Blog

  • House fire incident | गंजवार्डातील घराला आग

    House fire incident

    House fire incident : गुरुवारी सकाळच्या सुमारास गंज वॉर्डात घर जळाल्याची घटना घडली. दरम्यान, आमदार किशोर जोरगेवार यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन घराची पाहणी केली.

    पुरूषोत्तम गोवर्धन यांचे हे घर असून, घटनेच्या वेळी घरात कोणी नसल्याने मोठी दुर्घटना टळली. आमदार किशोर जोरगेवार यांनी पीडित कुटुंबाला आर्थिक मदत दिली असून, तात्काळ पंचनामा करून शासकीय मदत देण्याच्या सूचना तहसील विभागाला दिल्या. (Ganj Ward fire news)

    चंद्रपुरात भरदिवसा युवकाची धारदार शस्त्राने हत्या

    पुरूषोत्तम गोवर्धन हे सकाळच्या सुमारास भाजीपाला विकण्यासाठी बाजारात गेले होते. दरम्यान, त्यांच्या घरातून आगीचा धूर निघत असल्याचे शेजाऱ्यांच्या लक्षात आले. त्यांनी त्वरित ही माहिती पुरूषोत्तम गोवर्धन यांना दिली. स्थानिक नागरिकांनी बोरवेलच्या पाण्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले होते. या घटनेत गोवर्धन कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

    घटनेची माहिती मिळताच आमदार किशोर जोरगेवार यांनी गोवर्धन कुटुंबीयांची भेट घेऊन घराची पाहणी केली. तसेच, तहसीलदारांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून त्वरित पंचनामा करून आर्थिक मदत देण्याच्या सूचना दिल्या. आग कशाने लागली याचे कारण अद्याप कळलेले नाही.  

     

  • Bibi village murder case | भरदिवसा चंद्रपुरात युवकाची हत्या

    Bibi village murder case

    Bibi village murder case : चंद्रपूर जिल्हा गुन्हेगारीत रक्तरंजित झाला असून भरदिवसा एका तरुणाची हत्या झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

    भरदिवसा तरुणाचा खून झाल्याची घटना कोरपना तालुक्यातील बिबी गावात आज घडली, शिवराज उर्फ शिवा पांडुरंग जाधव वय 21 वर्ष खून झालेल्या युवकाचे नाव असून गावातील कब्रस्तान रोडवर शिवाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला स्थानिक शेतकऱ्यांना दिसला.

    चंद्रपूर जिल्ह्यात शिकाऱ्याची कॉलिंग

    त्यांनी याबाबत तात्काळ पोलीसाना माहिती दिली त्यानंतर मोठ्या प्रमाणात गावकऱ्यांनी गर्दी केली, मात्र तरुणाचा खून करणाऱ्या आरोपी हा सराईत गुन्हेगार असल्याचं बोललं जात असून आरोपीला पोलिसांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे.

    मृत युवकांचा लहान भावा सोबत काही दिवसापूर्वी वाद झाल्याची माहिती आहे. त्याचा राग मनात धरून हा खून केला असा बोलल जात आहे. आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्यांनी अनेक गुन्हे केले असल्याची माहिती आहे.

    अनेक वर्षापासून वार्डामध्ये दहशत माजविण्याच काम आरोपीकडून होत असल्याची माहिती आहे. पुढील तपास पी आय कदम यांच्या मार्गदर्शनात पीएसआय पिंपळकर, पोलीस शिपाई तिरुपती माने, संदीप थेरे, संदीप अडकिने, इस्वर देवकते करीत आहे.

  • Chandrapur paddy farmers payment | चंद्रपूर जिल्हयातील धान उत्पादक शेतकऱ्यांचे धान खरेदीचे पैसे त्यांच्या खात्यात तात्काळ जमा करावे : आम. सुधीर मुनगंटीवार

    Chandrapur paddy farmers payment

    Chandrapur paddy farmers payment : चंद्रपूर जिल्हयातील धान उत्पादक शेतकऱ्यांचे धान खरेदीचे पैसे संबंधीत शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ जमा करण्याबाबतची मागणी माजी मंत्री आम. सुधीर मुनगंटीवार यांनी महाराष्ट्र राज्य सहकार पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक हनुमंत पवार यांच्याकडे केली आहे.

    चंद्रपूर शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारणार

    धान खरेदीचे सदर थकीत पैसे 6 फेब्रुवारी रोजी संध्याकाळ पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे आश्वासन हनुमंत पवार यांनी आम. मुनगंटीवार यांना दिले आहे.या संदर्भात आ. मुनगंटीवार यांनी अन्न नागरी पुरवठा विभागाच्या सचिव श्रीमती जयश्री भोज यांच्याशी देखील चर्चा केली. Pending paddy payment news

     चंद्रपूर जिल्हयातील एकुण १६,६६९ धान उत्पादक शेतकऱ्यांचे धान खरेदीचे रुपये ९३ कोटी ९० लाख रक्कम थकीत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे. याबाबत अनेक शेतकऱ्यांनी आम. सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेत त्यांची कैफियत मांडली. आम. सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदर्भात महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ मुंबईचे व्यवस्थापकीय संचालक हनुमंत पवार यांच्याशी त्वरित संपर्क साधला व चर्चा केली.

    शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत असल्यामुळे याविषयी संवेदनशील रित्या कार्यवाही करावी असे आ. मुनगंटीवार म्हणाले. हनुमंत पवार यांनी 6 फेब्रुवारी रोजी संध्याकाळ पर्यंत शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे त्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल असे आश्वासन आ. सुधीर मुनगंटीवार यांना दिले.

  • Obituary news Today | खासदार धानोरकर यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर

    Obituary news today

    Obituary news today : खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. प्रवीण काकडे व चंद्रपूर लोकसभा क्षेत्राच्या खासदार प्रतिभाताई धानोरकर यांचे वडील 65 वर्षीय सुरेश काकडे यांचे अल्पशा आजाराने नागपूर येथे निधन झाले.

    चंद्रपूर जिल्ह्यात शिकाऱ्याची कॉलिंग

    दिनांक 6 फेब्रुवारी रोजी पहाटे 2 वाजता सुरेश काकडे यांनी अंतिम श्वास घेतला. त्याची अंतिम यात्रा त्यांचे राहते घरून परमडोह तालुका वणी येथून 6 फेब्रुवारी रोजी दुपारी 1 वाजता निघणार आहे.


    टीप – परमडोह हे गाव शिंदोला माईंस पासून 8 किलोमिटर अंतरावर आहे.

  • Chandrapur police department development | चंद्रपूर जिल्ह्यातील पोलीस विभागाच्या विविध प्रश्नांसंदर्भात गृह विभागाच्या अपर मुख्‍य सचिवांसोबत बैठक

    Chandrapur police department development

    Chandrapur police department development : पोलीस विभागाशी संबंधित जिल्ह्यातील प्रत्येक कामाचे सर्वसमावेशक नियोजन व्हावे. जमिनीचे अधिग्रहण असो किंवा चंद्रपूर जिल्ह्याच्या नवीन पोलीस स्टेशनच्या इमारतीचे बांधकाम असो, कुठलेही काम तुकड्यांमध्ये होऊ नये. त्यात सातत्य राखावे, अशी अपेक्षा राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

    चंद्रपूर जिल्ह्यातील बर्ड फ्लू बाबत महत्वाची माहिती

    चंद्रपूर जिल्ह्यातील पोलीस विभागाच्या विविध प्रश्नांसंदर्भात गृह विभागाचे अपर मुख्‍य सचिव डॉ. इक्बाल सिंग चहल यांच्या मंत्रालयातील दालनात महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीला आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांची उपस्थिती होती. बैठकीमध्ये त्यांनी विभागाशी संबंधित महत्त्वाच्या विषयांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. बैठकीला गृह विभागाचे प्रधान सचिव (विशेष) अनुप कुमार सिंह, सुरेश मेखला राज्य राखीव पोलीस बलाचे अप्पर पोलीस महासंचालक,बल्लारपूरच्या राज्य राखीव पोलीस बलाच्या समादेशक भाग्यश्री नवटक्के, पोलीस महासंचालकांचे प्रतिनिधी म्हणून सहायक पोलीस महानिरीक्षक प्रकाश जाधव, बल्लारपूरच्या राज्य राखीव पोलीस बलाचे पोलीस उप-अधिक्षक प्रमोद लोखंडे यांची उपस्थिती होती.  Police department land acquisition

    बल्लारपुरातील कोर्टीमक्ता येथील वन विभागाची जमीन राज्य राखीव पोलीस बलाकरिता उपलब्ध करून देणे, पोलीस विभागाच्या आरक्षणाखालील जागेच्या भूसंपदनाकरिता निधी उपलब्ध करून देणे, पडोलीची नविन प्रशासकीय इमारत व नविन शासकीय निवासस्थानाच्या बांधकामाकरिता मौजा कोसारा येथील आरक्षण क्र. 80 मधील जागा पोलीस विभागाच्या नावे करणे आणि चंद्रपूर जिल्ह्यातील प्रस्तावित नवीन पोलीस स्टेशनचे बांधकाम करणे यासह विविध विषयांवर बैठकीत सविस्तर चर्चा झाली. डॉ. इक्बाल सिंग चहल व वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सकारात्मकता दाखवत तातडीने कार्यवाहीचे निर्देश विभागाला दिले. Chandrapur district new police station

    कोर्टीमक्ता येथील वन विभागाची जमीन राज्य राखीव पोलीस बलाकरिता उपलब्ध करून देण्याबाबत प्रस्ताव घ्यावा. प्रस्ताव तयार करण्यासाठी गरज भासल्यास सल्लागार घ्यावा. सर्वसमावेशक नियोजन करून मान्यता घ्यावी. या संदर्भात केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवून पाच वर्षांऐवजी दहा वर्षे सहकार्य मागावे. अपूर्ण निधीमध्ये काम पूर्ण होऊ शकत नाही, याकडेही आ. श्री. मुनगंटीवार यांनी लक्ष वेधले.पडोलीची नवीन प्रशासकीय इमारत असो किंवा चंद्रपूर जिल्ह्यातील नवीन पोलीस स्टेशन असो, बांधकामाला तुकड्यांमध्ये मंजुरी देणे योग्य नाही. बांधकामामध्ये सातत्य राखावे, असेही ते म्हणाले.  Chandrapur police station construction

    पोलिस संकुलाच्या प्रस्तावाला मंजुरी द्यावी
    चंद्रपूरसाठी दहा पोलीस निरीक्षक अधिकारी द्यावे, असा प्रस्ताव देखील आ. मुनगंटीवार यांनी दिला. नवीन चंद्रपूरसाठी म्हाडाची हजारो एकर जमीन पोलीस संकुलांसाठी आरक्षित आहे. या पोलीस संकुलांसाठी 35 कोटीची मंजुरी द्यावी, असे आ. श्री. मुनगंटीवार म्हणाले.  मुल पोलीस स्टेशनच्या स्थानांतरासाठी पंधरा ते वीस लाख रुपयांची आवश्यकता लागणार आहे, ही बाब देखील आ. श्री. मुनगंटीवार यांनी लक्षात आणून दिली.

  • Dr. Shrikant Shinde birthday celebration । खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळ वाटप

    Dr. Shrikant Shinde birthday celebration

    Dr. Shrikant Shinde birthday celebration : भद्रावती – युवासेनेचे झुंजार नेते व कुशल नेतृत्व, कल्याण लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त ग्रामीण रुग्णालय भद्रावती येथे रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.

    रस्ते खोदकामामुळे नागरिकांचे चेहरे झाले लाल

    फळ वाटप कार्यक्रम शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख मीनल आत्राम यांच्या नेतृत्वात घेण्यात आला. सौ, ग्रामीण रुग्णालयातील प्रत्येक रुग्णांची आधी विचारपूस करीत त्यांना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या व्यक्तिमत्वाची माहिती दिली.

    Bhadrawati hospital

    यावेळी, सौ मिनलताई आत्राम शिवसेना जिल्हाप्रमुख महिला आघाडी चंद्रपूर, नानाभाऊ दुर्गे मा, नगरसेवक भद्रावती, योगेश म्यॅनेवार, विवेक दुर्गे,अभय दुर्गे, सचिन जयस्वाल,वैभव बावने व इतर शिवसैनिक उपस्थित होते.

  • Chhatrapati Shivaji Maharaj statue | चंद्रपुरात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा लवकरचं…

    Chhatrapati Shivaji Maharaj statue

    Chhatrapati Shivaji Maharaj statue : चंद्रपूर शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्याची चंद्रपूरकरांची भावना आहे. या स्मारकाच्या उभारणीसाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे जागा निश्चित करण्यात आली आहे. मात्र, या कामाच्या प्रक्रियेत विलंब होत असल्याने आता या कामाला गती देण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वय साधून आवश्यक परवानग्या तातडीने घ्याव्यात, असे निर्देश आमदार किशोर जोरगेवार यांनी महानगरपालिका आयुक्तांना दिले आहेत.

    बर्ड फ्लू च्या पार्श्वभूमीवर चिकन खाऊ शकता काय?

    चंद्रपूर शहर महानगरपालिकेत विविध विकासकामांवर चर्चा करण्यासाठी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत नेताजी सुभाषचंद्र बोस आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकांसंदर्भातील अडचणींवर सविस्तर चर्चा झाली. शिवरायांच्या स्मारकाच्या उभारणीस कोणताही अडथळा येऊ नये आणि ही प्रक्रिया अधिक वेगाने पूर्ण व्हावी, यासाठी प्रशासनाने त्वरित निर्णय घ्यावा, अशी स्पष्ट सूचना आमदार जोरगेवार यांनी केली. या बैठकीला मनपा आयुक्त विपिन पालिवाल, अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपायुक्त मंगेश खवले, शहर अभियंता विजय बोरिकर यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी आणि माजी नगरसेवक उपस्थित होते. Chandrapur city development

    चंद्रपुरात शिकाऱ्याची कॉलिंग

    आमदार जोरगेवार यांनी यावेळी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्रापुरते सीमित नसून संपूर्ण देशासाठी प्रेरणास्त्रोत आहेत. त्यांचे अश्वारूढ स्मारक चंद्रपूरच्या मध्यवर्ती ठिकाणी उभा राहिल्यास तो येथील नागरिकांसाठी अभिमानास्पद ठरेल. त्याचबरोबर, नव्या पिढीला शिवरायांच्या कर्तृत्वाची प्रेरणा मिळेल. शिवप्रेमी आणि शहरातील नागरिकांनी या स्मारकासाठी मोठा पाठिंबा दिला असून, लवकरच हे काम पूर्ण व्हावे, अशी त्यांची अपेक्षा आहे. पुतळ्याच्या उभारणीसाठी सर्व शासकीय यंत्रणांनी समन्वय साधावा, सर्व प्रकारच्या परवानग्या आणि तांत्रिक बाबी तातडीने मार्गी लावाव्यात, अशी सूचना आमदार जोरगेवार यांनी या बैठकीत दिल्या आहेत. Chandrapur equestrian statue

    चंद्रपूर महानगरपालिकेने या कामाची प्राथमिक पातळीवरील कार्यवाही सुरू केली असून, लवकरच सर्व प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष उभारणीच्या कामाला सुरुवात होईल, अशी अपेक्षा आहे. आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकाराने आणि नागरिकांच्या सहकार्याने लवकरच हा पुतळा उभारला जाईल, असा विश्वास शिवप्रेमींनी व्यक्त केला आहे.

     

    बंगाली कॅम्प येथे होणार नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे स्मारक

    चंद्रपूरात बंगाली समाज बांधव मोठ्या संख्येने वास्तव्यास आहेत. त्यामुळे बंगाली कॅम्प येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे स्मारक तयार करण्यात येणार आहे. हे काम लवकर पूर्ण करण्याच्या सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्या आहेत. या संदर्भातील सर्व परवानग्या घेण्यात आल्या असून उर्वरित असलेल्या वाहतूक विभागाच्या परवानग्या तात्काळ घ्याव्यात, असे निर्देश आमदार किशोर जोरगेवार यांनी मनपा अधिकाऱ्यांना दिले आहेत.

  • Bird flu Chandrapur latest news | चंद्रपुरात बर्ड फ्लू, मांसाहार करणार काय? बघा उत्तर

    Bird flu Chandrapur latest news

    Bird flu Chandrapur latest news : 25 जानेवारी रोजी ब्रह्मपूरी तालु्क्यातील मांगली गावतील पोल्ट्री फॉर्मवर काही कोंबड्या दगावल्या. ही बाब प्रशासनाला समजातच पशूपालन विभागाने धाव घेतली. त्यांनी नमुने घेतले. नमुने पुणे आणि भोपाळ येथे पाठवण्यात आले. प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यानुसार या कोंबड्यांना एव्हियन इन्फ्लूएंझा एच5एन1 झाल्याचे समोर आले आहे.

    कृषी सहायकाने शेतकऱ्याला मागितली लाच, चंद्रपुरात कारवाई

    अहवालानंतर प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांनी मांगली गाव आणि त्याच्या आजूबाजूचा 10 किलोमीटर परिसर अलर्ट झोन जाहीर केला आहे. संक्रमण पसरू नये यासाठी उपाय योजना करण्याचे काम सुरू करण्यात आले. (Bird Flu in Maharashtra)


    मांगली, गेवलाचक आणि जुनोनाटोली या गावातील पोल्ट्री फार्मवर बर्ड रॅपिड रिस्पान्स टीम पोहचली आहे. संसर्ग झालेल्या कोंबड्यांना आता नष्ट करण्यात येणार आहे. त्यांना योग्यरितीने नष्ट करण्यात येईल. तर अंडे आणि पिल्लांना पण नष्ट करण्यात येणार आहे.

    चंद्रपूर जिल्ह्यात शिकाऱ्याची कॉलिंग

    संसर्ग रोखण्यासाठी या भागात दळणवळण थांबवण्यात आले आहे. या परिसरात चिकन विक्री, अंडे विक्रीस प्रतिबंध घालण्यात आला आहे. इतर पक्ष्यांना, पशूंना कोणताही धोका होऊ नये यासाठी कोंबड्या नष्ट करण्यात येत आहेत. या परिसरात सोडियम हायपोल्कोराईट वा पोटेशियम परमॅगनेटने स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. या परिसरातील सर्व चिकन, मटन दुकाने सध्या बंद करण्यात आली आहे. (H5N1 outbreak in Chandrapur)

    बर्ड फ्लू च्या पार्श्वभूमीवर मांसाहार करू शकतो काय?

    सदर 3 गावातील 1 किलोमीटर परिसरातील सर्व पक्षीजन्य जनावरांची विल्हेवाट लावण्यात येणार आहे, सोबतच 10 किलोमीटर च्या भागात अलर्ट लावण्यात आला आहे, बर्ड फ्लू ने मानवी जीवनावर परिणाम होतो काय यावर पशुसंवर्धन विभाग चंद्रपूरचे उपायुक्त खाडे यांनी माहिती दिली की बर्ड फ्लू हा व्हायरस मानवी शरीरात त्याचा शिरकाव झाला अशी आजपर्यंत कोणतीही घटना आपल्या देशात घडलेली नाही. अंडे व मांस हे शिजवून खाल्लेलं बरं या व्हायरस बाबत कुणीही अफवा पसरवू नये असे आवाहन खाडे यांनी यावेळी केले.

  • Agricultural Assistant Bribe Chandrapur | महाडीबीटी योजनेत भ्रष्टाचार! कृषी सहाय्यकाला 1 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक

    Agricultural Assistant Bribe Chandrapur

    Agricultural Assistant Bribe Chandrapur चंद्रपूर – महाडीबीटी योजनेतून मंजूर झालेला फवारणी बॅटरी स्प्रे पंप अर्जदाराला देण्यासाठी कृषी सहायकाने 1 हजार रुपयांची लाच मागितली, 4 फेब्रुवारीला कृषी सहायकाला हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली. 36 वर्षीय सरजीव अजाबराव बोरकर असे कृषी सहायक वर्ग 3 चे नाव आहे.

    तक्रारदार हे शेतकरी असून त्यांनी ते मौजा नंदोरी तालुका भद्रावती येथे राहतात, त्यांनी महाडीबीटी योजनेअंतर्गत सप्टेंबर 2024 मध्ये शेतमाल फवारणी करीता बॅटरी स्प्रे पंप मिळावा यासाठी तालुका कृषी अधिकारी भद्रावती येथे अर्ज केला होता. MahaDBT Scheme Corruption

    चंद्रपूर जिल्ह्यात बर्ड फ्लू चे आगमन, जिल्ह्यातील या भागात अलर्ट


    तक्रारदाराचा अर्ज सप्टेंबर महिन्यातच मंजूर झाला होता, त्यानुसार ऑक्टोबर महिन्यात 7 तारखेला मौजा चंदनखेडा भद्रावती येथे कृषी विभागामार्फत स्प्रे पंप वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, मात्र त्यादिवशी तक्रारदार बाहेर गावी गेले असल्याने ते कार्यक्रमाला येऊ शकले नाही. (Chandrapur Anti-Corruption Bureau Action)


    बाहेरगावुन परत आल्यावर तक्रारदार यांनी स्प्रे पंप मिळावा यासाठी कृषी अधिकारी कार्यालय भद्रावती येथे कृषी सहायक बोरकर यांची भेट घेतली, मात्र त्यांनी स्प्रे पंप देण्यास टाळाटाळ केली.

    चंद्रपूर जिल्ह्यात शिकाऱ्याची कॉलिंग


    3 फेब्रुवारीला कृषी सहायक बोरकर यांनी तक्रारदार सोबत दूरध्वनी वर संपर्क साधला व स्प्रे पपं हवा असेल तर 1 हजार रुपये द्यावे लागतील असे सांगितले.
    मात्र तक्रारदाराला पैसे देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी याबाबत चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधत तक्रार दाखल केली. (Battery Spray Pump Bribery Case)


    तक्रारीची पडताळणी व योग्य शहानिशा केल्यावर पोलीस निरीक्षक जितेंद्र गुरनुले यांनी सापळा रचला व आज 4 फेब्रुवारीला नंदनवन प्रवेशद्वार विनायक ले आऊट वरोरा येथे पंचासमक्ष कृषी सहायक सरजीव बोरकर याला 1 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक केली.


    सदरची कारवाई पोलीस अधीक्षक दिगंबर प्रधान, अप्पर पोलीस अधीक्षक संजय पुरंदरे, पोलीस उपअधीक्षक मंजुषा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जितेंद्र गुरनुले, पोलीस कर्मचारी वैभव गाडगे, अमोल सिडाम, प्रदीप ताडाम, राकेश जांभुळकर, पुष्पा काचोळे, सतीश सिडाम यांनी केली.

  • Bird Flu Outbreak | बर्ड फ्लू चा आतंक, चंद्रपूर जिल्ह्यातील या गावात अलर्ट

    Bird Flu Outbreak

    Bird Flu Outbreak : ब्रम्हपूरी तालुक्यातील मौजा मांगली येथील कुक्कुट पक्ष्यांमध्ये 25 जानेवारी 2025 पासून मरतुक दिसून आल्यामुळे पशुसंवर्धन विभागामार्फत मृत कुक्कुट पक्ष्यांचे नमुने गोळा करून राज्यस्तरीय पशुरोग अन्वेषण प्रयोगशाळा, पुणे व भोपाळ येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषद – राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्था या प्रयोगशाळेत सादर करण्यात आले होते.

    चंद्रपूर जिल्ह्यात शिकाऱ्याची कॉलिंग

    सदर नमुने बर्ड फ्लू (AVIAN INFLUENZA  H५N१) पॉझिटिव्ह आल्यामुळे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष यांनी या आजाराचा प्रसार होऊ नये, याकरिता मांगली गावाच्या 10 कि.मी. त्रिज्येतील क्षेत्र ‘सतर्कभाग’ (Alert Zone) म्हणून घोषित केला आहे. तसेच सदर परिसरात पुढीलप्रमाणे आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी प्रशासनास निर्देश दिले आहे. (Avian Influenza H5N1)

                बाधित क्षेत्रात मांगली, गेवर्लाचक व जुनोनाटोली येथील कुक्कुट पक्षी जलद प्रतिसाद दलामार्फत शास्त्रोक्त पदध्दतीने संसर्गाचा प्रसार होऊ नये म्हणून प्रभावित पक्ष्यांना मारण्याची क्रिया तातडीने करण्यात येणार आहे. तसेच मृत पक्ष्यांना मार्गदर्शक सुचनेनुसार विल्हेवाट करण्यात येणार आहे. बाधित क्षेत्रातील उर्वरित पशुखाद्य, अंडी, इत्यादीचे शास्त्रोक्त पध्दतीने नष्ट करून विल्हेवाट लावण्यात येणार आहे. प्रभावित क्षेत्राच्या ठिकाणी वाहनांच्या ये- जा करण्यास मनाई करण्यात आली असून त्या ठिकाणची खाजगी वाहने प्रभावीत परिसराच्या बाहेर लावण्याबाबत आदेशित केले आहे. (Poultry Disease Control)

    हे आहे काळ्या सोन्याचं शहर

                तसेच प्रभावित क्षेत्रात जिवंत व मृत कुक्कुट पक्षी, अंडी, कोंबडीखत, पक्षीखाद्य, अनुषंगिक साहित्य व उपकरणे इत्यादिच्या वाहतूकीस मनाई करण्यात आली आहे. प्रभावित पोल्ट्री फार्मच्या परिसरात नागरिकांच्या हालचालीस, तसेच इतर पक्षी आणि प्राण्यांच्या वाहतुकीस प्रतिबंध करण्यात आले आहे. प्रभावित पोल्ट्री फार्मचे प्रवेशद्वार आणि परिसर 2 टक्के सोडियम हायपोक्लोराईट किंवा पोटॅशियम परमॅग्नेटने निर्जंतुकीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रभावित क्षेत्राच्या 5 कि.मी. त्रिज्येतील परिसरात कुक्कुट पक्ष्यांची खरेदी-विक्रीची दुकाने व  कुक्कुट मांसाची (चिकन) दुकाने,  वाहतूक, बाजार व यात्रा / प्रदर्शन, इत्यादी बाबी बंद राहतील. (Alert Zone for Bird Flu)

    नागरिकांना आवाहन : उकडलेली अंडी व शिजविलेले चिकन खाणे मानवी आरोग्यास पूर्णपणे सुरक्षित आहे. त्यामुळे बर्ड फ्लू रोगाबाबत नागरिकांनी अनावश्यक भीती बाळगू नये. तसेच अफवा व गैरसमज पसरवू नये. तसेच जिल्ह्यात कोठेही पक्ष्यांमध्ये असाधारण मरतुक आढळून आल्यास नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये किंवा 1962 या टोल फ्री दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. आणि पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. मंगेश काळे यांनी केले आहे.