Category: ताज्या बातम्या

महाराष्ट्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व ताज्या बातम्या (Latest News) आणि ब्रेकिंग अपडेट्स वाचण्यासाठी रोज भेट द्या news34.in वर. राजकारण, समाजकारण, क्रीडा, गुन्हेगारी आणि आर्थिक घडामोडींचे त्वरित आणि विश्वसनीय कव्हरेज येथे उपलब्ध आहे. २४ तास सुरू असलेल्या घडामोडींची अचूक माहिती मिळवा, जेणेकरून कोणतीही मोठी बातमी तुमच्यापासून सुटणार नाही.

  • Forest Minister Ganesh Naik | मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्याचा मार्ग चंद्रपुरातूनच निघणार – वनमंत्री गणेश नाईक

    Forest Minister Ganesh Naik

    Forest Minister Ganesh Naik : संरक्षित क्षेत्रांच्या बाहेर स्थानिक पातळीवरील वन्यप्राण्यांच्या मुबलक संख्येवर नियंत्रणासाठी अभिनव आणि संवेदनशील उपाययोजना’ या विषयावर भारतातील पहिली परिषद चंद्रपुरात होत आहे. याचा अतिशय आनंद आहे. केंद्र सरकार आणि विविध राज्यातील अनेक तज्ज्ञांनी या संवेदनशील विषयावर येथे चिंतन आाणि मंथन केले. चंद्रपूर येथे तत्ज्ञांच्या निष्कर्षातून निघालेल्या सकारात्मक उपाययोजनेतूनच मानव – वन्यजीव संघर्ष कमी करण्याचा मार्ग निघेल, असा विश्वास राज्याचे वनमंत्री गणेश नाईक (forest minister ganesh naik) यांनी व्यक्त केला.

    वन अकादमी येथे ‘वाईल्डकॉन – 2025’ या दोन दिवसीय परिषदेचा समारोप करतांना ते बोलत होते. यावेळी मंचावर आमदार किशोर जोरगेवार, प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा वनबल प्रमुख शोमिता बिस्वास, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) विवेक खांडेकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक (व्यवस्थापन) एम.एस.राव, महाराष्ट्र वनविकास महामंडळाचे (एफडीसीएम) व्यवस्थापकीय संचालक संजीव गौड, वन अकादमीचे संचालक एम.एस. रेड्डी, चंद्रपुरचे मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्रीय संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर, शोभा फडणवीस आदी उपस्थित होते.

    दुर्गापूर पोलिसांनी पकडला एमडी पावडर, 3 आरोपीना अटक

    मानवाने प्राण्यांच्या जागेत अतिक्रमण केले, की प्राण्यांनी आपल्या जागेत अतिक्रमण केले, हा संशोधनाचा विषय आहे, असे सांगून वनमंत्री श्री. नाईक म्हणाले, वन्यप्राण्यांची लोकसंख्या वाढली आहे, हे सत्य आहे. तसेच आपल्याकडे मानवी लोकसंख्या प्रचंड वाढली असून जमीन मात्र मर्यादीतच आहे. शिवाय वनांच्या क्षेत्रामधून विकास कामे होत आहे. त्यामुळे प्राण्यांच्या अधिवासाची जागा कमी झाली आहे. त्यामुळेच मानव – वन्यजीव संघर्षात वाढ झाल्याचे निदर्शनास येते. माणूस आणि वन्यजीव सुद्धा जगले पाहिजे. त्यामुळे या विषयावर इतर देशांनी काय उपाययोजना केल्यात, त्याचा वरिष्ठ वन अधिका-यांनी अभ्यास करावा. (Human Wildlife Conflict)

    wildcon program

    वनविभागात प्रत्येक क्षेत्रीय विभागानुसार किती अतिरिक्त मनुष्यबळाची आवश्यकता आहे, त्याचा अहवाल सादर करावा. चंद्रपुरातील टायगर सफारी प्रकल्पाला अतिक गतीने समोर नेण्यासाठी नक्कीच प्रयत्न केला जाईल. तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील स्थानिक नागरिकांसाठी ताडोबा सफारीचे शुल्क कमी करता येईल का, याचे अधिका-यांनी नियोजन करावे. चंद्रपूर येथे दोन दिवसीय चर्चासत्रात मांडण्यात आलेल्या प्रत्येक समस्या सोडविण्यात येतील. निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली. यावेळी त्यांनी बांबू पासून बनविलेल्या वस्तुंच्या प्रदर्शनीची पाहणी केली.

    वन्यजीव पर्यटनाचा फायदा स्थानिकांना व्हावा – आमदार किशोर जोरगेवार

    सरकारच्या कार्यकाळाच्या सुरवातीला आणि नवीन वर्षाच्याही सुरवातीलाच या संवेदनशील विषयावरची पहिली परिषद चंद्रपुरात होत आहे, ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. वन्यजीवांची लोकसंख्या वाढली आहे, त्यामुळे नागरी जीवनात त्यांचे आगमन होत आहे. मानवजीव हा सर्वात महत्वाचा आहे, मानवाचा जीव वाचविणे आवश्यक आहे. वन्यजीवांमुळेच चंद्रपूरच्या पर्यटनात वाढ झाली आहे. त्यामुळे स्थानिकांना त्याचा अधिक फायदा व्हावा. कारण वाईल्ड लाईफ पर्यटन हा लोकांना आनंद देणारा व्यवसाय आहे. त्यातून रोजगारनिर्मिती होण्यास मदत मिळेल. तसेच स्थानिक लोकांसाठी सफारीचे शुल्क कमी करावे, अशी मागणी श्री. जोरगेवार ( mla kishor jorgewar) यांनी केली.

    यावेळी प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा वनबल प्रमुख शोमिता बिस्वास म्हणाल्या, या दोन दिवसांत महत्वाची चर्चा झाली आहे. स्थानिक स्थरावर फॉरेस्टगार्डला मदतनिसाची गरज असल्याने विभागासाठी नवीन मनुष्यबळ आवश्यक आहे. तर अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) विवेक खांडेकर म्हणाले, मानव – वन्यजीव संघर्षाचे व्यवस्थापन करणे, संघर्ष कमी करून दोघांनाही वाचविणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने या परिषदेच्या माध्यमातून पहिले पाऊल चंद्रपुरात टाकण्यात आले आहे. तसेच 20 जिल्ह्यात रॅपीड रेस्क्यू टीमची आवश्यकता असल्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

    प्रास्ताविकात क्षेत्रीय संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर म्हणाले, संरक्षित क्षेत्राच्या बाहेर मानव – वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी आयोजित या दोन दिवसीय परिषदेत नवीन बाबी, नाविण्यपूर्ण माहिती समोर आल्या. याबाबतचा अहवाल शासनाला सादर करून वन्यजीव संरक्षण कसे करावे, याचे नियोजन करण्यात येईल.

    कार्यक्रमाचे संचालन श्रेया खांडीलकर यांनी तर आभार उपसंचालक (बफर) पियुषा जगताप यांनी मानले. दोन दिवसीय परिषदेत केंद्र सरकारचे वन्यजीव या विषयावरील वैज्ञानिक सल्लागार, विविध राज्यातील व्याघ्र प्रकल्पाचे संचालक, राज्यातील उपवनसंरक्षक, पर्यावरणतज्ज्ञ, वन्यजीव विषयावर काम करणा-या सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, वरिष्ठ वन अधिकारी आदी सहभागी झाले होते.

  • Wildcon 2025 | ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पाने Wildcon परिषदेचे केले आयोजन

    Wildcon 2025

    Wildcon 2025 : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातर्फे  ‘संरक्षित क्षेत्रांच्या बाहेर स्थानिक पातळीवरील तृणभक्षी आणि मांसभक्षी वन्यप्राण्यांच्या मुबलक संख्येवर नियंत्रणासाठी अभिनव आणि संवेदनशील उपाययोजना’ या विषयावर एका विशेष परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. चंद्रपूर वन अकादमी येथे आज या परिषदेचे उद्घाटन झाले. यावेळी झालेल्या चर्चेत आजी-माजी तसेच वरिष्ठ वन अधिकारी, वन्यजीव अभ्यासक, शास्त्रज्ञ, महाविद्यालयीन विद्यार्थी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले.

    परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा वनबल प्रमुख शोमिता बिस्वास, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) विवेक खांडेकर,  व्ही. क्लेमेंट बेन, अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव पूर्व),  डॉ. शिरीष उपाध्ये, संचालक, डब्ल्यूआरटीसी, गोरेवाडा, शोभा फडणवीस, आमदार देवराव भोंगळे,  तसेच डॉ. जितेंद्र  रामगावकर, क्षेत्र संचालक, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प ( tadoba andhari tiger reserve) यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी परिषदेच्या विषयाशी संबंधित संशोधनात्मक पोस्टर्सचे प्रदर्शनही आयोजित करण्यात आले. Wildcon 2025

    245 नळ धारकांवर चंद्रपूर मनपाने केली कपातीची कारवाई

    परिषदेच्या पहिल्या सत्रात ‘संरक्षित क्षेत्रांबाहेरील वन्यजीव मुबलकता आणि पर्यावरणीय संदर्भ’ या विषयावरील चर्चेत पर्यावरणीय व सामाजिक मुद्दयांचा परामर्ष घेण्यात आला. यावेळी बिबट्या, माकड, निलगाय, आणि रानडुक्कर यांसारख्या प्रजातींशी संबंधित विशिष्ट आव्हानांचे विवेचन करताना, त्यांचे शेती आणि मानवी वस्तीवर होणारे परिणाम स्पष्ट केले गेले. या सत्रातील चर्चेत  जयकुमार,  उपवनसंरक्षक,  मेळघाट व्याघ्र प्रकल्प, डॉ. बिलाल हबीब, डब्ल्यूआयआय, डेहराडून, डॉ. सिंदुरा गणपथी, फेलो, प्रधान वैज्ञानिक सल्लागार यांचे कार्यालय, भारत सरकार,  अमोल सातपुते,  उपवनसंरक्षक, जुन्नर,  एम. रामानुजन, मुख्य वनसंरक्षक, कोल्हापूर,  रजनीश सिंग,  उपसंचालक,  पेंच, मध्य प्रदेश,  कार्तिकेय सिंग, वन्यजीव आणि वन सेवा संस्था व डॉ. जितेंद्र एस. रामगावकर, क्षेत्र संचालक,  ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प हे सहभागी झाले.

    परिषदेच्या दुस-या सत्रात ‘वन्यजीव लोकसंख्येच्या व्यवस्थापनासाठी धोरण आणि कायदेशीर बाबी’ या विषयावरील चर्चेत संरक्षित क्षेत्रांबाहेरील वन्यजीव लोकसंख्या व्यवस्थापनासाठी अस्तित्वातील कायदे आणि धोरणात्मक चौकट तसेच नवीन कायदेशीर व समाजमान्य पद्धतींची गरज यावर विचारविनिमय करण्यात आला. या सत्रात  सुनील लिमये, माजी प्रधान मुख्य वन संरक्षक (वन्यजीव),  विवेक खांडेकर, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), एच. एस. पाब्ला, माजी प्रधान मुख्य वन संरक्षक (वन्यजीव), मध्य प्रदेश, डॉ. सेन्थिल कुमार,  विभागीय कार्यालय, पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालय, नागपूर, डॉ. वैभव माथूर, उपमहानिरीक्षक, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्रधिकरण, श्री. दिपांकर घोष, वरिष्ठ संचालक, डब्ल्यूडब्ल्यूएफ-भारत यांनी सहभाग घेतला.

    तिस-या सत्रात ‘वनक्षेत्रातील पशुवैद्यकीय पायाभूत सुविधांचे मानकीकरण’ या विषयावर चर्चा झाली. यावेळी प्रभावी वन्यजीव आरोग्य सेवा, रोग व्यवस्थापन आणि आपत्कालीन प्रतिसाद सुनिश्चित करण्यासाठी व्याघ्र अभयारण्यांमधील पशुवैद्यकीय पायाभूत सुविधांचे मानकीकरण करण्यावर चर्चा करण्यात आली.

    या चर्चेत डॉ. व्ही. क्लेमेंट बेन, अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव पूर्व), डॉ. बहार बाविस्कर, वाईल्ड सीईआर, डॉ. शिरिष उपाध्ये, संचालक,  डब्ल्यूआरटीसी,  गोरेवाडा,  नागपूर, श्रीमती नेहा पंचमिया, आरईएसक्यू चॅरिटेबल ट्रस्ट, डॉ. अखिलेश मिश्रा, ज्येष्ठ वन्यजीव पशुवैद्यक, मध्य प्रदेश, वनविभाग, डॉ. शशिकांत जाधव, डब्ल्यूव्हीएस, डॉ. शैलेश पेठे, उपायुक्त, पशुसंवर्धन विभाग यांनी आपले विचार व्यक्त केले.

  • What Is Hmpv virus | काय आहे HMPV व्हायरस? चंद्रपूर आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर

    what is hmpv virus

    what is hmpv virus : कोरोना नंतर चीन मधून HMPV व्हायरस चा उदय झाला असून हा व्हायरस चा एक रुग्ण देशातील कर्नाटक राज्यात आढळला असून आता महाराष्ट्र राज्यातील आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आलेले आहे.

    चंद्रपुरात एकाच रात्री 3 दुकाने फोडली

    याबाबत चंद्रपूर जिल्हा शल्य चिकित्सक महादेव चिंचोळे यांनी याबाबत जिल्ह्यातील जनतेला आवाहन केले की या hmpv व्हायरस कोरोना सारखा नसून काळजी करण्याचे कारण नाही, जर ताप, खोकला आला तर डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.

    एचएमपीव्ही (HMPV) व्हायरस म्हणजे ह्युमन मेटान्युमोव्हायरस (Human Metapneumovirus). हा एक श्वसन संसर्गजन्य व्हायरस असून तो मुख्यतः लहान मुले, वयस्कर व्यक्ती आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या लोकांना प्रभावित करतो. What is hmpv virus

    एचएमपीव्ही व्हायरसची माहिती:

    1. कुटुंब: Paramyxoviridae
      एचएमपीव्ही हा व्हायरस Paramyxoviridae कुटुंबातील आहे, जो इन्फ्लुएंझा किंवा आरएसव्ही (Respiratory Syncytial Virus) सारखाच आहे.
    2. सर्वप्रथम शोध:
      2001 साली नेदरलँड्समध्ये हा व्हायरस प्रथम ओळखला गेला. तो आधीपासून मानवांमध्ये अस्तित्वात होता, परंतु आधुनिक प्रयोगशाळेच्या तंत्रज्ञानामुळे त्याचे निदान झाले.
    3. संक्रमणाचा प्रकार:
      • श्वसनमार्गावर परिणाम करणारा व्हायरस.
      • सामान्यतः थंड हवामानात किंवा हिवाळ्यात अधिक प्रमाणात दिसतो.
      • संसर्ग मुख्यतः थेट संपर्क, श्वसनातून फेकलेले थेंब, किंवा संक्रमित वस्तूंच्या संपर्कातून होतो.

    एचएमपीव्हीचे लक्षणे:

    एचएमपीव्हीचा प्रभाव सौम्य ते गंभीर स्वरूपाचा असू शकतो. लक्षणे इतर श्वसन संसर्गांसारखी असतात: hmpv india

    1. सौम्य लक्षणे:
      • सर्दी, खोकला
      • ताप
      • घसा खवखवणे
      • थकवा
    2. गंभीर लक्षणे (मुख्यतः बालकांत आणि वृद्धांमध्ये):
      • श्वास घेण्यात अडचण
      • ब्रॉन्कायटिस (श्वासनलिका दाह)
      • न्युमोनिया (फुफ्फुसाचा संसर्ग)
      • घरघर (Wheezing)

    जोखीम गट:

    एचएमपीव्ही व्हायरस सामान्यतः खालील गटांना अधिक प्रभावित करतो:

    • लहान मुले: 5 वर्षांखालील मुले
    • ज्येष्ठ नागरिक: विशेषतः 65 वर्षांपेक्षा जास्त वयाचे
    • कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेले रुग्ण
    • अस्थमा किंवा हृदयविकार असलेले रुग्ण

    उपचार आणि प्रतिबंध:

    1. उपचार:
      • सध्या एचएमपीव्हीचा कोणताही विशिष्ट उपचार किंवा लस उपलब्ध नाही.
      • उपचार मुख्यतः लक्षणांवर आधारित असतात:
        • तापासाठी पॅरासिटामॉल
        • पुरेसे पाणी पिणे
        • ऑक्सिजन थेरपी (गंभीर प्रकरणांमध्ये)
    2. प्रतिबंध:
      • चांगल्या स्वच्छतेची सवय लावणे (हात वारंवार धुणे).
      • संक्रमित लोकांपासून लांब राहणे.
      • खोकताना किंवा शिंकताना तोंड झाकणे.
      • सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करणे.

    एचएमपीव्हीचा तुलनात्मक अभ्यास:

    एचएमपीव्ही हा आरएसव्ही (Respiratory Syncytial Virus), इन्फ्लुएंझा व्हायरस किंवा सामान्य सर्दीसारखाच आहे, परंतु तो गंभीर श्वसन संसर्ग घडवू शकतो. त्याची जटिलता अधिक प्रमाणात न्युमोनिया आणि ब्रॉन्कायटिस निर्माण करण्याची शक्यता वाढवते.

  • Planning meeting | मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कार्यक्रमाचे उत्तम नियोजन करा – आमदार किशोर जोरगेवार

    Planning meeting

    Planning meeting : मा. सा. कन्नमवार रौप्य महोत्सव निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 10 जानेवारीला चंद्रपूरात येत असून मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचे पहिल्यांदाच चंद्रपूरात आगमन होत आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. आयोजन समिती त्यांचे नियोजन करत आहे. मात्र, प्रशासनानेही कोणतीही गैरसोय होणार नाही यासाठी समन्वयाने उत्तम नियोजन करण्याच्या सूचना आमदार किशोर जोरगेवार (mla kishor jorgewar) यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

    चंद्रपुरातील पान ठेल्यावर होत आहे गांजाविक्री

        मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (cm devendra fadnavis) यांच्या दौऱ्यासंदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या विस कलमी सभागृहात नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, पोलिस अधीक्षक सदर्शन मुमक्का, मनपा आयुक्त विविन पालिवार, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. एस कुंभार, सहयक पोलिस अधीक्षक रिना जनबंधू, उपविभागीय पोलिस अधिकारी सुधाकर यादव,  वाहतुक पोलिस निरीक्षक प्रविण पाटील, शहर पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक प्रभावती एकुरे, रामनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक ससिफ राजा शेख, महोत्सव समीतीचे अध्यक्ष प्रा. सुर्यकांत खनके, भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष राहुल पावडे, श्री माता महाकाली महोत्सव समीतीचे सचिव अजय जयसवाल यांच्यासह संबधित विभगाचे अधिकारी श्री माता महाकाली महोत्सव समीतीचे पदाधिकारी आणि भारतीय जनता पक्षाच्या पदाधिका-यांची उपस्थिती होती. 

    झोमॅटो डिलिव्हरी बॉयचा अस्वल सोबत सामना

    राज्याचे दुसरे मुख्यमंत्री आणि चंद्रपूरचे सुपुत्र मा. सा. कन्नमवार यांच्या जयंतीनिमित्त शतकोत्तर रौप्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा चंद्रपूरचे सुपुत्र आहेत. त्यामुळे या कार्यक्रमाला त्यांची उपस्थिती राहावी, अशी विनंती महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे निश्चित केले असून महोत्सव समितीच्या वतीने कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे.

      10 जानेवारीला या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 8.30 वाजता लोकनेते कर्मवीर दादासाहेब कन्नमवार यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास माल्यार्पण करण्यात येणार आहे. तर 9 वाजता वसंत भवन येथून प्रभातफेरी काढण्यात येणार आहे. मुख्यमंत्री यांचे मोरवा विमानतळ येथे आगमन होताच ते वरोरा नाका मार्गे श्री माता महाकाली मंदिर येथे जाणार असून मातेचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर ते प्रियदर्शनी येथे आयोजित मा. सा. कन्नमवार शतकोत्तर सोहळ्यात उपस्थित राहणार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. Planning meeting

      या संदर्भात पूर्व नियोजनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, आयोजक आणि प्रशासनाने समन्वय ठेवत कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी दक्षता घेत अंतिम राहिलेली कामे जलदगतीने पूर्ण करावी. सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना, वाहतूक व्यवस्थापन, कार्यक्रम स्थळी सजावट, सुविधा आणि शिस्तबद्ध आयोजनावर या बैठकीत चर्चा करण्यात आली. तसेच वेळेत सर्व तयारी पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

  • Railway Flyover |बाबूपेठ रेल्वे उड्डाणपुलाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

    Railway Flyover

    Railway Flyover : महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि., महाराष्ट्र शासन आणि रेल्वे मंत्रालयाच्या संयुक्त उपक्रमांतर्गत नागपूरमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते बाबूपेठ रेल्वे उड्डाणपूलाचे आभासी प्रणालीद्वारे लोकार्पण करण्यात आले. यावेळी राज्यमंत्री आशिष जयस्वाल, आमदार किशोर जोरगेवार यांची उपस्थिती होती.

    चंद्रपूर शहरात आली अस्वल

    बाबूपेठकरांची अतिशय जुनी मागणी असलेला बाबूपेठ उड्डाणपूल रहदारीकरिता सुरू करण्यात आला आहे. मात्र सदर पुलाच्या कामात अनेक अडचणी आल्या. काम शेवटच्या टप्प्यात असताना निधीअभावी रखडले. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी प्रयत्न करत सदर पुलाच्या कामासाठी जवळपास साडेपाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला.

    त्यानंतर सदर पुलाचे काम पूर्ण करण्यात आले. मात्र लोकार्पण अभावी बाबूपेठकरांची प्रतिक्षा पुन्हा लांबेल असे चित्र निर्माण झाले. यावर तोडगा काढत आमदार किशोर जोरगेवार (mla kishor jorgewar) यांनी नागरिकांची अडचण लक्षात घेता सदर उड्डाणपूल रहदारी करिता खुला केला होता.

      दरम्यान, महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि., महाराष्ट्र शासन आणि रेल्वे मंत्रालयाच्या संयुक्त उपक्रम प्रकल्पांतर्गत नागपूर,  अमरावती,  चंद्रपूर,  जळगाव, वाशिम, धुळे आणि वर्धा जिल्ह्यांत उभारण्यात आलेल्या सात उड्डाण पुलांचे नागपूर येथील कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (cm devendra fadnavis) यांच्या हस्ते आभासी प्रणालीद्वारे लोकार्पण करण्यात आले आहे. यात बाबूपेठ रेल्वे उड्डाणपूलाचे सुद्धा लोकार्पण करण्यात आले आहे. 

  • Dangerous nylon manja | चंद्रपुरात 9 वर्षीय मुलाचा नायलॉन मांजाने गळा कापला

    Dangerous nylon manja

    Dangerous nylon manja चंद्रपूर : किराणा दुकानात सायकलने जाणाऱ्या तिसऱ्या वर्गातील नऊ वर्षीय विद्यार्थ्याचा गळा नायलॉन मांजाने कापला. ही घटना वृंदावननगर परिसरात रविवारी सकाळच्या सुमारास घडली. गळा कापलेल्या अवस्थेतच त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. सुदैवाने त्याचा जीव वाचला. 9 वर्षीय साई जंपलवार असे मांजाने जखमी झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.


    साई जंपलवार हा वृंदावननगर येथील रहिवासी असून, लोकमान्य टिळक ज्ञान मंदिरामध्ये तिसऱ्या वर्गात शिकतो. रविवारी सकाळच्या सुमारास तो सायकलने दुकानात जाण्यासाठी निघाला. काही अंतरावरच अचानक नायलॉन मांजा (Chinese manja) त्याच्या मानेला चिरून गेला. अचानक गळा कापल्याने त्याला काही सुचेनासे झाले. परिसरातील नागरिकांनी त्याला जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेले. तिथे त्याच्यावर उपचार करण्यात आले. प्रशासनाने याकडे वेळीच लक्ष देऊन कायमस्वरुपी बंदी घालावी. नायलाॅन मांजा विकणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, नायलाॅन मांजाने पतंग उडविणाऱ्यांवरही कारवाई करावी, अशी मागणी आता पुन्हा एकदा सामान्य नागरिकांमधून केली जात आहे.

    चंद्रपुरात अल्पवयीन मुलांच्या टोळक्याने केली हत्या

    नायलॉन मांजाने पतंग उडवू नका
    नायलॉन मांजामुळे मुलाचा गळा कापला गेला. पण, डॉक्टरांमुळे त्याला जीवदान मिळाले. पतंग उडविणाऱ्यांनाे नायलॉन मांजाने पतंग उडवू नका. साध्या दोराने उडवा, पतंग विकत घेता येतो, पण गेलेला जीव परत येत नाही.

    विद्यार्थ्याची काही चूक नसतानाही नाहक त्याचा गळा चिरला. यामुळे त्याला गंभीर दुखापत झाली. यावरून मांजा किती घातक आहे, हे कळते. नायलाॅन मांजा विकणाऱ्यांवर, या मांजाची पगंत उजविणाऱ्यांवर कारवाई होणे गरजेचे आहे. अन्यथा या विद्यार्थ्यांसह आपल्यावरही अशीच वेळ येऊ शकते.

  • new traffic rules | थांबा.. अल्पवयीन मुलांच्या हाती वाहन देतायं

    new traffic rules

    new traffic rules : चंद्रपूर शहरात रॅश ड्रायव्हिंग चे अनेक प्रकार समोर येत आहे, विशेष म्हणजे मुलगा/मुलगी वर्ग 10 किंवा 12 वी ची परीक्षा पास झाली की पालक आपल्या पाल्यांना दुचाकी वाहन खरेदी करून देतो.
    आपली मुलं अल्पवयीन आहे, कायदा त्यांना वाहन देण्याची परवानगी देत नसताना सुद्धा पालक प्रेमापोटी त्यांना नियमांचं उल्लंघन करायला लावतात यातून अनेक अपघात सुद्धा झाले आहे.

    चंद्रपूर जिल्ह्यात 5 साखर कारखाने येणार


    या बाबीवर नियंत्रण यावे म्हणून चंद्रपूर वाहतूक विभागाने 18 वर्षाखालील पालकांनी वाहन चालविण्यास दिले आणि ते वाहतूक पोलिसांच्या निदर्शनास आले तर मोटर वाहन सुधारित अधिनियम 2019 कलम 1,99 A अनव्ये पालक/मोटर वाहन मालकास तीन महिन्यापर्यंत कैद/25 हजार रुपये दंड इतक्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. (Traffic rules for kids)

    अल्पवयीन मुलांच्या दुचाकीला कट लागल्याने केली हत्या


    चंद्रपूर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रविणकुमार पाटील यांनी या संदर्भात शहरातील महाविद्यालयाला नोटीस बजावत या कायद्याबाबत माहिती देत अल्पवयीन पाल्यांच्या पालकांना ही बाब कळविण्यात यावी अन्यथा या शिक्षेसाठी तयार रहावे अशी सूचना देण्यात आली आहे. (Traffic rules 2024)

    शहरात असंख्य दुचाकी वाहन हे अल्पवयीन मुले चालवितात, वाहतूक पोलिसांनी यावर तात्काळ कारवाई करणे गरजेचे आहे, कारण चंद्रपूर शहरात 3 जानेवारी रोजी अल्पवयीन मुलांच्या वाहनाला धक्का लागल्याने एकाची हत्या करण्यात आली होती.


    हत्या प्रकरणातील अल्पवयीन मारेकरी हे दुचाकी वाहन चालवीत होते, विशेष म्हणजे चार पैकी एक अल्पवयीन हा पोलिसांचा मुलगा आहे.


    पोलिसांचे पाल्य जर कायदा मोडत असतील व ते कारवाई पासून वाचत असतील तर सामान्य नागरिकांचे काय? कारवाई फक्त त्यांच्यावर का? वाहतूक पोलीस या प्रकरणाची सुध घेत त्यांच्या पाल्यांवर कारवाई करणार का? हे बघण्यासारखे राहणार आहे.

    कायदा

  • Silver Jubilee Celebration | 10 जानेवारीला माजी मुख्यमंत्री कन्नमवार यांचा शतकोत्तर रौप्य महोत्सवी सोहळा

    Silver Jubilee Celebration

    Silver Jubilee Celebration : 10 जानेवारीला प्रियदर्शनी सांस्कृतिक सभागृहात आयोजित राज्याचे माजी मुख्यमंत्री, जिल्ह्याचे सुपुत्र स्व. मा. सा. कन्नमवार यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी सोहळ्यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हजेरी लावणार आहेत.

    कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष आमदार किशोर जोरगेवार, माजी मंत्री शोभा फडणवीस आणि आमदार कीर्तीकुमार भांगडिया तसेच रौप्य महोत्सव समितीच्या निमंत्रणानंतर ते या सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याची माहिती कर्मवीर मा. सा. कन्नमवार १२५ वी शतकोत्तर रौप्य महोत्सव समितीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे.

    आज मा. सा. कन्नमवार १२५ वी शतकोत्तर रौप्य महोत्सव समितीच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेला स्व. मा. सा. कन्नमवार यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी सोहळ्याचे स्वागताध्यक्ष किशोर जोरगेवार, उपाध्यक्ष अशोक पुल्लावर, लक्ष्मणराव धोबे, सचिव अवधूत कोटेवार, कार्याध्यक्ष राजेंद्र कन्नमवार, चंद्रपूर जिल्हा बेलदार समाजाचे अध्यक्ष विजय बोरगमवार, मिलिंद बंडिवार, प्रभा चीलके, विजय टोंगे, प्रभाकर पारखी, अशोक जीवतोडे, राजू बोरेवार, माजी नगर सेवक राजेंद्र अडपेवार, विनोद पेंडलीवार, अविनाश बोरगमवार, सुभाष नागुलावार, आदींची उपस्थिती होती.

    या पत्रकार परिषदेला संबोधित करताना स्वागताध्यक्ष आमदार किशोर जोरगेवार (kishor jorgewar) म्हणाले की, राज्याचे दुसरे मुख्यमंत्री चंद्रपूरचे सुपुत्र मा. सा. कन्नमवार यांच्या जयंती निमित्त शतकोत्तर रौप्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा चंद्रपूरचे सुपुत्र आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला त्यांची उपस्थिती राहावी अशी विनंती महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आली होती. (Silver Jubilee Celebration)

    चंद्रपूर जिल्ह्यात 5 साखर कारखाने येणार

    त्यानंतर आपण मुख्यमंत्र्यांची वेळ घेत त्यांची मुंबई येथे सदर कार्यक्रमाचे निमंत्रण दिले होते. त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे यासाठी आपण आग्रही होतो. आता ते या कार्यक्रमाला उपस्थित राहतील असे त्यांच्याकडून कळविण्यात आले असून महोत्सव समितीच्या वतीने कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू करण्यात आली असल्याचे ते यावेळी म्हणाले.

    10 जानेवारीला या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 8.30 वाजता लोकनेते कर्मवीर दादासाहेब कन्नमवार यांच्या पूर्णकृती पुतळ्यास माल्यार्पण करण्यात येणार आहे. तर 9 वाजता वसंत भवन येथून प्रभात फेरी काढण्यात येणार आहे. यात शाळकरी विद्यार्थी सहभागी होणार आहेत. तर 12 वाजता प्रियदर्शनी येथे आयोजित मा. सा. कन्नमवार शतकोत्तर सोहळ्याला सुरुवात होणार आहे.

    चंद्रपुरात अल्पवयीन मुलांच्या टोळक्याने केली हत्या

    राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार असून राष्ट्रीय इतर मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांची विशेष अतिथी म्हणून तर माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपस्थिती राहणार आहे. सोबतच आमदार किशोर जोरगेवार यांची सदर कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष म्हणून मंचावर उपस्थिती राहणार आहे. तर प्रमुख पाहुणे म्हणून खासदार प्रतिभा धानोरकर, माजी मंत्री तथा बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार सुधीर मुनगंटीवार, शिक्षक आमदार सुधाकर अडबाले, राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार देवराव भोंगळे, चिमूर गडचिरोली लोकसभा क्षेत्राचे खासदार नामदेव किरसान, पदवीधर मतदार संघाचे आमदार अभिजित वंजारी, चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किर्तिकुमार भांगडिया, वरोरा – भद्रावती विधानसभा क्षेत्राचे आमदार करण देवतळे, माजी मंत्री शोभा फडणवीस, माजी आमदार वामनराव चटप, ग्रामीण विकास संस्थेचे सचिव डॉ. राहुल कन्नमवार आदींची उपस्थिती राहणार आहे.

  • Sugar factory | चंद्रपूर जिल्ह्यात 5 साखर कारखाने येणार

    Sugar factory

    Sugar factory : विदर्भातील सर्वात मोठ्या गोसेखुर्द प्रकल्पाचे पाणी आज ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक तालुक्याच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे .लवकरच शेतकऱ्यांना मुबलक पाण्याच्या उपलब्धतेमुळे दोनदा उत्पन्न घेणे सहज शक्य होणार आहे.

    अशा स्थितीत शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी तसेच नकद नफा मिळण्याकरिता कृषी विभागाने आगामी हंगामात शेतकऱ्यांना बदलत्या पीक पद्धतीचे महत्त्व पटवून देत मका व ऊस लागवडीसाठी अधिकाधिक शेतकऱ्यांची संवाद साधावा असे निर्देश राज्याचे माजी विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार (vijay wadettiwar) यांनी ब्रह्मपुरी येथे नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत दिले.

    चंद्रपूर झाले क्राईमपूर

    आयोजित बैठकीत कृषी विभागाच्या शेतकऱ्यांकरिता असलेल्या जनकल्याणकारी योजना, व इतर महत्त्वपूर्ण बाबींचा विस्तृत आढावा घेण्यात आला. यात जिल्ह्यात नव्याने राबविण्यात येणाऱ्या पोकरा योजनेअंतर्गत अधिकाधिक गावातील लाभार्थी शेतकऱ्यांना याचा लाभ मिळवून देण्याचे यावेळी आमदार विजय वडेट्टीवार यांनी दिले. तर शेतकऱ्यांना गोसेखुर्दचे पाणी शेतीपर्यंत मुबलक प्रमाणात मिळत असल्याने आगामी काळात या क्षेत्रामध्ये पाच साखर कारखाने (sugar factory) प्रस्तावित करण्याचा कारखानदारांचा दृष्टिकोन असून दुबार उत्पन्न घेऊ शकणाऱ्या शेतकऱ्यांना मका व ऊस लागवड करिता प्रवृत्त करावे.

    जेणेकरून येथील शेतकऱ्यांना शेतमालाला योग्य भाव व परिसरातील नागरिकांना रोजगार असा दुहेरी फायदा होईल असेही ते यावेळी म्हणाले. तर सध्या एमआयडीसी मुल येथे इथेनॉल प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून मका व धान यातून इथेनॉल निर्मिती होणार आहे. याकरिता कच्चामाल म्हणून मका व धान अधिकाधिक प्रमाणात लागणार असून दर्जानुसार शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव मिळणार आहे.

    कृषी विजपंप जोडणीवरून खासदार धानोरकर आक्रमक

    तर बदलत्या पीक पद्धतीनुसार शेत जमिनीचा पोतही सुधारत असून शेतकऱ्यांनी बदलती पीक पद्धती अवलंबून नगद नफा देणारे मका व ऊस पिकाची लागवड करावी. यासाठी कृषी विभागाने ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचा आसपासच्या संपूर्ण परिसरामध्ये शेतकऱ्यांशी संवाद साधून शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी व क्षेत्रात शेतमालावर आधारित रोजगार उपलब्ध करण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करावी असे निर्देश राज्याचे माजी विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी दिली. आयोजित बैठकीस ब्रह्मपुरी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष खेमराज तिडके तसेच कृषी विभागाचे सर्व तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सेवक प्रामुख्याने उपस्थित होते.

  • Material purchase | चंद्रपूर मेडिकल कॉलेजबाबत महत्त्वाची बैठक

    Material purchase

    Material purchase : चंद्रपूर येथील मेडिकल कॉलेजसाठी साहित्य खरेदी प्रक्रिया तात्काळ सुरू करण्याची मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली होती. या मागणीची दखल घेत गुरुवारी मुंबई मंत्रालयात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेत उच्चस्तरीय बैठक पार पडली.

    चंद्रपूर जिल्ह्यात वाघाचा मृत्यू

    या बैठकीत 57 कोटी रुपयांचे फर्निचर खरेदी करण्याचे निर्देश एचबीसीसी कंपणीला देण्यात आले आहेत तसेच, इतर वैद्यकीय उपकरणांसाठी विविध विभागांमार्फत निधीचे नियोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे मेडिकल कॉलेजच्या साहित्य खरेदी प्रक्रियेला वेग मिळाला आहे.


      या बैठकीला आमदार किशोर जोरगेवार, वैद्यकिय शिक्षण विभागाचे अप्पर मुख्य सचिव दिनेश वाघमारे, वैद्यकिय शिक्षण विभागाचे आयुक्त राजीव निवतकर, संचालक अजय चंदनवाले यांच्यासह संबंधित विभागाचे उप सचिव आणि अवर सचिवांची उपस्थिती होती.

    शेतात विजेचा प्रवाह एकाचा मृत्यू


          नुकत्याच नागपूर येथे पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात औचित्याच्या मुद्द्यावर बोलताना आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूर मतदारसंघातील प्रश्न सभागृहात मांडले. यावेळी त्यांनी चंद्रपूर मेडिकल कॉलेजसाठी साहित्य खरेदीसाठी ( Material purchase) निधीची मागणी केली होती. त्यानंतर त्यांनी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता.


        चंद्रपूर मेडिकल कॉलेजची (GMC chandrapur) सुमारे ५० एकरातील नवीन वास्तू पूर्णत्वास आली असली तरी वैद्यकीय साहित्य आणि फर्निचरसाठी निधी उपलब्ध नव्हता. विशेषतः गडचिरोली, यवतमाळ, तसेच तेलंगणातील आसिफाबाद आणि करीमनगर येथील रुग्ण उपचारासाठी चंद्रपुरात येतात. सध्याच्या परिस्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयात कॉलेज चालवले जात आहे.

    रुग्णसंख्येत वाढ झाल्याने खाटांची संख्या कमी पडत आहे आणि गैरसोय होत आहे. तसेच निवासी डॉक्टरांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे नवीन इमारतीत कॉलेज हलविण्याची मागणी होत आहे. मात्र, साहित्य खरेदीसाठी निधी उपलब्ध नसल्यामुळे काम रखडले होते.


       सदर परिस्थिती लक्षात घेऊन आमदार किशोर जोरगेवार यांनी संबंधित विभागांशी पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला. तसेच हिवाळी अधिवेशनातही त्यांनी हा विषय सभागृहात मांडला. या प्रयत्नांचा परिणाम म्हणून गुरुवारी मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत फर्निचर खरेदीसाठी 57 कोटी आणि इतर वैद्यकीय उपकरणांसाठी 41 कोटी रुपये असा एकूण 100 कोटींच्या निधीची आवश्यकता असल्याचे स्पष्ट झाले.

    यावेळी फर्निचर खरेदीचे निर्देश एचबीसीसी कंपनीला मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले आहे. तर इतर साहित्य खरेदीसाठी निधीचे नियोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला. लवकरच दुसरी बैठक आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती आमदार किशोर जोरगेवार यांनी दिली.