महाराष्ट्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व ताज्या बातम्या (Latest News) आणि ब्रेकिंग अपडेट्स वाचण्यासाठी रोज भेट द्या news34.in वर. राजकारण, समाजकारण, क्रीडा, गुन्हेगारी आणि आर्थिक घडामोडींचे त्वरित आणि विश्वसनीय कव्हरेज येथे उपलब्ध आहे. २४ तास सुरू असलेल्या घडामोडींची अचूक माहिती मिळवा, जेणेकरून कोणतीही मोठी बातमी तुमच्यापासून सुटणार नाही.
कृषी मंत्र्यांच्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी खासदारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Manikrao Kokate Farmers Statement : राज्यात महायुतीचे सरकार बहुमताने निवडून आल्यानंतर सरकार मधील काही मंत्र्यांनी बेताल वक्तव्य करण्यास सुरुवात केली आहे. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी अमरावती येथे शेतकऱ्यांसंबंधी केलेल्या आक्षेपार्ह विधानासंदर्भात खासदार धानोरकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीत संबंधीत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचे वर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.
महायुती सरकार ला प्रत्येक घटकाने मदत केल्यानेच महायुतीचे सरकार अस्तित्वात आले. परंतु या सरकार मधील कृषी मंत्री यांनी पिक विम्या संदर्भात भिकारी देखील एक रुपया घेत नाहीत परंतु आम्ही शेतकऱ्यांना एक रुपयात विमा देतो, असे वादग्रस्त विधान करुन शेतकऱ्यांना भिकाऱ्याची उपमा दिली. (Maharashtra Agriculture Minister Controversy)
या विधानाचा महाराष्ट्रातून निषेध होत असतांना खासदार धानोरकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित आपल्या मंत्र्यांना आवर घालण्याची मागणी केली आहे. शेतकरी हा जगाचा पोशिंदा असून त्यांच्यामुळे आज आपण जगत आहोत याचा विसर कृषी मंत्र्यांना पडला असावा, असे मत खासदार धानोरकर यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रातून व्यक्त केले आहेत. अशा बेताल वक्तव्य करणाऱ्या कृषी मंत्र्यांवर कार्यवाही ची मागणी खासदार धानोरकर यांनी केली आहे.
Chandrapur Traffic Diversion : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांचा 16 फेब्रुवारी रोजी चंद्रपुर येथील प्रियदर्शिनी सभागृह येथे दौरा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सदर कार्यक्रमाकरीता नागरीकांची मोठया प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. तसेच कार्यक्रमा दरम्यान उपस्थित असणारे मान्यवर व इतर नागरीकांची वरोरा नाका ते प्रियदर्शिनी चौक या मार्गावरुन आगमन व निर्गमन होणार असल्याने त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोणातुन वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. (Devendra Fadnavis Chandrapur Visit)
दौरा कार्यक्रम असलेल्या मार्गावर रहदारी सुरळीत चालावी, रहदारीस कुठल्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये व जनतेला त्रास अथवा गैरसोय होऊ नये म्हणुन वाहतुक व्यवस्थेमध्ये पुढीलप्रमाणे बदल करण्यात येत आहे.
हा मार्ग राहणार बंद
16 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत वरोरा नाका ते प्रियदर्शिनी चौक हा मार्ग सर्व प्रकारचे वाहनाकरीता बंद राहील. तसेच सदरचा मार्ग हे नो पार्कींग झोन व नो हॉकर्स झोन म्हणुन घोषीत करण्यात येत आहे. (Chandrapur Road Closure 16 Feb)
या कालावधीत सर्व वाहतुकदारांनी पुढील पर्यायी मार्गाचा वापर करावा.
१) सदरच्या कालावधीत नागपूरकडून शहराकडे जाणारी वाहने वरोरा नाका-उडान पुल-सिध्दार्थ हॉटेल-बस स्टॅड-प्रियदर्शनी चौक मार्गे किंवा मित्र नगर चौक-संत केवलराम चौक मार्गे शहरामध्ये प्रवेश जातील.
२) सदरच्या कालावधीत शहरातुन बाहेर जाण्यासाठी नागरीकांनी जटपुरा गेट-प्रियदर्शीनी चौक-बस स्टॅण्ड चौक-सिध्दार्थ हॉटेल-उडान पुल-वरोरा नाका मार्गे किंवा संत केवलराम चौक-मित्र नगर चौक मार्गे बाहेर जातील.
३) सदर अधिसुचनेमध्ये आवश्यकतेनुसार बदल करण्यात येईल.
नागरीकांनी सदर अधिसुचनेचे पालन करुन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस विभागाने केले आहे.
OBC Protest Maharashtra : चंद्रपूर- राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे २० फेब्रुवारी २०२५ ला ओबीसींच्या न्याय मागण्यासाठी राज्यभरात धरणे आंदोलन होणार आहे. धरणे आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी १६ फेब्रुवारीला वरोरा नाका येथील पत्रकार भवनात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे ओबीसी, व्हीजे,एनटी & विमाप्र विद्यार्थ्याना अजूनही आधार योजनेतील रक्कम मिळाली नाही यासह जातनिहाय जनगणना करण्यात यावी, ओबीसी साठी केंद्रात स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्यात यावे, क्रिमीलेअरची उत्पन्न मर्यादा १५ लक्ष रुपये करण्यात यावे, आरक्षणाची ५०% मर्यादा रद्द करण्यात यावी.
ओबीसींना लोकसंख्येच्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात यावा इत्यादी प्रलंबित मागण्या संदर्भात पाठपुरावा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय समोर चंद्रपूर येथे धरणे आंदोलन करण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य, तसेच राष्ट्रीय ओबिसी महासंघाच्या सर्व कक्षाचे प्रमुख व समविचारी संघटना ओबीसी समाजात मोडणाऱ्या जातीय संघटना, विध्यार्थी यांची सभा १६ फेब्रुवारीला २०२५ रविवार ला दुपारी १ -०० वाजता चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघ, वरोरा नाका,चंद्रपूर,येथे आयोजित केली आहे. (National OBC Federation Dharna)
तरी सर्व विंगच्या पदाधिकाऱ्यांनी सभेला उपस्थित राहण्याचे आवानह राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजुरकर यांनी केले आहे.
Special needs child adoption : आपल्या देशात दत्तक प्रक्रियेंतर्गत बालक दत्तक घेतले जाते. परंतु व्यंगत्व असलेले बालक दत्तक घेण्याचे धाडक सहसा कोणी करीत नाही. मात्र हे करून दाखविले आहे एका स्वीडीश दाम्पत्याने. स्पेशल नीड (व्यंगत्व) असलेल्या बालकाला त्याच्या जन्मदात्यांनी नाकारले, परंतु स्वीडन येथील निपुत्रिक दाम्पत्याने या बालकाला स्वीकारून थेट स्वीडन गाठण्याची तयारी केली आहे.
केंद्रीय दत्तक नियमावली 2022 व बाल न्याय (बालकांची काळजी व संरक्षण) कायदा 2015 अंतर्गत प्रक्रिया करून जिल्हा न्यायालय चंद्रपूर येथून सदर बालकाला कायदेशीर दत्तक देण्यात आले. 11 फेब्रुवारी रोजी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी दिपक बानाईत यांच्या हस्ते असाच एक आगळा-वेगळा दत्तक निरोप समारंभ घेण्यात आला. या कार्यक्रमात सदर बालकाला स्वीडन येथील रिकार्ड टोबायस हेडबर्ग आणि मारिया एलिझाबेथ व्हिक्टोरिया एरिक्सन या परदेशातील पालकाकडे सुपूर्द करण्यात आले. (International adoption from India)
कार्यक्रमाला किलबिल दत्तक संस्थेच्या संस्थापिका प्रभावती मुठाळ, उपाध्यक्ष वंदना खाडे, प्रा. डॉ विद्या बांगडे, हेमंत कोठारे तसेच आदी किलबिल दत्तक तथा प्राथमिक बालगृहाचे कर्मचारी उपस्थित होते.
अनाथ, परित्याग केलेले आणि सोडून दिलेले बालकाचे संरक्षण, जिल्हा बाल संरक्षण कक्ष आणि चाइल्ड हेल्पलाईनच्या 1098 मोफत क्रमांक सेवा माध्यमातून केले जाते. अशा बालकांच्या पालन पोषणकरिता किलबिल दत्तक योजना संस्था कार्यरत असून बालकल्याण समिती चंद्रपुर, यांच्या आदेशाने दाखल करण्यात येते. यानंतर सदर बालकांना बालकल्याण समितीद्वारे दत्तक मुक्त केले जाते. दत्तक इच्छुक पालक महिला व बालविकास मंत्रालयाच्या CARA (Central Adoption Resource Authority) cara.wcd.gov.in या संकेतस्थळावर जाऊन cara पोर्टलवर नोंदणी करून बालक दत्तक घेऊ शकतात. (Foreign adoption of Indian children)
पालकत्व ही प्रत्येक विवाहित व्यक्तीसाठी महत्वाची बाब असते. परंतु निसर्गाने ती संधी काढून घेतल्याने काही जोडप्यांचे पालक बनण्याचे स्वप्न पूर्ण होत नाही. यावर आता शासनाने सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली आहे. यासाठी तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय अंतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्षला तसेच चंद्रपूर येथील किलबिल दत्तक संस्थेला भेट द्यायची आहे. अर्थात शासनाने पालकत्व मिळणे करीता तीन प्रकारे पालक बनण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. 1) अनाथ बालक दत्तक घेणे 2) नात्यातील बालक (रक्तातील नाती) दत्तक 3) प्रतिपालकत्व दत्तक घेणे. दत्तक प्रक्रियेविषयी अधिक माहिती घेण्याकरीता चाईल्ड हेल्पलाईनच्या 1098 क्रमांकावर फोनद्वारे माहिती मिळू शकते, असे महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.
Swedish Couple Adopts Special Needs Child from India, Sets an Example of Humanity
Chandrapur city water source : सध्या दिल्ली येथे सुरु असलेल्या केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केंद्र सरकार ला विविध प्रश्नांच्या माध्यमातून धारेवर धरले आहे. दि. 13 फेब्रूवारी रोजी त्यांनी उपस्थित केलेल्या चंद्रपूर शहरातील स्वतंत्र जलस्त्रोतासंदर्भात केंद्रीय मंत्र्यानी उत्तरे दिली. त्यासोबतच रोजगार हमी योजनेत गावात 100 दिवस काम मिळत नसल्याच्या प्रश्नावर देखील मंत्र्यांनी उत्तरे सादर केली.
केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील पहिल्या टप्प्याच्या शेवटच्या दिवशी चंद्रपूर शहर महानगरपालिकेला स्वतःचा जलस्त्रोत उपलब्ध नसल्याने सीएसटीपीएस यांच्याकडे उपलब्ध असलेल्या जलस्त्रोतावर अवलंबून राहावे लागत असल्याची खंत खासदार धानोरकर यांनी मांडलेल्या प्रश्नातून व्यक्त केली. (Pratibha Dhanorkar questions central government)
तसेच, चंद्रपूर शहर महानगरपालिकेला स्वतःच्या जलस्त्रोताकरीता वर्धा नदीवर बंधारा निर्माण करुन सदर जलस्त्रोत महानगरपालिकेला देण्यात यावा अशी मागणी देखील खासदार धानोरकर यांनी प्रश्नातून केली होती. तसेच, खासदार धानोरकर यांनी ग्रामीण भागातील जनतेला रोजगार हमी योजने अंतर्गत 100 दिवस काम मिळत नसल्याने ग्रामीण भागातील नागरीकांना कामाकरीता शहराकडे यावे लागत असल्याचा प्रश्न देखील सभागृहात उपस्थित केला. (Independent water source for Chandrapur)
सदर प्रश्नासंदर्भात सरकार ने गांभिर्यपुर्वक विचार करुन ग्रामीण भागातील नागरीकांना रोजगार हमी योजनेतून किमान 100 दिवस काम निश्चितच मिळणार याकरीता संबंबधीत यंत्रणेला आवश्यक त्या सुचना देणार असल्याचे आश्वासन दिले.
तसेच, चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या स्वतंत्र जलस्त्रोताकरीता राज्य सरकार आंमडी व धानोरा या दोन ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून बंधाऱ्याचे काम होणार असल्याचे खासदार धानोरकर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर सांगितले. तसेच केंद्र सरकार सदर विषयाकरीता आवश्यक ती मदत करणार असल्याचे देखील मंत्री महोदयांनी दिलेल्या उत्तरात सांगितले.
Special adoption agency Gadchiroli : गडचिरोली जिल्ह्यात मागील एक वर्षापासून कार्यरत असलेली लोककल्याण बहुउद्देशीय शिक्षण संस्था द्वारा संचालित विशेष दत्तक संस्था बजरंग नगर, हनुमान मंदिराच्या मागे, गडचिरोली येथे कार्यरत आहे. ही संस्था अनाथ, निराश्रित, सापडलेली, अनैतिक संबंधातून जन्मलेली बेवारस बालके तसेच शरण आलेल्या किंवा आत्मसमर्पण केलेल्या कुटुंबातील बालकांच्या शैक्षणिक, शारीरिक, व आरोग्यविषयक समस्यांचे निराकरण करते. मानसिक व शारीरिक विकलांग बालकांची काळजी घेणे, संरक्षण करणे आणि त्यांच्या पुनर्वसनासाठी कार्य करणे हे संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. (Maharashtra child adoption center)
महिला व बाल विकास विभाग अंतर्गत, महाराष्ट्र शासन मान्यता असलेली गडचिरोली जिल्ह्यातिल ही एकमेव संस्था आहे आणि या संस्थेला सप्टेंबर महिन्या मध्ये नोंदणी प्रमाण पत्र प्राप्त झाले होते आणि काहीच दिवसात सापडलेले बाळ हे या संस्थेतील पहिल्या बाळाच्या रूपाने या संस्थेच्या कार्याला सुरवात झाली.
विशेष दत्तक संस्थेतील पहिले बालक हे खरपुंडी गावाजवळ रस्त्याच्या कडेला अतिशय दयनीय अवस्थेत सापडलेले होते त्याला तात्काळ उपचारासाठी जिल्हा महिला व बाल रुग्णालय गडचिरोली येथे दाखल केले गेले. त्यानंतर बाल कल्याण समिति गडचिरोली यांच्या आदेशाने त्याची काळजि व संरक्षण करण्याची जबाबदारी या संस्थेने अतिशय चांगल्या पद्धतीने केली आणि आज त्या बालकाला पालकत्व प्राप्त झाले. (How to adopt a child in Maharashtra)
विशेष दत्तक संस्थेतील पहिले दत्तक मुक्त बालक, विहान, यास कारा नियमावलीच्या दत्तक विधान प्रक्रियेचे पालन करून दिनांक 12 फेब्रुवारी 2025 रोजी दत्तकपूर्व परिपोषणासाठी इंदोर येथील पालकांच्या ताब्यात देण्यात आले.
याप्रसंगी मा. श्री प्रकाश भांदककर जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या हस्ते दत्तक पालकांना बालकाचे हस्तांतरण करण्यात आले. या कार्यक्रमास मा. श्री अविनाश गुरनुले जिल्हा बाल संरक्षण अधिकारी; विशेष दत्तक संस्थेचे संस्थापक श्री. पुरुषोत्तम चौधरी; कार्याध्यक्ष श्री. महेश हजारे; अधिक्षक श्री. नशिब जांभुळकर; अधिपरिचारिका कु. डिम्पल सहारे, तसेच संस्थेच्या सर्व आया व कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यासाठी बाल कल्याण समिति, जिल्हा बाल संरक्षण कक्ष गडचिरोली आणि विशेष दत्तक संस्थेच्या सर्व कर्मचारी वर्गाचे मोलाचे सहकार्य लाभले.
factory worker death : ताडाळी एमआयडीसी येथील धारिवाल इन्फ्रास्ट्रक्चर लि. या कंपनीमध्ये १२ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी २.१५ वाजता कर्णधर अशोक शेरके या कामगाराचा कोल हँडलिंग प्लांटमध्ये मृत्यू झाला. सदर कामगाराच्या कुटूंबियांना कुठलाही मोबदला न देता कंपनी व्यवस्थापनाचा मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न कामगारांनी हाणून पाळला. त्यानंतर आमदार सुधाकर अडबाले यांनी घटनास्थळ गाठत सदर कामगाराच्या कुटुंबीयांना ७० लाख रुपयांची आर्थिक मदत व इतर लाभ मिळवून दिल्याने कामगारांचा रोष शांत झाला. (Dharival Infrastructure Accident)
भिवापूर वॉर्ड, चंद्रपूर येथील रहिवासी असलेल्या कर्णधर अशोक शेरके (वय ३६) या फील्ड ऑपरेटरचा धारिवाल इन्फ्रास्ट्रक्चर लि. या कंपनीमध्ये कोल हँडलिंग प्लांटमध्ये रिफ्लेक्टर जॅकेट अडकल्याने अपघात झाला. संपूर्ण बॉडी पुलीमध्ये फसली. त्यामुळे त्याचे संपूर्ण शरीर छिन्न विछिन्न झाले. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. (Coal Handling Plant Accident)
मृतदेहाची विल्हेवाट करण्याचा प्रयत्न
कंपनी व्यवस्थापनाने मृतदेह रुग्णवाहिकेत टाकून त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. व्यवस्थापनाचा हा प्रयत्न उपस्थित कामगारांनी हाणून पाळत रुग्णवाहिका अडवून आपल्या ताब्यात घेतली. जोपर्यंत मृत कामगाराच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत व इतर लाभ देत नाही, तोपर्यंत सर्व कामगारांनी कंपनी कार्यालयासमोर ठिय्या मांडत काम बंद आंदोलन केले. सायंकाळ झाली तरी तोडगा निघाला नव्हता.
आमदार सुधाकर अडबाले नागपूर येथे बैठकीसाठी गेले असता परत येताना ही बाब कळताच त्यांनी रात्री ८.३० वाजता थेट कंपनीतील घटनास्थळ गाठले. घटनास्थळाची पाहणी करत संपूर्ण घटनाक्रम कामगारांकडून जाणून घेतला. त्यानंतर कामगारांशी चर्चा करून कंपनी व्यवस्थापनाची बैठक घेतली.
कंपनी व्यवस्थापनाचा क्लास
कंपनी व्यवस्थापनाकडून मृत कामगारांच्या कुटुंबीयांना तात्काळ नुकसान भरपाई, नोकरी व इतर लाभ देण्याबाबत मागणी लावून धरली. कंपनी व्यवस्थापन टाळाटाळ करण्याच्या भूमिकेत बघता आमदार अडबाले यांनी त्यांचा “क्लास” घेत तात्काळ ॲग्रीमेंट करून नुकसान भरपाई द्या, अन्यथा रात्र इथेच काढेन, अशी तंबी दिली. त्यानंतर कंपनी व्यवस्थापनाने ७० लाख रुपये देण्याचे मान्य केले. (Employee Death Compensation)
त्या कामगारांवर कारवाई नाहीच
मृत कामगाराच्या कुटुंबीयांना ७० लाख रुपये व इतर देय लाभ, कामगाराच्या पत्नीस धारिवाल कंपनीत शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरी, आंदोलन करणाऱ्या कामगारांवर कोणतीही कारवाई करणार नाही, कंत्राटी कंपनीकडून मिळणारे इतर लाभ व अंत्यसंस्कारासाठी रोख पाच लाख रुपये मदत आमदार सुधाकर अडबाले यांनी रात्री ११ वाजता मिळवून दिली. त्याबाबतचे कंपनी व्यवस्थापनाकडून ॲग्रीमेंट लिहून घेतले. सोबतच भविष्यात अशा घटना कंपनीत घडणार नाही याची काळजी घेण्याबाबत कंपनी व्यवस्थापनास तंबी दिली. (Chandrapur Industrial Incident)
अधिवेशनात मुद्दा उचलणार
सदर कंपनीत झालेल्या अपघातास कंपनी व्यवस्थापनातील अधिकारी सर्वस्वी जबाबदार असल्याने त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याबाबत येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुद्दा उपस्थित करण्यात येईल, असे आमदार सुधाकर अडबाले यांनी कामगारांना सांगितले.
यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. यादव, तहसीलदार श्री. पवार, शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रामू तिवारी, सोहेल रजा, प्रशांत भारती, सचिन कत्याल, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे महानगर अध्यक्ष दिगांबर कुरेकार, महानगर कार्यवाह सुरेंद्र अडबाले, जिल्हा कार्यवाह दीपक धोपटे व कामगार प्रतिनिधी उपस्थित होते. ————–
जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक
कंपनीत कामगारांना किमान वेतन, इतर लाभ व सुरक्षा बाबत महत्त्वाच्या बाबींवर कंपनी व्यवस्थापन, कामगार प्रतिनिधी यांची जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठक घेण्यात येईल, असे यावेळी आमदार सुधाकर अडबाले यांनी कामगारांना आश्वासित केले.
Railway services in Chandrapur : सध्या संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून खासदार प्रतिभा धानोरकर ह्या चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्रातील विविध विकासात्मक कामासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे. लोकसभा क्षेत्रातील रेल्वे सुविधा संबंधी त्यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेत चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्रातील रेल्वे सुविधांना बळकटी देण्याची मागणी केली आहे. (Chandrapur railway station development)
खासदार प्रतिभा धानोरकर ह्या चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्रातील प्रत्येक विभागाच्या विकासांत्मक कार्यासाठी अग्रेसर असल्याचे दिसून येत आहे. काल दि. 10 फेब्रूवारी रोजी त्यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेत विविध मागण्यांसदर्भात चर्चा केली. या मध्ये त्यांनी प्रामुख्याने बल्लारपूर ते लोकमान्य टिळक टर्मिनस पर्यंत चालणारी गाडी आठवड्यातील संपुर्ण दिवस चालविण्याची विनंती केली. तसेच काजीपेठ-पुणे हि गाडी आठवड्यातून तीन दिवस चालविण्यासंदर्भात चर्चा केली.
तसेच, चंद्रपूर-पुणे व चंद्रपूर-मुंबई या मार्गावर वंदे भारत ट्रेन (Vande Bharat trains Chandrapur-Pune) चालविण्याची विनंती देखील खासदार प्रतिभा धानोरकर यांची केली. त्यासोबतच चंद्रपूर हे औद्योगीक शहर असून येथे अनेक गाड्यांचा थांबा नसल्याने या ठिकाणी प्रत्येक गाडीचा थांबा देण्याची देखील विनंती खासदार धानोरकर यांनी केली. त्यासोबतच वरोरा व भद्रावती येथे कोरोना काळाच्या आधी थांबत असलेल्या सर्व गाड्यांचा थांबा पुर्ववत देण्याची मागणी केली. तसेच, मुंबई-नंदीग्राम एक्सप्रेस ला मुकूटबन व लिंगती रेल्वे स्टेशन वर थांबा देण्यासोबतच मुकुटबन रेल्वे स्टेशन वर रेल्वे आरक्षणाची सुविधा उपलब्ध करुन देण्याची विनंती देखील खासदार धानोरकर यांनी केली.
तसेच, झरी तालुक्यातील अहेरअल्ली या गावाजवळ असणाऱ्या अंडरपासची दुरुस्ती देखील करण्याची मागणी या दरम्यान केली. तसेच विसापूर येथील रेल्वे लाईन वर असणाऱ्या अंडपास मध्ये लाईटस् ची व्यवस्था करण्याची मागणी करुन बल्लारपूर रेल्वे स्टेशन वर नागरीकांच्या सुविधेसाठी सुरु करण्यात आलेल्या बॅटरीचलीत कार पुन्हा सुरु करण्याची मागणी यावेळी खासदार धानोरकर यांनी केली. या सर्व मागण्यांवर केंद्रीय रेल्वे मंत्री यांनी सकारात्मकता दर्शवून लवकरच या संदर्भाने निर्णय घेण्याचे आश्वासन मंत्री महोदयांनी खासदार प्रतिभा धानोरकर यांना दिले.
Government Support for anandwan : अतिशय कठीण काळात बाबा आमटेंनी महारोगी सेवा समितीच्या माध्यमातून समाजसेवेचे काम सुरू केले. समाजामध्ये ज्या कामाला मान्यता नव्हती, तिरस्कार होत होता, अशा काळात बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांच्या सेवेचे व्रत हाती घेतले. आज 75 वर्षानंतर अनेक प्रतिष्ठित लोक या संस्थेची जुळले आहेत. या सर्व लोकांना आनंदवनातून आत्मिक समाधान मिळत असते. त्यामुळेच आनंदवन हे ख-या अर्थाने मानवतेचे मंदीर आहे, अशा भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या.
बाबा आमटे (Baba Amte social work) आणि साधनाताई आमटे यांनी स्थापन केलेल्या महारोगी सेवा समितीच्या 75 व्या वर्षपुर्ती निमित्त आयोजित कृतज्ञता सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी मंचावर राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके, उद्योगमंत्री उदय सामंत, माजी राज्यपाल राम नाईक, आमदार सर्वश्री किशोर जोरगेवार, करण देवतळे, महारोगी सेवा समितीचे सचिव डॉ. विकास आमटे, डॉ. प्रकाश आमटे, डॉ. भारती आमटे, डॉ. मंदाकिनी आमटे आदी मान्यवर उपस्थित होते.
मानवी संवेदनाची व्याख्या बाबा आमटेंच्या कार्यातून पाहायला मिळते, असे सांगून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, बाबा आमटे यांनी विविध उपक्रमातून संपूर्ण समाजासाठी संवेदना तयार केली आहे. याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे. 75 वर्षाची वाटचाल अतिशय महत्त्वाची आहे. त्या काळात हा भाग अतिशय मागासलेला असताना बाबांनी हा प्रकल्प हाती घेतला. केवळ कुष्ठरोगांची सेवा नव्हे तर समाजसेवेची विविध क्षेत्रे जलसंधारण, पर्यावरण रक्षण असे अनेक प्रयोग येथे सुरू आहेत. आनंदवनच्या सकारात्मक कामातून हजारो तरुणांना समाजासाठी उत्तरदायित्व केले आहे. आपले संपूर्ण जीवन आमटे कुटुंबियांनी या प्रकल्पासाठी समर्पित केले आहे. (Maharogi Sewa Samiti achievements)
अनेक अडचणींचा सामना आनंदवनला करावा लागत असला तरी विचलित न होता आनंदवनचे काम निरंतर सुरू आहे. विविध क्षेत्रातील लोक या संस्थेसोबत जुळले आहे. यात कला, संगीत, फिल्म, उद्योग आदींचा समावेश आहे. मूलभूत सेवेचा उत्कृष्ट नमुना आनंदवनात आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. (Baba Amte legacy)
कुष्ठरोग मुक्त भारत करण्याचा पंतप्रधानांचा संकल्प : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 2027 पर्यंत कुष्ठरोग मुक्त भारत करण्याचा संकल्प आहे. या कामासाठी शासनाला आनंदवन सारख्या संस्थांची मोलाची मदत घ्यावी लागणार आहे. सन 2015 मध्ये भारतात प्रति लक्ष 9.73 कुष्ठरुग्ण सापडायचे. आज प्रती लक्ष 5.52 रुग्ण आढळतात. त्यामुळे आपल्याला मोठे काम करावे लागेल. यात आनंदवनचा मोठा सहभाग राहील. (Leprosy rehabilitation in India)
आनंदवनच्या अनुदानात वाढ : आनंदवन येथे कौशल्य विकास केंद्र उभे राहत आहे. तसेच निवासी 500 लोकांचे केंद्र सुद्धा येथे सुरू होणार आहे. सन 2012 पासून आनंदवनला देण्यात येणाऱ्या अनुदानात आता बदल करण्यात येत असून प्रति रुग्ण 2200 ऐवजी आता 6 हजार रुपये तर पुनर्वसन अनुदान अंतर्गत प्रति रुग्ण 2 हजार वरून 6 हजार रुपये देण्यात येणर आहे. आनंदवनला 10 कोटी रुपये कॉर्पस फंड लगेच देण्यात येईल. उर्वरित 65 कोटी रुपये कॉर्पस फंड देण्याकरीता नक्कीच प्रयत्न करणार असून शासन म्हणून आम्ही यासाठी पुढाकार घेऊ. आनंदवन ही समाजाची संस्था आहे. सकारात्मक संस्थेच्या मागे उभे राहणे ही शासनाची जबाबदारी आहे, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
आनंदवन येथील सेवाभाव जगाच्या पातळीवर उल्लेखनीय : उद्योगमंत्री उदय सामंत
यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले, आनंदवन येथील महारोगी सेवा समितीच्या 75 व्या वर्षपुर्तीनिमित्त या कार्यक्रमाला उपस्थित राहता आले, हे मी माझे भाग्य समजतो. आनंदवन येथे दिव्यांगांसाठी कौशल्य विकास केंद्र सुरू होत असून उद्योगांशी त्याचा समन्वय करून देण्यात आला आहे. या केंद्राच्या माध्यमातून दिव्यांगांना नोकरी मिळण्यास मदत होईल. शासन म्हणून आनंदवनला पाठबळ देण्याची आमची जबाबदारी आहे. आनंदवन येथील किमान 2 टक्के काम, इतर ठिकाणी करू शकलो, तर ती बाबा आमटे यांना खरी श्रद्वांजली ठरेल. सकारात्मक पध्दतीने राज्य चालविणारे आनंदवनला कोणतीही मदत कमी पडू देणार नाही. आनंदवनची उर्जा प्रेरणादायी आहे. येथील सेवाभाव जगाच्या पातळीवर उल्लेखनीय आहे, असे श्री. सामंत म्हणाले.
विविध बाबींचे ऑनलाईन उद्घाटन : बाबा आमटे यांच्या जीवनावर मराठी आणि इंग्रजीमध्ये भाषेवर आधारीत चित्रपटाचे ऑनलाईन पध्दतीने मुख्यमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. याशिवाय एस्ट्याब्लिशींग एम.एम.एस. (महारोगी सेवा समिती) ॲज हेल्थ कॅपिटल, सोमनाथ येथील श्रमतीर्थ, आनंदवनला डब्ल्यूसीएल कडून मिळालेल्या सोलर पॉवर जनरेशन प्रोजेक्ट, एस्ट्याब्लिशींग एम.एम.एस. ॲज स्कील डेव्हलपमेंट कॅपिटल आदींचे ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कौस्तुभ आमटे यांनी केले. संचालन वसुंधरा काशीकर – भागवत यांनी तर आभार डॉ. दिगंत आमटे यांनी मानले. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्ती उपस्थित होत्या.
Samvad Chimuklyanshi Abhiyan : राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या संकल्पनेतून 7 फेब्रवारी रोजी राबविण्यात आलेल्या ‘संवाद चिमुकल्यांशी अभियान’ अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातही वरिष्ठ अधिका-यांनी शासकीय आदिवासी आश्रमशाळेत मुक्काम केला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी चर्चा करून आश्रमशाळा तसेच वसतीगृहाची पाहणी केली.
आदिवासी विकास विभागांतर्गत राज्यात एकूण 497 शासकीय आश्रमशाळा कार्यान्वित आहे. या आश्रमशाळा व वसतीगृहात आदिवासी विद्यार्थ्यांसाठी असलेल्या सोयीसुविधा, विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी तसेच त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी 7 फेब्रुवारी 2025 रोजी ‘संवाद चिमुकल्यांशी’ हे अभियान राबविण्यात आले.
या अंतर्गत आदिवासी विकास मंत्र्यांचे खाजगी सचिव ललितकुमार व-हाडे यांनी राजुरा तालुक्यातील देवाडा येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेत तर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूरचे प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार आणि विशेष कार्य अधिकारी श्री. वाडेकर यांनी जिवती तालुक्यातील पाटण येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेत मुक्काम केला. Government tribal ashram schools
खाजगी सचिव ललितकुमार व-हाडे यांनी देवाडा येथील आश्रमशाळेत इयत्ता 5 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तसेच वर्गखोल्या, मुलांचे – मुलींचे वसतीगृह, भंडारगृह, स्वयंपाकगृह, स्वच्छतागृह ग्रंथालय, अभ्यासिका, प्रयोगशाळा, खेळाचे मैदान आणि परिसराची पाहणी केली. विशेष म्हणजे त्यांनी मुलांच्या पंगतीमध्ये जेवण वाढले आणि त्यांच्यासोबत जेवणाचा आस्वादसुध्दा घेतला. समोरच असणाऱ्या आदिवासी विभागाच्या एकलव्य नामांकित शाळेला श्री. व-हाडे यांनी भेट देऊन पाहणी केली
आगामी 10 वी आणि 12 वी परिक्षेच्या पार्श्वभुमीवर विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना श्री. व-हाडे म्हणाले, विद्यार्थ्यांनी नियमितपणे अभ्यास करून आपली प्रगती करा. तसेच आपल्यातील कलागुणांना विकसीत करून एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व घडवा. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी विशेष प्रयत्न करून शाळेचा लौकिक वाढवावा, असे आवाहन त्यांनी शिक्षक आणि मुख्याध्यापिका यांना केले. त्यावेळी मुलांनी सांस्कृतिक कार्यक्रम आणि आदिवासी नृत्य सादर केले सादर केले. Tribal residential schools facilities
प्रकल्प अधिकाऱ्यांचा पाटण येथील आश्रमशाळेत मुक्काम : ‘संवाद चिमुकल्यांशी’ या उपक्रमाअंतर्गत 7 फेब्रुवारी रोजी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपूर कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी शासकीय माध्यमिक आश्रमशाळा पाटण, येथे एकदिवस मुक्काम केला. सकाळी शाळेच्या परिपाठापासून ते रात्री मुलांच्या अभ्यासापर्यंत संपूर्ण एक दिवस विद्यार्थ्यांसोबत त्यांनी संवाद साधला. या भेटीत त्यांनी विद्यार्थ्यांशी हितगुज करत त्यांच्या अडचणी समजून घेण्याबरोबरच शाळेतील इतर मुलभूत सुविधांची पाहणी केली. त्याच बरोबर आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीकरिता शक्य ते प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांसोबतच त्यांनी दुपार व सायंकाळच्या भोजनाचा आस्वाद घेतला.