Blog

  • Warora city Congress leaders resign । वरोरा काँग्रेस संकटात! प्रचाराच्या तोंडावर महिला अध्यक्षांचा राजीनामा

    Warora city Congress leaders resign : वरोरा/चंद्रपूर २९ नोव्हेम्बर (News३४): चंद्रपूर जिल्ह्यात होणाऱ्या नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी आपली पूर्ण शक्ती पणाला लावली आहे. प्रचाराचा अंतिम टप्पा सुरू असतानाच, वरोरा शहरात काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे.

    काँग्रेसच्या महिला आघाडी शहर अध्यक्ष दीपाली माटे यांनी दिनांक २८ नोव्हेंबर रोजी आपल्या पदासह काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. निवडणुकीच्या ऐन तोंडावर शहर महिला अध्यक्षांनी राजीनामा दिल्याने वरोरा काँग्रेसमध्ये मोठी खळबळ माजली आहे.

    बातमी जंगलाची : चंद्रपूर जिल्ह्यात मानव वन्यजीव संघर्ष शिगेला, वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार

    नाराजीमुळे पक्षाला गळती

    नगर परिषद निवडणुकीच्या सुरुवातीपासूनच वरोरा काँग्रेसमध्ये नाराजीचे वातावरण दिसून येत आहे. दीपाली माटे यांच्या राजीनाम्यापूर्वी देखील अनेक महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाची साथ सोडली आहे. Warora city Congress leaders resign

    • जिल्हा महासचिव शिरोमणी स्वामी आणि तहसील महासचिव मनोहर स्वामी यांनी यापूर्वीच आपल्या पदांचे राजीनामे दिले होते.
    • त्याचप्रमाणे, तीन वेळा नगर परिषद स्वीकृत सदस्य राहिलेले राजू महाजन आणि दोन वेळा नगरसेविका राहिलेल्या त्यांच्या पत्नीनेही काँग्रेस सोडली आहे.

    आता शहर महिला अध्यक्षा दीपाली माटे यांनीही राजीनामा दिल्यानंतर, काँग्रेसने त्यांच्यासोबत लावलेल्या उमेदवारांचे फलक आणि बॅनर तातडीने उतरवण्यास सुरुवात केली आहे. ऐन निवडणुकीच्या धामधुमीत महत्त्वाच्या नेत्यांचे आणि पदाधिकाऱ्यांचे राजीनामे झाल्याने, वरोरा नगर परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या अडचणी वाढण्याची चिन्हे आहेत.

  • Chandrapur breaking news today tiger attack । चंद्रपूर हादरले! गुराख्यावर वाघाचा हल्ला; गुराखी ठार

    Chandrapur breaking news today tiger attack : चंद्रपूर: २९ नोव्हेम्बर (News३४) – चंद्रपूर जिल्ह्यात मानव वन्यजीव संघर्ष शिगेला पोहोचला असून आज २९ नोव्हेम्बरला चंद्रपूर वनविभागाच्या हद्दीत जनावरे चारण्यासाठी गेलेल्या गुराख्यावर वाघाने हल्ला करीत ठार केले. चालू वर्षातील वन्यप्राण्यांच्या हल्ल्यातील हि ४१ वी घटना असून यामध्ये आतापर्यंत वाघाच्या हल्ल्यात ३७, बिबटच्या हल्ल्यात २, हत्ती व अस्वलाच्या हल्ल्यात प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. २९ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास हि घटना उघडकीस आली असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

    प्रशासनाचा आदेश : जिल्ह्यातील कामगारांना भरपगारी सुट्टी

    सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास चंद्रपूर वनपरिक्षेत्रातील चिचपल्ली रेंज कंपार्टमेंट क्रमांक ६९६ मध्ये मंदा तुकूम गावातील रहिवासी ५५ वर्षीय रमेश नागो बोमनवार हे नेहमीप्रमाणे गुरे चारण्यासाठी गेले होते. मात्र त्याठिकाणी दबा धरून बसलेल्या वाघाने बोमनवार यांच्यावर हल्ला करीत ठार केले. घटनेची माहिती वनविभागाला मिळाल्यावर त्यांनी तात्काळ घटनस्थळ गाठत पंचनामा केला. नियमानुसार मृत गुराख्याच्या कुटुंबाला वनविभागातर्फे आर्थिक मदत देण्याची कारवाई सुरु करण्यात आली आहे. Chandrapur breaking news today tiger attack

    विभागीय वनाधिकारी राजन तलमले यांनी परिसरातील नागरिकांना आवाहन केले आहे की, वन्यप्राण्यांच्या हालचाली लक्षात घेऊन अशा संवेदनशील वनक्षेत्रात एकटे फिरणे टाळावे आणि सतर्कता बाळगावी. वन्यप्राण्यांबद्दल कोणतीही माहिती असल्यास त्वरित वन विभागाला कळवावी.

  • foreign liquor illegal stock raid Chandrapur । निवडणूक काळात मोठी कारवाई! ब्रह्मपुरी येथे अवैध दारूसाठा जप्त

    foreign liquor illegal stock raid Chandrapur : चंद्रपूर २९ नोव्हेम्बर (News३४) : नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लागू असलेल्या दारूबंदीच्या कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाने ब्रह्मपुरी तालुक्यात मोठी कारवाई केली आहे. दिनांक १ ते ३ डिसेंबर २०२५ या कालावधीसाठी दारूबंदी लागू असताना, मौजा उदापूर येथे ५ लाख १६ हजार रुपयांचा अवैध देशी-विदेशी दारूसाठा जप्त करण्यात आला आहे.

    आदेश : चंद्रपूर जिल्ह्यातील कामगारांना मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी

    विभागीय उपायुक्त गणेश पाटील (नागपूर विभाग) आणि अधीक्षक नितीन धार्मिक (चंद्रपूर) यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. गुप्त माहितीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार, मौजा उदापूर, तालुका ब्रह्मपुरी येथील ज्ञानेश्वर रामकृष्ण नाकतोडे या व्यक्तीने अवैधरित्या दारूचा मोठा साठा घरात ठेवला असल्याची माहिती मिळाली होती.

    शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास भरारी पथकाने आरोपीच्या घरावर छापा टाकला असता, तिथे मोठ्या प्रमाणात अवैध दारूसाठा आढळून आला. या छाप्यात विदेशी दारूच्या विविध क्षमतेच्या एकूण २२६३ बाटल्या आणि देशी दारूच्या २०० बाटल्या, असा एकूण ५ लाख १६ हजार २८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. foreign liquor illegal stock raid Chandrapur

    दुय्यम निरीक्षक सोमेश्वर गव्हारे यांच्या नेतृत्वाखाली जवान सुजित चिकाटे, संजय कुमार हरिणखेडे आणि सुकेशनी कारेकार यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली. या प्रकरणाचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक सोमेश्वर गव्हारे करीत आहेत.

  • Paid Leave for Workers on Voting Day । निवडणुकीत कामगारांना भरपगारी सुट्टी! चंद्रपूर जिल्ह्यात महत्त्वाचा आदेश जाहीर

    Paid Leave for Workers on Voting Day : चंद्रपूर, दि. 29 नोव्हेम्बर (News३४) : राज्यातील नगर परिषद व नगर पंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये मतदान करण्याकरीता चंद्रपुर जिल्हयात काम करणा-या कामगार मतदारांना मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी अथवा 2 ते 2 तासाची सवलत देण्याबाबतचे आदेश निर्गमित करण्यात आले आहे.

    प्रशासनाचा आदेश : निवडणूक आणि मतदानासाठी चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने जारी केले नवे नियम

    महाराष्ट्र शासनाचे उद्योग, उर्जा, कामगार व खनिकर्म विभागाच्या शासन निर्णयान्वये सर्व दुकाने, आस्थापना, व्यापारी संस्था, हॉटेल, रेस्टारेन्ट, नाट्यगृहे, औद्योगिक उपक्रम, कारखाने किंवा इतर व्यापारी आस्थापनांमध्ये कार्यरत असलेल्या कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्याकरीता मतदानाच्या दिवशी सुट्टी दिली जाईल. सदर सुट्टी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाअंतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने आदींना लागू राहील, (खाजगी कंपन्या मधील आस्थापना, सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्नगृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम, किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स, रिटेलर्स इत्यादी.)

    अपवादात्मक परिस्थितीत अनुपस्थितीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होईल, अशा धोकादायक अथवा लोकोपयोगी सेवेत अथवा आस्थापनांच्या संदर्भात अधिकारी, कर्मचारी व कामगार आदींना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर, मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी कमीत कमी 2 ते 3 तासांची सवलत मिळेल. याची दक्षता संबंधित आस्थापना मालकांनी घेणे आवश्यक राहील.

    वर नमूद केल्यानुसार आस्थापनांच्या मालकांनी/व्यवस्थापनाने वरील सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. मतदारांकडून मतदानाकरीता योग्य ती सुट्टी  अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता आले नाही, अशी तक्रार आल्यास, त्यांच्याविरुध्द योग्य कारवाई करण्यात येईल, याची नोंद घेण्यात यावी. या संदर्भात कामगारांनी आपली तक्रार सहाय्यक कामगार आयुक्त यांचे कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारत, बस स्टॅन्ड समोर, चंद्रपुर येथे स्थापित केलेल्या नियंत्रण कक्षात प्रत्यक्षात किंवा  ई-मेल द्वारे assttcommrchd @gmail.com तक्रार करावी, असे कामगार विभागाने कळविले आहे.

  • Chandrapur local news accident । विहिरीवर पाणी आणताना तोल गेला; चंद्रपुरात तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

    Chandrapur local news accident : पोंभूर्णा २९ नोव्हेम्बर २०२५ (News३४): तालुक्यातील खरमत येथे स्वतःच्या शेतातील विहिरीत तोल गेल्याने एका तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना गुरुवारी, दिनांक २८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली. प्रदीप शामराव हेपटे (वय ४०), रा. खरमत, असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

    आदेश : चंद्रपूर जिल्ह्यातील आठवडी बाजार यादिवशी राहणार बंद

    प्राप्त माहितीनुसार, मृत शेतकरी प्रदीप हेपटे हे आपल्या शेतात धान बांधणीचे काम करत होते. काम सुरू असताना पिण्याचे पाणी घेण्यासाठी ते विहिरीवर गेले. मात्र, याच वेळी त्यांचा अचानक तोल गेला आणि ते विहिरीत कोसळले.

    काही वेळाने ते घरी परतले नाहीत म्हणून कुटुंबीयांच्या लक्षात ही बाब येताच त्यांनी तातडीने विहिरीकडे धाव घेतली आणि मदतकार्य सुरू केले. परंतु, खूप उशीर झाला होता; विहिरीतून बाहेर काढल्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. Chandrapur local news accident

    या घटनेची माहिती मिळताच पोंभूर्णा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला. मृतदेह पुढील उत्तरीय तपासणीसाठी पोंभूर्णा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे खरमत गावात शोककळा पसरली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई आणि वडील असा आप्त परिवार आहे.

  • जनता कॅरिअर लॉन्चर विद्यार्थी आत्महत्या प्रकरणात महत्वाची माहिती

    संस्थाअध्यक्ष व सचिवावर गुन्हे दाखल होणार?

    Janata Career Launcher harassment case : चंद्रपूर २८ नोव्हेम्बर (News३४) – २० नोव्हेम्बर रोजी चंद्रपुरातील चांदा शिक्षण प्रसारक मंडळ अंतर्गत चालणाऱ्या जनता कॅरिअर लॉन्चर या शिकवणी वर्गातील १७ वर्षीय प्रथमेश सुदरी या मुलाने प्राचार्य, शिक्षक व वॉर्डन यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली होती. संस्थेच्या संस्थाचालकावर अद्याप कारवाई न झाल्याने चंद्रपूर युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांनी महिला व बालविकास विभागाचे विभागीय उपायुक्त मुंडे साहेब यांना निवेदन दिले.

    राजकीय : भाजप सरकारने केली ओबीसींची फसवणूक – विजय वडेट्टीवार

    सहारे यांनी मागणी केली कि चांदा शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्ष व सचिवांची यांना सहआरोपी बनवीत त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात यावा. शेतकरी कुटुंबातील मुलाने शिक्षणाच्या माध्यमातून आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जनता करिअर लॉन्चर मध्ये प्रवेश घेतला होता. मात्र या शिकवणी वर्गात त्याला प्राचार्य व शिक्षक आणि वस्तीगृह वॉर्डन यांनी प्रथमेश ला मानसिक त्रास देणे सुरु केले होते. त्यामुळे १७ वर्षीय प्रथमेश ने टोकाचे पाऊल उचलले. आपल्या शिक्षण संस्थेत काय चालतंय? वसतिगृहात काय सुरु आहे? याची काही कल्पना अध्यक्ष व सचिवाना नव्हती का? विद्यार्थ्यांच्या आत्महत्या प्रकरणात प्राचार्य, शिक्षक, व्यवस्थापक व वॉर्डन जितके दोषी आहे तितकेच संस्था अध्यक्ष व सचिव सुद्धा जबाबदार आहे.

    सहारे यांच्या मागणीवर कारवाई करण्यासाठी तात्काळ चौकशी करीत गुन्हा दाखल करणार असं सकारात्मक उत्तर उपायुक्त मुंडे यांनी दिले. त्यामुळे प्रथमेश च्या आत्महत्येला जबाबदार व्यक्तीवर कारवाई होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबत चंद्रपुरातील पोलीस अधीक्षक व महिला बाल विकास विभागाला कारवाई बाबत निवेदन दिले मात्र अद्यापही कारवाई काही झाली नाही.

    शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात वरदहस्त असल्याने जनता करिअर लॉन्चर च्या संस्थाचालकांवर अद्यापही गुन्हा दाखल झाला नाही. अल्पवयीन मुलाच्या आत्महत्या प्रकरणी तात्काळ चौकशी होत जबाबदार प्राचार्य सहित संस्था चालक व अध्यक्षांवर गुन्हा दाखल करावा अन्यथा यावर आम्ही आंदोलन पुकारू असा इशारा विक्रांत सहारे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.

  • चंद्रपूर निवडणूक 2025: मतदान आणि मतमोजणीसाठी प्रशासनाने निर्बंध जाहीर

    Maharashtra civic election polling day rules : चंद्रपूर, दि. 28 नोव्हेम्बर (News३४) : राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर, राजुरा,  गडचांदूर,  भद्रावती, वरोरा,  चिमूर, ब्रम्हपुरी, नागभीड, मुल, घुग्गुस या नगरपालिकांमध्ये तसेच भिसी नगरपंचायतीत सार्वत्रिक निवडणूक-2025 साठी आचारसंहिता 4 नोव्हेंबर 2025 पासून लागू करण्यात आली आहे.

    आदेश : चंद्रपूर जिल्ह्यातील आठवडी बाजार यादिवशी राहणार बंद

    दि. 2 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 7.30 ते सायं. 5.30  वाजेपर्यंत मतदान होणार असून, मतमोजणी दि. 3 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10.00 वाजता सुरू होईल. या अनुशंगाने कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी आणि आदर्श आचारसंहितेचे पालन सुनिश्चित करण्यासाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 चे कलम 163 नुसार जिल्हादंडाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी विशेष निर्बंध लागू करण्याचा आदेश जारी केला आहे.

    1 डिसेंबर रोजी सकाळी 7.30 पासून ते मतमोजणी पूर्ण होईपर्यंत खालील निर्बंध लागू मतदान व मतमोजणी केंद्राच्या 100 मीटर परिसरात :

    * अनधिकृत जमाव, सार्वजनिक सभा, वाहनांची वर्दळ बंदी

    * भित्तीपत्रके, ध्वज, चिन्हे, प्रचार साहित्य यांवर बंदी

    * मतदारांना ने-आण करण्यासाठी वाहने वापरण्यास मनाई

    * मोबाईल, वायरलेस सेट इत्यादी मतदान केंद्रात नेण्यास बंदी (अधिकृत कर्मचारी वगळता)

    * धोक्यातील व्यक्तींना सुरक्षा दलासह 100 मीटर परिसरात येण्यास निर्बंध

    * मतमोजणी केंद्राबाहेरील 100 मीटर परिसरातील दुकाने, आस्थापना बंद

    * मतमोजणी केंद्राच्या परिसरात अनधिकृत व्यक्तींना प्रवेशबंदी

    * ड्रोन उडविण्यास सक्त मनाई Maharashtra civic election polling day rules

    प्रतिबंधातून सूट

    * “डोअर टू डोअर” प्रचार (5 पेक्षा जास्त व्यक्ती जमण्यास मनाई)

    * अँबुलन्स, दवाखान्याच्या गाड्या, दूधगाड्या, पाणी टँकर, पोलिस, वीज, निवडणूक कर्मचारी यांची वाहने

    * बसस्थानक, रेल्वे स्थानक किंवा हॉस्पिटलकडे जाणारी वाहने

    * दिव्यांग/आजारी मतदारांना त्यांच्या वैयक्तिक वाहनाने मतदानासाठी ये-जा

    जिल्हादंडाधिकाऱ्यांचे हे आदेश दि. 27 नोव्हेंबर 2025 रोजी सही व कोर्टाच्या शिक्क्यासह जारी करण्यात आले असून, संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना आदेशाचे व्यापक प्रसारण करण्याचे निर्देश दिले आहेत.

  • चंद्रपूर जिल्ह्यातील आठवडी बाजार बंद ठेवण्याचा आदेश

    Election code of conduct market closure notice : चंद्रपूर, दि. 28 नोव्हेम्बर (News३४) : राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या नगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक-2025 च्या कार्यक्रमानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर,  राजुरा, गडचांदूर,  भद्रावती,  वरोरा, चिमूर, ब्रम्हपुरी, नागभीड, मुल, घुग्गुस या नगरपालिकांसाठी तसेच भिसी नगरपंचायतीसाठी दि. 2 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 7.30 ते सायं. 5.30 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. तर दि. 3 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10.00 वाजेपासून मतमोजणी पार पडणार आहे. 4 नोव्हेंबर 2025 पासून या निवडणूक क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू आहे.

    राजकीय : तुम्ही दारू दुकानाचे मालक, भाजप उमेदवारावर नागरिकांचा संताप

    मतदान व मतमोजणीच्या दिवशी संबंधित नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्रात भरत असलेल्या आठवडी बाजारांमध्ये मोठी गर्दी होत असल्याने आदर्श आचारसंहितेचे पालन, कायदा-सुव्यवस्था आणि निवडणूक प्रक्रिया निर्विघ्न पार पाडण्यासाठी बाजार बंद ठेवणे आवश्यक असल्याचे जिल्हादंडाधिकारी यांनी नमूद केले आहे.

    मार्केट अ‍ॅण्ड फेअर अ‍ॅक्ट, 1862 चे कलम 5(अ) अन्वये जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.  यांनी मतदान दिवशी (दि. 2 डिसेंबर 2025 – मंगळवार) गडचांदूर येथे आठवडी बाजार येत असल्याने सदर आठवडी बंद ठेवण्यात येणार असून मतमोजणी दिवशी (दि. 3 डिसेंबर 2025 – बुधवार) भद्रावती व मूल येथील आठवडी बाजार बंद ठेवण्यात येणार आहे.

    हा आदेश दि. 27 नोव्हेंबर 2025 रोजी जिल्हादंडाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या  स्वाक्षरीसह जारी करण्यात आला असून, सर्व संबंधितांनी आदेशाचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

  • घुग्घुस BJPची दमदार पदयात्रा! विकासाच्या बळावर विजयाचा आत्मविश्वास – आमदार जोरगेवार

    ठोस विकासकामांच्या आधारावर निवडणूक जिंकू  – आ. किशोर जोरगेवार

    MLA Kishor Jorgewar election rally Ghugghus : चंद्रपूर २८ नोव्हेम्बर (News३४) – घुग्घुस नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी, घुग्घुसतर्फे नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ गुरुवारी आमदार किशोर जोरगेवार आणि आमदार देवराव भोंगळे यांच्या प्रमूख उपस्थितीत भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. टिळक नगर येथून निघालेल्या पदयात्रेचे आठवडी बाजार चौक येथ सभेत रूपांतर झाले. यावेळी बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी विकासाच्या मुद्यावर आपण निवडणुकीला समोर जात असुन नगराध्यक्ष पदासह सर्व नगर सेवकांना निवडणुन देण्याचे आवाहण आमदार किशोर जोरगेवार यांनी केली.

    राजकीय : भाजप उमेदवारावर महिलांचा संताप, भद्रावती नगरपरिषद निवडणूक

       यावेळी महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, नगराध्यक्ष पदाच्या उमेदावार शारदा उर्फ पूजा दुर्गम, घुग्घुस शहर अध्यक्ष संजय तिवारी, निवडणूक प्रमूख प्रकाश देवतळे, महामंत्री नामदेव डाहुले, विवेक बोडे, तालुका अध्यक्ष विनोद खेवले, चिन्ना नलभोगा यांच्यासह ईतर पदाधिका-यांची उपस्थिती होती.

    खोट्या आश्वासनावर नाही तर विकासावर निवडणूक

       सदर सभेत बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले कि, घुग्घुस मध्ये आम्ही जात-पात, भेदाभेद किंवा खोट्या आश्वासनांवर नाही, तर ठोस विकासकामांच्या आधारावर निवडणूक लढवत आहोत. आमदार म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर घुग्घुसमध्ये अनेक महत्त्वाची कामे पूर्ण केली आहेत. रस्ते, पाणीपुरवठा, प्रकाशयोजना, क्रीडा सुविधा ते नागरिकांच्या दैनंदिन गरजांपर्यंत विकासाचा वेग वाढवण्याचे काम आम्ही केले आहे. MLA Kishor Jorgewar election rally Ghugghus

    bjp padyatra
    प्रचार सभेत उपस्थित जनसमुदाय

    घुग्घुसचा सर्वांगीण विकास हा आमचा प्रामाणिक हेतू आहे. आजच्या पदयात्रेत नागरिकांनी जो प्रेम आणि विश्वास व्यक्त केला, तोच आम्हाला विजयाकडे घेऊन जाणार आहे. नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाचे सर्व भाजपा उमेदवार सक्षम, प्रामाणिक आणि कार्यक्षम आहेत. या विकासाच्या बळावरच ते निश्चित विजयी होतील, असा ठाम विश्वास यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केला. वेकोलिच्या तलावामुळे घुग्घुस शहरातील नाल्यांना पूर येतो त्यामुळे या तलावाचे खोलीकरण करण्यासाठी सात कोटी रुपयांचा निधी आपण मंजूर केला आहे.

    येथील रुग्णालय लवकर पुर्ण क्षमतेने सुरु होणार आहे. येथील अनेक विकासकामे मागील काही वर्षात आपण पुर्ण करु शकलो आहे. कॉंग्रेसकडे आज विकासाच्या नावावर सांगण्यासारखे काही नाही.  ते केवळ घुग्घूस वासियांची दिक्षाभुल करण्याचे काम करत त्यांच्या खोट्या प्रचाराला घुग्घुसवासी बळी पडणार नाही असे ते यावेळी बोलतांना म्हणाले. या सभेला घुग्घुस वासियांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

  • सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने निवडणुका मोकळ्या, पण ओबीसी जागा धोक्यात!

    स्थानिक स्वराज्य निवडणुका सुरू; पण ओबीसींचं भविष्य अजूनही अनिश्चित – वडेट्टीवारांची टीका

    SC updates on Maharashtra civic polls : चंद्रपूर २८ नोव्हेम्बर (News३४) – आज सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती दिली नाही, हा थोडा दिलासा असला तरी या निवडणुकांचा निकाल हा न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहणार आहे. त्यामुळे ओबीसींच्या जागांवर असलेली टांगती तलवार कायम राहणार आहे. आज न्यायालयाच्या अंतरिम आदेशाने ओबीसी समाजाला दिलासा नाहीच अशी टीका काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवर यांनी केली.

    राजकीय – भाजप नगराध्यक्ष उमेदवाराचा व्हिडीओ व्हायरल, महिलांचा संताप आणि पळवाट

    स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सर्वोच्च न्यायालयात आज महत्वाची सुनावणी पार पडली. या सुनावणीकडे आमचे लक्ष होते. आज न्यायालयाच्या आदेशामुळे निवडणूक घेण्याचा मार्ग मोकळा झाला असला तरी ओबीसींच्या जागांवरील टांगती तलवार मात्र कायम राहिलेली आहे, अस वडेट्टीवार म्हणाले.


    आज न्यायालयाने निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश देताना, ५०% आरक्षणाची मर्यादा ओलांडू नये असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. याचा अर्थ, ज्या ठिकाणी ओबीसी आरक्षणामुळे एकूण आरक्षण ५०% च्या वर गेले आहे, त्या जागांवर निवडणूक होऊ शकणार नाही. त्यामुळे भाजपाने ओबीसी आरक्षणासंदर्भातील केलेलं सगळे दावे पूर्णपणे फोल ठरले आहेत. ही सपशेल बनवा बनवी आहे अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली. SC updates on Maharashtra civic polls

    स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या तरी ओबीसी जागांचा निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णयावर अवलंबून राहणार आहे. याचा स्पष्ट अर्थ आहे की, ओबीसी समाजाचे प्रतिनिधित्व पुन्हा एकदा अनिश्चिततेच्या छायेखाली राहणार आहे. भाजप सरकार सातत्याने आम्ही ओबीसींना २७% आरक्षण दिले म्हणून स्वतःची पाठ थोपटून घेत होते. मात्र, आजच्या परिस्थितीमुळे हे सर्व दावे फोटे ठरले आहेत. ओबीसींसाठी दिलेले २७% आरक्षण गेले कुठे? याचे उत्तर भाजपने द्यावे. निवडणुका घेण्यास सांगूनही निकाल न्यायालयावर अवलंबून ठेवणे म्हणजे ओबीसी बांधवांची राजकीय दिशाभूल करणे आहे. भाजपने केवळ घोषणांची बनवाबनवी करून ओबीसी बांधवांना मूर्ख बनवले, अशी घणाघाती टीका वडेट्टीवार यांनी केली.

    ओबीसी बांधवांना त्यांचे संवैधानिक प्रतिनिधित्व तातडीने मिळावे यासाठी भाजपने केवळ घोषणाबाजी न करता ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी असल्याचे वडेट्टीवार म्हणाले.