Blog

  • Chandrapur Medical Tourism Hub । “चंद्रपूर लवकरच बनेल मेडिकल टूरिझम हब: भव्य मेडिकल कॉलेज आणि कॅन्सर हॉस्पिटलचा मार्ग मोकळा!”

    Chandrapur Medical Tourism Hub

    Chandrapur Medical Tourism Hub : चंद्रपूरमध्ये भव्य आणि सुसज्ज मेडिकल कॉलेज लवकरच सुरू होणार आहे. येथे कॅन्सर हॉस्पिटल निर्माणाधीन आहे तसेच महिलांसाठी 100 खाटांचे रुग्णालय उपलब्ध आहे. त्यामुळे महाराष्ट्राला मेडिकल टूरिझम हब म्हणून विकसित करण्याच्या संकल्पपूर्तीची सुरुवात चंद्रपूर जिल्ह्यापासून करावी आणि चंद्रपूरला मेडिकल टूरिझम हब म्हणून विकसित करावे, अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे.

    रविवारी सन्मित्र महिला सहकारी पतसंस्थेच्या रौप्यमहोत्सवी सोहळ्यानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चंद्रपूर दौऱ्यावर होते. या वेळी आमदार जोरगेवार यांनी त्यांची भेट घेऊन ही मागणी मांडली. चंद्रपूरमध्ये उत्तम वैद्यकीय सुविधा आणि आधुनिक आरोग्य केंद्र स्थापन करण्याची मोठी संधी आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र तसेच देशभरातील रुग्णांना दर्जेदार आणि परवडणाऱ्या आरोग्यसेवा उपलब्ध होतील, असे आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे.

    चंद्रपुरात अत्याधुनिक मच्छीबाजाराची होणार निर्मिती, आमदार जोरगेवार यांचा पुढाकार

    एका वृत्तपत्राच्या कार्यक्रमात बोलताना वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी महाराष्ट्राला मेडिकल टूरिझम हब (Medical Tourism Hub in Maharashtra) बनविण्याचा संकल्प असल्याचे बोलून दाखविले होते. त्यानंतर आता आमदार किशोर जोरगेवार यांनी ही मागणी केली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सकारात्मकता दर्शविली आहे.

    चंद्रपूरला मेडिकल टूरिझम हबचा दर्जा मिळाल्यास स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणावर निर्माण होतील. चंद्रपूरची भौगोलिक परिस्थिती पाहता हे शहर देशाच्या मध्यभागी आहे. तसेच येथे  सिकल सेल यासह अनेक मल्टी स्पेशालिस्ट रुग्णालये आहेत. या सर्व उपलब्ध सुविधांचा लाभ घेत, हे ठिकाण राज्याच्या आरोग्य पर्यटन नकाशावर महत्त्वाचे केंद्र म्हणून उदयास येऊ शकते. वैद्यकीय पर्यटन वाढल्यास हॉस्पिटल्स, औषध उद्योग, हॉटेल्स, वाहतूक आणि इतर संबंधित सेवा क्षेत्रांना फायदा होईल असेही आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे. (Top Healthcare Destinations Maharashtra)

    भावी डॉक्टरांसाठी ही एक मोठी संधी ठरू शकते. त्यांना योग्य शिक्षण या मेडिकल कॉलेजच्या माध्यमातून दिले जाईल. चंद्रपूर हा राज्याच्या सीमावर्ती भागात असल्याने लगतच्या राज्यातील रुग्णांनाही उत्तम वैद्यकीय सेवा देता येईल, असेही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे.

    छावा चित्रपट टॅक्स फ्री करा – आमदार किशोर जोरगेवार यांची मुख्यमंत्री यांना मागणी.

     चंद्रपूर : मराठा योद्धा छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्यगाथेवर आधारित ‘छावा’ चित्रपट महाराष्ट्रातील जनतेसाठी करमुक्त (टॅक्स फ्री) करावा, अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. (Chhava Movie Tax-Free Maharashtra)

     ‘छावा’ हा चित्रपट केवळ मनोरंजनासाठी नाही, तर ऐतिहासिक वारसा आणि मराठा साम्राज्याच्या गौरवशाली परंपरेची जाणीव करून देणारा आहे. त्यामुळे राज्यातील जनतेला सहजपणे हा चित्रपट पाहता यावा, यासाठी त्यावरचा कर माफ करण्यात यावा, असे आमदार जोरगेवार यांनी म्हटले केले.

  • Best sports festival 2025 । महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सव २०२४ – गोंडवाना विद्यापीठाजवळ यजमानपद

    Best sports festival 2025

    Best sports festival 2025 : चंद्रपूर – २६ वा महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सव २०२४ दि. १८ फेब्रुवारी ते दि. २२ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत चंद्रपूर व बल्लारपूर परिक्षेत्रामध्ये भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आला आहे. गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली यांना या महोत्सवाचे यजमानपद बहाल करण्यात आले असून, विद्यापीठाने या स्पर्धांचे उत्कृष्ट आयोजन केले आहे. हा राज्यस्तरीय महोत्सव गोंडवाना विद्यापीठासाठी तसेच गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक अभिमानास्पद क्षण आहे. Top university sports events

    प्रेस परिषदेतील माहिती

    दि. १५ फेब्रुवारी रोजी चंद्रपूर येथील तिरुपती क्राऊन येथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये महोत्सवाबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.

    उद्घाटन समारंभ

    महोत्सवाचा उद्घाटन समारंभ दि. २० फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ४.०० वाजता तालुका क्रीडा संकुल, विसापूर, ता. बल्लारपूर, जि. चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आला आहे.

    मुख्यमंत्री साहेब कृषी मंत्र्यांना आवरा – खासदार प्रतिभा धानोरकर

    • उद्घाटन केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे यांच्या हस्ते होणार आहे.
    • अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे मा. राज्यपाल श्री. सी. पी. राधाकृष्णन असतील.
    • प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याचे मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, आदिवासी विकास व पालकमंत्री डॉ. अशोक रामाजी ऊईके, क्रीडा व युवक तसेच अल्पसंख्याक विकास मंत्री ना. दत्तात्रय भरणे यांची उपस्थिती असेल.
    • तसेच विद्यापीठ परिक्षेत्रातील खासदार, आमदार आणि प्रशासकीय अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. (Biggest inter-university sports)

    क्रीडा स्पर्धांचे स्वरूप व वेळापत्रक

    महोत्सवात मुले व मुलींसाठी कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, बॅडमिंटन, टेबल टेनिस, ॲथलेटिक्स आणि चेस अशा एकूण ८ प्रकारच्या स्पर्धा होणार आहेत.

    • स्पर्धांचे वेळापत्रक:
      • सकाळी: ७.०० ते दुपारी १२.००
      • संध्याकाळी: ४.०० ते रात्री ९.००

    स्पर्धा स्थळे:

    • कबड्डी, खो-खो: आरएसएसएस, विसापूर (४ मैदाने)
    • व्हॉलीबॉल: आरसीईआरटी, चंद्रपूर (४ मैदाने)
    • बास्केटबॉल: सैनिक स्कूल, विसापूर (४ मैदाने)
    • बॅडमिंटन: जिल्हा क्रीडा स्टेडियम, चंद्रपूर (बॅडमिंटन हॉल)
    • टेबल टेनिस: तालुका क्रीडा संकुल, विसापूर (बॅडमिंटन हॉल)
    • ॲथलेटिक्स: तालुका क्रीडा संकुल, विसापूर
    • चेस (बुद्धिबळ): आरसीईआरटी, चंद्रपूर (इन हॉल)

    स्पर्धक व सहभागी विद्यापीठे

    या महोत्सवासाठी २३ विद्यापीठांमधून ३,७२३ खेळाडू आणि संघव्यवस्थापकांनी नोंदणी केली आहे. तसेच विद्यापीठ पदाधिकारी, प्रशासकीय अधिकारी, प्राध्यापक, कर्मचारी आणि स्वयंसेवकांसह एकूण ४,५०० जण महोत्सवात सहभागी होणार आहेत. (State-level sports championship)

    निवास आणि भोजन व्यवस्था

    महिला खेळाडूंसाठी निवास व्यवस्था:

    • शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर (महिला स्टाफ क्वार्टर)
    • राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय (मुलींचे वसतिगृह)
    • क्रीडा संकुल, बल्लारपूर

    पुरुष खेळाडूंसाठी निवास व्यवस्था:

    • विकास केंद्र, चंद्रपूर
    • क्रीडा संकुल, विसापूर
    • आरएसएसएम कॉलेज, बल्लारपूर
    • शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर (स्टाफ क्वार्टर)
    • संत तुकाराम सभागृह, बल्लारपूर

    भोजन व्यवस्था:
    सर्व खेळाडू व सहभागींसाठी मैदानांवरच भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

    • आरएसएसएस, विसापूर – १,१८८ जणांसाठी
    • तालुका क्रीडा संकुल, विसापूर – ९४२ जणांसाठी
    • आरसीईआरटी, चंद्रपूर – ८९१ जणांसाठी
    • सैनिक स्कूल, बल्लारपूर – ६०९ जणांसाठी
    • जिल्हा क्रीडा स्टेडियम, चंद्रपूर – ३७० जणांसाठी

    परिवहन व वैद्यकीय सेवा

    • परिवहन सेवा:
      • खेळाडूंना निवासस्थानांहून मैदानांपर्यंत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या २५ बसेस उपलब्ध.
      • आगमन व निर्गमनासाठी विशेष ७ बसेस.
    • वैद्यकीय सेवा:
      • खेळाडूंसाठी २४ तास उपलब्ध असलेल्या ८ रुग्णवाहिका.
      • जिल्हा सामान्य रुग्णालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर यांच्याद्वारे प्राथमिक उपचार आणि औषधांचा पुरवठा.

    समारोप सोहळा

    महोत्सवाचा समारोप दि. २२ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी १२.३० वाजता, तालुका क्रीडा संकुल, विसापूर, बल्लारपूर येथे होणार आहे. (Competitive college tournaments)

    • प्रमुख अतिथी: मा. हंसराज अहिर, अध्यक्ष, इतर मागासवर्गीय आयोग, भारत सरकार
    • अध्यक्षस्थानी: मा. डॉ. प्रशांत बोकारे, कुलगुरु, गोंडवाना विद्यापीठ
    • प्रमुख उपस्थिती: मा. डॉ. श्रीराम कावळे, प्र-कुलगुरु, गोंडवाना विद्यापीठ

    गोंडवाना विद्यापीठाचा पूर्वानुभव

    गोंडवाना विद्यापीठाने यापूर्वीही यशस्वीपणे राज्यस्तरीय महोत्सव आयोजित केले आहेत:

    • १३ वा आंतर विद्यापीठ संशोधन उत्सव “आविष्कार” (२०१८-१९)
    • १७ वा आंतर विद्यापीठ सांस्कृतिक युवा महोत्सव “इंद्रधनुष्य” (२०१९)
    • राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबीर “आव्हान” (२०२३)
    आयोजित पत्रकार परिषदेत प्र कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण, अधिसभा सदस्य डॉ. जयेश चक्रवर्ती, निलेश बेलखेडे, डॉ. प्रवीण जोगी, संजय रामगिरवार, प्राचार्य डॉ. राजेश दहेगावकर, अधिष्ठाता डॉ. संजय निंबाळकर आदींची उपस्थिती होती.
  • Modern fish market infrastructure । प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेतर्गत चंद्रपूरला स्वच्छ आणि सुसज्ज मच्छी बाजार

    Modern fish market infrastructure

    चंद्रपूरच्या मत्स्य व्यावसायिकांना आधुनिक सुविधा मिळणार – आ. किशोर जोरगेवार

    Modern fish market infrastructure : प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत चंद्रपूर महानगरपालिकेत अत्याधुनिक मच्छी मार्केट उभारण्याच्या दृष्टीने मनपा प्रशासनाने जलद कार्यवाही करावी हे मार्केट केवळ व्यवसायाच्या दृष्टीनेच नव्हे, तर स्वच्छता, सुविधा आणि शाश्वत विकासाच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाचे आहे. यातून चंद्रपूरच्या मत्स्यव्यवसायीकांना आधुनिक सुविधा मिळणार असुन या कामात स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्याचे निर्देश आमदार किशोर जोरगेवार यांनी दिले आहे.

    कृषी वीज पंप जोडणीवरून खासदार धानोरकर आक्रमक, आंदोलनाचा इशारा

                प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत मच्छी मार्केट उभारणी संदर्भात महानगरपालिका येथे बैठकीचे आयोजन करण्यात होते. या बैठकीत आमदार किशोर जोरगेवार यांनी प्रस्तावीत मच्छी मार्केट च्या कामाचा आढावा घेतला असून आवश्यक सुचना केल्या आहे. या बैठकीला मनपा आयुक्त विपिन पालिवाल, सहाय्यक आयुक्त अक्षय गडलिंग, शहर अभियंता विजय बोरीकर, शाखा अभियंता नरेंद्र पवार, भारतीय जनता पार्टीचे मनोज पाल, विश्वजित शहा, अमोल शेंडे, आदींची उपस्थिती होती. (Fish market development project)

    चांगली बाजारपेठ उपलब्ध होणार

      या प्रकल्पांतर्गत स्वच्छ, आधुनिक आणि सुसज्ज मच्छी मार्केट उभारण्यावर भर दिला गेला आहे. मत्स्यव्यवसायिकांना उत्तम पायाभूत सुविधा मिळाव्यात, तसेच स्वच्छतेसाठी आधुनिक यंत्रणा बसवण्याच्या अनुषंगाने बैठकीत चर्चा करण्यात आली. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर स्थानिक मत्स्यव्यवसायिकांना अधिक चांगली बाजारपेठ उपलब्ध होईल आणि ग्राहकांनाही स्वच्छ आणि सुरक्षित वातावरणात येथे खरेदी करता येणार आहे. (Sustainable fish market planning)
    fish market development project

                   मत्स्य व्यवसायिकांना शीतगृह, पाणीपुरवठा आणि वीजपुरवठा यांसारख्या सुविधा व्यवस्थित मिळाव्यात. विक्रेत्यांना आधुनिक व्यवस्थापनाचे प्रशिक्षण मिळावे, त्यांचे उत्पन्न वाढावे आणि हा व्यवसाय अधिकाधिक लोकांसाठी रोजगारनिर्मिती करणारा ठरावा, ही आमची भूमिका असून  प्रशासनाने या कामाच्या गतीला प्राधान्य द्यावे आणि अंमलबजावणी वेळेत पूर्ण व्हावी हा प्रकल्प म्हणजे केवळ मच्छी बाजार नव्हे, तर स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणारा आणि चंद्रपूरच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणारा उपक्रम आहे असल्याचे या बैठकीत आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले असून सर्व विभागानी समन्वय ठवेत हे काम वेळेत पूर्ण करत उत्तम दर्जाचे करण्याच्या सुचना या बैठकीत आमदार किशोर जोरगेवार यांनी प्रशासनाला केल्या आहे. या बैठकीत संबधित विभागाच्या अधिका-यांची आणि मच्छी विक्रेत्यांची उपस्थिती होती. 

  • Remarkable Nagpur Divisional Level Competition । स्वामी विवेकानंद बालगृह, नागभीडच्या खेळाडूंची घवघवीत कामगिरी

    Nagpur Divisional Level Competition

    नागपूर विभागात अव्वल स्थान

    Nagpur Divisional Level Competition: महाराष्ट्र राज्य महिला व बालविकास विभागाच्या वतीने जिल्हास्तरीय चाचा नेहरू बालमहोत्सव आयोजित केला जातो. या स्पर्धेत यशस्वी ठरलेल्या बालगृहातील लाभार्थ्यांची विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड केली जाते. शासकीय निरीक्षण गृह, बालगृह, स्वयंसेवी संस्था आणि इतर शाळांमधील विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होतात.

    कृषी मंत्री कोकाटे यांना आवरा, खासदार धानोरकर यांचं मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र

    अपुऱ्या सुविधा आणि मर्यादित संसाधनांच्या परिस्थितीतही स्वयंसेवी संस्थांमधील मुलांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे, हे विशेष कौतुकास्पद आहे. आगामी राज्यस्तरीय स्पर्धेतही ही मुले उत्कृष्ट कामगिरी करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (Chacha Nehru Children’s Festival Maharashtra)

    विभागस्तरीय चाचा नेहरू बालमहोत्सव नागपूर येथे १२ ते १४ फेब्रुवारी दरम्यान पार पडला.
    या स्पर्धेत लोककल्याण बहुउद्देशीय शिक्षण संस्था, ब्रह्मपुरी द्वारा संचालित स्वामी विवेकानंद बालगृह, नागभीड (जिल्हा चंद्रपूर) येथील लाभार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली. (Swami Vivekananda Children’s Home Nagbhid)

    स्पर्धेतील यश:

    • ६ ते १२ वयोगट:
      • कबड्डी – प्रथम क्रमांक
      • खो-खो – प्रथम क्रमांक
      • १०० मीटर धावणे – द्वितीय क्रमांक
    • १३ ते १८ वयोगट:
      • खो-खो – प्रथम क्रमांक
      • कबड्डी – द्वितीय क्रमांक

    पुरस्कार वितरण समारंभात, महिला व बालविकास विभागाच्या विभागीय उपायुक्त श्रीमती अपर्णा कोल्हे यांच्या शुभहस्ते विजेत्यांना सन्मानित करण्यात आले. विविध मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या या समारंभात, स्वामी विवेकानंद बालगृह, नागभीडने नागपूर विभागात अव्वल स्थान पटकावल्याने चंद्रपूर जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला.

    या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे संस्थापक पुरुषोत्तम चौधरी, अधीक्षक नरेंद्र बोरकर, गृहपिता रवींद्र राणे यांचे विशेष योगदान लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली बालकांनी मिळवलेले हे यश सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यातून संस्थेच्या कामगिरीचे अभिनंदन करण्यात येत आहे.

  • Ashram School Teachers Issues । अनुदानित आश्रमशाळा शिक्षक-कर्मचाऱ्यांच्या समस्यांवर चर्चा

    Ashram School Teachers Issues

    आमदार सुधाकर अडबाले यांच्या उपस्थितीत सहविचार सभा

    Ashram School Teachers Issues : चंद्रपूर : इतर मागास बहुजन कल्याण विभागाअंतर्गत संचालित अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या समस्या निवारणार्थ विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचा उपक्रम “समस्‍या तुमच्या, पुढाकार आमचा” अंतर्गत सहविचार सभा आमदार सुधाकर अडबाले यांच्या उपस्थितीत नागपूर प्रादेशिक उपसंचालक विजय वाकूलकर व विभागातील सर्व जिल्ह्यांचे सहाय्यक संचालक यांच्यासोबत नुकतीच पार पडली. कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रकरणे तात्‍काळ निकाली काढण्याच्या सूचना आमदार सुधाकर अडबाले यांनी अधिकाऱ्यांना दिल्‍या. (Government Aided Ashram Schools)

    मुख्यमंत्री साहेब कृषिमंत्र्यांना आवरा – खासदार प्रतिभा धानोरकर

    सभेत नियमित वेतनाबाबत गंभीरपणे चर्चा करण्यात आली असून यानंतर वेतन विनाविलंब करण्यात यावे,जेष्ठता सूची पाहूनच शिक्षक अतिरिक्त  ठरवण्यात यावेत, शिक्षकांचे समायोजन समुपदेशन पद्धतीने घेण्यात यावेत, भनिनि परतावा व ना-परतावा बी.डी.एस. तात्काळ सुरू करण्यात यावे, अनुकंपा धारकांचे प्रस्ताव मान्यतेसाठी शासनाकडे पाठपुरावा करावा, कर्मचाऱ्यांचे वरिष्ठ/निवड श्रेणी मंजुरीकरिता विभागात दर आठवड्याला समितीची सभा घेऊन नियमानुसार ४५ दिवसाच्या आत मार्गी लावण्यात यावे, वैद्यकीय प्रतिपूर्ती प्रस्ताव एका आठवड्यात निकाली काढावे या व इतर सर्व समस्‍यांवर चर्चा तथा सूचना करण्यात आल्या. (Sudhakar Adbale Teachers Meeting)

    बैठकीत यांची होती उपस्थिती

    यावेळी सहाय्यक संचालक श्रीमती आशा कवाडे, सहाय्यक संचालक धनराज सहारे, सहा. संचालक विनोद मोहतुरे, सहा. संचालक श्री. मडावी, नागपूर समाज कल्‍याण अधिकारी श्री. भोयर, विमाशि संघ आश्रमशाळा विभागाचे जिल्‍हा कार्यवाह किशोर नगराळे, जिल्‍हाध्यक्ष दिनेश चौधरी, वनकर सर, बोरकर सर, दुधबावरे सर तथा विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रांतीय उपाध्यक्ष रमेश काकडे, प्रांतीय कोषाध्यक्ष भूषण तल्‍हार, नागपूर महानगर अध्यक्ष विठ्ठल जूनघरी, जिल्‍हा कार्यवाह संजय वारकर, महानगर कार्यवाह अविनाश बढे, कर्णबोधी मांडवे, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे चंद्रपूर महानगर अध्यक्ष दिगांबर कुरेकार, महानगर कार्यवाह सुरेंद्र अडबाले, जिल्हा कार्यवाह दीपक धोपटे, सुर्यकांत केंद्रे, रणजीत राठोड व समस्‍याग्रस्‍त आश्रमशाळा शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

  • Manikrao Kokate Farmers Statement । कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शेतकऱ्यांविषयी वक्तव्याचा निषेध, खासदार धानोरकरांची कार्यवाहीची मागणी

    Manikrao Kokate Farmers Statement

    कृषी मंत्र्यांच्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी खासदारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

    Manikrao Kokate Farmers Statement : राज्यात महायुतीचे सरकार बहुमताने निवडून आल्यानंतर सरकार मधील काही मंत्र्यांनी बेताल वक्तव्य करण्यास सुरुवात केली आहे. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी अमरावती येथे शेतकऱ्यांसंबंधी केलेल्या आक्षेपार्ह विधानासंदर्भात खासदार धानोरकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीत संबंधीत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचे वर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.

    शेतकऱ्यांच्या वीज जोडणी प्रश्नावर खासदार धानोरकर आक्रमक

    महायुती सरकार ला प्रत्येक घटकाने मदत केल्यानेच महायुतीचे सरकार अस्तित्वात आले. परंतु या सरकार मधील कृषी मंत्री यांनी पिक विम्या संदर्भात भिकारी देखील एक रुपया घेत नाहीत परंतु आम्ही शेतकऱ्यांना एक रुपयात विमा देतो, असे वादग्रस्त विधान करुन शेतकऱ्यांना भिकाऱ्याची उपमा दिली. (Maharashtra Agriculture Minister Controversy)

    या विधानाचा महाराष्ट्रातून निषेध होत असतांना खासदार धानोरकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित आपल्या मंत्र्यांना आवर घालण्याची मागणी केली आहे. शेतकरी हा जगाचा पोशिंदा असून त्यांच्यामुळे आज आपण जगत आहोत याचा विसर कृषी मंत्र्यांना पडला असावा, असे मत खासदार धानोरकर यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रातून व्यक्त केले आहेत. अशा बेताल वक्तव्य करणाऱ्या कृषी मंत्र्यांवर कार्यवाही ची मागणी खासदार धानोरकर यांनी केली आहे.

  • MSEDCL Electricity Connection Issue । “शेतकऱ्यांच्या विज जोडणी प्रश्नावर खासदार प्रतिभा धानोरकर आक्रमक, महावितरण अधिकाऱ्यांना घेराव घालण्याचा इशारा”

    MSEDCL Electricity Connection Issue

    MSEDCL Electricity Connection Issue : खासदार प्रतिभा धानोरकर ह्या चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्रातील नागरिकांच्या प्रश्नासाठी अनेक वेळा आक्रमक झाल्याचे दिसून आले आहे. सध्या शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना वीज जोडणी देण्याच्या प्रश्नावर त्या आक्रमक झाल्या असून विज द्या अथवा 2018 पासून जमा केलेल्या सुरक्षा रकमेवर व्याज द्या अन्यथा महावितरण च्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांसह घेराव घालणार असल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे.

    चंद्रपुरातील हा मार्ग राहणार बंद

    खासदार प्रतिभा धानोरकर ह्या नागरीकांच्या प्रश्नांबद्दल संवेदनशील असून सध्या त्यांनी 2018 पासून जिल्ह्यातील 1590 शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना विज (Agricultural Pump Power Connection) मिळवून देण्याकरीता सरकार विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. सदर शेतकऱ्यांनी वीज जोडणी करीता सुरक्षा ठेव देखील जमा केलेली आहे.

    या विषयासंदर्भात खासदार प्रतिभा धानोरकर यांनी मुख्यमंत्री तथा उर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्मरणपत्र लिहून शेतकऱ्यांची मागणी मान्य करण्याची विनंती केली आहे. उशीर झाल्यास सामान्य नागरीकांकडून विज बिलावर व्याज घेणारे महावितरण 2018 पासून शेतकऱ्यांना विज जोडणी देण्यास असमर्थ ठरले आहे.

    या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात शेतकऱ्यांना विज किंवा शेतकऱ्यांनी महावितरण कडे सुरक्षा ठेव स्वरुपात भरलेल्या पैशावर व्याज न दिल्यास महावितरणच्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांसह घेराव घालणार (Pratibha Dhanorkar Farmers Protest) असल्याचे खासदार धानोरकरांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे. या संदर्भात मुख्यमंत्री काय भुमिका घेतात हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.

  • Chandrapur Traffic Diversion । मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा चंद्रपूर दौरा: 16 फेब्रुवारीला वाहतूक मार्गात बदल, नागरिकांनी घ्यावी दक्षता

    Chandrapur Traffic Diversion

    Chandrapur Traffic Diversion : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांचा 16 फेब्रुवारी रोजी चंद्रपुर येथील प्रियदर्शिनी सभागृह येथे दौरा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सदर कार्यक्रमाकरीता नागरीकांची मोठया प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. तसेच कार्यक्रमा दरम्यान उपस्थित असणारे मान्यवर व इतर नागरीकांची वरोरा नाका ते प्रियदर्शिनी चौक या मार्गावरुन आगमन व निर्गमन होणार असल्याने त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोणातुन वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. (Devendra Fadnavis Chandrapur Visit)

    २० फेब्रुवारीला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राज्यव्यापी धरणे आंदोलन

    दौरा कार्यक्रम असलेल्या मार्गावर रहदारी सुरळीत चालावी, रहदारीस कुठल्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये व जनतेला त्रास अथवा गैरसोय होऊ नये म्हणुन वाहतुक व्यवस्थेमध्ये पुढीलप्रमाणे बदल करण्यात येत आहे.

    हा मार्ग राहणार बंद

    16 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत वरोरा नाका ते प्रियदर्शिनी चौक हा मार्ग  सर्व प्रकारचे वाहनाकरीता बंद राहील. तसेच सदरचा मार्ग हे नो पार्कींग झोन व नो हॉकर्स झोन म्हणुन घोषीत करण्यात येत आहे. (Chandrapur Road Closure 16 Feb)

    या कालावधीत सर्व वाहतुकदारांनी पुढील पर्यायी मार्गाचा वापर करावा.

    १) सदरच्या कालावधीत नागपूरकडून शहराकडे जाणारी वाहने वरोरा नाका-उडान पुल-सिध्दार्थ हॉटेल-बस स्टॅड-प्रियदर्शनी चौक मार्गे किंवा मित्र नगर चौक-संत केवलराम चौक मार्गे शहरामध्ये प्रवेश जातील.

    २) सदरच्या कालावधीत शहरातुन बाहेर जाण्यासाठी नागरीकांनी जटपुरा गेट-प्रियदर्शीनी चौक-बस स्टॅण्ड चौक-सिध्दार्थ हॉटेल-उडान पुल-वरोरा नाका मार्गे किंवा संत केवलराम चौक-मित्र नगर चौक मार्गे बाहेर जातील.

    ३) सदर अधिसुचनेमध्ये आवश्यकतेनुसार बदल करण्यात येईल.

    नागरीकांनी सदर अधिसुचनेचे पालन करुन प्रशासनाला सहकार्य करावे,  असे आवाहन पोलिस  विभागाने केले  आहे.

  • OBC Protest Maharashtra | ओबीसी न्याय हक्कांसाठी २० फेब्रुवारीला धरणे आंदोलन, १६ फेब्रुवारीला आढावा बैठक

    OBC Protest Maharashtra

    OBC Protest Maharashtra : चंद्रपूर- राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे २० फेब्रुवारी २०२५ ला ओबीसींच्या न्याय मागण्यासाठी राज्यभरात धरणे आंदोलन होणार आहे. धरणे आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी १६ फेब्रुवारीला वरोरा नाका येथील पत्रकार भवनात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

    धारिवाल कंपनी प्रबंधनावर कठोर कारवाई करा, आपची मागणी

    राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे ओबीसी, व्हीजे,एनटी & विमाप्र विद्यार्थ्याना अजूनही आधार योजनेतील रक्कम मिळाली नाही यासह जातनिहाय जनगणना करण्यात यावी, ओबीसी साठी केंद्रात स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्यात यावे, क्रिमीलेअरची उत्पन्न मर्यादा १५ लक्ष रुपये करण्यात यावे, आरक्षणाची ५०% मर्यादा रद्द करण्यात यावी.

    ओबीसींना लोकसंख्येच्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात यावा इत्यादी प्रलंबित मागण्या संदर्भात पाठपुरावा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय समोर चंद्रपूर येथे धरणे आंदोलन करण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य, तसेच राष्ट्रीय ओबिसी महासंघाच्या सर्व कक्षाचे प्रमुख व समविचारी संघटना ओबीसी समाजात मोडणाऱ्या जातीय संघटना, विध्यार्थी यांची सभा १६ फेब्रुवारीला २०२५ रविवार ला दुपारी १ -०० वाजता चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघ, वरोरा नाका,चंद्रपूर,येथे आयोजित केली आहे. (National OBC Federation Dharna)

    तरी सर्व विंगच्या पदाधिकाऱ्यांनी सभेला उपस्थित राहण्याचे आवानह राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजुरकर यांनी केले आहे.

  • Chandrapur Power Plant Accident | धारीवाल पावर प्लांट दुर्घटना: आम आदमी पक्षाची कंपनी प्रशासनावर कठोर कारवाईची मागणी

    Chandrapur Power Plant Accident

    Chandrapur Power Plant Accident : चंद्रपूर – धारीवाल पावर प्लांटमध्ये घडलेल्या दुर्दैवी घटनेवर आम आदमी पक्ष चंद्रपूरने कठोर भूमिका घेतली असून, कंपनी प्रशासनाविरुद्ध कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. LCPL कंपनीतील फील्ड ऑपरेटर कर्णधर अशोक शेरके यांचा कन्व्हेअर बेल्टमध्ये (Conveyor Belt Accident) अडकून मृत्यू झाला, ही घटना कंपनी प्रशासनाच्या हलगर्जीपणाचे गंभीर उदाहरण आहे.

    चंद्रपूर ते मुंबई रेल्वे सुरू होणार, आमदार जोरगेवार यांचा पाठपुरावा

    घटनेचे वर्णन व प्रशासनाचे गैरप्रकार:
    १. सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष: कामगारांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती खबरदारी न घेतल्याने अपघात घडला.
    २. शव बेकायदेशीररीत्या हलवण्याचा प्रयत्न: मृतकाच् शरीरार तातडीने हलवून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला गेला. (Dhariwal Company Negligence)


    ३. कामगार व नेत्यांना घटनास्थळी प्रवेश नाकारणे: कामगार संघटनांच्या नेत्यांना व आम आदमी पक्षाच्या प्रतिनिधींना घटनास्थळी जाण्यापासून रोखण्यात आले.
    ४. पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न: कंपनीने अपघाताची जबाबदारी झटकण्यासाठी महत्त्वाचे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला.


    ५. पोलिस प्रशासनाची भूमिका: संबंधित पोलिस अधिकाऱ्यांनी कामगार व नेत्यांना घटनास्थळी जाण्यापासून रोखून अन्यायकारक भूमिका घेतली.

    आम आदमी पक्षाच्या मागण्या:
    १. कंपनी प्रशासनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा.
    २. मृतकाचे शव बेकायदेशीररीत्या हलवण्याच्या व पुरावे नष्ट करण्याच्या प्रयत्नांवर कायदेशीर कार्यवाही करावी.
    ३. कामगार व नेत्यांवर झालेल्या धक्का-बुक्कीबद्दल संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करावी.
    ४. कामगारांच्या सुरक्षेच्या तपासणीसाठी तात्काळ समिती स्थापन करावी.


    ५. सुरक्षेचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी.
    ६. जिल्ह्याला कायमस्वरूपी सहाय्यक कामगार आयुक्त द्यावा.

    इशारा:
    जर वरील मागण्या त्वरित पूर्ण झाल्या नाहीत, तर आम आदमी पक्ष कामगारांच्या हक्कांसाठी तीव्र आंदोलन उभारेल. कोणतीही तडजोड केली जाणार नाही.

    प्रमुख नेत्यांची उपस्थिती:
    यावेळी आपचे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार, कामगार नेते व युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे, महिला शहर अध्यक्षा तब्बसूम शेख, शहर संघटनमंत्री संतोष बोपचे, युवा जिल्हा संघटनमंत्री मनीष राऊत, युवा सचिव आदित्य नंदनवार, अजय बाथव, अल्पसंख्यांक अध्यक्ष जावेद सय्यद, वाहतूक अध्यक्ष जयदेव देवगडे, अनुप तेलतुबडे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.