Blog

  • india post electric vehicle initiative । इंडिया पोस्ट मधील पोस्टमॅनला मिळणार इलेक्ट्रिक दुचाकी

    india post electric vehicle initiative : मुंबई ३ डिसेंबर (News३४) : मुंबईतील नागरिकांना शेवटच्या टप्प्यातील वितरण सेवा अधिक कार्यक्षम, आधुनिक आणि पर्यावरणपूरक बनवण्यासाठी इंडिया पोस्ट, मुंबई विभागाने एक महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. पार्सलच्या संख्येत झालेली वाढ आणि वितरणाची उत्पादकता वाढवण्याची गरज लक्षात घेऊन, इंडिया पोस्टने पारंपरिक पायी वितरणाऐवजी ‘स्मार्ट मोबिलिटी’चा नवा पर्याय स्वीकारला आहे.

    ई-वाहनाद्वारे होणार जलद वितरण

    इंडिया पोस्ट, मुंबई विभागाने ‘स्मार्ट मोबिलिटी इनिशिएटिव्ह’ अंतर्गत, टीव्हीएस व्हेईकल मोबिलिटी सोल्युशन्स (TVS VMS) च्या सहकार्याने टपाल वितरकांसाठी (पोस्टमन/पोस्टवूमन) इलेक्ट्रिक दुचाकींची संपूर्ण सेवा प्रणाली सुरू केली आहे.

    निवडणूक : चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूरात मतदाराने फोडली ईव्हीएम

    • वितरण केंद्रे: मुंबई जीपीओ, सायन, दादर, काळबादेवी आणि चाकाला यांसारख्या नव्याने स्थापन केलेल्या स्वतंत्र वितरण केंद्रांवर टपाल वितरकांना टीव्हीएसच्या इलेक्ट्रिक गाड्या उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
    • सेवा: या वाहनांच्या माध्यमातून नियमित मेल, अकाऊंट्स मेल (नोंदणीकृत/स्पीड पोस्ट) आणि पार्सलसह सर्व प्रकारच्या टपाल सेवांचे वितरण केले जाईल.

    पर्यावरणपूरक आणि किफायतशीर उपक्रम

    या उपक्रमांतर्गत, एकूण २११ इलेक्ट्रिक दुचाकी तैनात करण्यात आल्या आहेत. या गाड्यांचे सुरळीत, पर्यावरणपूरक आणि किफायतशीर संचालन सुनिश्चित करण्यासाठी टपाल कार्यालयांमध्ये समर्पित चार्जिंग स्टेशन्स (Charging Stations) देखील बसविण्यात आले आहेत.

    ४ डिसेंबर रोजी शुभारंभ

    हा पथदर्शी प्रकल्प (पायलट प्रोजेक्ट) ४ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता चाकाला एमआयडीसी पोस्ट ऑफिस येथून सुरू केला जाईल. याप्रसंगी महाराष्ट्र आणि गोवा सर्कलचे मुख्य पोस्टमास्टर जनरल श्री. अमिताभ सिंग, इंडिया पोस्ट, मुंबई विभागाच्या टपाल सेवा संचालिका श्रीमती काया अरोरा आणि टीव्हीएस व्हेईकल मोबिलिटी सोल्युशन्सचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

  • Armed Forces Flag Day Fund । ध्वजदिन निमित्त चंद्रपूरमध्ये शहीदांच्या कुटुंबांचा सन्मान; ९ डिसेंबरला विशेष कार्यक्रम

    Armed Forces Flag Day Fund : चंद्रपूर २ डिसेंबर (News३४): देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या आणि सीमेवर अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या सशस्त्र दलातील जवानांच्या सन्मानार्थ दरवर्षी ७ डिसेंबर हा दिवस संपूर्ण देशभरात ‘सशस्त्र सेना ध्वजदिन निधी‘ (Armed Forces Flag Day Fund) म्हणून पाळला जातो. या निधी संकलनाचा शुभारंभ चंद्रपूर जिल्ह्यात ९ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या हस्ते होणार आहे.

    या कार्यक्रमाच्या निमित्ताने ९ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता नियोजन भवन येथे भव्य सैनिक मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

    निवडणूक गोंधळ : गडचांदूरात मतदाराने फोडली ईव्हीएम मशीन

    हा कार्यक्रम विशेषतः शौर्य आणि सेवेचा सन्मान करण्यासाठी आयोजित करण्यात आला आहे, ज्यात पुढीलप्रमाणे सत्कार होणार आहेत:

    • उत्कृष्ट निधी संकलन: ध्वजदिन निधी संकलनात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा भेटवस्तू, स्मृतीचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात येणार आहे.
    • वीरांचा सन्मान: देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शहीद सैनिकांच्या वीर पत्नी, वीर माता-पिता यांचा तसेच शौर्य चक्र प्राप्त सैनिकांचा शाल व श्रीफळ देऊन यथोचित गौरव केला जाईल.
    • माजी सैनिकांच्या पाल्यांना मदत: माजी सैनिकांच्या पाल्यांना मान्यवरांच्या हस्ते धनादेशाचे वाटप करून शैक्षणिक व इतर मदतीचा हात दिला जाणार आहे.

    जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक बांधवांना शौर्याचा हा सोहळा आणि मदतकार्याचा शुभारंभ कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे कळकळीचे आवाहन केले आहे.

  • evm machine vandalized in gadchandur polling । चंद्रपूर निवडणूक LIVE: गडचांदूरमध्ये संतप्त मतदारांनी ईव्हीएम मशीन फोडली

    evm machine vandalized in gadchandur polling : कोरपना/गडचांदूर: चंद्रपूर जिल्ह्यातील ९ नगरपालिका आणि एका नगरपंचायतीच्या निवडणुकीदरम्यान दिवसभर विविध केंद्रांवर गोंधळाचे वातावरण होते. कुठे तांत्रिक बिघाडामुळे मतदान थांबले, तर कुठे मतदारांना पैसे वाटपाचे प्रकार उघडकीस आले. या सगळ्या गोंधळात गडचांदूर येथे एक अत्यंत गंभीर घटना घडली, जिथे एका संतप्त मतदाराने ईव्हीएम मशीन फोडून टाकली.

    पोलीस आदेश : चंद्रपूर जिल्ह्यात कलम ३६ लागू

    ही घटना गडचांदूर नगरपरिषदेच्या प्रभाग ९ मधील आदर्श हिंदी विद्यालय (केंद्र क्रमांक २) येथे घडली. राम मल्लेश दुर्गे (वय ४०) नावाच्या मतदाराने मतदान करताना ‘नगारा’ चिन्हाचे बटन दाबले असता, अचानक भाजपच्या ‘कमळ’ चिन्हाचा दिवा लागला, असा गंभीर आरोप त्यांनी केला. या कथित प्रकारामुळे संतापाच्या भरात दुर्गे यांनी ईव्हीएम मशीनवर हल्ला करत ती फोडून टाकली.

    घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच मतदान केंद्राबाहेर मोठ्या संख्येने मतदारांनी गर्दी केली आणि संतप्त नागरिकांनी **“भाजप मुर्दाबाद”**च्या जोरदार घोषणाबाजी सुरू केली. यामुळे काही काळ मतदान प्रक्रियेला ब्रेक बसला आणि वातावरण अत्यंत तणावपूर्ण बनले. evm machine vandalized in gadchandur polling

    परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र जाधव, मुख्याधिकारी आशिष चव्हाण आणि ठाणेदार शिवाजी कदम यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी नागरिकांशी संवाद साधून मध्यस्थी केली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी तात्काळ ईव्हीएम मशीनचा पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू केली असून, या घटनेची सखोल चौकशी केली जात आहे.

    या घटनेमुळे गडचांदूरमधील राजकीय तापमान अधिक वाढले असून, मतदान केंद्राबाहेर अजूनही तणाव असल्याने सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे.

    युवकाला अटक

    गडचांदूर नगर परिषदेच्या निवडणुकीदरम्यान वॉर्ड क्रमांक 9 येथील मतदान केंद्र 9/2 येथे मतदान यंत्रासोबत छेडछाड करणाऱ्या युवकाला पोलिसांनी अटक केली आहे. जिल्हा प्रशासनाने याची तात्काळ दखल घेत क्षतीग्रस्त बॅलेट युनीट बदलवून मतदान सुरळीत सुरू केले. विशेष म्हणजे यावेळी कंट्रोल युनीट पुर्णपणे सुरक्षित होते.

    विवेक मल्लेश दुर्गे हा गडचांदूर येथील रहिवासी असून आज गडचंदुर येथील मतदान केंद्र क्रमांक 9/2 येथे मतदान करताना त्याने बॅलेट युनिट ला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न केला. मतदान केंद्रावर उपस्थित पोलिसांनी त्याला त्वरीत अटक केली. जिल्हा प्रशासनाच्या तत्परतेने सदर मतदान केंद्रावर पुन्हा सुरळीत मतदान सुरू झाले आहे.

  • law and order Police Notification । 4 ते 7 डिसेंबरपर्यंत चंद्रपूर जिल्ह्यात कलम 36 लागू

    law and order Police Notification : चंद्रपूर २ डिसेंबर (News३४): भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६ डिसेंबर रोजी असलेल्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार, ४ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून ते ७ डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत महाराष्ट्र पोलीस कायद्याचे कलम ३६ चे पोटकलम ‘अ’ ते ‘फ’ लागू करण्यात आले आहे.

    लोकसभा अधिवेशन : धानोरकर यांच्या प्रश्नावर उघड झाले शालेय शिक्षणाचे दुर्दैव

    या कलमांतर्गत सार्वजनिक ठिकाणी शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक निर्बंध आणि निर्देश देण्याचे अधिकार सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांसह त्यांच्यापेक्षा कनिष्ठ दर्जाच्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. law and order Police Notification

    या निर्बंधांमध्ये खालील बाबींचा समावेश आहे:

    • मिरवणूक आणि सभा: मिरवणुकीचा रस्ता, वेळ निश्चित करणे आणि सभेत तसेच धार्मिक पूजास्थानाजवळ लोकांच्या वर्तनावर योग्य निर्बंध घालण्याचे अधिकार.
    • ध्वनी प्रदूषण नियंत्रण: सार्वजनिक रस्ते किंवा ठिकाणी वाद्य वाजविणे, गाणी गाणे, ढोल-ताशे वाजविणे, तसेच लाऊडस्पीकर वापरण्यावर मर्यादा घालण्याचे अधिकार.
    • सार्वजनिक सुव्यवस्था: रस्ते आणि इतर सार्वजनिक ठिकाणी सुव्यवस्था राखण्यासाठी योग्य निर्देश देणे.

    या कालावधीत सभा, मिरवणूक आयोजित करण्यासाठी, वाद्य वाजविण्यासाठी, लाऊडस्पीकर वापरण्यासाठी किंवा मिरवणुकीचा रस्ता व वेळ निश्चित करण्यासाठी संबंधित पोलीस ठाणे अंमलदार यांची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. नागरिकांनी पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या सर्व निर्देशांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा पोलीस प्रशासनाने केले आहे.

  • Chandrapur farmers relief fund update । लोकसभेत दमदार मांडणीचा परिणाम! चंद्रपूर जिल्ह्याला 93.76 कोटींचा आर्थिक आधार

    Chandrapur farmers relief fund update : चंद्रपूर २ डिसेंबर (News३४) : जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने आणि भरीव आर्थिक मदत मिळावी यासाठी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी  केंद्र आणि राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. याच प्रयत्नांचा भाग म्हणून, हिवाळी अधिवेशनात लोकसभेत (तारांकित प्रश्न क्र. ३३) त्यांनी हा गंभीर मुद्दा अत्यंत प्रभावीपणे मांडला. त्यांच्या या निर्णायक ‘आवाजा’ला मोठे यश मिळाले असून, केंद्र सरकारने दिलेल्या लेखी उत्तरात चंद्रपूर जिल्ह्यासाठी तब्बल ९३.७६ कोटी रुपयांची नुकसानभरपाई जाहीर केली आहे.

    प्रशिक्षण : बांबू प्रशिक्षण केंद्र व नागपूर विद्यापीठात महत्वाचा करार

    या महत्त्वपूर्ण मागणीमुळे चंद्रपूर जिल्ह्याच्या हजारो शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे. खासदार प्रतिभा धानोरकर यांनी सरकारला अनेक महत्त्वपूर्ण प्रश्न विचारून मदतीचा तपशील मागितला होता. त्यांनी विशेषत्वाने सोयाबीन व्यतिरिक्त इतर पिकांचे झालेले गंभीर नुकसान, यामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांची नेमकी संख्या आणि त्यांना पिकांच्या नुकसानीची भरपाई म्हणून लवकरात लवकर पुरेसे आर्थिक साहाय्य उपलब्ध करण्यासाठी सरकारने उचललेली पाऊले यावर जोर दिला. Chandrapur farmers relief fund update

    खासदार धानोरकर यांच्या प्रश्नावर केंद्रीय मंत्र्यांचे उत्तर

    याव्यतिरिक्त, पंचनामा करताना मृदा अपरदन आणि संपूर्ण पीक हानी यांसारख्या घटकांचा समावेश केला जात नसल्याच्या तक्रारींकडेही त्यांनी केंद्र सरकारचे लक्ष वेधले होते.खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या प्रश्नांना लेखी उत्तर देताना केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने चंद्रपूर जिल्ह्यासाठीची मदत स्पष्ट केली आहे. यात अतिवृष्टीमुळे बाधित सर्व पिकांसाठी जिल्ह्याला ९,३७६.५६ लाख रुपये नुकसानभरपाई देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, रब्बी पिकांसाठी सर्व बाधित शेतकऱ्यांकरिता ११,०३०.९४ लाख रुपयांची अतिरिक्त विशेष सहायता देखील जारी करण्यात आली आहे.

    केंद्राच्या हिश्श्याचे १५६६.४० कोटी रुपये राज्याला वर्ग

    मदत वितरणाच्या सद्यस्थितीबद्दल सांगायचे झाल्यास, २४ नोव्हेंबर २०२५ पर्यंत ‘ई-पंचनामा पेमेंट वितरण पोर्टल’च्या माध्यमातून १,१३,४५५ बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट ८२,३७,५०,०४८ रुपयांची रक्कम  हस्तांतरित झाली आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना त्वरित दिलासा मिळाला आहे.आपत्ती व्यवस्थापनाची प्राथमिक जबाबदारी राज्य सरकारांची असली तरी, केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारला राज्य आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत आवश्यक ती मदत पुरवली आहे. आर्थिक वर्ष २०२५-२०२६ साठी मंजूर झालेल्या निधीपैकी केंद्राच्या हिश्श्याचे १५६६.४० कोटी रुपये राज्याला वर्ग करण्यात आले आहेत.

    पूरस्थितीच्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी आंतर-मंत्रालयी केंद्रीय पथकाने ३ ते ५ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत बाधित क्षेत्रांचा दौरा केला होता. पंचनामा प्रणालीबाबतच्या तक्रारींवर, महाराष्ट्र सरकारने अशी कोणतीही तक्रार प्राप्त झाली नसल्याचे केंद्राला कळवले आहे. एकंदरीत, खासदार प्रतिभा धानोरकर यांनी शेतकऱ्यांची बाजू लावून धरल्यामुळेच चंद्रपूरच्या शेतकऱ्यांना हा महत्त्वपूर्ण आणि त्वरित आर्थिक लाभ मिळाला आहे.  

  • Chandrapur Election Live Update । चंद्रपूर निवडणूक LIVE: सकाळपासून मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद पण…

    Chandrapur Election Live Update : चंद्रपूर २ डिसेंबर (News३४) – चंद्रपूर जिल्ह्यातील ९ नगरपालिका व एक नगरपंचायतीची सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली, सकाळपासूनच मतदार आपल्या केंद्रावर पोहोचत लोकशाही साठी मतदान करीत होते, यादरम्यान मतदारांना पैसे वाटप करण्याचे व्हिडिओ सुद्धा समोर आले आहे. जिल्ह्यातील नगरपालिकांमध्ये ब्रह्मपुरी, भद्रावती, नागभीड, चिमूर, राजुरा, बल्लारपूर, गडचांदूर, वरोरा मूल व भिसी नगरपंचायतीकरिता मतदान होत आहे.

    कारवाई : नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ३६३ जणांवर हद्दपारीची कारवाई

    नगराध्यक्ष पदासाठी एकूण जिल्ह्यात ६५ उमेदवार तर सदस्य पदासाठी १ हजार ८९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. घुग्गुस नगरपरिषदेची निवडणूक सह गडचांदूर, मूल, बल्लारपूर व वरोरा मधील काही प्रभागाची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. २० डिसेंबर रोजी निवडणूक होणार आहे. त्यासोबतच ३ डिसेंबर रोजी मतदानाचा निकाल सुद्धा हायकोर्टाच्या निकालाने पुढे ढकलण्यात आला असून आता जिल्ह्यातील सर्वत्र नगरपरिषद व नगरपंचायत चा निकाल २१ डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे. Chandrapur Election Live Update

    १० नगराध्यक्ष व २२६ सदस्य निवडून द्यायचे आहे

    सकाळी मतदान सुरु झाल्यावर खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार विजय वडेट्टीवार, माजी आमदार सुभाष धोटे यांनी मतदानाचा हक्क बजावला. जिल्ह्यात एकूण ३८९ मतदान केंद्रावर ३ लक्ष ३९ हजार ४९ नागरिक लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी होणार असून १२२ प्रभागातील २२६ सदस्य व १० नगराध्यक्ष निवडून देणार आहे.

    सकाळ पासून सुरु झालेल्या मतदानाची सुरुवात संथ गतीने सुरु झाली होती, दुपारी १.३० वाजता जिल्ह्यात २५.५७ टक्के मतदान झाले होते तर सर्वात कमी मतदान 16.43 टक्के गडचांदूर शहरात झाले.

  • BRTC Nagpur University MoU । चिचपल्ली बीआरटीसी आणि नागपूर विद्यापीठात ऐतिहासिक सामंजस्य करार

    BRTC Nagpur University MoU : चंद्रपूर, दि. 01 डिसेंबर (News३४) : बांबू क्षेत्रातील शैक्षणिक उन्नती, संशोधन, कौशल्यविकास आणि उद्योजकता वाढीसाठी चिचपल्ली येथील बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र (बीआरटीसी) आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ यांच्यात ऐतिहासिक सामंजस्य करार विद्यापीठाच्या कुलगुरू माधवी खोडे यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

    शिक्षण व्यवस्था : प्रतिभा धानोरकरांच्या प्रश्नामुळे उजेडात आले शालेय शिक्षणाचे गंभीर मुद्दे

    या करारामुळे बांबू तंत्रज्ञान, बांबू हस्तकला, बांबू फर्निचर डिझाईन, बांबू बांधकाम,  वन आधारित वास्तुकला व शाश्वत बांधकाम पद्धती आणि निसर्ग निर्वाचन यांसारख्या विषयांवर संयुक्त कार्यशाळा, सेमिनार, प्रशिक्षण शिबिरे आणि क्षेत्रीय भेटी आयोजित करण्यास दोन्ही संस्था एकत्र काम करतील. यामुळे विद्यार्थी–प्राध्यापक  विनिमय कार्यक्रम, तज्ज्ञ व्याख्याने आणि संशोधन क्षमतावृद्धीसाठी तांत्रिक देवाणघेवाण यांनाही गती मिळणार आहे. विद्यापीठाच्या  विद्यार्थ्यांसाठी बीआरटीसीमध्ये प्रत्यक्ष अनुभवाधारित इंटर्नशिप उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

    रिअल-टाइम प्रोजेक्ट्स, फील्ड असाइनमेंट्स आणि पर्यावरणपूरक विकास उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना बांबू तंत्रज्ञानातील व्यावहारिक ज्ञान मिळणार आहे. अभ्यासक्रम निर्मिती, शैक्षणिक पाठबळ, प्रमाणन आणि बांबू तंत्रज्ञानावर केंद्रित संशोधन व डॉक्युमेंटेशनलाही विद्यापीठाकडून प्रोत्साहन दिले जाणार आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 शी सुसंगत अशा कौशल्याधारित अल्पमुदतीच्या क्रेडिट अभ्यासक्रमांची अंमलबजावणी बीआरटीसीतर्फे करण्यात येणार असून हे अभ्यासक्रम विद्यापीठ संलग्न महाविद्यालयांमध्ये Choice-Based Credit System (CBCS) अंतर्गत उपलब्ध करून देण्याची तयारी आहे. बांबू प्रक्रियाकरण, हस्तकला, तंत्रज्ञान आणि उद्योजकता यामध्ये युवक, कारागीर आणि स्थानिक उद्योजकांना दिशा देणारे उपक्रम राबवणे हेही कराराचे एक महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. BRTC Nagpur University MoU

    यावेळी विद्यापीठाच्या कार्यकारी कुलगुरू डॉ. माधवी खोडे (चवरे), कुलसचिव डॉ. राजू हिवसे, बीआरटीसीचे संचालक मनोज कुमार खैरनार, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. उमेश पलीकुंडवार, आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ. राजश्री वैष्णव, आयआयएलचे संचालक डॉ. प्रकाश ईटणकर, आजीवन अध्ययन व विस्तार विभाग संचालक डॉ. समित माहोरे, डॉ. निशिकांत राऊत, रोजगार व प्रशिक्षण अधिकारी डॉ. भूषण महाजन, एलईडी महिला महाविद्यालयातील डॉ. सारिका दगडकर, वनपरिक्षेत्र अधिकारी ए. डी. मल्लेलवार तसेच हस्तकला निर्देशक किशोर गायकवाड यांची उपस्थिती होती.

    ५ वर्षाचा करार कालावधी

    या कराराचा कालावधी पाच वर्षांचा असून हा करार बांबू आधारित शाश्वत उपजीविका, रोजगारनिर्मिती, ग्रामीण विकास आणि हरित उद्योजकतेच्या दिशेने एक मोलाचे पाऊल मानला जात आहे. विशेषतः  विदर्भासारख्या बांबू समृद्ध भागास याचा मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे. बीआरटीसीच्या तांत्रिक अनुभवास विद्यापीठाच्या शैक्षणिक सामर्थ्याची जोड मिळाल्याने महाराष्ट्रातील बांबू क्षेत्रासाठी एक मजबूत, दीर्घकालीन आणि परिणामकारक सहकार्य मॉडेल उभे राहणार आहे. या करारामुळे बीआरटीसी चिचपल्लीचे स्थान राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवरील बांबू उत्कृष्टता केंद्र म्हणून अधिक भक्कम होईल, असा विश्वास यावेळी केंद्राचे संचालक मनोज खैरनार यांनी व्यक्त केला.

  • Maharashtra single teacher schools । खासदार धानोरकरांचा प्रश्न आणि लोकसभेत उघडकीस आले शालेय शिक्षणाचे दुर्दैव

    Maharashtra single teacher schools : चंद्रपूर १ डिसेंबर (News३४) : महाराष्ट्रामधील शालेय शिक्षणाची विदारक स्थिती आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी होत असलेला खेळ आज लोकसभेत उघड झाला. खासदार प्रतिभा धानोरकर यांनी शिक्षण मंत्रालयाला धारेवर धरत राज्यातील शिक्षणाच्या गंभीर प्रश्नांवर तातडीने लेखी उत्तर मागितले.

    खासदार प्रतिभा धानोरकर यांनी थेट विचारणा केली की, महाराष्ट्रातील तब्बल ८,१८७ शाळा फक्त एकाच शिक्षकावर चालत आहेत हे सत्य आहे काय? तसेच, या शाळांमधील रिक्त पदांमुळे शिक्षण गुणवत्तेचा बळी जात असताना, शिक्षण मंत्रालयाकडे या रिक्त जागा भरण्यासाठी कोणती ठोस कालमर्यादा आहे? 

    घटना – रेल्वेच्या धडकेत वाघिणीचा मृत्यू

    त्यांनी राष्ट्रीय शिक्षण धोरणाचे, विद्यार्थी-शिक्षक गुणोत्तर, पायदळी तुडवणाऱ्या शाळांवर सरकार कोणती कठोर कारवाई करणार आहे, असा जाब विचारला. विशेषतः, राज्यातील आदिवासी आणि दुर्गम भागांमध्ये एकाच शिक्षकांवर चालणाऱ्या शाळांमुळे विद्यार्थ्यांचे कसे नुकसान होत आहे, यावर सरकारने कोणते जिल्हावार सर्वेक्षण केले आहे, याचे तपशील देण्याची मागणी त्यांनी केली.

    गंभीर प्रश्न आणि विदारक स्थिती उघड

    या गंभीर प्रश्नांवर शिक्षण राज्यमंत्री जयंत चौधरी यांनी समाधानकारक उत्तर देणे टाळले. मंत्रालयाने ‘शिक्षण हा समवर्ती सूचीतील विषय आहे’ असे सांगत शाळांचे नियमन आणि शिक्षकांच्या सेवाशर्ती राज्य सरकारांच्या अखत्यारीत असल्याचे स्पष्ट केले. Maharashtra single teacher schools

    रिक्त पदांबाबत बोलताना, सरकारने ‘शिक्षकांची भरती ही सेवानिवृत्ती आणि राजीनाम्यांमुळे सतत चालणारी प्रक्रिया आहे’ असे हात झटकणारे विधान केले. केंद्र सरकार फक्त राज्यांशी पाठपुरावा करत आहे आणि वेळोवेळी सूचना देत आहे.

    ‘समग्र शिक्षा’ योजनेंतर्गत केंद्र सरकार केवळ ‘एकत्रित निधी पुरवते, पण या निधीचा विनियोग राज्य सरकारांनी करायचा असतो, असे सांगून केंद्राने आपली जबाबदारी झटकल्याचे चित्र आहे.

    खासदार प्रतिभा धानोरकर यांनी उपस्थित केलेल्या या प्रश्नामुळे, महाराष्ट्रातील गरीब आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांचे भविष्य, केवळ कागदी घोडे नाचवणाऱ्या सरकारी धोरणांमुळे अंधारात असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न ‘समवर्ती सूची’च्या नावाखाली राज्या-राज्यांमध्ये टोलवला जात असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

  • world aids day rally in chandrapur । चंद्रपुरात जागतिक एड्स दिन उत्साहात; रॅली, शपथविधी आणि जनजागृती कार्यक्रम संपन्न

    world aids day rally in chandrapur : चंद्रपूर, दि. 01 डिसेम्बर (News३४) : 1 डिसेंबर जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधून जिल्हाभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या अनुषंगाने विविध सामाजिक संस्था, महाविद्यालय यांच्या सहकार्याने जनजागृती रॅली काढण्यात आली. या वर्षीचे घोषवाक्य ‘अडथळ्यांवर मात करू, एकजुटीने एचआयव्ही/एड्स ला लढा देऊ, नवं परिवर्तन घडवू !’ असे आहे.

    कारवाई – चंद्रपूर जिल्ह्यातील ३६३ जणांवर हद्दपारीची कारवाई

    जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे यांच्या मार्गदर्शनाखाली व रोटरी क्लबचे अध्यक्ष संदीप रामटेके यांच्या अध्यक्षतेखाली 1 डिसेंबर जागतिक एड्स दिन कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी संदीप रामटेके यांनी एडस् विरोधी शपथेचे वाचन केले. कार्यक्रमाला इनर्व्हिल क्लबच्या अर्चना उचके, रोटरी क्लबचे श्रीकांत रेशीमवाले, महेश उचके, राजेश गणियारपवार, हिमानी गोयल, शासकिय नर्सिंग कॉलेजच्या वृषाली नानोटे, विद्या रघुगे, समाजकार्य विद्यालयाचे प्राध्यापक संतोष आडे, प्रा. मनुरे, एआरटीचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. दिलीप मडावी, अजय जैस्वाल, जिल्हा कार्यक्रम अधिकारी सुमंत पानगंटीवार, जिल्हा पर्यवेक्षक निरंजन मंगरूळकर, नसीमा शेख, देवेंद्र लांजे, रोशन आकुलवार, राज काचोळे, माधुरी डोंगरे, संगिता देवाळकर यांची उपस्थिती होती.

    शहरात निघाली जनजागृती रॅली

    एडस् विरोधी शपथ घेऊन मान्यवरांच्या हस्ते बाईक रॅलीला हिरवी झेंडी दाखवून सुरुवात करण्यात आली. सदर रॅली ही सामान्य रुग्णालयातून जटपुरा गेट मार्गे, बसस्टॉप चौक, जटपुरा गेट, गिरनार ते गांधी चौक वरून वापस जिल्हा सामान्य रुग्णालयात समाप्त करण्यात आली. बाईक रॅली मध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी, नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनी, जिल्ह्यातील नामांकित सामाजिक संस्था त्यामध्ये रोटरी क्लब पदाधिकारी, आय.एम.ए. पदाधिकारी, एनर्व्हील क्लब पदाधिकारी, शासकिय नर्सिंग कॉलेज, प्रभादेवी नर्सिंग कॉलेज, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्षाचे  समुपदेशक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, एआरटी केंद्राचे सर्व कर्मचारी, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था द्वारा अनुदानित संकल्प बहुउद्देशीय ग्राम विकास संस्था, लिंक वर्कर स्कीम, मायग्रंट प्रकल्प, संबोधन ट्रस्ट कोअर प्रकल्प,  नोबल शिक्षण संस्था, मायग्रंट प्रकल्प, ट्रकर्स प्रकल्प, विहान प्रकल्प , वन स्टॉप सेंटर इत्यादी स्वयंसेवी संस्थांचे कर्मचारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. world aids day rally in chandrapur

    एड्स ला देशातून हद्दपार करण्यासाठी करा

    रॅलीच्या सुरुवातीला कार्यक्रमाचे अध्यक्ष संदीप रामटेके यांनी, रोटरी क्लबच्या माध्यमातून विविध प्रकारचे सामाजिक कार्य सुरू असून या आजाराला देखील देशातून हद्दपार करण्यासाठी आवश्यक ती मदत करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. त्याचबरोबर एचआयव्ही बाधित रुग्णांना आरोग्याबाबत, पोषक आहाराबाबत काय मदत करता येईल, असेही ते म्हणाले. समाजकार्य विद्यालयाचे प्रा. संतोष आडे यांनी एचआयव्ही एड्स संदर्भात समाजकार्य विद्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमाची माहिती दिली. एआरटीचे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. दिलीप मडावी यांनी एआरटी केंद्र, जिल्ह्यातील एचआयव्ही एड्स बाधीत रुग्णांना मिळणाऱ्या सोयी सुविधा तसेच शासनाच्या योजना याविषयी माहिती देऊन एड्स प्रतिबंध करण्यासाठी कार्य करण्याचे आवाहन केले. 

    जिल्हा कार्यक्रम अधिकारी सुमंत पानगंटीवार यांनी प्रास्तावित करतांना, प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर सूचना देऊन गरोदर माता व सामान्य नागरिकांना एचआयव्ही तपासणी करण्याची सुविधा, साहित्याची उपलब्धता आणखी प्रबळ करण्याचे आश्वासन दिले. त्याचबरोबर डापकू कर्मचारी, आयसीटीसी केंद्र, डीएसआरसी केंद्र व स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, तालुकास्तरावरील व जिल्हा स्तरावरील आयसीटीसी केंद्र कशाप्रकारे कार्यरत असून नागरिकांना मोफत तपासणी, समुपदेशन, उपचार उपलब्ध करून देत आहे, याबद्दल माहिती दिली.

              कार्यक्रमाचे संचालन जिल्हा कार्यक्रम अधिकारी सुमंत पानगंटीवार यांनी तर आभार जिल्हा आयसीटीसी पर्यवेक्षक निरंजन मंगरुळकर यांनी मानले.

  • crime branch action against cattle smugglers । चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

    crime branch action against cattle smugglers : चंद्रपूर १ डिसेम्बर (News३४) – चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने गोवंश तस्करीच्या २ कारवाईमध्ये ९ गोवंश, ४ म्हैस व १ वगार यांची सुटका करीत ७ आरोपींवर गुन्हा दाखल करून एकूण ३७ लक्ष ४० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

    पहिल्या कारवाईत ३० नोव्हेम्बर ला गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे बल्लारपूर अंतर्गत मौजा मानोरा रोडवर नाकाबंदी करीत तीन पिकअप वाहन क्रमांक MH३३ T०४५२, MH३४ BZ ५०८३ व MH ३४ BG ३९५६ यांना थांबवित झडती घेतली असता त्यामध्ये ९ गोवंश जनावरे आढळून आले. सदर जनावरे हे कत्तलीकरिता कोंबून नेत होते. crime branch action against cattle smugglers

    कारवाई : चंद्रपूर पोलिसांनी ३६३ जणांवर केली हद्दपारीची कारवाई

    गुन्हे शाखेने या प्रकरणात २७ वर्षीय राहुल दशरथ नाकाडे, २५ वर्षीय अनिल नारायण सहारे, ३८ वर्षीय रामेश्वर अरुण करंबे तिन्ही राहणार ब्रह्मपुरी, ४३ वर्षीय रणजित पुंजाराम ढोंगे, व पाहिजे असलेला आरोपी पिंटू सय्यद राहणार ब्रह्मपुरी यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम ४९ अंतर्गत महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम गुन्हे दाखल करण्यात आले. या कारवाईत एकूण २९ लक्ष ७० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. crime branch action against cattle smugglers

    चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

    दुसऱ्या कारवाईत रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जुनोना फाटा परिसरात नाकाबंदी करीत गोवंश तस्करांचे वाहन क्रमांक MH २६ CH ३६०१ ला पोलिसांनी थांबवित झडती घेतली असता त्यामध्ये ४ मग म्हैस व एक नग वगार कोंबलेल्या अवस्थेत होते. सदर जनावरे कत्तलीकरिता नेत होते, या प्रकरणी २४ वर्षीय पांडुरंग विठ्ठल तडेकोट व २८ वर्षीय तिरुपती तुळशीराम सादगिरे दोघेही राहणार नांदेड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईत ७ लक्ष ७० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

    दोन्ही कारवाईत पोलिसांनी ३७ लक्ष ४० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सपोनि दीपक कांक्रेडवार, बलराम झाडोकर, पोउपनि विनोद भुरले, संतोष निंभोरकर, पोलीस पथक कर्मचारी धनराज करकाडे, सुरेंद्र महतो, जयंत चुनारकर, प्रदीप मडावी, अजित शेंडे, सुमित बरडे, प्रफुल गार्गात , नितेश महात्मे व मिलिंद टेकाम यांनी केली.