Chandrapur Traffic Diversion । मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा चंद्रपूर दौरा: 16 फेब्रुवारीला वाहतूक मार्गात बदल, नागरिकांनी घ्यावी दक्षता

Chandrapur Traffic Diversion

Chandrapur Traffic Diversion : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांचा 16 फेब्रुवारी रोजी चंद्रपुर येथील प्रियदर्शिनी सभागृह येथे दौरा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सदर कार्यक्रमाकरीता नागरीकांची मोठया प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. तसेच कार्यक्रमा दरम्यान उपस्थित असणारे मान्यवर व इतर नागरीकांची वरोरा नाका ते प्रियदर्शिनी चौक या मार्गावरुन आगमन व निर्गमन होणार असल्याने त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोणातुन वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. (Devendra Fadnavis Chandrapur Visit)

२० फेब्रुवारीला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राज्यव्यापी धरणे आंदोलन

दौरा कार्यक्रम असलेल्या मार्गावर रहदारी सुरळीत चालावी, रहदारीस कुठल्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये व जनतेला त्रास अथवा गैरसोय होऊ नये म्हणुन वाहतुक व्यवस्थेमध्ये पुढीलप्रमाणे बदल करण्यात येत आहे.

हा मार्ग राहणार बंद

16 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत वरोरा नाका ते प्रियदर्शिनी चौक हा मार्ग  सर्व प्रकारचे वाहनाकरीता बंद राहील. तसेच सदरचा मार्ग हे नो पार्कींग झोन व नो हॉकर्स झोन म्हणुन घोषीत करण्यात येत आहे. (Chandrapur Road Closure 16 Feb)

या कालावधीत सर्व वाहतुकदारांनी पुढील पर्यायी मार्गाचा वापर करावा.

१) सदरच्या कालावधीत नागपूरकडून शहराकडे जाणारी वाहने वरोरा नाका-उडान पुल-सिध्दार्थ हॉटेल-बस स्टॅड-प्रियदर्शनी चौक मार्गे किंवा मित्र नगर चौक-संत केवलराम चौक मार्गे शहरामध्ये प्रवेश जातील.

२) सदरच्या कालावधीत शहरातुन बाहेर जाण्यासाठी नागरीकांनी जटपुरा गेट-प्रियदर्शीनी चौक-बस स्टॅण्ड चौक-सिध्दार्थ हॉटेल-उडान पुल-वरोरा नाका मार्गे किंवा संत केवलराम चौक-मित्र नगर चौक मार्गे बाहेर जातील.

३) सदर अधिसुचनेमध्ये आवश्यकतेनुसार बदल करण्यात येईल.

नागरीकांनी सदर अधिसुचनेचे पालन करुन प्रशासनाला सहकार्य करावे,  असे आवाहन पोलिस  विभागाने केले  आहे.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *