Category: ताज्या बातम्या

महाराष्ट्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व ताज्या बातम्या (Latest News) आणि ब्रेकिंग अपडेट्स वाचण्यासाठी रोज भेट द्या news34.in वर. राजकारण, समाजकारण, क्रीडा, गुन्हेगारी आणि आर्थिक घडामोडींचे त्वरित आणि विश्वसनीय कव्हरेज येथे उपलब्ध आहे. २४ तास सुरू असलेल्या घडामोडींची अचूक माहिती मिळवा, जेणेकरून कोणतीही मोठी बातमी तुमच्यापासून सुटणार नाही.

  • Unauthorized banner hoarding | चंद्रपुरात बॅनर लावंताय, गुन्हा दाखल होणार

    Unauthorized banner hoarding

    Unauthorized banner hoarding : चंद्रपूर महानगरपालिका हद्दीतील विना परवानगी होर्डिंग, बॅनर, जाहीरात फलक उभारणाऱ्यांवर सक्त कारवाई करण्याचे निर्देश आयुक्त विपीन पालीवाल यांनी दिले असुन अनधिकृत होर्डींगसाठी मा. उच्च न्यायालयाच्या आदेशाबाबत राजकीय पक्ष प्रतिनिधी व बॅनर छापणाऱ्या प्रिंटर्सना सोमवार ३१ डिसेंबर रोजी झालेल्या बैठकीत मनपा प्रशासनाद्वारे अवगत करण्यात आले.  


        घाटकोपर येथील होर्डींग दुर्घटनेनंतर सुस्वराज फाऊंडेशनची दाखल जनहित याचिका क्र.१५५ / २०११ नुसार मा.उच्च न्यायालयाने शहरातील अनधिकृत होर्डींग,बॅनर, जाहीरात फलकांवर सक्त कारवाई निर्देश दिलेले आहेत.त्याअनुषंगाने पोलीस विभाग व मनपा प्रशासनाद्वारे मनपा क्षेत्रातील प्रिंटर्स व राजकीय पक्ष प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. यात आयुक्त यांनी संबंधितांना मा. उच्च न्यायालयाच्या आदेशाबाबत अवगत केले व शहरात कुठलेही अवैध बॅनर,जाहीरात फलक,होर्डिंग लाऊ नये अन्यथा न्यायालयीन आदेशानुसार कारवाई करण्यात येणार असल्याची कल्पना दिली.  

    चंद्रपुरात 4 वाघनखे जप्त

                 
       अनधिकृत होर्डिंग्ज, बॅनर, फलक पालिका करणार जप्त असून गुन्हाही दाखल केला जाणार आहे. अनधिकृत होर्डिंग्ज तपासणीसाठी क्यूआर कोड देण्यात आला आहे. तो क्यूआर कोड नसेल तर कारवाई होणार आहे. त्याचप्रमाणे नागरिकांच्या सहभागासाठी वॉर्ड निहाय समिती सुद्धा स्थापन केली जाणार असुन तक्रार करण्यास वेबसाईट तसेच संपर्क क्रमांक मनपातर्फे (chandrapur mahanagar palika) उपलब्ध करून देण्यात आला आहे.

    अनधिकृत बॅनर,पोस्टर्स होर्डींग वर निष्कासनाची कारवाई करण्यासाठी स्थानिक पोलीस प्रश्न यांनी पुरेसे संरक्षण उपलब्ध करून देण्याचे तसेच आवश्यकता असल्यास हत्यारबंद पोलीस देखील पुरविण्याचे न्यायालयाने आदेशित केले आहे.

    चंद्रपुरात नागरिकांचे गळे कापणारे सक्रिय


         याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील,उपायुक्त मंगेश खवले,रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आसिफ राजा,सिटी पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके,दुर्गापूर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक लता वाढीवे,सहायक आयुक्त शुभांगी सूर्यवंशी,संतोष गर्गेलवार, अनिलकुमार घुले तसेच राजकीय पक्षांचे व प्रिंटिंग प्रेसचे प्रतिनिधी उपस्थीत होते.        

  • sudhir mungantiwar on santosh deshmukh | बीड मध्ये जी घटना घडली ती भविष्यात.. सुधीर मुनगंटीवार

    sudhir mungantiwar on santosh deshmukh

    sudhir mungantiwar on santosh deshmukh राज्यात सध्या चर्चेत असलेले सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा सर्वत्र निषेध होत असून या घटना पुन्हा घडू नये यासाठी येणाऱ्या अधिवेशनात अशासकीय विधेयक मांडत मी सरपंच बंधू-भगिनींचा आवाज बुलंद करणार असल्याची प्रतिक्रिया आमदार मुनगंटीवार यांनी दिली.

    नवीन वर्षाचे स्वागत करताना ही चूक करू नका

    चंद्रपुरात धनोजे कुणबी समाजातर्फे 3 दिवसीय कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते, महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी सरपंच परिषदेचे आयोजन करण्यात आले, त्यामध्ये राज्यात सरपंचावर होत असलेल्या हल्ल्यावर प्रकाश टाकण्यात आला.

    बीड जिल्ह्यात संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली त्यानंतर सलग 2 सरपंचावर हल्ला करण्यात आला होता.


    यावर आता माजी मंत्री व आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी बीड जिल्ह्यातील घटनांची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी मार्च मधील विधानसभेच्या अधिवेशनात सरपंचांना सुरक्षा पुरविण्यात यावी त्यांच्या कार्यकाळात कसलीही अप्रिय घटना घडू नये असे कायदे अस्तित्वात आणण्यासाठी अशासकीय विधेयक मी मांडणार अशी प्रतिक्रिया आमदार मुनगंटीवार यांनी यावेळी दिली. राज्यातील सरपंच बंधू-भगिनींच्या पाठीशी मी पूर्ण ताकदीनिशी उभा राहणार असल्याची प्रतिक्रिया आमदार मुनगंटीवार यांनी यावेळी दिली.

  • New Year celebration | नवीन वर्षाचे स्वागत करतायं तर ही चूक करू नका

    New Year celebration

    New Year celebration : येत्या 31 डिसेंबर 2024 रोजी वर्ष समाप्ती व नववर्षाच्या स्वागताप्रसंगी अतिउत्साही तरुण मंडळीकडून मद्यप्राशन करून वाहन चालवणे आणि वाहतुकीच्या नियमांचे पालन न करणे, असे प्रकार निदर्शनास येतात. यावर आळा घालण्यासाठी अशा वाहन चालकांविरुध्द कडक कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दिले आहे

    नववर्षाचा उत्सव साजरा करण्याकरीता अतिउत्साही तरुण मंडळी मद्य प्राशन करून दुचाकी, चारचाकी वाहने भरधाव वेगाने व बेदरकारपणे चालवतात. तसेच रस्त्यावर स्टंटबाजी किंवा अतिशय निष्काळजीपूर्व ड्रायव्हिंग करणे यासारखे कृत्य करीत असतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गंभीर अपघात घडून जीवितहानी होण्याची शक्यता असते. Drunk and drive punishment

    अशा प्रकारच्या कृत्यावर आळा घालण्याच्या दृष्टीने 29 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2024 पर्यंत संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी नाकेबंदी लावण्यात येणार आहे.

    आपलं विमान पुन्हा उतरणार – आमदार मुनगंटीवार

    जर मद्यप्राशन करून वाहन चालविताना आढळून आल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. जिल्ह्यातील वाढते अपघात कमी करण्याकरिता वाहतूक नियंत्रण शाखा चंद्रपूर व जिल्ह्यातील सर्व पोलिस स्टेशन अंतर्गत मद्यप्राशन करून वाहन चालविणे, ट्रिपल सीट, रफ ड्रायव्हिंग, स्टंटबाजी करून वाहन चालविणाऱ्या वाहन चालकावर मोठ्या प्रमाणात विशेष मोहिमेद्वारे कडक कारवाई करण्यात येणार आहे. Chandrapur traffic police

    त्यामुळे नववर्षाचे स्वागत करताना सर्व नागरिकांनी वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे व अपघात होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी केल्याचे वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस निरीक्षक प्रवीण कुमार पाटील यांनी कळविले आहे.

  • krishi mahotsav |चंद्रपुरातील कृषी महोत्सव म्हणजे कृषी विकास आणि सामाजिक बांधिलकीचा संगम – आमदार जोरगेवार

    krishi mahotsav

    krishi mahotsav : कुणबी समाज नेहमीच मेहनती, प्रामाणिकपणा आणि परंपरांचे जतन यासाठी ओळखला जातो. या कृषी महोत्सवाच्या आणि वधू-वर परिचय मेळाव्याच्या निमित्ताने आपण सर्वांनी एकत्र येऊन कृषी क्षेत्र आणि सामाजिक एकता अधिक बळकट केली आहे. हे एकत्रीतरित्या आयोजित झालेले आयोजन म्हणजे कृषी विकास आणि सामाजिक बांधिलकीचा संगम असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार (mla kishor jorgewar) यांनी केले.

    कुणबी समाजाच्या (dhanoje kunbi samaj) वतीने चांदा क्लब मैदानात कृषी महोत्सव आणि वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला अध्यक्ष अॅड. पुरुषोत्तम सातपूते, श्रीधर मालेकर, माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टुवार, अनिल धानोरकर, मनोहर पाउनकर, सुनील मुसळे, अजय जयसवाल, विलास माथनकर, माजी नगरसेवक वाढई, विनोद पिंपळशेंडे, अतुल देउळकर, अरुण मालेकर, प्रा. अनिल डाहाके, प्रा. मोरे आदि मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.

    आपलं विमान पुन्हा उतरणार – सुधीर मुनगंटीवार

    यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे मी सलग दुसऱ्यांदा आमदार म्हणून विधानसभेत पोहोचलो आहे. त्यामुळे माझ्यावर आता अधिकची जबाबदारी आहे. मागील पाच वर्षांत अनेक विकासकामे आपल्याला करता आली. तर अनेक विकासकामे या पाच वर्षांत करण्याचा निर्धार आपण केला आहे. मतदारसंघात मोठ्या अभ्यासिका आपण तयार करत आहोत. तसेच अनेक भागात मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावर आपला भर असल्याचे यावेळी बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले.

     वधू-वर परिचय मेळावा म्हणजे नव्या नात्यांची सुरुवात आहे. हे नाते केवळ दोन व्यक्तींचे नसून दोन कुटुंबे, संस्कृती आणि संपूर्ण समाजाची बांधिलकी दर्शवणारे असते. आज येथे उपस्थित तरुण-तरुणींनी एकमेकांची ओळख करून घेऊन नव्या वाटचालीस सुरुवात करावी.

    कृषी महोत्सवाच्या माध्यमातून आपल्या शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, शेतीतील नवसंकल्पना आणि सरकारी योजनांची माहिती मिळते. आपल्या शेतकऱ्यांना उत्पन्नवाढीचे मार्ग यातून शोधता येतात. कृषी हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा अधिकाधिक लाभ शेतकरी बांधवांनी घेण्याचे आवाहन यावेळी बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

      आपण कुणबी समाजाच्या अभ्यासिकेसाठी 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर करुन दिला आहे. यातून मोठी अभ्यासिका तयार होत आहे. येथे साहित्य खरेदीसाठी आणखी 50 लक्ष रुपयांच्या निधीची मागणी समाजाच्या वतीने आली असून साहित्य खरेदीसाठी 50 लक्ष रुपयांचा निधी देणार असल्याची घोषणाही यावेळी बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी केली.

    सोबतच घुग्घूस येथे कुणबी समाज मोठ्या संख्येने वास्तव्यास असून तेथेही अभ्यासिका बांधकामासाठी आपण 50 लक्ष रुपये देणार असल्याची घोषणा यावेळी बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी केली. या कार्यक्रमाला समाज बांधवांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

  • Vadhu var parichay melava : उप वर-वधु परिचय मेळाव्यात विवाह करुन समाजासमोर आदर्श मांडा – खासदार प्रतिभा धानोरकर

    Vadhu var parichay melava

    Vadhu var parichay melava : चंद्रपूर येथील चांदा क्लब मैदानावर धनोजे कुणबी समाजाच्या (Dhanoje kunbi samaj) वतीने आयोजित उप वर-वधू परिचय मेळावा व कृषी मेळाव्याचे उद्घाटन 27 डिसेंबर 2024 रोजी खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते पार पडले.

    चंद्रपुरात पर्यावरण संवर्धनासाठी महत्वाचा करार

    या उद्घाटन सोहळ्यात खासदार धानोरकर यांनी समाजाच्या भूमिका जागतिक स्तरावर मांडण्याची महत्त्वाची गरज व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, भविष्यातील परिचय मेळाव्यांमध्ये केवळ परिचय करणे नाही, तर विवाह देखील पार पडले पाहिजे, जेणेकरून समाजात आदर्श निर्माण होईल.

    कृषी मेळाव्याच्या संदर्भात त्यांनी शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाबद्दल मार्गदर्शन घेण्याची प्रेरणा दिली आणि तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात सर्वांनी भाग घ्यावा, असे आवाहन केले. या उद्घाटनावेळी समाजाची कृतज्ञता व्यक्त करताना खासदार धानोरकर म्हणाल्या, “समाजाने मला बरेच काही दिले आहे, आणि मी सदैव ऋणी आहे.”

    यावेळी मंचावर आमदार देवराव भोंगळे, आमदार संजय देरकर, धनोजे कुणबी समाजाचे अध्यक्ष अॅड. पुरुषोत्तमराव सातपूते, श्री. मालेकर, डॉ. विजय झाडे, विलास माथनकर, मनोहर पाऊनकर, राहूल पावडे, गजानन सातपुते, सुनंदा धोबे, सुनिता लोढीया, उमाकांत धांडे यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

  • Former PM Manmohan Singh Passes Away : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं निधन

    Former PM Manmohan Singh Passes Away

    Former PM Manmohan Singh Passes Away : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग (Former PM Manmohan Singh) यांचे निधन झाले आहे. मनमोहन सिंग यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. गुरुवारी रात्री उपचारासाठी त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

    भारताचे 14 वे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग 92 वर्षांचे होते. 2004 ते 2014 असे दहा वर्ष ते देशाचे पंतप्रधान होते.

    विद्वान, मृदू, मितभाषी आणि संवेदनशील नेता म्हणून मनमोहन सिंग यांची ओळख होती. 33 वर्षे ते खासदार होते. तर देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यानंतर 10 वर्ष पंतप्रधान राहणारे पहिले पंतप्रधान होते. PM Manmohan Singh

    डॉ. मनमोहन सिंग 1991 पासून राज्यसभेचे सदस्य होते जिथे ते 1998-2004 पर्यंत विरोधी पक्षनेते होते. 2004 आणि 2009 मध्ये काँग्रेस पक्षाच्या ऐतिहासिक विजयानंतर त्यांनी 22 मे 2004 आणि पुन्हा 22 मे 2009 रोजी पंतप्रधानपद स्वीकारले. डॉ.सिंग यांची विकासाप्रती असलेली बांधिलकी आणि त्यांच्या अनेक कर्तृत्वाची ओळख त्यांना बहाल करण्यात आलेल्या अनेक सन्मानांद्वारे करण्यात आली आहे.

    1 जानेवारी पासून नियम बदलणार

    यामध्ये 1987 मध्ये पद्मविभूषण, 1993 मध्ये युरो मनी अवॉर्ड ऑफ द इयर ऑफ द इयर, 1993 आणि 1994 या दोन्ही वर्षातील अर्थमंत्र्यांचा आशिया मनी पुरस्कार आणि 1995 मध्ये भारतीय विज्ञान काँग्रेसचा जवाहरलाल नेहरू जन्मशताब्दी पुरस्कार यांचा समावेश आहे. PM Manmohan Singh

    डॉ. मनमोहन सिंग यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 रोजी पंजाबमध्ये झाला. त्यांनी1952 मध्ये पंजाब विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदवी आणि 1954 मध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. त्यांनी 1957 मध्ये केंब्रिज विद्यापीठातून त्यांचे इकॉनॉमिक ट्रायपोस पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी 1962 मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्रात डी.फिल केले. PM Manmohan Singh

    तर 1971 मध्ये भारत सरकारच्या वाणिज्य मंत्रालयात आर्थिक सल्लागार म्हणून रुजू झाले. त्यांना लवकरच 1972 मध्ये वित्त मंत्रालयात मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून पदोन्नती देण्यात आली. UNCTAD सचिवालयात अल्पावधीत काम केल्यानंतर त्यांना दक्षिण आयोगाचे महासचिव म्हणून नियुक्त करण्यात आले.

    1987-1990 पासून जिनिव्हा. याशिवाय डॉ. सिंग यांनी वित्त मंत्रालयात सचिव, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष, भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, पंतप्रधानांचे सल्लागार आणि विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष अशी पदेही भूषवली.

  • Veer bal diwas 2024 | खालसा कॉन्व्हेंट येथे वीर बाल दिवस कार्यक्रमाचे आयोजन

    Veer bal diwas 2024

    Veer bal diwas 2024

    Veer bal diwas 2024 : गुरू गोविंदसिंहजी यांच्या सुपुत्रांनी दाखवलेले पराक्रम आणि त्याग यांचे स्मरण आज आम्हाला प्रेरणा देते. आजचा दिवस केवळ एक स्मरणोत्सव नाही, तर मुलांना संस्कार, शौर्य, त्याग आणि न्यायासाठी संघर्ष करण्याची उर्जा देणारा हा दिवस आहे. आजचा वीर बाल दिवस आपल्याला कायमच सत्य, धर्म आणि न्यायासाठी लढण्याची प्रेरणा देत राहील, असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

    इंग्रजी नामांकित शाळेत मोफत प्रवेश प्रक्रिया सुरू

      वीर बाल दिवस निमित्त आज गुरुवारी खालसा कॉन्व्हेंटमध्ये (khalsa highschool) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला लाडी बसेसा, भारतीय जनता पार्टीचे मंडळ अध्यक्ष संदीप आगलावे, मुख्याध्यापिका सिमरन सहाणी, अमनप्रती गौरा, विश्वजित शाहा आदि प्रमुख अतिथी म्हणून मंचावर उपस्थित होते.

      यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण आपल्या पुढच्या पिढीला इतिहासाची जाणीव करून देण्याचा प्रयत्न करतो आहोत. मुलांनी आणि युवकांनी या प्रेरणादायी इतिहासातून शिकावे, आपली संस्कृती, परंपरा आणि आदर्श जपावेत. या प्रसंगातून एकजुटीचा संदेश घेऊन पुढे जावे. आपल्या समाजातील मूल्यांना टिकवण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य केले पाहिजे. विशेषतः आजच्या पिढीने आपल्या देशासाठी, समाजासाठी आणि न्यायासाठी सदैव तत्पर राहावे, ही प्रेरणा देणारा आजचा दिवस असल्याचे यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले.

      आजच्या दिवशी आपण ज्यांनी आपल्या शौर्याने आणि त्यागाने इतिहास घडवला, अशा महान बालवीरांना आदरांजली अर्पण करतो. लहान वयातसुद्धा मोठमोठ्या संकटांना तोंड देणाऱ्या वीर बालांनी आपले मोठे योगदान देशासाठी दिले आहे. गुरू गोविंदसिंह यांचे सुपुत्र साहिबजादे यांचा बलिदान, हा त्याग आणि धर्मासाठी दिलेली आहुती आजही आपल्याला प्रेरणा देते. त्यांच्या शौर्याने धर्म आणि संस्कृतीचे रक्षण करण्याचा आदर्श घालून दिला आहे.

    khalsa highschool

      आपली नवी पिढी ही देशाचा उज्ज्वल भविष्यकाळ आहे. त्यांना योग्य शिक्षण, मूल्यसंस्कार आणि समाजसेवेचे महत्त्व शिकविणे ही आपली जबाबदारी आहे. वीर बाल दिवसाच्या निमित्ताने, आपण आपल्या मुलांमध्ये देशप्रेम, आत्मसन्मान आणि आदर्श नागरिक होण्याची वृत्ती रुजवावी, असे आवाहन यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. या कार्यक्रमाला शिक्षकवृंद, पालकवर्ग आणि विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या कार्यक्रमात विद्यार्थांचा सत्कार करण्यात आला. 

  • Rain forecast | चंद्रपूर जिल्ह्यात या दिवशी वादळी पावसाचा अंदाज

    Rain forecast

    Rain forecast : दिनांक 27-28 डिसेंबरदरम्यान मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात गारपीट आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

    27 डिसेंबरला दूपारपासून मेघगर्जनेसह पावसाची सुरुवात सर्वात प्रथम नंदुरबार, धुळे, जळगाव, अहिल्यानगर जिल्ह्यांसह, दक्षिण मराठवाडा, पुणे आणि नाशिक जिल्ह्यांतील पूर्व भागांमध्ये होईल. (Accurate weather forecast rain)

    चंद्रपुरात भव्य कृषी महोत्सवाचे आयोजन

    शुक्रवार रात्रीपर्यंत वादळी पाऊस पश्चिम विदर्भ आणि शेजारच्या मराठवाड्यात हजेरी लावेल, ज्यात बुलढाणा, अकोला, वाशीम, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि बीड जिल्ह्यांचा समावेश आहे. या भागांमध्ये काही प्रमाणात गारपिटीची शक्यता देखील वर्तविण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या उर्वरित जिल्ह्यांतील काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता देखील आहे.

    28 डिसेंबरच्या पहाटेपर्यंत वादळी पाऊस पूर्वेकडे सरकेल आणि विदर्भातील इतर जिल्ह्यांत हजेरी लावेल. यात यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, आणि चंद्रपूर जिल्ह्यांचा समावेश आहे. या भागांमध्ये काही प्रमाणात गारपीट होण्याची शक्यता आहे. (Rainfall updates live)

    पश्चिम विदर्भ आणि शेजारच्या मराठवाड्यातील काही भागांमध्ये पावसाची स्थिती या दिवशी देखील कायम राहण्याची शक्यता आहे. या दिवशी एकंदरीत विदर्भात आणि मराठवाड्यात आभाळी हवामान अपेक्षित असल्यामुळे कमाल तापमानात थोडी घट होईल. मात्र खानदेश आणि मध्य महाराष्ट्रात हवामान स्थिर होण्यास सुरुवात होईल.

    29 डिसेंबरला विदर्भ आणि मराठवाड्यातील काही तुरळक ठिकाण वगळता राज्यातील बहुतांश भागांत स्थिर हवामान पहिला मिळेल, आणि 30 डिसेंबरपासून थंडीत वाढ होईल.

    शेतकऱ्यांनी हवामानाच्या या स्थितीनुसार नियोजन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.  प्राण्यांना आणि काढणी केलेल्या पिकांना पाऊस, गारपीट आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावे. वादळ आल्यास झाडांखाली, मोकळ्या जागेत, टिनाच्या शेडखाली,  वीजप्रवाह असलेल्या तारांखाली किंवा विद्युत रोहित्रांनजीक आसरा घेऊ नये, असे आवाहन देखील कृषी विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.

  • Mohan Bhagwat | शिक्षण व आरोग्य या दोन्ही गोष्टी आता महाग – डॉ.मोहन भागवत

    Mohan Bhagwat

    Mohan Bhagwat : चंद्रपूर – डॉ. मोहनजी भागवत : शाळा चालवणे सोपे काम राहिले नाही. शिक्षण व आरोग्य या दोन्ही गोष्टी आता महाग झाल्या आहेत. त्यातही काही जण पैसा कमवण्यासाठी शाळा चालवतात. सेवा म्हणून शाळा चालवणे हे व्रत आहे. व्रत हे नेटाने आणि तेवढ्याच निष्ठेने चालवावे लागते. सन्मित्र सैनिकी शाळा (sanmitra sainik vidyalaya) तसा प्रयत्न करीत आहे ही आनंदाची आणि अभिनंदनाची गोष्ट आहे, असे प्रतिपादन रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी येथे केले.

    बुधवार, 25 डिसेंबर 2024 रोजी सकाळी येथील सन्मित्र सैनिकी शाळेच्या 30 व्या वार्षिकोत्सवाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सन्मित्र मंडळाचे अध्यक्ष डॉ. परमानंद अंदनकर, सचिव अ‍ॅड. निलेश चोरे, शाळेच्या प्राचार्य अरुंधती कावडकर, कमांडंट सुरेंद्रकुमार राणा व्यासपीठावर उपस्थित होते.

    खासदार धानोरकर यांनी गाजवलं लोकसभा अधिवेशन

    डॉ. भागवत पुढे म्हणाले, सेवा म्हणून शाळा चालवणे ही केवळ शाळा व्यवस्थापनाचीच जबाबदारी नाही, तर ती समाजाचीही आहे. पोट भरण्यासाठी शिक्षण हे संकुचित व्याख्या झाली. शिक्षणाचा खरा उद्देश मनुष्य विचारशील व्हावा हा आहे.

    सुबुध्दी देणारे, संवेदना निमार्ण करणारे शिक्षण हवे. दुसर्‍याचा विचार करायला लावणारे शिक्षण हवे. स्वतः शिकून आपल्या कुटुंबाचे जीवन उन्नत करणार्‍याला चांगले मानले जाते. कुटुंबासोबतच गावासाठी धावपळ करणार्‍याला त्यापेक्षा जास्त मान दिला जातो.

    आपल्या देशासाठी कार्यरत राहिलेल्यांची जयंती, पुण्यतिथी साजरी होते आणि जो अवघ्या जगासाठी झटतो त्याला साष्टांग नमस्कार घातला जातो. स्वामी विवेकानंदांसारखे जीवन असेल तर ते सार्थकी लागते, असे विचार त्यांनी मांडले. डॉ. परमानंद अंदनकर यांनी, ‘सर्वे भवन्तु सखिनः सर्वे सन्तु निरामया’ हे ब्रिद व्हावे यासाठी सन्मित्र मंडळ कार्यरत असल्याचे म्हटले. प्रास्ताविक अ‍ॅड. निलेश चोरे यांनी, तर संचालन व आभार प्रदर्शन अरुंधती कावडकर यांनी केले. (Sanmitra sainik school chandrapur)

    मोहनजींच्या हस्ते ‘सन्मित्र बेस्ट कंपनी अवार्ड’ने नेताजी सुभाष कंपनीला पुरस्कृत करण्यात आले. तर ‘सन्मित्र बेस्ट कॅडेट’ म्हणून नायक श्रीकांत वाडणकर या विद्यार्थ्याचा सत्कार झाला. यावेळी रा. स्व. संघाचे प्रांत संघचालक दीपकजी तामशेट्टीवार, जिल्हा संघचालक तुषार देवपुजारी, तालुका संघचालक लक्ष्मण ओलालवार, नगर संघचालक अ‍ॅड. रवींद्र भागवत, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, आमदार सुधीर मुनगंटीवार, आ. किशोर जोरगेवार, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र बोकारे, डॉ. मुकुंद अंदनकर, डॉ. प्रवीण पंत यांच्यासह जिल्ह्यातील गणमान्य व्यक्ती उपस्थित होते.

    बाल सैनिकांनी सादर केले युध्द कौशल्य
    डॉ. मोहनजी भागवत यांच्यापुढे सन्मित्र सैनिकी शाळेच्या बाल सैनिकांनी युध्द कौशल्य सादर केले. व्यायाम योग, योगासन, नियुध्द, मल्लखांब आणि घोष प्रात्यक्षिकांसह चित्तथरारक मनोरेही त्यांनी उभारले.

  • ias transfer maharashtra : राज्यातील IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

    ias transfer maharashtra

    ias transfer maharashtra : महायुती सरकारचे खातेवाटप झाल्यावर सरकार ऍक्शन मोड वर आले आहे. शासनाने राज्यातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहे.

    यामध्ये बेस्टचे महाव्यवस्थापक अनिल डिग्गीकर यांची बदली ही दिव्यांग विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी करण्यात आली आहे. (IAS officer transfer Maharashtra 2024)

    मोफत रुग्णवाहिकेचे चंद्रपुरात लोकार्पण

    हर्षदीप कांबळे यांची बेस्टच्या महाव्यवस्थापकपदी बदली करण्यात आली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाचे सहसचिव राधाकृष्णन यांची महाजेनकोच्या अध्यक्षपदी बदली करण्यात आली आहे. वर्ध्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिलेंची नाशिक महापालिका आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. राज्यात प्रशासकीय बदलास सुरुवात झाली असून त्याचाच भाग म्हणून या बदल्यांकडे पाहिलं जातंय.

    या अधिकाऱ्यांच्या बदल्या

    • मुख्यमंत्री कार्यालयाचे सहसचिव राधाकृष्णन यांची महाजेनकोच्या अध्यक्षपदी बदली.
    • महाजेनकोचे अध्यक्ष अनबाल्गन यांच्याकडे आता उद्योग विभागाच्या सचिवपदाची जबाबदारी.
    • गडचिरोलीचे जिल्हाधिकारी संजय दैने यांकडे नागपूर टेक्सटाईल आयुक्तपदाची धुरा.
    • आयुक्त अविशांत पांडा यांची गडचिरोलीच्या जिल्हाधिकारी पदावर बदली.
    • वर्ध्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिलेंची नाशिक महापालिका आयुक्तपदी बदली.
    • राज्य कर सहआयुक्त सी वनमाथी यांची वर्ध्याच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती.
    • सा वनमाथी यांच्या जागी चंद्रपूर जिल्हा परिषदेचे सीईओ संजय पवार यांची वर्णी.
    • विवेक जोन्सन हे चंद्रपूरचे नवे जिल्हा परिषद सीईओ.
    • पुणे विभागीय महसूल उपायुक्त अण्णासाहेब चव्हाण यांची महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेच्या सीईओपदी बदली.
    • गोपीचंद कदम यांना सोलापूर स्मार्ट सिटी सीईओपदी नियुक्ती