Blog

  • वरोरा नगराध्यक्ष पदासाठी भाजपच्या उच्चशिक्षित उमेदवार मायाताई राजूरकर

    महिला उमेदवार माया राजूरकरच्या प्रचाराला महिला सहभागाची ऊर्जा

    Maya Rajurkar BJP Warora candidate : चंद्रपूर २६ नोव्हेम्बर (News३४) : भारतीय जनता पक्षाने वरोरा शहरासाठी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार म्हणून उच्चशिक्षित डॉ. माया रमेश राजूरकर यांना उमेदवारी दिली आहे. सामाजिक कार्यात अनुभवसंपन्न उमेदवार असलेल्या डॉ. राजूरकर यांचा शिक्षणाचा पाया मजबूत आहे. त्यांच्या सामाजिक कार्याचा आणि शिक्षणाचा वरोराच्या विकासासाठी मोठा हातभार लागणार असल्याचे मतदारांमध्ये बोलल्या जात आहे. दरम्यान, प्रचारातही त्यांनी आघाडी घेतली आहे. घरोघरी जाऊन त्यांनी मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या प्रचारामध्ये महिलांही मोठ्या संख्येने सहभागी होत आहे.

    चंद्रपूर जिल्ह्यात ७१ नगराध्यक्षपदाचे उमेदवार ११ जणांना मिळेल संधी

    माया राजूरकर यांचे समाजसेवेतही महत्त्वपूर्ण योगदान आहे.
    शहर स्वच्छ, सुंदर आणि सुव्यवस्थित करण्यासाठी शहराच्या विकासासाठी माया राजूरकर यांचा अनुभव अनमोल ठरेल, असे मत वरोरा येथील मतदार व्यक्त करीत आहेत. भाजपच्या नेतृत्वाखाली वरोराचा विकास आणि सामाजिक कामांना गती देऊ असे मत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉ. माया रमेश राजूरकर यांनी व्यक्त केले.

    वरोरा नगर परिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदाकरिता एकूण ५ महिला उमेदवार रिंगणात आहे. भाजप पक्षाकडून माया राजूरकर, कांग्रेस कडून अर्चना ठाकरे, शिवसेना ठाकरे गटाकडून सोनम नाशिककर, नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी कडून रंजना पारशिवे व शिवसेना शिंदे गटाकडून ज्योती मत्ते यांचा समावेश आहे.

    वरोरा नगरपरिषद निवडणुकीत कांग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर, भाजप आमदार करण देवतळे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. वरोरा विधानसभा निवडणुकीत कांग्रेस चौथ्या क्रमांकावर फेकल्या गेली होती. मात्र सध्या राजकीय परिस्थिती बदलल्याने दोन्ही प्रबळ उमेदवारांमध्ये चुरस निर्माण झाली आहे. २ डिसेम्बर रोजी मतदान तर ३ डिसेम्बर ला नगरपरिषद निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.

  • चंद्रपूर पोलिसांची ‘ऑपरेशन शोध’ मोहीम यशस्वी; 14 वर्षीय मुलगी व 13 वर्षीय मुलाचा शोध

    Operation Shodh Chandrapur police action : चंद्रपूर २६ नोव्हेम्बर (News३४) – चंद्रपूर जिल्ह्यात अल्पवयीन बालकांसंदर्भात अनुचित प्रकार घडू नये याकरिता चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाने ऑपरेशन शोध मोहीम राबवली, या मोहिमेत दोन अल्पवयीन बालकांचा शोध लावत त्यांच्या कुटुंबाकडे स्वाधीन करण्यात आले.

    ५ वर्षांपासून तो पोलिसांना चकवीत होता, स्थानिक गुन्हे शाखेच्या हाती सापडला अन…

    पहिल्या कारवाईत चंद्रपुरातील १४ वर्षीय मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार रामनगर पोलिसांकडे प्राप्त झाली होती. अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणाचा गुन्हा रामनगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल दाखल झाल्यावर पोलिसांनी गांभीर्याने तपासाला सुरुवात केली. सदर मुलीला एका मुलाने पळवून नेल्याची बाब उघडकीस आल्यावर पोलिसांनी पळवून नेणाऱ्या आरोपी मुलासह अल्पवयीन मुलीला परभणी जिल्ह्यातून शोध घेत मुलीला आईच्या ताब्यात देण्यात आले.

    chandrapur police missing child rescue
    13 वर्षीय मुलाचा यशस्वी शोध

    दुसऱ्या प्रकरणात चंद्रपुरातील १३ वर्षीय बालक बेपत्ता झाला होता, रामनगर पोलिसात आई ने तक्रार दिल्यावर पोलिसांनी दिवसरात्र मेहनत घेत त्या बालकाचा अवघ्या ८ दिवसात शोध लावत त्याला नैनिताल राज्य उत्तराखंड मधून आणले व त्याला आईच्या ताब्यात देण्यात आले. Operation Shodh Chandrapur police action

    या दोन्ही कारवाईत पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक आसिफरजा शेख यांच्या नेतृत्वात सपोनि शिवाजी नागवे, पोउपनि कवडू गेडाम, कैलास खोब्रागडे, पोलीस कर्मचारी अहमद शेख, देविदास राठोड, तिरुपती जाधव, हेमंत बावणे, महेश खोके, ज्योती गायकवाड यासह सायबर पोलीस स्टेशन यांचा सहभाग होता.

  • 1098 आणि 181 हेल्पलाईनची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत; ‘गुड टच-बॅड टच’ व्हिडिओद्वारे जागरूकता

    Sakhi One Stop Center 181 awareness program : चंद्रपूर, दि. 26 (News३४) : जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मिनाक्षी भस्मे, यांच्या मार्गदर्शनाखाली ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ व बालविवाह प्रतिबंध अभियान अंतर्गत चांदा पब्लिक स्कूल येथे चाईल्ड हेल्पलाईन 1098 व सखी वन स्टॉप सेंटर 181 बाबत जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

    कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून चांदा पब्लिक स्कूलच्या प्राचार्य आम्रपाली पडोळे, तर प्रमुख अतिथी म्हणून परिविक्षा अधिकारी दिवाकर महाकाळकर व चांदा पब्लिक स्कूलचे सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी विद्यार्थिनी ही उपस्थित होते.

    चंद्रपूर जिल्ह्यात आमदाराची दादागिरी

    याप्रसंगी अभिषेक मोहुर्ले यांनी युट्युबवर असलेली गुड टच व बॅड टच स्टोरी विद्यार्थ्यांना दाखविली. यावेळी ते म्हणाले, आजचे बालक सुरक्षित असले पाहिजे. बालकांना कुठेही शारिरीक, मानसिक सामाजिक समस्या येत असेल अशावेळी चाईल्ड हेल्पलाईन 1098 ही यंत्रणा बालकांचे संरक्षण करण्याचे कार्य करित असते. बालकांनी फ्रेंड्स बनविले पाहिजेत, आपल्या भावना शेअर केल्या पाहिजेत, परंतु बार्डर लाईन कधीही क्रॉस करू नये. आपल्या ध्येयापासून विचलित होऊ नये. सोशल मिडियाचा वापर जपून करावा, अथवा करू नये. Sakhi One Stop Center 181 awareness program

    मार्गदर्शन करतांना सखी वन स्टॉप सेंटरच्या राणी खडसे यांनी बालकांशी हितगुज करित सखी वन स्टॉप सेंटर व महिला हेल्पलाईन 181 कार्याबाबत बालकांना माहिती दिली.  सदर कार्यक्रमाचे आयोजन चांदा पब्लिक स्कूल चंद्रपूरद्वारे करण्यात आले, यावेळी कार्यक्रम आयोजनाचे प्रभारी म्हणून फहिम शेख आणि रूहिना तबस्सूम यांनी जबाबदारी पार पाडली. कार्यक्रमाचे संचालन श्रावणी चिकटे व अंतरा पारखी या विद्यार्थ्यांनी केले तर आभार तनिष्का बुरण या विद्यार्थीनीने मानले.

  • नगर परिषद निवडणूक: घुग्गुस व भद्रावतीतील मतदान केंद्रांची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

    District Collector Vinay Gowda election inspection : चंद्रपूर, दि. 26 (News३४) : नगर परिषद / नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी आज (दि. 26) घुग्गुस आणि भद्रावती येथील मतदान केंद्राची पाहणी करून सुचना दिल्या.

    🗳️ घुगुस नगर परिषद निवडणुकीचा आढावा

    जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी घुगुस नगर परिषद येथील ईव्हीएम मशीनचा सुरक्षा कक्ष तपासला. यानंतर, त्यांनी जनता विद्यालय, घुगुस येथील आठ मतदान केंद्रांची पाहणी केली.

    चंद्रपूर जिल्हा निवडणूक ७१ नगराध्यक्ष उमेदवारांपैकी ११ ना मिळेल संधी

    यावेळी त्यांनी काही महत्त्वाच्या सूचना दिल्या. त्यांनी म्हटले की, मतदान केंद्रावर स्वयंसेवकांची नेमणूक करा आणि आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध ठेवा. शिवाय, मतदान पथकांना जास्तीत जास्त व अचूक प्रशिक्षण द्या, अशा सूचना त्यांनी केल्या.

    election preparations

    या तपासणीदरम्यान चंद्रपूर चे उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम, घुग्गुस न.प.चे निवडणूक निर्णय अधिकारी (चंद्रपूरचे तहसीलदार विजय पवार), सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी (मुख्याधिकारी निलेश रांजणकर), व अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी (नायब तहसीलदार ओंकार ठाकरे) आदी उपस्थित होते.

    🏢 भद्रावती येथे जिल्हाधिकाऱ्यांची भेट

    त्याचप्रमाणे, जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी भद्रावती नगर परिषद निवडणूक तयारीचा आढावा घेतला. त्यांनी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI), भद्रावती येथील स्ट्राँग रुमला भेट दिली. तसेच, त्यांनी मतमोजणी कक्षाची देखील पाहणी केली.

    यावेळी त्यांनी आवश्यक सूचना केल्या. आगामी काळात, निवडणुकीची पुढील प्रक्रिया, साहित्य वाटप आणि मतमोजणी प्रक्रिया ही याच शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत होणार आहेत.

    पुढे जाऊन, जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी प्रभाग ११ मधील मतदान केंद्र (जिल्हा परिषद हायस्कूल, भद्रावती) तसेच यशवंतराव शिंदे (प्रभाग ७) येथील मतदान केंद्रांना भेट दिली.

    या प्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी अतूल जटाले, भद्रावतीचे तहसीलदार बालाजी कदम, न.प. मुख्याधिकारी विशाखा शेळकी, पोलिस निरीक्षक योगेश पारधी, नायब तहसीलदार (श्री. काळे), समीर वाटेकर, राकेश महकुलकर, राजू काळे इत्यादी उपस्थित होते.

    माहितीनुसार, भद्रावती नगर परिषद क्षेत्रात एकूण ५२,५७२ मतदार आहेत. यामध्ये स्त्री मतदार २६,५५७ तर पुरुष मतदार २६,०१५ आहेत. एकूण, मतदार केंद्राची संख्या ६३ आहे.

  • चंद्रपूरमध्ये स्थानिक विरुद्ध राष्ट्रीय पक्ष! कोण होणार नगराध्यक्ष?

    Chandrapur political battle for municipal councils : चंद्रपूर २६ नोव्हेम्बर (News३४) – चंद्रपूर जिल्ह्यातील १० नगरपरिषद व १ नगरपंचायती करीत सुरु असलेल्या निवडणूक रिंगणात नगराध्यक्ष पदाकरिता चांगलीच चुरस निर्माण झाली असून राष्ट्रीय पक्षाला काही ठिकाणी नवखा उमेदवार आव्हान निर्माण करीत असल्याचे चित्र आहे. नगरपंचायत व नगरपरिषद निवडणुकीत चंद्रपूर जिल्ह्यात एकूण ७१ उमेदवार नगराध्यक्षपदासाठी उभे आहेत. विशेष बाब म्हणजे ज्या महिला नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीत उभ्या आहे त्यामध्ये काही उमेदवार यांचं राजकीय इतिहास आहे तर काहींचं वय झाल्यावर त्यांना सेवेची गरज असताना सुद्धा त्यांना नागरिकांची सेवा करायची आहे.

    हे हि वाचा : आमदाराला हवी भागीदारी नाहीतर दाखवणार दादागिरी

    बल्लारपूर नगरपरिषदेत नगराध्यक्ष पदाचे ८ उमेदवार व पक्ष

    • अय्यर मंजुषा श्रीराम (आम आदमी पार्टी)
    • रहिकवार पूजा अमर (बहुजन समाज पार्टी)
    • वाढई अलका अनिल (भारतीय राष्ट्रीय कांग्रेस)
    • दुधे रेणुका सुधाकर (भारतीय जनता पार्टी)
    • वाळके ज्योत्सना दीपक (वंचित बहुजन आघाडी)
    • तामगाडगे वंदना पंचशील (रिपब्लिकन ऑफ इंडिया)
    • मुलचंदानी चैताली दीपक (शिवसेना ठाकरे गट)
    • रोजिदा ताजुद्दीन शेख (नॅशलिस्ट कांग्रेस पार्टी)

    भद्रावती नगरपरिषद नगराध्यक्ष पद निवडणुकीत ६ उमेदवार रिंगणात

    • अनिल नारायण धानोरकर (भारतीय जनता पार्टी)
    • उमेश नानाजी काकडे (बहुजन समाज पार्टी)
    • सुनील विनायक नामोजवार (भारतीय राष्ट्रीय कांग्रेस)
    • विशाल नीलकंठ शिंदे (आम आदमी पार्टी)
    • नरेंद्र महादेव पढाल (शिवसेना ठाकरे)
    • प्रफुल रामदास चटकी (शिवसेना शिंदे)

    वरोरा नगरपरिषद निवडणुकीत ५ नगराध्यक्षपदाचे उमेदवार

    • राजूरकर माया रमेश (भारतीय जनता पार्टी)
    • ठाकरे अर्चना आशिष (भारतीय राष्ट्रीय कांग्रेस)
    • नाशिककर सोनम पंकज (शिवसेना ठाकरे)
    • पारशिवे रंजना मनोहर (नॅशनलिस्ट कांग्रेस पार्टी)
    • मत्ते ज्योती नितीन (शिवसेना शिंदे)

    ब्रह्मपुरी नगरपरिषद ४ उमेदवार

    • निहाल अंबर ढोरे (बहुजन समाज पार्टी)
    • सुयोगकुमार वामनराव बाळबुधे (भारतीय जनता पार्टी)
    • मिलिंद नानाजी भनारे (शिवसेना ठाकरे)
    • मिसार योगेश बालाजी (भारतीय राष्ट्रीय कांग्रेस)

    मूल नगरपरिषद ५ उमेदवार

    • गीतांजली शोन तांगडे (अपक्ष)
    • चैताली मल्हारी मद्रीवार (बहुजन समाज पार्टी)
    • किरण किशोर कापगते (भारतीय जनता पार्टी)
    • एकता प्रशांत समर्थ (भारतीय राष्ट्रीय कांग्रेस)
    • भारती सुनील राखुंडे (शिवसेना)

    राजुरा ५ उमेदवार

    • अडाणीया राधेश्याम लक्ष्मीनारायण (भारतीय जनता पार्टी)
    • डोहे राजेंद्र विठ्ठल (शिवसेना)
    • धोटे अरुण रामचंद्रराव (भारतीय राष्ट्रीय कांग्रेस)
    • भाके आदित्य विजय (नॅशनलिस्ट कांग्रेस पार्टी)
    • मस्के गजानन गोविंदराव (वंचित बहुजन आघाडी)

    घुग्गुस नगरपरिषद ६ उमेदवार

    • पाटील आरती स्नेहदीप (बहुजन समाज पार्टी)
    • सोनटक्के दीप्ती सुजित (भारतीय राष्ट्रीय कांग्रेस)
    • देशकर रिता फकरु (अपक्ष)
    • ढोके नैना धिरज (शिवसेना ठाकरे)
    • आगदारी रंजिता पवनकुमार (अपक्ष)
    • दुर्गम शारदा मोहन (भारतीय जनता पार्टी)

    गडचांदूर नगरपरिषद ८ उमेदवार

    • उमरे राहुल नारायण (अपक्ष)
    • छाजेड धनंजय सोहनलाल (शिवसेना)
    • जोगी शरद सुरेश (नॅशनलिस्ट कांग्रेस पार्टी)
    • डोहे अरविंद तुकाराम (भारतीय जनता पार्टी)
    • ताजने निलेश शंकरराव (अपक्ष)
    • निमजे अरुण केशवराव (राष्ट्रवादी शरद पवार)
    • भोयर सचिन पांडुरंग (भारतीय राष्ट्रीय कांग्रेस)
    • वाघमारे अरविंद ज्ञानोबा (प्रहार०

    नागभीड नगरपरिषद १० उमेदवार

    • कटोरे रोमी बाळकृष्ण (अपक्ष)
    • केशव सीताराम रामटेके (अपक्ष)
    • खापर्डे स्मिता प्रफुल (भारतीय राष्ट्रीय कांग्रेस)
    • खोब्रागडे आत्माराम अंतराम (राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी)
    • दुधे लोमेश वामनराव (भारतीय जनता पार्टी)
    • मनोज चरणदास नागदेवते (बहुजन समाज पार्टी)
    • वृषभ सिद्धार्थ खापर्डे (अपक्ष)
    • शेंडे अनमोल तुळशीराम (अपक्ष)
    • श्रीकांत सुधाकर खापर्डे (शिवसेना)
    • सुनील देविदास मेश्राम (अपक्ष)

    चिमूर नगरपरिषद ८ उमेदवार

    • अंबादे सुरक्षा हरिदास (वंचित बहुजन आघाडी)
    • कटारे वैशाली राजू (अपक्ष)
    • गजभिये विशाखा हरिचंद्र (अपक्ष)
    • गेडाम बबिता रमेश (अपक्ष)
    • नंदेश्वर सारिका मनीष (भारतीय राष्ट्रीय कांग्रेस)
    • रंगारी वनिता जगन (नॅशनलिस्ट कांग्रेस पार्टी)
    • लिंगायत गीता बाबा (भारतीय जनता पार्टी)
    • शेंडे आयेशा छगनलाल (शिवसेना)

    भिसी नगरपंचायत ६ उमेदवार

    • कटारे विक्की अशोक (अपक्ष)
    • गायकवाड पंकज नरहरी (अपक्ष)
    • चहांदे सिद्धार्थ पंचम (वंचित बहुजन आघाडी)
    • पाटील आकाश विनोद (भारतीय राष्ट्रीय कांग्रेस)
    • पारवे अतुल वासुदेव (भारतीय जनता पार्टी)
    • मुन विक्की मनोहर (अपक्ष)

    नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीत महायुती व महाविकास आघाडी वेगवेगळी लढत आहे, मात्र निवडणुकीनंतर सर्व नगरसेवक आपला आघाडी धर्म पाळतील. Chandrapur political battle for municipal councils

  • विकास थांबला, तस्करी वाढली? आमदाराच्या मतदारसंघात ‘रेती व कोळसा राजा’ सक्रिय

    politician and sand mafia partnership

    politician and sand mafia partnership : चंद्रपूर: नैसर्गिक संपत्तीमुळे चंद्रपूर जिल्ह्याकडे राज्याचे लक्ष आहे. परंतु, जिल्ह्यातील एका आमदाराच्या कार्यशैलीवर गंभीर चर्चा सुरू आहेत.

    या आमदाराने विकास, बेरोजगारी, प्रदूषण आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्याची आश्वासने दिली होती. याउलट, आता त्यांच्यावर ‘स्वार्थी राजकारण’, ‘दबावतंत्र’ आणि ‘माफियांशी आर्थिक संबंध’ अशा आरोपांची कुजबुज राजकीय वर्तुळात सुरू आहे.

    • रेती तस्करीला राजकीय छत्र?
      • जिल्ह्यात रेती तस्करीला या आमदाराचे राजकीय पाठबळ मिळत असल्याची जोरदार चर्चा आहे.
      • शिवाय, या भागीदारीमुळे प्रशासनही संभ्रमात असल्याची सूत्रांची माहिती आहे.
      • स्थानिक कार्यकर्त्यांनी आमदारांवर कोळसा तस्करीतही ‘हात काळा’ असल्याचा आरोप केला आहे. परिणामी, राजकीय वातावरण तापले आहे.

    या आमदारांचे काही कोल माफिया, रेत माफिया आणि बडे उद्योगपतींशी ‘विशेष संबंध’ असल्याच्या चर्चांना राजकीय पातळीवर वेग आला आहे.

    हे वाचा – ५ वर्षांपासून पोलिसांच्या तावडीतून पसार चोर गुन्हे शाखेच्या हातात लागला, आणि झाला धक्कादायक खुलासा

    विरोधकांचे गंभीर आरोप: विकासकामे, कंत्राटे, वाढीव दर, टक्केवारी आणि प्रत्येक योजनेत ‘हिशेब’ मागितला जात असल्याचे विरोधक म्हणत आहेत.

    नागरिकांमध्ये नाराजी: जनप्रतिनिधींनी नैसर्गिक संपत्तीचे रक्षण करायचे असते. मात्र, आमदारांच्या कथित भोंगळ कारभारामुळे याच संपत्तीची लूट होत आहे. या ‘दादागिरी’ करणाऱ्या आमदार महोदयांवर नागरिकांची नाराजी वाढू लागली आहे.

    ‘पारस’ची रेती तस्करीत दादागिरी वाढली!

    चंद्रपूर जिल्ह्यातील रेती तस्करीचे प्रकरण आता नव्या वळणावर आले आहे.

    • आमदारांचे पाठबळ, कार्यकर्त्याचा दबदबा: आमदार महोदयांच्या मूळ गावातील काही जुन्या कार्यकर्त्यांना रेती तस्करीसाठी राजकीय पाठबळ मिळत आहे.
    • त्यामुळेच संबंधित कार्यकर्त्याचा आत्मविश्वास वाढला आहे. गावात आता त्याची दादागिरी उघडपणे ऐकू येत आहे, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

    वर्धा नदीवर ताबा: या कार्यकर्त्याच्या गावातून वर्धा नदी वाहते. आणि तर, त्याने नदीवरील रेती उपसा आणि वाहतुकीवर पूर्ण ताबा मिळवल्याची कुजबुज गावभर सुरू आहे.

    स्थानिक नागरिकांचा आरोप: नदीला ‘पारस’ मानून तिची बेकायदेशीर लूट सुरू आहे. म्हणूनच या सर्व कारभारामागे “दादाचा राजकीय आशीर्वाद” असल्याची चर्चा वारंवार होत आहे.

    प्रशासनालाही आव्हान:

    • “दादाच्या भरोशावरच हा पारस दादागिरी करत आहे; प्रशासनालाही आव्हान देण्याइतका त्याचा आत्मविश्वास वाढला आहे,” असे गावात बोलले जात आहे.
  • Chandrapur local news fatal accident : गतिरोधकामुळे चंद्रपुरात अपघात, महिलेचा मृत्यू

    Chandrapur local news fatal accident

    Chandrapur local news fatal accident : मूल: चंद्रपूर जिल्ह्यातील मूल शहरात मंगळवारी (दि. २५) सकाळी एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. रेल्वे गेटजवळील गतिरोधक लक्षात न आल्याने स्कूटी उसळली आणि मागे बसलेल्या महिलेला आपला जीव गमवावा लागला.

    वाचा – चंद्रपूर-नागपूर महामार्गावरील खड्डे दुरुस्तीचे काम सुरु

    🛣️ अपघाताचा तपशील

    • मृत महिला: लता वांगलवार, रा. जटपुरा गेट हॉस्पिटल वॉर्ड, चंद्रपूर.
    • सोबत असलेले: त्यांचे पती प्रभाकर वांगलवार.
    • प्रवासाची दिशा: हे दाम्पत्य एमएच सीजी १२८० क्रमांकाच्या स्कूटीने सिंदेवाहीकडे जात होते.
    • अपघाताचे ठिकाण: मूल शहरातील रेल्वे गेटजवळ.
    • नेमकं काय घडलं?: चालकाला रस्त्यावरील गतिरोधक दिसला नाही. स्कूटी त्यावर वेगात आदळल्याने लता वांगलवार या उसळून थेट दहा फूट फरफटत गेल्या.
    • दुखापत: त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

    💔 उपचारादरम्यान मृत्यू

    अपघातानंतर त्यांना तातडीने मूल उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी उपचाराचे शर्थीचे प्रयत्न केले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे वांगलवार कुटुंबियांवर आणि चंद्रपूर परिसरात शोककळा पसरली आहे.

  • tadoba chital relocation project । Tadoba–Navegaon–Nagzira चितळ स्थानांतरण यशस्वी; 63 चितळ सुरक्षितपणे हलवले

    tadoba chital relocation project

    tadoba chital relocation project : चंद्रपूर २५ नोव्हेम्बर (News३४) – ताडोबा–अंधारी व्याघ्र प्रकल्प (टीएटीआर) येथून नवेंगाव–नागझिरा व्याघ्र प्रकल्प (एनएनटीआर) येथे चितळ स्थानांतराची दुसरी फेरी आज यशस्वीरीत्या पूर्ण झाली. कोणतीही जिवितहानी न होता एकूण 63 चितळ सुरक्षितपणे जामनी गवताळ परिसरातून एनएनटीआरमधील सॉफ्ट-रिलीज एनक्लोजरमध्ये हलविण्यात आले.

    हे सुद्धा वाचा – ५ वर्षे पोलिसांना चकवणारा चोर चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात

    या प्रक्रियेत सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एकही मृत्यू न होणे. चितळ हा अतिशय संवेदनशील प्राणी असून पकडण्याच्या प्रक्रियेदरम्यान किंवा मानवी जवळीक, हाताळणी, वाहतूक यावेळी तीव्र ताणामुळे त्यांना मानसिक धक्का बसू शकतो. या ताणामुळे हृदयाचे विकार निर्माण होऊन अचानक मृत्यू होण्याची शक्यता असते, ज्याला ‘कॅप्चर मायोपथी’ असे म्हटले जाते. मात्र आजच्या स्थानांतरणात एकाही प्राण्याचा मृत्यू झालेला नाही, ही अत्यंत समाधानकारक बाब आहे.

    जामनी गवताळ परिसरात तयार करण्यात आलेल्या बोमा पद्धतीचा वापर करून चितळांना सुरक्षितरीत्या पकडण्यात आले. या परिसरातील योग्य अधिवास आणि चितळांची उपलब्धता या प्रक्रियेस पूरक ठरल्या. बोमामधून प्राण्यांना विशेष तयार केलेल्या ट्रान्सलोकेशन वाहनांतून हलविण्यात आले. या वाहनांची रचना प्राण्यांचा ताण कमी करण्याच्या आणि प्रवास सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने करण्यात आलेली आहे.

    ही मोहीम पुढील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडली: श्री सचिन शिंदे, विभागीय वनअधिकारी, टीएटीआर; श्री अतुल देवकर, विभागीय वनअधिकारी, एनएनटीआर; श्री बापू येळे, विभागीय वनअधिकारी, सामाजिक वनीकरण, चंद्रपूर; श्री विवेक नातू, सहाय्यक वनसंरक्षक, टीएटीआर; श्री विशाल वैद्य, वनपरिक्षेत्र अधिकारी, कोलारा, टीएटीआर; तसेच कोलारा वनपरिक्षेत्रातील कर्मचारी.

    ताडोबा आणि नवेगाव–नागझिरा या दोन्ही व्याघ्र प्रकल्पांदरम्यानच्या उत्कृष्ट समन्वयामुळे ही स्थानांतर प्रक्रिया सुरळीत, सुरक्षित आणि यशस्वीरीत्या पूर्ण झाली. या संपूर्ण मोहिमेला डॉ. प्रभू नाथ शुक्ला, क्षेत्र संचालक, टीएटीआर आणि श्री आनंद रेड्डी, उपसंचालक (कोअर), टीएटीआर यांचे मार्गदर्शन लाभले.

  • Chandrapur habitual thief arrested । पोलिसांना पाच वर्षे चकवणारा चोर चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेला सापडला

    Chandrapur habitual thief arrested

    Chandrapur habitual thief arrested : चंद्रपूर, २५ नोव्हेंबर (News34) – तो तब्बल पाच वर्षांपासून चोरी आणि घरफोडीच्या गुन्ह्यांतून पोलिसांना हवा होता. मात्र तो सतत हातातून निसटत होता. दरम्यान, या काळात त्याने मंदिर, चर्च आणि दीक्षाभूमीतील बौद्ध विहारातील दानपेट्या फोडल्या. परंतु मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला हा अट्टल चोर अखेर गवसला.

    स्थानिक गुन्हे शाखेने शहरातील वाढत्या मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी मोहीम सुरू केली. यादरम्यान, पोलिसांनी महाकाली कॉलरी, चंद्रपूर येथील रहिवासी ३५ वर्षीय प्रतीक उर्फ राहुल वनराज झाडे (हल्ली मुक्काम – छोटा नागपूर) याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने नागपूर आणि रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत विविध चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली.

    हे ही वाचा : चंद्रपुरातील शिक्षकाचं नराधमी कृत्य

    तपासात पुढे आले की, आरोपीवर अनेक गुन्हे दाखल असून तो पाच वर्षांपासून फरार होता. या दरम्यान, त्याने दादमहलमधील हनुमान मंदिर, जयंत टॉकीजजवळील चर्च, दीक्षाभूमीतील बौद्ध विहार आणि लक्ष्मीनारायण मंदिर येथील नगदी चोरी केली.

    यासोबतच, नागपूर जिल्ह्यातील इमामवाडा आणि चंद्रपूर रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून चार मोटारसायकली—होंडा ऍक्टिव्हा (MH34 AS 8353), होंडा शाईन (MH27 CK 7050), MH31 AS EX 2471, MH49 B 0358—आणि तीन मोबाईल असा एकूण ५ लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

    ही कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पोउपनि विनोद भुरले, सुनील गौरकार, सुभाष गोहोकर, सतीश अवथरे, रजनीकांत पुठ्ठावार, दीपक डोंगरे, इम्रान खान, हिरालाल गुप्ता, किशोर वाकाटे आणि शशांक बदामवार यांनी ही यशस्वी कारवाई केली.

  • Ghughus Congress leaders join BJP । आमदार जोरगेवार यांचा राजकीय धक्का, कांग्रेस सेनेचे पदाधिकारी भाजपात

    Ghughus Congress leaders join BJP

    Ghughus Congress leaders join BJP : चंद्रपूर २५ नोव्हेम्बर (News३४) – घुग्घुसच्या कॉंग्रेसच्या माजी शहराध्यक्ष विजया बंडेवार तसेच उबाठाचे उपतालुका प्रमुख गणेश शेंडे यांनी आज मंगळवारी कार्यकर्त्यांसह आमदार किशोर जोरगेवार यांच्या उपस्थितीत घुग्घुस येथे भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे भाजपाला स्थानिक पातळीवर अधिक बळकटी मिळणार आहे. आमदार किशोर जोरगेवार यांनी या दोन्ही नवनियुक्त सदस्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी यांची उपस्थिती होती.

    Read Also : आदर्श शिक्षकाचा प्रताप, अल्पवयीन मुलीसोबत नराधमी कृत्य

    देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या सक्षम नेतृत्व आणि राज्याचे नेतृत्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकुशल, पारदर्शक व जनहितैषी कामकाजावर विश्वास ठेवून कॉंग्रेसच्या माजी शहराध्यक्ष विजया बंडेवार, कॉंग्रेस नेते अशोक बंडेवार आणि गणेश शेंडे यांनी भाजपाचा विचार स्वीकारला आहे. Ghughus Congress leaders join BJP

    यावेळी नवनियुक्त सदस्यांचे पक्षात स्वागत करताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, भारतीय जनता पक्ष हा राष्ट्रहित, विकास आणि सर्वसमावेशक प्रगतीचा मार्ग स्वीकारणारा पक्ष आहे. आज विजया बंडेवार आणि गणेश शेंडे यांनी आमच्या पक्षावर ठेवलेला विश्वास हा आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. त्यांच्या अनुभवामुळे आणि नेतृत्वामुळे संघटना अधिक बळकट होईल आणि घुग्घूसमध्ये विकासाची नवी ऊर्जा निर्माण होईल, असा विश्वास आहे. पक्षात येणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचे योगदान मौल्यवान असून त्यांच्या सन्मानाचे रक्षण करणे ही आमची जबाबदारी आहे. विकासाच्या प्रवासात आम्ही एकजुटीने काम करत राहू आणि जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध राहू, असे यावेळी ते म्हणाले.