Blog

  • Expensive Tadoba Safari Tourism । १ ऑक्टोबरपासून ताडोबात जिप्सी प्रवेश बंद? खासदार प्रतिभा धानोरकर यांचा इशारा

    Expensive Tadoba Safari Tourism

    Expensive Tadoba Safari Tourism : चंद्रपूर २५ सप्टेंबर २०२५ : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे प्रवेश शुल्क सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर असल्याने चंद्रपूर जिल्ह्याच्या नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. विशेषतः शनिवार-रविवारसाठी कोर झोनमधील तब्बल १२,६०० चे शुल्क स्थानिक लोकांसाठी ताडोबा दर्शन केवळ एक ‘स्वप्न’ बनवत आहे. याच पार्श्वभूमीवर, जिल्ह्याच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी वनमंत्री गणेश नाईक यांना कठोर भाषेत पत्र लिहून तातडीने शुल्क कपातीची मागणी केली आहे.

    मुसळधार पावसामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालये बंद

    *मानव-वन्यजीव संघर्षातही स्थानिकांवर आर्थिक भुर्दंड*

    चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मानव-वन्यजीव संघर्ष आहे. नागरिक वाघांच्या हल्ल्यांमुळे जीव गमावत असताना, त्याच जिल्ह्यातील लोकांना वाघाचे दर्शन घेण्यासाठी हजारो रुपये मोजावे लागत आहेत. हा दुजाभाव त्वरित थांबवावा, अशी स्थानिकांची मागणी आहे.सध्याचे प्रवेश शुल्क (प्रति जिप्सी, एक वेळ):झोनदिवसएकूण शुल्ककोरसोमवार – शुक्रवाररु. ८,६००कोरशनिवार – रविवाररु. १२,६००बफरसोमवार – शुक्रवाररु. ७,३००बफरशनिवार – रविवाररु. १०,३०० Tadoba fee hike local citizens

    *खासदारांची लोकहितकारी मागणी*


    “स्थानिक नागरिकांना ताडोबा येथे जाण्यासाठी केवळ ₹२७००/- वाहन शुल्क आणि ₹६००/- प्रति व्यक्ती शुल्क आकारले जावे. ताडोबामुळे चंद्रपूरची ओळख आहे, पण आज ताडोबा येथील लोकांनाच परका झाला आहे. हा अन्याय आम्ही कदापि सहन करणार नाही.”*- प्रतिभा धानोरकर, खासदार*

    *१ ऑक्टोबरपासून ‘जिप्सी प्रवेश बंद’ आंदोलनाचा इशारा*

    खासदार प्रतिभा धानोरकर यांनी वनमंत्र्यांना स्पष्ट आणि अंतिम इशारा दिला आहे की, जर १ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या नवीन पर्यटन हंगामापूर्वी स्थानिक नागरिकांसाठी शुल्क कपातीचा निर्णय लागू झाला नाही, तर १ ऑक्टोबर रोजी ताडोबात एकही जिप्सी आत जाऊ दिली जाणार नाही.हा इशारा केवळ एक मागणी नसून, चंद्रपूरच्या नागरिकांच्या हक्कांसाठी उभारलेले हे मोठे आणि निर्णायक आंदोलन असेल, असे खासदार प्रतिभा धानोरकर यांनी ठामपणे सांगितले आहे. शासनाने या गंभीर विषयावर तातडीने लक्ष देऊन स्थानिकांना न्याय द्यावा, अशी तीव्र अपेक्षा व्यक्त होत आहे.
  • Chandrapur Weather Update । मुसळधार पावसाचा तडाखा: चंद्रपूर जिल्ह्यात शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

    Chandrapur Weather Update

    Chandrapur Weather Update :चंद्रपूर २५ सप्टेंबर २०२५: जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे इरई धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून धरणाचे एकूण पाच दरवाजे उघडण्यात आले असून, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर, अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

    चंद्रपुरात भूकंप? नेमकं काय घडलं?

    इरई धरणाची स्थिती आणि नदीकाठच्या गावांना सूचना

    सध्या इरई धरणाची पाणी पातळी २०७.३७५ मीटर पर्यंत पोहोचली आहे. धरणातून पाण्याचा विसर्ग नियंत्रित करण्यासाठी आधी तीन दरवाजे ०.२५ मीटरने उघडण्यात आले होते. आता, आणखी दोन दरवाजे ०.२५ मीटरने उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे नदीच्या पाणी पातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. Irai Dam Water Release Chandrapur

    प्रशासनाने नदीकाठच्या गावांना विशेषतः सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांनी नदीपात्र ओलांडू नये आणि जनावरांना नदीकाठी सोडू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व संबंधितांनी ही माहिती त्यांच्या संपर्कातील सर्वांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

    मुसळधार पाऊस: शाळा-महाविद्यालये बंद

    जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आज (२५ सप्टेंबर २०२५) जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. ज्या शाळा सकाळी सुरू झाल्या आहेत, त्यांना सकाळी ११ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे घरी सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या सूचना सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी (BDO) आणि शिक्षणाधिकारी यांना देण्यात आल्या आहेत. Chandrapur Schools Holiday Rain

    नागभीड तालुक्यात दुर्देवी घटना: एकाचा मृत्यू

    नागभीड तालुक्यातून एका दुर्देवी घटनेची माहिती समोर आली आहे. नागभीड तालुक्यातील गोविंदपूर येथील रहिवासी असलेले धर्मा देवाजी शेंडे (वय अंदाजे ६५) यांचा त्यांच्या घराशेजारील विहिरीवर असलेल्या मोटरपंपाला विजेचा धक्का (करंट) लागून मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी घडली. धर्मा शेंडे यांच्या नावे गोविंदपूर येथे शेती आहे. तहसीलदार नागभीड यांनी या घटनेची माहिती दिली आहे.

  • Chandrapur Warora Earthquake Update । भूकंप की ॲपची चूक? चंद्रपूरकरांसाठी प्रशासनाचं महत्वाचं अपडेट

    Chandrapur Warora Earthquake Update

    Chandrapur Warora Earthquake Update : चंद्रपूर: २४ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजून १९ मिनिटांनी चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील मार्डा आणि एकोना परिसरात ३.२ रिश्टर स्केल भूकंपाची नोंद झाल्याची माहिती ‘सेसमिक स्टडी ऑफ इंडिया’ या भूकंप ॲपवर दिसली. यामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, तातडीने केलेल्या चौकशीत स्थानिक प्रशासनाने भूकंपाची शक्यता फेटाळून लावली आहे.

    चंद्रपूरच्या रस्त्यावर युवकाची दहशत, हातात तलवार घेत नागरिकांना धमकविण्याचा प्रयत्न

    प्रशासनाने केली सत्यता पडताळणी

    आपत्ती व्यवस्थापन, चंद्रपूरने दिलेल्या माहितीनुसार, भूकंप ॲपवर नोंद झाल्यानंतर लगेचच वरोरा परिसरातील ग्रामस्थ, पोलिस पाटील, तलाठी आणि वेकोली खदान व्यवस्थापनाशी संपर्क साधून खात्री करण्यात आली. या सर्व तपासणीत कोणालाही भूकंपाचे धक्के जाणवले नसल्याचे समोर आले. तसेच, कोणत्याही प्रकारच्या नुकसानीची नोंद झालेली नाही.

    भूकंपाची नोंद खरी, पण धक्के नाहीत?

    ज्या वेळी भूकंप ॲपवर ही नोंद झाली, त्याच वेळी मार्डा आणि एकोना गावातील लोकांनी कोणतेही भूकंपाचे धक्के जाणवले नसल्याचे सांगितले. यामुळे, जरी ॲपवर भूकंपाची नोंद झाली असली, तरी जमिनीवर त्याचे कोणतेही प्रत्यक्ष परिणाम जाणवले नाहीत. या घटनेमुळे नागरिकांनी घाबरून न जाता, प्रशासनाकडून अधिकृत माहितीची वाट पाहावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

  • Chandrapur Police Seized Weapons । चंद्रपूर शहरातील रस्त्यावर हातात तलवार घेऊन दहशत माजविण्याचा प्रयत्न

    Chandrapur Police Seized Weapons

    Chandrapur Police Seized Weapons : चंद्रपूर २४ सप्टेंबर २०२५ : रामनगर पोलिसांनी शहरात तलवारी घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या एका आरोपीला अटक केली आहे. आरोपी धीरज बबलू यादव (वय ३२, रा. लखमापूर, जि. चंद्रपूर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून तीन स्टीलच्या तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी त्याचा साथीदार राहुल (रा. लखमापूर) हा मात्र फरार आहे.

    वडिलांसमोर मुलावर वाघाचा हल्ला, मुलगा ठार

    स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शहरात गस्त घालत असताना, त्यांना गोपनीय माहिती मिळाली की, काही व्यक्ती तलवारी घेऊन दहशत निर्माण करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, वडगाव ते आंबेडकर सभागृह परिसरात धीरज यादव हातात तलवार घेऊन लोकांना धमकावत असताना पोलिसांना आढळला. पोलिसांनी तात्काळ त्याला ताब्यात घेतले.

    साथीदार पसार

    पोलिसांनी त्याच्याकडून ३,००० रुपये किमतीच्या तीन धारदार तलवारी जप्त केल्या आहेत. या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात धीरज यादव आणि त्याचा साथीदार राहुल (मो. ७४९९१७२२४) यांच्याविरोधात भारतीय हत्यार कायद्यांतर्गत गुन्हा (अ.क्र. ७७९/२०२५) दाखल करण्यात आला आहे.

    ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे एपीआय बलराम झाडोकर, पीएसआय संतोष निभोरकर, पीएसआय सर्वेश बेलसरे, पोहेकॉ जय सिंग, सचिन गुरनुले, संतोष येलपुलवार, नितीन रायपुरे आणि दिनेश अराडे यांच्या पथकाने केली. फरार आरोपी राहुलचा पोलीस शोध घेत आहेत.

  • Tadoba Jeep Driver Killed । वडिलांसमोरच वाघाचा हल्ला; तरुण जीप चालकाचा दुर्दैवी मृत्यू

    Tadoba Jeep Driver Killed

    Tadoba Jeep Driver Killed : मोहर्ली २४ सप्टेंबर २०२५ : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात येणाऱ्या भामडेली गावात आज (२४ सप्टेंबर २०२५) सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास वाघाच्या हल्ल्यात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. अमोल बबन नन्नावरे (वय ३७, रा. भामडेली) असे मृताचे नाव असून, ते ताडोबा व्याघ्र प्रकल्पात जीप चालक म्हणून काम करत होते. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 33 नागरिकांचा बळी गेला असून यामध्ये वाघ 30, बिबट 2 तर हत्तीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला आहे.

    नेमकी घटना कशी घडली?

    सकाळी अमोल नन्नावरे आपल्या शेतात औषध फवारणीसाठी लागणारा मोटर पंप आपल्या वडिलांना देण्यासाठी गेले होते. त्याचवेळी शिकारीच्या शोधात असलेल्या वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. वाघाने अमोलला सुमारे ५० फूटपर्यंत फरफटत नेले. Tadoba Tiger Attack News

    गुराख्यावर वाघाचा हल्ला, गुराखी जखमी

    ही संपूर्ण घटना त्यांच्या वडिलांच्या डोळ्यासमोर घडली. वडिलांनी आरडाओरड केल्यावर वाघाने अमोलचा मृतदेह सोडून जंगलाच्या दिशेने पळ काढला. अमोलच्या मानेवर गंभीर जखमा आढळल्या आहेत. मृतदेह शवविच्छेदनासाठी भद्रावती येथे पाठवण्यात आला आहे.

    प्रशासनाची तत्परता

    घटनेची माहिती मिळताच भद्रावती पोलीस, वन परिक्षेत्र अधिकारी संतोष थीपे, क्षेत्र सहायक एस. जुमडे, बालपणे, वनरक्षक, पीआरटी टीम, वन मजूर आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले.

    ग्रामस्थांची मागणी

    अमोलच्या पश्चात पत्नी आणि एक लहान मुलगा असा परिवार आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. वाघाला पकडून त्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे.

    खासदार प्रतिभा धानोरकर यांची आक्रमक मागणी; मृतकाच्या कुटुंबीयांना ५० हजार रुपयांची तातडीची मदत

    चंद्रपूर जिल्ह्यातील मोहर्ली वनपरिक्षेत्रातील सीतारामपेठ बिटात वाघाच्या हल्ल्यात अमोल बबन नन्नावरे (वय ३८, रा. भामडेळी) या तरुणाचा मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण चंद्रपूर जिल्हा हादरला असून, नन्नावरे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. Tadoba Buffer Zone Death Case

    घटनेची माहिती मिळताच चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी तात्काळ वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आक्रमक भूमिका घेतली. ज्या वाघाने अमोल नन्नावरे यांचा जीव घेतला, त्या नरभक्षक वाघाला तातडीने पकडून जेरबंद करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

    खासदार प्रतिभा धानोरकर यांनी म्हटले, “शेतकरी बांधव आपल्या शेतात सुरक्षित नसतील तर ही बाब अत्यंत गंभीर आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. जोपर्यंत या वाघाला पकडून जेरबंद केले जात नाही, तोपर्यंत नागरिकांचा जीव धोक्यात आहे. वन विभागाने तात्काळ विशेष मोहीम हाती घेऊन या वाघाला जेरबंद करण्याचे निर्देश मी दिले आहेत.

    खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या निर्देशानुसार, मृत अमोल नन्नावरे यांच्या पत्नी प्रेमिला अमोल नन्नावरे यांना घटनास्थळीच तात्काळ रोख ५०,०००/- रुपयांची मदत देण्यात आली. तसेच, नन्नावरे कुटुंबियांना नियमानुसार पुढील शासकीय मदत लवकरात लवकर आणि कोणत्याही अडथळ्याशिवाय मिळावी, यासाठी प्रशासकीय कार्यवाही तातडीने पूर्ण करावी, असे आदेशही त्यांनी दिले.

  • Shiv Sena Independent Strategy । शिवसेना ठाकरे गटाचा स्वबळाचा नारा; चंद्रपूर मनपा निवडणुकीत 66 उमेदवारांची तयारी!

    Shiv Sena Independent Strategy

    Shiv Sena Independent Strategy : चंद्रपूर (२४ सप्टेंबर २०२५) – आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाने पत्रकार परिषदेच्या माध्यमातून स्वबळाचा नारा दिला आहे. महाविकास आघाडीमध्ये सन्मानजनक जागा मिळाल्या तर सोबत लढू अशी माहिती जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांनी पत्रकार परिषदेच्या मार्फत दिली.

    हुशार विद्यार्थी, भावी डॉक्टरने उचलले टोकाचे पाऊल

    महाविकास आघाडीमधील शिवसेना या घटकपक्षाला सन्मानजनक जागा मिळाल्या नाहीतर आम्ही स्वबळावर निवडणूका लढू याबाबत आम्ही आपल्या स्तरावरून तयारी केली आहे.
    पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आम्हाला स्थानिक निवडणुका बाबत आपण आपल्या स्तरावर युती करावी असा आदेश आम्हाला दिला आहे, याबाबत सध्यातरी महाविकास आघाडीची याबाबत आमची बैठक झाली नाही. गिर्हे पुढे म्हणाले की जर आमची बैठक झाली तर आम्ही 15 ते 16 जागेवर मनपा निवडणुकीत उमेदवार उभे करणार. Shiv Sena Chandrapur Election 2025

    निवडणूक स्वबळावर लढू

    वर्ष 2017 च्या मनपा निवडणुकीत 2 नगरसेवक शिवसेना पक्षाचे निवडून आले होते, त्यावेळी 11 उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होते. जर महाविकास आघाडीमध्ये आम्हाला सन्मानपूर्वक जागा मिळाल्या नाहीतर आम्ही चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीत 66 उमेदवार आमच्या पक्षाचे उतरविणार अशी माहिती जिल्हाप्रमुख गिर्हे यांनी यावेळी दिली. विधानसभा निवडणुकीत एकतरी जागा शिवसेना लढत होती मात्र ऐनवेळी वरच्या पातळीवरून पहिल्यांदा शिवसेनेला चंद्रपूर जिल्ह्यात विधानसभेची एकही जागा मिळाली नाही, तरीसुद्धा शिवसेना जिल्हाप्रमुखाने निवडणूक लढत दुसऱ्या क्रमांकावर मजल मारली, कांग्रेसचे जागा शिवसेनेने विधानसभा निवडणुकीत दाखवली होती. पण आता जागावाटपात सन्मान मिळायला हवा.

    पत्रकार परिषदेत महानगरप्रमुख सुरेश पचारे, सतीश भिवंगडे, सिनेट सदस्य निलेश बेलखेडे, राहुल विरुटकर, प्रमोद पाटील यांची उपस्थिती होती.


  • Immediately declare a wet drought | चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर संकट: मुख्यमंत्र्यांकडे तातडीची मागणी

    Immediately declare a wet drought

    Immediately declare a wet drought : चंद्रपूर – २३ सप्टेंबर २०२५ – महायुती सरकारने राज्यातील अनेक जिल्ह्यांना ओला दुष्काळ जाहीर केला आहे. मात्र, शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले चंद्रपूर जिल्हा या घोषणेतून वगळला गेल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

    भद्रावती केंद्रीय विद्यालयाची इमारत जीर्ण, खासदार धानोरकर यांची तात्काळ कारवाई

    जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे हजारो एकरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. शेतजमिनी वाहून गेल्या, घरांची व शेतीमालाची हानी झाली. शेतकरी कर्जबाजारीपणात सापडला असून आर्थिक संकट गडद झाले आहे.

    या पार्श्वभूमीवर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दिनेश दादाजी चोखारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करून तातडीने चंद्रपूर जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे.

    निवेदनातील प्रमुख मागण्या :

    • चंद्रपूर जिल्ह्यात तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा.
    • बाधित शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत, कर्जमाफी व तातडीने दिलासा द्यावा.
    • शेतीपयोगी साधनसामग्री व घरांचे नुकसान भरून काढण्यासाठी विशेष पॅकेज द्यावे.

    निवेदनाची प्रत कृषीमंत्री यांनाही पाठविण्यात आली आहे.
    शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी ठाम मागणी चोखारे यांनी केली आहे.

  • All India primary teachers TET mandatory । टीईटी अनिवार्य निर्णयामुळे शिक्षकांची चिंता; राज्य सरकारने हस्तक्षेप करावा

    All India primary teachers TET mandatory

    All India primary teachers TET mandatory : चंद्रपूर २३ सप्टेंबर २०२५ – सर्वोच्च न्यायालयाने शाळांमध्ये शिकवणाया शिक्षकांना १ सप्टेंबर २०२५ पासून टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य केले आहे. या निर्णयामुळे लाखो शिक्षकांमध्ये निराशा आणि गोंधळ निर्माण झाला आहे. अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष सतीश बावणे यांनी पत्रकार परिषदेत या समस्येवर उपाय म्हणून राज्य सरकारच्या हस्तक्षेपाची मागणी केली आहे.

    त्यांनी स्पष्ट केले की १ सप्टेंबर २०२५ रोजीच्या सर्वोच्च न्यायालयाच्या अलीकडील निर्णयामुळे शाळांमधील सेवेत असलेल्या सर्व शिक्षकांना टीईटी परीक्षा उत्तीर्ण करने अनिवार्य केले आहे. राज्य नियमांनुसार सेवा देणाया शिक्षकांसाठी, त्यांचा सेवा कालावधी आणि मागील पात्रता काहीही असो, टीईटी उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. पाच वर्षांपेक्षा कमी सेवा शिल्लक असलेल्या शिक्षकांसाठी टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे अशक्य आहे. TET exam compulsory for in-service teachers

    उभ्या वाहनाला चारचाकी वाहनांची धडक, तरुणी ठार २ जखमी

    जर पाच वर्षांपेक्षा कमी सेवा असलेला शिक्षक पदोन्नतीची मागणी करत असेल तर त्यांना टीईटी उत्तीर्ण झाल्याशिवाय पात्र मानले जाणार नाही. आरटीई कायद्याच्या अंमलबजावणीपूर्वी नियुक्त झालेल्या आणि निवृत्तीपूर्वी पाच वर्षांपेक्षा कमी कालावधी शिल्लक असलेल्या सेवारत शिक्षकांना निर्धारित वेळेत टीईटी उत्तीर्ण होणे आवश्यक असेल.

    तर शिक्षणाच्या गुणवत्तेवरही विपरीत परिणाम

    सेवारत शिक्षकांसाठी आणि त्यांच्या पदोन्नतीसाठी टीईटी अनिवार्य करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाबद्दल अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघटनेने तीव्र दुःख आणि नाराजी व्यक्त केली. अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघटना याला असंवैधानिक आणि नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वांच्या विरुद्ध मानते. यामुळे केवळ सेवारत शिक्षकांचे मनोधैर्य खचू शकते असे नाही तर शिक्षण पद्धती आणि शिक्षणाच्या गुणवत्तेवरही विपरीत परिणाम होऊ शकतो. Primary teachers association TET government intervention

    एनसीटीई आणि न्यायालयांनी सुरुवातीपासूनच टीईटीच्या मुद्द्याचा गैरसमज केला आहे. खरं तर जेव्हा मुलांचा मोफत आणि सक्तीचा शिक्षण हक्क कायदा, २००९ (आरटीई कायदा) लागू करण्यात आला तेव्हा देशभरात अनेक अपात्र पैरा शिक्षक कार्यरत होते. शिक्षण हक्क कायदा, २००९ च्या कलम २3 अंतर्गत अशा शिक्षकांची भरती करणे आवश्यक असल्याने पात्रता चाचणी सुरू करण्यात आली आणि ती अनिवार्य करण्यात आली.

    शाळा बंद होण्याची आणि विलीनीकरण होण्याची शक्यता

    राज्यात आधीच पात्र शिक्षकांची तीव्र कमतरता आहे. परिणामी, सार्वजनिक शिक्षण हा संविधानानुसार मूलभूत अधिकार असूनही, लोकांच्या नजरेत त्याची विश्वासार्हता कमी होत आहे. यामुळे शाळा बंद होण्याची आणि विलीनीकरण होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे देशातील सार्वजनिक शिक्षणाची स्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे.

    दुर्दैवाने, सरकार आणि न्यायालये या निर्णयांमुळे शिक्षकांच्या आणि सरकारी अनुदानित शाळांच्या मनोबलावर नकारात्मक परिणाम होतो या वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करत आहेत. वरील कारणांमुळे, भारतातील शालेय शिक्षकांना न्याय मिळावा यासाठी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघटनेने राज्य सरकारला या प्रकरणात त्वरित हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.

  • NSUI Chandrapur student fee waiver । अतिवृष्टी व पुरामुळे आर्थिक संकट; विद्यार्थी शुल्क माफ करा – NSUI

    NSUI Chandrapur student fee waiver

    NSUI Chandrapur student fee waiver : चंद्रपूर २३ सप्टेंबर २०२५ : एनएसयूआय प्रदेशाध्यक्ष मा. सागर सालुंखे जी यांच्या निर्देशानुसार तसेच आमचे नेते व मार्गदर्शक मा. रोशन दादा बिट्टू जी यांच्या मार्गदर्शनाखाली, एनएसयूआय चंद्रपूर जिलाध्यक्ष शफक शेख यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा शिक्षणाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

    MBBS प्रवेशित विद्यार्थ्यांची आत्महत्या, थक्क करणार कारण

    संपूर्ण महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांकडून प्रवेश शुल्क, शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क, नोंदणी शुल्क व वसतिगृह शुल्क आकारले जात आहे. ही विद्यार्थ्यांच्या कुटुंबांवर मोठी आर्थिक जबाबदारी ठरत असून अनेक विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात आले आहे.

    कठीण परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा

    विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी वरील सर्व शुल्क माफ करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. शिक्षण हा प्रत्येक विद्यार्थ्याचा मूलभूत हक्क आहे आणि कठीण परिस्थितीत सरकार व शिक्षण विभागाने दिलासा देणे ही जबाबदारी असल्याचे या प्रसंगी अधोरेखित करण्यात आले.

    या निवेदन प्रसंगी एनएसयूआयचे युवा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामध्ये फैजल खान, नावेद शेख, आतिश दुपारे, सौम्या विश्वकर्मा, सुमित चौहान, गणेश यादव, आशीष गावडे, राहुल तापसे, प्रतमेश दाओरे यांचा सक्रिय सहभाग होता.

  • Kendriya Vidyalaya building repair । भद्रावती केंद्रीय विद्यालयाची जीर्ण इमारत, खासदार प्रतिभा धानोरकरांचा तातडीचा आदेश

    Kendriya Vidyalaya building repair

    Kendriya Vidyalaya building repair : चंद्रपूर २३ सप्टेंबर २०२५ : भद्रावती येथील केंद्रीय विद्यालय, आयुध निर्माणी (चांदा)ची जीर्ण झालेली इमारत विद्यार्थ्यांच्या जीवासाठी धोकादायक ठरत आहे. या गंभीर प्रश्नाची दखल घेत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी तातडीने संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून इमारतीची दुरुस्ती करण्याचे आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी पर्यायी व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत. पालकांनी दिलेल्या निवेदनानंतर खासदार धानोरकर यांनी तात्काळ कार्यवाही सुरू केली आहे.

    मला व्यवसाय करायचा होता पण…२० वर्षीय मुलाने उचलले टोकाचे पाऊल

    आज वरोरा येथील जनसंपर्क कार्यालय येथे विद्यार्थ्यांच्या पाल्यांची खासदार प्रतिभा धानोरकर यांची भेट घेतली. त्याची भेट घेऊन संपूर्ण परिस्थितीची माहिती दिली. यावेळी जयश्री नितीन डोंगरे, भावना वाढई, नाजूका नंदेकर, प्रिया निमसरकार, मिनाक्षी डेकाटे, सारिका कोठे, विद्या नरंजे, सविता नेरुलकर उपस्थित होते. 

    विद्यार्थ्यांची सुरक्षा हे आमचे सर्वोच्च प्राधान्य

    खासदार प्रतिभा  धानोरकर म्हणाल्या, “विद्यार्थ्यांची सुरक्षा हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. जीर्ण इमारतीमुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये आणि त्यांना सुरक्षित वातावरणात शिक्षण घेता यावे यासाठी सर्व आवश्यक पावले उचलली जातील. लवकरच यावर ठोस कार्यवाही केली जाईल आणि पालकांनाही याबाबतची माहिती दिली जाईल.”