Blog

  • बल्लारपुरात पोलिसांची धांय धांय कारवाई

    Illegal Arms Raid in Ballarpur : चंद्रपूर 6 डिसेंबर (News34) – चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुका गुन्हेगारीचे हब बनू पाहत आहे, काही महिन्यापूर्वी बल्लारपुरातील सूर्यवंशी टोळीने शस्त्रसाठा चंद्रपुरात आणत मोठा गुन्हा करण्याच्या तयारीत होते, पोलिसांनी त्या टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई केली होती, मात्र त्यानंतर सुद्धा बल्लारपूर शहरात बंदुकीचा वापर काही थांबत नाही आहे. (हे वाचा : प्रेमसंबंधात अडसर ठरणाऱ्या पतीची पत्नी व प्रियकराकडून हत्या)

    चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखा व बल्लारपूर पोलिसांच्या कारवाईत २ कट्टे व जिवंत काडतूस सह २ आरोपीना अटक करण्यात आली.

    स्थानिक गुन्हे शाखेच्या पहिल्या कारवाईत

    ५ डिसेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गस्तीवर असताना त्यांना माहिती मिळाली कि एक इसम स्वतःजवळ देशी कट्टा बाळगून फिरत आहे, माहितीच्या आधारे गुन्हे शाखेचे पथक पंडित दीनदयाल वॉर्ड येथे पोहोचले.

    दीनदयाळ वॉर्डातील पेपरमिल कॉलोनी पडित क्वार्टर परिसरात ३९ वर्षीय राहुल दिनेश डंगोरे ला ताब्यात घेत अंगझडती घेतली असता एक देशी बनावटीची जुनी वापरती देशी कट्टा आढळून आला. Illegal Arms Raid in Ballarpur

    आरोपी डंगोरे वर भारतीय हत्यार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला, या कारवाईत ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुढील तपास बल्लारपूर पोलीस करीत आहे.

    या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखा निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सपोनि दीपक कांक्रेडवार, बलराम झाडोकार, पोलीस कर्मचारी स्वामीदास चालेकर, अजय बागेसर, किशोर वैरागडे, गोपीनाथ नरोटे, किशोर वाकाटे, शेखर माथनकर व रिषभ बारसिंगे यांनी केली.

    बल्लारपूर पोलिसांच्या कारवाईत

    रेल्वेनगर वॉर्डात एक इसम आपल्या घरी देशी बनावटीची पिस्टल बाळगून असल्याची माहिती बल्लारपूर पोलिसांना मिळाली, माहितीच्या आधारे पोलिसांनी त्या इसमाच्या घराची झडती घेतली असता ७ MM बोर देशी बनावटीची पिस्टल मॅगझीन सह दोन जिवंत काडतूस आढळून आले.

    देशी बनावटीची पिस्टल व २ जिवंत काडतुसे

    रेल्वे नगर वॉर्डातील ३० वर्षीय मोहम्मद इस्माईल उर्फ नवाब युसूफ शेख वर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी हा ट्रान्सपोर्ट व्यवसायी आहे. भारतीय हत्यार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करीत आरोपी शेख ला अटक करण्यात आली.

    या कारवाईत देशी बनावटीची पिस्टल व जिवंत काडतुसे असा एकूण १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, पुढील तपास बल्लारपूर पोलीस करीत आहे.

    बल्लारपूर पोलिसांच्या कारवाईत पोलीस निरीक्षक बिपीन इंगळे यांच्या नेतृत्वात सपोनि मदन दिवटे, सपोनि शब्बीर पठाण, पोलीस कर्मचारी रणविजय ठाकूर, सुनील कामतकर, पुरुषोत्तम चिकाटे, सत्यवान कोटनाके, संतोष दंडेवार, विकास जुमनाके, शरदचंद्र कारुष, खंडेराव माने व गुरु शिंदे यांचा सहभाग होता.

    स्थानिक गुन्हे शाखा व बल्लारपूर पोलिसांनी या कारवाईत एकूण १७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

  • चंद्रपूरच्या रेल्वे प्रश्नांसाठी खासदार प्रतिभा धानोरकर यांचा सातत्याने पाठपुरावा

    Chandrapur rail connectivity : चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्याच्या रेल्वे प्रश्नांसाठी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी दिल्लीच्या तख्तावर सातत्याने आवाज उठवला आहे. अशा परिस्थितीत, ‘रेल्वे सुविधांचे प्रश्न सोडविण्यासाठी सहकार्य करत नाही’ असे निराधार आणि राजकीय हेतूने प्रेरित आरोप करणे, हे काम करणाऱ्या लोकप्रतिनिधीला बदनाम करण्याचे षड्यंत्र आहे. चंद्रपूर रेल प्रवासी संस्थेच्या उपोषणाला आमचा पूर्ण नैतिक पाठिंबा आहे, मात्र माझ्यावर बिनबुडाचे आरोप करण्याऐवजी, मी केलेल्या धडाडीच्या कामाचा पुरावा जनतेसमोर आहे. (हे हि वाचा – NASP पोर्टल मधील अडचणी दूर करा)

    खासदार प्रतिभा धानोरकर यांचा ‘रेल्वे’साठी सातत्यपूर्ण पाठपुरावा

    १५ जून २०२४ रोजी रेल्वेमंत्र्यांना पत्र: मी स्वतः केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहून (पत्र क्र. १०१२/२०२४), बल्लारपूर-लोकमान्य टिळक टर्मिनल्स (LTT) ही ट्रेन दररोज चालवण्याची आणि काजीपेठ-पुणे ट्रेनच्या फेऱ्या वाढवण्याची मागणी केली आहे. Chandrapur rail connectivity

    ४ जुलै २०२४ रोजी विद्यार्थ्यांसाठी विशेष पत्र:

    चंद्रपूर आणि परिसरातील हजारो विद्यार्थी पुण्यात शिक्षणासाठी आहेत, हे लक्षात घेऊन काजीपेठ-पुणे एक्सप्रेस दररोज चालवण्यासाठी त्यांनी रेल्वे मंत्र्यांना पुन्हा स्वतंत्र पत्र (क्रमांक १०९८/२०२४) दिले.

    ०२ एप्रिल २०२५ रोजी संसदेत जाब:

    खासदार प्रतिभा धानोरकर यांनी लोकसभेत अतारांकित प्रश्न क्रमांक ५२११ द्वारे चंद्रपूर ते पुणे आणि मुंबईसाठी थेट रेल्वे गाड्यांची कमतरता असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता आणि नियमित सुपरफास्ट गाड्या सुरू करण्याची मागणी केली होती.

    कोरोना काळात बंद झालेली बल्लारशाह-मुंबई लिंक कोच सेवा (जी सेवाग्राम एक्सप्रेसला जोडली जात होती) ती पूर्ववत सुरू करण्यासाठी त्यांनी पत्र (क्रमांक ३९२३/२०२४) दिले आहे, जेणेकरून सामान्य प्रवाशांची सोय होईल.

    वरोरा येथील प्रवाशांच्या सोयीसाठी कोरोना काळापासून बंद असलेल्या गाड्यांचे थांबे पूर्ववत करण्याची मागणीही त्यांनी १५ जून २०२४ च्या पत्राद्वारे केली आहे

    आरोप करणाऱ्यांनी हे लक्षात घ्यावे की, आम्ही सातत्याने मागणी करत असतानाही रेल्वे प्रशासन आणि केंद्र सरकार आमच्या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. आंदोलकांनी आपला रोष काम करणाऱ्या लोकप्रतिनिधीवर न काढता, निर्णयाचा अधिकार असलेल्या प्रशासनावर व्यक्त करावा.

    खासदार प्रतिभा धानोरकर यांनी स्पष्ट केले आहे की, यापुढेही चंद्रपूरकरांना हक्काची रेल्वे मिळेपर्यंत माझा लढा सुरूच राहणार असून, जनहिताच्या कामात राजकीय अडथळे आणणाऱ्या शक्तींचा त्यांनी तीव्र निषेध त्यांनी केला आहे.

  • संविधानाचे पालन हीच खरी राष्ट्रसेवा – आ. किशोर जोरगेवार

    mahaparinirvan diwas : चंद्रपूर ६ डिसेंबर (News३४) – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आमदार किशोर जोरगेवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात आले. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याल्याही मार्ल्यापण करण्यात आले.

      यावेळी भारतीय जनता पक्षाचे महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, बहुजन महिला आघाडी प्रमूख विमल कातकर, विधानसभा अध्यक्ष वंदना हातगावकर, युवा मोर्चा अध्यक्ष मयुर हेपट, मंडळ अध्यक्ष सुभाष अदमाने, स्वप्निल डुकरे, महामंत्री सविता दंढारे, श्याम कनकम, माजी नगर सेविका पूष्पा उराडे, सुषमा नागोसे, खुशबु चौधरी, कल्पना शिंदे, दुर्गा वैरागडे, आशु फुलझेले, नितेश गवळी, शितल गुरनुले आदिंची उपस्थिती होती. (नक्की वाचा – प्रेमसंबंधात अडसर ठरलेल्या पतीची प्रियकराने केली हत्या)

    बाबासाहेबांच्या विचारावर चालणे हीच खरी आदरांजली

     यावेळी बोलतांना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले कि, महापरिनिर्वाण दिन हा केवळ स्मरणाचा नाही, तर जागृतीचा दिवस आहे. बाबासाहेबांनी समाजाचे रुपांतर केले. त्यांनी अंधारातून प्रकाशाकडे, गुलामगिरीतून स्वाभिमानाकडे आणि अन्यायातून न्यायाकडे नेणारा मार्ग दिला. आज आपण त्यांच्या विचारांवर चालणे हीच खरी आदरांजली आहे. बाबासाहेबांनी दिलेले संविधान हे आपल्या देशाचे बळ आहे. mahaparinirvan diwas

    समानता, स्वातंर्त्य, बंधुता आणि न्याय या तत्त्वांवर उभा असलेला हा देश मजबूत ठेवण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकावर आहे. संविधानाचे पालन करणे, कर्तव्य बजावणे आणि समाजात सकारात्मकता निर्माण करणे हीच खरी राष्ट्रसेवा आहे. धम्म म्हणजे शांतता, नैतिकता आणि मानवी मूल्ये आहे. एकमेकांचा आदर, सहिष्णुता आणि सद्भावना हीच खरी जीवनशैली आहे.

    शिक्षण सर्वात मोठे शस्त्र

    शिक्षण हेच आपले सर्वात मोठे शस्त्र आहे. तरुणांनी शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःला सक्षम करावे, समाजासाठी पुढे यावे आणि बाबासाहेबांच्या विचारांची मशाल उजळवत ठेवावी. बाबासाहेबांचा विचार कृतीत उतरवणं हेच आपल्या जीवनाचं ध्येय असलं पाहिजे. समाजात न्याय, शिक्षण आणि समतेचा दीप पेटत राहिला पाहिजे.  असे ते यावेळी म्हणाले.  यावेळी म्हणाले. यावेळी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

  • पत्नी व प्रियकराने मिळून पतीची केली हत्या

    Meghwanshi murder : राजुरा (चंद्रपूर) ६ डिसेंबर (News३४) : पत्नीला नेण्यासाठी चंद्रपुरात आलेल्या पतीला पत्नी व तिच्या प्रियकराने ठार केल्याची घटना ५ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता राजुरा तालुक्यातील हरदोना गावात घडली, पोलिसांनी या प्रकरणी पत्नी व तिच्या प्रियकराला ताब्यात घेतले आहे. ३० वर्षीय राजेश नारायणलाल मेघवंशी राहणार भिलवाडा राजस्थान असे मृतकाचे नाव आहे.

    राजुरा तालुक्यातील हरदोना गावात ब्लास्टिंग च्या कामासाठी विविध राज्यातील अनेक कामगार या ठिकाणी राहतात. मागील वर्षी राजेश मेघवंशी व त्याची पत्नी दुर्गा उर्फ जिया काम करण्यासाठी हरदोना मध्ये आले होते. काही महिन्यांनी राजेश आपल्या पत्नीसह राजस्थान मध्ये आपल्या गावी परतले, हरदोना मध्ये काम करतेवेळी चंद्रप्रकाश मेघवंशी सोबत दुर्गाचे प्रेमसंबंध जुळले होते. विशेष म्हणजे चंद्रप्रकाश हा राजस्थान राज्यातील भिलवाडा गावात राहणारा असून तो मृतकाच्या पत्नीचा नात्यात भाऊ लागत होता. (हे हि वाचा : १३ ग्राम एमडी सह २ युवकांना अटक)

    प्रेमसंबधाचा खुनी शेवट

    प्रेमसंबंधात वेडसर झालेल्या चंद्रप्रकाश व दुर्गा ने सोबत जीवन मरणाच्या आणाभाका घेतल्या होत्या, ६ महिन्यापूर्वी चंद्रप्रकाश ने दुर्गा ला भिलवाडा मधून पळवीत राजुरा तालुक्यातील हरदोना मध्ये आणले. याबाबत राजेश ने भिलवाडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती. Meghwanshi murder

    पोलीस तपासात दुर्गा हि चंद्रपूर जिल्ह्यातील हरदोना गावात असल्याची माहिती राजेशला मिळाली, २ मुली व एक मुलगा आईच्या प्रेमात पोरके व्हायला नको यासाठी राजेश व त्याचा मित्र जगदीश मेघवंशी यांनी हरदोन जायचे ठरविले.

    २९ नोव्हेम्बर रोजी राजेश व जगदीश राजस्थान वरून निघाले, आधी नागपूर, चंद्रपूर व नंतर गडचांदूरात त्यांनी पत्नीचा शोध घेतला, ५ डिसेंबर रोजी दुर्गा हि ब्लास्टिंग च्या कामासाठी राहत असलेल्या कामगारांच्या वसाहत परिसरात राहत असल्याची माहिती राजेश ला मिळाली.

    पत्नीने प्रियकराला दिली तलवार

    सायंकाळी ६.३० वाजता राजेश हरदोना आपल्या मित्रांसह पोहोचला, त्यावेळी चंद्रप्रकाश त्यांना दिसला, तू माझ्या पत्नीला का पळवून आणला असा जाब राजेश ने त्याला विचारला असता दोघांमध्ये यावरून वाद वाढला, वाद विकोपाला गेल्यावर चंद्रप्रकाश ने दुर्गा ला आवाज दिला, त्यावेळी दुर्गा ने चंद्रप्रकाश च्या दिशेने तलवार फेकली, त्या तलवारीने राजेश च्या डोक्यावर चंद्रप्रकाश ने जबर प्रहार केला.

    अचानक झालेल्या या हल्ल्यात राजेश खाली कोसळला, रक्तबंबाळ अवस्थेत पडलेल्या राजेश चा काही क्षणात मृत्यू झाला, जगदीश ने स्वतःचा जीव वाचवीत, घटनस्थळावरून पळ काढत पोलीस स्टेशन गाठले. राजुरा पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठले. काही तासात पोलिसांनी दुर्गा उर्फ जिया व चंद्रप्रकाश मेघवंशी ला ताब्यात घेतले.

    प्रेमसंबंधात पती अडसर

    जगदीश मेघवंशी ने पोलिसांना माहिती दिली कि चंद्रप्रकाश व दुर्गा यांच्या प्रेमसंबंधात राजेश अडसर ठरत होता, त्यामुळे त्याचा काटा काढण्यासाठी दुर्गा ने चंद्रप्रकाश ला उकसवत त्याची हत्या केली.

    काही दिवसांपूर्वी कोरपना तालुक्यात पत्नीच्या प्रियकराने पतीची हत्या केल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. प्रेमात अडसर ठरत असलेल्या पतीची प्रियकराने हत्या करीत अपघाताचा बनाव केला होता.

  • NSAP पोर्टल मधील अडचणी दूर करा!

    NSAP portal : चंद्रपूर ५ डिसेंबर (News३४) : चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष सौ. चंदाताई वैरागडे यांनी, केंद्रपुरस्कृत निराधार आणि विविध योजनांच्या ऑनलाइन नोंदणीमध्ये गरजू लाभार्थ्यांना येत असलेल्या गंभीर अडचणी प्राधान्याने सोडवण्याबाबत, चंद्रपूर जिल्ह्याच्या खासदार मा. प्रतिभाताई धानोरकर आणि जिल्हाधिकारी मा. विनय गौडा यांना निवेदन दिले आहे.

    🛑 योजनेच्या लाभापासून लाभार्थी वंचित राहण्याची प्रमुख कारणे:

    • आधार कार्ड पडताळणीची अडचण: इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विकलांग योजना आणि राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना यांसारख्या केंद्रपुरस्कृत योजनांची ऑनलाइन नोंदणी करताना, लाभार्थ्यांचे आधार कार्ड एकदा ‘वेरिफाय’ (पडताळणी) झाल्यावर दुसऱ्यांदा वेरिफाय होत नाही. यामुळे लाभार्थ्यांना कोणत्याही योजनेचा लाभ मिळत नाही. NSAP portal
    • NSAP पोर्टलवरील त्रुटी: ‘नॅशनल सोशल असिस्टन्स प्रोग्राम’ (NSAP) या पोर्टलवर आवश्यक सुधारणा जोपर्यंत केल्या जात नाहीत, तोपर्यंत गरजू लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ मिळणार नाही, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. (हे हि वाचा : चंद्रपुरात एमडी पावडर सह दोघांना अटक)

    💰 अनुदान थकबाकी आणि लाभार्थ्यांचा मानसिक त्रास:

    • ज्या गरजू लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ मिळत होता, त्यांचे डिसेंबर २०२३ पासूनचे अनुदान थकीत आहे.
    • अनुदान मिळवण्यासाठी हे गरजू लाभार्थी शासकीय कार्यालयात सातत्याने चकरा मारत असून, त्यामुळे प्रचंड मानसिक तणावात आहेत.

    💡 काँग्रेसची आग्रही मागणी:

    या अतिशय गंभीर विषयाची त्वरित दखल घेऊन, केंद्रपुरस्कृत योजनांची नोंदणी राज्य पुरस्कृत ‘महाडीबीटी’ पोर्टलवर करावी किंवा इतर कोणत्याही योग्य माध्यमातून ही गंभीर समस्या सोडवून गरजू लाभार्थ्यांना न्याय द्यावा, अशी आग्रही मागणी सौ. चंदाताई वैरागडे यांनी केली आहे.

    मा. खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी वरील समस्या सोडविण्यासाठी विश्वास व्यक्त केला आहे.

  • जिल्हाधिकारी गौडा यांनी केली ईव्हीएम स्ट्रॉंग रूमची पाहणी

    EVM security guidelines : चंद्रपूर, दि. ०५ डिसेंबर (News३४) : नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी चंद्रपूर  विनय गौडा जी. सी. यांनी आज वरोरा तालुक्यात विविध कार्यांचा आढावा घेत क्षेत्रदौरा केला. सुरवातीला त्यांनी वरोरा येथील मतमोजणीसाठी ठेवण्यात आलेल्या ईव्हीएम मशीनच्या स्ट्रॉंग रूमची पाहणी करून  सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला आणि ईव्हीएम सुरक्षेसंदर्भात आवश्यक त्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

    यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी मौजे शेगाव बुद्रुक येथील झुडपी जंगल गट क्रमांक 1 ची पाहणी केली. सदर जमीन डी-लिस्टिंगसाठीचा प्रस्ताव वन विभागास पाठविण्याची प्रक्रिया महसूल विभागाने गतिमान करावी, असे निर्देश त्यांनी महसूल अधिकाऱ्यांना दिले. यानंतर चारगाव बुद्रुक येथील प्रगतशील शेतकरी  मधुकर भलमे यांच्या तूर उत्पादन व बियाणे उत्पादन शेताला जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिली. (हे हि वाचा : ताडोबा अभयारण्यात नियमांचे उल्लंघन)

    शेतकऱ्यांना मार्गदर्शन

    तेलबिया उत्पादन वाढीसाठी नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब, प्रयोगशील शेती आणि नाविन्यपूर्ण पद्धतींना प्रोत्साहन देण्याची गरज आहे, असे सांगून कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन व प्रोत्साहन देण्याचे निर्देश त्यांनी उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांना दिले. EVM security guidelines

    या दौऱ्यात उपविभागीय अधिकारी  संदीप भस्के, तहसीलदार योगेश कौटकर, पोलीस निरीक्षक श्री. तांबाडे, उपविभागीय कृषी अधिकारी कविता हरिणखेडे, मुख्याधिकारी नगरपरिषद वरोरा श्री. मेश्राम, तालुका कृषी अधिकारी श्री. राठोड, महसूल मंडळ अधिकारी अजय निखाडे यांसह तलाठी व कृषी सहाय्यक उपस्थित होते.

  • ब्रेकिंग: पक्षफोडी सरकारवर धानोरकरांचा हल्लाबोल!

    Maharashtra politics : चंद्रपूर ५ डिसेंबर (News३४) –महाराष्ट्र राज्यात ‘दोन पक्ष फोडून’ स्थापन झालेल्या वर्तमान सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर, खासदार प्रतिभा धानोरकर यांनी राज्य सरकारच्या कामगिरीवर जोरदार टीका केली आहे. ‘संतभूमी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्राचे चित्र गेल्या वर्षभरात अत्यंत निराशाजनक झाले असून, राज्याचे जगासमोर ‘तीन तिघाडा आणि महाराष्ट्राचे काम बिघाडा’ असे लाजिरवाणे झाले आहे, अशी घणाघाती टीका त्यांनी केली आहे.

    राज्यातील शेतकरी संकटात

    खासदार प्रतिभा धानोरकर यांनी म्हटले आहे की, एकीकडे महाराष्ट्र सुजलाम सुफलाम आहे, मात्र सध्या राज्यातील शेतकरी पूर्णपणे संकटात सापडले आहेत आणि राज्याची घडी पूर्णपणे मोडलेली आहे. “राज्यात कायद्याची आणि सुव्यवस्थेची स्थिती इतकी बिघडली आहे की, राज्यातील महिलांना निवडणूक अर्ज भरण्यासाठीसुद्धा बंदूकधारी  घेऊन जावे लागते, ही बाब अत्यंत दुर्दैवी आणि लाजिरवाणी आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. (हे हि वाचा : चंद्रपूर स्थानिक निवडणुकीतील उमेदवारांसाठी दिलासादायक बातमी)

    वर्षभरात पक्ष फोडण्याचे काम

    “या एका वर्षात सरकारने दोन प्रमुख पक्ष फोडून हे सरकार बनवले. पण या सत्तासंघर्षातून आणि पक्षफोडीच्या राजकारणातून सामान्य नागरिकांसाठी काय साध्य केले आहे?” असा थेट प्रश्न खासदार प्रतिभा धानोरकर यांनी उपस्थित केला आहे. केवळ सत्ताकारणासाठी धडपडणाऱ्या या सरकारने महाराष्ट्राची प्रतिमा आणि प्रगती दोन्ही धोक्यात आणले आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

    खासदार प्रतिभा धानोरकर यांनी या सरकारला आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला देत, त्वरित राज्याच्या मूलभूत समस्यांवर आणि शेतकरी व महिलांच्या सुरक्षेवर लक्ष केंद्रित करण्याची मागणी केली आहे.

  • चंद्रपूर स्थानिक निवडणुकीत उमेदवारांना सुखद बातमी!

    Election expenses : चंद्रपूर ५ डिसेंबर (News३४) – महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (नगर परिषद व नगर पंचायत) निवडणुका न्यायालयीन प्रक्रियेमुळे पुढे ढकलल्या गेल्याने, उमेदवारांच्या निवडणूक खर्चाचे व्यवस्थापन एक कळीचा मुद्दा बनले आहे. या पार्श्वभूमीवर, खासदार प्रतिभा धानोरकर यांनी मुख्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग यांच्याकडे एक अत्यंत महत्त्वपूर्ण मागणी केली आहे.

    दिलासादायक मागणी

    उमेदवारांना आर्थिक ताणातून दिलासा देण्यासाठी, निवडणूक खर्चाची गणना नवीन वेळापत्रकानुसार निवडणूक चिन्ह वाटपाच्या दिवसापासून (११ डिसेंबर) सुरू करावी, अशी स्पष्ट भूमिका खासदार प्रतिभा धानोरकर यांनी मांडली आहे. यापूर्वी झालेला सर्व खर्च निवडणूक खर्च म्हणून ग्राह्य धरू नये, अशी त्यांची आग्रही विनंती आहे. (हे हि वाचा – ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पात नियमांची पायमल्ली)

    खासदार प्रतिभा धानोरकर यांनी मुख्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग, मुंबई यांना पत्र लिहून, सध्याच्या न्यायालयीन प्रक्रिया व निवडणूक आयोगाच्या आदेशामुळे पुढे ढकलण्यात आलेल्या नगर परिषद व नगर पंचायत निवडणुकांमधील उमेदवारांच्या खर्चाबाबत स्पष्ट मार्गदर्शक सूचना जारी करण्याची विनंती केली आहे.

    खर्च ग्राह्य धरू नये

    खासदार प्रतिभा धानोरकर यांनी पत्रात नमूद केले आहे की, मा. न्यायालयीन प्रक्रिया व आयोगाच्या आदेशानुसार, ज्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत, त्यासाठी उमेदवारांनी यापूर्वी केलेला सर्व खर्च हा निवडणूक खर्च म्हणून ग्राह्य धरू नये. Election expenses

    उमेदवारांवर अनावश्यक आर्थिक ताण पडू नये आणि निवडणुकीत समान संधी मिळावी यासाठी, निवडणुकीच्या नवीन वेळापत्रकानुसार दिनांक ११ डिसेंबर रोजी निवडणूक चिन्हांचे वाटप होणार आहे.खासदार प्रतिभा धानोरकर यांची मागणी आहे की, ११ डिसेंबर रोजी निवडणूक चिन्ह वाटप झाल्यानंतर, त्या दिवसापासून उमेदवारांनी केलेला प्रत्येक खर्च हा निवडणूक खर्च म्हणून ग्राह्य धरण्यात यावा,

    मार्गदर्शक सूचना निर्गमित करा

    तर या तारखेपूर्वी झालेला खर्च कोणत्याही परिस्थितीत ग्राह्य धरला जाऊ नये. खासदार प्रतिभा धानोरकर यांनी या अतिशय महत्त्वाच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून, संबंधित जिल्हाधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी आणि निवडणुकीतील उमेदवार यांना या संदर्भात स्पष्ट आणि त्वरित मार्गदर्शक सूचना त्वरित निर्गमित करण्यात याव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

  • चंद्रपुरात १३.५० ग्रॅम एमडीसह २ तरुणांना अटक

    Police raid MD drugs : चंद्रपूर ५ डिसेंबर (News३४) – चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने अंमली पदार्थ (एमडी) मेफेड्रोन ची विक्री करणाऱ्या २ तरुणांना अटक करीत त्यांचेजवळून १३.५० ग्राम एमडी सह २ लक्ष २३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

    चंद्रपूर जिल्ह्यात सुरु असलेल्या अवैध धंद्यांविरोधात गुन्हे शाखा मोहीम राबवित कारवाई करीत आहे. जुगार असो कि अंमली पदार्थाची विक्री यावर प्रतिबंधात्मक कारवाई पोलिसांकडून सुरु आहे. (हे वाचा – स्थानिक गुन्हे शाखेची वाळू तस्करावर कारवाई)

    एमडी तस्करी वाढली

    चंद्रपुरात काही वर्षांपासून गांजा व एमडी पावडरची तस्करी मोठ्या प्रमाणात वाढली आहे, यावर नियंत्रण यावे यासाठी पोलीस यंत्रणा प्रयत्न करीत असली तरी छुप्या मार्गाने हे पदार्थ जिल्ह्यात यदाखल होत आहे.

    म्हाडा कॉलोनी मध्ये राहणारे २४ वर्षीय प्रांजल राकेश तिवारी व २४ वर्षीय अदनान जाकीर शेख राहणार म्हाडा कॉलोनी हे दोघे एमडी पावडरची विक्रीसाठी नागपूर रोडवरील ढाब्याजवळ आले होते. Police raid MD drugs

    गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई

    गुन्हे शाखेला याबाबत गोपनीय माहिती प्राप्त होताच दोघांना ढाब्याजवळून अटक केली, आरोपी प्रांजल तिवारी व अदनान शेख कडून १३.५० ग्राम एमडी पावडर, रोख रक्कम सह दोन मोबाईल असा २ लक्ष २३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दोघांवर रामनगर पोलीस स्टेशनमध्ये NDPS अधिनियम अन्व्ये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी आरोपी वाढण्याची शक्यता आहे.

    यशस्वी कारवाई पथक

    सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पोउपनि विनोद भुरले, सुनील गौरकार, पोलीस कर्मचारी सुभाष गोहोकार, सतीश अवथरे, रजनीकांत पुठ्ठावार, दीपक डोंगरे, इम्रान खान, किशोर वाकाटे, शशांक बदामवार, हिरालाल गुप्ता यांनी केली. प्रकरणाचा पुढील तपास सपोनि निलेश वाघमारे करीत आहे.

  • ताडोबा कोर झोनमध्ये ड्रोन उडवला: नियमभंग प्रकरण

    चंद्रपूर/ताडोबा ५ डिसेंबर (News३४) : Tadoba rule violation प्रकरणात गोविंदा असोपा नावाच्या तरुणाने ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोर झोनमध्ये वाहन थांबवून खाली उतरला. ड्रोन उडवून रील शूट केली. अधिकाऱ्याच्या गाडीचा वापर झाल्याची चर्चा सुरु असून अद्यापही वनविभागाने त्या युवकावर कारवाई केली नाही.

    कोर झोनमध्ये सर्रास नियमभंग: काय घडले?

    ताडोबा कोर झोनमध्ये वाहनातून खाली उतरण्यास सक्त मनाई. असे असताना सुद्धा
    गोविंदा असोपा याने परवानगी नसताना गाडी थांबवली.
    फोटो, व्हिडिओ रील शूट + ड्रोन उडवले आणि अपलोडही केले.

    अधिकाऱ्याच्या गाडीचा वापर? वरदहस्ताचा संशय

    बफर झोनमध्येही उतरण्यास बंदी, कोर झोनमध्ये हा प्रकार.
    ताडोबा अधिकाऱ्याची गाडी वापरल्याची चर्चा.
    वन्यजीवप्रेमींकडून चौकशीची मागणी, असोपा याला वनविभागाच्या अधिकाऱ्यांचे पाठबळ तर नाही अशी चर्चा आता बाहेर आली आहे.

    दुर्दैवी : कौटुंबिक वाद, युवकाने स्वतःला पेटवले

    वन विभागाची कारवाई कधी? ताडोबा सुरक्षेला धोका

    अद्याप गोविंदा असोपा यांच्यावर कोणतीही कारवाई नाही.
    Tadoba rule violation मुळे वन्यजीवांना धोका निर्माण झालं आहे.
     ताडोबा नियम पहा.

    वन्यजीव सुरक्षेसाठी कडक चौकशी आवश्यक

    गोविंद असोपा यांच्या विरुद्ध वनविभागाला तक्रार देण्यात आली आहे, वन्यजीवांच्या या क्षेत्रात असोपा यांनी नियमांचे भंग करीत वन्यजीवांची सुरक्षा धोक्यात टाकली आहे, उलट तक्रारदाराला असोपा यांनी धमकी सुद्धा दिली असल्याचे तक्रारीत नमूद आहे.