Blog

  • Chandrapur Cyber Crime | चंद्रपुरात सायबर हल्ला, 3 कोटी 70 लाखांवर डल्ला

    Chandrapur District Central Bank Cyber Attack: ₹3.7 Crore Fraud Case

    Chandrapur Cyber Crime

    Chandrapur Cyber Crime : पदभरती प्रक्रियेत वादात आलेली चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँक पुन्हा प्रकाशझोतात आली आहे, बँकेच्या ऑनलाइन व्यवहारात सायबर अटॅक झाल्याने अज्ञात चोरट्याने 3 कोटी 70 लाख 64 हजार 742 रुपयांवर डल्ला मारला, मात्र पोलिसांच्या समयसूचकतेने पोलिसांनी 1 कोटी 31 लाख 99 हजार 319 रुपये वाचविण्यात यश आले.

    7 आणि 10 फेब्रुवारी दरम्यान झालेले अनेक ट्रांजेक्शन सायबर गुन्हेगारांनी दिल्ली आणि नोएडा येथील खात्यांवर वळते करत बँकेच्या सायबर सुरक्षेला धक्का दिलाय. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतून RTGS केलेली रक्कम नागपूर येथील येस बँक च्या माध्यमातून लाभार्थी खात्यात जमा होते. (Cyber Fraud RTGS Scam)

    चंद्रपुरात अखेर भ्रष्टाचाराचे आका अवतरले

    7 आणि 10 फेब्रुवारी या दोन दिवसात 34 खातेदारांच्या खात्यामधून ही रक्कम RTGS करण्यात आली होती. या प्रकरणात जिल्हा मध्यवर्ती बँक “मेकर आणि चेकर” तर यस बँक बेनिफिशरी बँक आहे. मात्र आरटीजीएस केलेली रक्कम संबंधित खात्यांमध्ये जमा न झाल्याने व्यवस्थापनाला संशय आला. (Online Banking Fraud News)

    चंद्रपूर येथील रामनगर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीं विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. चंद्रपूर पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केलाय.

    10 फेब्रुवारीला नॅशनल सायबर रिपोर्टिंग पोर्टलवरून तक्रार दिल्यावर 33 आर्थिक व्यवहार फ्रीज करण्यात आले त्यामुळे बँकेचे 60 लक्ष 64 हजार 582 रुपये परत जमा झाले, 71 लक्ष 34 हजार 737 रुपये विविध बँक खात्याला होल्ड झाले असे एकूण 1 कोटी 31 लक्ष 99 हजार 319 रुपये वाचविले आहे, सध्या या प्रकरणी आयटी टीम, सायबर पोलीस व रामनगर पोलीस घटनेचा पुढील तपास करीत आहे.

  • Underground drainage system | जुन्या भुमिगत गटार योजनेचा अंत्यविधी, चंद्रपुरात अवतरले आका चे आका

    Underground drainage system

    Underground drainage system : पंधरा वर्षांपूर्वी संपूर्ण चंद्रपूर शहरात टाकलेल्या जुन्या भूमिगत गटार योजनेचा आज जनविकास सेनेतर्फे प्रतीकात्मक दफनविधी करण्यात आला. जटपुरा गेट जवळील जनार्दन मेडिकल समोर मनपाने खोदलेल्या खड्ड्यात आज दुपारी 2 वाजे दरम्यान हा दफन विधी चा कार्यक्रम करण्यात आला. यानंतर 2 मिनिटे मौन पाळून जुन्या भूमिगत गटार योजनेला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

    राजकीय नेत्यांच्या वेशभुषेतील ‘आकाचे आका’ कोण ?

    चंद्रपूर महानगरपालिकेला लुटणारे आयुक्त ‘आका’ असल्याचा तसेच त्यांना संरक्षण देणारे ‘आकाचे आका’ असल्याचा आरोप जनविकास सेनेने एका पत्रकार परिषदेतून केला होता.भूमिगत गटार योजनेच्या प्रतीकात्मक अंत्यविधीला ‘आका, मनपा आयुक्त’, आकाचा आका चंद्रपूर, आकाचा आका जिल्हाधिकारी कार्यालय, आकाचा आका मंत्रालय’ असे फलक छातीवर लावलेले जनविकास सेनेचे कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते. Urban drainage project

    उन्हाळा आलाय, कुलर लावंताय तर ही बातमी वाचा


    सुटा बुटात असलेले प्रतीकात्मक जिल्हाधिकारी व त्यांच्या शेजारी मंत्रालयातील सचिव हे आकाचे प्रशासकीय आका असल्याची भूमिका जनविकास सेनेने अप्रत्यक्षपणे स्पष्ट केली. परंतु राजकीय नेत्यांच्या वेशभूषेतील दोघांच्या छातीवर ‘आकाचे आका चंद्रपूर‘ असे फलक लावले होते. जनविकासनेकडून मनपा आयुक्तांच्या भ्रष्टाचाराला लोकप्रतिनिधी संरक्षण देत असल्याचा आरोप करण्यात आला होता. परंतु अंत्यविधीला प्रतीकात्मक उपस्थिती असलेले हे दोन लोकप्रतिनिधी कोण आहेत ? हे मात्र अजून स्पष्ट झाले नाही.

    जुन्या भुमिगत गटार योजनेच्या आठवणींना उजाळा

    प्रतिकात्मक अंत्यविधीच्या वेळी माजी नगरसेवक व जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. योजनेच्या अनेक चांगल्या वाईट आठवणी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. तेव्हाचे नगरपालिकेचे पदाधिकारी व अधिकारी यांना मोठा लाभ या योजनेतून झाला.त्यांची कुटुंब सक्षम झाली. त्यांच्या कुटुंबाला आधार मिळाला. अंदाजे 100 कोटी रुपये खर्च करून तयार झालेल्या या योजनेसाठी ५ ते ६ वर्षे संपूर्ण शहर खोदण्यात आले होते. Municipal corruption scandal

    लहान मुले,प्रौढ व जेष्ठ नागरिक या सर्वांनाच ५ ते ६ वर्षे मोठा त्रास सहन करावा लागला. श्वसनाचे आजार, मान व मणक्याचे आजार मोठ्या प्रमाणात वाढले. अनेक नागरिकांना कायमचे आजार जडले. चंद्रपूर शहरातील लाखो लोकांनी मोठा त्याग केल्यानंतर या योजनेचे 90 टक्के काम पूर्ण झाले. Symbolic protest in politics

    घर जोडणी केल्यानंतर योजनेतून दरवर्षी २ कोटी रुपये महसूल प्राप्त होईल असे मागील 10 वर्षाच्या मनपाच्या अंदाजपत्रकामध्ये नमूद करण्यात येत आहे.
    मात्र आता नवीन ५०६ कोटी भूमिगत गटार योजनेचे काम सुरू झाल्याने जनविकास सेनेने जुन्या गटार योजनेचा प्रतिकात्मक अंत्यविधी केला.

  • Cooler maintenance tips | तापमानात वाढ, कुलर सुरू करताय तर ही बातमी वाचा

    Cooler maintenance tips

    Cooler maintenance tips : चंद्रपूर:- उन्हाळा लागताच अंगाची लाही लाही होऊन घामाच्या धारा वाहायला सुरू होते. थंड हवा मिळावी, यासाठी कुलर लावले जातात. उन्हाळ्यात केवळ चार महिने वापरला जाणारा कुलर आठ महिने अडगळीत ठेवलेला असतो. फेब्रुवारी महिना उजाडताच तापमान वाढण्यास सुरुवात झाली आहे. त्यातूनच कुलर बाहेर निघताना दिसत आहेत.
    कुलर थंड हवा देणारे यंत्र असले तरी ते इलेक्ट्रिकवर चालणारे आहे. त्याचा वापर करतांना योग्य काळजी घेणे गरजेचे आहे.

    कुलर मध्ये पाण्याचा वापर केला जातो. यामुळे कधी शॉक बसेल, याचा नेम नसतो. हीच बाब लक्षात घेऊन अनेक जण दरवर्षी कुलर लावण्यापूर्वी दुरुस्तीची कामे करून घेतात. तापमानात वाढ होण्यास सुरुवात झाली असली तरी अजूनही पहाटे व रात्री थंडी कायम आहे दिवसभर मात्र उकाळ्यामुळे घामाघुन होत आहे अडगळीत पडलेले घरातील कुलर काढणे सुरू केले.

    स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईने वाळू तस्करांचे धाबे दणाणले


    कुलरला अर्थिंग द्या.

    थंड हवा मिळावी, यासाठी कुलर मध्ये पाण्याचा वापर केला जातो. त्यामुळे शॉक लागण्याची अधिक शक्यता असते. अशावेळी कुलरला अर्थिंग देणे आवश्यक आहे. तसेच कुलरचा शॉक लागून मृत्यू झाल्याच्या घटना दरवर्षीच घडतात त्यामुळे काळजी घेणे आवश्यक आहे.
    मोटार, वायरिंगची तपासणी का करावी? Prevent electric shock from cooler

    थंडी गायब होऊन ऊन तापण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे स्वेटर कपाटात गेले असून कुलर बाहेर काढण्यास सुरुवात झाली आहे.
    कुलर दुरुस्तीची कामे अजून वाढलेली नाही तापमानात वाढ होताच नागरिक नवीन कुलर खरेदीसाठी किंवा गवत, जाडी, मोटार, आदि खरेदीसाठी गर्दी करतात.

    अडगळीत ठेवलेल्या कुलरची उंदरांकडून वायरिंग कुडतडली जाण्याची अधिक शक्यता असते. त्यामुळे कुलर सुरू करण्यापूर्वी मोटार व वायरिंग सुस्थितीत आहे किंवा नाही तपासने गरजेचे आहे. Air cooler wiring check

    उन्हाळा लागताच कुलर दुरुस्तीच्या कामांना वेग येतो. यात मोटार, जाडी, गवत बदलविण्याची कामे होतात या वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत.

  • illegal sand mining cases | चंद्रपूर जिल्ह्यात अवैध रेती उत्खनन प्रकरणी कारवाई : लाखोंचा मुद्देमाल जप्त

    illegal sand mining cases

    illegal sand mining cases : चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा आणि भद्रावती येथे स्थानिक गुन्हे शाखेने गुप्त माहितीच्या आधारे दोन वेगवेगळ्या ठिकाणी सापळा रचून अवैध रेती उत्खनन करणाऱ्या टोळ्यांवर मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. illegal sand mining report

    राजुरा पोलिसांची कारवाई : दोन ट्रॅक्टरसह १६.१० लाखांचा मुद्देमाल जप्त

    आज दिनांक १२ फेब्रुवारी २०२५, रोजी स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार मौजा गोमनी नाल्यातून अवैधरित्या रेती चोरी करून वाहतूक केली जात असल्याचे समजले. त्या आधारे पोलिसांनी तत्काळ सापळा रचून छापा टाकला. या कारवाईत दोन ट्रॅक्टरसह एकूण १६,१०,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

    चंद्रपूर शहरातील भ्रष्टाचाराचे आका कोण ?

    आरोपींची माहिती:

    १) अरुण श्रीधर मालेकर (वय ३९ वर्षे, व्यवसाय – मजुरी, मालक)
    २) शैलेश नामदेव तलांडे (वय २४ वर्षे, व्यवसाय – ड्रायव्हर)
    ३) संदेश मारोती मुसळे (वय २६ वर्षे, व्यवसाय – ड्रायव्हर)
    (सर्व राहणार आर्वी, तालुका – राजुरा, जिल्हा – चंद्रपूर)

    गुन्हा आणि कलमे:

    वरील आरोपी अवैधरित्या रेती चोरून वाहतूक करताना मिळून आल्याने पोलीस ठाणे राजुरा, अप. क्र. ५६/२०२५ अंतर्गत पुढील कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे :

    • कलम ३०३(२) भारतीय दंड संहिता
    • कलम ४८(७), ४८(८) महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६
    • कलम १, २, ३ गौण खनिज अधिनियम, १९५२
    • कलम १३०(१)/१७७, ५० मोटार वाहन कायदा

    या कारवाईमुळे राजुरा परिसरातील अवैध रेती उत्खनन करणाऱ्या टोळ्यांना मोठा झटका बसला आहे.

    भद्रावती येथे गुन्हे शाखेची कारवाई : एक ट्रॅक्टरसह ६.६० लाखांचा मुद्देमाल जप्त

    आज दिनांक १२ फेब्रुवारी २०२५, रोजी स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे मौजा मांगली नाल्यातून अवैधरित्या रेती चोरी होत असल्याचे समजले. पोलिसांनी तात्काळ सापळा रचून छापा मारला आणि एक ट्रॅक्टरसह ६,६०,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. sand mafia activities

    आरोपींची माहिती:

    १) समीर बंडू चौधरी (वय २१ वर्षे, व्यवसाय – चालक)
    2) भारत वसंत बोढेकर (वय २४ वर्षे, व्यवसाय – शेती)
    (दोघे राहणार मांगली, तालुका – भद्रावती, जिल्हा – चंद्रपूर)

    गुन्हा आणि कलमे:

    वरील आरोपींनी अवैधरित्या रेती चोरून वाहतूक करत असताना मिळून आल्याने पोलीस ठाणे भद्रावती, अप. क्र. ३९/२०२५ अंतर्गत खालील कलमांनुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे : कलम ३०३(२) भारतीय दंड संहिताकलम १७७, १९२ मोटार वाहन कायदा (sand mining police action)

    पोलिसांच्या कठोर कारवाईने अवैध रेती तस्करांमध्ये खळबळ

    राजुरा आणि भद्रावती येथे स्थानिक गुन्हे शाखेने अवैध रेती तस्करी करणाऱ्या टोळ्यांवर मोठी कारवाई करत लाखोंचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामुळे परिसरातील रेती चोरी करणाऱ्या तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून, अवैध रेती तस्करीस आळा घालण्यासाठी पुढील कारवाई करण्यात येणार आहे.

    सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या नेतृत्वात पथकाने केली.

  • Corruption in Chandrapur Municipal Corporation । चंद्रपुरातील भ्रष्टाचाराचे आका? माजी नगरसेवक देशमुख स्पष्टच बोलले

    Corruption in Chandrapur Municipal Corporation

    चक्क शंभर कोटी रुपयांची भूमिगत गटार योजना पूर्ण झालेली असताना नवीन भुमिगत गटार योजनेकरिता 450 कोटी रुपयांची निविदा काढण्यात येते, 450 कोटी रुपये अंदाजपत्रक असलेले हे काम मर्जीतल्या कंत्राटदाराला दर वाढवून 506 कोटी रुपयांमध्ये देण्यात येते, अनेक काम अपूर्ण ठेवणाऱ्या व कराराचा भंग करणाऱ्या पहिल्या अमृत योजनेच्या कंत्राटदाराची सर्व देयके मंजूर करून त्याला कारवाईतून अभय देण्यात येते व त्याची शिल्लक कामे मनपा स्वतःच्या पैशातून करते , शंभर कोटी रुपयांच्या कचरा संकलनाचे काम सर्वोच्च न्यायालयातून रद्द होते पण निविदा प्रक्रियेत गैरव्यवहार करणाऱ्या विरुद्ध कारवाई होत नाही. Corruption in Municipal Corporations


    आम्ही तक्रार केल्यानंतर फाउंटेनच्या कामाची, पाणीपुरवठ्याच्या खाजगीकरणाची तसेच लोकसभेच्या आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करून काढलेली रामाळा तलावाच्या सौंदर्यीकरणाची 24 कोटी रुपयांची निविदा रद्द होते पण दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई होत नाही. Amrut Scheme Scam


    चंद्रपूर शहर महानगरपालिकेत आम्ही आजपर्यंत उघडकीस आणलेल्या अनेक घोटाळ्यावर शिक्कामोर्तब होऊनही कारवाई का होत नाही ? जिल्हा प्रशासन किंवा शासन झोपले आहे का ? हा आमचा सवाल आहे.
    महानगरपालिकेतील भ्रष्टाचारा विरुद्ध विधानसभेत किंवा लोकसभेत (केंद्र सरकारच्या अमृत योजनेतील घोटाळ्याबाबत) कोणतेही लोकप्रतिनिधी आवाज का उचलत नाही? महानगरपालिकेची तिजोरी लुटणाऱ्या विरुद्ध शासनाला कारवाई करायला भाग का पडत नाही ? हे सुद्धा गंभीर प्रश्न आहेत. Urban Development Corruption

    चंद्रपूर मनसे कामगार सेनेच्या आंदोलनात नाटकीय घडामोड


    चंद्रपूर शहराची दुर्दशा होण्यास मनपा प्रशासनातील ‘आका’ आणि या ‘आकां’ना संरक्षण देणारे सरकारमधील मंत्री, प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी आणि जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत. हेच ‘आकाचे आका’ आहेत.हे केवळ ‘आकां’कडे दुर्लक्षच करत नाही तर त्यांच्याविरुद्ध कोणतीही कारवाई होणार नाही याची काळजी सुद्धा घेतात.
    मनपा प्रशासनातील या ‘आका’ व त्यांना संरक्षण देणाऱ्या ‘आकाच्या आका’ विरुद्ध जनविकास सेनेतर्फे ‘जनसंघर्ष अभियान’ सुरू करण्यात येत आहे.

    बुधवार 12 फेब्रुवारी 2025 पासून या अभियानाला सुरुवात करण्यात येईल अशी माहिती मनपाचे माजी नगरसेवक व जन विकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली.पत्रकार परिषदेला जनविकास सेनेचेघनश्याम येरगुडे, इमदाद शेख, नितीन बनसोड, कुशाबराव कायरकर,सुभाष पाचभाई,प्रफुल बैरम, अमोल घोडमारे, आकाश लोडे, गितेश शेंडे, सतिश घोडमारे, मनीषाताई बोबडे, स्नेहल चौथाले, अरुणा महातळे, मेघा मगरे, अरुणा मांदाडे उपस्थित होते. Chandrapur Municipal Corruption

    मनपाच्या मुजोर अधिकाऱ्यांचा माज उतरवणार

    मनपाच्या भ्रष्टाचार व भोंगळ कारभाराविरुद्ध आंदोलन करणाऱ्या जनविकास सेनेला मंडप व होर्डिंग साठी मनपा प्रशासनाने परवानगी नाकारली. मुख्यमंत्र्यांच्या आगमनाच्या वेळेस लावलेल्या अवैध बॅनर बाबत विचारणा केल्यानंतर उपायुक्त खवले यांनी मुजोरीने उत्तर दिले. भाजप कार्यकर्त्याच्या नावाने डमी परवानगी मागितल्यानंतर संबंधित कर्मचारी बोधनकर व नागोसे यांनी एका तासात बॅनर व मंडपाची परवानगी दिली.या बाबतचे पुरावे व ऑडिओ क्लिप देशमुख यांनी पत्रकार परिषदेत सादर केले. Public Fund Misappropriation

    आंदोलन करणाऱ्या विरुद्ध पोलिसात खोट्या तक्रारी करण्यापर्यंत मनपा आयुक्त विपिन पालीवाल यांची मजल गेली आहे. सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादाने मनपा प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना माज आला आहे. जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना याची लेखी माहिती दिली असुन त्यांनी कारवाई न केल्यास जनविकास सेना मनपा प्रशासनातील मुजोर अधिकारी व कर्मचाऱ्यांचा माज उतरवण्याचे काम करेल असा इशारा यावेळी देशमुख यांनी दिला.

  • Workers protest against company | महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या नेतृत्वाखाली कामगारांचा संघर्ष

    Workers protest against company

    Workers protest against company : ताडाळी एमआयडीसी मधील सनविजय कंपनीचा मनमानी कारभार सुरु असून एका कामगाराचा अपघात झाल्यानंतर सुद्धा त्याला कुठलीही वैद्यकीय सुविधा न देता व त्याला पगार न देता कामावरून कमी केल्या प्रकरणी जवळपास 10 कामगारांनी कपंनी विरोधात आवाज उठवला होता, मात्र कंपनीने त्या 10 कामगारांना सुद्धा कामावरून कमी केल्याने महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अमन अंदेवार यांच्या नेतृत्वात मागील 6 फेब्रुवारी पासून कंपनी गेट समोर ठिय्या आंदोलन सुरु आहे.

    चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात हव्या या रेल्वे सुविधा

    दरम्यान कंपनी प्रशासन कामगारांना कामावर घेण्यास तयार नसल्याने आता कामगारांनी कामबंद आंदोलन दिनांक 7 फेब्रुवारी पासून सुरु झाले आहे, दरम्यान कंपनी व्यवस्थापन यांच्या सोबत मनसे पदाधिकारी यांची झालेली बैठक ही निष्फळ ठरली असल्याने हे आंदोलन सुरुचं राहणार असल्याची माहिती आहे. ११ फेब्रुवारीला कामगार आयुक्त कंपनी परिसरात दाखल झाले असता कंपनीत असलेले परप्रांतीय कामगारांनी भिंतीवरून उड्या मारत पळ काढण्याचा प्रयत्न केला असता मनसे पदाधिकारी यांनी पळणाऱ्या कामगारांना पकडून आणले. (Tadali MIDC)

    कंपनी बाहेर स्थानिक कामगार आपल्या हक्कासाठी लढत असताना कंपनी परप्रांतीय कामगारांना रोजगार देते हि बाब कामगार कायद्याचे उल्लंघन करणारी आहे अशी प्रतिक्रिया मनसे कामगार अध्यक्ष मन अन्देवार यांनी यावेळी दिली.

    सनविजय अलॉय पॉवर कंपनीत जे कंत्राटदार आहेत त्यापैकी अनेकांची नोंदणी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात नसून त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या कामगारांची संख्या जवळपास 200 च्या वर आहे, दरम्यान अशाच एका बेकायदेशीर कंत्राट घेणाऱ्या कंत्राटदार यांच्या एका कामगारांचा अपघात झाला होता तरी सुद्धा त्याला कंत्राटदार किंव्हा कंपनी कडून वैद्यकीय खर्च दिला नाही तर उलट त्याला कामावरून काढून टाकल्या गेले, याकरिता जवळपास 22 कामगारांनी आवाज उठवला की त्याला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे मात्र कंपनी ठेकेदारांनी उलट त्यापैकी 10 कामगारांना कामावरून काढून टाकले यावरून कंपनीच्या कंत्राटदारांकडून मनमानी कारभार असून कामगारावर अन्याय होतं आहे, त्यामुळे मनसे कामगार सेनेच्या पाठिंब्याने आंदोलन सुरूच आहे. (Industrial accident and negligence)

    स्थानिक गुन्हे शाखेची वाळू तस्करांवर कारवाई, लाखोंचा मुद्देमाल जप्त

    यां कंपनीत जवळपास 350 ते 400 कामगार काम करीत आहे मात्र त्यापैकी अनेक बोगस कंत्राटदार आहेत त्यांच्या कडे ते काम करतात व कामगारांचा भविष्य निर्वाह निधी जमा होतं नाही आणि किमान वेतन कायाद्यानुसार त्यांना वेतन मिळतं नाही, सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातून दरवर्षी कामगारांच्या वेतन धोरनानुसार किमान वेतन संबंधी आदेश निघतो मात्र यां कंपनीतील कामगारांना दरवर्षी वेतन वाढ होतं नाही, त्यांना वैद्यकीय सुविधा नाही, कंपनीत ऍम्ब्युलन्स आहे पण त्यात पेट्रोल डिझेल नाही, कामगारांना काही दुखापत झाली तर शासनाच्या प्राथमिक आरोग्य केंद्र असलेल्या ताडाळी येथे उपचार केल्या जातो. (Mass termination of employees)

    त्यामुळे ही कंपनी पूर्णतः बेकायदेशीर असून यां विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या झेंड्याखाली माध्यमातून काल दिनांक 7/2/2025 पासून आंदोलन सुरु आहे, मात्र ते आंदोलन होऊ नये यासाठी कामगारावर दबाव आणल्या जात आहे पण कामगारांच्या मागण्या पूर्ण केल्या जात नाही. त्यामुळे आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आक्रमक झाले असून जोपर्यंत कामगारांच्या मागण्या मान्य होतं नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहिलं असा इशारा मनसे कामगार जिल्हाध्यक्ष अमन अंदेवार यांनी कपंनी प्रशासनाला दिला आहे. (Company workers’ strike)

    यावेळी मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, वाहत्तुक सेना जिल्हाध्यक्ष महेश वासलवार, उमाशंकर तिवारी, जनहीत जिल्हाध्यक्ष रमेश काळबाधे सुनील गुढे, रोजगार स्वयंरोजगार जिल्हाध्यक्ष मनोज तांबेकर, व्यापारी सेना जिल्हाध्यक्ष महेश शास्त्रकार अँड.अजीतकुमार पांडे मोहम्मद फयाज इत्यादीची उपस्थिती होती.

  • Railway services in Chandrapur | चंद्रपूरच्या रेल्वे सुविधांसाठी खासदार धानोरकर यांची रेलमंत्र्यांशी चर्चा

    Railway services in Chandrapur

    Railway services in Chandrapur : सध्या संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून खासदार प्रतिभा धानोरकर ह्या चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्रातील विविध विकासात्मक कामासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे. लोकसभा क्षेत्रातील रेल्वे सुविधा संबंधी त्यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेत चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्रातील रेल्वे सुविधांना बळकटी देण्याची मागणी केली आहे. (Chandrapur railway station development)

    खासदार प्रतिभा धानोरकर ह्या चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्रातील प्रत्येक विभागाच्या विकासांत्मक कार्यासाठी अग्रेसर असल्याचे दिसून येत आहे. काल दि. 10 फेब्रूवारी रोजी त्यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेत विविध मागण्यांसदर्भात चर्चा केली. या मध्ये त्यांनी प्रामुख्याने बल्लारपूर ते लोकमान्य टिळक टर्मिनस पर्यंत चालणारी गाडी आठवड्यातील संपुर्ण दिवस चालविण्याची विनंती केली. तसेच काजीपेठ-पुणे हि गाडी आठवड्यातून तीन दिवस चालविण्यासंदर्भात चर्चा केली.

    घुग्गुस शहराच्या विकासासाठी आमदार जोरगेवार यांची महत्वाची बैठक

    तसेच, चंद्रपूर-पुणे व चंद्रपूर-मुंबई या मार्गावर वंदे भारत ट्रेन (Vande Bharat trains Chandrapur-Pune) चालविण्याची विनंती देखील खासदार प्रतिभा धानोरकर यांची केली. त्यासोबतच चंद्रपूर हे औद्योगीक शहर असून येथे अनेक गाड्यांचा थांबा नसल्याने या ठिकाणी प्रत्येक गाडीचा थांबा देण्याची देखील विनंती खासदार धानोरकर यांनी केली. त्यासोबतच वरोरा व भद्रावती येथे कोरोना काळाच्या आधी थांबत असलेल्या सर्व गाड्यांचा थांबा पुर्ववत देण्याची मागणी केली. तसेच, मुंबई-नंदीग्राम एक्सप्रेस ला मुकूटबन व लिंगती रेल्वे स्टेशन वर थांबा देण्यासोबतच मुकुटबन रेल्वे स्टेशन वर रेल्वे आरक्षणाची सुविधा उपलब्ध करुन देण्याची विनंती देखील खासदार धानोरकर यांनी केली.

    तसेच, झरी तालुक्यातील अहेरअल्ली या गावाजवळ असणाऱ्या अंडरपासची दुरुस्ती देखील करण्याची मागणी या दरम्यान केली. तसेच विसापूर येथील रेल्वे लाईन वर असणाऱ्या अंडपास मध्ये लाईटस् ची व्यवस्था करण्याची मागणी करुन बल्लारपूर रेल्वे स्टेशन वर नागरीकांच्या सुविधेसाठी सुरु करण्यात आलेल्या बॅटरीचलीत कार पुन्हा सुरु करण्याची मागणी यावेळी खासदार धानोरकर यांनी केली. या सर्व मागण्यांवर केंद्रीय रेल्वे मंत्री यांनी सकारात्मकता दर्शवून लवकरच या संदर्भाने निर्णय घेण्याचे आश्वासन मंत्री महोदयांनी खासदार प्रतिभा धानोरकर यांना दिले.

  • Ghugghus city development Progressive । “घुग्घुसच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस पावले – नागरी सुविधा, स्वच्छता आणि क्रीडा संकुल उभारणीला गती”

    Ghugghus city development

    Ghugghus city development : विकासाच्या दिशेने ठोस पावले उचलण्याची गरज आहे. घुग्घुस शहराच्या आणि परिसराचा सर्वांगीण विकासासाठी कोणतीही तडजोड स्वीकारली जाणार नाही, नागरी सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा, (Water supply schemes in Ghugghus) क्रीडा संकुल आणि पुनर्वसन योजनांवर ठोस निर्णय घेऊन त्यांची तातडीने अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. निधीची गरज असल्यास शासनाकडे प्रस्ताव पाठवा, आम्ही पाठपुरावा करू, घुग्घुससारख्या वाढत्या शहरांसाठी नियोजनबद्ध विकास महत्त्वाचा असून, तसे नियोजन करण्याच्या सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्या आहे.

    चंद्रपुरात मनसेचे आंदोलन

    चंद्रपूर शहर आणि घुग्घुस परिसरातील विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीत अमृत 2.0 (Amrut 2.0 development projects) अंतर्गत सुरू असलेल्या विकास प्रकल्पांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच, शहरातील स्वच्छता, घुग्घुस नगर परिषदेच्या प्रलंबित प्रकल्पांबाबत आणि क्रीडा संकुल उभारणीसाठी आवश्यक जागेच्या उपलब्धतेसंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. Urban planning in Chandrapur

    या बैठकीला जिल्हाधिकारी विनय गौडा, उपविभागीय अधिकारी संजय पवार, तहसीलदार विजय पवार,  घुग्घुस नगर परिषद मुख्य अधिकारी राजनकर, नायब तहसीलदार राजू धांडे, क्रीडा अधिकारी  तसेच इतर संबंधित अधिकारी आणि भाजप नेते मनोज पाल, दशरथ सिंग ठाकूर, संतोष नुने, संजय तिवारी, राजकुमार गोडछेडवार, श्याम आगदरी, निरीक्षण ताद्रा, साजन गोहणे, सोनल भरटकर, स्वप्नील वाढई, विजय सिंग, मयूर कलवल, राजेश मोरपाका, विशाल दामीर उपस्थित होते.

    बैठकीत घुग्घुस नगर परिषदेच्या विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. तालुका क्रीडा संकुलाच्या उभारणीसाठी २५ एकर जागा उपलब्ध करण्यासंदर्भात चर्चा झाली. तसेच, नगर परिषदेच्या हद्दीत असलेल्या शासकीय जागांचा वापर पाणीपुरवठा प्रकल्प आणि घनकचरा व्यवस्थापन यासाठी करण्यात यावा, यावरही भर देण्यात आला. भूस्खलन आपत्तीग्रस्त भागातील नागरिकांसाठी पुनर्वसन उपाययोजनांवर चर्चा करत, त्यासाठी आवश्यक निधी मिळवण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले.

    नगर परिषदेच्या इमारतीसाठी निधी उपलब्ध करून देण्याच्या मुद्द्यावरही चर्चा झाली. घुग्घुसमधील एसडब्ल्यूएम क्षेत्राची स्वच्छता करण्यासाठी आवश्यक निधी मिळावा, यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात यावा, असे निर्देश आमदार किशोर जोरगेवार यांनी दिले. याशिवाय, सर्वे क्रमांक ३१८ वरील निस्तार हक्क काढण्याच्या प्रक्रियेवर या बैठकीत विचारविनिमय करण्यात आला. बैठकीदरम्यान, सामाजिक दायित्व निधी अंतर्गत डस्ट सक्शन मशीन उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्णय घेण्यात आला. १५ व्या वित्त आयोगाच्या अंतर्गत जिल्हा परिषदेकडे असलेल्या १.१५ कोटी निधीच्या विनियोगावर चर्चा झाली. त्याचा उपयोग विकासकामांसाठी करण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्याचे निर्देश आमदार किशोर जोरगेवार यांनी दिले. मायनॉरिटी विभागाकडून मंजूर झालेल्या २५ लाख निधीच्या वापराबाबतही सविस्तर माहिती घेण्यात आली असून, आवश्यक तेथे हा निधी वापरण्याच्या सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्या. (Ghugghus Municipal Council)

    या वेळी बोलताना आमदार जोरगेवार म्हणाले, “विकासकामे वेळेत पूर्ण होण्यासाठी स्थानिक प्रशासनाने अधिक जबाबदारीने काम करणे गरजेचे आहे. प्रलंबित प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी शासनाकडून आवश्यक निधी मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. नागरिकांच्या सोयीसाठी, शहर स्वच्छता आणि सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे प्रकल्प वेगाने राबवले जातील. या बैठकीच्या माध्यमातून शहराच्या सर्वांगीण विकासाला गती मिळेल. घुग्घुससारख्या वाढत्या शहरांसाठी नियोजनबद्ध विकास महत्त्वाचा आहे. क्रीडा संकुलासाठी जागा उपलब्ध करून देणे, स्वच्छतेसाठी आवश्यक यंत्रणा उभारणे आणि नगर परिषदेच्या इमारतीसाठी निधी मिळवणे या प्राधान्याच्या बाबी आहेत. नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण होण्यासाठी प्रशासनाने अधिक जबाबदारीने कार्य करावे, अशा सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्या.

  • Chandrapur MNS agitation | चंद्रपुरात मनपाची धूळ आणि मनसेचे मास्क वाटप आंदोलन

    Chandrapur MNS agitation

    Chandrapur MNS agitation : चंद्रपूर : चंद्रपूर येथील नागरिकांना महानगरपालिकेने कोणतीही पूर्व सूचना न देता चंद्रपुरात ठिकठिकाणी रस्ते खोदल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

    मात्र याकडे लोकप्रतिनिधी आणि मनपाचे दुर्लक्ष होत असल्याने आज दिनांक 11 फेब्रुवारीला दुपारी चंद्रपूर शहरातील जटपूरा गेट येथे मनपाच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष मनदीप रोडे यांच्या नेतृत्वात आक्रमक आंदोलन करण्यात आले. (Mns protest)

    एक व्हाट्सएप संदेश, आणि निराधार महिलेला झाली मोठी मदत

    आंदोलनादरम्यान मनसेच्या कार्यकर्त्यांनी मास्क लावून महानगरपालिकेचा जाहीर निषेध नोंदविला. 

    चंद्रपूर शहरात जाण्यासाठी एकच मुख्य मार्ग असल्याने या रस्त्यावर महानगर पालिकेने कोणतीही पूर्व सूचना न देता खोदकाम केले यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांसह रुग्णांना सुद्धा या रस्त्यावरून येजा करताना त्रास सहन करावा लागत असताना याकडे मनपा आयुक्त जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्यामुळे मनसेने आंदोलन केले व या रस्त्यावर मार्गक्रमण करणाऱ्या नागरिकांना मास्कचे वाटप केले. येत्या काही दिवसात रस्त्याची दुरुस्ती न केल्यास मनपासमोर आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी मनदीप रोडे यांनी दिला. (Chandrapur traffic issues)

    भूमिगत गटार योजनेवरून मनपा विरुद्ध नागरिकांमध्ये आधीच रोष आहे, 15 वर्षापूर्वी सुद्धा चंद्रपुरात 100 कोटींची भूमिगत गटार योजनेचे काम करण्यात आले होते, मात्र सदर काम अयशस्वी झाल्याने आता 500 कोटींच्या भूमिगत गटार योजनेचे काम सुरू करण्यात आले आहे.

    यामुळे शहरातील मुख्य मार्ग खोदण्यात आल्याने नागरिकांना रहदारी करण्यासाठी धुळीचा सामना करावा लागत आहे, शहरातील वाहतूक व्यवस्था खोळंबून गेली आहे, मनसेने आज या विषयावर निषेध आंदोलन केले मात्र या आंदोलनाचा काय परिणाम होणार ही येणारी वेळ ठरवेल.

  • Sudhir Mungantiwar Health Initiatives । “सेवाभावी उपक्रमांचा अनोखा वसा – चंद्रपुरात रुग्णवाहिकेचे लोकार्पण!”

    Sudhir Mungantiwar Health Initiatives

    Sudhir Mungantiwar Health Initiatives : आरोग्यसेवा हीच ईश्वर सेवा आहे. वेळेवर रुग्णवाहिका मिळाल्याने अनेकांचे जीव वाचवता येतात. याच उदात्त सेवा भावनेने श्री. विराल चीतालिया यांच्याद्वारे रुग्णवाहिका देण्यात आली. दुर्घटना, आजार व आरोग्याच्या बाबतीत अन्य आपात्कालीन स्थितीत रुग्णवाहिका प्रभावी ठरेल, असा विश्वास आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. आरोग्यसेवेच्या बळकटीकरणासाठी आ. श्री. मुनगंटीवार सदैव तत्पर असतात. यापूर्वी अनेक वैद्यकीय सेवा उपक्रम राबवून त्यांनी याची प्रचिती दिली आहे, हे विशेष.

    आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांतून स्व. विनोदजी चीतालिया मुंबई यांच्या स्मृती प्रित्यर्थ भद्राबेन चीतालिया, विराल चितालिया, मिलान चितालिया यांच्या सौजन्यातून मुल जलतरण संघटनेला रुग्णवाहिका प्राप्त झाली. या रुग्णवाहिकेचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते सोमवारी (ता.१०) मुल येथील रामलीला भवन येथे लोकार्पण झाले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी श्री. विरल चीतालीया, अमोल जाधव, नंदकिशोर रणदिवे, संध्याताई गुरनुले, किशोर कापगाते, संजय चिंतावार, प्रवीण मोहुर्ले, अजय गोगुलवार, प्रज्वलंत कडू उपस्थित होते. (Healthcare Services for Poor)

    श्रीमतीचा सौभाग्य सोहळा, आमदार जोरगेवार यांची उपस्थिती

    चितालिया यांनी मोठ्या मनाने सेवाभावाने २१ लाख ८७ हजार ३६३ रुपयांची रुग्णवाहिका प्रदान केली, असे सांगत आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी श्री. विराल चितालिया यांचे आभार व्यक्त केले. तसेच त्यांनी जलतरण संघटना उत्तमरित्या रुग्णवाहिकेचे देखरेख करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुलवासीयांनी या रुग्णवाहिकीचे समर्पक उपयोग करीत गोरगरीबांचा जीव वाचविण्यासाठी काम करावे, या कामात सर्व समुदाय एकदिलाने सहकार्य करतील, असाही विश्वास आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

    Mungantiwar

    आरोग्यसेवेच्या बळकटीकरणासाठी
    आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आरोग्य सेवेमध्ये अनेक महत्वाची कार्य केली आहेत. त्यांच्या पुढाकारामुळे चंद्रपूरमध्ये कॅन्सर हॉस्पिटल (Cancer Hospital Chandrapur) तयार झाले, नवीन मेडिकल कॉलेज निर्माण झाले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात १३ नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रांची निर्मिती श्री. मुनगंटीवार यांनी केली. त्यांनी आतापर्यंत नऊ रुग्णवाहिका जनतेच्या सेवेकरिता उपलब्ध करुन दिल्या, मोठ्या प्रमाणात आरोग्य शिबिर घेतली.

    आरोग्य उपकेंद्रांना मंजुरी
    आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र निर्माण केली जात आहेत. विशेष बाब म्हणून त्यांनी सात उपकेंद्र जिल्ह्यात मंजुर केली. यामध्ये मुल तालुक्यातील चितेगाव, पिंपरी दीक्षित, फिस्कुटी, सुशी, तर पोंभुर्णा तालुक्यातील सातारा तुकूम, फुटाणा व जामतुकूम या गावांमध्ये उपकेंद्र मंजूर करण्यात आले आहेत. आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून आतापर्यंत नेत्र चिकित्सा शिबिराच्या माध्यमातून ५० हजार रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली. ५ हजारांपेक्षा जास्त मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली आणि ३५ हजारांहून अधिक चष्मे प्रदान करण्यात आले आहेत.