Category: ताज्या बातम्या

महाराष्ट्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व ताज्या बातम्या (Latest News) आणि ब्रेकिंग अपडेट्स वाचण्यासाठी रोज भेट द्या news34.in वर. राजकारण, समाजकारण, क्रीडा, गुन्हेगारी आणि आर्थिक घडामोडींचे त्वरित आणि विश्वसनीय कव्हरेज येथे उपलब्ध आहे. २४ तास सुरू असलेल्या घडामोडींची अचूक माहिती मिळवा, जेणेकरून कोणतीही मोठी बातमी तुमच्यापासून सुटणार नाही.

  • Union Budget 2025 India | आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय अर्थसंकल्‍पाचे केले स्‍वागत

    Union Budget 2025 India

    Union Budget 2025 India : पंतप्रधान विश्‍वगौरव नरेंद्रभाई मोदी यांच्‍या सबका साथ – सबका विकास – सबका विश्‍वास या धोरणानुसार भारताच्‍या अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी संसदेत सादर केलेला अर्थसंकल्‍प हा शेतकरी, महिला, युवक, नोकरदार आदी सर्वच घटकांना न्‍याय देणारा भारताच्‍या सर्वसमावेशक विकासाचा संकल्‍प मांडणारा अर्थसंकल्‍प असल्‍याची प्रतिक्रिया आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्‍यक्‍त केली आहे. देशाला विकासाच्‍या मार्गावर अग्रेसर करणारा अर्थसंकल्‍प सादर केल्‍याबद्दल आमदार मुनगंटीवार यांनी अर्थमंत्री निर्मला सितारमण यांचे अभिनंदन केले आहे.

    तलाठी हल्ला प्रकरण, 2 आरोपीना अटक

     या अर्थसंकल्‍पात शेतकरी वर्गाला अर्थमंत्र्यांनी केंद्रास्‍थानी ठेवले आहे. विशेषतः कापूस उत्‍पादकांसाठी ५ वर्षांचे पॅकेज, कापुस उत्‍पादक मिशन, स्‍वस्‍त व्‍याजदरावर शेतक-यांना ५ लाखापर्यंतचे कर्ज हे संकल्‍प देशातील शेतक-यांना दिलासा देणारे आहे. कापुस उत्‍पादक शेतक-यांना केंद्र सरकारने दिलेली ही विशेष भेट आहे. त्‍याचप्रमाणे आर्थिक घडामोडींमध्‍ये ७० टक्‍के महिलांचा असलेला सहभाग तसेच अनुसुचित जाती व जमातींच्‍या महिलांना उद्यमी म्‍हणून प्रोत्‍साहन देण्‍याचा संकल्‍प महिला विकासाला चालना देणारा आहे. (Nirmala Sitharaman Budget 2025)

    एमएसएमईसाठी नॅशनल मॅन्‍युफॅक्‍चरींग मिशनची घोषणा या क्षेत्राला प्रोत्‍साहन देणारी आहे. तसेच एमएसएमईसाठी मोठी तरतूद करण्‍यात आली आहे. मत्‍स्‍य उत्‍पादनाला मोठे प्रोत्‍साहन देखील देण्‍यात आले आहे. कमी उत्‍पन्‍न असलेल्‍या जिल्‍हयांसाठी धनधान्‍य योजना शेतकरी व गरीब नागरिकांना दिलासा देणारी आहे. युवकांसाठी कौशल्‍य प्रशिक्षणाच्‍या योजना व त्‍यासाठी करण्‍यात आलेली तरतूद युवक कल्‍याणाबद्दल सजगता दर्शविणारी आहे. (Farmer benefits in Budget 2025)

    पर्यटन विकासाला चालना देण्‍यासाठी ५० पर्यटन स्‍थळे विकसित करण्‍याचा संकल्‍प तसेच मेडीकल टूरिझम ही संकल्‍पना राबविण्‍याचा संकल्‍प पर्यटन विकासाला चालना देणारा आहे. पायाभूत सुविधांच्‍या विकासावर भर देत करण्‍यात आलेली तरतूद विशेष महत्‍वपूर्ण असून येत्‍या १० वर्षात १२० विमानतळ विकसित करण्‍याचा तसेच नविन काही ग्रीनफिल्‍ड विमानतळ विकास विकसित करण्‍याचा संकल्‍प देखील महत्‍वाचा आहे.

     आर्थीक सुधारणा करताना करदात्‍यांना मोठा दिलासा अर्थमंत्र्यांनी दिला आहे. देशातील मध्‍यमवर्गीयांना या माध्‍यमातुन मोठा दिलासा दिला आहे. १२ लाख रू. पर्यंत उत्‍पन्‍न असलेल्‍यांवर कोणताही कर न आकारण्‍याचा निर्णय अतिशय महत्‍वाचा असून कॅन्‍सर व इतर गंभीर आजारांसाठीची औषधे करमुक्‍त करण्‍याचा निर्णय देखील दिलासा दायक आहे.

    याशिवाय सुक्ष्‍म उद्योगांसाठी कस्‍टमाईज क्रेडीट कार्ड, छोटया गुंतवणुकदारांना प्रोत्‍साहन ही देखील महत्‍वाची पाऊले सरकारने उचलली आहे. सर्वच क्षेत्रातील सर्वच घटकांना न्‍याय देत महागाई नियंत्रणात आणण्‍यासाठी केंद्र सरकारने सादर केलेला अर्थसंकल्‍प देशाला प्रगतीपथावर नेणारा असल्‍याची प्रतिक्रिया आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्‍यक्‍त केली आहे.

  • National Leprosy Eradication Programme | चंद्रपूर जिल्ह्यात आज पासून कुष्ठरोग शोध अभियान

    National Leprosy Eradication Programme

    National Leprosy Eradication Programme : राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमांतर्गत दि. 31 जानेवारी ते 14 फेब्रुवारी 2025 या कालावधीत कुष्ठरोग शोध अभियान राबविण्यात येत आहे. (Leprosy Detection Campaign 2025) त्याअनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक पार पडली.  यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी अशोक कटारे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, सहायक संचालक (कुष्ठरोग) डॉ. संदीप गेडाम, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.ललीत पटले,  जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रकाश साठे आदी उपस्थित होते.

    चंद्रपूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे, तलाठ्याच्या अंगावर ट्रॅक्टर चढविण्याचा प्रयत्न

    समाजात लपून राहिलेले कुष्ठरोग लवकरात लवकर व विनाविकृती शोधून काढत त्यांना बहुविध औषधोपचाराखाली आणणे, तसेच नवीन सांसर्गिक कुष्ठरुग्ण शोधून बहुविध औषधोपचाराद्वारे संसर्गाची साखळी खंडीत करून होणारा प्रसार कमी करणे, व समाजात कुष्ठरोगाविषयी जनजागृती करणे,  तसेच 2027 पर्यंत शुन्य कुष्ठरोग प्रसाराचे ध्येय साध्य करण्याच्या दिशेने वाटचाल करणे हा मोहिमेचा उद्देश आहे. (Leprosy Awareness Campaign)

    अमृत च्या खड्ड्यात बसून माजी नसगरसेवकाचे सत्याग्रह आंदोलन

    कुष्ठरोगाची लक्षणे : त्वचेवर फिकट/ लालसर बधीर चट्टा त्या ठिकाणी घाम न येणे, जाड, बधीर तेलकट/ चकाकणारी त्वचा, त्वचेवर गाठी असणे, कानाच्या पाळ्या जाड होणे. भुवयांचे केस विरळ होणे, डोळे पुर्ण बंद करता न येणे, तळहात व तळपायावर मुंग्या येणे, बधीरपणा अथवा जखमा असणे, हाताची व पायाची बोटे वाकडी असणे, मनगटापासून किंवा पाय घोट्यापासून लुळा पडणे, त्वचेवर थंड व गरम संवेदना न जाणवणे, हात व पायामध्ये अशक्तपणा जाणवणे, हातातून वस्तू गळून पडणे, चालताना पायातून चप्पल गळून पडणे ही लक्षणे आहे.

    जिल्ह्यामध्ये 31 जानेवारी ते 14 फेब्रुवारी या कालावधीत जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागामध्ये आशा स्वयंसेविका, पुरुष स्वयंसेवक व आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत सर्व कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची कुष्ठरोग विषयक आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. तदनंतर संशयित कुष्ठ रुग्णांची तपासणी करून  प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत निदान करण्यात येणार आहे. (Leprosy Infection Control Plan)

    ग्रामीण व शहरी भागातील एकूण लोकसंख्या 18 लक्ष 12 हजार 994, तर एकूण घरे 4 लक्ष 41 हजार 362 करिता ग्रामीण व शहरी भागातील एकूण 1537 टीम असणार आहे. सदर कार्यक्रम जनतेच्या हिताचा असून यामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यामार्फत घरोघरी जाऊन आरोग्य शिक्षण व जनजागृती करण्यात येणार आहे. तरी, सर्व जनतेने येणाऱ्या कर्मचाऱ्यामार्फत आपल्या आरोग्याची तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

  • Chandrapur Municipal Corporation corruption | चंद्रपूर मनपाच्या भ्रष्ट कारभाराची ईडी कडे तक्रार

    Chandrapur Municipal Corporation corruption

    Chandrapur Municipal Corporation corruption : चंद्रपूर महानगरपालिकेतील आर्थिक गैरव्यवहारांवर तीव्र प्रकाश टाकत आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांच्या नेतृत्वाखाली आज प्रवर्तन संचालनालय (ईडी) मुख्यालय, दिल्ली येथे तक्रार अर्ज सादर करण्यात आला.

    खड्ड्यात बसून चंद्रपुरात सत्याग्रह आंदोलन

    या तक्रारीत महानगरपालिकेचे आयुक्त विपिन पालीवाल यांच्या विरोधात गंभीर आरोप करण्यात आले असून, त्यांच्या कार्यकाळात 1,000 कोटींपेक्षा अधिक रकमेच्या विविध योजनांमध्ये गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

    प्रमुख आरोप:

    • अमृतपाणी योजना फेस 1: टेंडर प्रक्रियेत अपारदर्शकता व अपूर्ण कामांसाठी पूर्ण पेमेंट.
    • अमृत कलश योजना 2: अपूर्ण कामे असूनही निधीचा दुरुपयोग.
    • कचरा संकलन व दलित वस्ती सुधारित योजना: फसव्या निविदा प्रक्रियेमुळे सरकारी निधीची हानी.
    • फाउंटन घोटाळा : निविदा प्रक्रियेत अपारदर्शकता.
    • शहर सौंदर्यीकरणासाठी काढण्यात आलेल्या छोट्या निविदा: निधीचा अपव्यय.
    • ड्रेनेज सिवर घोटाळा

    जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, “विपिन पालीवाल यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेच्या प्रत्येक मोठ्या योजनेत भ्रष्टाचाराचे स्पष्ट पुरावे समोर आले आहेत. टेंडर प्रक्रिया पारदर्शकतेने न होणे, अपूर्ण कामांसाठी संपूर्ण निधी देणे आणि जनतेच्या पैशांचा अपव्यय करणे हे त्यांच्या कार्यकाळातील प्रमुख गैरव्यवहार आहेत. हा केवळ आर्थिक भ्रष्टाचार नसून, चंद्रपूरच्या नागरिकांच्या विश्वासाला फसवणूक आहे.” (Chandrapur Municipal Commissioner scam)

    ईडीकडून मिळाले आश्वासन:
    तक्रारीच्या सादरीकरणानंतर ईडी अधिकाऱ्यांनी या प्रकरणावर तातडीने लक्ष घालून चौकशी सुरू करण्याचे आश्वासन दिले.

    प्रमुख मागण्या:

    1. चंद्रपूर महानगरपालिकेतील सर्व आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी करण्यात यावी.
    2. महानगरपालिकेच्या सर्व योजनांचे लेखापरीक्षण (Audit) करण्यात यावे.
    3. दोषी अधिकारी विपिन पालीवाल आणि इतर संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.

    तक्रार सादर करताना आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांच्यासोबत युवा जिल्हाध्यक्ष राजू कूडे, आदित्य नंदनवार, आणि रोहन गुर्जेवार उपस्थित होते. परंतु, नेतृत्वाच्या आघाडीवर मयूर राईकवार यांनी अत्यंत प्रभावीपणे या मुद्द्याला वाचा फोडली.

    जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांनी सांगितले की, “चंद्रपूरच्या जनतेच्या पैशांची ही लूट थांबवण्यासाठी आम्ही शेवटपर्यंत लढा देऊ. हा केवळ एक राजकीय लढा नाही, तर चंद्रपूरच्या सामान्य जनतेच्या हक्कांचा लढा आहे.”

    आम आदमी पक्षाच्या वतीने हा लढा पुढेही सुरू राहील आणि चंद्रपूरच्या जनतेच्या प्रत्येक पैशाचा हिशोब मागितला जाईल.

  • Chandrapur Satyagraha | चंद्रपुरात खड्ड्यात बसून सत्याग्रह आंदोलन

    Chandrapur Satyagraha

    Chandrapur Satyagraha : 30 जानेवारीला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथीनिमित्त माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी मनपा प्रशासनविरोधात अनोखं सत्याग्रह आंदोलन पुकारले.

    मनपाच्या अतिक्रमण हटाव मोहिमेत गांधीगिरी, दुकानदार आला वाहनाखाली

    सध्या शहरात सुरू असलेल्या अमृत पाणी पुरवठा योजनेच्या कामामुळे शहरातील अंतर्गत रस्ते मनपा ने खोदून काढले आहे, आधीच प्रदूषणाच्या विळख्यात चंद्रपुरातील नागरिक मोकळा श्वास घेण्याचा प्रयत्न करीत असतात मात्र त्यामध्ये अमृत च्या कामाने सर्वत्र धूळ पसरली आहे. (Chandrapur Road Digging Issues)


    मनपाच्या या कामविरोधात माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त सत्याग्रह आंदोलन करीत मनपा द्वारे खोदलेल्या खड्ड्यात महात्मा गांधी यांची प्रतिमा घेत सत्याग्रह (Chandrapur Satyagraha Protest) आंदोलन सुरू केले.

    सिडीसीसी बँकेच्या पदभरती बाबत मोठी अपडेट, पदभरती रद्द होणार?


    देशमुख यावेळी म्हणाले की 16 वर्षांपूर्वी प्रशासनाने 100 कोटी रुपये खर्च करीत भूमिगत गटार योजनेचे काम सुरू केले होते, कंत्राटदाराला पैसे मिळाले मात्र योजना पूर्णतः फसली, आज 16 वर्षांनी पुन्हा 500 कोटींच्या भूमिगत गटार योजनेचे काम सुरू होणार आहे, सोबतच अमृत योजनेचे 234 कोटी रुपयांचे काम सुरू झाले असून या कामामुळे नागरिकांना धुळीचा मोठा त्रास होत आहे.


    मनपाने आपल्या मर्जीतील कंत्राटदाराला काम दिले असून यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे असा आरोप करीत मनपाच्या भोंगळ कारभाराची चौकशी करावी असे लिखित आश्वासन प्रशासनाने आम्हाला 48 तासाच्या आत द्यावे अन्यथा आम्ही आक्रमक आंदोलन करू असा इशारा देशमुख यांनी यावेळी दिला.

  • Vidarbha Madhyamik Shikshak Sangh | 1 फेब्रुवारीला विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे धरणे आंदोलन

    Vidarbha Madhyamik Shikshak Sangh

    Vidarbha Madhyamik Shikshak Sangh : दहावी, बारावी परीक्षा केंद्रासाठी केंद्रसंचालक, पर्यवेक्षक व परीक्षेशी संबंधित व्यक्तींची नियुक्ती आस्थापनेतील केंद्राव्यतिरिक्त इतर अन्य माध्यमिक – उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक व कर्मचाऱ्यांमधून करण्याबाबतचा निर्णय तात्काळ रद्द करण्याबाबत विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने आमदार सुधाकर अडबाले यांच्या नेतृत्‍वात नागपूर विभागीय बोर्ड कार्यालयासमोर १ फेब्रुवारी २०२५ रोजी धरणे / निदर्शने आंदोलन करण्यात येणार आहे.

    चंद्रपूर विधानसभेच्या विकासकामांवर उपमुख्यमंत्री पवार सोबत चर्चा

    राज्यमंडळ, पुणेचे अध्यक्ष यांच्या दि. १७/०१/२०२५ रोजीच्या पत्रातील मुद्दा क्र. २ नुसार राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यावर्षीपासून दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये मुख्याध्यापक आणि शिक्षकांना (आस्थापनाव्यतिरिक्त) अन्य शाळांमध्ये केंद्र संचालक आणि पर्यवेक्षक म्हणून काम करावे यासाठीचा निर्णय घेण्यात आलेला आहे. परंतु, सदर निर्णय या ऐन परीक्षांच्या तोंडावर घेतल्याने शाळा, शिक्षकांची तारांबळ उडेल. सोबतच बाहेरील शिक्षक व कर्मचाऱ्यांना परीक्षा केंद्राच्या भौगोलिक परिस्थितीची, स्थानिक अडचणींची व आवश्यकतेची पूर्ण माहिती नसल्यामुळे परीक्षा व्यवस्थापनात अडथळा निर्माण होईल.

    एकीकडे शिक्षण विभाग ५ सप्टेंबर रोजी शिक्षकांचा सन्मान करतो तर दुसरीकडे सदर निर्णयावरून राज्यमंडळाचा राज्यातील शिक्षकांवर अविश्वास दिसतो आहे, याचा विचार होणे आवश्यक आहे.

    हा निर्णय अनेक अडचणी निर्माण करणारा ठरतो आहे. त्यामुळे सदर निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी माजी आमदार व्‍ही. यू. डायगव्हाणे यांच्या मार्गदर्शनात व विमाशि संघाचे सरकार्यवाह तथा आमदार सुधाकर अडबाले यांच्या नेतृत्‍वात विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने नागपूर विभागीय बोर्ड कार्यालयासमोर १ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ३ ते ५ वाजेपर्यंत धरणे / निदर्शने आंदोलन करण्यात येणार आहे.

    या धरणे आंदोलनात विदर्भ ज्‍युनिअर कॉलेज टिचर्स असोसिएशन, राज्‍य शिक्षक मंडळ, विभागीय अनु. आ. आश्रमशाळा कर्म. संस्‍कृती संघटना व इतर समविचारी शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना सहभागी होणार आहेत.

    १ फेब्रुवारी २०२५ रोजी होणाऱ्या धरणे / निदर्शने आंदोलनात नागपूर विभागातील सर्व शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्‍हावे, असे आवाहन विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रांतीय / जिल्‍हा / महानगर / तालुका पदाधिकारी, सदस्‍यांनी केले आहे. 

  • Complaint against cdcc bank | CDCC बँकेविरोधात आप ची ED कडे तक्रार

    Complaint against cdcc bank

    Complaint against cdcc bank : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील 360 पदांच्या अवैध भरती प्रक्रियेत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप असून, या संदर्भात आज आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार, युवा जिल्हाध्यक्ष राजीव कूडे, युवा सचिव आदित्य नंदनवार आणि रोहन गुजेवार यांनी नवी दिल्ली येथील प्रवर्तन निदेशालयाच्या (ED) मुख्यालयात भेट घेतली.

    या भरती प्रक्रियेत मागासवर्गीयांचे (SC, ST, OBC) आरक्षण काढून टाकण्यात आले असून, 31,000 पेक्षा जास्त उमेदवारांपैकी केवळ तीन जिल्ह्यांतील (चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ) उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. याशिवाय, निवड झालेले उमेदवार बँकेशी संबंधित असल्याचेही उघड झाले आहे. या प्रक्रियेत 25 ते 40 लाख रुपयांची लाच देऊन उमेदवारांची निवड केल्याचे गंभीर आरोप आहेत.

    चंद्रपूर पोलीस दलाचा तक्रार निवारण दिन

    यासंदर्भात आम आदमी पक्षाच्या शिष्टमंडळाने प्रवर्तन निदेशालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सविस्तर निवेदन दिले. त्यांनी या गंभीर प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

    आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांनी म्हटले की, “ही भरती प्रक्रिया पूर्णपणे बेकायदेशीर आणि अपारदर्शक असून, चंद्रपूरच्या सामान्य विद्यार्थ्यांचे भवितव्य उध्वस्त करण्याचा डाव आहे. आम्ही ही भरती प्रक्रिया ची चोकशी आणि दोषींवर कारवाई होईपर्यंत लढा सुरूच ठेवू.”

    आम आदमी पक्षाने हा प्रश्न सार्वजनिक पातळीवर नेण्याचा निर्धार केला आहे आणि या भरती प्रक्रियेतील भ्रष्टाचार उघड करण्यासाठी आंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे.

  • Grievance Redressal Day | तक्रार निवारण दिनी पोलीस अधिक्षकापुढे आल्या 8 तक्रारी आणि…

    Grievance Redressal Day

    Grievance Redressal Day : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 100 दिवसांचा कृती आराखडा तयार केला आहे, त्याचप्रमाणे राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येक विभागाने 100 दिवसांचा आराखडा तयार करून ठोस कामगिरी करावी याकरिता चंद्रपूर पोलीस दलाने बल्लारपूर पोलीस स्टेशनमध्ये जनसामान्य नागरिकांच्या समस्येचे निराकरण व्हावे यासाठी तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले.

    तक्रार निवारण दिनाला स्वतः पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी हजेरी लावत शांतता कमिटी ची बैठक घेतली, बल्लारपूर शहरात शांतता व सुव्यवस्था कश्या पध्दतीने राखल्या जाईल याबाबत मार्गदर्शन व सुचना करण्यात आल्या.

    चंद्रपूर जिल्ह्यात एका महिन्यात वाघाने घेतला तिघांचा बळी

    शांतता कमिटी च्या बैठकीनंतर पोलीस पाटलांसोबत पोलीस अधिक्षकांनी संवाद साधला, यावेळी नवीन कायदे, रस्ता सुरक्षा, महिला व बालकांविरुद्ध सुरक्षा तसेच गुन्ह्याबाबत, सायबर जागृती बाबत सविस्तर माहिती देण्यात आली.

    यावेळी पोलीस अधिक्षकांसमोर 8 वेगवेगळ्या स्वरूपाच्या तक्रारी प्राप्त झाल्या, सर्व तक्रारदाराचे म्हणने ऐकत पोलीस अधिक्षकांनी त्यांच्या तक्रारींचे निराकरण केले, तक्रारदारांनी यावेळी पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांचे आभार मानले, तक्रारींचे निवारण झाल्याबाबत समाधान व्यक्त करीत स्वतः पोलीस अधिक्षकांनी आमच्या तक्रारी ऐकत त्याचं निराकरण केलं ही एक चांगली बाब असल्याचं तक्रारदारांनी म्हटलं.

  • Bahelia gang on tiger hunting | 19 वाघांची शिकार, बहेलिया टोळीचा म्होरक्या चंद्रपुरात

    Bahelia gang on tiger hunting

    Bahelia gang on tiger hunting : राज्यात सर्वात जास्त वाघ असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात काही वर्षांपूर्वी वाघांच्या शिकारीचे प्रकरण उघडकीस आले होते, आता नव्या वर्षात वाघाची शिकार करणाऱ्या बहेलिया टोळीचा म्होरक्या राजुरा तालुक्यात आढळल्याने जिल्ह्यातील वाघांची शिकार झाली का? याबाबत वनविभागात चिंतेचे वातावरण पसरलेले आहे.


    विशेष म्हणजे जानेवारी महिन्यात 4 वाघांचा मृत्यू झाला आहे. वनविभागाच्या तपासात आता काय नवी माहिती उघडकीस येणार याकडे लक्ष लागले आहे.

    चंद्रपुरात पत्रकारांची गळचेपी

    वाघांच्या शिकारीसाठी कुख्यात असलेल्या बहेलिया टोळीचा मोरक्या अजित राजगोंड याला चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातून अटक करण्यात आली आहे.

    मध्यप्रदेशातील या बहेलिया टोळीने 2013 ते 2015 दरम्यान विदर्भात किमान 19 वाघांच्या शिकारी केल्याचा संशय आहे. या शिकारींच्या मागे अजित आणि त्याचे दोन भाऊ केरू आणि कुट्टू हे प्रमुख सूत्रधार होते. वाइल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरोने 2015 मध्ये अजितला तिरुपती येथून अटक केली होती.

    त्यानंतर सीबीआयने या प्रकरणाचा तपास करून न्यायालयाने अजितला शिक्षा ठोठावली होती. मात्र सप्टेंबर 2024 मध्ये अजित जामिनावर कारागृहाबाहेर आला होता. मात्र अजित सारखा कुख्यात तस्कर अचानक राजुरा तालुक्यात सापडल्याने वनविभागाच्या चिंतेत वाढ झाली आहे.

    अजित या भागात गेल्या किती दिवसांपासून आहे ? त्याने या भागात वाघांच्या शिकारी केल्या का? त्याच्या टोळीचे आणखी किती लोकं या भागात आहे? यासारखे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. वन विभागाचं विशेष पथक अजितची कसून चौकशी करत आहे.

  • Chandrapur journalist | गुन्हेगारी अनियंत्रित, चंद्रपुरात पत्रकारांना नियंत्रित करण्याचा प्रयत्न

    Chandrapur journalist

    प्रजासत्ताक दिनाला घडला प्रकार

    chandrapur journalist : चंद्रपूर जिल्ह्यातील चौथा स्तंभ म्हणजे पत्रकार, मात्र २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाला या चौथ्या स्तंभाची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न चंद्रपूर पोलीस विभागाने केला आहे. जिल्ह्यातील गुन्हेगारी अनियंत्रित झाली असून त्याकडे लक्ष न देता पत्रकारांना नियंत्रित करण्याचे काम पोलीस विभाग करीत असल्याचे चित्र पुढे आले आहे.

    २६ जानेवारीला पालकमंत्री डॉ अशोक उईके यांच्या हस्ते पोलीस मुख्यालय मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम होता, पालकमंत्री कार्यक्रम स्थळी आले, पथसंचलन पूर्वी पालकमंत्री उईके हे वाहनाद्वारे पोलीस पथकाची पाहणी करीत होते. त्यावेळी प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी चित्रण करीत होते.

    चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासासाठी कटिबद्ध – पालकमंत्री उईके

    पण काही वेळातच पोलीस अधिकाऱ्यांनी चित्रण करण्यास पत्रकारांना मज्जाव करण्यास सुरु केले, इतकेच नाही तर त्यांचा हात पकडत बाहेरचा रस्ता दाखविण्याचे काम पोलीस अधिकाऱ्यांनी केले. हा सर्व प्रकार पालकमंत्री उईके यांच्या समोर घडला, पत्रकारांनी आपली एकजूट दाखवीत कार्यक्रमाच्या चित्रीकरणावर बहिष्कार टाकत पोलीस विभागाचा निषेध करीत बाहेर निघाले.

    चंद्रपूर जिल्ह्यातील गुन्हेगारी अनियंत्रित झाली मात्र त्याकडे पोलीस विभागाचे पूर्णतः दुर्लक्ष आहे, शहरात खुलेआम सट्टा, गांजा विक्री, सुगंधित तंबाखू विक्री होत आहे, विशेष बाब म्हणजे वर्ष २४ – २५ मध्ये शहरात घडलेल्या क्रूर हत्याकांडात पोलिसांचे मूल आरोपी होते, पोलीस विभागातील कर्मचारी घरफोडी व हत्या करीत होते मात्र याचा थांगपत्ता पोलिसाना लागत नाही हे आश्चर्य म्हणावं लागेल.

    राज्यातील इतर सर्व जिल्हे वगळता चंद्रपुरात पोलिसांनी पत्रकारांवर अनेक नियम लादण्याचे प्रकार केले आहे, लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणी केंद्रावर पत्रकारांना मोबाईल व कॅमेरा नेण्यास मज्जाव करण्यात आला होता, चंद्रपूर जिल्ह्यापेक्षा गडचिरोली जिल्हा हा अतिसंवेदनशील आहे मात्र त्याठिकाणी पत्रकारांवर असे निर्बंध लादण्यात येत नाही.

    चंद्रपुरात काही घटना घडली तर त्याबाबत प्रसार माध्यमांसमोर बोलण्यास अधिकारी नकार देतात, याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांची मुलाखत घ्या असे सांगतात, हे चित्र फक्त आपल्या जिल्ह्यात आहे. वर्ष २०२४ मध्ये गुन्हगारी व गोळीबाराच्या घटनेने जिल्हा हादरून गेला होता, बाहेर राज्यातील गुन्हेगार जिल्ह्यात दाखल होत गोळीबार करीत होते. भरदिवसा गोळीबार, बॉम्बहल्ला व पोलीस स्टेशनमध्ये हाणामारीच्या घटना घडल्या होत्या. शिवा वझरकर यांच्या हत्या प्रकरणातील आरोपीना व्हीआयपी ट्रीटमेंट देण्यात आली होती.

    कधी जिल्ह्यातील नागरिकांनी एमडी ड्रग्स चे नाव ऐकले नव्हते मात्र आता मोठ्या प्रमाणात हे अंमली पदार्थ जिल्ह्यात येऊ लागले आहे. हे सर्व गुन्हे ज्यावेळी घडतात त्यांचा म्होरक्या कधी पकडल्या जात नाही, पोलीस विभाग यामध्ये अपयशी ठरला आहे.

    गुन्हेगारी नियंत्रणात न आणू शकणारे पोलीस पत्रकारांना नियंत्रित करण्याचा प्रयत्न करू लागले आहे, याबाबत गैरवर्तन करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची तक्रार पत्रकारांनी पालकमंत्री उईके यांना केली आहे, पालकमंत्री यावर काही कारवाई करतात का याबाबत सर्वांचे लक्ष लागले आहे.

  • President’s Medal | रोशन यादव यांना राष्ट्रपती पदक

    President’s Medal

    President’s Medal : चंद्रपूर: नागपूर येथील एसीबी पोलीस उप अधीक्षक पदावर कार्यरत असलेले रोशन यादव यांच्या प्रदीर्घ उत्कृष्ट आणि गुणवत्तापूर्ण सेवेच्या नोंदी पाहून सन-2025 मध्ये गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले आहे. विशेष म्हणजे त्यांनी चंद्रपूर येथे विविध पदावर जबाबदारी पार पाडली आहे.

    मानवी वन्यजीव संघर्षाचा जिल्ह्यात दुसरा बळी

    सरळ सेवेत 1995 पीएसआय म्हणून त्यांची नेमणूक झाली. त्यांनी अत्यंत संवेदनशील नक्षलग्रस्त गोंदिया आणि गडचिरोली येथे सेवा दिली आहे. त्यांनी मांगेझरी जंगलात नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत महत्त्वाचे नक्षल साहित्य आणि उपकरणे जप्त केले. तसेच नक्षल शोध मोहिमेत सीमेवरील घनदाट जंगलात नक्षलवाद्यांचा मृतदेह जप्त केला.

    एसीबी चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात सामील झाल्यानंतर त्यांनी भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी विशेषतः अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त भागात अनेक उल्लेखनीय कामगिरी. नागपूर, गोंदिया आणि चंद्रपूर येथे त्याच्या पोस्टिंगदरम्यान एटीएम चोरी ,डकैती करणारे आंतरराज्यीय टोळ्यांचा शोध घेवून तसेच इतर गंभीर गुन्हे उघडकीस आणून त्यांना आरोपींना अटक करण्याचे महत्वपूर्ण काम केले आहे.

    कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती त्यांनी चांगल्या प्रकारे हाताळली आहे.
    त्यांनी हैदराबादमध्ये ग्रे हाउंड कमांडोचे सर्वात कठीण प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केले आहे.


    ते एक चांगले फुटबॉलपटू असून त्यांनी जिल्हा आणि रेंज स्पोर्ट्समध्ये भाग घेतला आहे.