fake documents used in cow transport | 🐄 बनावट कागदपत्रांवर गोवंश वाहतूक? पोलिसांनी पकडला 1.70 कोटींचा तस्करीचा खेळ!

fake documents used in cow transport

fake documents used in cow transport : चंद्रपूर जिल्ह्यातून गोवंश जनावरांची वाहतूक करण्याचे काम गोवंश तस्कर करीत आहे, अश्याच गोवंश तस्करीचा चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने गुन्हा उघडकीस करण्यात यश मिळाले असून यामध्ये तब्बल 1 कोटी 70 लाख 70 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
घुग्गुस पोलीस स्टेशनच्या हद्दीतील धानोरा टोल नाकाजवळ ही कारवाई करण्यात आली. animal cruelty in cattle transport

दीड कोटीच्या रस्त्याच्या कामात मोठा भ्रष्टाचार, आप ने केली पोलखोल


गोवंश जनावरांना क्रूर पणे हात-पाय तोंड बांधून वाहनात दाटीने भरीत त्यांना तेलंगणा राज्यात कत्तलीसाठी नेत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती.

सदर वाहतूक घुग्गुस मार्ग पडोली मधून तेलंगणा राज्यात जात असल्याने गुन्हे शाखेने धानोरा टोल नाक्याजवळ सापळा रचला, यावेळी संशयास्पद वाहने दिसताच क्षणी पोलिसांनी वाहनांना थांबवित त्यांची झडती घेतली असता तब्बल 6 आयशर वाहनात एकूण 72 गोवंश जनावरांना क्रूरपणे दाटून कोंबले होते.
सदर वाहनांची वाहतूक व्यवस्थित पणे व्हावी याकरिता एक पायलट वाहन सुद्धा होते. cattle trafficking in Chandrapur district

बनावट पावत्याने उघडला तस्करीचा खेळ


आयशर वाहनात असलेल्या चालकांना वाहतुकीबाबत कागदपत्रांची मागणी केली असता त्यांनी भंडारा-गोंदिया वरून जनावरे खरेदी केल्याच्या पावत्या सादर केल्या, त्या पावत्यांची तपासणी केली असता त्यामध्ये शासकीय अधिकारी यांची स्वाक्षरी ही बनावट असल्याचे निष्पन्न झाले, त्या स्वाक्षरी मार्फत गोवंशाची वाहतूक ही कायदेशीर असल्याचे दिसून येत होते, त्यामुळे हे तस्कर जनावरांची कोंबून कत्तलीसाठी वाहतूक करीत होते.


यावेळी पोलिसांनी एकूण 72 गोवंश जनावरे, 6 ट्रक व एक पायलटिंग वाहन असा एकूण 1 कोटी 70 लाख 70 हजारांचा माल जप्त करीत एकूण 18 जणांवर घुग्गुस पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. गोवंश जनावरांना प्यार फाउंडेशन कडे सोपविण्यात आले. विशेष बाब म्हणजे पोलीस प्रशासनाच्या प्रसिद्धी पत्रकातून आरोपींचे नाव गहाळ होते.


सदरची यशस्वी कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सपोनि बलराम झाडोकर, पोउपनी विनोद भुरले, संतोष निंभोरकर, सुनील गौरकार व पथकाने केली.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *