Blog

  • Nagpur Divisional Sports Championship | “नागपूर विभागीय क्रीडा स्पर्धेत चंद्रपूरचा दबदबा – जनरल चॅम्पियनशिपवर मोहोर!”

    Nagpur Divisional Sports Championship

    Nagpur Divisional Sports Championship : चंद्रपूर येथे पार पडलेल्या नागपूर विभागीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्याने उत्कृष्ट कामगिरी करत 356 गुणांसह ‘जनरल चॅम्पियनशीप’ चा किताब पटकाविला. तर उपविजेता गडचिरोली जिल्ह्याला 305 गुण मिळाले. राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी चंद्रपूर जिल्हा विजयी चमुसह ‘जनरल चॅम्पियनशीप’’ चषक स्वीकारला. (Chandrapur District Wins General Championship)

    दिनांक 7 ते 9 फेब्रुवारी 2025 या कालावधीत विसापूर येथील सैनिक शाळेत नागपूर विभागीय क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. नागपूर विभागातील सहा जिल्हे आणि नागपूर येथील आयुक्त कार्यालयातील चमूने सदर स्पर्धेत सहभाग नोंदविला. या स्पर्धेचा समारोप सैनिक स्कूल येथे 9 फेब्रुवारी 2025 रोजी पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी आमदार किशोर जोरगेवार, नागपूरच्या विभागीय आयुक्त माधवी खोडे – चवरे, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविशांत पंडा, नागपूर येथील उपायुक्त दिपाली मोतिहाळे, सहायक जिल्हाधिकारी अपुर्वा बासुर, कश्मिरा संख्ये, सैनिक स्कूलचे प्राचार्य कॅप्टन अश्विन अनुपदेव, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. (Inter-District Sports Competition 2025)

    एका व्हाट्सअप मॅसेजने निराधार महिलेला मिळाली मोठी मदत

    राज्य स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करा – पालकमंत्री डॉ. अशोक उईके

    यावेळी बोलतांना पालकमंत्री डॉ. अशोक उईके म्हणाले, महसूल विभाग प्रशासनाची मुख्य रक्तवाहिनी आहे. दैनंदिन काम करीत असतांनाच अशा प्रकारच्या क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमातून अधिकारी – कर्मचा-यांसाठी एक व्यासपीठ उपलब्ध होते. जिल्हास्तर, विभागीय स्तर आणि राज्य स्तरावर खेळण्याची चांगली संधी त्यांना मिळते. खेळामध्ये यश प्राप्त करणे हे ध्येय ठेवायलाच पाहिजे. प्रशासनामध्ये काम करीत असतांना आपण आपली ओळख निर्माण करतो, तशीच ओळख खेळाच्या माध्यमातूनही निर्माण झाली पाहिजे. राज्यस्तरावरील क्रीडा स्पर्धेत आता नागपूर विभाग आणि चंद्रपूर जिल्ह्यानेसुध्दा उत्कृष्ट कामगिरी करावी, अशी अपेक्षा पालकमंत्र्यांनी व्यक्त केली. (Chandrapur Sports Achievements)

    जिल्हा प्रशासनाच्या वतीने क्रीडा स्पर्धांचे उत्कृष्ट आयोजन : आमदार किशोर जोरगेवार

    राज्य शासनाच्या 590 कोटीतून ही सैनिक स्कूल उभी राहिली आहे. खेळाच्या अत्याधुनिक सोयीसुविधा येथे आहेत. शासनाला महसूल प्रशासनाकडून जास्त अपेक्षा असतात. महसूल विभागाच्या क्रीडा स्पर्धांप्रमाणेच नागपूर विभागाने इतरही शासकीय  विभागांच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा आयेाजित कराव्यात. जेणेकरून इतर विभागातील अधिकारी कर्मचा-यांनासुध्दा स्वत:तील कलागुण विकसीत करता येईल. या क्रीडा स्पर्धांचे चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने उत्कृष्ट आयोजन केले, असे त्यांनी सांगितले. (Best Performing District in Sports)

    राज्यात नागपूर विभाग नेहमीच अग्रेसर राहावा : विभागीय आयुक्त माधवी खोडे

    महसूल विभागावर प्रशासनाची मोठी जबाबदारी असते. कामाच्या तणावातून मुक्त होण्यासाठी अशा स्पर्धांचे आयोजन आवश्यक आहे. नागपूर विभागातील सहा जिल्हे आणि आयुक्त कार्यालयाच्या टीम येथे आल्या. सर्वांनी चांगली कामगिरी केली असून खेळभावना केवळ खेळातच नव्हे तर कामातूनही दिसू द्यावी. तसेच संपूर्ण राज्यात नागपूर विभाग नेहमीच अग्रेसर असावा, अशी अपेक्षा विभागीय आयुक्त माधवी खोडे – चवरे यांनी व्यक्त केली.

    प्रास्ताविकात जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. म्हणाले, तीन दिवस या स्पर्धा घेण्यात आल्या. नागपूर विभागातून एकूण 1080 अधिकारी आणि कर्मचा-यांनी यात सहभाग नोंदविला. 22 क्रीडा प्रकारामध्ये या स्पर्धा घेण्यात आल्या. अशा स्पर्धांमधून व्यक्तिमत्व विकास होण्यास मदत होते.

    कार्यक्रमाचे संचालन तहसीलदार प्रताप वाघमारे यांनी तर आभार निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार यांनी मानले. यावेळी उपविभागीय अधिकारी संजय पवार, रविंद्र माने, उपजिल्हाधिकारी (भुसंपादन) संजय पवार, तहसीलदार विजय पवार, श्रीधर राजमाने यांच्यासह इतर खेळाडू अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

    हे संघ ठरले विजेता आणि उपविजेता : कबड्डी – विजेता गडचिरोली जिल्हा, उपविजेता चंद्रपूर जिल्हा. व्हॉलीबॉल – विजेता चंद्रपूर, उपविजेता गडचिरोली.  थ्रो बॉल – विजेता गडचिरोली, उपविजेता चंद्रपूर. खो-खो  महिला : विजेता गडचिरोली, उपविजेता चंद्रपूर. खो-खो पुरुष : विजेता गडचिरोली, उपविजेता चंद्रपूर. क्रिकेट – विजेता चंद्रपूर, उपविजेता नागपूर. फुटबॉल – विजेता चंद्रपूर, उपविजेता गडचिरोली. याशिवाय उत्कृष्ट गायन सोलो, उत्कृष्ट अभिनय सोलो, वैयक्तिक नृत्य, उत्कृष्ट वेशभुषा, नक्कल, युगल गीत, दिग्दर्शन, कलाप्रकार मध्ये चंद्रपूर आणि गडचिरोलीसह गोंदिया, भंडारा, वर्धा, नागपूर जिल्ह्यांनी चांगली कामगिरी केली.

  • Mission Aadhar Initiative | “मिशन आधार उपक्रमातून निराधार महिलेच्या घराला आर्थिक मदतीचा आधार!”

    Mission Aadhar Initiative

    Mission Aadhar Initiative : सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपूरच्या वतीने तयार करण्यात आलेल्या ‘मिशन आधार’ उपक्रमाच्या माध्यमातून निराधार महिलेला 60 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. या रकमेतून निराधार महिलेचे घर सुरक्षित झाले आहे.

    एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूरचे प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांच्या संकल्पनेतून सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी  ‘मिशन आधार’ नावाचा व्हॉटसअप ग्रुप तयार करण्यात आला आहे. या ग्रुपमध्ये  प्रकल्प कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या सर्व अधिकारी/कर्मचारी, आश्रमशाळेचे मुख्याध्यापक, इतर कर्मचारी तसेच गृहपाल व अनुदानित आश्रमशाळेचे कर्मचारी तसेच संस्थाचालकांचा समावेश आहे.

    चंद्रपुरात पुन्हा सुरु झाला कोंबडा बाजार

    सदर ग्रुप हा गरजु, वंचित, निराधार व अपंगाना मदत करण्यासाठी मानवीय दृष्टीकोनातून तयार करण्यात आला आहे. एक महिन्यापूर्वी चंद्रपुर येथील रहिवासी महिला शिला बालाजी कुमरे, या विधवा व अपंग असून त्यांची परिस्थिती अत्यंत हलाकीची आहे. त्यांच्या घराचे छत पडण्यावर आलेले आहे, अशी माहिती जितेश कुळमेथे यांनी प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांना दिली. (Support for Widows and Disabled)

                श्री. राचेलवार यांनी सदर मॅसेज व घराचा फोटो अधिकारी/कर्मचारी गृपवर पाठविला व सर्वांना या गरजु कुटुंबाला मदत करण्याचे आवाहन केले. प्रकल्प कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी, शासकीय आश्रमशाळेतील मुख्याध्यापक तसेच अनुदानित आश्रम शाळेचे संस्था प्रमुख मंगेश चटप, मनोहर चटप, प्रशांत चटप तसेच श्री.बजाज, तसेच प्रकल्प कार्यालयातील काही पुरवठादार या सर्वांनी मिळुन 60 हजार रुपयाची मदत गोळा केली.

    ही रक्कम प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार, डी. के. टिंगुसले. एस. डी. जगताप, लेखाधिकारी तसेच एस. एस. पाटील, यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत निराधार महिलेला देण्यात आली.  या आर्थिक मदतीतून शिला बालाजी कुमरे या महिलेच्या घराची दुरुस्ती करावयाची जबाबदारी जितेश कुळमेथे यांना देण्यात आली व त्यानुसार सदर महिलेच्या घराची छताची व पक्की दुरुस्ती करण्यात आली. (Tribal Development Project India)

    याबाबत प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार म्हणाले, मिशन आधारच्या रुपाने सर्व माझ्या सहकारी अधिकारी/कर्मचारी यांच्या माध्यमातून यापूर्वीही मोठया प्रमाणात गरजु, निराधार, विधवा, अपंग व्यक्तींना वैयक्तीक मदत केली आहे. अशाच प्रकारचे सामाजिक कार्य या ग्रुपच्या मदतीने निरंतर करण्यात येणार आहे. त्यासाठी माझे सहकारी तसेच कार्यालयाशी संबंधित प्रत्येक घटकांनी समोर येऊन मदतीचा हात द्यावा, अशी अपेक्षा श्री. राचेलवार यांनी व्यक्त केली.

  • Shrimati’s soubhagya utsav । “श्रीमतीचा सौभाग्य सोहळा : संघर्षशील महिलांच्या जिद्दीला सलाम”

    Shrimati’s soubhagya utsav

    Shrimati’s soubhagya utsav : स्त्रीशक्ती ही केवळ कुटुंबाचीच नाही, तर संपूर्ण समाजाची ताकद आहे. जेव्हा एखादी महिला आत्मनिर्भर होते, तेव्हा ती केवळ स्वतःपुरती मर्यादित राहत नाही, तर संपूर्ण समाजाला प्रेरणा देते. आज या मंचावर अनेक महिलांनी आपले अनुभव सांगितले. त्यामध्ये संघर्ष होता, कष्ट होते, पण त्याहीपेक्षा जिद्द, आत्मविश्वास आणि काहीतरी करून दाखवण्याची हिम्मत होती. श्रीमतीचा सौभाग्य सोहळा हा याच संघर्षशील प्रवासाची दखल घेत समाजात सकारात्मक परिवर्तन घडवणारा उपक्रम असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

    संकल्प संस्था आणि निमा ह्युमन फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने इंदिरा नगर येथे एकल पालकतत्व करणाऱ्या परितक्ता आणि विधवा महिलांच्या संघर्षमय वाटचालीला सन्मान देण्यासाठी “श्रीमतीचा सौभाग्य सोहळा” आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी संकल्प संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अशोक  वासलवार, निमा ह्युमन फोरमच्या अध्यक्ष डॉ. शिमला गाजर्लावार, सचिव डॉ. मनीष घुगल, डॉ. वैशाली बदनोरे, डॉ. स्नेहल पोटदुखे, संकल्प संस्थेचे व्यवस्थापक कुंदन खोब्रागडे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. (Celebrating Women’s Strength)

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस उत्साहात

    यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, समाजामध्ये अनेक महिला वेगवेगळ्या परिस्थितींशी सामना करत आपले जीवन साकारत असतात. काही विधवा होतात, काही परीतक्ता असतात, पण त्यांनी कठीण परिस्थितीसमोर हार न मानता आपल्या कुटुंबासाठी उभे राहणे, ही खऱ्या अर्थाने एक शौर्यगाथा आहे.

    आज येथे उपस्थित असलेल्या महिलांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर केवळ स्वतःचे जीवन नव्हे, तर आपल्या मुलांचे आणि परिवाराचे जीवन घडवले आहे. संकल्प संस्थेने हा उपक्रम राबवून या महिलांना सन्मानित करण्याचे मोठे कार्य केले आहे. या गौरवामुळे त्यांना अधिक आत्मविश्वास मिळेल आणि इतर महिलांसाठीही हे एक नवे मार्गदर्शन ठरेल. समाजानेही अशा महिलांच्या जिद्दीला आणि कर्तृत्वाला प्रोत्साहन दिले पाहिजे.

    indira nagar

    स्त्रियांच्या सशक्तीकरणासाठी, त्यांच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या प्रगतीसाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत. शासनाच्या विविध योजनांचा लाभ अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचावा, त्यांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. महिला म्हणजे केवळ कुटुंबाचा आधारस्तंभ नाहीत, तर त्या संपूर्ण समाजाची शक्ती आहेत. आपल्या कर्तृत्वाने त्यांनी हे सिद्ध केले आहे. आणि पुढेही करत राहतील,” असा विश्वास आमदार किशोर जोरगेवार यांनी यावेळी व्यक्त केला. या कार्यक्रमाला परीतक्ता आणि विधवा महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

  • Eknath shinde birthday celebration chandrapur । शिवसेना मुख्यनेते एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त चंद्रपुरात विविध कार्यक्रमांचे आयोजन

    Eknath shinde birthday celebration chandrapur

    Eknath shinde birthday celebration chandrapur : चंद्रपुर, महाराष्ट्र: शिवसेना मुख्यनेते, महाराष्ट्र राज्याचे माजी लाडके मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त चंद्रपुर जिल्ह्यात विविध सामाजिक आणि सेवाभावी कार्यक्रम आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमांदरम्यान शिवसेना कार्यकर्त्यांनी समाजातील विविध वर्गांना सन्मानित करून, सेवाभावी कार्ये केली.

    चंद्रपुरात पुन्हा कोंबडा बाजार

    शिवसैनिकांचा सत्कार
    शिवसेना महिला आघाडी, चंद्रपुर जिल्हाप्रमुख सौ. मिनलताई आत्राम यांच्या उपस्थितीत शिवसेना चंद्रपुर तालुका प्रमुख, ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष तथा कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष पारखी यांच्या नेतृत्वात चंद्रपुरातील सार्वजनिक बांधकाम विश्राम गृहामध्ये जिल्ह्यात शिवसेना पक्षाच्या वाढीसाठी प्रयत्न करणाऱ्या ज्येष्ठ शिवसैनिकांना शाल आणि श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. (Shiv Sena social work programs Chandrapur)

    chandrapur shiv sena news updates

    भिक्खू आणि विद्यार्थ्यांना ब्लँकेट वाटप
    भदंत चंद्रमणी नॅशनल पार्क, अष्टभुजा वार्डातील भदंत धम्म घोष मेत्ता भिक्खू संघ बौद्ध विहारात भंतेजी आणि विद्यार्थी भंतेजींना ब्लँकेट वाटप करण्यात आले. यावेळी शिवसेना कार्यकर्त्यांनी बौद्ध भिक्खूंशी संवाद साधण्यात आला.

    रुग्णांसाठी भोजनदान
    चंद्रपुर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना भोजनदान करण्यात आले. या आधी रुग्णांच्या कुटुंबियांना सेवाभावी कार्यातून मदत करण्याचा प्रयत्न करण्यात आला. (Eknath Shinde Chandrapur event highlights)

    वृद्धाश्रमात फळवाटप
    डेबू सावली वृद्धाश्रम, देवाळा येथील वृद्धांना फळे वाटप करण्यात आली. यावेळी वृद्धांनी शिवसेना मुख्यनेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवसाला दीर्घ आयुष्य लाभो आणि त्यांचे आरोग्य चांगले राहो असा आशिर्वाद दिला.

    कार्यक्रमात उपस्थित
    या कार्यक्रमात शिवसेना चंद्रपुर वैद्यकीय मदत कक्ष जिल्हाप्रमुख तथा वाहतूक जिल्हाप्रमुख अरविंद धिमान, चंद्रपुर तालुका संघटक संजयकुमार शिंदे, बल्लारपुर विधानसभा महिला संघटिका सौ. कृष्णाताई सुरमवार, शिवसेना दिपक रेड्डी, उपतालुका प्रमुख विक्की महाजन, उपशहर प्रमुख सूचक दखने, उपशहर प्रमुख विश्वास खैरे, युवासेना उपशहर प्रमुख साहिल गाणफाडे, भद्रावती माजी नगरसेवक नाना दुर्गे, मंगेश वांढरे, साहेबराव आठवले, सूरज पारखी, भगवानदास रॉय, विवेक दुर्गे आदी शिवसैनिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

    शिवसेना पक्षाच्या या कार्यक्रमांद्वारे समाजातील विविध वर्गांशी एकात्मता दर्शविण्यात आली आणि मा. एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाला विशेष अर्थपूर्ण स्वरूप देण्यात आले.

  • Kombda Bazar Successful | बुधवार, शुक्रवार व रविवार चंद्रपुरात पुन्हा कोंबडा बाजार

    Kombda Bazar

    Kombda Bazar : काही महिन्यांपूर्वी चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर येथे कोंबडा बाजाराचा उत्सव सुरू झाला होता, मात्र महिना झाल्यावर आता तो बाजार जिवती येथील माणिकगड किल्ल्याजवळ सुरू करण्यात आला आहे.

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा, आनंदवनला मोठी भेट


    कोंबडा बाजाराचे मुख्य आयोजक सचिन व त्याचे 4 ते 5 साथीदार आहे, सर्वांना फुलांची पाकळी देत निर्भीडपणे हा बाजार सध्या चांगला फुलला आहे.
    कोंबडा बाजार तीन दिवस म्हणजे बुधवार, शुक्रवार व रविवारी यादिवशी तेलंगणा व चंद्रपूर जिल्ह्यातील शौकीन कोंबड्यावर आपली बाजी लावतात.


    काती लागून मृत्यू झालेला कोंबडा हरतो, आणि त्या बदल्यात पैसे लावणाऱ्या मिळतो बक्कळ पैसा.
    एकीकडे पोलीस अधीक्षक प्रत्येक पोलीस ठाण्यात तक्रार निवारण कार्यक्रमाचे आयोजन करीत नागरिकांच्या समस्या ऐकत आहे तर दुसरीकडे जिवती मध्ये अवैध धंद्याना चालना देण्याचे काम सुरू आहे.

  • Eknath shinde birthday celebrations in bhadrawati | उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त भद्रावतीत विविध सामाजिक उपक्रम

    Eknath shinde birthday celebrations in bhadrawati

    Eknath shinde birthday celebrations in bhadrawati : भद्रावती: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व शिवसेना पक्षाचे प्रमुख नेते मा. ना. श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भद्रावती शहरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. शिवसेना जिल्हाप्रमुख महिला आघाडी, चंद्रपूरच्या सौ. मिनलताई आत्राम यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम पार पडला.

    चिमूर ला जात आहात? तर आधी ही बातमी वाचा

    या विशेष प्रसंगी, भद्रावती शहरातील संपूर्ण ऑटोचालक बांधवांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच, गजानन महाराज मतिमंद विद्यालय येथे विद्यार्थ्यांना भोजनदान व केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. सौ. मिनलताई आत्राम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांना प्रोत्साहन दिले.

    या कार्यक्रमाला शिवसेनेचे निष्ठावान कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये बाळूभाऊ उपलंचीवार, प्रकाश मेंढे, नानाभाऊ दुर्गे (माजी नगरसेवक), योगेश म्यॅनेवार (तालुका प्रमुख, कामगार संघटना), मोहन कोरवन, विवेक दुर्गे, अभय दुर्गे, सचिन जयस्वाल, राधाबाई कोल्हे, मंदाताई धांडे, प्रेमिला कृष्णपलीवार, विधाताई कुचणकर, सुरेखा देठे व इतर शिवसैनिकांचा समावेश होता.

    social work events by shiv sena

    या निमित्ताने शिवसेना पक्ष बळकट होवो, पक्षप्रमुख मा. ना. श्री एकनाथ शिंदे साहेब यांना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो, अशी प्रार्थना करण्यात आली. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.

  • Chimur Ghoda Yatra | चंद्रपूर जिल्ह्यातील या मार्गावरील वाहतूक व्यवस्थेत बदल

    Chimur Ghoda Yatra

    Chimur Ghoda Yatra : 10 फेब्रुवारीला चिमूर शहरातील ऐतिहासिक श्रीहरी बालाजी महाराज घोडारथ यात्रा असल्याने चिमूर शहरात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे.


    करीता चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाने सुरळीत रहदारीसाठी वाहतूक व्यवस्थेत बदल केल्याची अधिसूचना प्रसिद्ध केली असून सदर बदल हा 10 फेब्रुवारी सायंकाळी 5 वाजतापासून ते 11 फेब्रुवारी सकाळी 10 वाजेपर्यंत राहणार आहे. (Changes in the transport system)

    आनंदवनात मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली मोठी घोषणा

    हजारे पेट्रोलपंप चिमूर ते सरकारी दवाखाना चिमूर पर्यंत सर्व प्रकारची वाहतूक बंद राहणार, आवश्यकतेनुसार सदर कालावधीत अधिसूचनेत काही प्रमाणात बदल करण्यात येईल.

    वाहतूकदारांनी या मार्गाचा वापर करावा

    वाहतूक सुरळीत रहावी यासाठी वाहनधारकांनी या पर्यायी मार्गाचा वापर करावा.
    भिसी ते चिमूर-वरोरा-चंद्रपूर जाण्यासाठी कन्हाळगाव-महालगाव-तिरपुरा-गदगाव या मार्गाचा अवलंब करावा, जांभुळघाट ते चिमूर किंवा वरोरा-चंद्रपूर जाण्यासाठी भिसी-कन्हाळगाव-महालगाव-तिरपुरा-गदगाव या मार्गाचा वापर करावा, नेरी वरून चिमूर किंवा वरोरा-चंद्रपूर-भिसी ला जाण्यासाठी जांभुळघाट-भिसी-कन्हाळगाव-महालगाव-तिरपुरा-गदगाव या मार्गाचा वापर करावा व वरोरा कडून भिसी-जांभूळघाटला जाण्यासाठी गदगाव-तिरपुरा-महालगाव-कन्हाळगाव या मार्गाचा वापर करावा.
    वरील निर्देशाचे सर्व वाहतुकदारांनी पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी केले आहे.

  • Government Support for anandwan | आनंदवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

    Government Support for anandwan

    Government Support for anandwan : अतिशय कठीण काळात बाबा आमटेंनी महारोगी सेवा समितीच्या माध्यमातून समाजसेवेचे काम सुरू केले. समाजामध्ये ज्या कामाला मान्यता नव्हती, तिरस्कार होत होता, अशा काळात बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांच्या सेवेचे व्रत हाती घेतले. आज 75 वर्षानंतर अनेक प्रतिष्ठित लोक या संस्थेची जुळले आहेत. या सर्व लोकांना आनंदवनातून आत्मिक समाधान मिळत असते. त्यामुळेच आनंदवन हे ख-या अर्थाने मानवतेचे मंदीर आहे, अशा भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या.

    बाबा आमटे (Baba Amte social work) आणि साधनाताई आमटे यांनी स्थापन केलेल्या महारोगी सेवा समितीच्या 75 व्या वर्षपुर्ती निमित्त आयोजित कृतज्ञता सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी मंचावर राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके, उद्योगमंत्री उदय सामंत, माजी राज्यपाल राम नाईक, आमदार सर्वश्री किशोर जोरगेवार, करण देवतळे, महारोगी सेवा समितीचे सचिव डॉ. विकास आमटे, डॉ. प्रकाश आमटे,  डॉ. भारती आमटे, डॉ. मंदाकिनी आमटे आदी मान्यवर उपस्थित होते.

    शासकीय अधिकाऱ्यांचा चिमुकल्यांशी संवाद अभियान

    मानवी संवेदनाची व्याख्या बाबा आमटेंच्या कार्यातून पाहायला मिळते, असे सांगून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, बाबा आमटे यांनी विविध उपक्रमातून संपूर्ण समाजासाठी संवेदना तयार केली आहे. याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे. 75 वर्षाची वाटचाल अतिशय महत्त्वाची आहे. त्या काळात हा भाग अतिशय मागासलेला असताना बाबांनी हा प्रकल्प हाती घेतला. केवळ कुष्ठरोगांची सेवा नव्हे तर समाजसेवेची विविध क्षेत्रे जलसंधारण, पर्यावरण रक्षण असे अनेक प्रयोग येथे सुरू आहेत. आनंदवनच्या सकारात्मक कामातून हजारो तरुणांना समाजासाठी उत्तरदायित्व केले आहे. आपले संपूर्ण जीवन आमटे कुटुंबियांनी या प्रकल्पासाठी समर्पित केले आहे. (Maharogi Sewa Samiti achievements)

    अनेक अडचणींचा सामना आनंदवनला करावा लागत असला तरी  विचलित न होता आनंदवनचे काम निरंतर सुरू आहे. विविध क्षेत्रातील लोक या संस्थेसोबत जुळले आहे. यात कला, संगीत, फिल्म, उद्योग आदींचा समावेश आहे. मूलभूत सेवेचा उत्कृष्ट नमुना आनंदवनात आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. (Baba Amte legacy)

    कुष्ठरोग मुक्त भारत करण्याचा पंतप्रधानांचा संकल्प : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 2027 पर्यंत  कुष्ठरोग मुक्त भारत  करण्याचा संकल्प आहे. या कामासाठी शासनाला आनंदवन सारख्या संस्थांची मोलाची मदत घ्यावी लागणार आहे. सन 2015 मध्ये भारतात प्रति लक्ष 9.73 कुष्ठरुग्ण सापडायचे. आज प्रती लक्ष 5.52 रुग्ण आढळतात. त्यामुळे आपल्याला मोठे काम करावे लागेल.  यात आनंदवनचा  मोठा सहभाग राहील. (Leprosy rehabilitation in India)

    आनंदवनच्या अनुदानात वाढ : आनंदवन येथे कौशल्य विकास केंद्र उभे राहत आहे. तसेच निवासी 500 लोकांचे केंद्र सुद्धा येथे सुरू होणार आहे. सन 2012 पासून आनंदवनला देण्यात येणाऱ्या अनुदानात आता बदल करण्यात येत असून प्रति रुग्ण 2200 ऐवजी आता 6 हजार रुपये तर पुनर्वसन अनुदान अंतर्गत प्रति रुग्ण 2 हजार वरून 6 हजार रुपये देण्यात येणर आहे. आनंदवनला 10 कोटी रुपये कॉर्पस फंड लगेच देण्यात येईल. उर्वरित 65 कोटी रुपये कॉर्पस फंड देण्याकरीता नक्कीच प्रयत्न करणार असून शासन म्हणून आम्ही यासाठी पुढाकार घेऊ. आनंदवन ही समाजाची संस्था आहे. सकारात्मक संस्थेच्या मागे उभे राहणे ही शासनाची जबाबदारी आहे, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

    आनंदवन येथील सेवाभाव जगाच्या पातळीवर उल्लेखनीय : उद्योगमंत्री उदय सामंत

    यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले, आनंदवन येथील महारोगी सेवा समितीच्या 75 व्या वर्षपुर्तीनिमित्त या कार्यक्रमाला उपस्थित राहता आले, हे मी माझे भाग्य समजतो. आनंदवन येथे दिव्यांगांसाठी कौशल्य विकास केंद्र सुरू होत असून उद्योगांशी त्याचा समन्वय करून देण्यात आला आहे. या केंद्राच्या माध्यमातून दिव्यांगांना नोकरी मिळण्यास मदत होईल. शासन म्हणून आनंदवनला पाठबळ देण्याची आमची जबाबदारी आहे. आनंदवन येथील किमान 2 टक्के काम, इतर ठिकाणी करू शकलो, तर ती बाबा आमटे यांना खरी श्रद्वांजली  ठरेल. सकारात्मक पध्दतीने राज्य चालविणारे आनंदवनला कोणतीही मदत कमी पडू देणार नाही. आनंदवनची उर्जा प्रेरणादायी आहे. येथील सेवाभाव जगाच्या पातळीवर उल्लेखनीय आहे, असे श्री. सामंत म्हणाले.

    विविध बाबींचे ऑनलाईन उद्घाटन : बाबा आमटे यांच्या जीवनावर मराठी आणि इंग्रजीमध्ये भाषेवर आधारीत चित्रपटाचे ऑनलाईन पध्दतीने मुख्यमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. याशिवाय एस्ट्याब्लिशींग एम.एम.एस. (महारोगी सेवा समिती) ॲज हेल्थ कॅपिटल, सोमनाथ येथील श्रमतीर्थ, आनंदवनला डब्ल्यूसीएल कडून मिळालेल्या सोलर पॉवर जनरेशन प्रोजेक्ट, एस्ट्याब्लिशींग एम.एम.एस. ॲज स्कील डेव्हलपमेंट कॅपिटल आदींचे ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले.

    maharogi sewa samiti achievement

    कार्यक्रमाचे प्रास्ताविक कौस्तुभ आमटे यांनी केले. संचालन वसुंधरा काशीकर – भागवत यांनी तर आभार डॉ. दिगंत आमटे यांनी मानले. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्ती उपस्थित होत्या.

  • Bangkok vs Goa tourism | बँकॉक की गोवा? स्वस्तात करा पर्यटन

    Bangkok vs Goa tourism

    Bangkok vs Goa tourism : पर्यटन म्हटलं तर भारत देशात असे अनेक राज्य आहे ज्यामध्ये बघण्यासाठी खूप काही आहे, मात्र आपल्या देशापेक्षाही विदेशातील थायलंड या देशात भारतातील नागरिक जाण्यास अधिक पसंती देतात त्याच कारणही तसेच आहे. थायलंड देश हा पर्यटनावर अवलंबून आहे. या देशात सर्वात जास्त पर्यटक हे भारतातील आहे. गोवा जाण्याऐवजी नागरिक थायलंड ला जाणे पसन्त करतात.

    काळ्या सोन्याचे शहर

    बँकॉकला भेट द्यायची की गोवा, पण जर पर्यटकांना जवळजवळ त्याच किमतीत परदेशात भेट देण्याची संधी मिळत असेल तर ते गोव्याऐवजी बँकॉकची निवड करतात. सध्या असे दिसून आले आहे की पर्यटक गोव्याऐवजी बँकॉकला जाणे पसंत करत आहेत. Bangkok travel cost for Indians

    बँकॉक गोव्यापेक्षा स्वस्त आहे का हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया आणि पर्यटक बँकॉकला जाणे का पसंत करत आहेत ते जाणून घेऊया. जर तुम्ही बँकॉकला ऑफ-सीझन फ्लाइट बुक केली तर भाडे सहसा कमी असते. तुम्हाला दिल्ली ते बँकॉकचे एकेरी तिकीट ८,००० रुपयांना मिळू शकते, जे दिल्ली ते गोवा जाण्याच्या किमतीइतकेच आहे. बँकॉकमध्ये तुम्हाला गोव्यापेक्षा जास्त बजेट फ्रेंडली निवास पर्याय मिळू शकतात. Goa vs Bangkok trip budget

    IRCTC बँकॉक मध्ये विशेष पॅकेज

    साधारणपणे बँकॉकमध्ये तुम्हाला दररोज १००० रुपयांपर्यंत बजेट हॉटेल रूम मिळेल. बँकॉकमध्ये स्ट्रीट फूड गोव्याच्या तुलनेत खूपच स्वस्त आहे. बँकॉकमध्ये तुम्हाला १०० ते ३०० रुपयांमध्ये चांगले जेवण मिळू शकते. बँकॉकमधील रेस्टॉरंट्स देखील परवडणाऱ्या किमतीत आहेत. Cheap travel destinations for Indians

    गोव्यापेक्षा बँकॉकमध्ये तुम्हाला खूपच स्वस्त गेस्टहाऊस आणि हॉस्टेल मिळतील. तुम्हाला ₹५०० च्या किमतीत सहज वसतिगृह मिळू शकते. बँकॉकमध्ये तुम्ही गोव्यापेक्षा कमी पैशात उत्तम नाईटलाइफचा आनंद घेऊ शकता. यामागील कारण असे आहे की येथे जवळजवळ प्रत्येक गोष्ट सरकारच्या परवानगीने चालते.

    गोवा vs बँकॉक: भारतीय पर्यटकांची पहिली पसंती कोणती?

  • Vipin Paliwal transfer demand | मनपा आयुक्त पालीवाल विरुद्ध माजी नगरसेवकाने पुकारला एल्गार

    Vipin Paliwal transfer demand

    Vipin Paliwal transfer demand : चंद्रपूर महानगरपालिकेचे आयुक्त विपिन पालीवाल यांची तात्काळ बदली करून त्यांची कठोर विभागीय चौकशी करण्याची मागणी जनविकास सेनेने केली आहे. संस्थापक अध्यक्ष पप्पू देशमुख तसेच जनविकास सेनेचे इमदाद शेख,प्रफुल बैरम व अमोल घोडमारे यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी विनय गौडा यांची भेट घेऊन लेखी पत्राद्वारे ही मागणी केली. आयुक्त पालीवाल यांनी अनेक कामांमध्ये करोडो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा जनविकास सेनेचा आरोप आहे.

    शासकीय आश्रमशाळेत अधिकाऱ्यांचा मुक्काम

    महानगरपालिकेत वाढलेला भोंगळ कारभार व भ्रष्टाचार याला मनपा आयुक्त पालीवाल जबाबदार असून त्यांच्या कारकिर्दीतील सर्व कामांची सखोल व निष्पक्ष चौकशी होणे गरजेचे असल्याने त्यांची तात्काळ बदली करण्यात यावी अशी मागणी या भेटीच्या वेळी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे करण्यात आली. मनपातील भोंगळ कारभार व भ्रष्टाचाराविरुद्ध लवकरच जनआंदोलन सुरू करण्यात येत असल्याची माहिती सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांना यावेळी देण्यात आली. (Chandrapur Municipal Corporation corruption)

    अमृत पाणीपुरवठा व भूमिगत गटार योजनेच्या भ्रष्टाचाराची तक्रार

    234 कोटी रुपयांच्या पहिल्या अमृत पाणीपुरवठा योजनेसाठी फोडलेले रस्ते दुरुस्त करणे, काम पूर्ण झाल्यानंतर एक वर्षापर्यंत योजना चालवणे इत्यादी पूर्ण केलेली नसतांना कंत्राटदार मे. संतोष एजन्सीचे देयके देण्यात आली. 270 कोटी रुपयांच्या दुसऱ्या अमृत पाणीपुरवठा योजनेसाठी मंजुरी घेताना अनेक नियमांना बगल देण्यात आली. नवीन अमृत भुमिगत गटार योजनेचे सुरुवातीला 450 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक होते. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मधील अधिकाऱ्यांना हाताशी धरून निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आयुक्त पालीवाल यांनी अंदाजपत्रकीय किमंतीत वाढ केली. सुमारे 450 कोटी रुपयांचे काम कंत्राटदाराला 506 कोटी रुपयांमध्ये देण्यात आले. या कामात कंत्राटदाराला सुरुवातीलाच 50 कोटी रुपयांचा लाभ पोहोचविला माजी नगरसेवक देशमुख यांचा आरोप आहे. (Corruption in Chandrapur projects)

    आयुक्तांचा भूतकाळ वादग्रस्त

    बल्लारपूर नगरपालिकेत मुख्याधिकारी म्हणून कार्यरत असतांना पालीवाल यांनी नगरपालिकेतील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या काही सामाजिक कार्यकर्त्यांविरुद्ध पोलिसात खोट्या तक्रारी केल्याचा आरोप होता. वर्धा नगरपालिकेत त्यांची कारकीर्द वादग्रस्त होती. त्यांच्याविरुद्ध शासनाकडे आजपर्यंत अनेक तक्रारी झालेल्या आहेत.

    चंद्रपूर महानगरपालिकेत अतिक्रमण काढतांना किंवा ब्ल्यु झोन मधील अवैध बांधकाम पडताना त्यांनी निवडक व भेदभावपूर्ण कारवाई केल्याचा आरोप आहे. निळ्या पूर रेषेच्या आतील अनेक मध्यमवर्गीयांची बांधकामे पाडण्यात आली. त्याचवेळी श्रीमंत व वजनदार लोकांच्या अवैध बांधकामांना संरक्षण दिल्याचाही त्यांच्यावर आरोप आहे. लोकसभागातून विविध उपक्रम राबवून जनमानसात प्रतिमा संवर्धन करणे व या प्रतिमेच्या आडून करोडो रुपयांचा मलिदा लाटणे ही आयुक्त पालीवाल यांची कार्यपद्धती असल्याचा देशमुख यांचा आरोप आहे.