Statewide farmer protest in Maharashtra
Statewide farmer protest in Maharashtra : चंद्रपूर: अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीनंतर सरकारने जाहीर केलेल्या तुटपुंज्या मदतीमुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. विशेषतः चंद्रपूर जिल्ह्याला ओला दुष्काळग्रस्त यादीतून वगळण्यात आल्याने येथील शेतकरी प्रचंड नाराज झाले आहेत.
शेतकऱ्यांवर कोसळलं अतिवृष्टीचं संकट
सरकारने जाहीर केलेल्या मदतीवर सर्वच स्तरांतून टीका होत आहे. कोरडवाहू जमिनीसाठी प्रति गुंठा फक्त ८५ रुपये आणि बागायती (ओलिताच्या) जमिनीसाठी १७० रुपये इतकी तोकडी मदत जाहीर करण्यात आली आहे. ही मदत शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या तुलनेत नगण्य असून, यामुळे शेतकऱ्यांची थट्टा झाल्याची भावना व्यक्त होत आहे.
या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, शेतकरी संघटना युवा आघाडीने सरकारविरोधात आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला आहे. या आघाडीचे प्रदेशाध्यक्ष ॲड. दीपक चटप यांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास २९ सप्टेंबर रोजी राज्यभरातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर धरणे आंदोलन करण्यात येईल. Chandrapur agriculture crisis and farmer protests
या आंदोलनातून शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या सरकारसमोर ठेवल्या जाणार आहेत:
- हेक्टरी किमान ५० हजार रुपये मदत जाहीर करावी.
- शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करून सातबारा कोरा करावा.
- पीक विमा योजनेच्या नियमांमध्ये शेतकऱ्यांच्या हिताचे बदल करावेत.
- चंद्रपूर जिल्ह्याचा ओला दुष्काळग्रस्त जिल्ह्यांच्या यादीत तात्काळ समावेश करावा.
या मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार शेतकरी संघटनांनी केला आहे. सरकारने तातडीने याकडे लक्ष न दिल्यास हे आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. या धरणे आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी होतील, असे ॲड. चटप यांनी स्पष्ट केले.
Leave a Reply