Tag: स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर

  • illegal cockfighting gambling Chandrapur । 🔥 कोंबड्यांच्या झुंजीवर जुगार! खेळाडूंचा भंडाफोड

    illegal cockfighting gambling Chandrapur

    illegal cockfighting gambling Chandrapur : चंद्रपूर – १७ ऑगस्ट रोजी रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेने अवैधपणे कोंबड्याच्या झुंजीवर जुगार खेळणाऱ्या जुगार बहाद्दर विरोधात कारवाई केली, या कारवाई ३ आरोपी सह ५ लाख ८८ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

    चंद्रपुरात २४ वर्षीय युवकाला मेफेड्रोन पावडर विक्री प्रकरणी अटक

    मौजा जांभरला गावाच्या तलावाजवळ काही इसम कोंबड्याच्या झुंजीवर जुगार खेळत आहे अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती, माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने जांभरला या गावातील तलावाजवळ धाड मारली. यावेळी एकूण १५ कोंबडे, त्यापैकी ३ मृत कोंबडे, ६ दुचाकीवाहन सह रोख १५ हजार ५०० रुपये असा एकूण ५ लाख ८८ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर जुगार हा अजयपूर मधील विशाल गावंडे चालवीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

    हे आहेत जुगार बहाद्दर

    यावेळी जुगार खेळणारे आरोपी ३८ वर्षीय फारुख बहादूर शेख चंद्रपूर, ४६ वर्षीय मुकेश नामदेव दशमवार राहणार जुनोना चौक, बाबुपेठ व ३५ वर्षीय राजसिंग बहादूरसिंग पटवा राहणार शिवाजी चौक मूल यांना अटक झाली. आरोपींवर महाराष्ट्र जुगार कायद्यांतर्गत रामनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. cockfight gambling crime in Chandrapur

    सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमाक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पोउपनि विनोद भुरले, पोउपनि सर्वेश बेलसरे, पोलीस कर्मचारी सुभाष गोहोकार, चेतन गज्जलवार, इम्रान खान, सतीश अवथरे, किशोर वाकाटे, सुमित बरडे, हिरालाल गुप्ता, प्रफुल्ल गारघाटे व शशांक बदामवार यांनी केली.

  • Anti-drug operation in Chandrapur । चंद्रपुरात नशेचं जाळं, मेफेड्रोन विक्री प्रकरणी २४ वर्षीय युवकाला अटक

    Anti-drug operation in Chandrapur

    Anti-drug operation in Chandrapur : चंद्रपूर – चंद्रपूर सारख्या लहान जिल्ह्यात मादक पदार्थाची तस्करी दिवसेंदिवस वाढत आहे, अनेक तरुण या नशेच्या आहारी गेल्याने गांजा सह मेफेड्रोन पावडर हे सहजतेने उपलब्ध होत आहे, विशेष बाब म्हणजे अल्पवयीन मुले, तरुण मुली व महिलांचा सुद्धा या मादक पदार्थ विक्रीमध्ये सहभाग वाढताना दिसत आहे.

    चंद्रपुरात दीड किलो गांजा जप्त

    चंद्रपूर शहरात स्थानिक गुन्हे शाखा मादक पदार्थविरोधात मोहीम राबवित आहे, या मोहिमेत १८ ऑगस्ट रोजी रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोपनीय माहितीच्या आधारे सरकार नगर मध्ये सापळा रचत २४ वर्षीय युवकाला मेफेड्रोन पावडर विक्री प्रकरणी अटक करण्यात आली.

    १ लाख ३ हजारांचा मुद्देमाल जप्त

    सरकार नगर मध्ये दुचाकी वाहन mh३४ bn ०७५२ ला थांबवित चालकाची झडती घेतली असता २४ वर्षीय सौरभ दुर्वास कसारे राहणार मेजर गेट, वैद्य नगर चंद्रपूर याच्या ताब्यात असलेले ६.०६ ग्राम मेफेड्रोन पावडर जप्त करीत दुचाकी वाहन, मोबाईल व मेफेड्रोन पावडर असा एकूण १ लाख ३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, पोलिसांनी आरोप सौरभ वर एनडीपीएस ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे. youth Mephadrone arrest NDPS action

    सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सपोनि बलराम झाडोकार, पोउपनि सर्वेश बेलसरे, पोलीस कर्मचारी नितीन साळवे, नितीन कुरेकार, दीपक डोंगरे व अमोल सावे यांनी केली.

  • illegal liquor transport from Madhya Pradesh । 🚨 “Madhya Pradesh मधून चंद्रपुरात आली विदेशी दारूची अवैध खेप!

    illegal liquor transport from Madhya Pradesh

    illegal liquor transport from Madhya Pradesh : चंद्रपूर – १५ ऑगस्ट प्रत्येक नागरिक स्वातंत्र्यदिन उत्साहाने साजरा करीत होता मात्र याचा फायदा काही गुन्हेगारी वृत्ती अवैध कामे करण्यास तयार होती मात्र स्थानिक गुन्हे शाखेच्या चपळतेने त्यांचा गुन्हा हाणून पाडला. स्थानिक गुन्हे शाखेने मध्यप्रदेश राज्यातून येणाऱ्या विदेशी दारू असा एकूण ५ लाख ११ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल पकडला. यावेळी दोन आरोपीना अटक करण्यात आली आहे.

    बाबुपेठमध्ये मेफेड्रोन पावडर ची वाहतूक, दोघांना अटक

    मध्यप्रदेश या राज्यातून अवैध दारूची वाहतूक चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी मध्ये होणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती, माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने विविध ठिकाणी नाकेबंदी केली, मौजा बाम्हणी रोडवर नाकाबंदी सुरु असताना चारचाकी वाहन क्रमांक mh०३ AW ५८७७ येताना दिसले, त्या वाहनाला थांबविता त्याची झडती घेतली असता त्यामध्ये १५ पेट्या रॉयल स्टॅग विदेशी दारू ७२० बॉटल १८० एमएल किंमत १ लाख ८७ हजार व २ पेट्या रॉयल स्टॅग विदेशी दारू १९० बॉटल ९० एमएल किंमत २४ हजार रुपये, दारूची वाहतूक करणारे वाहन सहित एकूण ५ लाख ११ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

    दोघांना अटक

    सदर गुन्ह्यात ३१ वर्षीय प्रफुल प्रकार घरडे राहणार हनुमान नगर ब्रह्मपुरी व २७ वर्षीय अक्षय रुपचंद पिल्लेवार राहणार देलनवाडी ब्रह्मपुरी यांना अटक करण्यात आली, दोघांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांवये गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास नागभीड पोलीस करीत आहे. illegal alcohol trafficking on Independence Day

    सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सपोनि दीपक कांक्रेडवार, सपोनि बलराम झाडोकर, पोउपनि संतोष निंभोरकर, सर्व्हेश बेलसरे व पोलीस कर्मचारी जयंता चुनारकर, नितेश महात्मे, गणेश भोयर, प्रदीप मडावी, अजित शेंडे आणि दिनेश अराडे यांनी केली.

  • mephedrone trafficking Babupeth । स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला बाबुपेठमध्ये गुन्हे शाखेची कारवाई! अंमली पदार्थांसह २ आरोपी ताब्यात

    mephedrone trafficking Babupeth

    mephedrone trafficking Babupeth : चंद्रपूर – शहरातील बाबुपेठ भागात चंद्रपूर पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी मोहिमेत अनेक कारवाया होत असून याचा अर्थ या भागात अंमली पदार्थाचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले आहे, स्वातंत्र्यदिनाच्या पूर्व संध्येला स्थानिक गुन्हे शाखेने २ युवकांना मेफेड्रोन पावडर सहित अटक करून तब्बल १ लाख ७४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला यावेळी आरोपीकडून एक धारदार चाकू सुद्धा जप्त करण्यात आला.

    बाबुपेठमध्ये १९ वर्षीय मुलाला मेफेड्रोन ची वाहतूक करताना पकडले

    स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने १४ ऑगस्ट रोजी बाबुपेठ भागातील गुरुदेव चौकात छापेमार कारवाई केली, पोलिसांना अंमली पदार्थ मेफेड्रोन ची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुदेव चौकात सापळा रचला असता त्यावेळी दुचाकी वाहनावर १९ वर्षीय चुन्नु महेश गुप्ता राहणार महाकाली कॉलरी वार्ड आणि दुसऱ्या वाहनावर २० वर्षीय हर्षित अशित टीकेदार राहणार नार्मल स्कुल वॉर्ड बाबुपेठ चंद्रपूर त्यावेळी चौकात आढळले असता दोघांना ताब्यात घेण्यात आले. Crime Branch catches mephedrone traffickers

    अंमली पदार्थ सहित धारदार चाकू जप्त

    दोन्ही आरोपीकडून ०४.४५० ग्राम मेफेड्रोन पावडर एमडी हे अंमली पदार्थ सहित धारदार चाकू व दोन दुचाकी वाहनसह १ लाख ७४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीवर चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये एनडीपीएस कायदा व भारतीय हत्यार कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

    सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे व उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सपोनि दीपक कांक्रेडवार, सपोनि बलराम झाडोकार, पोउपनि संतोष निंभोरकर, पोउपनि विनोद भुरले, पोउपनि सर्वेश बेलसरे, पोलीस कर्मचारी धनराज करकाडे, चेतन गज्जलवार, सुरेंद्र महतो, सुमित बरडे, प्रफुल गारघाटे व मिलिंद टेकाम यांनी केली.

  • Chandrapur drug trafficking case । चंद्रपुरात MD पावडरसह दोघांना अटक

    Chandrapur drug trafficking case

    Chandrapur drug trafficking case : चंद्रपूर – राज्य ड्रग्ज मुक्त व्हावे यासाठी पोलीस यंत्रणा सध्या विविध मोहिमा राबवित आहे, विशेषकरून चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखा जिल्ह्यात होणाऱ्या अंमली पदार्थाच्या तस्करी व विक्रीवर आळा घालण्याचे प्रयत्न करीत आहे यामध्ये २७ जुलै रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २० ग्राम मेफेड्रोन पावडर सहित दोघांना अटक केली आहे. आरोपीजवळून तब्बल १ लाख ९२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

    चंद्रपुरात गुन्हेगारीचा उद्रेक

    झटपट पैसे कमविण्याच्या नादात तरुणाईच्या उंबरठ्यावर असणारी मुले अंमली पदार्थाच्या तस्करीत रमून गेली आहे, या गुन्ह्यात अडकल्यावर पुढे काय यावर विचार न करणारी मुले आपलं भविष्य उध्वस्त करीत आहे. चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखा जिल्ह्यातील अवैध व्यवसायांवर नियंत्रण आणण्याकरिता विविध मोहिमा राबवित आहे. या अनुषंगाने २७ जुलै रोजी गोपनीय माहितीच्या आधारे शहरात मेफेड्रोन पावडरची विक्री करणाऱ्या २ युवकांना रयतवारी कॉलोरी येथील निमवाटिका येथे सापळा रचून ताब्यात घेतले. MD powder drug case in Chandrapur

    झटपट पैसे कमविण्याच्या नादातील गुन्हेगारी

    २१ वर्षीय विशाल रत्नाकर भोयर राहणार बगड खिडकी, चंद्रपूर व २२ वर्षीय मोहम्मद फैज अब्दुल राशिद कुरेशी राहणार नुरी चौक बगड खिडकी यांच्याजवळून पोलिसांना २० ग्राम एमडी मेफेड्रोन पावडर आढळून आले. गुन्ह्यात वापरलेली दुचाकी सहित १ लाख ९२ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी यावेळी जप्त केला.

    Somayya institute of technology

    सदरची यशस्वी कारवाई स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पोउपनि विनोद भुरले, पोउपनि सुनील गौरकार, पोलीस कर्मचारी सुभाष गोहोकार, सतीश अवथरे, रजनीकांत पुठ्ठावार, दीपक डोंगरे, इम्रान खान, किशोर वाकाटे, हिरालाल गुप्ता, अजित शेंडे, रिषभ बारसिंगे व मिलिंद टेकाम यांनी केली.

  • brahmpuri illegal firearm seizure । “देशी कट्टा, दोघांना अटक! ब्रह्मपुरीत LCB ची कारवाई”

    brahmpuri illegal firearm seizure

    brahmpuri illegal firearm seizure : ब्रह्मपुरी – चंद्रपूर जिल्ह्यात अवैध बंदूक कुठून येतात हा सर्वात मोठा अनुत्तरित प्रश्न आहे, बंदूक आणणारा पोलिसांना मिळतो मात्र बंदूक विक्रेता पोलिसांच्या हाती लागत नाही. १९ जुलै रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २६ वर्षीय युवकांकडून देशी कट्टा व दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले.

    चंद्रपुरात बोगस ओयो हॉटेलचा पर्दाफाश

    ब्रह्मपुरी तालुक्यात अवैध व्यवसाय विरुद्ध कारवाई करीता पेट्रोलिंग करणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला अवैध शस्त्राबाबत गोपनीय माहिती मिळाली, माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मौजा किन्ही गावात दाखल होत संशयिताच्या घरी छापा टाकला, २६ वर्षीय गणेश उर्फ गोलू बक्षी सोनवणे याच्या ताब्यातील देशी कट्टा सह दोन जिवंत काडतुसे पोलिसांच्या कारवाई दरम्यान आढळले.

    दोन आरोपीना अटक

    सदर गावठी कट्टा ब्रह्मपुरी तालुक्यातील मालडोंगरी गावात राहणाऱ्या २९ वर्षीय अक्षय भजनदास शेंडे याने गणेश सोनवणे ला दिला असल्याची माहिती गणेश ने पोलिसांना दिली, पोलिसांनी दोन्ही आरोपीना अटक करीत भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३, २५ अनव्ये गुन्हा दाखल करीत ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले.

    सदरची कारवाई पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सपोनि बलराम झाडोकर, पोउपनि संतोष निंभोरकर, पोलीस कर्मचारी सचिन गुरनुले, गणेश भोयर, अजित शेंडे, नितेश महात्मे व मिलिंद जांभुळे यांनी केली.

  • fake documents used in cow transport | 🐄 बनावट कागदपत्रांवर गोवंश वाहतूक? पोलिसांनी पकडला 1.70 कोटींचा तस्करीचा खेळ!

    fake documents used in cow transport

    fake documents used in cow transport : चंद्रपूर जिल्ह्यातून गोवंश जनावरांची वाहतूक करण्याचे काम गोवंश तस्कर करीत आहे, अश्याच गोवंश तस्करीचा चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने गुन्हा उघडकीस करण्यात यश मिळाले असून यामध्ये तब्बल 1 कोटी 70 लाख 70 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
    घुग्गुस पोलीस स्टेशनच्या हद्दीतील धानोरा टोल नाकाजवळ ही कारवाई करण्यात आली. animal cruelty in cattle transport

    दीड कोटीच्या रस्त्याच्या कामात मोठा भ्रष्टाचार, आप ने केली पोलखोल


    गोवंश जनावरांना क्रूर पणे हात-पाय तोंड बांधून वाहनात दाटीने भरीत त्यांना तेलंगणा राज्यात कत्तलीसाठी नेत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती.

    सदर वाहतूक घुग्गुस मार्ग पडोली मधून तेलंगणा राज्यात जात असल्याने गुन्हे शाखेने धानोरा टोल नाक्याजवळ सापळा रचला, यावेळी संशयास्पद वाहने दिसताच क्षणी पोलिसांनी वाहनांना थांबवित त्यांची झडती घेतली असता तब्बल 6 आयशर वाहनात एकूण 72 गोवंश जनावरांना क्रूरपणे दाटून कोंबले होते.
    सदर वाहनांची वाहतूक व्यवस्थित पणे व्हावी याकरिता एक पायलट वाहन सुद्धा होते. cattle trafficking in Chandrapur district

    बनावट पावत्याने उघडला तस्करीचा खेळ


    आयशर वाहनात असलेल्या चालकांना वाहतुकीबाबत कागदपत्रांची मागणी केली असता त्यांनी भंडारा-गोंदिया वरून जनावरे खरेदी केल्याच्या पावत्या सादर केल्या, त्या पावत्यांची तपासणी केली असता त्यामध्ये शासकीय अधिकारी यांची स्वाक्षरी ही बनावट असल्याचे निष्पन्न झाले, त्या स्वाक्षरी मार्फत गोवंशाची वाहतूक ही कायदेशीर असल्याचे दिसून येत होते, त्यामुळे हे तस्कर जनावरांची कोंबून कत्तलीसाठी वाहतूक करीत होते.


    यावेळी पोलिसांनी एकूण 72 गोवंश जनावरे, 6 ट्रक व एक पायलटिंग वाहन असा एकूण 1 कोटी 70 लाख 70 हजारांचा माल जप्त करीत एकूण 18 जणांवर घुग्गुस पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. गोवंश जनावरांना प्यार फाउंडेशन कडे सोपविण्यात आले. विशेष बाब म्हणजे पोलीस प्रशासनाच्या प्रसिद्धी पत्रकातून आरोपींचे नाव गहाळ होते.


    सदरची यशस्वी कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सपोनि बलराम झाडोकर, पोउपनी विनोद भुरले, संतोष निंभोरकर, सुनील गौरकार व पथकाने केली.

  • criminal caught with stolen vehicle । गडचिरोली मध्ये चैन स्नॅचिंग पण दुचाकी चोरीत चंद्रपुरात अडकला

    criminal caught with stolen vehicle

    criminal caught with stolen vehicle : चंद्रपूर – जिल्ह्यात वाहनांच्या चोरी प्रकरणी पोलीस अधीक्षकांनी सदर गुन्ह्यांचा छडा लावावा असे निर्देश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोहीम राबवित खबरीद्वारे गोपनीय माहिती मिळवली असता रेकॉर्डवरील आरोपी एसटी वर्कशॉप जवळ दुचाकी वाहन विक्री करण्यासाठी येत असल्याचे कळताच पथकाने सापळा रचत एकाला अटक केली. vehicle theft cases solved by police

    तुकूम अपघात प्रकरणी युवती सेनेने केली लक्षवेधी मागणी

    स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रेकॉर्डवरील आरोपी ४५ वर्षीय जनरलसिंग उर्फ मन्नूसिंग टाक राहणार समतानगर नेरी चौक ऊर्जानगर याला अटक केली. जनरलसिंग ने महिनाभरापूर्वी नायडू हॉस्पिटल तुकूम जवळून स्प्लेंडर प्रो क्रमांक MH ३४ AX ३८४८ छोटी केली होती.

    गडचिरोली मध्ये चैन स्नॅचिंग

    आरोपीने जनरलसिंग ने गडचिरोली मध्ये महिलेकडून सोन्याची चैन हिसकावत जबरी चोरी केल्याची कबुली दिली. याबाबत गडचिरोली पोलिसांना माहिती देण्यात आली आहे. दुचाकी चोरी प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने दुचाकीसहित ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

    सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पोउपनि विनोद भुरले, सुनील गौरकार, पोलीस कर्मचारी सुभाष गोहोकार, नितीन साळवे, नितीन कुरेकार, सतीश अवथरे, दीपक डोंगरे, गोपाल आतकुलवार, किशोर वाकाटे, शशांक बदामवार व प्रसाद धुळगंडे यांनी केली.

  • card gambling in jungle । वाघाच्या दहशतीतही जंगलात ५२ पत्त्यांचा जुगार! पोलिसांनी ११ जणांना पकडलं

    card gambling in jungle

    card gambling in jungle : भिसी – भिसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत बाघाई जंगलात ५२ पत्त्यांचा जुगार खेळत असताना एकूण ११ जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली, यावेळी मोबाईल, तीन दुचाकी असा एकूण ३ लक्ष १९ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

    खासदार धानोरकर यांच्या पाठपुराव्याला यश, हाताला पुन्हा काम भेटणार

    सध्या जिल्ह्यात वाघाची दहशत सुरु आहे, ८ दिवसात ८ नागरिकांची वाघाने शिकार केल्याची घटना घडली, मात्र वाघाच्या दहशतीला न घाबरता ११ जुगार बहाद्दरांनी थेट जंगलात जाऊन ५२ पत्त्यांचा जुगार सुरु केला. local crime branch gambling raid forest

    Powered by myUpchar

    जंगलात रंगला जुगार

    मात्र हि माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली असता १८ मे रोजी जुगार अड्ड्यावर धाड मारीत तब्बल ११ जुगार बहाद्दरांना जुगार खेळताना अटक करण्यात आली. ११ जणांवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनिय अन्व्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

    सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक संतोष निभोरकर, पोलीस उपनिरीक्षक सुनील गौरकार, पोलीस कर्मचारी नितीन कुरेवार, नितीन साळवे, जय सिंह, गणेश मोहुर्ले, संतोष येलपुलवार, गणेश भोयर, गोपाळ आतकुलवार व नितीन रायपुरे यांनी केली. जुगार प्रकरणाचा पुढील तपास भिसी पोलीस करीत आहे.

  • copper pipe theft in Chandrapur । कॉपर पाईप चोर टोळी जेरबंद, चंद्रपूर पोलिसांचे यश!

    copper pipe theft in Chandrapur

    copper pipe theft in Chandrapur : चंद्रपूर शहरात चोरीचे वाढते प्रमाण हे डोकेदुखी बनली आहे, यावर नियंत्रण यावे यासाठी पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेला निर्देशित करीत चोरीच्या गुन्ह्यांचा उलगडा करण्यासाठी आदेशित केले.

    गांधी चौकात भाजपचा जल्लोष

    स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय माहिती मिळाली कि रेकॉर्डवरील गुन्हेगाराने मोठ्या प्रमाणात कॉपर पाईप ची चोरी करीत सदर माल घरामागे लपून ठेवला आहे.

    पोलिसांनी आरोपी २७ वर्षीय गोलू उर्फ सुमोहित चंद्रशेखर मेश्राम, १९ वर्षीय राहुल रतन रॉय, २१ वर्षीय सुंदरम संजय तिवारी व २९ वर्षीय कमलेश दादुभाई गुप्ता राहणार आरोपी अष्टभुजा व श्यामनगर यांना ताब्यात घेत चौकशी केली असता चोरीचा माल जप्त करण्यात आला. police solve copper theft case Chandrapur

    सदर कॉपर पाईप हे चंद्रपुरातील निर्माणाधीन मेडिकल कॉलेज येथे सुरु असलेल्या बांधकाम येथील ऑक्सिजन आउटलेट कॉपर पाईप चोरी केल्याचे निष्पन्न झाले सदर गुन्ह्यात चोरी झालेला कॉपर पाईप व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण १ लक्ष ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

    सदरची यश्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले, मधुकर सामलवार, सुनील गौरकार, पोलीस कर्मचारी सुभाष गोहोकार, सतीश अवथरे, रजनीकांत पुठ्ठावार, दीपक डोंगरे, प्रशांत नागोसे, किशोर वाकाटे, शशांक बदामवार यांनी केली.