Blog

  • भद्रावती प्रचारात खळबळ! महिलांचा संताप, भाजप उमेदवार झाले व्हायरल

    BJP candidate Anil Dhanorkar viral video : चंद्रपूर २८ नोव्हेम्बर (News३४) – चंद्रपूर जिल्ह्यात १० नगरपालिका व १ नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे, या रणधुमाळीत सर्वच राजकीय पक्ष प्रचारावर जोर देत आहे मात्र काही उमेदवारांना मतदारांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. जिल्ह्यातील भद्रावती नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाचे भाजप उमेदवार अनिल धानोरकर यांना महिलांच्या रोषाचा सामना करावा लागला, याचा व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे.

    निवडणूक – वरोरा शहरात भाजप उमेदवाराला मारहाण, तिघांना अटक

    भद्रावती नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारकार्यात व्यस्त असलेले भाजपचे उमेदवार अनिल धानोरकर यांना गवराळा गावात महिलांच्या तीव्र रोषाचा सामना करावा लागला. धानोरकर हे दारू व्यावसायिक असून शहरासह परिसरात त्यांची अनेक दारू दुकाने असल्याची स्थानिकांची माहिती आहे. रात्री गवराळा गावात गेल्यावर दारू दुकानावरून महिला धानोरकर यांच्यावर महिला चांगल्या संतापल्या.

    प्रचारासाठी वॉर्डात प्रवेश करताच महिलांनी धानोरकर यांना वॉर्डातील दारू दुकानांमुळे तरुण मुलं व्यसनाधीन होत असल्याची तक्रार केली. “दारू दुकानामुळे आमच्या घरातील आणि समाजातील तरुण बिघडत आहेत, तुम्हीच मालक असताना आम्ही कोणाकडे तक्रार करायची?” अशा शब्दांत महिलांनी जाब विचारला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे धानोरकरांची चांगलीच नाचक्की झाली, परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे समजताच धानोरकर यांनी माघार घेतली.

    भद्रावती नगरपरिषदेत अनेक वर्षे शिवसेनेची सत्ता होती, पक्ष विखुरले आणि परिस्थिती बदलली, नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उभे असलेले उमेदवार हे ३ ते ४ पक्षाचा प्रवास करून आपण निष्ठावंत असल्याचे दाखवीत आहे, मात्र अनेक वर्षे सत्ता उपभोगल्यावर उमेदवारांना रोषाचा सामना करावा लागत आहे.

  • वरोरा नगरपरिषद निवडणूक; प्रचारादरम्यान भाजपा उमेदवारावर जीवघेणा हल्ला; तिघांना अटक

    प्रचारादरम्यान झाला हल्ला

    Warora bjp candidate attack वरोरा, चंद्रपूर | गुरुवार, २७ नोव्हेंबर, २०२५ | (News34) – वरोरा येथील प्रभाग क्रमांक ५ मधून नगरसेवक पदासाठी उभे असलेले भारतीय जनता पक्षाचे (BJP) उमेदवार अनिकेत धनराज नाकाडे (वय ३५) यांच्यावर गुरुवारी, २७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास जीवघेणा हल्ला झाला. अचानक उद्भवलेल्या शाब्दिक वादातून हा हल्ला झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.

    हे वाचा : चंद्रपुरात कालबाह्य औषधे खुलेआम जाळली, गुन्हा दाखल करा – राजेश बेले


    तिघांनी हल्ला करीत केली मारहाण

    भाजप उमेदवार अनिकेत नाकाडे दुपारी सुमारे ४:३० वाजता आपल्या समर्थकांसह दत्त मंदिर वार्डात प्रचार करत होते. यादरम्यान शुभम टोरे आणि अनिकेत नाकाडे यांच्यात अश्लील शिवीगाळ झाल्यामुळे वाद झाला. काही वेळातच शुभम टोरेने आपल्या सहकारी अमोल मडावी आणि गोलू मडावी यांसह नाकाडे यांच्यावर हल्ला करून जबर मारहाण केली. पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आरोपींनी नाकाडे यांच्यावर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न देखील केला. या हल्ल्यात नाकाडे यांना दुखापत झाली. Warora bjp candidate attack

    या प्रकरणी भाजप उमेदवार नाकाडे यांनी मारहाण बाबत वरोरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे, तक्रार प्राप्त होताच वरोरा पोलिसांनी कारवाई करीत तिघांना अटक केली आहे. आरोपीवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी भाजप तर्फे करण्यात आली आहे.

    वरोरा नगरपरिषद निवडणूक आता चुरशीची झाली असून सर्वच राजकीय पक्षाचे उमेदवार प्रचारात गुंतले आहे, अश्यातच असे प्रसंग घडणे हे सर्वच उमेदवारासाठी नुकसानदायक आहे.

  • कालबाह्य औषधे खुलेआम जाळली!, गुन्हा दाखल करा – राजेश बेले

    expired medicines burning case : चंद्रपूर २७ नोव्हेम्बर (News३४) – वेस्टर्न कोलफिल्ड लि. चंद्रपूर येथील क्षेत्रीय रूग्णालयाच्या आवारात कालबाह्य झालेली औषधी आणि काही वैद्यकीय साहित्य दि. 26/11/2025 रोजी उघडपणे जाळले असल्यामुळे हवेमध्ये रासायनिक वायू प्रदूषण निर्माण झाले आहे.

    गुन्हा दाखल करा

    त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या तसेच पाळीव प्राणी, जल पाणी व पक्षी यांच्या आरोग्याला व जिवाला धोका निर्माण झालेला असल्यामुळे क्षेत्रीय रूग्णालय, लालपेठ येथील क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी व त्याचे सहयोगी कर्मचारी यांच्यावर योग्य ती कायदेशीर कार्यवाही करून फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी तक्रार पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अध्यक्ष व सदस्य सचिव, चंद्रपूर जिल्हाधिकारी चंद्रपूर महानगरपालिका आयुक्त, वेकोली मुख्य प्रबंधक यांच्याकडे राजेश बेले संस्थापक अध्यक्ष संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्था यांनी केलेली आहे.

    योजना – चंद्रपुरात सुरु झाली किलकारी योजना

    waste burning


    महाराष्ट्र शासनाने बॉयोमेडिकल वेस्ट विल्हेवाट लावण्याकरीता चंद्रपूर, एम. आय. डी.सी. परिसरामध्ये बॉयोमेडिकल वेस्ट प्रकल्प विल्हेवाट लावण्याकरीता उभारले असतेवेळी वेस्टर्न कोल्डफिल्ड लि. चंद्रपुर क्षेत्रीय रूग्णालय, लालपेठ, क्षेत्रीय वैद्यकीय आधिकारी व त्यांचे सहयोगी कर्मचारी पदाची गरीमाची पायमल्ली करून नागरिकाच्या जीवाला व आरोग्याला मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झालेला आहे. त्यांच्यावर लिपापोती करण्यात चंद्रपूर शहर महानगरपालिका, स्वच्छता विभाग सहभागी असल्याचे निदर्शनास आले आहे. illegal biomedical waste burning

    घाण कचरा संकलन गाडीमध्ये संपूर्ण कालबाहय झालेली औषधी आणि काही वैद्यकीय जाळलेली स पूर्ण सामुग्री वेस्टर्न कोल्डफिल्ड लि. चंद्रपूर क्षेत्रीय रूग्णालय, लालपेठ, क्षेत्रीय वैद्यकीय आधिकारी यांनी पदाचा दुरूपयोग करून कॉलनी परिसरात कचरा संकलन करण्याकरीता आलेल्या गाडीमध्ये टाकण्याकरीता कचरा संकलन करणा-या कर्मचारा-यावर दबाव यंत्रणेचा वापर करून कालवाहय झालेल्या औषणी आणि वैद्यकीय सामुग्री जाळलेल्या पाणकच-याची विल्हेवाट लावण्यास भाग पाडले. अशा क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी व त्या चे सहयोगी कर्मचारी या व्यावर योग्य ती कायदेशीर कार्यवाही करून फौजदारी गुन्हा दाखल करून निल बनाची कार्यवाही करण्यात अशी मागणी संस्थापक अध्यक्ष राजेश वारलूजी बेले संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्था चंद्रपूर यांनी केली आहे

  • चंद्रपूरमध्ये मातृत्व व बालआरोग्यासाठी किलकारी मोफत सेवा सुरु

    गर्भवती महिला आणि बालआरोग्यासाठी भारत सरकारची मोफत ऑडिओ कॉल सेवा – किलकारी

    Kilkari audio messages for new mothers : चंद्रपूर 27 नोव्हेंबर (News३४) – मातृत्व व बालआरोग्य सशक्त करण्याच्या दिशेने केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय अंतर्गत किलकारी ही मोबाईल-आधारित मोफत स्वास्थ्य सेवा देशभर प्रभावीपणे कार्यरत आहे. या सेवेमधून गरोदर महिला व एक वर्षाखालील बाळ असलेल्या कुटुंबांना त्यांच्या मोबाईलवर स्थानिक भाषेत (मराठीसहित) आठवड्यातून 1 वेळा आरोग्यविषयक मार्गदर्शन ऑडिओ कॉलद्वारे दिले जाते.

    क्राईम – गोवंशीय जनावरांची वाहतूक, २ आरोपीना अटक

    कोण लाभ घेऊ शकतो?

    किमान 4 महिन्यांची नोंदणी झालेली गर्भवती महिला
    तसेच 1 वर्षाखालील बाळ असलेली कुटुंबे
    कॉल कोणत्या क्रमांकावरून येईल?
    या सेवेचे सर्व अधिकृत कॉल 1600403660 या फोन क्रमांकावरून येतात. नागरिकांनी हा क्रमांक आजच आपल्या मोबाईलमध्ये जतन (Save) करून ठेवावा, जेणेकरून कॉल सहज ओळखता येईल आणि महत्त्वाचा संदेश ऐकणे चुकू नये. येणारा कॉल हा ३ ते ५ मिनिटांचा असुन पुर्ण कॉल ऐकणे आवश्यक आहे.  


    गरोदर महिलेला कॉल कधीपासून येतात?
    गर्भधारणेच्या 13 व्या आठवड्यापासून (किंवा अंदाजे 4 थ्या महिन्यापासून) गरोदर महिलेला किलकारीचा फोन आठवड्यातून 1 वेळा येण्यास प्रारंभ होतो.
    तसेच बाळ 1 वर्षाचे होईपर्यंत हे कॉल नियमितपणे प्राप्त होत राहतात.
    कॉल चुकला तर काय?
    एखादा कॉल नागरिकांकडून चुकल्यास, किंवा पुन्हा ऐकायचा असल्यास, नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून 14423 हा नंबर डायल करून त्याच आठवड्याचा किलकारी संदेश अगदी मोफत पुन्हा ऐकता येतो.


    किलकारी संदेशात काय असते?
    गरोदर महिलेच्या गर्भावस्थेच्या महिन्यानुसार आवश्यक आरोग्य सूचना
    उदा. जर एखादी महिला 5 व्या महिन्यात असेल, तर तिला 5 व्या महिन्यात अपेक्षित मार्गदर्शनच दिले जाते.
    त्याचप्रमाणे, बाळाच्या वयानुसार दर आठवड्याला बाळाच्या आरोग्य व देखभालीबाबत मार्गदर्शन दिले जाते.
    संदेशामध्ये आहार, औषधोपचार, नियमित तपासणी, लसीकरण, आजार प्रतिबंध, आरोग्यसवयी, आणि काळजी घेण्याच्या आवश्यक टिप्सचा समावेश असतो.


    सेवा सुरू करण्यासाठी नोंदणी कशी करावी?
    आपल्या भागातील आशा सेविका, ए.एन.एम. आरोग्य कर्मचारी किंवा जवळील शासकीय आरोग्य केंद्रात जा.
    गर्भधारणा किंवा बाळाच्या जन्माची अधिकृत नोंदणी करून घ्या.
    नोंदणी करताना तोच मोबाईल क्रमांक द्या ज्यावर तुम्हाला किलकारीचे कॉल प्राप्त करायचे आहेत.
    ही माहिती ऑनलाइन आर.सी.एच. प्रणाली मध्ये नोंदवली जाईल आणि त्यानंतर कॉल्स आपोआप सुरू होतील.


    सेवेचा मुख्य उद्देश –
    किलकारी सेवेमुळे गरोदर महिला, नवमाता, बाळ, आणि त्यांचे कुटुंब आरोग्यदृष्ट्या जागरूक होऊन निरोगी व आनंदी जीवन जगण्यास सक्षम बनतात. ही सेवा संपूर्णपणे मोफत असून, नागरिकांनी तिचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
    अधिक माहितीसाठी –
    नागरिकांनी जवळील शासकीय आरोग्य केंद्र किंवा आशा व एएनएम आरोग्य कर्मचारी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

  • गोवंशीय जनावरांची क्रूर वाहतूक पोलिसांनी थांबवली, २ आरोपी अटकेत

    Chandrapur Illegal Cattle Transport Case : चंद्रपूर २७ नोव्हेम्बर (News३४) – गोवंशीय जनावरांच्या अवैध वाहतुकीवर बंदी असताना सुद्धा चंद्रपूर जिल्ह्यात याप्रकारची वाहतूक बेभामपणे सुरु आहे. २६ नोव्हेम्बर रोजी विरूर पोलिसांनी गोवंशीय जनावरांची क्रूरपणे होत असलेल्या वाहतुकीवर कारवाई करीत तब्बल ७ गोवंशीय जनावरांची सुटका करीत २ आरोपीना अटक केली आहे.

    हे वाचा – निवडणुकीच्या रणधुमाळीत युवकाने काढली तलवार आणि….

    २६ नोव्हेम्बर रोजी पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर महाराष्ट्र तेलंगणा राज्याच्या सीमेवर मौजा अंतरंगाव वनतपासणी नाक्यावर नाकाबंदी करीत महिंद्रा पिकअप वाहन क्रमांक MH३४ BZ ७६९१ ला थांबविण्यात आले. वाहनांची झडती घेतली असता त्यामध्ये ७ गोवंशीय जनावर आढळले, त्या जनावरांना अत्यंत निर्दयीपणे कोंडून तेलंगणा राज्यात नेल्या जात होते.

    पोलिसांनी ७ गोवंशीय जनावरांची सुटका करीत आरोपी ३१ वर्षीय शेख शाहरुख शेख मेहबूब व २९ वर्षीय सोहेल अहमद शेख हुसेन दोन्ही राहणार मौलाना आझाद वार्ड बल्लारपूर यांना अटक करण्यात आली. गोवंशीय जनावरे व गुन्ह्यात वापरलेले वाहन असा एकूण ९ लक्ष २५ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. आरोपीवर विरूर पोलीस ठाण्यात कलम ५(ब), ९,११ महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ सहकलम ११ (१)(सी) प्राण्यांना निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० अन्व्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

    सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनात सपोनि संतोष वाकडे, पोलीस कर्मचारी अफसर पठाण, विभीषण खटके, भूषण इटनकर , राहुल वैद्य व अविनाश बोरूले यांनी केली.

  • 🎬 ‘कांतारा चॅप्टर १’ आता हिंदीमध्ये!

    kantara chapter 1 Hindi version on Prime Video : मुंबई २७ नोव्हेम्बर (News३४): दाक्षिणात्य सुपरस्टार ऋषभ शेट्टीचा बहुचर्चित आणि ब्लॉकबस्टर ठरलेला चित्रपट ‘कांतारा चॅप्टर १’ अखेर हिंदी भाषेत ओटीटी प्लॅटफॉर्मवर दाखल झाला आहे. ॲमेझॉन प्राईम व्हिडीओने आज, २७ नोव्हेंबर रोजी ही मोठी घोषणा केली आहे. त्यामुळे, हिंदी भाषिक प्रेक्षक ज्यांनी या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहिली होती, त्यांची प्रतीक्षा आता संपली आहे.

    कांतारा चॅप्टर १‘ हा चित्रपट मागील महिन्यात प्रदर्शित झाला होता, तेव्हा तो प्रामुख्याने कन्नड, तमिळ, तेलुगू आणि मल्याळम यांसारख्या प्रादेशिक भाषांमध्ये ओटीटीवर प्रदर्शित झाला होता. मात्र, देशभरातील प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाची असलेली प्रचंड क्रेझ आणि हिंदीतील डबिंगची मागणी पाहता, ॲमेझॉन प्राईमने एक महिन्याच्या प्रतीक्षेनंतर हिंदी आवृत्तीही उपलब्ध केली आहे.

    २०२२ मध्ये आलेल्या ‘कांतारा’ चित्रपटाचा हा प्रीक्वल (मागील कथा) असून, यात ऋषभ शेट्टीने दमदार अभिनय केला आहे. देवभूमी, जंगल, आणि तेथील लोककथांचे रहस्यमय चित्रण असलेल्या या चित्रपटाने थिएटरमध्ये मोठी कमाई केली होती. आता ओटीटीवर हिंदीमध्ये उपलब्ध झाल्यामुळे, उत्तर भारतीय पट्ट्यातील प्रेक्षक आणि ज्यांना प्रादेशिक भाषा समजत नाहीत, त्यांनाही ‘कांतारा’ची ही अद्भुत गाथा अनुभवता येणार आहे. kantara chapter 1 Hindi version on Prime Video

    प्राईम व्हिडीओने त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर याची अधिकृत घोषणा केली आहे, ज्यामुळे सोशल मीडियावर चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. कन्नड, तमिळ, तेलुगू आणि मल्याळम या भाषांमध्येही हा चित्रपट प्राईम व्हिडीओवर उपलब्ध आहे.

    ज्या प्रेक्षकांनी थिएटरमध्ये हा चित्रपट पाहिला नाही किंवा हिंदी डबिंगची वाट पाहत होते, त्यांच्यासाठी ही एक मोठी पर्वणी आहे. ॲमेझॉन प्राईमचे सदस्य आता घरबसल्या भारतीय संस्कृती आणि पौराणिक कथांवर आधारित या थरारक चित्रपटाला हिंदीत पाहू शकतील.


  • महानगरपालिका निवडणूक 2025: मतदार यादीसाठी महत्त्वाच्या तारखा बदलल्या!

    voter list reform timeline Maharashtra : चंद्रपूर २७ नोव्हेंबर (News३४) – राज्य निवडणूक आयोगाने २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५ करीता मतदार यादी सुधारणा व प्रसिद्धी प्रक्रियेचा सुधारित निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. नागरिकांना मतदार यादीतील हरकती व दुरुस्ती नोंदविण्यासाठी अधिक वेळ मिळावा, या उद्देशाने कार्यक्रमातील दिनांकात महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत.

    राजुरा बातमी : कांग्रेसच्या आक्रमक भूमिकेने महावितरणची माघार

    निवडणूक कार्यक्रमातील सुधारित टप्पे पुढीलप्रमाणे :

    प्रारूप मतदार यादीवर हरकती व सूचना स्वीकारण्याचा अंतिम दिनांक –
    आधी निश्चित दिनांक : २७ नोव्हेंबर २०२५
    सुधारित जाहीर दिनांक : ३ डिसेंबर २०२५

    प्राप्त हरकती/सूचनांवर निर्णय, अंतिम मतदार यादीचे अधिप्रमाणीकरण व प्रसिद्धी –
    आधी निश्चित दिनांक : ५ डिसेंबर २०२५
    सुधारित जाहीर दिनांक : १० डिसेंबर २०२५

    मतदान केंद्र ठिकाणांची यादी प्रसिद्ध करणे –
     आधी निश्चित दिनांक : ८ डिसेंबर २०२५
     सुधारित जाहीर दिनांक : १५ डिसेंबर २०२५

    मतदान केंद्रनिहाय मतदार यादी जाहीर करणे –
     आधी निश्चित दिनांक : १२ डिसेंबर २०२५
     सुधारित जाहीर दिनांक : २२ डिसेंबर २०२५

       सदर कार्यक्रमानुसार, सर्व पात्र नागरिकांनी मतदार यादीतील नाव, पत्ता किंवा अन्य तपशीलातील दुरुस्ती, तसेच हरकती/सूचना आवश्यक पुराव्यासह मुख्य महानगरपालिका कार्यालयात कार्यालयीन वेळेत, लेखी स्वरूपात विहित मुदतीत सादर कराव्यात, असे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे. voter list reform timeline Maharashtra


        लोकशाही प्रक्रियेला अधिक सक्षम करण्यासाठी मतदार यादी अचूक व अद्ययावत असणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवून मतदार यादी सुधारणा प्रक्रियेस सहकार्य करावे, असे मनपातर्फे सूचित करण्यात आले आहे. हा सुधारित कार्यक्रम राज्य निवडणुक आयोग यांच्या निर्देशानुसार अमलात आणण्यात येत आहे.

  • राजुऱ्यात काँग्रेसची दमदार भूमिका!

    Rajura electronic meter protest news : राजुरा 27 नोव्हेम्बर (News34) :– राजुरा शहरातील विविध भागांत लावण्यात येत असलेल्या अन्यायकारक इलेक्ट्रॉनिक मीटरविरोधात अखेर काँग्रेसने कडक भूमिका घेतली असून नागरिकांच्या दबावानंतर विद्युत विभागाने जबरदस्तीने मीटर बसविणार नसल्याचे आश्वासन दिले आहे.

    क्राईम न्यूज : नगरपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत युवकाने माजवली दहशत

    स्थानिक नागरिकांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे आणि राजुरा विधानसभा काँग्रेसचे समन्वयक, माजी नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्याकडे धाव घेत अन्यायाची माहिती दिली. नागरिकांच्या योग्य हक्कासाठी अरुण धोटे यांनी स्वतः पुढाकार घेत उपकार्यकारी अभियंता, विद्युत उप विभाग, राजुरा कार्यालयासमोर आंदोलन छेडले. यावेळी विभागीय अधिकाऱ्यांना जाब विचारत अन्यायकारक मीटर तत्काळ मागे घेण्याची मागणी करणारे निवेदनही देण्यात आले. नवीन इलेक्ट्रॉनिक मीटर हे आधीच्या मीटर पेक्षा दोन ते तीन पट्टीने अधिक वाढीव बील देत असतात यामुळे गोरगरीब जनतेची पिळवणूक होणार असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.

    काँग्रेसच्या या ठाम भूमिकेनंतर अखेर विद्युत विभागाने नागरिकांना विश्वासात न घेता जबरदस्तीने इलेक्ट्रॉनिक मीटर बसविण्यात येणार नसल्याचे आश्वासन दिले. या निर्णयाचे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून लोकशाही मार्गाने लढलेल्या संघर्षाला यश मिळाल्याची भावना व्यक्त केली जात आहे. Rajura electronic meter protest news

    आंदोलनाच्या वेळी माजी उपनगराध्यक्ष सुनीलभाऊ देशपांडे, किशोर बानकर, सय्यद जाहीर, रफीक अन्सारी, अजहर सिद्धिकी यांच्यासह स्थानिक नागरिक, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • निवडणुकीच्या रणधुमाळीत तरुणाचा तलवारीने उपद्रव; पोलिसांनी पकडले!

    Bhadrawati crime news : चंद्रपूर/भद्रावती २७ नोव्हेम्बर (News३४) – चंद्रपूर जिल्ह्यात सध्या नगरपरिषद निवडणुकीचा धुरळा सुरु आहे, अनेक ठिकाणी नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी चुरस वाढली आहे. या चुरशीदरम्यान भद्रावती शहरात २२ वर्षीय तरुणाने हातात तलवार बाळगत परिसरात दहशत निर्माण करण्याचे काम करीत होता, भद्रावती पोलिसांच्या सतर्कतेने त्या तरुणाला हिसका दाखवीत अटक केली.

    हे हि वाचा – चंद्रपूर जिल्हा परिषद शाळेत कार्यरत शिक्षकाचं नराधमी कृत्य

    निवडणुकीच्या रणधुमाळीत भद्रावती शहरात २२ वर्षीय प्रज्वल अशोक कोडापे राहणार शिवाजी नगर हा तरुण सुमठाणा चौकात हातात तलवार बाळगून परिसरात दहशत निर्माण करीत होता. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच शहानिशा करण्यात आली. पोलिसांनी प्रज्वल कोडापे ला ताब्यात घेत अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यातून एक तलवार जप्त करण्यात आली.

    जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचे महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) अनव्ये शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल असे शस्त्र बाळगण्यास मनाई असताना आरोपी प्रज्वल कोडापे यांनी अआदेशाचे उल्लंघन केले असून त्याच्यावर कारवाई करीत ताब्यात घेण्यात आले. आरोपी प्रज्वल कडून लोखंडी तलवार किंमत १ हजार जप्त करण्यात आली. Bhadrawati crime news

    सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथकाचे पोउपनि गजानन तुपकर, महेंद्र बेसरकर, गोपाल आतकुलवार, जगदीश झाडे, अनुप आष्टुन्कर, विशवनाथ चुदरी, योगेश घाटोळे, खुशाल कावळे, रोहित चिटगिरे व संतोष राठोड यांनी केली.

  • 🔋 7025mAh बॅटरी + 80W चार्जिंग: Oppo Find X मध्ये काय खास आहे? वाचा पूर्ण फीचर्स

    Oppo Find X review 2025 : मोबाईल २७ नोव्हेम्बर (News३४) – ओप्पोचा बहुप्रतिक्षित ‘फाईंड एक्स’ (Oppo Find X) स्मार्टफोन अखेर बाजारात दाखल झाला आहे. दमदार फीचर्स आणि आकर्षक डिझाईनमुळे हा मोबाईल चर्चेत आहे. हा मोबाईल एक प्रीमियम अनुभव देतो आणि यात अनेक जबरदस्त गोष्टींचा समावेश आहे. चला, या फोनच्या मुख्य वैशिष्ट्यांवर एक नजर टाकूया!


    🔥 दमदार प्रोसेसर आणि स्मूथ अनुभव

    • चिपसेट: या फोनमध्ये मीडियाटेक डिमेन्सिटी 9500 (Mediatek Dimensity 9500) हा अत्याधुनिक 3nm प्रोसेसर वापरण्यात आला आहे. यामुळे फोनची कार्यक्षमता (Performance) खूपच वेगवान आणि उत्कृष्ट आहे.
    • मेमरी (RAM/Storage): हा फोन 12GB आणि 16GB RAM पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. स्टोरेजसाठी 256GB पासून ते 1TB पर्यंतचे पर्याय मिळतात. (UFS 4.1 स्टोरेजमुळे डेटा ट्रान्सफर खूप जलद होतो.)
    • ऑपरेटिंग सिस्टीम (OS): हा फोन अँड्रॉइड 16 वर चालतो आणि कंपनीने 5 मोठ्या अँड्रॉइड अपग्रेड्स देण्याचे वचन दिले आहे. (सोबतच ColorOS 16 चा सपोर्ट आहे.) Oppo Find X review 2025

    ✨ आकर्षक डिझाईन आणि डिस्प्ले

    • डिझाईन आणि बिल्ड: ‘फाईंड एक्स’ चे डिझाईन खूपच प्रीमियम आहे. याला गोरिल्ला ग्लास 7i ने संरक्षित फ्रंट आणि बॅक पॅनेल, तसेच अ‍ॅल्युमिनियम फ्रेम दिली आहे. हा फोन IP68/IP69 रेटिंगसह धुळीपासून आणि पाण्यापासून सुरक्षित आहे.
    • डिस्प्ले: यात 6.59 इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेट सह येतो. हा डिस्प्ले 1 बिलियन रंगांना सपोर्ट करतो आणि त्याची पीक ब्राइटनेस (Peak Brightness) 3600 nits पर्यंत आहे. (HDR10+, डॉल्बी व्हिजन सारखे फीचर्स चित्रपट पाहण्याचा अनुभव खास बनवतात.)
    • संरक्षण: डिस्प्लेला कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 7i चे मजबूत संरक्षण आहे.

    📸 कॅमेरा: Hasselblad चा अनुभव

    या फोनचा कॅमेरा सेटअप अतिशय प्रभावी आहे.

    • मुख्य कॅमेरा (Triple Camera):
      • 50 MP वाईड लेन्स (f/1.6, OIS सह): उत्तम डिटेलिंग आणि कमी प्रकाशात चांगले फोटो.
      • 50 MP पेरिस्कोप टेलीफोटो लेन्स (f/2.6, 3x ऑप्टिकल झूम, OIS सह): दूरचे फोटो झूम करूनही स्पष्ट येतात.
      • 50 MP अल्ट्रावाइड लेन्स (f/2.0): विस्तृत क्षेत्राचे फोटो घेण्यासाठी.
    • खास वैशिष्ट्ये: यात लेझर AF, कलर स्पेक्ट्रम सेन्सर आणि Hasselblad Color Calibration चा सपोर्ट मिळतो, ज्यामुळे फोटोंचे रंग नैसर्गिक आणि आकर्षक दिसतात.
    • व्हिडिओ: हा फोन 4K@120fps पर्यंतचे व्हिडिओ रेकॉर्ड करू शकतो.
    • सेल्फी कॅमेरा: समोरच्या बाजूला 32 MP चा वाईड लेन्स कॅमेरा दिला आहे, जो 4K@60fps पर्यंत व्हिडिओ रेकॉर्ड करू शकतो.

    🔋 बॅटरी आणि चार्जिंग

    • बॅटरी: यात मोठी 7025 mAh ची Si/C Li-Ion बॅटरी देण्यात आली आहे.
    • चार्जिंग:
      • 80W वायर्ड चार्जिंग (फोन जलद चार्ज होतो).
      • 50W वायरलेस चार्जिंग चा सपोर्ट देखील मिळतो.
      • 10W रिव्हर्स वायरलेस चार्जिंग मुळे तुम्ही इतर डिव्हाईस देखील चार्ज करू शकता. Oppo Find X review 2025

    📡 कनेक्टिव्हिटी आणि इतर फीचर्स

    • नेटवर्क: हा फोन 5G ला सपोर्ट करतो आणि इंटरनॅशनल, चायना तसेच भारतासाठी खास 5G बँड्स (1, 3, 5, 8, 40 SA/NSA) दिले आहेत.
    • सिम: यात Nano-SIM + eSIM किंवा Nano-SIM + Nano-SIM असे दोन पर्याय उपलब्ध आहेत.
    • अतिरिक्त फीचर्स: यात अल्ट्रासोनिक इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, स्टीरिओ स्पीकर्स, NFC, आणि इन्फ्रारेड पोर्ट (IR Blaster) आहे.
    • ऑडिओ: यामध्ये 3.5mm ऑडिओ जॅक दिलेला नाही.

    💰 किंमत आणि निष्कर्ष

    या फोनची अंदाजित किंमत सुमारे ७४,९९९ / १०,९९९९ रुपये आहे.

    निष्कर्ष: ओप्पोचा ‘फाईंड एक्स’ (Oppo Find X) हा त्यांच्या चाहत्यांसाठी एक उत्कृष्ट प्रीमियम फ्लॅगशिप फोन आहे. उत्कृष्ट प्रोसेसर, सुंदर डिस्प्ले, दमदार कॅमेरा सेटअप आणि मोठी बॅटरी/जलद चार्जिंग या सर्व गोष्टींमुळे हा फोन सध्या बाजारातील सर्वोत्तम पर्यायपैकी एक ठरतो.