Category: ताज्या बातम्या

महाराष्ट्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व ताज्या बातम्या (Latest News) आणि ब्रेकिंग अपडेट्स वाचण्यासाठी रोज भेट द्या news34.in वर. राजकारण, समाजकारण, क्रीडा, गुन्हेगारी आणि आर्थिक घडामोडींचे त्वरित आणि विश्वसनीय कव्हरेज येथे उपलब्ध आहे. २४ तास सुरू असलेल्या घडामोडींची अचूक माहिती मिळवा, जेणेकरून कोणतीही मोठी बातमी तुमच्यापासून सुटणार नाही.

  • mhada housing । म्हाडा क्षेत्रातील विकासाकरीता निधी उपलब्ध करुन द्या – खासदार प्रतिभा धानोरकर

    mhada housing

    mhada housing : चंद्रपूर शहरा अंतर्गत येणाऱ्या म्हाडा येथील निधी अभावी विकास थांबलेला असून म्हाडा अंतर्गत येणारे रस्ते, वीज, नाल्यांची दुरावस्था झाली आहे. याकरीता निधी नसल्याने ही दुरावस्था आणखी वाढत चालली आहे. याकरीता खासदार धानोरकर यांनी उपमुख्यमंत्री तथा गृह निर्माण मंत्री एकनाथजी शिंदे तसेच वित्त व उपमुख्यमंत्री तथा नियोजन मंत्री अजित पवार यांना पत्र लिहून निधी ची मागणी केली आहे.

    चंद्रपुरात पोलीस चौकीजवळ घरफोडी

    चंद्रपूर शहराचा मोठया प्रमाणात विस्तार होत असून म्हाडा अंतर्गत येणाऱ्या जमिनींवर नविन चंद्रपूर उदयास येत आहे. परंतु या भागातील रस्ते, नाल्या, वीज व पाणी या मुलभूत गरजांची अतिशय दुरावस्था झाली असून सदर सोयी उपलब्ध होण्याकरीता खासदार प्रतिभा धानोरकर यांनी पुढाकार घेतला असून उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री तसेच वित्त मंत्री अजित पवार यांना पत्र लिहून एक हजार कोटी रुपयांचा निधी म्हाडा अंतर्गत विकासकामांकरीता उपलब्ध करुन देण्याची मागणी पत्राद्वारे केली आहे.

    म्हाडा अंतर्गत अनेक नागरिकांनी कोटयावधी रुपयांची घरे बांधली आहेत. परंतु त्यांना मुलभूत सोयी पासून वंचित राहावे लागत आहे. भविष्यात म्हाडा अंतर्गत विकास झाल्यास नविन चंद्रपूर म्हणून म्हाडा उदयास येणार आहे.

  • Powerful MP | चंद्रपूर जिल्ह्यातील खासदाराचे दमदार काम

    Powerful MP

    Powerful MP : बामणी हे बल्लारपूर तालुक्यातील महत्वाचे गाव असून जवळपास 10 हजार लोकवस्ती त्या ठिकाणी आहे. खासदार धानोरकर यांच्या बामणी दौऱ्या दरम्याने तेथील नागरीकांनी अनेक समस्या खासदारांसमोर माडल्या.

    चंद्रपुरातील विविध गुन्ह्यात अल्पवयीन मुलांचा वापर

    त्यातील जलद, अतीजलद, इलेक्ट्रिक 9 मी. व 12 मी., तसेच शिवाई, शिवशाही व शिवनेरी या बसेस चा थांबा बामणी येथे मिळावा याकरीता नागरीकांनी मागणी केली होती. त्या संदर्भात खासदार प्रतिभा धानोरकर यांनी मागणीची दखल घेऊन बामणीकर यांची ही समस्या कायमस्वरूपी सोडवीली.

    खासदार प्रतिभा धानोरकर यांनी दौऱ्या दरम्यान बामणी ग्रामपंचायतीला भेट दिली असता. तेथील नागरीकांनी बामणी येथे जलद, अतिजलद, शिवाई, शिवशाही व शिवनेरी या बसेस बामणी येथे थांबत नसल्याने प्रवास्यांची गैरसोय होत असल्याचे खासदार प्रतिभा धानोरकर यांना सांगितले.

    खासदार प्रतिभा धानोरकर यांनी या समस्येची तात्काळ दखल घेऊन सदर समस्या सोडविण्यासाठी विभागीय नियंत्रक राज्यपरिवहन मंडळ, चंद्रपूर यांना आदेशीत केले. त्यासंदर्भाने दि. 15 जानेवारी 2025 रोजी विभागीय नियंत्रक, चंद्रपूर यांनी सर्व आगार व्यवस्थापकांना पत्र देऊन बामणी येथे सर्व बसेस ला थांबा देण्याच्या सुचना दिल्या.

    त्यानुसार पत्र मिळताच आगार प्रमुखांनी चालक व वाहकाला सुचना द्याव्यात, असे देखील पत्रात नमुद केले आहे. सदर समस्येचे तात्काळ समाधान झाल्याने नागरीकांनी खासदार प्रतिभा धानोरकर यांचे आभार मानले.

  • Naming of Government ITIs | चंद्रपूर जिल्ह्यातील 9 शासकीय औद्योगिक संस्थांचे नामकरण

    Naming of Government ITIs

    Naming of Government ITIs : कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकारामुळे महाराष्ट्रातील 132 शासकीय औद्योगिक संस्थांचे नामकरण करण्यात आले आहे. प्रथम 14 शासकीय औद्योगिक संस्थांचे नामकरण करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाद्वारे घेण्यात आला होता.

    चंद्रपूर जिल्ह्यातील बेरोजगारांना परदेशात नोकरीची सुवर्णसंधी

    महाराष्ट्रातील फक्त 2 औद्योगिक संस्था सोडल्या तर इतर औद्योगिक संस्थांना या आधी कोणत्याही प्रकारची नावे नव्हती. त्यांनतर कौशल्य विकास विभागाद्वारे महाराष्ट्रातील शासकीय औद्योगिक संस्थांसाठी नागरिकांकडून नावाबाबत सूचना मागवण्यात आल्या होत्या. त्याप्रमाणे राज्यातील 132 आयटीआयचे नामकरण करण्याचा निर्णय आज जाहीर करण्यात आला.

    राज्यातील अकोला,  अमरावती,  कोल्हापूर,  गडचिरोली,  गोंदिया, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर,  जळगाव,  जालना,  धाराशिव, धुळे, नंदुरबार, नागपूर, नांदेड, नाशिक, परभणी, बीड, बुलढाणा, भंडारा, मुंबई उपनगर,  यवतमाळ,  रत्नागिरी,  रायगड, लातूर, वर्धा, वाशिम, सांगली, सातारा, सोलापूर आणि हिंगोली जिल्ह्यातील शासकीय औद्योगिक संस्थांना नवीन ओळख मिळाली.

    चंद्रपूर जिल्ह्यातील 9 शासकीय औद्योगिक संस्थांचे नामकरण : चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस स्व. यशवंत बाजारे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था असे नामकरण, मुल शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस मा.सा. कन्नमवार, सिदेंवाही शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस रामभाऊ बोंडाळे, गोंडपिपरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण (आदिवासी) संस्थेस नल-नील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, राजुरा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण (आदिवासी) संस्थेस लाला लजपतराय, 

    चंद्रपूर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस ऋषी अगस्त्य, नागभिड शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस आचार्य प्रफुल्लचंद्र रे, सावली शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस क्रांतिकारी खुदीराम बोस, वरोरा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस गजानन पेंढारकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वरोरा असे नामकरण करण्यात आले आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील 9 शासकीय औद्योगिक संस्थांना नवीन ओळख मिळाली आहे.

  • Coal dust in residential areas | प्रदूषणावर राहणार कॅमेऱ्याची नजर

    Coal dust in residential areas

    Coal dust in residential areas : चंद्रपुरातील औष्णिक वीज केंद्रातील कोळसा वाहतुकीमुळे नागरिकांच्या आरोग्यावर अपायकारक परिणाम होत आहे.
    मागील अनेक वर्षांपासून रोप व्हे द्वारे वीज केंद्रात कोळश्याची वाहतूक केल्या जाते मात्र यामुळे दुर्गापुरातील कोंडी नेरी गावात नागरिकांना कोळशाच्या धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे.

    युको बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी


    सोबतच रोप वे कार्यालयातील CHP मधून यंत्रांच्या मोठ्या आवाजाने ध्वनी प्रदूषणात सुद्धा वाढ होताना दिसत आहे.
    कोंडी नेरी गावातील नागरिकांनी याबाबत प्रशासनाला अनेकदा निवेदने दिली मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही.


    नागरिकांनी याबाबत माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांना सदर समस्येपासून मुक्तता मिळावी याबाबत निवेदन दिले. आज सुधीर मुनगंटीवार थेट पाहणी करण्यासाठी रोप व्हे कार्यालयात दाखल झाले.

    मांजाने चिरला युवकाचा गळा


    अधिकाऱ्यांना धूळ व ध्वनी प्रदूषणावर लवकरात लवकर उपाययोजना करा असे निर्देश दिले.
    प्रसार माध्यमांशी बोलताना आमदार मुनगंटीवार म्हणाले की आज कोंडी नेरी गावातील नागरिक प्रदूषणाने त्रस्त झाले आहे, रोप व्हे द्वारे जाणाऱ्या कोळश्याने धुळीचे कण मोठ्या प्रमाणात उडत असल्याने याचा दुष्परिणाम त्यांच्या आरोग्यावर होत आहे, सोबतच रोप व्हे कार्यालयातील यंत्राच्या आवाजाने या प्रदूषणात भर टाकली आहे.

    नागरिकांनी आवाज उचलला तर यंत्र बंद होतात मात्र ते तात्पुरते असतात, यावर आता कायमस्वरूपी उपाययोजना हवी अन्यथा नागरिकांचा उद्रेक होणार, एकीकडे सुप्रीम कोर्ट ध्वनी प्रदूषणावर कठोर आहे, उत्सवात डीजे च्या आवाजाला निर्बंध घालण्यात येते आणि इथे न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्या जाते हे आता चालणार नाही.
    यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन उपस्थित होते.

  • Save the environment | भविष्य वाचवायचे असेल तर पर्यावरण वाचवा – राज्यपाल सीपी राधाकृष्णन

    Save the environment

    Save the environment : लोकसंख्या वाढत असल्यामुळे गरजासुध्दा वाढल्या आहेत. या गरजा पूर्ण करण्यासाठी नैसर्गिक स्त्रोतांचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन पूर्णपणे बिघडले असून आपले भविष्य वाचवायचे असले तर पर्यावरण वाचविणे आवश्यक आहे. त्यासाठी आज आपण पाऊले उचलली तर येणा-य पिढीला आपण चांगले भविष्य देऊ शकतो, असे विचार राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी व्यक्त केले.

    To truly save the environment, we must recognize the importance of sustainable practices in our daily lives.

    एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ आणि सीटी युनिर्व्हसिटी ऑफ न्यूयॉर्क यांच्या संयुक्त विद्यमाने चंद्रपूर येथे आयोजित तीन दिवसीय ‘इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन क्लायमेट चेंज’ चे उद्घाटन करतांना राज्यपाल श्री. राधाकृष्णन बोलत होते. प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृहात झालेल्या या उद्घाटन सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून आमदार सुधीर मुनगंटीवार, देवराव भोंगळे, एस.एन.डी.टी. विद्यापिठाच्या कुलगुरू डॉ. उज्वला चक्रदेव, प्रभारी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, प्रसिध्द जलपुरुष राजेंद्र सिंह, हैद्राबाद येथील युएस काँसलेट जनरल सलील कादर, सीटी युनिर्व्हसिटीचे प्रोफेसर नील फिलीप, आदी उपस्थित होते.

    In order to save the environment, collaboration between governments, organizations, and communities is crucial.

    By taking proactive steps to save the environment, we can mitigate the effects of climate change.

    It’s vital for educational institutions to engage in initiatives that aim to save the environment.

    We must ensure that efforts to save the environment become a part of our collective responsibility.

    Every individual can contribute to initiatives that help save the environment, making a significant impact.

    ग्लोबल वॉर्मिंग आज सर्वात मोठी जागतिक समस्या बनली आहे, असे सांगून राज्यपाल श्री. राधाकृष्णन म्हणाले, जास्त लोकसंख्येमुळे गरजासुध्दा जास्त वाढल्या आहेत. त्यामुळे नैसर्गिक स्त्रोत कमी होत आहे. जल, जंगल, जमीन वाचविले तरच पर्यावरण वाचणार आहे. एस.एन.डी.टी विद्यापीठ, सीटी युनिर्व्हसिटी ऑफ न्युयॉर्क आणि महाराष्ट्र सरकार यांच्या संयुक्त विद्यामाने पर्यावरण संरक्षण या अतिशय महत्वाच्या विषयावर चंद्रपूर येथे तीन दिवसीय परिषदेचे आायोजन करण्यात आले आहे. क्लायमेट चेंज या मानवासमोर असलेल्या सर्वांत गंभीर विषयावर या परिषदेतून नक्कीच उपाययोजना सुचविण्यात येतील.

    Ultimately, our goal should be to save the environment for future generations through education and awareness.

    बदललेले हवामान आणि समुद्राच्या पातळीत होणारी वाढ यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडले असून त्याचा परिणाम मानवी जीवनावर होत आहे. यावर वेळीच उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यामुळे अशा परिषदांच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षणासंदर्भातील चर्चा, त्यावरची अंमलबजावणी होण्यास मदत होईल. तसेच भविष्यातील पिढीसाठीसुध्दा चांगल्या उपाययोजना करता येतील. ही एक चांगली सुरवात असून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण – 2020 मध्ये पर्यावरण या विषयाचा  मोठ्या प्रमाणात समावेश करण्यात आला आहे.

    मोदी साहेब लक्ष द्या, महाराष्ट्र आर्थिक संकटात सापडलाय – प्रतिभा धानोरकर

    एस.एन.डी.टी. विद्यापीठाबाबत बोलतांना राज्यपाल म्हणाले,  विद्यापीठाने चंद्रपूर सारख्या दुर्गम जिल्ह्यात उपकेंद्र सुरू करून येथील महिलांना कौशल्य विकासाचे दालन उघडे करून दिले आहे. जवळपास 50 एकर क्षेत्रात उभे राहणारे हे विद्यापीठ महिलांना ख-या अर्थाने सक्षम करण्याचे काम करेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

    पर्यावरण संरक्षण ही लोकचळवळ व्हावी : आमदार सुधीर मुनगंटीवार

    आपण वनमंत्री असतांनाच ‘सी फॉर चंद्रपूरमध्येच ‘क्लायमेट चेंज’ या विषयावर परिषद घेण्याचे निश्चित केले होते. पर्यावरण संरक्षणाच्या या युध्दात राज्यपाल महोदय आज चंद्रपुरात आले, मी त्यांचा आभारी आहे. पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आयोजित ही तीन दिवसीय परिषद केवळ चर्चेसाठीच नाही तर, अंमलबजावणीची गती वाढविणे ही काळाची गरज आहे. मानवाने पर्यावरणाचे संतुलन बिघडविले आहे. त्यामुळे या परिषदेतून लोकशिक्षण, संशोधन, अंमलबजावणी व्हावी. पर्यावरणासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करावे, ख-या अर्थाने ही लोक चळवळ व्हावी, असे आवाहन त्यांनी केले.

    जल, जमीन, जंगल हेच आपले दैवत : जलपुरुष राजेंद्र सिंह

         ‘इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन क्लायमेट चेंज’ या विषयावर अतिशय चांगला उपक्रम आज चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आला आहे. देशात जलसाक्षरता राबविणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे. जल, जमीन, जंगल वाचले तरच आपली संस्कृतीही वाचणार आहे. त्यामुळे हेच आपले दैवत आहे. मंत्री असतांना सुधीर मुनगंटीवार यांनी ‘चला जाणू या नदीला’ हा उपक्रम राबवून राज्यातील 108 नद्यांच्या पुनरुज्जीवनाचे काम हाती घेतले. नद्या वाचविणे आावश्यक आहे, असेही ते म्हणाले.

    तत्पुर्वी राज्यपालांच्या हस्ते ‘इंटरनॅशनल कॉन्फरन्स बुक प्रोसिडींग’ या पुस्तकाचे विमोचन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस.एन.डी.टी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उज्वला चक्रदेव यांनी केले. संचालन रेणुका देशकर यांनी तर आभार कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी मानले. कार्यक्रमाला विद्यापीठाचे प्राध्यापक, सीटी युनिर्व्हसिटी ऑफ न्युयॉर्कचे विद्यार्थी, पर्यावरण प्रेमी आदी उपस्थित होते.

  • Prabhat Rally | चंद्रपुरात निघाली पर्यावरण रॅली

    Prabhat Rally

    Prabhat Rally : देशात सतत वातावरणात होत असलेला बदल हा भविष्यात मोठा धोका निर्माण करू शकतो, या बदलाने पर्यावरण व मानवी जीवनास हानी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, करिता यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे.

    अपघात कमी करायचे असतील तर…पडोली चौकात

    वातावरणात होत असलेला बदल ग्लोबल वॉर्मिंग यावर उपाययोजना व चर्चा करण्यासाठी चंद्रपुरात इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन क्लायमेट चेंज चे 3 दिवसीय आयोजन करण्यात आले आहे.

    16 जानेवारीला या कार्यक्रमाचे उदघाटन राज्यपाल राधाकृष्णन यांच्या हस्ते होणार आहे, तत्पूर्वी शहरात सकाळी आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते पर्यावरण प्रभात रॅली ची सुरुवात करण्यात आली. आयोजित रॅली मध्ये हजारो विद्यार्थ्यांनी पर्यावरणाचे महत्व बाबत आकर्षक देखावे सादर केले.


    पर्यावरणाला वाचविण्यासाठी आम्ही मोठी चळवळ उभी करीत आहे, ही चळवळ आता थांबणार नाही असा विश्वास आमदार मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

  • Padoli Chowk |अपघात कमी करायचे असतील तर…खासदार धानोरकर यांचं मंत्र्यांना पत्र

    Padoli Chowk

    Padoli Chowk : खासदार प्रतिभा धानोरकर यांनी रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत अधिकाऱ्यांना जिल्हîात अपघात कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सुचना केल्या होत्या. यासंदर्भात त्यांनी स्वतः याबाबत पडोली चौकात अपघात कमी करण्याकरीता ओव्हर ब्रिज चे मागणी करणारे पत्र केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांना लिहले आहे.

    बांबू कामगारावर वाघाचा हल्ला, मृतदेहाजवळ वाघाचा ठिय्या

    राज्य महामार्गाच्या अंतर्गत येणाऱ्या चंद्रपूर शहरातील पडोली चौकात अनेक अपघाताच्या मालिका घडल्या असून अनेकांना आपला जिव गमवावा लागला आहे. रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी अपघात कमी करण्याकरीता उपाययोजना कराव्यात अशा सूचना दिल्या होत्या.

    खासदार प्रतिभा धानोरकर यांनी स्वतः या बाबतीत लक्ष देऊन पडोली चौकातील अपघात रोखण्याकरीता केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहून सदर चौकात ओव्हर ब्रिज ची मागणी केली आहे. सदर पुल निर्माण झाल्यास अपघाताची श्रृंखला मोडकडीस निघेल असा विश्वास खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केंद्रीय गडकरी यांना लिहीलेल्या पत्रातून व्यक्त केला आहे. सदर मागणी बाबात केंद्रीय मंत्री काय निर्णय घेतात हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

  • Recent Tiger Attack | वाघाच्या हल्ल्यात बांबू कामगार ठार, मृतदेहाजवळ वाघाचा ठिय्या

    Recent Tiger Attack

    Recent Tiger Attack : चंद्रपूर जिल्ह्यात वाघांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे सोबतच मानव वन्यजीव संघर्ष सुद्धा जिल्ह्यात वाढलेला दिसून येत आहे. या वन्यजीव संघर्षाच्या मालिकेत १४ जानेवारीला वाघाने एकावर हल्ला करीत ठार केले मात्र वाघ इतक्यावरच थांबला नाही तर त्याने मृतदेहावर ५ ते ६ तास ठाण मांडून बसला होता. वनविभागाने वाघाला डार्ट मारत त्याला बेशुद्ध केले.

    १४ जानेवारीला सकाळी १० वाजताच्या सुमारास बल्लारपूर वनपरिक्षेत्रात बांबू कंत्राटदार यांना वाटप करण्यात आलेल्या बांबू युनिट क्रमांक ५ राखीव वनखंड क्रमांक ४९३ मध्ये कामगार ५७ वर्षीय लालसिंग बरेलाल मडावी राहणार जिल्हा मंडला राज्य मध्यप्रदेश हा बांबू निष्कासनाचे काम करीत होता. त्याठिकाणी दबा धरून बसलेल्या वाघाने लालसिंग वर हल्ला करीत त्याला ठार केले.

    १६ जानेवारीला चंद्रपुरात इंटरनॅशनल कॉन्फरन्स व क्लायमेट चेंज, राज्यपाल राहणार उपस्थित

    घटनेची माहिती वनविभागाला मिळताच अधिकारी व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. मात्र हल्लेखोर वाघ हा लालसिंग यांच्या मृतदेहाजवळ बसून होता. वन कर्मचाऱ्यांनी वाघाला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला मात्र वाघ उलट वन कर्मचाऱ्यांवर धावण्याचा प्रयत्न करीत होता. वाघ मृतदेहाजवळ बराच वेळ बसून होता, बराच वेळ निघून गेल्याने वनविभागाने अतिशीघ्र दलाला पाचारण केले.

    अतिशीघ्र दलाचे शुटर अविनाश फुलझेले यांनी वाघाला डार्ट मारीत बेशुद्ध केले,पशुवैधकीय अधिकारी कुंदन पोडचलवार यांनी वाघाची तपासणी करीत त्याला पिंजऱ्यात बंद करण्यात आले. सदर वाघ हा नर असून तो ४  वर्षाचा आहे, वाघाला पुढील तपासणी साठी वन्यजीव उपचार केंद्र चंद्रपूर येथे नेण्यात आले. मृत लालसिंग यांचा मृतदेह शवविच्छेदन करिता रुग्णालयात नेण्यात आला.

    मानव वन्यजीव संघर्षातील वर्षातील हि दुसरी घटना आहे, मागील वर्षी मानव वन्यजीव संघर्षात एकूण २९ नागरिकांचा बळी गेला होता ज्यामध्ये २७ वाघाने, २ बिबट व १ रान डुक्कराच्या हल्ल्यात बळी गेला.

  • Government Hospital । जिल्हा सामान्य रुग्णालयात गैरसोय, हंसराज अहिर यांनी दिले हे निर्देश

    Government Hospital

    Government Hospital : जिल्हा सामान्य रूग्णालयाविषयी नागरिकांच्या तक्रारी, विविध सोयीसुविधांचा अभाव, रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांची होत असलेली हेळसांड व रूग्णालयाशी निगडीत विविध समस्यांची दखल घेत दि. १४  जानेवारी २०२५ रोजी पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री तथा राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांनी रूग्णालयास भेट देवून तेथील समस्यांबाबत डीन व सी एस. डॉ. महादेव चिंचोळे यांचेशी चर्चा करून समस्यांच्या निराकरणाविषयी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.

    १६ जानेवारीला राज्यपाल चंद्रपुरात

    जिल्हा रूग्णालयातील भेटीप्रसंगी येथील पेयजल, स्वच्छता व अन्य समस्यांबाबत रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी माहिती दिली. हंसराज अहीर यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांसोबत काही कक्षांना भेट देवून तेथील व्यवस्थेची पाहणी करून शल्यचिकित्सकांना आवश्यक सुचना केल्या. यावेळी भाजयुमोचे जिल्हा सरचिटणीस राहुल सुर्यवंशी, गौतम यादव, अमित क्षिरसागर व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. hansraj ahir

    जिल्हा सामान्य रूग्णालयात रूग्णांना योग्य सोयीसुविधा व प्रभावी रूग्णसेवा उपलब्ध करण्याची तसेच रूग्णालयातील सीटी स्कॅन व अन्य नादुरूस्त उपकरणे सुरू करून त्याचा लाभ गोरगरीब रूग्णांना उपलब्ध करण्याची सुचना केली. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांचेशी भ्रमणध्वनी वरून संपर्क साधत येथील समस्या निराकरणार्थ तातडीने कार्यवाहीची सुचना केली. जिल्हा रूग्णालयाशी निगडीत असलेल्या विविध समस्याविषयी जिल्हा प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग व अन्य विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत लवकरच बैठक घेण्याचे सुतोवाचही हंसराज अहीर यांनी यावेळी केले.

  • Climate Change Conference । १६ जानेवारीला ‘इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन क्लायमेट चेंज’

    Climate Change Conference

    Climate Change Conference : चंद्रपूर येथे तीन दिवसांच्या कॉन्फरन्समध्ये पुढील ३० वर्षांच्या पर्यावरणाची बिजे रोवली गेली पाहिजे. तसेच ‘क्लायमॅट चेंज’ ही चंद्रपुरातून सुरू होणारी चळवळ देशव्यापी व्हायला हवी, अशी अपेक्षा राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

    पर्यावरण जागृतीसाठी जागतिक स्तरावरील ही परिषद चंद्रपूर येथे होत असल्याचा नक्कीच अभिमान असल्याचेही आ. श्री. मुनगंटीवार म्हणाले. एसएनडीटी महिला विद्यापीठ, मुंबई यांनी सिटी युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क, अमेरिका यांच्या शैक्षणिक सहकार्याने आणि सोबतच महाराष्ट्र शासनाच्या मँग्रोव्ह फाऊंडेशन, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, जिल्हा प्रशासन, चंद्रपूर महानगरपालिका, बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी, इकोलॉजिकल सोसायटी, पुणे आणि चंद्रपूर वन अकादमी यांच्या एकत्रित सहकार्याने चंद्रपूर येथे तीन दिवसीय ‘इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन क्लायमेट चेंज- २०२५’ चे आयोजन दिनांक १६ जानेवारी ते १८ जानेवारी २०२५ या कालावधीत वन अकादमी येथे करण्यात येणारं आहे.

    मेडिकल कॉलेज व कॅन्सर हॉस्पिटलची आमदार जोरगेवार यांनी केली पाहणी

    या कॉन्फरन्सचे उद्घाटन महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी राधाकृष्णन यांच्या हस्ते होणार आहे.तर विशेष पाहुणे म्हणून राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक राहतील. यावेळी जलपुरुष राजेंद्रसिंह, चाणक्य मंडळ प्रमुख अविनाश धर्माधिकारी, सलील कादेर,अमेरिकेतील हवामान तज्ञ डॉ. नील फिलिप, डॉ. परिमिता सेन, डॉ. दुराई स्वामी, डॉ अमित होरडे, डॉ सुधाकर परदेशी, आयआयटी मुंबईच्या हरिप्रिया यांचेही मार्गदर्शन लाभणार आहे. प्रोफेसर रुबी ओझा, अतिरिक्त मुख्य सचिव वेणूगोपाल रेड्डी, अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक एस. व्ही. रामाराव यांच्यासह इतर आदी पाहुणे उपस्थित राहणार आहेत.

    या परिषदेच्या संदर्भात माहिती देण्यासाठी आ. श्री. मुनगंटीवार यांची मंगळवार, दि. १४ जानेवारीला पत्रकार परिषद झाली. पत्रकार परिषदेला यावेळी एसएनडी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उज्वला चक्रदेव, प्रभारी जिल्हाधिकारी श्री. विवेक जॉन्सन, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, एसएनडीटी बल्लारपूर कॅम्पस संचालक डॉ. राजेश इंगोले,डॉ. मंगेश गुलवाडे, नम्रता ठेमस्कर उपस्थित होते. Climate Change Conference

    आ. श्री. मुनगंटीवार म्हणाले, ‘२०५० पर्यंत शेतीचे उत्पादन ३० टक्क्यांनी कमी होणार आहे. तेव्हा परिस्थिती भीषण होईल, असा इशारा संयुक्त राष्ट्रसंघाने दिला आहे. त्यामुळे या कॉन्फरन्सच्या बिजारोपणातून हजारो लोकांना जोडावे लागणार आहे. त्यासाठी अॅप तयार करण्यात आले आहे. ते लवकरच वापरासाठी उपलब्ध होणार आहे. या आंतरराष्ट्रीय परिषदेला पर्यावरणावर प्रेम करणाऱ्या पर्यावरण प्रेमींनी व स्वयंसेवी संस्थांनी उपस्थित राहावे.’

    पर्यावरणासाठी जेवढ्या संघटना, संस्था काम करतात, त्यांना देशस्तरावर एकत्र आणता येईल का, याचाही विचार या तीन दिवसांत होणार आहे. दिल्लीत मार्च-एप्रिलमध्ये परिषद घेण्याचाही विचार आहे. चंद्रपुरातील क्लायमेट चेंजची ही चळवळ आधी राज्यव्यापी आणि नंतर देशव्यापी करायची आहे. त्यासाठी प्रत्येकाने काम करावे, असे आवाहन आ. श्री. मुनगंटीवार यांनी केले.  

    प्रभातफेरीने होणार सुरुवात
    या परिषदेच्या पहिल्या दिवशी महापालिकेने सकाळी ८.३० ते ९ या वेळात पर्यावरण रॅलीचे आयोजन केले आहे. गांधी चौकातून ही रॅली निघेल आणि प्रियदर्शनी सभागृहापर्यंत जाऊन तेथे रॅलीचा समारोप होईल. या प्रभात फेरीमध्ये चंद्रपूरकरांनी मोठया संख्येने आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन आ. श्री. मुनगंटीवार यांनी केले.

    चळवळ मोठी होणार
    या कॉन्फरन्सचं महत्त्व समाज आणि सृष्टीशी संबंधित आहे. मकरसंक्रांती नंतरचं हे पर्व आहे. २१ जूनपर्यंत दिवस मोठा होत जाणार आहे. आता दिवस मोठा मोठा होत जातो. अगदी त्याचप्रमाणे ही चळवळही मोठी होत जाणार, असा विश्वास आ. श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.  

    शेती आणि उद्योगावर फोकस
    क्लायमेट चेंजनंतर आरोग्य आणि शेतीवर लक्ष केंद्रीत करायचे आहे. जैविक शेती, सेंद्रीय शेती यामध्ये कार्य केल्यास प्रदूषणाला तोंड देता येईल. चंद्रपूरमध्ये प्रदूषणाची धोक्याची पातळी अध्येमध्ये वाढलेली असते. येथील उद्योगांमुळे हे होत आहे. उद्योग आवश्यकच आहेत. पण हे उद्योग प्रदूषण वाढविणारे नकोत. उद्योग बंद करू शकत नाही. कारण त्यावर लोकांची उपजिविका आहे. त्यामुळे उद्योग आणि प्रदूषण याचे संतूलन साधावे लागेल, असेही आ. मुनगंटीवार यांनी सांगितले