Blog

  • sand tipper escapes during tehsildar raid । 🚨 थेट तहसीलदारांसमोर रेती टिप्पर पळवला! वाचा काय घडलं त्या रात्री!

    sand tipper escapes during tehsildar raid

    sand tipper escapes during tehsildar raid : चंद्रपूर – तहसीलदार यांच्यासमोर वाळू तस्करांनी वाळूने भरलेला टिप्पर पळविल्याची घटना २१ जून ला रात्री घडली, या घटनेमुळे वाळू तस्कर महसूल विभागाला जुमानत नसल्याचे दिसून आले. याबाबत चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. tehsildar stops illegal sand transport

    चंद्रपूर पोलीस दलात मोठे फेरबदल

    २१ जून रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास तहसीलदार विजय पवार हे शासकीय वाहनाने वाहन चालक विनोद द्विवेदी सोबत गस्तीवर होते, त्यावेळी पोंभुर्णा मार्गे वाळूने भरलेला टिप्पर जुनोना गावामार्गे चंद्रपूरच्या दिशेने येत होता, तहसीलदार पवार यांनी सदर वाहन थांबविले, टिप्पर चालकाची चौकशी करीत वाहनात काय आहे असे विचारले तर त्याने वाळू असल्याचे सांगितले. वाळूचा परवाना आहे का असे विचारले असता त्याने परवाना नसल्याचे सांगितले.

    तहसीलदार पवार यांनी वाळूने भरलेला टिप्पर क्रमांक MH ३४ BG १९२९ चा रीतसर जप्तीनाम्याला सुरुवात केली, यावेळी वाहन चालक रहेमान आतिफर खान याने सांगितले कि सदर सदर वाहन हे सोनू सिंग व अंकुश वर्मा यांचे असून हि रेती थेरगाव घाटातून आणली असल्याचे सांगितले. illegal sand mining in chandrapur

    आधी वाहन अडविले आणि नंतर पळविले

    वाळू परवाना नसल्याने वाहन चालकाला पुढील कारवाईसाठी तहसील कार्यालयाकडे नेण्यास सांगितले, अष्टभुजा वार्ड नाना नाणी पार्कजवळ टिप्पर पोहचताच पांढऱ्या रंगाच्या चारचाकी वाहन क्रमांक MH ३४ BR ६५०५ ने तहसीलदार पवार यांच्या वाहनासमोर वाहन आडवे लावले. चारचाकी वाहन धारकाने टिप्पर चालकाला इशारा करताच सदर टिप्पर वेगात समोर गेला. सोबतच ते चारचाकी वाहन सुद्धा भरधाव वेगाने निघून गेले काही क्षणात दोन्ही वाहन दिसेनासे झाले.

    तहसीलदार पवार समोरच वाळू माफियाने मुजोरी करीत वाहन पळविले. याबाबत शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, याबाबत तहसीलदार पवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

    विशेष बाब म्हणजे मागील काही वर्षांपासून वाळू घाटाचे लिलाव झाले नव्हते या काळात कोट्यवधी रुपयांच्या वाळूची तस्करी जिल्हाभरात सुरु होती, तशीच परिस्थिती चंद्रपूर शहरात पण होती मात्र आजपर्यंत महसूल प्रशासनाने अशी कारवाई करताना कुठे दिसले नाही. या काळात राजकीय पुढाऱ्यांनी वाळूची मोठ्या प्रमाणात चोरी केली मात्र राजकीय दबावापोटी कारवाई झाली नाही.

  • first day of school activities । 🥳 शाळेचा पहिला दिवस झाला खास – लेझीम, शिवगर्जना आणि स्वागत समारंभात रंगत!

    first day of school activities

    first day of school activities : चंद्रपूर, दि. 23 : ‘महाराज, राजनीती धुरंधर, प्रौढप्रताप पुरंदर, सिंहासनाधिश्वर, महाराजाधिराज, राजा शिवछत्रपती महाराजांचा, विजय असो…विजय असो…विजय असो…’ अशा पहाडी आवाजात 7 वी ची विद्यार्थीनी कार्तिकी मुंगले हिने शिवगर्जनेचा जयघोष केला आणि विद्यार्थ्यांचे शाळेत पहिले पाऊल पडले.

    दाताळा येथील पी.एम.श्री. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या प्रमुख उपस्थितीत जल्लोषपूर्ण वातावरणात विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव पार पडला. यावेळी शिक्षणाधिकारी (प्राथ.) अश्विनी सोनवणे, दाताळाच्या सरपंचा सुनिता देशकर, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष सुमन दोनाडकर, शिक्षण विस्तार अधिकारी मनोज गौरकार, शाळेचे मुख्याध्यापक लटोरी मोहितकर, शिक्षिका सुनिता पावडे, वंदना वनकर, अर्चना चिंतावार, शिक्षक राजू लांजेकर, केशर चकोले यांच्यासह पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते. pm shri schools facilities

    चंद्रपूर पोलीस दलातील बदल्या, महिला पोलीस निरीक्षकांना साईड पोस्टिंग

    यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा म्हणाले, आजपासून शैक्षणिक सत्र 2025-26 ला सुरुवात झाली असून विद्यार्थ्यांसाठी आज अतिशय महत्वाचा दिवस आहे. पहिल्यांदा शाळेत पाऊल टाकण्याचा क्षण अविस्मरणीय असतो. त्याचे महत्व जीवनभर असते. शिक्षणामुळेच स्वत:चा, कुटुंबाचा तसेच सामाजिक, आर्थिक व सर्वांगीन विकास होण्यास मदत होते. सर्वांना चांगले शिक्षण देणे ही आपली प्राथमिकता आहे. कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही, असा शासनाचा मानस आहे.

    pm shri schools facilities

    जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण द्यावे, जेणेकरून स्पर्धेच्या या युगात आपलाही विद्यार्थी पुढे राहील. आजचा विद्यार्थी हे उद्याचे भविष्य आहे. विद्यार्थी घडला तरच देश घडेल. शाळांच्या विकासासाठी जिल्हा प्रशासन निधीची कमतरता पडू देणार नाही. विद्यार्थ्यांनो, चांगला अभ्यास करा, तरच मोठ्या पदावर पोहचाल, असे म्हणत जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच पालकांनीसुध्दा मुलांना चांगले शिक्षण द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी शाळेकरीता मिळालेल्या स्मार्ट टीव्हीचे लोकार्पण जिल्हाधिका-यांच्या हस्ते करण्यात आले. district collector school visit news

    कार्यक्रमाचे संचालन वंदना वनकर यांनी तर आभार राजू लांजेकर यांनी मानले. यावेळी पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    महत्वाची क्षणचित्रे :

    1. नवीन प्रवेशित बालकांचे सजावट केलेल्या इनोव्हातून आगमन 2. जिल्हाधिकारी विनय गौडा यांची विद्यार्थ्यांसोबत हितगुज 3. लेझीम आणि बॅन्डच्या ठेक्यावर विद्यार्थ्यांचे वाजत-गाजत स्वागत 4. जिल्हाधिका-यांच्या हस्ते शाळेच्या परिसरात वृक्षारोपण 5. फित कापून तसेच दीप प्रज्वलनाने शैक्षणिक सत्राचा प्रारंभ 6. शिवगर्जनेत विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव. 7. नवीन बालकांच्या प्रवेशाच्या पाऊलखुणा 8. विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत. 9. जिल्हाधिका-यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बॅग, पुस्तके आणि गणवेश वाटप.

    शाळेविषयी माहिती :

    दाताळा येथील पी.एम.श्री. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत वर्ग 1 ली ते 8 वी पर्यंत एकूण 225 विद्यार्थी प्रवेशित आहेत. नवीन शैक्षणिक सत्र 2025-26 मध्ये 25 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. शाळेमध्ये मुलामुलींकरीता स्वतंत्र आणि स्वच्छ शौचालय, पिण्याच्या पाण्यासाठी दोन आर.ओ. मशीन, 7 वर्गखोल्यांमध्ये स्मार्ट टिव्ही, विज्ञान प्रयोगशाळा, स्टेम लॅब, गार्डन आदी सोयीसुविधा आहेत.

  • internal police transfer chandrapur 2025 । 💥 चंद्रपूर पोलिस बदल्या २०२५, महिला पोलीस निरीक्षकांना साइड पोस्टिंग का?

    internal police transfer chandrapur 2025

    internal police transfer chandrapur 2025 : चंद्रपूर – २१ जून रोजी चंद्रपूर जिल्हा पोलीस दल अंतर्गत मोठे फेरबदल करण्यात आले. या बदलात ११ पोलीस निरीक्षक, १८ सहायक पोलीस निरीक्षक व २५ पोलीस उपनिरीक्षकांचा समावेश आहे. जिल्ह्यातील गुन्हेगारी संपुष्टात यावी याकरिता कदाचित पोलीस अधीक्षकांनी बदल्या केल्या असाव्या. कारण जिल्ह्यात रोज किरकोळ गुन्ह्या सहित गंभीर गुन्हे घडत आहे. त्यावर अजूनही पोलीस दलाला नियंत्रण मिळविण्यात अद्यापही यश मिळालेले नाही. मात्र पोलीस दलातील झालेल्या अंतर्गत बदल्यामुळे अनेक प्रश्नचिन्ह सुद्धा उपस्थित झाले आहे. impact of police reshuffle on crime control

    सिगारेटच्या पैश्यासाठी का हटकलं? म्हणून थेट हत्या

    ११ पोलीस निरीक्षक यांच्या बदल्या कुठे?

    सिंदेवाही पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजय राठोड यांची जिवती पोलीस स्टेशनमध्ये बदली, कोरपना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दारासिंग राजपूत यांची मानव संसाधन विभाग चंद्रपूर मध्ये, पोलीस निरीक्षक सुनील गाडे यांची नियंत्रण कक्ष मधून पोलीस स्टेशन कोरपना मध्ये, पोलीस निरीक्षक कांचन पांडे जिवती वरून थेट सिंदेवाही पोलीस स्टेशन, महिला पोलीस निरीक्षक लता वाडीवे यांची भद्रावती वरून थेट सायबर पोलीस स्टेशन,

    नव्याने आलेले पोलीस निरीक्षक दिनेश लबडे नियंत्रण कक्ष चंद्रपूर वरून थेट जिल्हा विशेष शाखा, योगेश पारधी जिल्हा विशेष शाखा वरून थेट भद्रावती पोलीस स्टेशन, महिला पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन वरून थेट अर्ज शाखा, भरोसा सेल, पोलीस निरीक्षक निशिकांत रामटेके सायबर पोलीस स्टेशन वरून चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन, पोलीस निरीक्षक श्याम गव्हाणे बल्लारपूर वरून थेट नियंत्रण कक्ष तर पोलीस निरीक्षक विपीन इंगळे हे मानव संसाधन विभाग वरून थेट पोलीस स्टेशन बल्लारपूर मध्ये बदली करण्यात आली. honest police officer transferred chandrapur

    सहायक पोलीस निरीक्षक यांच्या बदल्या

    सचिन राखुंडे दोषसिद्धी कक्ष ते पोलीस स्टेशन रामनगर, जितेंद्र चांदे भिसी पोलीस स्टेशन ते पोलीस स्टेशन चिमूर, राजेश गवाले उप पोलीस स्टेशन धाबा वरून पोलीस स्टेशन रामनगर, युवराज सहारे उप पोलीस स्टेशन लाठी ते चंद्रपूर पोलीस शहर, संगीता हेलोंडे प्रभारी पोलीस स्टेशन तळोधी ते पोलीस स्टेशन वरोरा, निशा भुते पोलीस स्टेशन राजुरा ते उप पोलीस स्टेशन लाठी, पंकज बैसाणे चंद्रपूर शहर ते आर्थिक गुन्हे शाखा,

    नितेश डोर्लीकर ब्रह्मपुरी ते पोलीस स्टेशन पाथरी, धर्मेंद्र मडावी नक्षल सेल ते उप पोलीस स्टेशन धाबा, प्रफुल डाहुले नियंत्रण कक्ष ते पोलीस स्टेशन घुग्गुस, लक्ष्मण लोखरे नियंत्रण कक्ष ते राजुरा, प्रमोद रासकर पाथरी ते नियंत्रण कक्ष, मंगेश भोंगाडे चंद्रपूर शहर ते भिसी, राहुल गुहे उप पोलीस स्टेशन उमरी पोतदार ते तळोधी, गणेश झाम्बरे दुर्गापूर ते वरोरा, राहुल टेंगने चंद्रपूर ते उप पोलीस स्टेशन उमरी पोतदार, रमेश नन्नावरे राजुरा ते चंद्रपूर, योगेश पाटील घुग्गुस ते नक्षल सेल मध्ये बदली करण्यात आली आहे.

    ज्यांच्यामागे वाद ते आबाद?

    ११ पोलीस निरीक्षक व्यतिरिक्त चंद्रपूर जिल्ह्यातील असे काही पोलीस निरीक्षक आहे कि त्यांच्या कार्यकाळात काही चुका झाल्यावर सुद्धा त्यांची बदली चांगल्या ठिकाणी करण्यात आली. यामध्ये गुन्हे शाखा, तत्कालीन पोलीस निरीक्षक बल्लारपूर, तत्कालीन नियंत्रण कक्ष सह दुर्गापूर पोलीस निरीक्षक यांचा समावेश आहे. internal police transfer chandrapur 2025

    ज्यांचं काम त्यांचं नुकसान?

    सध्या या पोलीस दलातील बदल्यात महिला पोलीस निरीक्षकांच्या कार्य प्रणालीवर पोलीस अधीक्षकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले कि काय? असे चित्र निर्माण झाले आहे. कारण कार्यकाळ पूर्ण होण्याआधी त्यांना साईड ब्रांच मध्ये बदली केल्या गेली. यामध्ये कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक लता वाडीवे व प्रभावती एकुरके यांचा समावेश आहे. दोघांनी आपल्या अल्पशा कार्यकाळात चांगले काम केल्यावर सुद्धा त्यांची बदली करण्यात आली आहे. यामागे काय दडलंय हे तर न समजण्यासारखी गोष्ट आहे. why good police officers get transferred

    सध्या पोलीस दलात चुकीला माफी असावी असे चित्र या बदल्यातून स्पष्ट झालेले आहे. मात्र प्रामाणिक आपले कर्तव्य बजावणाऱ्या महिला पोलीस निरीक्षकांना चांगल्या कामाचे वाईट फळ मिळाले कि काय असे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. दुर्गापूर ते भद्रावती पोलीस स्टेशन अंतर्गत पोलीस निरीक्षक वाडीवे व शहर पोलीस स्टेशनच्या एकुरके यांनी आपल्या कार्यकाळात मोठे गुन्हे घडण्यापूर्वी त्यावर नियंत्रण मिळविले होते, महिला पोलीस निरीक्षक म्हणून दोघांनी आपल्या कामाची छाप पोलीस दलात सोडली.

  • shopkeeper murder over cigarette debt । उधारीचे पैसे मागितले म्हणून…थेट खून, राजुरा पोलिसांची जबरदस्त कामगिरी

    shopkeeper murder over cigarette debt

    shopkeeper murder over cigarette debt – राजुरा – १५ जून रोजी राजुरा शहरातील रमाबाई नगरात ५३ वर्षीय महिलेच्या हत्येचं प्रकरण उघडकीस आलं होत, रात्री कुणीतरी अज्ञाताने रायपुरे यांच्या घरी प्रवेश करीत धारदार शस्त्राने कविता रायपुरे या महिलेची हत्या करण्यात आली होती. सदर आव्हानात्मक गुन्ह्याचा तपास करीत राजुरा पोलिसांनी या प्रकरणी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. त्याने गुन्हा कबूल केला असून सिगारेट चे पैसे कधी देणार याबाबत त्याला दोनदा हटकले म्हणून हा गुन्हा घडला. असल्याची बाब अल्पवयीन मुलाने कबूल केली.

    चंद्रपूर आम आदमी पार्टीने केला मोठा गौप्य्स्फोट

    १५ जुन रोजी सकाळी कविता रायपुरे यांची मुलगी दुधाचे पॉकेट घेण्याकरिता आई कविता रायपुरे यांच्या घरी गेली होती, आईला आवाज दिल्यावर सुद्धा काही प्रतिसाद न आल्याने आत बघितले असता कविता या मृत अवस्थेत पडल्या होत्या, पोलिसांना याबाबत माहिती दिल्यानन्तर त्यांनी घटनास्थळ गाठले. कविता यांच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार केल्याच्या खुणा होत्या.

    पोलिसांनी अज्ञात आरोपीवर कलम १०३ (१), ३३२ (ब) अन्व्ये गुन्हा दाखल करीत तपास सुरु केला, गुन्हा अत्यंत क्लिष्ट स्वरूपाचा असल्याने पोलिसांना गुन्ह्याचा उलगडा करण्यासाठी चांगलीच दमछाक होणार होती, राजुरा पोलिसांनी कसलीही तमा न बाळगता रात्र – दिवस मेहनत घेतली, १५ ते २० ठिकाणावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले, संशयाच्या आधारावर एकूण ४० संशयित इसमाची कसून तपासणी केली मात्र आरोपीचा सुगावा लागला नाही. crime due to cigarette addiction among teens

    ४० संशयित हे मृतक महिलेच्या घराजवळील व्यक्ती असल्याची माहिती आहे, गुन्हा घडल्यापासून एक मुलगा गावाबाहेर गेला असल्याची बाब पोलिसांना यावेळी मिळाली, त्याला फोन करीत बोलावले, त्याची चौकशी केली असता त्याने हा गुन्हा केला अशी कबुली दिली.

    कारण काय?

    मृतक कविता रायपुरे ह्या घरी किराणा दुकान चालवायच्या, परिसरातील नागरिक किराणा सामान रायपुरे यांच्या दुकानातून खरेदी करीत होते, अश्यावेळी अल्पवयीन मुलाला सिगारेट चा छंद होता, तो नेहमी सिगारेट घेण्यासाठी रायपुरे यांच्या दुकानात जायचा, उधारी जास्त झाल्याने रायपुरे यांनी त्या मुलाला पैश्यासाठी दोनदा हटकले, पैश्यासाठी का हटकले याचा राग त्या मुलाच्या मनात निर्माण झाला. आणि या रंगाचे रूपांतर महिलेच्या हत्येत झाले. कविता रायपुरे यांचा काटा काढायचा असा विचार मनात ठेवत त्या मुलाने त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवले, घटनेच्या दिवशी ती महिला एकटी आहे असे त्या मुलाला समजले, मध्यरात्री रायपुरे यांच्या घरी प्रवेश करीत त्याने कोयत्याने रायपुरे यांच्यावर वार केला. shopkeeper murder over cigarette debt

    या हल्ल्यात कविता रायपुरे यांचा जागीच मृत्यू झाला, पोलीस आपल्याला अटक करेल या भीतीने त्या मुलाने घटनास्थळावरुन पळ काढला. त्याला बोलाविले असता त्याने आधी उडवाउडवीची उत्तरे दिली मात्र राजुरा पोलिसांच्या या आव्हानात्मक तपासाने सदर गुन्ह्याचा उलगडा झाला, अल्पवयीन मुलाला विश्वासात घेत त्याची सखोल चौकशी केली आणि त्याने गुन्हा कबुल केला, गुन्ह्यात वापरलेला कोयता पोलिसांनी त्या मुलाकडून जप्त केला.

    सदर प्रकरणाचा यशस्वी तपास प्रभारी पोलीस निरीक्षक सुमित परतेकी यांच्या नेतृत्वात सपोनि निशा भुते, सपोनि हेमंत पवार, पोउपनि पांडुरंग हाके, पोउपनि भीष्मराज सोरते, पोउपनि चाटे, पोलीस कर्मचारी किशोर तुमराम, विक्की निर्वाण, महेश बोलगोडवार, शफिक शेख, शरद राठोड, अविनाश बांबोळे व आनंद मोरे यांनी केला.

  • political monopoly in local tenders । ठेके फक्त ‘आपल्याच’ लोकांना? चंद्रपुरातील मोठा राजकीय स्फोट

    political monopoly in local tenders

    political monopoly in local tenders : चंद्रपूर – आम आदमी पक्षाने (आप) चंद्रपूर शहरातील सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यात व्यापक भ्रष्टाचार, ‘ठेकेदारी मक्तेदारी’ आणि बेरोजगारांना संधी नाकारल्याचा मुद्दा प्रामुख्याने मांडण्यात आला आहे. पक्षाने चंद्रपूर महानगरपालिका आणि स्थानिक राजकारण्यांच्या जवळच्या व्यक्तींशी संबंधित ‘८५ हजार रुपये वाहन भाडे घोटाळा’ उघडकीस आणल्याचा दावा केला आहे. high rent electric vehicles government scam

    आमदारांच्या सचिवांशी जोडलेली उच्च भाड्याची इलेक्ट्रिक वाहने रडारवर

    आपचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, चंद्रपूर महानगरपालिकेने मागील एका वर्षापासून दोन इलेक्ट्रिक वाहने (MH34 CD 5828 आणि MH34 BZ 4696) प्रत्येकी ८५,००० रुपये प्रति महिना या दराने भाड्याने घेतली आहेत. ही वाहने स्थानिक आमदारांच्या खासगी सचिवाच्या नावावर नोंदणीकृत असल्याचा आरोप पक्षाने केला आहे.

    बनावट कागदपत्रांच्या आधारे चंद्रपुरात गोवंश जनावरांची तस्करी

    “शहरातील सामान्य टॅक्सी चालक एका महिन्यात जेवढे कमावतो, त्याच्या दुप्पट हे भाडे आहे,” असे राईकवार यांनी नमूद केले. ते म्हणाले की, सामान्य टॅक्सी चालक दरमहा ३०,००० ते ४०,००० रुपये कमावतात आणि त्यांना ईएमआय, चार्जिंग आणि देखभालीचा खर्च भागवणे कठीण जाते, तर आमदारांचे सचिव थेट ८५ हजार रुपयांचे मासिक भाडे घेतात. “ही व्यवस्था म्हणजे सत्तेचा सरळसरळ गैरवापर आणि सामान्य बेरोजगारांवर अन्याय आहे,” असेही त्यांनी ठामपणे सांगितले. corruption in municipal vehicle contracts

    ‘ठेकेदारी मक्तेदारी’ आणि दडपलेल्या संधींचे आरोप

    आपने पुढे आरोप केला आहे की, महानगरपालिका, जलसंपदा आणि सार्वजनिक बांधकाम विभागांमधील बहुतांश ठेके स्थानिक आमदारांच्या जवळच्या गटांनाच मिळतात. सामान्य बेरोजगार आणि ठेकेदार निविदा भरतात, परंतु त्यांच्यावर दबाव टाकून निविदा मागे घ्यायला लावली जाते, असे पक्षाचे म्हणणे आहे.

    “ही मक्तेदारी पद्धत म्हणजे बेरोजगारांसाठी दरवाजे बंद करणे आणि सत्ता केंद्रीत करणे होय,” असे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

    निवडक प्रसिद्धी: रोजगार योजनांऐवजी महोत्सवांना प्राधान्य?

    आपने उपस्थित केलेला एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सार्वजनिक माहितीच्या प्रसिद्धीतील कथित निवडकपणा. पक्षाने निदर्शनास आणले की, ‘माता महाकाली महोत्सव’, विविध उद्घाटने आणि खासगी महोत्सवांची शहराच्या कानाकोपऱ्यात बॅनर, मोबाईल मेसेजेस आणि ढोल-ताशांच्या गजरात मोठ्या प्रमाणावर जाहिरात केली जाते. मात्र, शासकीय योजना, निविदा आणि रोजगाराच्या संधींविषयीची महत्त्वाची माहिती सामान्य बेरोजगारांपर्यंत पोहोचवली जात नाही. political corruption in Chandrapur 2025

    “ज्या योजनांचा उपयोग बेरोजगारांना व्हावा, त्या योजनांची जाहिरात हेतुपुरस्सर गुप्त ठेवली जाते आणि केवळ ‘सेटिंग’वाल्यांपर्यंत पोहोचते,” असे आपने म्हटले आहे.

    खाजगी लाभासाठी पूरनियंत्रण निधी, वस्त्यांकडे दुर्लक्ष

    आमदारांनी ‘पूर नियंत्रण निधी’चा गैरवापर केल्याचा आरोपही पक्षाने केला आहे. मित्राच्या बंगल्यासाठी संरक्षक भिंत बांधण्यासाठी या निधीतून तब्बल ९५ लाख रुपये खर्च करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. याउलट, पावसाळ्यात हजारो रहिवाशांच्या वस्त्यांमध्ये पाणी शिरते, परंतु त्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही. political monopoly in local tenders

    “सामान्य जनतेला केवळ मतदानापुरते वापरणे आणि ‘मित्रगटांना’ सर्व संरक्षण देणे – हीच सत्ताधाऱ्यांची आजची कृती आहे,” असे प्रसिद्धी पत्रकात गंभीरपणे नमूद केले आहे.

    पारदर्शकतेच्या मागणीसाठी ‘आप’चे ‘स्वाक्षरी अभियान’

    या भ्रष्टाचार, मक्तेदारी आणि बेरोजगारांवरील अन्यायाविरोधात आम आदमी पक्षाने ‘स्वाक्षरी अभियान’ जाहीर केले आहे. पक्ष हजारो नागरिकांच्या स्वाक्षऱ्या घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करणार आहे.

    या निवेदनात या प्रकरणांची सखोल चौकशी करण्याची आणि वाहन भाडे व ठेके प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याची मागणी केली जाणार आहे.

    चंद्रपूरकरांना लढ्यात सामील होण्याचे आवाहन

    आपचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या शेवटी चंद्रपूरच्या नागरिकांना या लढ्यात सामील होण्याचे आवाहन केले आहे. “ही लढाई आहे – बेरोजगारांसाठी समान संधी मिळवण्याची. ही लढाई आहे – सत्तेचा गैरवापर थांबवण्याची. ही लढाई आहे – केवळ ‘आपल्या लोकां’साठी नाही, तर ‘सर्वांच्या अधिकारां’साठी!” असे आवाहन त्यांनी केले.

  • fake documents used in cow transport | 🐄 बनावट कागदपत्रांवर गोवंश वाहतूक? पोलिसांनी पकडला 1.70 कोटींचा तस्करीचा खेळ!

    fake documents used in cow transport

    fake documents used in cow transport : चंद्रपूर जिल्ह्यातून गोवंश जनावरांची वाहतूक करण्याचे काम गोवंश तस्कर करीत आहे, अश्याच गोवंश तस्करीचा चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने गुन्हा उघडकीस करण्यात यश मिळाले असून यामध्ये तब्बल 1 कोटी 70 लाख 70 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
    घुग्गुस पोलीस स्टेशनच्या हद्दीतील धानोरा टोल नाकाजवळ ही कारवाई करण्यात आली. animal cruelty in cattle transport

    दीड कोटीच्या रस्त्याच्या कामात मोठा भ्रष्टाचार, आप ने केली पोलखोल


    गोवंश जनावरांना क्रूर पणे हात-पाय तोंड बांधून वाहनात दाटीने भरीत त्यांना तेलंगणा राज्यात कत्तलीसाठी नेत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती.

    सदर वाहतूक घुग्गुस मार्ग पडोली मधून तेलंगणा राज्यात जात असल्याने गुन्हे शाखेने धानोरा टोल नाक्याजवळ सापळा रचला, यावेळी संशयास्पद वाहने दिसताच क्षणी पोलिसांनी वाहनांना थांबवित त्यांची झडती घेतली असता तब्बल 6 आयशर वाहनात एकूण 72 गोवंश जनावरांना क्रूरपणे दाटून कोंबले होते.
    सदर वाहनांची वाहतूक व्यवस्थित पणे व्हावी याकरिता एक पायलट वाहन सुद्धा होते. cattle trafficking in Chandrapur district

    बनावट पावत्याने उघडला तस्करीचा खेळ


    आयशर वाहनात असलेल्या चालकांना वाहतुकीबाबत कागदपत्रांची मागणी केली असता त्यांनी भंडारा-गोंदिया वरून जनावरे खरेदी केल्याच्या पावत्या सादर केल्या, त्या पावत्यांची तपासणी केली असता त्यामध्ये शासकीय अधिकारी यांची स्वाक्षरी ही बनावट असल्याचे निष्पन्न झाले, त्या स्वाक्षरी मार्फत गोवंशाची वाहतूक ही कायदेशीर असल्याचे दिसून येत होते, त्यामुळे हे तस्कर जनावरांची कोंबून कत्तलीसाठी वाहतूक करीत होते.


    यावेळी पोलिसांनी एकूण 72 गोवंश जनावरे, 6 ट्रक व एक पायलटिंग वाहन असा एकूण 1 कोटी 70 लाख 70 हजारांचा माल जप्त करीत एकूण 18 जणांवर घुग्गुस पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. गोवंश जनावरांना प्यार फाउंडेशन कडे सोपविण्यात आले. विशेष बाब म्हणजे पोलीस प्रशासनाच्या प्रसिद्धी पत्रकातून आरोपींचे नाव गहाळ होते.


    सदरची यशस्वी कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सपोनि बलराम झाडोकर, पोउपनी विनोद भुरले, संतोष निंभोरकर, सुनील गौरकार व पथकाने केली.

  • Chandrapur flood preparedness training 2025 । 💪 पूर आला तरी घाबरू नका! चंद्रपूरमध्ये नागरिकांना देण्यात येतंय थेट रेस्क्यू ट्रेनिंग

    Chandrapur flood preparedness training 2025

    Chandrapur flood preparedness training 2025 : चंद्रपूर (२१ जुन २०२५ ) – पावसाळ्यात उद्भवणारी पूर परिस्थिती व इतर आपत्ती वेळी नागरिकांनी कोणती दक्षता घ्यावी, याबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तसेच चंद्रपूर तालुका प्रशासनाच्या वतीने लोहारा येथील तलावावर प्रशिक्षण आयोजित करण्यात आले.

    चंद्रपूर जिल्हा प्रशासनाच्या ताफ्यात नवे वाहन

    नैसर्गिक आपत्तीमध्ये दक्षता

    या प्रशिक्षणाला अतिरिक्त जिल्हाधिकारी नितीन व्यवहारे, उपविभागीय अधिकारी संजय पवार, तहसीलदार विजय पवार यांनी मार्गदर्शन केले. तसेच यावेळी नागरिकांना सीपीआर, नैसर्गिक आपत्तीमध्ये घ्यावयाची दक्षता याबाबत राज्य आपत्ती व्यवस्थापन दलातर्फे प्रात्यक्षिकाद्वारे माहिती देण्यात आली.

    सदर प्रशिक्षणाचा लाभ गावातील नागरीक तसेच तालुक्यातील पोलीस पाटील, इतर शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी, सरपंच, तलाठी, मंडळ अधिकारी, कोतवाल, ग्रामसेवक, कृषी सहायक, आशा सेवकिा, आपदा मित्र, आपदा सखी, पट्टीचे पोहणारे नागरिक यांनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सलीम शेख व त्यांच्या टीमने सहकार्य केले.

  • Chandrapur district administration new vehicles । 📸 आपत्कालीन व्यवस्थेसाठी चंद्रपूर तयार! प्रशासनाच्या ताफ्यात नवे ‘बोलेरो’ वाहन

    Chandrapur district administration new vehicles

    Chandrapur district administration new vehicles : चंद्रपूर (२१ जून २०२५ ) – महसूल विभागांतर्गत क्षेत्रीय स्तरावर गतिमान प्रशासन तथा आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण करण्यासाठी राज्य शासनाने जिल्हा प्रशासनाला सहा वाहने उपलब्ध करून दिली आहेत. या वाहनांचे लोकार्पण राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते करण्यात आले.

    चंद्रपुरात योगा चा महासंगम


    नियोजन भवन येथे आयोजित या कार्यक्रमाला आमदार किशोर जोरगेवार, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, पोलिस अधिक्षक मुमक्का सुदर्शन, अतिरिक्त जिल्हाधिकारी नितीन व्यवहारे, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, उपविभागीय अधिकारी संजय पवार, अजय चरडे, रविंद्र माने, तहसीलदार विजय पवार, प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार, जिल्हा नियोजन अधिकारी संजय कडू, सुभाष कासनगोट्टूवार आदी उपस्थित होते.

    यांना मिळणार नवे वाहन

    जिल्हाधिकारी यांच्या अधिनस्त असलेल्या क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी, उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांना, त्यांच्या जुन्या निर्लेखित वाहनांच्या बदली स्वरुपात नवीन वाहने खरेदी करण्यास शासनाने मंजुरी दिली होती. त्यानुसार एकूण सहा महिंद्रा बोलेरो न्युओ या वाहनांची खरेदी करून सदर वाहने जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाली आहेत. ही वाहने चंद्रपूर, गोंडपिपरी, मुल, वरोरा येथील उपविभागीय अधिकारी तथा राजुरा आणि कोरपना येथील तहसीलदारांना देण्यात येणार आहे.

  • Chandrapur International Yoga Day 2025 event । 🧘 चंद्रपूरमध्ये योगाचा महासंगम! आंतरराष्ट्रीय योग दिनाला उस्फूर्त प्रतिसाद

    Chandrapur International Yoga Day 2025 event

    Chandrapur International Yoga Day 2025 event – चंद्रपूर दि. 21 जून : धावपळीच्या आणि तणावग्रस्त जीवनशैलीमुळे आज अनेकांना विविध व्याधींनी ग्रासले आहे. यावर मात करून निरोगी आणि उत्तम जीवन जगायचे असेल तर दैनंदिन जीवनात योगा करणे आवश्यक आहे. हा एक केवळ व्यायामच नाही तर योगामुळे मानवाचा शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक संगम साधण्यास मदत होते, असे विचार राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी व्यक्त केले. District level yoga day programme Chandrapur 2025

    १९ वर्षाच्या युवकाला गांजा सहित अटक


    जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मेरा युवा भारत आणि शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा क्रीडा संकूल येथे आयोजित मुख्य शासकीय योग दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार किशोर जोरगेवार, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, अतिरिक्त जिल्हाधिकारी नितीन व्यवहारे, उपविभागीय अधिकारी संजय पवार, तहसीलदार विजय पवार, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार, शिक्षणाधिकारी राजेश पाताळे, अश्विनी सोनवणे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मिना साळूंके, सुभाष कासनगोट्टूवार आदी उपस्थित होते.

    District level yoga day programme Chandrapur 2025


    देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून संयुक्त राष्ट्र संघटनेने योगाचे महत्व ओळखले आणि 21 जूनला आंतराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याचा ठराव पारीत केला. गत 11 वर्षांपासून जगातील 177 देशांमध्ये योग दिन साजरा केला जात आहे. ‘एक पृथ्वी, एक आरोग्य’ ही 2025 च्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची थीम आहे. जिल्हा प्रशासनाने पतंजली योग समिती आणि विविध संघटनांच्या माध्यमातून चांगल्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

    पुढील वर्षापासून सर्वांनी एकत्रित येऊन शासकीय योग दिन साजरा करावा. चंद्रपूरात योग संगम दिसणे आवश्यक आहे. पुढील आंतरराष्ट्रीय योग दिन यापेक्षा मोठ्या स्वरूपात व खुल्या मैदानात आयोजित करावा, अशा सुचनाही पालकमंत्री डॉ. उईके यांनी दिल्या. Chandrapur International Yoga Day 2025 event


    कार्यक्रमाच्या सुरूवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेला पुजन करण्यात आले. यावेळी योगशिक्षिका वैजंती गौरकार आणि कविता मंघानी यांनी उपस्थितांना योगाचे प्रात्याक्षिक करून दाखविले. कार्यक्रमाचे संचालन मंगला घोगी आसुटकर यांनी केले. कार्यक्रमाला क्रीडा अधिकारी मनोज पंधराम, मोरेश्वर गायकवाड, नंदू आवारे, तालुका क्रीडा अधिकारी विनोद ठिकरे, जयश्री देवकर, संदीप उईके, विजय ढोबाळे यांच्यासह पतंजली योग समितीचे इतर सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    चांगले व निरोगी आयुष्य योगामुळे शक्य : आमदार किशोर जोरगेवार

    आज 11 वा आंतराष्ट्रीय योग दिन आपण साजरा करीत आहोत. देशाच्या पंतप्रधानांनी योगाचे महत्व जगाला पटवून दिले, त्यामुळेच याला आंतरराष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाले. अनादी कालापासून भारतात योग सुरू असून याला अनन्यसाधारण महत्व आहे. चांगले आयुष्य केवळ योगामुळेच मिळू शकते. कोणत्याही आजारावर नियंत्रण मिळवायचे असेल किंवा मनाच्या शांतीसाठी योगा करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. Kishor Jorgewar yoga importance healthy life speech


    उपस्थितांनी केली ही आसने : कपालभारती प्राणायाम, अनुलोमविलोम, ब्राभरी प्राणायाम, वज्रासन, स्कंदसंचालन, स्कंदस्थलांतरण, स्कंदचक्र, घुटनासंचालन, ताडासन, वृक्षासन, पादअष्टासन, अर्धचक्रासन, त्रिकोनासन, दंडासन, भद्रासन, वज्रासन, अर्धवज्रासन, उत्तंगासन, वक्रासन, भुजंगासन, अर्धहलासन, पवनउत्तासन, शवासन आदी आसने करण्यात आली.



  • Bhadravati NDPS Act ganja seizure 2025 । 💥 १९ वर्षांचा तरुण, पण काम ‘गंभीर’! गांजासह रंगेहाथ पकडला

    Bhadravati NDPS Act ganja seizure 2025

    Bhadravati NDPS Act ganja seizure 2025 : भद्रावती (२१ जून २०२५) – चंद्रपूर, [आजची तारीख]: चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथे अंमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत (NDPS Act) मोठी कारवाई करण्यात आली आहे. भद्रावती पोलिसांनी १९ वर्षीय तरुणाकडून सुमारे १ किलो ४८० ग्रॅम गांजा जप्त केला असून, त्याची एकूण किंमत ८९ हजार रुपयांपेक्षा जास्त आहे. ही कारवाई २० जून २०२५ रोजी रात्री उशिरा ते २१ जून २०२५ च्या पहाटे दरम्यान करण्यात आली. Bhadravati drug bust under NDPS Act June 2025

    घडलेला प्रकार:

    भद्रावती पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मोहन धोंगळे आणि त्यांच्या गुन्हे शोध पथकाने (DB Pathak) भद्रावती परिसरात गस्त घालत असताना, त्यांना गोपनीय माहिती मिळाली. माहितीनुसार, क्षितिज संजय जुनघरे (वय १९, रा. भंगाराम वॉर्ड, भद्रावती) हा त्याच्या MH 34 AJ 3464 या हिरो होंडा स्प्लेंडर मोटरसायकलवरून चंद्रपूर येथून गांजासदृश अंमली पदार्थ घेऊन येत होता. त्याने हा पदार्थ पाठीला लटकवलेल्या बॅगमध्ये ठेवला होता.

    आप ने केली भ्रष्टाचाराची पोलखोल

    मिळालेल्या माहितीच्या आधारे, पोलिसांनी तात्काळ सापळा रचून आरोपी क्षितिज जुनघरे याला आयुध निर्मणी चांदा गेट क्र. ३, सुमठाणा चौक, भद्रावती येथे ताब्यात घेतले. पंचांसमक्ष त्याच्या बॅगची झडती घेण्यात आली असता, त्यात गांजासदृश पदार्थ आढळून आला.

    जप्त केलेला मुद्देमाल: मापारी जीवितोष्य बिस्वास यांनी वजन केले असता, जप्त केलेल्या गांजाचे वजन १ किलो ४८० ग्रॅम असून त्याची किंमत ₹२९,०८०/- आहे. याव्यतिरिक्त, गुन्ह्यात वापरलेली हिरो स्प्लेंडर मोटरसायकल (किंमत ₹६०,१००/-) देखील जप्त करण्यात आली आहे. अशा प्रकारे एकूण ₹८९,१८०/- किमतीचा मुद्देमाल पंचांसमक्ष जप्त करण्यात आला आहे.

    दाखल गुन्हा: याप्रकरणी भद्रावती पोलीस स्टेशनमध्ये अ.क्रं. २८०/२०२५ अंतर्गत कलम ८(क), २०(ब), (II), (ब) NDPS ॲक्ट सह कलम ३(१)/१८१, १३०/१७७ मोटार वाहन कायदा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.