यांपासून प्रलंबित वेतन देणे आहे या बाबत सूचना बैठकीत पारित करण्यात आल्या .या सर्व कामगारांचे प्रलंबित वेतन येत्या आठवडाभरात दिले जाईल असे क्षेत्रीय प्रबंधानाने मान्य केले. बैठकीला अरुण म्हस्की ,राजू घरोटे ,मधुकर नरड,पुरुषोत्तम लांडे,बाळनाथ वडस्कर,सचिन शेंडे, सचिन कुडे ,सतीश बानकर, राकेश हिंगाणे, महादेव हिंगाणे यांचे सह प्रकल्पग्रस्तांची बहुसंख्येने उपस्थिती होती.

  • Maharashtra Rain Forecast September 2025 । 26 ते 28 सप्टेंबर महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा – शेतकऱ्यांना सतर्कतेचे आवाहन

    Maharashtra Rain Forecast September 2025

    Maharashtra Rain Forecast September 2025 : मुंबई, दि 25: बंगालच्या उपसागरावर एक कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे, आणि त्याच्या प्रभावामुळे राज्यातील विविध भागांमध्ये 26 ते 28 सप्टेंबर दरम्यान ढगाळ हवामान आणि पावसात वाढ होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. राज्यात किमान 5 ऑक्टोबर पर्यंत तरी मान्सून निरोप घेण्याची शक्यता नाही.

    चंद्रपुरात पोलीस ठाणेदार विरुद्ध पत्रकारांचे आंदोलन

    26 तारखेला दक्षिण विदर्भ आणि लगतच्या मराठवाड्यात दुपार नंतर ढगाळ हवामान आणि पावसात वाढ होऊ शकते. यात गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, आणि नांदेड जिल्ह्यांचा समावेश आहे. उर्वरित विदर्भ आणि मराठवाड्यात आभाळी हवामान आणि हलका पाऊस पडू शकतो.

    पावसात वाढ होणार

    26 तारखेच्या तुलनेत 27 आणि 28 ला राज्यात पावसाच्या प्रमाणात आणि क्षेत्रात वाढ होण्याचा अंदाज आहे. 27 तारखेला दक्षिण मराठवाड्यात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यात नांदेड, लातूर धाराशिव, बीड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांचा समावेश आहे. उर्वरित मराठवाड्यात देखील पावसात वाढ होऊ शकते, ज्यामुळे या भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. याच बरोबर दक्षिण विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील काही भागांमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस पडू शकतो, तर उर्वरित विदर्भात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाडा लगतचे मध्य महाराष्ट्रातील जिल्हे, जसं की सोलापूर, इथे मध्यम स्वरूपाचा पाऊस पाडण्याचे संकेत आहे. या दिवशी खानदेशात प्रामुख्याने हलका पाऊस पडू शकतो. Vidarbha Rain Forecast September

    28 तारखेला इतर भागांच्या तुलनेत पावसाचा जोर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अधिक राहण्याची शक्यता आहे. या दिवशी अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, रत्नागिरी, आणि रायगड जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. याच बरोबर मुंबई महानगरात (मुंबई शहर, ठाणे आणि पालघर जिल्हे) पाऊस अपेक्षित आहे, ज्यातील काही भागात देखील मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याचे संकेत आहे. पश्चिम विदर्भ, पश्चिम मराठवाडा आणि खानदेशात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे, तर उर्वरित विदर्भात प्रामुख्याने हलका पाऊस पडू शकतो. Heavy Rain Alert in Maharashtra

    शेतकऱ्यांनी हवामानाच्या या अंदाजानुसार शेतीचे नियोजन करावे. काढणी केलेली पिके पाऊस आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावीत, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे. दक्षिण मराठवाडा; कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसरातील धरण साठ्यात वाढ होऊन नदी-नाल्यांना पूर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून करण्यात आले आहे.

  • Statewide farmer protest in Maharashtra । अतिवृष्टीमुळे नुकसान शासनाची तुटपुंजी मदत, शेतकरी संघटना युवा आघाडीचे राज्यव्यापी आंदोलन

    Statewide farmer protest in Maharashtra

    Statewide farmer protest in Maharashtra : चंद्रपूर: अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीनंतर सरकारने जाहीर केलेल्या तुटपुंज्या मदतीमुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. विशेषतः चंद्रपूर जिल्ह्याला ओला दुष्काळग्रस्त यादीतून वगळण्यात आल्याने येथील शेतकरी प्रचंड नाराज झाले आहेत.

    शेतकऱ्यांवर कोसळलं अतिवृष्टीचं संकट

    सरकारने जाहीर केलेल्या मदतीवर सर्वच स्तरांतून टीका होत आहे. कोरडवाहू जमिनीसाठी प्रति गुंठा फक्त ८५ रुपये आणि बागायती (ओलिताच्या) जमिनीसाठी १७० रुपये इतकी तोकडी मदत जाहीर करण्यात आली आहे. ही मदत शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या तुलनेत नगण्य असून, यामुळे शेतकऱ्यांची थट्टा झाल्याची भावना व्यक्त होत आहे.

    या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, शेतकरी संघटना युवा आघाडीने सरकारविरोधात आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला आहे. या आघाडीचे प्रदेशाध्यक्ष ॲड. दीपक चटप यांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास २९ सप्टेंबर रोजी राज्यभरातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर धरणे आंदोलन करण्यात येईल. Chandrapur agriculture crisis and farmer protests

    या आंदोलनातून शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या सरकारसमोर ठेवल्या जाणार आहेत:

    1. हेक्टरी किमान ५० हजार रुपये मदत जाहीर करावी.
    2. शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करून सातबारा कोरा करावा.
    3. पीक विमा योजनेच्या नियमांमध्ये शेतकऱ्यांच्या हिताचे बदल करावेत.
    4. चंद्रपूर जिल्ह्याचा ओला दुष्काळग्रस्त जिल्ह्यांच्या यादीत तात्काळ समावेश करावा.

    या मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार शेतकरी संघटनांनी केला आहे. सरकारने तातडीने याकडे लक्ष न दिल्यास हे आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. या धरणे आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी होतील, असे ॲड. चटप यांनी स्पष्ट केले.

  • Chandrapur Farmer Flood Relief । शेतकऱ्यांवर कोसळलं अतिवृष्टी संकट – खासदार प्रतिभा धानोरकर यांची केंद्र सरकारकडे मदतीची मागणी

    Chandrapur Farmer Flood Relief

    Chandrapur Farmer Flood Relief : चंद्रपूर : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीने शेतीत सर्वाधिक नुकसान केले असून, शेतकरी पूर्णपणे हतबल झाला आहे. या नैसर्गिक संकटाकडे केवळ ‘नुकसान’ म्हणून न पाहता, हा आमच्या अन्नदात्याच्या आशा, स्वप्ने आणि भविष्याचा चिखल झाला आहे. खासदार प्रतिभा धानोरकर यांनी याच गंभीर विषयावर केंद्र सरकारचे कृषी आणि किसान कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांना थेट पत्र लिहून महाराष्ट्रासाठी तातडीने विशेष मदत पॅकेज जाहीर करण्याची आग्रही मागणी केली आहे.

    १ ऑक्टोम्बर पासून ताडोब्यातील जिप्सी बंद करणार, खासदार धानोरकर यांचा इशारा

    खासदार प्रतिभा धानोरकर यांनी पत्रात शेतकऱ्यांची व्यथा तीव्र शब्दांत मांडली आहे. त्यांनी म्हटले आहे की, सोयाबीन, कापूस, धान, तूर, भाजीपाला आणि फळांची उभी असलेली सोन्यासारखी पिके डोळ्यांदेखत पाण्याखाली बुडाली आहेत. “ज्या धान्यासाठी शेतकरी दिवस-रात्र घाम गाळत होता, ते पूर्णपणे सडून गेले आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. शेतकऱ्याच्या नशिबी आलेली ही घोर निराशा आणि हताशता केवळ शब्दांत व्यक्त करणे अशक्य नसल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.”

    कर्जाचे डोंगर, जगण्याचा मोठा प्रश्न

    नुकसानीमुळे प्रत्येक शेतकऱ्यावर कर्जाचे मोठे डोंगर आणि जगण्याचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. त्यांचे मन वेदनांनी भरले असून, या संकटातून बाहेर पडण्यासाठी त्यांना तात्काळ आर्थिक आधाराची नितांत गरज आहे. त्यामुळे खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केंद्र सरकारला या संकटकाळात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे आवाहन केले आहे.

  • Chandrapur Devi Visarjan 2025 । देवी विसर्जनासाठी ईरई नदीवर खास व्यवस्था – नागरिकांनो जाणून घ्या मनपाचे प्लॅनिंग

    Chandrapur Devi Visarjan 2025

    Chandrapur Devi Visarjan 2025 : चंद्रपूर 25 सप्टेंबर –  शहरात नवरात्रोत्सवानंतर होणाऱ्या देवी विसर्जन सोहळ्यासाठी चंद्रपूर महानगरपालिकेद्वारे तयारी केली जात असुन इरई नदी हेच विसर्जनाचे अधिकृत स्थळ असल्याचे मनपाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.

    चंद्रपुरात पोलिसांविरोधात पत्रकार आक्रमक

       विसर्जन सुरळीत पार पडावे यादृष्टीने मनपाची शहर नियंत्रण समिती कार्यरत असुन मिरवणुकी दरम्यान अनुचित घटना घडु नये याकरीता विसर्जन स्थळावर सीसीटीव्ही लावण्यात येत आहेत. विद्युत विभागामार्फत मार्गावर तसेच विसर्जन स्थळावर पुरेशी लाईट व्यवस्था करण्यात येणार आहे. आरोग्य विभागामार्फत आरोग्य पथकाची चमु वैद्यकीय सेवा देण्यास पूर्ण वेळ विसर्जनस्थळी राहणार असुन अँब्युलन्सचीही व्यवस्था करण्यात येत आहे.

    मनपाची तयारी

      यांत्रिकी विभागामार्फत वाहन व्यवस्था सांभाळण्यात येत असुन विसर्जन स्थळी लागणारे पिण्याचे पाणी, फिरते शौचालय कार्यरत ठेवण्यात येणार आहे.अग्निशमन विभागामार्फत आपत्ती व्यवस्थापन चमु पुर्ण वेळ तैनात राहणार असुन विसर्जनप्रसंगी आवश्यक त्या साधने उपलब्ध केली गेली आहेत. स्वच्छता विभागाद्वारे रस्त्यांची नियमित सफाई करण्यात येत असुन रस्त्यावर व विसर्जन स्थळी कचरा जमा राहु नये यादृष्टीने घनकचरा संकलनाचे नियोजन करण्यात आले आहे. ईरई नदी या मुख्य विसर्जन स्थळाची स्वच्छता केली गेली आह. विसर्जनानंतर त्याच रात्री सर्व रस्ते स्वच्छ करून सकाळी सर्वांना स्वच्छ रस्त्याचा वापर मनपा स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांनी मिळतो. Irrai River immersion Chandrapur

    नवरात्रात लागणाऱ्या विविध परवानग्या या मनपाने सुरु केलेल्या एक खिडकी योजनेद्वारे देण्यात आल्या आहेत. यंदा 229 मंडळांनी परवानगीसाठी अर्ज ऑनलाईन अर्ज सादर केला होता. महानगरपालिकेद्वारे ही सर्व कार्ये दरवर्षी पार पाडली जातात. यावर्षीसुद्धा देवी विसर्जन सोहळा हा शांततेत व आनंदात पार पाडण्यास सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

  • digital media ethics code violation by police । ठाणेदार योगेश हिवसे विरोधात पत्रकारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन

    digital media ethics code violation by police

    digital media ethics code violation by police : चंद्रपूर:- २५ सप्टेंबर २०२५ – पडोली पोलीस स्टेशन चे ठाणेदार योगेश हिवसे हे अवैध धंदेवाईक यांचे संरक्षण करतात आणि अवैध धंदेवाईक यांच्या अड्ड्यावर पत्रकार बातमी करिता गेले असता त्यांना अवैध व्यवसाई बेदम मारहान केल्यानंतर त्यांच्या विरोधात पत्रकार पोलीस स्टेशन मध्ये तक्रार करायला गेल्यानंतर अवैध व्यवसायीकांवर गुन्हे दाखल करण्याचे सोडून उलट पोलिसाकडून पत्रकाराला धमकावल्या जात असल्याने भूमिपुत्राची हाक न्यूज पोर्टल चे संपादक राजू कुकडे यांचेवर ठाणेदार योगेश हिवसे यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात नसताना खाकी वर्दीचा दुरुपयोग करून त्यांनी गुन्हे दाखल केले.

    ताडोबा जंगल सफारी महाग, खासदार धानोरकर यांनी दिला आंदोलनाचा इशारा

    त्या विरोधात इंडियन डिजिटल मिडिया अँड ब्रॉडकास्ट असोसिएशन चंद्रपूर तर्फे सर्व पत्रकारांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनास जेष्ठ पत्रकार किशोर पोतनवार यांच्यासाह जिल्ह्यातील शेकडो पत्रकार उपस्थित राहणार असल्याचा अंदाज आहे. Chandrapur journalist protest news

    अवैध धंद्याची बातमी दिली म्हणून गुन्हा दाखल

    भारतीय संविधानाच्या कलम १९(१)(अ) द्वारे प्रेसला संरक्षण देण्यात आले आहे, जे भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकाराची हमी देते. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा वारंवार निर्णय दिला आहे की, हे प्रेस स्वातंत्र्याचा समावेश करते, शिवाय आपल्या महाराष्ट्र राज्यात पत्रकार संरक्षण अधिनियम 2017 व पत्रकार सुरक्षा कायदा 2019 अन्वये पत्रकारांना महाराष्ट्र शासनाने संरक्षण दिले आहे, मात्र चंद्रपूर जिल्ह्याच्या पोलीस प्रशासनातले पडोली पोलीस स्टेशनं चे ठाणेदार योगेश हिवसे यांनी भूमिपुत्राची हाक न्यूज पोर्टल चे संपादक राजू कुकडे यांचेवर पोलीस स्टेशन परिसरात अवैध धंदे याबद्दल बातमी दिल्या प्रकरणी गुन्हे दाखल केले आहे जें पत्रकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे व पत्रकार संरक्षण कायद्याचे उल्लंघन असल्याने पत्रकार संतापले आहे. Digital Media Ethics Code violation India

    भारत सरकार ने माहिती तंत्रज्ञान नियम, २०२१ अनुसार इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने माहिती तंत्रज्ञान ( डिजिटल मीडिया नीतिमत्ता संहिता) नियम, २०२१ अधिसूचिना काढली आहे, त्यानुसार कुठल्याही न्यूज पोर्टल व इलेक्ट्रॉनिक न्यूज चैनेल, यु ट्यूब चैनेल च्या पत्रकारावर पोलीस स्टेशन मध्ये बातम्या संदर्भात सरळ गुन्हा नोंद होऊ शकतं नाही, त्यासाठी या कायाद्यानुसार डिजिटल मीडिया नीतिमत्ता संहिता नुसार अगोदर संबंधित संपादक यांचेकडे तक्रार नोंद करावी लागते, त्यांनंतर जर सकारात्मक उत्तर संपादक यांनी दिले नाही तर त्यांचे जिल्हा न्यायालयाचे माजी न्यायाधीश किंव्हा उच्च न्यायालयाचे अधिवक्ता यांची नियुक्ती केलेल्या डिजिटल मीडिया मध्यस्थाकडे प्रकरण वर्ग केल्यानंतर त्यांचेकडे सुनावणी झाल्यानंतर मग गुन्हा नोंद करायचा की नाही याबद्दल निर्णय पोलीस प्रशासन घेऊ शकते. digital media ethics code violation by police

    ठाणेदार विरोधात ठिय्या आंदोलन

    मात्र पडोली पोलीस स्टेशन चे ठाणेदार योगेश हिवसे यांना सदर कायाद्याचे ज्ञान नसल्याने त्यांनी ज्या पद्धतीने आपल्या पदाचा दुरुपयोग करून माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने मंजूर केलेल्या डिजिटल मीडिया नीतिमत्ता संहिता नियम, २०२१ चे उल्लंघन केले आहे, या प्रकरणी त्याचेवर पत्रकारांचा पत्रकार सरक्षण अधिनियम 2017 व पत्रकार सुरक्षा अधिनियम 2019 अंतर्गत पत्रकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर झालेल्या हल्ल्याची दखल घेऊन व उच्चस्तरीय चौकशी करून त्यांचेवर पत्रकार संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करावा या मागणी करिता जिल्ह्यातील सर्व पत्रकार संघटना पदाधिकारी आणि वार्ताहर पोलीस प्रशासनाविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन उद्या दिनांक 26/9/2025 ला सकाळी 11.00 ते सायंकाळी 4.00 वाजेपर्यंत करण्यात येत आहे. Journalist Safety Act 2019 Maharashtra

    तरी या आंदोलनात सर्व पत्रकारांनी आपल्या हक्क अधिकारासाठी आंदोलनात सहभागी व्हावं असं आवाहन इंडियन डिजिटल मिडिया अँड ब्रॉडकास्ट असोसिएशन चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष अनुप यादव संजय कन्नावार, राजू बिट्टूरवार, दिनेश एकोणकर यांचेसह सर्व पत्रकार संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.