Category: ताज्या बातम्या

महाराष्ट्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व ताज्या बातम्या (Latest News) आणि ब्रेकिंग अपडेट्स वाचण्यासाठी रोज भेट द्या news34.in वर. राजकारण, समाजकारण, क्रीडा, गुन्हेगारी आणि आर्थिक घडामोडींचे त्वरित आणि विश्वसनीय कव्हरेज येथे उपलब्ध आहे. २४ तास सुरू असलेल्या घडामोडींची अचूक माहिती मिळवा, जेणेकरून कोणतीही मोठी बातमी तुमच्यापासून सुटणार नाही.

  • Labor minister Maharashtra । “कामगार सुरक्षेसाठी मोठा निर्णय: कायद्यात सुधारणा आणि चंद्रपूर दौऱ्याची कामगार मंत्र्यांची घोषणा”

    Labor minister Maharashtra Akash Fundkar

    Labor minister Maharashtra : राज्यात कंपन्यांमध्ये दुर्घटना होऊन कामगारांचे दुर्दैवी मृत्यू होतात. तसेच अशा घटनांमध्ये काही कामगार जखमी होतात. अशा दुर्घटनेमध्ये कामगार विभागाचे अधिकारी जाऊन याप्रकरणी तपासणी करतात.  तपासणीअंती अहवाल सादर करतात. जास्तीत जास्त कामगार विभागाच्या माध्यमातून न्यायालयात खटला दाखल करता येतो. अशा दुर्घटनांमध्ये कामगाराच्या हितासाठी कामगार विभागाला अधिकाधिक अधिकार मिळावेत. यासाठी कायद्यात सुधारणा करणार असल्याचे कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले. अधिवेशन संपताच चंद्रपूर जिल्ह्यातील उद्योगातील कामगार सुरक्षेसंदर्भात आढावा घेण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यात  दौरा करण्याचे आश्वासन कामगार मंत्र्यांनी दिले. Industrial safety in Maharashtra

    महाकाली यात्रेसाठी निधी द्या – सुधीर मुनगंटीवार

    चंद्रपूर जिल्ह्यातील ताडाळी औद्योगिक वसाहतीत धारिवाल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीत झालेल्या ऑपरेटरच्या मृत्यूप्रकरणी सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. धारिवाल सह जिल्ह्यातील अन्य उद्योगामध्ये सुरक्षा नियमांचे पालन केले जात नसल्याने कामगारांचे बळी जात आहेत याकडे सुधीर मुनगंटीवार यांनी लक्ष वेधले. कामगार मंत्र्यांनी जिल्ह्यातील उद्योगात कामगार सुरक्षेच्या दृष्टीने आढावा घेण्याची मागणी सुधीर मुनगंटीवार यांनी केली.या लक्षवेधी सूचनेच्या चर्चेत सदस्य सर्वश्री  राजू तोडसाम, नाना पटोले,  हिरामण खोसकर यांनी सहभाग घेतला. Workplace accidents statistics Maharashtra

    लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात अधिक माहिती देताना कामगार मंत्री फुंडकर म्हणाले, चंद्रपूर जिल्ह्यातील धारिवाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड मधील दुर्घटनेत मृत्यू झालेल्या ऑपरेटरच्या वारसाला कारखाना व्यवस्थापनाद्वारे सानुग्रह अनुदानाची 70 लक्ष रुपये रक्कम देण्यात आली आहे. तसेच मृत कामगाराच्या पत्नीला नोकरी देण्याबाबत, गट विमा व उपदनाची रक्कम लवकरात लवकर मिळवून देण्याबाबत कार्यवाही करण्याचे कंपनी व्यवस्थापनाने कळविले आहे. याबाबत कार्यवाही न झाल्यास नियमानुसार संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. Labor laws Maharashtra

    चंद्रपूर जिल्ह्यातील उद्योगांबाबत कामगार सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अधिवेशन संपल्यानंतर चंद्रपूर येथे आढावा घेण्यात येईल.सध्या अस्तित्वात असलेल्या कायद्यात सुधारणा किंवा नवीन कायदा करण्याबाबत विधी व न्याय विभागाकडे मार्गदर्शन मागण्यात आले आहे. मार्गदर्शन प्राप्त झाल्यानंतर याबाबत सकारात्मक कार्यवाही करण्यात येईल, असेही कामगार मंत्री फुंडकर यांनी सांगितले.

  • Chandrapur Mahakali Yatra । लाखो भाविकांचा महाकाली यात्रेत सहभाग – सोयीसुविधांसाठी १ कोटींची मदत मिळणार?

    Chandrapur Mahakali Yatra

    Chandrapur Mahakali Yatra : चंद्रपूर महानगरपालिका हद्दीतील ऐतिहासिक आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री माता महाकाली मंदिरात दरवर्षी चैत्र महिन्यात भव्य यात्रा भरते. विदर्भातील अष्टक त्रीपिठांपैकी एक असलेल्या या ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्रावर महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश, मराठवाडा आणि इतर राज्यांतून लाखो भाविक दर्शनासाठी येतात. चंद्रपूर जिल्ह्याचे सांस्कृतिक आणि धार्मिक वारशाचे प्रतीक असलेल्या या यात्रेत लाखो भाविकांना उत्तम सोयीसुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. त्यासाठी राज्य शासनाने १ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांना केली. विधानभवनातील मुख्यमंत्र्यांच्या दालनात आ. श्री. मुनगंटीवार यांनी त्यांची भेट घेऊन यात्रेसंदर्भात सविस्तर चर्चा केली. Chandrapur Mahakali Yatra facilities

    या यात्रेमध्ये लाखो भाविक सहभागी होतात. भाविकांची संख्या सातत्याने वाढत आहे. याचा विचार करता यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी आणि भाविकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी 1 कोटी रुपये निधीची आवश्यकता आहे. हा निधी जिल्हा प्रशासनाला उपलब्ध करून देण्याची मागणी आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली. Chandrapur Mahakali Yatra arrangements

    औद्योगिक कंपन्यांचे सुरक्षा ऑडिट करा – आमदार जोरगेवार

    यात्रेदरम्यान फक्त 15 ते 20 दिवसांत सुमारे 10 लाख भाविक येथे येतात.  यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी तात्पुरती निवासव्यवस्था, आरोग्य सुविधा, स्वच्छता, शौचालये, विद्युत रोषणाई, वाहनतळ, सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी व इतर आवश्यक बाबींच्या उपलब्धतेसाठी भाजपा महानगराचे जिल्हाध्यक्ष राहुल पावडे यांनी आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे निवेदन दिले होते. या निवेदनाची दखल घेत,यासंदर्भात आ. मुनगंटीवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेत सविस्तर चर्चा केली. Chandrapur Mahakali Temple infrastructure

    मुख्यमंत्र्यांनी दिले आश्वासन
    चंद्रपूरच्या माता महाकाली यात्रेसाठी राज्यभरातून येणाऱ्या लाखो भाविकांच्या सोयी-सुविधांसाठी 1 कोटी निधी मंजूर करण्याची मागणी राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे केली. यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविकांच्या आरोग्य, स्वच्छता, सुरक्षा व सुविधांची गरज लक्षात घेता, निधी मंजूर करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले असून त्याबद्दल त्यांचे मनस्वी आभार मानतो, असे आ. श्री. मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

    झरपट नदीचे पावित्र्य राखण्यासाठी
    आ. श्री. मुनगंटीवार यांचा पुढाकार

    चंद्रपुरातील महाकाली यात्रा ३ एप्रिलपासून सुरू होत आहे. यात्रेच्या पार्श्वभूमीवर पवित्र तीर्थ म्हणून झरपट नदीचे महत्त्व आहे. परंतु सध्या तिची अवस्था अत्यंत चिंताजनक आहे. त्यामुळे नदीचे खोलीकरण, सौंदर्यीकरण आणि पुनरुज्जीवन करणे अत्यावश्यक आहे, याकडे नागरिकांच्या मागणीनुसार आ. श्री. मुनगंटीवार यांनी लक्ष वेधले आणि त्यासंदर्भात तातडीने काम करण्याचे निर्देश काही दिवसांपूर्वी दिले.

    यात्रेकरूंच्या सोयीसुविधांसाठी
    भाविकांसाठी स्नानगृह उभारावे. त्या ठिकाणी चार ट्युबवेल पंप कार्यान्वित करावे. महानगरपालिकेने गेट दुरुस्ती, झरपट नदी परिसरातील कचऱ्याची साफसफाई, गायमुख दुरुस्ती, बंधारा बांधकाम, चार ट्यूबवेल्स व फवारे बसवावेत तसेच अंचलेश्वर मंदिर येथे टाइल्स लावण्याचे कार्य हाती घ्यावे, अशा सूचनाही आ. श्री. मुनगंटीवार यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

  • Chandrapur district collector । चंद्रपूर जिल्हाधिकारी विनय गौडा यांचा ‘बालस्नेही’ पुरस्काराने सन्मान

    Chandrapur district collector

    Chandrapur district collector : बालकांच्या संरक्षणासाठी अस्तित्वात असलेल्या विविध कायद्यांची चंद्रपूर जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी तसेच बाल संगोपन योजनेसाठी घेतलेला पुढाकार यासाठी चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांची नागपूर विभागातून उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून निवड करण्यात आली व त्यांना मुंबई येथे ‘बालस्नेही’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

    जिल्हाधिकारी श्री. गौडा यांच्या  नेतृत्वात महिला व बालविकास विभागाने बाल विवाह प्रतिबंधक कायदा, बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) कायदा, अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा, POCSA यासारख्या काय‌द्याची प्रभावी अंबलबजावणी करून बाल संगोपन योजनेसाठी अभिनव उपक्रम राबविले. त्यामुळे महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग यांच्यामार्फत जिल्हाधिकारी विनय गौडा यांची नागपूर विभागातून उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून ‘बालस्नेही’ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. Maharashtra child rights

    चंद्रपुरातुन अवैध दारू वाहतुकीचा प्रयत्न फसला

    हा पुरस्कार वितरण समारंभ 3 मार्च रोजी मुंबई येथे पार पडला. यावेळी महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, मनिषा कायंदे, महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष सुशीबेन शहा, आयोगाचे सदस्य प्रशांत नारनवरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

    चंद्रपूर जिल्ह्यात महिला व बाल विकास विभागाने केलेल्या कामगिरीबद्दल जिल्हाधिकारी यांच्या सोबतच दीपक बानाईत यांना ‘बालस्नेही जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी’ हा वैयक्तिक पुरस्कार, बाल कल्याण समिती चंद्रपूर यांना ‘बालस्नेही सीडब्ल्यूसी’ पुरस्कार तसेच बाल संरक्षण कक्ष चंद्रपूर यांना ‘बालस्नेही डीसीपीयू’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. अशाप्रकारे जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या नेतृत्वात जिल्ह्याला चार बालस्नेही पुरस्कार मिळाले आहेत. Child protection laws

    जिल्हा प्रशासनाची मंत्रालयात दखल : तीन दिवसांपूर्वीच मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांचा नुकताच मंत्रालयात सत्कार करण्यात आला होता. तर आता चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांना उत्कृष्ट कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले. एकप्रकारे चंद्रपूर जिल्हा प्रशासनाच्या उल्लेखनीय कार्याची दखल मंत्रालय स्तरावर होत असून जिल्ह्यासाठी ही गौरवाची बाब आहे.

  • Chandrapur thermal power plant pollution । चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या प्रदूषणावर कारवाई – MPCB कडून कठोर पावले

    Chandrapur thermal power plant pollution

    आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा तारांकित प्रश्न

    Chandrapur thermal power plant pollution : चंद्रपूर येथे महाऔष्णिक विद्युत केंद्र प्रकल्पातून निघणाऱ्या धुळीमुळे प्रदुषणात वाढ झाल्याबाबतच्या तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी, चंद्रपूर व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी दि. १७/०१/२०२५ रोजी चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र व वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या मे. दुर्गापुर खुली खाण या उद्योगांची पाहणी करण्यात आली. भेटी दरम्यान आढळुन आलेल्या त्रुटींच्या अनुषंगाने संबंधित उद्योगांवर नियामाप्रमाणे आवश्यक कारवाई करण्यात आली आहे. Western Coalfields Limited Durgapur mine environmental impact

    चंद्रपुरातील प्रदूषणाबाबत आमदार जोरगेवार यांची महाजेनको अधिकाऱ्यांशी बैठक

    चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र या उद्योगास दि. १७/०१/२०२५ रोजी कारणे दाखवा नोटीस बजावली व त्या अनुषंगाने सदर उद्योगाने दि. ३०/०१/२०२५ रोजीच्या पत्रान्वये अनुपालन अहवाल सादर केला आहे. तसेच, वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड दुर्गापुर या उद्योगास दि. २९/०१/२०२५ रोजी कारणे दाखवा नोटीस बजावली व त्या अनुषंगाने सदर उद्योगाने दि. ०७/०२/२०२५ रोजीच्या पत्रान्वये अनुपालन अहवाल सादर केला आहे. तसेच उपरोक्त दोन्ही उद्योगांची अनुक्रमे रू.१५.०० लक्ष व रू.५.०० लक्ष बँक हमी जप्त करण्यात आली आहे, अशी माहिती पर्यावरण मंत्री श्रीमती पंकजा मुंडे यांनी आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या तारांकित प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली. Chandrapur air quality concerns

     चंद्रपूर जिल्ह्यातील ऊर्जानगर, कोंडी व नेरी येथील वेकोलि दुर्गापूर सीएचपी बंकर, सीएचपी रोप-वे व महाऔष्णीक विद्युत केंद्र प्रकल्पातून २४ तास निघणाऱ्या धुळीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात वायुप्रदुषण होत असल्याची बाब आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मुळ तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून निदर्शनास आणली. प्रदुषणामुळे नागरिकांना श्वसनाच्या व त्वचेच्या होणाऱ्या विकारांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, ही प्रदुषणकारी उपकरणे हटविण्याची मागणी आ. मुनगंटीवार यांनी सदर प्रश्नाद्वारे केली. Coal mining impact on agriculture in Chandrapur


    चंद्रपूर तालुक्यातील येरूर येथील एमआयडीसीतील कारखान्यामुळे तसेच अल्ट्राटेक व माणिकगड सिमेंट कंपन्यामुळे गडचांदूर, नांदा फाटा व लगतच्या गावांमध्ये जल व वायू प्रदूषणामुळे शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे नुकसान होत असल्याची बाब आ. मुनगंटीवार यांनी तारांकित प्रश्नाद्वारे निदर्शनास आणली. या विषयाबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळा मार्फत प्रतिबंधक कार्यवाही करण्यात येत असल्याचे पर्यावरण मंत्र्यानी लेखी उत्तरात सांगितले.

  • Chandrapur power plant pollution । आमदार किशोर जोरगेवार यांची महाजनको अधिकाऱ्यांसोबत प्रदूषण नियंत्रणावर महत्वपूर्ण चर्चा

    Chandrapur power plant pollution

    Chandrapur power plant pollution : आमदार किशोर जोरगेवार यांनी आज महाजनकोच्या व्यवस्थापकीय संचालक राधाक्रिष्णा यांची मुंबई येथे भेट घेतली असून, सीएसटीपीएसच्या युनिट क्रमांक ८ व ९ मधून होणाऱ्या प्रदूषण नियंत्रणाबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी त्यांनी प्रदूषण नियंत्रणासाठी तात्काळ प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. CSTPS Unit 8 and 9 emissions

    १० मार्च रोजी चंद्रपूर मनपा या नागरिकांची नावे करणार जाहीर

    यावेळी, प्रदूषणामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. स्थानिक नागरिकांना श्वसनासंबंधी विकार, त्वचारोग आणि इतर आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागत असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगितले.

    तसेच, प्रदूषणामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणले. धुरामुळे शेतमालाच्या गुणवत्तेत घट होत असून, त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. प्रदूषण नियंत्रणासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर व प्रशासनाच्या सक्रिय पुढाकाराची आवश्यकता असल्याचे आमदार जोरगेवार यांनी म्हटले आहे. Mahagenco pollution measures

    प्रदूषण कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर या बैठकीत चर्चा झाली. प्रकल्पाच्या कार्यप्रणालीत सुधारणा करणे, स्थानिक जनतेच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे आणि शेतीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करणे या दृष्टीने त्वरित उपाययोजना राबविण्याची मागणी यावेळी आमदार जोरगेवार यांनी केली.महाजनको प्रशासनाने त्यांच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला असून, लवकरच प्रदूषण नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना केल्या जातील, असे आश्वासन दिले आहे.

  • court case for traffic violation । वाहनांवरील दंड: ‘हे’ न केल्यास कोर्टात खटला!

    court case for traffic violation
    वाहतूक दंड: भरला नाही, तर थेट कोर्टात खटला!

    court case for traffic violation : जर तुम्ही वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केले असेल आणि दंड भरला नसेल, तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. आता वाहनांवर थकीत दंड असल्यास, वाहनचालकांवर थेट न्यायालयात खटला दाखल होणार आहे. त्यानंतर तुम्ही इतर कोणत्याही माध्यमातून दंड भरू शकणार नाही.

    अप्पर पोलीस महासंचालक वाहतूक यांच्याकडून आदेश जारी:

    राज्यातील कसूरदार वाहनचालक/मालक यांच्यासाठी ‘वन स्टेट वन ई-चलन‘ अंतर्गत वाहनावर थकीत दंड असल्यास, तो ९० दिवसांच्या आत भरणे बंधनकारक आहे. दंड न भरल्यास, थेट न्यायालयात तुमच्याविरुद्ध खटला दाखल होऊ शकतो. e-challan payment online

    चंद्रपुरात शिक्षकचं निघाला कॉपी बहाद्दर

    चंद्रपूर जिल्ह्यात अनेक वाहनांवर दंड प्रलंबित:

    चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक वाहनचालकांवर दंड प्रलंबित आहे. त्यांनी तातडीने जवळच्या पोलीस स्टेशन किंवा वाहतूक शाखेत जाऊन थकीत दंड भरावा. न्यायालयात खटला दाखल होण्यापूर्वी नागरिकांनी आपल्या वाहनावरील थकीत दंड भरावा, असे आवाहन चंद्रपूर जिल्हा वाहतूक शाखेद्वारे करण्यात आले आहे. Chandrapur traffic rules

    महत्त्वाचे मुद्दे:

    • ९० दिवसांची मुदत: ‘वन स्टेट वन ई-चलन’ (one state one e-challan system
      ) अंतर्गत दंड भरण्यासाठी ९० दिवसांची मुदत आहे.
    • न्यायालयात खटला: मुदतीत दंड न भरल्यास, थेट न्यायालयात खटला दाखल होईल.
    • तातडीने दंड भरा: चंद्रपूर जिल्ह्यातील वाहनचालकांनी तातडीने थकीत दंड भरावा.
    • आवाहान: चंद्रपूर जिल्हा वाहतूक शाखेकडून नागरिकांना दंड भरण्याचे आवाहन.
  • CBSE 10th exam । CBSE च्या नवीन परीक्षा पद्धतीला खासदार धानोरकरांचा विरोध!

    CBSE 10th exam

    CBSE 10th exam : केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डाने 2026 पासून 10वी च्या परीक्षांमध्ये अमुलाग्र बदल करण्यासाठी मसुदा तयार करुन नविन नियमांना मंजुरी दिली आहे. नविन नियमाअंतर्गत 10वी बोर्डाची परीक्षा दोन वेळा घेण्यात येणार असल्याने खासदार प्रतिभा धानोरकर (Pratibha Dhanorkar MP) यांनी नविन मसुदा नियमांना विरोध दर्शवित त्या आशयाचे पत्र केंद्रीय माध्यमिक शिक्षा मंडळाच्या अध्यक्षांना पाठविले आहे.

    केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डाच्या नविन नियमानुसार विद्यार्थ्यांना दोन वेळा परीक्षा द्यावी लागणार असल्याने व माध्यमिक शिक्षा मंडळाने बदलविलेल्या मसुदा नियमांच्या अनुषंगाने खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या कडे अनेक विद्यार्थी व पालकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या. त्यानुसार खासदार धानोरकर यांनी केंद्रीय माध्यमिक शिक्षा मंडळाच्या अध्यक्षांना पत्र लिहित आक्षेप नोंदविलेला आहे.

    या पत्रामध्ये त्यांनी सदर परीक्षा पध्दतीतून दोष निर्माण होणार असल्याचे सांगितले. तसेच, मे महिन्यातील तापमानामुळे विदर्भात सदर परीक्षा विद्यार्थ्यांसाठी जिवघेणी ठरणार असल्याचे सांगितले. तसेच, या पत्रातून शाळांना अनेक तांत्रिक अडचणी निर्माण होणार असून शालेय वेळापत्रक देखील कोलमडणार आहे व शिक्षकांना सदर परीक्षापद्धती अडचणीची ठरणार आहे. त्यामुळे सध्याची प्रचलीत परीक्षापध्दती योग्य असून हिच परीक्षा पध्दत कायम ठेवण्याची आग्रही भुमीका खासदार धानोरकर यांनी घेतली आहे. CBSE exam pattern change

    चंद्रपुरात परीक्षा केंद्रावर धाड, कॉपी चा ढीग आणि शिक्षकांची मदत

    या संदर्भात केंद्रीय माध्यमिक शिक्षा मंडळाने मागविलेल्या हरकती वर खासदार धानोरकरांनी पत्रातून आक्षेप नोंदविला आहे. या संदर्भात खासदर धानोरकर यांनी केंद्रीय शिक्षा मंत्री यांची भेट घेणार आहेत. बोर्डाने कुठलाही निर्णय घेण्याआधी विद्यार्थी, शिक्षक व शालेय प्रशासक यांचा देखील विचार करावा असे देखील खासदार धानोरकर यांनी पत्रातून सांगितले.

  • Chandrapur farmers relief । मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने चंद्रपूरच्या शेतकऱ्यांना मिळणार कोट्यवधींची मदत

    Chandrapur farmers relief

    Chandrapur farmers relief : चंद्रपूर जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना गेल्यावर्षी अतिवृष्टीचा व पुराचा फटका बसला होता. त्यामुळे शेतजमिनींचे व शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते. त्यावेळी तत्कालीन पालकमंत्री आ. श्री. सुधीर मुनगंटीवार (sudhir mungantiwar) शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आले होते. पण त्याचसोबत या शेतकऱ्यांना सरकारकडून मदत जाहीर व्हावी यासाठी देखील त्यांनी पाठपुरावा केला होता. आता राज्य सरकारने चंद्रपूर जिल्ह्यातील 5385 शेतकऱ्यांना 7 कोटी 65 लक्ष 33 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. आ. श्री. मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांचेच हे यश असून शेतकऱ्यांनी त्यांचे आभार मानले आहेत. Sudhir Mungantiwar farmers aid

    चंद्रपूर जिल्ह्यात वाढतोय मानव वन्यजीव संघर्ष, तात्काळ उपाययोजना करा

    अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ या सारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे आणि शेतजमिनीचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये पुन्हा शेतकरी उभा राहू शकला पाहिजे, यादृष्टीने निविष्ठा अनुदान स्वरूपात मदत देण्यात येते. तसेच, राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरीता देखील मदत देण्यात येते. शासनाकडे जून ते सप्टेंबर, 2024 या कालावधीत अतिवृष्टीमुळे शेतजमीनीच्या झालेल्या नुकसानीसाठी प्रस्ताव आले होते. यात नाशिक, पुणे, नागपूर, अमरावती व छत्रपती संभाजीनगर या विभागांमधून प्रस्ताव आले होते. त्यानंतर आता राज्य सरकारने यावर निर्णय घेत राज्यभरासाठी 2925.61 लक्ष रुपयांचा निधी वितरीत करण्याला मंजुरी दिली आहे. Chandrapur agriculture loss compensation

    विद्यार्थ्यांना कॉपी पुरविण्याचं काम शिक्षकांच्या खांद्यावर, चंद्रपुरातील प्रकार

    या प्रस्तावांमध्ये चंद्रपूरच्या शेतकऱ्यांचाही समावेश होता. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचे तातडीने पंचनामे करून मदतीचे प्रस्ताव तयार करावे, अशा सूचना आ. श्री. मुनगंटीवार यांनी त्या कालावधीत दिल्या होत्या. त्यानंतर प्रशासनाने नागपूर विभागांतर्गत चंद्रपूरचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्यानुसार जून व जुलै 2024 या कालावधीत अतिवृष्टीचा फटका बसलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील 5309 शेतकऱ्यांना 7 कोटी 48 लक्ष 89 हजार रुपयांची मदत जाहीर झाली आहे. तर ऑगस्ट व सप्टेंबर 2024 या कालावधीत जिल्ह्यातील 76 शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसला होता. त्यांना 16.4 लक्ष रुपयांची मदत जाहीर झाली आहे. Chandrapur flood relief fund

    एकूण 2,254.76 हेक्टर शेतीचे नुकसान या चार महिन्यांच्या कालावधीत झाले होते. त्यानुसार जून ते सप्टेंबर या कालावधीत अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील 5385 शेतकऱ्यांना 7 कोटी 65 लक्ष 33 हजार रुपयांची मदत आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे मिळणार आहे.

    शेतकऱ्यांनी मानले आभार
    मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याची विक्रमी 202 कोटीची रक्कम मिळू शकली होती. तर शेतकऱ्यांच्या धानाला 20 हजार रुपये हेक्टरी बोनस देऊन भात उत्पादक शेतकऱ्यालाही न्याय देण्याचे काम त्यांनी केले होते. आता त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले आहेत.

  • Ashok Uike minister | ताडोबाच्या वाघांमुळे चंद्रपूर जगप्रसिद्ध, पण संघर्ष वाढतोय

    Ashok Uike minister

    Ashok Uike minister : ताडोबा – अंधारी व्याघ्र प्रकल्पामुळे (Tadoba Andhari Tiger Reserve) चंद्रपूर जिल्ह्याचे नाव जागतिक पातळीवर पोहचले आहे. मानवाच्या संरक्षणासोाबतच वन्यजीवांचाही समतोल राखणे गरजेचे आहे. मात्र आपला अधिवास सोडून जंगलातील वाघ गावांच्या जवळ येत आहे. त्यामुळे मानव – वन्यजीव संघर्ष (Human-wildlife conflict) वाढत असल्याचे निदर्शनास येते. हा संघर्ष रोखण्यासाठी वनविभागाने आणखी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशा सुचना राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी दिल्या.

    चंद्रपुरात कॉपी चा महापूर, शिक्षण विभागाच्या पथकाने मारली धाड


    वीस कलमी सभागृह येथे वन विभागाचा आढावा घेतांना ते बोलत होते. बैठकीला चंद्रपूरचे मुख्य वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., ताडोबा – अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रीय संचालक प्रभुनाथ शुक्ला, एफडीसीएमचे व्यवस्थापकीय संचालक सुमीत कुमार, संचालक (कोर) आनंद रेड्डी, उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू, राकेश सेपट, कुशाग्र पाठक, विभागीय वन अधिकारी प्रशांत खाडे, सचिन शेंडे, बापू येळे, वन्यजीव मंडळाचे सदस्य धनंजय बापट व वनविभागाचे इतर अधिकारी उपस्थित होते.


    पुढे पालकमंत्री डॉ. उईके म्हणाले, मानव – वन्यजीव संघर्षात ज्या कुटुंबातील सदस्यांचा मृत्यु झाला असेल, त्या कुटुंबातील सदस्याला केवळ आर्थिक मदतच नाही तर वनविभागाने नियमित रोजगारसुध्दा उपलब्ध करून द्यावा. प्राचीन काळापासून जल, जंगल, जमीनचे संरक्षण येथील आदिवासी करीत आले आहेत. या आदिवासी युवक-युवतींना कौशल्य विकासातून चांगले प्रशिक्षण देऊन रोजगारक्षम बनवावे. त्यासाठी वन विभागाने धोरण निश्चित करावे. अनुसुचित जमातीच्या शेतक-यांकडून सागवान, झाडे व इतर वनोपज विकत घेतल्यानंतर या शेतक-यांना वेळेवर मोबदला देण्यात यावा. याबाबत कोणतीही तक्रार येऊ देऊ नका. आतापर्यंत किती शेतक-यांना मोबदला दिला, याचा सविस्तर अहवाल सादर करावा.


    डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वनधन योजनेंतर्गत लाभार्थ्यांना सरळ लाभ मिळण्यासाठी स्थानिक पातळीवर यंत्रणा उभारावी. या योजनेसोबतच कौशल्य विकासाची जोड देऊन स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा. चंद्रपूरचे वनवैभव पाहण्यासाठी येणा-या पर्यटकांसाठी (Wildlife tourism Maharashtra) रस्त्यांची सोयीसुविधा उच्च दर्जाचीच असावी. ग्राम परिसर व आदिवासी विकास कार्यक्रमांतर्गत वनसमित्यांना योग्य प्रशिक्षण द्यावे, अशा सुचना पालकमंत्री डॉ. अशोक उईके (Ashok Uike minister) यांनी दिल्या. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते बॉटनिकल गार्डनच्या संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले.


    सादरीकरणात चंद्रपूरचे मुख्य वन संरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर म्हणाले, जिल्ह्यात एकूण 4845.30 चौ. कि.मी. म्हणजे एकूण भौगालिक क्षेत्राच्या 42.34 टक्के वनक्षेत्र आहे. महाराष्ट्रात आज वाघांची संख्या 450 च्या आसपास असून यापैकी एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात जवळपास 225 वाघ आहेत. ताडोबा व्याघ्र प्रकल्पामध्ये 95 ते 100 वाघ आहेत. आतापर्यंत 26829 शेतक-यांना सौर उर्जा कुंपनाचा लाभ देण्यात आल्याचे सांगितले. सोबतच जिल्ह्यातील वन विभागाच्या महत्वाच्या प्रकल्पांची माहिती दिली.

  • Chandrapur Zilla Parishad achievements । चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासात नवीन अध्याय: विवेक जॉन्सन यांचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते गौरव

    Chandrapur Zilla Parishad achievements

    Chandrapur Zilla Parishad achievements : चंद्रपूर जिल्ह्यातील विकासात्मक आणि नाविन्यपूर्ण कार्यक्रमांसाठी जिल्हा परिषद चंद्रपूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) विवेक जॉन्सन यांचा राज्य स्तरावर गौरव करण्यात आला. 27 फेब्रुवारी 2025 रोजी मुंबई येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विवेक जॉन्सन यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. हा गौरव जिल्ह्यातील विकासात्मक कार्यक्रमांच्या अभूतपूर्व यशाचा पुरावा आहे. Vivek Johnson CEO Chandrapur

    चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या हाती लागले ४ वर्षांपासून पसार

    नाविन्यपूर्ण उपक्रमांची सुरुवात
    विवेक जॉन्सन यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यात अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यास सुरुवात केली. त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील विकासाच्या नवीन मानदंड घालण्यात आले आहेत. त्यांनी सुरू केलेल्या उपक्रमांमध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे:

    1. मिशन सक्षम: जिल्ह्यातील युवकांना कौशल्य विकासाच्या माध्यमातून स्वावलंबी बनवण्याचा हा उपक्रम.
    2. मिशन अंकुर: शिक्षणक्षेत्रातील गुणवत्ता सुधारण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला.
    3. खुली विज्ञान बाग: विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रसारासाठी ही बाग तयार करण्यात आली.
    4. स्टेम लॅब: विद्यार्थ्यांना विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित (STEM) शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्यासाठी ही प्रयोगशाळा सुरू करण्यात आली.
    5. ॲस्ट्रॉनॉमी लॅब: खगोलशास्त्राच्या अभ्यासासाठी विशेष प्रयोगशाळा सुरू करण्यात आली.
    6. मोबाईल प्लॅनेटोरीयम: जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना खगोलशास्त्राचे ज्ञान देण्यासाठी मोबाईल प्लॅनेटोरीयम सुरू करण्यात आले.
    7. स्मार्ट पीएचसी: आरोग्य सेवा सुधारण्यासाठी स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रे सुरू करण्यात आली.
    8. मोबाईल कॅन्सन व्हॅन: कर्करोगाच्या लवकर निदानासाठी मोबाईल कॅन्सन व्हॅन सुरू करण्यात आली.
    9. स्मार्ट वाचनालय: ज्ञानप्रसारासाठी स्मार्ट वाचनालये सुरू करण्यात आली.
    10. बचतगट मॉल: महिला बचतगटांना आर्थिक सक्षमीकरणासाठी मॉलची सोय उपलब्ध करून देण्यात आली.
    11. बळीराजा समृद्धी मार्ग अभियान: शेतीक्षेत्रातील उत्पादकता वाढवण्यासाठी हे अभियान सुरू करण्यात आले.
    12. सोमनाथ कृषी पर्यटन: कृषी आधारित पर्यटन विकसित करण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला.
    13. ई-ऑफिस प्रणाली: प्रशासकीय कामकाज अधिक सुगम आणि पारदर्शक करण्यासाठी ई-ऑफिस प्रणालीचा प्रभावी वापर सुरू करण्यात आला.

    राज्य स्तरावर दखल
    विवेक जॉन्सन यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल राज्य स्तरावर घेण्यात आली. त्यांच्या नेतृत्वाखाली चंद्रपूर जिल्ह्यातील विकासाचे नवे परिमाण गाठले गेले आहे. या सर्व उपक्रमांच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे जिल्ह्यातील लोकांच्या जीवनात मोठा बदल घडवून आणण्यात आला आहे. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित केले. Devendra Fadnavis honors Chandrapur CEO

    मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन
    या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विवेक जॉन्सन यांच्या कार्याची प्रशंसा करताना म्हटले, “विवेक जॉन्सन यांनी चंद्रपूर जिल्ह्यात केलेले कार्य खरोखरच प्रेरणादायी आहे. त्यांच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे जिल्ह्यातील लोकांचे जीवन सुधारले आहे. त्यांच्या कार्याचा आदर्श इतर जिल्ह्यांनीही स्वीकारला पाहिजे.”