Blog

  • खड्डेमुक्त महामार्ग! खासदार धानोरकर यांच्या हस्तक्षेपानंतर दुरुस्तीला सुरूवात

    Nagpur Chandrapur highway repair latest update : चंद्रपूर २५ नोव्हेम्बर (News३४) – चंद्रपूर-नागपूर महामार्गावरील खड्ड्यांमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांसाठी दिलासा मिळाला आहे. खासदार प्रतिभा धानोरकर यांनी सार्वजनिक बांधकाम मंडळ आणि महामार्ग प्राधिकरणाला खडसावल्यानंतर, अखेर प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली असून, महामार्गाच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे. 

    Read Also : जनता कॅरिअर लॉन्चर विद्यार्थी आत्महत्या, संस्थाचालकावर गुन्हा दाखल करा – युवासेना

    खासदार प्रतिभा धानोरकर यांनी सार्वजनिक बांधकाम मंडळ, चंद्रपूर येथीलअधीक्षक अभियंता यांना पत्र लिहून चंद्रपूर-नागपूर महामार्गाची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी केली होती. या पत्रात त्यांनी स्पष्ट केले होते की, महामार्गावर अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले असून, पावसाळ्यामुळे ही समस्या अधिकच गंभीर झाली होती. या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना आणि नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो, तसेच यामुळे भविष्यात मोठे अपघात होऊन जीवतहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

    खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे प्रशासनाने अखेर महामार्गाच्या दुरुस्तीसाठी तातडीने पाऊले उचलली आहेत. दुरुस्तीचे काम सुरू झाल्याने वाहनचालकांना आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. खासदार प्रतिभा धानोरकर यांच्याकडून या कामाचा सातत्याने पाठपुरावा सुरू राहणार असून, जोपर्यंत रस्त्याची गुणवत्ता सुधारत नाही आणि महामार्ग पूर्णपणे सुस्थितीत येत नाही, तोपर्यंत प्रशासनावर दबाव कायम ठेवला जाईल, अशी माहिती खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या वतीने देण्यात आली आहे. जनतेच्या हितासाठी खासदार प्रतिभा धानोरकर कटिबद्ध असून, लवकरच हा महामार्ग अपघातमुक्त आणि सुस्थितीत दिसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

  • चंद्रपुरातील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत शिक्षकाचं नराधमी कृत्य

    Minor girl abuse by teacher in Chandrapur : चंद्रपूर २५ नोव्हेम्बर (News३४) : नाशिकमधील मालेगाव येथे तीन वर्षीय चिमुरडीवर अत्याचार झाल्याची घटना गाजत असतानाच चंद्रपुरातही एका अल्पवयीन मुलीवर शिक्षकानेच अत्याचार केल्याची खळबळजनक घटना समोर आली. याप्रकरणी शहर पोलिसांनी नराधम शिक्षकावर पॉक्सोंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली. जिल्हा परिषद शाळेत कार्यरत दिलीप दादाजी मडावी (५३) असे अटकेतील नराधम शिक्षकाचे नाव आहे.

    Read Also : चंद्रपुरातील या शिक्षण संस्थेत विद्यार्थ्याला दिला मानसिक त्रास, विद्यार्थ्यांची आत्महत्या, संस्थाचालक यांच्यावर गुन्हा दाखल करा

    पीडित मुलगी राजुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका शाळेत मागील पाच वर्षांपूर्वी इयत्ता सहावीत शिकत होती. शिक्षकसुद्धा तिथेच कार्यरत होता. पीडित मुलगी हुशार असल्याने तिचे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर उच्च प्राथमिक शिक्षणासाठी चंद्रपूरला पाठवण्याचा सल्ला मडावीने तिच्या आई-वडिलांना दिला. त्यामुळे मागील वर्षी ती मुलगी चंद्रपूर येथे शिक्षणासाठी आली. दरम्यान, त्या मुलीचे आई-वडील काही आवश्यक साहित्य त्या शिक्षकाकडे पाठवायचे.

    तेव्हा शिक्षक तिच्या रुमखाली जाऊन त्या मुलीला घरगुती सामान देण्याच्या बहाण्याने आपल्या गाडीत बसवून तिचे शोषण करायचा. मात्र, बदनामीच्या भीतीने त्या मुलीने याबाबत कुठेही वाच्यता केली नाही. २० तारखेला ही बाब कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिस निरीक्षक निशिकांत रामटेके यांच्या मार्गदर्शनात पीएसआय तृप्ती खंडाईत यांनी पीडित मुलीचे बयान घेत शिक्षक दिलीप मडावी याच्यावर बीएनएस (७५ (१), ६४ (२), आयएमएफ ६५ १, ३५२, ४, ६, १२ पॉक्सो ६६ (ई) ६७ (ए) आयटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली. पुढील तपास पोलिस निरीक्षक निशिकांत रामटेके करत आहेत. Minor girl abuse by teacher in chandrapur

    …असे आले प्रकरण उघडकीस

    नराधम शिक्षक पीडित मुलीला रात्री बाथरुममध्ये जाऊन विवस्त्र होऊन व्हिडीओ कॉल करायला सांगायचा. या कॉलचे त्याने स्क्रिनशॉटसुद्धा काढले होते. २० नोव्हेंबर २०२५ रोजी चुकीने हा स्क्रिनशॉट व चॅटिंग पीडित मुलीच्या वडिलांच्या मोबाइलवर जाताच त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. त्यांनी मुलीला याबाबत विचारणा केली, तिने आपबिती कथन केली. त्यानंतर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली. Minor girl abuse by teacher in chandrapur

    घुग्घुस केंद्रातही तक्रार

    दिलीप मडावी याची मागील काही दिवसांपूर्वी घुग्घुस केंद्रातील एका शाळेत बदली झाली. येथेही त्याने मुलींना बॅडटच केल्याच्या तक्रारी पालकांकडे गेल्या. त्यांनी शाळा गाठून त्या शिक्षकाला चांगलेच धारेवर धरले. पोलिस ठाण्यापर्यंतही विषय गेला होता. मात्र, तक्रार झाली नसल्याची माहिती आहे. शेवटी पालकांनी त्या शिक्षकाची बदली करण्याची मागणी केली.

  • कांपा जंगलात मोठी कारवाई! पोलिसांनी मोहा हातभट्टी नष्ट करून २.१७ लाखांचा मुद्देमाल उद्ध्वस्त

    Action against illegal Moha Hat Bhatti liquor : नागभीड २४ नोव्हेम्बर (News३४) – नागभीड पोलीस स्टेशनच्या हद्दीत जंगल परिसरात सुरु असलेल्या अवैध मोहा हातभट्टी दारू अड्ड्याबाबत पोलिसांनी मोहीम राबवित मोहा नष्ट करण्यात आला, या मोहिमेत पोलिसांनी तब्बल २ लक्ष १७ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला.

    नागभीड पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे तालुक्यातील कांपा जंगलात विविध ठिकाणी सुरु असलेल्या मोहा हातभट्टी दारू अड्ड्यावर कारवाई करण्यात आली. यामध्ये पहिल्या कारवाईत २५० लिटर मोहादारू व १ हजार ८०० लिटर मोहफूल सडवा व साहित्य जप्त करण्यात आले, या कारवाई दरम्यान २६ वर्षीय आदित्य प्रदीप उके हा पसार झाला.

    Read Also : रात्र गस्तीदरम्यान रामनगर पोलिसांनी पकडले बॅटरी चोर

    दुसऱ्या कारवाईत २०५ लिटर मोहदारू, मोहाफूल सडवा १ हजार ५०० किलो सह साहित्य जप्त केले, या कारवाई दरम्यान आरोपी २७ वर्षीय रोहित प्रकाश अलोणे हा सुद्धा पसार झाला. पोलिसांनी दोन्ही कारवाई मध्ये जप्त मुद्देमाल जागेवरच नष्ट केला.

    सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक रमाकांत कोकाटे यांच्या नेतृत्वात पोउपनि अजिंक्य गोविंदलवार, पोलीस कर्मचारी किशोर देशमुख, भरत घोळवे, ज्ञानेश्वर गिरडकर, विशाल पेंदाम, संदीप मडावी व दामोदर करंबे यांनी केली.

  • जनता कॅरिअर लॉन्चर आत्महत्या प्रकरण; संस्थाचालकावर गुन्हा दाखल करा – युवासेना

    Education institute student suicide updates : चंद्रपूर २४ नोव्हेम्बर (News३४) – चंद्रपूर जिल्ह्यातील चांदा शिक्षण प्रसारक मंडळ अंतर्गत चालणाऱ्या जनता करिअर लॉन्चर च्या वसतिगृहात २० नोव्हेम्बर रोजी प्रथमेश गुलाब सुदरी या १७ वर्षीय मुलाने वसतिगृह व जनता करिअर लॉन्चर मधील प्राचार्य द्वारा होणाऱ्या मानसिक छळापायी गळफास लावून आत्महत्या केली होती. पोलिसांनी या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल केला असून एकाला अटकही झाली आहे. सदर आत्महत्या प्रकरणी जचांदा शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्ष व सचिवावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांनी जिल्हा व महिला बालविकास अधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनामार्फत केली आहे.

    Read Also : जनता कॅरिअर लॉन्चर च्या वसतिगृहात विद्यार्थ्यांची आत्महत्या

    चंद्रपूर तालुक्यातील लहान गावातून मोठी स्वप्ने बाळगत शेतकऱ्याने आपल्या मुलाला जनता करिअर लॉन्चर मध्ये शिकवणी साठी पाठवलं, मुलाने गावाच्या वातावरणापासून शहरात जनता करिअर लॉन्चर च्या वसतिगृहात राहत पुढील शिक्षण घ्यावं अशी कुटुंबाची इच्छा होती. मात्र शिक्षण क्षेत्रातील गुरु ने प्रथमेश चे स्वप्न धुळीस मिळवीत त्याला टोकाचं पाऊल उचलायला भाग पाडलं. Education institute student suicide updates

    प्रथमेश ने याबाबत वडिलांना तक्रार केली होती, यासह त्याला होणाऱ्या त्रासावर व्यवस्थापनाला सुद्धा तक्रार केली अशी माहिती सहारे यांनी दिली, मात्र प्रथमेश च्या तक्रारींवर संस्थाचालक व व्यवस्थापनाने कानाडोळा करीत कारवाई केली नाही, जर आधीच प्रथमेश च्या तक्रारींवर कारवाई झाली असती तर तो आज हयात असता.

    निवेदनामार्फत विक्रांत सहारे यांनी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी आणि पोलीस अधीक्षक विद्यर्थ्यांच्या तक्रारींवर मानसिक छळ करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर संस्थाचालकाद्वारे कसलीही कारवाई न करता त्यांना अभय देण्याचं काम अध्यक्ष व सचिव यांनी केल्याने सदर प्रकरणात दोघांवर चौकशी करून गुन्हा दाखल करीत मृतक प्रथमेश च्या पालकांना न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.

  • रात्रीची गस्त फायद्याची! २ बॅटरी चोर ताब्यात

    police action against battery thieves : चंद्रपूर २४ नोव्हेम्बर (News३४) – रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्र्क मधून बॅटरी चोरणाऱ्या दोघांना रामनगर पोलिसांनी अटक करून तब्बल ९८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

    २३ नोव्हेम्बर रोजी फिर्यादी करण झामरे यांनी तक्रार दिली कि त्यांच्या वाहनचालकाने नादुरुस्त असलेल्या ट्र्क ला रस्त्याच्या कडेला लावून घरी गेला होता दुसऱ्या दिवशी सकाळी कॅबीनच्या खिडक्या उघड्या होत्या, त्याठिकाणी बघितले असता ट्र्क क्रमांक MH ३४ M ८६७४ मधील लाल रंगाची बॅटरी, MH ३४ AB ३८५९ इनोव्हा कंपनीची लाल रंगाची बॅटरी व हायड्रॉलिक जॅक दिसून आला नाही. सदर माल हा अज्ञात चोराने चोरून नेला अशी तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली.

    Read Also : कांग्रेसच्या माजी नगरसेवकाचा प्रताप, सुरु केला देहव्यापाराचा प्रताप

    तक्रार दाखल झाल्यावर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी तपासाला सुरुवात केली, नाईट गस्ती दरम्यान २ युवक हे बॅटरी घेऊन जाताना पोलिसांना आढळले, दोघांना ताब्यात घेत त्यांची विचारपूस केली असता त्यांनी बॅटरी चोरी केल्याची कबुली दिली. police action against battery thieves

    आरोपी १९ वर्षीय सप्रेम लेमचंद दुर्गे राहणार MIDC हनुमान नगर चंद्रपूर व २० वर्षीय अखतर गुलाम हुसेन राहणार म्हाडा कॉलोनी दाताला यांच्याकडून दुचाकी, ५ बॅटऱ्या सह ४ हायड्रॉलिक जॅक असा एकूण ९८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे.

    सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक आसिफरजा शेख यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथकातील सपोनि देवाजी नरोटे, हनुमान उगले, निलेश वाघमारे, पोलीस कर्मचारी आनंद खरात, जितेंद्र आकरे, शरद कुडे, लालू यादव, बाबा नैताम, गजानन नागरे, रामप्रसाद नैताम, मनीषा मोरे, रवीकुमार ढेंगळे, पंकज ठोंबरे, प्रफुल पुप्पलवार, संदीप कामडी, सुरेश कोरवार, पंकज पोंदे व ब्ल्यूटी साखरे यांनी केली.

  • भद्रावतीत भाजपला धक्का! तीन माजी नगरसेवकांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

    political leaders joining Congress updates : चंद्रपूर : भद्रावती शहरातील राजकारणाला आज काँग्रेस पक्षाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण वळण दिले आहे. भारतीय जनता पक्षाचे तीन महत्त्वाचे माजी पदाधिकारी तथा माजी नगरसेविका लीला ढुमणे, माजी नगरसेविका प्रतिभा निमकर आणि माजी नगरसेवक देविदास पाझारे यांनी आज अधिकृतपणे काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.

    Read Also : चंद्रपुरात पुन्हा वाघाचा हल्ला, आतापर्यंत ४० जणांचा बळी

    खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. या प्रवेशामुळे आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर भद्रावतीमध्ये काँग्रेस पक्षाची जनशक्ती आणि राजकीय प्रभाव वाढला आहे.जनतेच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणाऱ्या आणि आपापल्या प्रभागात मजबूत पकड असलेल्या या सर्व सहकाऱ्यांचे काँग्रेसमध्ये स्वागत केले. political leaders joining Congress updates

    यावेळी बोलताना खासदार प्रतिभा धानोरकर यांनी ठाम विश्वास व्यक्त केला की, जनतेच्या सेवेत सक्रिय असलेल्या या सर्व सहकाऱ्यांच्या प्रवेशामुळे आगामी नगरपरिषद निवडणुकीत काँग्रेसला मिळणारे यश अधिक भव्य असेल. “ज्या सहकाऱ्यांनी समर्पित भावनेने आपल्या प्रभागाची सेवा केली आहे, त्यांना काँग्रेस पक्षात योग्य सन्मान मिळेल आणि त्यांच्या अनुभवाचा उपयोग शहर विकासासाठी होईल,” असे स्पष्ट मत त्यांनी मांडले.

    काँग्रेस पक्ष तळागाळातील लोकांना सोबत घेऊन भद्रावती शहराच्या विकासाची नवी दिशा निश्चित करेल, असा निर्धार त्यांनी बोलून दाखवला.या महत्त्वाच्या पक्षप्रवेशावेळी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रशांत काळे, शहराध्यक्ष सुरज गावंडे, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुनील नामोजवार, प्रवीण काकडे यांच्यासह मित्रपक्षांचे प्रमुख नेतेही आवर्जून उपस्थित होते. यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे कुशाल मेश्राम, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे मुनाज शेख आणि महिला काँग्रेसच्या सरिता सूर यांचा समावेश होता. मित्रपक्षाच्या नेत्यांनीही या एकीचे स्वागत करत आगामी निवडणुकीत परिवर्तन अटळ असल्याचा विश्वास व्यक्त केला. यावेळी उपस्थित सर्व सहकाऱ्यांचे स्वागत करून त्यांना संघटनेतील पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

  • मुल नगरपरिषद निवडणुकीत विकासाचा बिगुल! मूनगंटीवार यांच्या सभेला उसळली विक्रमी गर्दी

    local election campaign updates : चंद्रपूर, दि. 24 नोव्हेम्बर (News३४):  मुल शहरात ‘न भुतो न भविष्यती’ अशी कामे करण्यात आली. मुल शहराच्या सर्वांगीण आणि सर्वंकष विकासासाठी मतदारांचा मतरुपी आशीर्वाद आवश्यक आहे. मुलच्या विजयामुळे भविष्यातील विकासपर्वाचे दारे उघडेल, असा ठाम विश्वास राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मनगंटीवार यांनी व्यक्त केला. जाहिर सभेसाठी मुलवासीयांनी दाखवलेली उत्स्फूर्त अफाट गर्दी ही विश्वासाचे आणि जनसमर्थनाचे प्रतीक ठरली.

    मुल येथील नगरपरिषद उमेदवारांच्या प्रचारार्थ गांधी चौकातील जाहीर सभेत ते उपस्थितांना संबोधित करताना ते बोलत होते. local election campaign updates

    Read Also : चंद्रपूर मनपाने पकडले ९० किलो प्लास्टिक

    आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, मुल नगरवासीयांच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही केलेल्या आणि पुढे करणार असलेल्या विकासकामांच्या आधारे आम्ही मतांची विनंती करीत आहोत. यासाठी मुल शहराच्या विकासाचा सविस्तर जाहीरनामा तयार करण्यात आला आहे.  कोणत्याही खोट्या आश्वासनांना किंवा भावनिक भूलथापांना बळी न पडता मुलच्या खऱ्या विकासासाठी मतदान करा. आपल्या डोळ्यांसमोर झालेली कामे, बदलत जाणारे मुलचे स्वरूप आणि निर्माण झालेल्या सुविधा हाच आपल्या निर्णयाचा खरा आधार आहे. त्यामुळे आपले अमूल्य मत विचारपूर्वक, जबाबदारीने आणि मुलच्या विकासासाठी द्यावे, असे आवाहन आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी केले.

    speech sudhir mungantiwar
    मार्गदर्शन करताना आमदार मुनगंटीवार

    यावेळी मुल नगरपरिषद निवडणुकीचा शुभारंभ मोठ्या उत्साहात करण्यात आला. मुलच्या सर्वांगीण प्रगतीचा विचार करून तयार केलेल्या ‘प्रगतीचा वचननामा’ चे उद्घाटन आमदार श्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले.गांधी चौकातील जाहीर सभेला मुलवासीयांनी दाखवलेल्या उत्स्फूर्त आणि ऐतिहासिक अफाट गर्दीने विजयाची खात्री आजच मिळाली असून हा केवळ कार्यक्रम नाही तर मुलच्या उज्ज्वल भवितव्याचा ठाम निर्धार असल्याचे आमदार श्री. मुनगंटीवार म्हणाले. local election campaign updates

    आमदार श्री. मुनगंटीवार पुढे म्हणाले, दिन, दुर्बल, वंचित, शोषित, गरीब आणि कष्टकरी यांची सेवा करण्याचा संकल्प घेऊन राजकारणात पाऊल ठेवले. मुल शहराच्या उत्पन्न आणि खर्चामध्ये 5 कोटी 17 लाख 14 हजार 485 रुपये तफावत आहे. या विभागाचा आमदार म्हणून हा निधी राज्य सरकारकडून नगरपरिषदेला उपलब्ध करून दिला जातो. त्यामुळे गेल्या दहा वर्षांत नागरिकांचा मालमत्ता कर वाढवला गेलेला नाही. मी आमदार म्हणून येथील नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर असल्याचेही श्री. मुनगंटीवार म्हणाले.

  • चंद्रपूर मनपाची कारवाई! 90 किलो बेकायदा प्लास्टिक जप्त, व्यापाऱ्यास दंड

    Chandrapur municipal plastic enforcement : चंद्रपूर २४ नोव्हेम्बर (News३४) – बिनबा गेट परिसरातील राकेश तोतवानी यांच्या गोदामात चंद्रपूर महानगरपालिका उपद्रव शोध पथकाने कारवाई करून 90 किलो प्लास्टीक जप्त केले आहे शिवाय प्लास्टीकचा साठा करणाऱ्या या व्यक्तीकडून 5 हजार रुपये दंड वसुल करण्यात आला आहे.

    सोमवार 24 नोव्हेंबर रोजी पठाणपुरा गेट रोडवरून येत असलेल्या एका दुचाकी वाहनावर सिंगल यूज प्लास्टिक पिशव्या वाहून नेण्यात येत असल्याचे मनपा उपद्रव शोध पथकास आढळून आले. त्याचा मागोवा घेतल्यानंतर तपासात समजले की सदर पिशव्या या शंकर आत्राम यांच्या मालकीच्या आहेत. तेव्हा तात्काळ छापा टाकून एकूण 3 पोते (अंदाजे 90 किलो) सिंगल यूज प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आला असून नियमांनुसार 5 हजार रुपये दंड आकारण्यात आला आहे.

    Read Also : चंद्रपूर मनपाची मोहीम बेघरांना दिला निवारा

    चंद्रपूर महानगरपालिका मनपा उपद्रव शोध पथकास मिळालेल्या गुप्त माहीतीच्या आधारे सदर कारवाई करण्यात आली असुन सदर व्यावसायिकास सक्त ताकीद देण्यात आली आहे. पुन्हा सदर गुन्हा केल्यास 10 हजार रुपये दंड ठोठावण्यात येणार असल्याचे मनपा प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.मनपा हद्दीत प्लास्टीक पिशव्यांच्या वापरावर प्रतिबंध घालण्यास सातत्याने कारवाई केली जात असुन प्लास्टीक पिशव्यांच्या साठयाबाबत गुप्त माहीती देणाऱ्यास 5 हजारांचे बक्षिस सुद्धा जाहीर करण्यात आले आहे.यास मोठा प्रतिसाद मिळुन मनपापर्यंत प्लास्टीक साठ्याची गुप्त माहीती पोचविण्यात येत आहे. Chandrapur municipal plastic enforcement

     एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तूंचे उत्पादन, आयात, साठवणूक, वाहतूक, वितरण, विक्री व वापरावर राज्यात 1 जुलै 2022 पासून पूर्णपणे बंदी घालण्यात आली असुन महाराष्ट्र प्लास्टिक आणि थर्माकोल अधिसूचना 2018 नुसार दंड आणि 3 महिन्यांच्या कारावासाची शिक्षा आहे. सदर कारवाई प्रभारी आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्या मार्गदर्शनात सहायक आयुक्त शुभांगी सूर्यवंशी यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात डॉ. अमोल शेळके,भुपेश गोठे,शुभम खोटे,जगदीश शेंद्रे, शुभम चिंचेकर,राहुल गगपल्लीवार, पूनम समुद्रे यांच्याद्वारे करण्यात आली. 

  • बेघरांच्या मदतीसाठी मनपा पुढे सरसावली; 17 बेघरांना सुरक्षित निवार्‍यात आश्रय

    Chandrapur homeless shelter update: चंद्रपूर 24 नोव्हेंबर (News३४) – उघड्यावर राहणाऱ्या बेघर बांधवांची गैरसोय होऊ नये यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानअंतर्गत रात्रीच्या सुमारास 17 महिला पुरुष बेघर बांधवांना मनपाच्या बेघर निवारा गृहात आणण्यात येऊन त्यांची व्यवस्था करण्यात आली.

    Read Also : चंद्रपुरात पुन्हा वाघाचा हल्ला, ४० वा मृत्यू

    अनेकदा परिस्थितीने गांजलेल्या व्यक्तीला कुणाचाही आधार न मिळाल्याने भटकत, उघड्यावर जगावं लागते. उड्डाण पूलाखाली, रस्त्याकडेला, मोकळया जागेवर बेघर आपणास दृष्टीस पडतात. त्यांचे जीवन सुसह्य करण्याच्या दृष्टीने चंद्रपूर महानगरपालिकेने निराधार-बेघरांना मदतीचा हात दिला आहे. मनपाच्या निवारा चमूने शुक्रवारी रविवार 23 नोव्हेंबरच्या रात्री विशेष मोहीम राबवित 17 बेघरांना जवळच्या निवारा केंद्रात आश्रय दिला आहे.

    Read Also : जिजाऊ ब्रिगेडच्या महाअधिवेशनाची सांगता

     चंद्रपूर शहरातील फुटपाथ, रस्त्याच्या शेजारी पूलाखाली व अन्य ठिकाणी वास्तव्य करणाऱ्या बेघरांसाठी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. विद्या गायकवाड यांच्या मार्गदर्शनात चंद्रपूर महानगरपालिकेच्या समाजकल्याण विभागाद्वारे दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत शहरात विविध ठिकाणी बेघर निवारा केंद्र सुरू केलेले आहेत. त्यामुळे उघड्यावर झोपणाऱ्या बेघर व निराधारांना बेघर निवारा केंद्राचा मोठा आधार मिळाला आहे. त्यांना निवारागृहात मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. Chandrapur homeless shelter update

       वाढत्या थंडीच्या पार्श्वभूमीवर मनपाच्या बेघर निवारा चमूद्वारे विशेष शोध मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत शहरातील विविध भागातून रस्त्यावर राहणाऱ्या आणि फुटपाथवर झोपणाऱ्या बेघरांना शोधून त्यांना मनपाच्या बेघर निवारा केंद्रांमध्ये नेण्यात येत आहे. त्यानुसार एकूण 17 व्यक्तींना मनपाच्या वाहन व्यवस्थेच्या मदतीने निवारा केंद्रात नेवून आश्रय दिला. अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील व उपायुक्त संदीप चिद्रवार यांच्या नेतृत्वात  NULM विभाग प्रमुख रफिक शेख,शहर अभियान व्यवस्थापक रोशनी तपासे, चिंतेश्वर मेश्राम, समुदाय संघटक सुषमा करमनकर ,खडसे, मून, लोणारे, पाटील व समाज कल्याण विभागाचे कर्मचारी काम करीत आहे.

  • चंद्रपूरमध्ये पुन्हा वाघाचा हल्ला; मानव वन्यजीव संघर्षातील ४० वा बळी

    Chandrapur tiger human conflict updates : चंद्रपूर २४ नोव्हेम्बर (News३४) – चंद्रपूर वनपरिक्षेत्रात २३ नोव्हेम्बरला वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात ४० वा बळी गेला, दुर्गापुरातील पायली-भटाळी बीटात सरपण गोळा करण्यासाठी जंगलात गेलेल्या चिंचोली निवासी ५४ वर्षीय बाबा नारायण गेडाम याला दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला चढवीत ठार केले. चंद्रपूर जिल्ह्यात सुरु असलेल्या मानव-वन्यजीव संघर्षातील हा ४० वा बळी होता. आतापर्यंत वाघाच्या हल्ल्यात ३६, बिबट २, अस्वल व हत्तीच्या हल्ल्यात प्रत्येकी एक असे एकूण ४० जणांचा मृत्यू झाला आहे.

    Read Also : नगरपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत देहव्यापाराचा धंदा उघकीस

    चिंचोली गावात राहणारे ५४ वर्षीय बाबा गेडाम हे रोजंदारी मजूर म्हणून कामी करीत होते, सध्या थंडीचे दिवस असल्याने रविवारी सकाळी १० वाजता गेडाम हे सरपण गोळा करण्यासाठी गावातील झुडपी भागातील पायली-भटाळी बीटातील वन कक्ष क्रमांक ८०० मध्ये गेले होते. त्याठिकाणी दबा धरून बसलेल्या वाघाने गेडाम यांच्यावर हल्ला करीत त्यांना जंगलाच्या दिशेने फरफटत घेऊन गेला.

    गेडाम हे सायकलने जंगलाच्या दिशेने गेले होते, सायंकाळी गेडाम यांचे कुटुंब कामावरून घरी परतले, मात्र वडील घरी न आल्याने कुटुंबाने शोधाशोध सुरु केली, मात्र त्यांचा काही थांगपत्ता लागला नसल्याने गावातील नागरिकांना सोबत घेत जंगलाच्या दिशेने निघाले असता त्यांना गेडाम यांची सायकल व त्याठिकाणी रक्ताचे डाग आढळून आले. याबाबत दुर्गापूर पोलिसांना व वनविभागाला नागरिकांनी माहिती दिली. Chandrapur tiger human conflict updates

    Read Also : ताडोब्यातील १० चितळांचे स्थानांतर

    काही वेळात वनविभाग व पोलिसांची चमू त्याठिकाणी दाखल झाली, गेडाम यांचा शोध घेण्यासाठी सर्वानी जंगलाच्या दिशेने मोर्चा वळविला असता, गेडाम यांची कुऱ्हाड, चप्पल व रक्ताने माखलेले कपडे आढळून आले, तब्बल रात्री ११ वाजता गेडाम यांच्या मृतदेहाचे तुकडे, हाथ त्यानंतर छिन्नविछिन्न अवस्थेत त्यांचा मृतदेहाचा खाल्लेला भाग आढळून आला.

    गेडाम यांचा मृतदेह मिळाल्यावर नागरिकांचा वनविभागवर रोष उफाळून आला, रात्रीपासून गावात तणावाची स्थिती निर्माण झाली होती, वाघाचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली.