Blog

  • Samvad Chimuklyanshi Abhiyan |अधिकाऱ्यांचा शासकीय आश्रमशाळेत मुक्काम

    Samvad Chimuklyanshi Abhiyan

    Samvad Chimuklyanshi Abhiyan : राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या संकल्पनेतून 7 फेब्रवारी रोजी राबविण्यात आलेल्या ‘संवाद चिमुकल्यांशी अभियान’ अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातही वरिष्ठ अधिका-यांनी शासकीय आदिवासी आश्रमशाळेत मुक्काम केला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी चर्चा करून आश्रमशाळा तसेच वसतीगृहाची पाहणी केली.

    आदिवासी विकास विभागांतर्गत राज्यात एकूण 497 शासकीय आश्रमशाळा कार्यान्वित आहे. या आश्रमशाळा व वसतीगृहात आदिवासी विद्यार्थ्यांसाठी असलेल्या सोयीसुविधा, विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी तसेच त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी 7 फेब्रुवारी 2025 रोजी ‘संवाद चिमुकल्यांशी’ हे अभियान राबविण्यात आले.

    चंद्रपुरात भव्य रोजगार मेळावा, तरुणांनो सुवर्णसंधी गमावू नका

    या अंतर्गत आदिवासी विकास मंत्र्यांचे खाजगी सचिव ललितकुमार व-हाडे यांनी राजुरा तालुक्यातील देवाडा येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेत तर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूरचे प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार आणि विशेष कार्य अधिकारी श्री. वाडेकर यांनी जिवती तालुक्यातील पाटण येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेत मुक्काम केला. Government tribal ashram schools

    खाजगी सचिव ललितकुमार व-हाडे यांनी देवाडा येथील आश्रमशाळेत इयत्ता 5 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तसेच वर्गखोल्या, मुलांचे – मुलींचे वसतीगृह, भंडारगृह, स्वयंपाकगृह, स्वच्छतागृह ग्रंथालय, अभ्यासिका, प्रयोगशाळा, खेळाचे मैदान आणि परिसराची पाहणी केली. विशेष म्हणजे त्यांनी मुलांच्या पंगतीमध्ये जेवण वाढले आणि त्यांच्यासोबत जेवणाचा आस्वादसुध्दा घेतला. समोरच असणाऱ्या आदिवासी विभागाच्या एकलव्य नामांकित शाळेला श्री. व-हाडे यांनी भेट देऊन पाहणी केली

    आगामी 10 वी आणि 12 वी परिक्षेच्या पार्श्वभुमीवर विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना श्री. व-हाडे म्हणाले, विद्यार्थ्यांनी नियमितपणे अभ्यास करून आपली प्रगती करा. तसेच आपल्यातील कलागुणांना विकसीत करून एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व घडवा. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी विशेष प्रयत्न करून शाळेचा लौकिक वाढवावा, असे आवाहन त्यांनी शिक्षक आणि मुख्याध्यापिका यांना केले. त्यावेळी मुलांनी सांस्कृतिक कार्यक्रम आणि आदिवासी नृत्य सादर केले सादर केले. Tribal residential schools facilities

    प्रकल्प अधिकाऱ्यांचा पाटण येथील आश्रमशाळेत मुक्काम : ‘संवाद चिमुकल्यांशी’ या उपक्रमाअंतर्गत 7 फेब्रुवारी रोजी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपूर कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी शासकीय माध्यमिक आश्रमशाळा पाटण, येथे एकदिवस मुक्काम केला. सकाळी शाळेच्या परिपाठापासून ते रात्री मुलांच्या अभ्यासापर्यंत संपूर्ण एक दिवस विद्यार्थ्यांसोबत त्यांनी संवाद साधला. या भेटीत त्यांनी विद्यार्थ्यांशी हितगुज करत त्यांच्या अडचणी समजून घेण्याबरोबरच शाळेतील इतर मुलभूत सुविधांची पाहणी केली. त्याच बरोबर आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीकरिता शक्य ते प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांसोबतच त्यांनी दुपार व सायंकाळच्या भोजनाचा आस्वाद घेतला.

  • Supreme Court Justice Bhushan Gavai : न्यायदानाची प्रक्रिया शेवटच्या घटकापर्यंत पोहचवा – न्यायमूर्ती भूषण गवई

    Supreme Court Justice Bhushan Gavai

    जिल्हा न्यायालयाच्या विस्तारीत इमारतीचे भुमिपूजन

    Supreme Court Justice Bhushan Gavai : राजकीय, सामाजिक आणि आर्थिक न्याय हे भारतीय राज्यघटनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. कायदेमंडळ, न्यायमंडळ आणि कार्यकारी मंडळ या संस्था देशातील सर्वसामान्य नागरिकांसाठी कार्य करीत असतात. घटनेच्या चौकटीत कायदे आहेत की नाही, हे तपासण्याचे काम न्यायमंडळाचे आहे. नागरिकांना कमी वेळात आणि कमी खर्चात न्याय देऊन न्यायदानाची ही प्रक्रिया शेवटच्या घटकापर्यंत पोहचविणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती भुषण गवई यांनी केले.

    चंद्रपुरात मोकाट जनावरे असुरक्षित, शहरात घडली धक्कादायक घटना

    चंद्रपूर जिल्हा न्यायालयाच्या नुतन विस्तारीत इमारतीचे भुमिपूजन केल्यानंतर वन अकादमी येथे आयोजित मुख्य समारंभात न्यायमुर्ती गवई बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती अनिल पानसरे तर मंचावर प्रमुख अतिथी म्हणून मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमुर्ती आलोक आराधे, चंद्रपूरच्या प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश समृध्दि भीष्म, जिल्हा अधिवक्ता संघाचे अध्यक्ष ॲङ गिरीश मार्लीवार, सचिव अविनाश खडतकर, अतिरिक्त सत्र न्यायाधीश अभिश्री देव आदी उपस्थित होते. Chandrapur court bhumipujan

    भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेचा अतिशय चांगला मसुदा आपल्याला सुपुर्द केला आहे, असे सांगून न्यायमुर्ती भुषण गवई म्हणाले, राज्य घटनेच्या निर्मितीचे हे अमृत महोत्सवी वर्ष आहे. जिल्हा न्यायालयाची इमारत चांगली होईल, सुविधा सुध्दा होतील, मात्र या इमारतीतून नागरिकांना कमी वेळात आणि कमी खर्चात न्याय देणे आवश्यक आहे. सामाजिक आणि आर्थिक न्यायदानाचे काम या इमारतीतून होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. Chandrapur news

    पुढे न्यायमुर्ती श्री. गवई म्हणाले, नैसर्गिक वरदान लाभलेल्या चंद्रपुरची संस्कृती मोठी आहे. विधी क्षेत्रातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व चंद्रपुरातून घडले आहे. या संस्कृतीला साजेशी इमारत येथे तयार होईल. कोल्हापूर, नागपूर, अमरावती येथील न्यायालयाच्या उत्कृष्ट इमारती सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधल्या आहेत. ही इमारतसुध्दा वेळेत आणि दर्जेदारच होईल. Legal rights of citizens India

    वरोरा येथील महारोगी सेवा समितीच्या अमृत महोत्सवी समारंभानिमित्त चंद्रपूर येथील जिल्हा न्यायालयाच्या विस्तारीत इमारतीच्या भुमिपूजन कार्यक्रमाला आज उपस्थित राहता आले, याचा मला मनापासून आनंद आहे, असेही न्यायमुर्ती गवई यांनी सांगितले.

    अध्यक्षीय भाषणात न्यायमुर्ती अनिल पानसरे म्हणाले, न्याय हा प्रामाणिकता, पारदर्शकता या शब्दाला समानार्थी शब्द आहे. खरंच न्याय मंदिरात प्रवेश करीत आहो, अशी उत्कृष्ट इमारत येथे उभी राहिली पाहिजे. प्रामाणिक, पारदर्शक आणि शुध्दतेने इमारतीचे बांधकाम करावे. विस्तारीत न्यायालयीन इमारत लवकरच दिसेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

    न्यायमुर्ती नितीन सांबरे म्हणाले, या इमारतीचे भुमिपूजन 25 जानेवारी 2025 रोजी होणार होते. मात्र वरोरा येथील महारोगी सेवा समितीच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमाच्या निमित्ताने या कार्यक्रमाचेसुध्दा आयोजन करण्यात आले. तर न्यायमुर्ती आलोक आराधे म्हणाले, या नवीन इमारतीमधून न्यायाची प्रक्रिया आणखी गतीमान होईल. न्यायाधीश, वकील आणि स्टाफ करीता नवीन इमारतीमध्ये चांगल्या सुविधा होतील, अशा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

    chandrapur news

    तत्पुर्वी न्यायमुर्ती सर्वश्री भुषण गवई, आलोक आराधे, नितीन सांबरे, अनिल पानसरे यांच्या हस्ते जिल्हा न्यायालय येथे भुमिपूजन करण्यात आले. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश समृध्दि भीष्म यांनी स्वागतपर भाषण केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा अधिवक्ता संघाचे अध्यक्ष गिरीश मार्लीवार यांनी तर संचालन न्या. तुषार वाझे आणि ॲङ वैष्णवी सराफ यांनी केले.

    chandrapur news

    कार्यक्रमाला आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, मनपा आयुक्त विपीन पालिवाल, अतिरिक्त पोलिस अधिक्षक रिना जनबंधू यांच्यासह जिल्ह्यातील न्यायाधीश, जेष्ठ वकील आदी उपस्थित होते.

    अशी राहील न्यायालयाची विस्तारीत इमारत : तळमजला +७ मजली सदर ईमारतीच्या कामास प्रशासकीय मान्यता 2023 मध्ये मिळालेली असून त्यासाठी ६० कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. सदर इमारतीत सुसज्ज 12 कोर्ट हॉल, वकीलांकरीता बाररुम तसेच न्यायालयीन प्रशासनाकीता कक्ष सर्व अद्यावत सुविधासह तयार करण्यात येणार आहे.

  • Animal abuse case chandrapur | चंद्रपुरात मोकाट कुत्रीवर अनैसर्गिक कृत्य करण्याचा प्रयत्न

    Animal abuse case chandrapur

    Animal abuse case chandrapur : नशेच्या आहारी गेल्यावर मानवी जीवनात विकृती मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसून येत आहे, अश्याच विकृती चे उदाहरण देणारी घटना चंद्रपूर शहरात 6 फेब्रुवारीला घडली.
    61 वर्षीय इसमाने मोकाट कुत्रीला पकडत तिच्यावर अनैसर्गिक कृत्य करण्याचा प्रयत्न केला मात्र एका सुजाण युवकाला ही बाब कळताच त्याने तात्काळ विकृत घटना घडण्यापूर्वी त्या नराधमाला पोलिसांच्या स्वाधीन केले.


    6 फेब्रुवारीला सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास इंदिरा नगर येथे राहणारे 61 वर्षीय तीलक बाबुराव कुमरे हे एका मोकाट कुत्रीचे पाय पकडून अत्यंत क्रूर पणे रस्त्याच्या कडेला असलेल्या समाजभवनाकडे जात होता, तितक्यात इंदिरानगर वरून 30 वर्षीय युवक आपल्या आईला घेऊन दुचाकीने शहरात जात होते. Shocking news chandrapur

    चंद्रपुरात भव्य रोजगार मेळावा


    त्यावेळी सदर इसमाचे विकृत कृत्य त्या युवकाला दिसले काही अप्रिय घटनेची चाहूल त्या युवकाला लागली त्याने त्या इसमाचा पाठलाग केला असता कापडी आडोशात कुत्रीला झोपवित आरोपी कुमरे यांनी पॅन्ट काढत अतिप्रसंग करण्याच्या तयारी असताना त्या युवकाने अप्रिय घटना थांबविली.


    हा प्रकार बघून परिसरातील नागरिक जमा झाले त्यांनी कुमरे ला चोप दिला, कुमरे हे नशेत होते, याबाबत प्यार फाउंडेशन व रामनगर पोलिसांना देण्यात आली.
    पोलिसांनी आरोपी 61 वर्षीय तीलक कुमरे ला अटक केली. पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे.

    61 वर्षीय इसमाच्या या अनैसर्गिक कृत्य बघून परिसरातील नागरिकही अवाक झाले आहे, आता जनावरे सुद्धा या नराधमापासून असुरक्षित असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

  • Job fair near me 2025 | रोजगार मेळाव्यात नोकरीची सुवर्णसंधी

    Job fair near me 2025

    Job fair near me 2025 : जिल्हा कौशल्य  विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर व मॉडल करीअर सेंटर चंद्रपूर, सर्वोदय महाविद्यालय, सिंदेवाही आणि राष्ट्रीय एस.सी.,एस.टी.ओ.बी.सी, क्रांतीदल यांच्या तर्फे 13 फेब्रूवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता सर्वोदय महाविद्यालय, सिंदेवाही येथे पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

    जिल्हातील 10 वी, 12 वी, आय.टी.आय, पदविका, पदवी इत्यादी बेरोजगार उमेदवारांना विविध क्षेत्रात निर्माण होत असलेल्या रोजगारांच्या संधी उपलब्ध  करून देण्याच्या दृष्टीने आणि राज्यातील नामांकित उद्योजकांचा थेट नोकरी इच्छुक उमेदवारांशी संपर्क होण्यासाठी सदर रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. (Career opportunities for freshers)

    मालमत्ता करात सूट हवी तर करा हे काम

    सदर रोजगार मेळाव्यातून 1 हजार पेक्षा जास्त पदे भरण्यात येणार असून मेळाव्यामध्ये विविध नामांकित कंपन्या सहभागी होत आहे. या मेळाव्यातून रोजगाराची संधी उपलब्ध होत आहे.

    यामध्ये मल्टीव्हेव पॉलिफायबर, चंद्रपूर  यांच्या लूम ऑपरेटर, हेल्पर, अकाऊंट मॅनेजर, वाईडर मॅन क्वॉलिटी सुपरवायझर, क्लिनर, एस.बी.आय. लाईफ इंन्सुरन्स चंद्रपूर फिल्ड वर्कर, विदर्भ क्लिक वन सोल्युशन यांचा फिटर, वेल्डर इलेक्ट्रिशियन, डेक्सॉन इंजिनिअरींग प्रा. लि. नागपूर यांच्या मोटार मॅकेनिकल, इलेक्ट्रिशिअन, डिझेल  मॅकेनिकल, प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन मुंबई यांच्या हॉटेल मॅनेजमेंट, टू व्हिलर, फोर व्हिलर दुरुस्ती, कंट्रक्शन इलेक्ट्रिशियन, नर्सींग, आय.सी.आय. सी. आय.फाउंडेशन  पांगडी, चंद्रपूर यांचे सौरउर्जा इलेक्ट्रिशिअन, बांबू संशोधन केंद्र, चिचपल्ली  यांचे बांबू हस्तकला व नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, नर्सिग, असिस्टंट, घरगुती सहायक,  फिजिओथेरेपिस्ट, असिस्टंट आदी कंपनीमार्फत नोकरी  करण्याची संधी उमेदवारांना मिळणार आहे. (Best companies hiring now)

    सदर कंपन्यामध्ये विविध पदे असल्याचे उद्योजकांकडून कळविण्यात आले आहे. मेळाव्याकरीता उमेदवारांनी आधारकार्ड व शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्राचे झेरॉक्स प्रतीसह (कमीत कमी तीन) उपस्थित राहावे. मेळाव्यामध्ये सहभागी होण्याकरीता https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाइटवर नोंदणी करावी व ऑनलाईन अप्लाय सुध्दा करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या मेळाव्याची विशेष बाब म्हणजे यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. अधिक माहिती करीता जिल्हा कौशल्य  विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर दूरध्वनी क्रमांक 07172 -252295 येथे संपर्क करावा. (Top industries hiring in India)

    उमेदवारांना रोजगार व स्वंय रोजगार करण्याकरीता कर्जविषयक माहिती देण्यासाठी संत रोहितदास चर्मोउद्योग माहमंडळ, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक  मागास महामंडळ, महात्मा फूले मागासवर्ग महामंडळ, वसंतराव नाईक विमूक्त जाती व भटक्या जाती महामंडळ, इतर मागासवर्ग महामंडळ, अपंग महामंडळ, अण्णा साहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, इत्यादी महामंडळे सदर मेळाव्यात मार्गदर्शनाकरीता येणार आहे. तरी जिल्हातील जास्तीत जास्त  उमेदवारांनी सहभागी होण्याचे व मेळाव्याचा लाभ घेण्याचे आवाहन सहायक आयुक्त भै.गो. येरमे यांनी केले आहे.

  • How to pay property tax in Chandrapur | मालमत्ता करात सूट हवी तर करा हे काम

    How to pay property tax in Chandrapur

    How to pay property tax in Chandrapur : चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे 15 फेब्रुवारी पर्यंत थकबाकीसह मालमत्ता कराचा एकरकमी भरणा करणाऱ्याना शास्तीत सवलत देण्यात येत ऑनलाईन पद्धतीने कराचा भरणा केल्यास 50 टक्के तसेच ऑफलाईन पद्धतीने कराचा भरणा केल्यास 45 टक्के शास्तीत सवलत देण्यात येत आहे.सवलत केवळ 15 फेब्रुवारी पर्यंतच असल्याने अधिकाधिक मालमत्ता धारकांनी या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.  


       सदर योजनेचा आतापर्यंत 5241 मालमत्ता धारकांनी लाभ घेतला असुन एकुण 3 कोटी 96 लक्ष 58 हजार 420 रकमेचा भरणा या योजनेअंतर्गत करण्यात आला आहे. 15 फेब्रुवारी नंतर थकबाकीसह पूर्णतः कराचा भरणा करण्याऱ्या मालमत्ता धारकांना ऑनलाईन पद्धतीने कराचा भरणा केल्यास 25 टक्के तसेच ऑफलाईन पद्धतीने कराचा भरणा केल्यास 22 टक्के शास्तीत सूट देण्यात येणार आहे. ही सूट 31 मार्च पर्यंत लागू अराहणार असुन कर भरणा करणे सुविधेचे व्हावे या दृष्टीने 31 मार्च पर्यंत येणाऱ्या प्रत्येक सुटीच्या दिवशी मालमत्ता कर भरणा कार्यालय सुरु राहणार आहे.  (Chandrapur Municipal Corporation property tax discount)

    चंद्रपूर मनपाची मोठी कारवाई, 10 गाळे केले सील


       महापालिका क्षेत्रात 80 हजाराहुन अधिक मालमत्ता असून, संपूर्ण मालमत्तांच्या माध्यमातून दरवर्षी मागणी नोंदवली जाते. करदात्यांना कराची नोटीस पाठवून कर भरणा करण्यासाठी विनंती करण्यात येते. कर न भरल्यास दंड वसुली तसेच प्रसंगी मालमत्ता सील करण्याची कारवाई करण्यात येते. जास्तीत जास्त वसुली होऊन ती शहराच्या विकास कामांसाठी उपयोगी यावी या अनुषंगाने यंत्रणा जोमात कामाला लागली आहे. (Chandrapur property tax penalty waiver)


        चंद्रपूर महानगरपालिकेचे स्वतःचे उत्पन्न वाढुन कर्मचाऱ्यांचे वेतन व इतर किरकोळ खर्च पालिकेला स्वतःच्या उत्पन्नातून भागविण्याचे दृष्टीने मालमत्ता कराची वसुली नियमित व प्रभावी होण्याकरीता शासनाने महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमामध्ये सुधारणा करून विहित कालावधीनंतर शास्ती लागु करण्याची तरतूद केलेली आहे. अश्या प्रकारे लागु होणाऱ्या शास्तीमध्ये पुर्णतः किंवा अंशतः सूट देण्याचे अधिकारी महानगरपालीकेस आहेत.


        मालमत्ता कराच्या प्रभावी वसुलीकरीता व संभाव्य उद्दिष्ट पूर्ती करीता मनपातर्फे शास्तीत सवलत जाहीर करण्यात आली आहे. 15 फेब्रुवारी पूर्वी या शास्ती माफीचा लाभ घेण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

  • Chandrapur food license updates । चंद्रपूर शहरातील अन्न व्यावसायिकांना नोंदणी बंधनकारक

    Chandrapur food license updates

    Chandrapur food license updates : अन्न सुरक्षा व मानदे कायदा – 2006 मध्ये अन्न व्यावसायिकांची व्याख्या स्पष्ट केली आहे. पदार्थाचा व्यवसाय करणारे स्टॅालधारक व फिरते विक्रेते जसे पाणीपुरी, भेलपुरी, पावभाजी विक्रेते, आइसक्रीम, बर्फ गोळा, ज्यूस, शरबत विक्रेते, भाजीपाला व फळ विक्रेते, किरकोळ किराणा, डेली निड्स,बेकरी, घाऊक विक्री करणारे वितरक व वाहतूकदार, गृहउद्योग ते अन्न पदार्थाचे उत्पादक तसेच उपहारगृह, हॉटेल, खानावळ, चहा विक्रेते, दुध विक्रेते त्याच बरोबर स्वस्त धान्य दुकानदार, कॅटरर्स, शालेय पोषण आहार पुरवठादार, बचतगट, शासकीय/ अशासकीय कार्यालयातील कॅटीन, वसतिगृहातील खानावळ, धार्मिक ठिकाणी वितरित होणारा प्रसाद, मेळावे व प्रदर्शना मधील अन्न पदार्थांचे स्टॉलधारक आदी सर्व अन्न व्यावसायिक या वर्गवारीच्या कक्षेत येतात. Food license registration India

    चंद्रपूर शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा लवकरच

    या सर्व अन्न व्यावसायिकांना व्यवसाय करण्यासाठी अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006  चे कलम 31 अंतर्गत परवाना किंवा नोंदणी प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. परवाना अथवा नोंदणी प्रमाणपत्र न धेता व्यवसाय करणे कायद्याचे कलम 63 अन्वये दंडनीय गुन्हा आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आज रोजी 2350 परवाना व 13035 नोंदणी प्रमाणपत्र, असे  एकूण 15385 सक्रिय परवाना व नोंदणीधारक अन्न व्यावसायिक आहेत. Food Safety Act 2006 compliance

               परवाना किंवा नोंदणी  प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी foscos.fssai.gov.in  या संकेत स्थळावर ऑनलाईन पध्दतीने आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करणे आवश्यक आहे. तरी सर्व अन्न व्यावसायिकांनी आपल्या व्यवसायासाठी त्वरित ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करून परवाना अथवा नोंदणी प्रमाणपत्र करून  घ्यावे.  परवाना व नोंदणी प्रमाणपत्राची मुदत संपली असल्यास नूतनीकरण करण्यात यावे. सक्रिय परवाना अथवा नोंदणी प्रमाणपत्र न घेता व्यवसाय करीत असल्याचे आढळून आल्यास संबंधित व्यक्तिविरुध्द अन्न सुरक्षा व मानदे कायदा  अंतर्गत कारवाई करण्यात येईल, याची सर्व अन्न व्यावसायिकांनी नोंद घ्यावी, असे अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त प्र.अ.उमप यांनी कळविले आहे.

  • National Filaria Elimination Program ।  हिवताप सार्वत्रिक औषधोपचार मोहीम व राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम

    National Filaria Elimination Program

    National Filaria Elimination Program : राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत हत्तीरोग दूरीकरणासाठी सार्वत्रिक औषधोपचार मोहीम व टीबी मुक्त भारत अभियान अंतर्गत राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या अंतर्गत आरोग्य कर्मचा-यांमार्फत घरोघरी मोफत औषध वितरीत करण्यात येणार आहे. आपल्या घरी येणा-या आरोग्य अधिकारी – कर्मचा-यांना सहकार्य करून सदर मोहीम 100 टक्के यशस्वी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले.

    चंद्रपूर जिल्हा बर्ड फ्लू अपडेट

    जिल्हाधिकारी कार्यालयात आरोग्य विषयक मोहिमांचा आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रकाश साठे आणि जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. ललित पटले व इतर अधिकारी उपस्थित होते.

    यावेळी जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, सार्वत्रिक औषधोपचार मोहीम प्रभावीपणे राबविणे तसेच हत्तीरोग दूरीकरणासाठी या मोहिमेत लोकसहभाग वाढविणे आवश्यक आहे. हत्तीपाय झाल्यास उपचार होणे शक्य नसल्यामुळे सार्वत्रिक औषधोपचार मोहिमेदरम्यान आपल्याकडे येणाऱ्या आशा स्वयंसेविका व आरोग्य कर्मचाऱ्यांनी दिलेल्या प्रतिबंधात्मक गोळ्या त्यांच्या समोरच खाव्यात व स्वत:ला या आजारापासून दूर ठेवावे. Public health campaign India

    पुढे ते म्हणाले, 100 दिवस क्षयरोग मोहीम राबविण्यासाठी नागरिकांनी आरोग्य कर्मचा-यांना सर्वतोपरी सहकार्य करून मोहीम यशस्वी करावी. तसेच क्षयरोगावर औषध उपचार घेत असलेले रुग्णांना दानशूर नागरिकांनी पोषण आधार किट देऊन निक्षयमित्र बनण्यास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले आहे. District health program updates

    प्रत्येक घरात मोफत औषध वाटप : चंद्रपूर जिल्ह्यात हत्तीरोग ही गंभीर आरोग्य समस्या आहे. या रोगामुळे शारीरिक विकृती, अपंगत्व असे गंभीर परिणाम दिसून येतात. हत्तीरोग दूरीकरण मोहिमेंतर्गत तीन औषधांची एकत्रित एक मात्रा देण्यात येणार आहे. यातील आयव्हरमेक्टीन ही गोळी ऊंची नुसार तर डी.ई.सी. व अलबेंडाझोल ही गोळी वयोगटानुसार एक मात्रा घेवून या रोगाचा समूळ नाश करता येते. हत्तीरोगाचे तीनही औषध प्रत्येक घरात आशा स्वयंसेविका व आरोग्य कर्मचारी यांच्यामार्फत मोफत देण्यात येणार आहे. 2 वर्षापेक्षा कमी वयाचे बालके, गरोदर माता  तसेच गंभीर आजारी रुग्णांना ही औषधी दिली जाणार नाही. Universal Drug Administration campaign

    राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम : टीबी मुक्त भारत अभियानअंतर्गत जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी 100 दिवस क्षयरोग मोहिमेचा आढावा घेतला. जिल्हयामध्ये 7 डिसेंबर 2024  पासून 100 दिवस क्षयरोग मोहीम सुरू आहे. मोहिमेदरम्यान क्षयरोगासाठी जोखीमेचे असलेले 4 लक्ष 7 हजार 325 व्यक्तींची क्षयरोगाबाबत तपासणी करण्यात येणार आहे. आजपर्यंत 2 लक्ष 51 हजार 158 व्यक्तींची क्षयरोगाबाबत तपासणी झाली आहे. 10615 व्यक्तीचे छातीचे क्ष-किरण, 7332 व्यक्तीचे नाट तपासणी व 4776 व्यक्तिंची माइक्रोस्कोपी  तपासणी करण्यात आली आहे. मोहिमेदरम्यान 1803 निक्षय शिबीर आजपर्यंत घेण्यात आले  असून 32878 संशयित क्षयरुग्णांची तपासणी करून 728  क्षयरुग्णाचे निदान करण्यात आले आहे व त्यांना औषधोपपचार सुरु करण्यात आला आहे. TB Free India initiative

  • Chandrapur property tax updates । चंद्रपूर मनपाची कारवाई, कर चुकवेगिरी १० गाळे सील

    Chandrapur property tax updates

    Chandrapur property tax updates : 9 लक्ष 78 हजार रुपयांची थकबाकी असणाऱ्या झोन क्रमांक 2 मधील नेहरू मार्केट येथील टिळक मैदान येथील 10 ओटे-गाळ्यांना मनपा कर वसुली पथकाने टाळे ठोकले आहे. मनपा कर विभागाद्वारे वारंवार सूचना देऊन, यापुर्वी तीनदा थकबाकीची नोटीस दिल्यानंतरही सदर मालमत्ता धारकांनी कराचा भरणा न केल्याने सदर कारवाई करण्यात आली आहे.

    खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर


        टिळक मैदान येथे गाळे असणाऱ्या विठाबाई निंबाळकर यांच्याकडे 62,922,देविदास राहुलकर यांच्याकडे 1,10,809,मंगला राऊत यांच्याकडे 63790,इंदिराबाई बनकर यांच्याकडे 67,790,किशोर येरणे यांच्याकडे 40,294,सईबाई निंबाळकर यांच्याकडे 1,37,293,अंजनाबाई खरतड यांच्याकडे 63,188,दिनेश पायधन यांच्याकडे 2,23,525,विजय आमटे यांच्याकडे 97,552 तर चंद्रभागा मंगरूळकर यांच्याकडे1,11,051 रुपयांची थकबाकी आहे.यापुर्वी तीनदा थकबाकीची नोटीस या सर्वांना बजाविण्यात आली होती. मात्र करचुकवेगिरी करत असल्याने मनपा कर विभागाने गाळे सील केले आहेत.  Property tax defaulters


        चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून कर वसुलीसाठी झोननिहाय विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. यासाठी मनपा अधिकारी कर्मचारी यांची पथके सुटीच्या दिवशीही कार्यरत आहेत. थकीत कराचा भरणा न करणाऱ्या मालमत्ता धारकांच्या मालमत्तेला सिल लावण्याची कारवाई मोठ्या प्रमाणात सुरु आहे. काही मालमत्ता धारक हे धनादेशाद्वारे कराचा भरणा करतात, अधिकतम धनादेश हे वटले जातात, मात्र जे धनादेश वटले जाणार नाही त्यांच्यावर फौजदारी कारवाई मनपातर्फे करण्यात येत आहे. Municipal tax recovery news

       
         सदर कारवाई मनपा आयुक्त विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनात व अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील,उपायुक्त मंगेश खवले यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात सहायक आयुक्त शुभांगी सूर्यवंशी ,कर विभाग प्रमुख अनिल घुले, श्रीकांत होकाम,मनोज सोनकुसरे,अनिल नन्हेट,प्रल्हाद भावरकर,नीरज कमटलवार,गोपाळ वाळके व अतिक्रमण विभागाचे कर्मचारी यांनी केली.

  • Chandankheda mobile hospital । चंदनखेडा येथील निःशुल्क फिरते रूग्णालय गोरगरीबांसाठी वरदान – हंसराज अहिर

    Chandankheda mobile hospital

    Chandankheda mobile hospital : ग्रामिण भागातील गोरगरीब, कष्टकरी व तळागाळात असलेल्या नागरिकांना निः शुल्क प्रभावी स्वास्थ्यविषयक अत्याधुनिक सोयी-सुविधा व तातडीची स्वास्थ्य सेवा प्राप्त व्हावी हे माननिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी यांचे ध्येय आहे. हे ध्येय दृष्टीपथात ठेवून त्यांनी देशातील सार्वजनिक कंपन्या, उद्योगांना सामाजिक दायित्वाच्या भावनेतून स्वास्थ्य सेवा उपलब्ध करण्यास बाध्य केले. निःशुल्क फिरते रूग्णालयांच्या सेवेमध्ये प्रधानमंत्र्यांच्या दूरदृष्टीचे मोठे योगदान आहे.

    चंदनखेडा व परिसरात गॅस अथॉरिटी ऑफ इंडियाद्वारा निःशुल्क फिरते रूग्णालय हे याच धोरणाचे प्रतिक असून हे फिरते रूग्णालय भद्रावती तालुक्यातील गोरगरीब जनतेला वरदान ठरेल असे प्रतिपादन राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले. (GAIL free ambulance service)

    चंद्रपुरातील गंजवार्डात आग, आमदार जोरगेवार यांनी केली पाहणी


    दि.०६ फेब्रुवारी रोजी भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा येथे गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया (GAIL) द्वारा सामाजिक दायित्व निधी अंतर्गत नि:शुल्क फिरते रूग्णालयाच्या (अॅम्बुलन्स) लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते.
    या कार्यक्रमास वरोराचे आमदार करण देवतळे, गेलचे कार्यकारी निदेशक अनुपकुमार गुप्ता, संचालक रविकांत कोल्हे, महाजन, डॉ. भगवान गायकवाड, अशोक हजारे, प्रशांत डाखरे, जिपचे माजी सदस्य मारोती गायकवाड, माजी जि.प. सदस्य विजय वानखेडे, माजी नगराध्यक्ष संजय वासेकर, माजी पं.स.सभापती सौ. विद्याताई कांबळे, पं.स.च्या माजी सभापती इंदुताई नन्नावरे, उपसरपंच ग्रा.पं. चंदनखेडा सौ. भारतीताई उरकुडे, महेश टोंगे, विठ्ठल हनवते, डॉ. सागर वझे, सुरेश महाजन, बंडु नन्नावरे, संजय देवतळे, डेविड बागेसर, विठ्ठल कापकर, आदी मान्यवर उपस्थित होते. (Government free health services)


    यावेळी आपल्या मार्गदर्शनात हंसराज अहीर यांनी हे फिरते रूग्णालय चंदनखेडा व भद्रावती तालुक्यातील अनेक गावातील विविध आजाराने तसेच दुर्धर व्याधीने ग्रस्त असलेल्या रूग्णांना उपकारक ठरेल असे सांगितले. या फिरत्या रूग्णालयाचा लाभ ग्रामिण भागातील सर्व स्तरातील रूग्णांनी घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. ते म्हणाले, तीन वर्षांपूर्वी राजुरा विधानसभा क्षेत्रात अशीच फिरते दोन अॅम्बुलन्स रूग्णालय सुरू झाले असून, या रूग्णालयाचा लाभ आजपर्यंत हजारो नागरिकांनी घेतला असून घरपोच रूग्णसेवा मिळत असल्याने या रूग्णालयास नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभत आहे. चंदनखेडा येथे लोकार्पण झालेल्या या रूग्णालयामुळे रूग्णांना मोठी सोय होणार असून रूग्णांच्या तकारीचे निरसन होईल त्यामुळे हे रूग्णालय नागरिकांच्या जिवीतासाठी मोलाचे ठरले असेही हंसराज अहीर यांनी यावेळी सांगितले. (Hansraj Ahir latest news)


    याप्रसंगी आमदार करण देवतळे व गेलचे कार्यकारी निदेशक अनुपकुमार गुप्ता यांनीही उपस्थितांना समयोचित मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता गजू रणदिवे, संतोष हनवते, बालाजी मगमवार, चंपत भरडे व इतरांनी विशेष परिश्रम घेतले.

  • Chhatrapati Shivaji Maharaj Memorial । शिव स्मारकासाठी आमदार जोरगेवार यांनी केली ५० लक्ष रुपयांच्या निधीची घोषणा

    Chhatrapati Shivaji Maharaj Memorial

    Chhatrapati Shivaji Maharaj Memorial : घुग्घूस येथे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक उभारण्यासाठी जागेची परवानगी द्यावी, या मागणीसाठी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीच्या वतीने लॉयड मेटल कंपनीच्या गेटसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन या मागणीसाठी शासन दरबारी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले असून  स्मारकासाठी ५० लाख रुपये निधी जाहीर केला आहे.

    चंद्रपूर जिल्ह्यात भरदिवसा युवकाची हत्या

    या आंदोलनात स्मारक समितीचे चेतन बोबडे, माजी सरपंच संतोष नुने, विवेक बोंढे, संजय तिवारी, सोनल भरडकर, अमित बोरकर, गणेश शेंडे, अनिल बाम, हेमराज बावणे यांच्यासह शिवप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

    घुग्घूस येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक तयार करण्यात यावे, अशी येथील स्थानिक नागरिकांची मागणी आहे. यासाठी मुख्य चौकात असलेल्या लॉयड मेटल कंपनीच्या गेटसमोरील जागा घुग्घूसवासियांच्या वतीने सुचविण्यात आली आहे. सदर जागा सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे. मात्र, तेथे लॉयड मेटल कंपनीचा गेट असल्याने स्मारक उभारण्यास कंपनी व्यवस्थापनाने विरोध दर्शविला आहे. या विरोधात छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती, घुग्घूस यांच्या वतीने वेळोवेळी आंदोलने केली जात आहेत. (Chhatrapati Shivaji public movement)

    दरम्यान, आज गुरुवारी याच मागणीसाठी धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी आंदोलनाला भेट देऊन आंदोलकांच्या मागण्या जाणून घेतल्या. यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, ही केवळ जागेची परवानगी मिळवण्यासाठीची लढाई नाही, तर आपल्या अस्मितेची, अभिमानाची आणि इतिहासाच्या जतनाची लढाई आहे. शिवराय हे केवळ एका काळापुरते मर्यादित नाहीत, ते अनंत काळासाठी प्रेरणादायी आहेत म्हणून त्यांचे भव्य स्मारक उभारणे ही आपली जबाबदारी आहे. (Shivaji Maharaj monument news)

    आपल्या भागात वेगवेगळी विकासकामे होत आहेत, मोठमोठ्या उद्योगधंद्यांनी जागा व्यापली आहे. मात्र, शिवरायांच्या स्मारकासाठी जागेची परवानगी मिळावी यासाठी आपल्याला आंदोलन करावे लागते, हे निश्चितच दुर्दैवी आहे. पण आपण माघार घेणारे नाही. ही मागणी आम्ही शासन दरबारी मांडणार आणि योग्य ती परवानगी मिळवणार, असे आमदार किशोर जोरगेवार म्हणाले. यावेळी घुग्घूसवासियांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.