Category: ताज्या बातम्या

महाराष्ट्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व ताज्या बातम्या (Latest News) आणि ब्रेकिंग अपडेट्स वाचण्यासाठी रोज भेट द्या news34.in वर. राजकारण, समाजकारण, क्रीडा, गुन्हेगारी आणि आर्थिक घडामोडींचे त्वरित आणि विश्वसनीय कव्हरेज येथे उपलब्ध आहे. २४ तास सुरू असलेल्या घडामोडींची अचूक माहिती मिळवा, जेणेकरून कोणतीही मोठी बातमी तुमच्यापासून सुटणार नाही.

  • Sudhir Mungantiwar pollution debate । प्रदूषणाच्या आगीत सापडलेला चंद्रपूर: आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत उठवला मोठा प्रश्न

    Sudhir Mungantiwar pollution debate

    Sudhir Mungantiwar pollution debate : “जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे” अश्या शब्दात चंद्रपूर थर्मल पॉवर स्टेशनमुळे आणि वेकोलि खाणींमुळे होणाऱ्या प्रदूषणबाधित जनतेच्या भावना समजून घेत राज्याच्या पर्यावरण मंत्री ना. श्रीमती पंकजाताई मुंडे यांनी यासंदर्भात तातडीने एक तज्ज्ञ समिती गठीत करून यामध्ये लोकप्रतिनिधींचा यात समावेश करण्यात येईल व निर्णय घेण्यात येईल अशी घोषणा केली. राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदर्भातील वास्तव मांडल्यानंतर श्रीमती पंकजा मुंडे यांनी पंधरा दिवसांत चंद्रपूरमध्ये येऊन तोडगा काढणार असल्याचा शब्द दिला. Industrial pollution in Chandrapur district

    पोलिसांच्या हत्येनंतर चंद्रपुरात बार ला ठोकले टाळे

    चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत प्रकल्पातील धुळीमुळे, तसेच वेकोलिमुळे होणाऱ्या प्रदूषणासंदर्भात आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मंगळवारी विधानसभेत अर्धा तास चर्चा उपस्थित केली. या विषयाचे गांभीर्य श्रीमती पंकजा मुंडे यांनी लक्षात घेतले. त्यानंतर तज्ज्ञांची व आमदारांची समिती गठीत करण्याचे व स्वतः चंद्रपूरला येऊन प्रत्यक्ष पाहणी करून बैठक घेणार असल्याचा शब्द दिला. नियमांचे उल्लंघन केल्यास दंडाच्या रकमेत वाढ करण्यासंबंधी तसेच बँक हमीची रक्कम वाढविण्या मोठा निर्णय घेणार असल्याचे आश्वासन दिले.

    या भागातील हवा, पाणी, ध्वनी प्रदूषण याबाबत मोठ्या प्रमाणात काम करण्याची, उपक्रम राबविण्याची अपेक्षा व्यक्त केली. याबाबत या परिसरातील उद्योगाचा सीएसआर त्याच ठिकाणी वापरून पर्यावरण संतुलनाचे काम करता येईल असेही त्या म्हणाल्या. एक जागरूक यंत्रणा चंद्रपूर जिल्ह्यात तयार करण्याचा विचार आहे असेही ना. मुंडे म्हणाल्या. Pankaja Munde environmental action plan

    यासंदर्भात चर्चेची सुरुवात करताना आ. सुधीर मुनगंटीवार यांनी या प्रकल्पाच्या अधिकऱ्यांसह शेकडो कोटीचे उद्योग प्रस्थापित करणाऱ्या उद्योजकांच्या दुर्लक्षितपणाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. सर्वसामान्य माणसाच्या जीवाशी खेळण्याच्या या अपराधाबद्दल कठोर कारवाई करण्याची मागणी पर्यावरण मंत्र्यांकडे केली. चंद्रपूर औष्णिक वीज प्रकल्पासाठी प्रदूषण विभागाची मान्यता ही 31 मे 2024 पर्यंतच होती. त्यामुळे ही मान्यताच रद्द करण्याची पहिली मागणी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी सभागृहात केली. Industrial pollution in Chandrapur district

    नूतनीकरण न करता थर्मल पॉवर स्टेशन सुरू असल्याचेही त्यांनी सभागृहात सांगितले. या विज प्रकल्पाच्या करणाने होणाऱ्या प्रदूषणाबाबत कारवाई करताना पर्यावरण विभागाने केवळ 15 लक्ष रुपयांची बँक हमी जप्त केली. याबाबत श्री मुनगंटीवार यांनी ही बँक गॅरंटी 5 कोटी रुपये करण्याची मागणी केली. (Bank guarantee increase for pollution control) यासोबतच वेस्टर्न कोल्ड फिल्ड मुळे होणाऱ्या प्रदूषण करवाईबाबत बोलताना त्यांची बँक गॅरंटीदेखील पाच लाखावरून पाच कोटी रुपये करण्यात यावी असा आग्रह धरला.

    डब्लूसीएल क्षेत्रातील बँकर उडवताना मर्यादेपेक्षा अधिक डेसिमल आवाजामुळे ध्वनी प्रदूषण वाढते आहे. वीज केंद्रातील कोल हॅण्डलिंग प्लांटची दुरवस्था झाली असून त्याचे नूतनीकरण झाले पाहिजे अशीही मागणी आ. श्री. मुनगंटीवार यांनी केली. या भागातील कामगार, रहिवासी यांच्या कुटुंबियांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होऊ लागले आहेत, त्यांच्यासाठी या प्रकल्पाच्या माध्यमातून मोठी आरोग्य शिबीरे व्हावीत, रुग्णांच्या शस्त्रक्रिया, उपचार यासाठी भरीव मदत मिळाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. त्यासाठी एक समिती प्रदूषणाच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी गठीत करावी. यासंदर्भात जागरूकता निर्माण करण्यासाठी डिस्पले लावावेत अशी सूचना केली. प्रदूषणाच्या कायद्यात, नियमात बदल करावेत अशी अपेक्षाही आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

  • Pink Paradise bar sealed । पोलिसाच्या हत्येनंतर कारवाईचा झटका – ‘पिंक पॅराडाईज’ बारला टाळे

    public demand Pink Paradise bar sealed

    शहरातील इतर बारवरही नजर?

    Pink Paradise bar sealed : चंद्रपूर शहरात 7 मार्च रोजी पिंक पॅराडाईज बार मध्ये दिलीप चव्हाण नामक पोलीस कर्मचाऱ्याचा क्षुल्लक वादातून खून झाला होता, यानंतर पोलीस प्रशासन आक्रमक झाले आणि खुनासारखी गंभीर घटना व वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याने नागरिकांच्या मागणीवरून पिंक पॅराडाईज बार पोलीस प्रशासनाच्या वतीने सील करण्यात आले.

    7 मार्च रोजी बार पुढे पोलीस कर्मचाऱ्यांची हत्या करण्यात आली होती, (Police officer murder in Chandrapur
    ) आधी बार मध्ये काही युवकांसोबत पोलीस कर्मचाऱ्यांचा वाद झाला त्या वादातून पोलीस कर्मचाऱ्याची हत्या झाली होती.

    चंद्रपुरात क्रिकेट सट्टा नेटवर्क चालविणाऱ्यांवर आता होणार मोठी कारवाई

    या घटनेनंतर पोलीस विभाग खळबळून जागा झाला आणि महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 142 (2) च्या अधिकारातून लोकहिताच्या दृष्टीने सदर बार सील करण्यात आले. (Maharashtra bar license rules) काही दिवसांपासून या बार समोर बांधकाम साहित्य ठेवण्यात आले आहे, ज्यामुळे नागरिकांना मार्गावरून जाण्यासाठी गैरसोय होत आहे. सोबतच बार मध्ये पार्किंग ची व्यवस्था नाही ही बाब अनुज्ञपती चे उल्लंघन करणारी आहे. त्यामुळे हि कारवाई करण्यात आली. Police action on bars

    खुनासारखी गंभीर घटना घडल्यावर पोलिसांनी आपल्या अधिकाराचा वापर केला हे चांगलं पाऊल पोलिसांनी उचललं पण शहरात असे अनेक बार आहे जे वेळेचे बंधन पाळत नाही, पार्किंगची व्यवस्था नाही, त्या बार वर सुद्धा पोलिसांनी कारवाई करावी, अन्यथा एकाला एक तर दुसऱ्याला दुसरा न्याय होणार. काही वर्षांपूर्वी रघुवंशी कॉम्प्लेक्स मधील एका बार मधून व्यसनाधीन युवकाने पार्किंग मध्ये युवकाच्या अंगावरून वाहन नेले होते.

    हॉटेलमध्ये बिर्याणी खात आहात? मग त्या बिर्याणीमध्ये अळी तर नाही? चंद्रपुरात घडला अळीमय बिर्याणीचा प्रकार

    शहरात असे अनेक बार आहे जे वेळेचे बंधन पाळत नाही, काही बार ला स्थानिक नागरिकांनी अनेकदा विरोध केला मात्र त्यावेळी पोलीस आपल्या अधिकाराचा वापर करीत नाही. अनेक जागी नको त्या ठिकाणी आज बार व देशी दारूचे दुकान लागले आहे, त्या ठिकाणाहून महिला जाण्यास घाबरतात त्याबाबत विरोध होतो पण तेव्हाही पोलीस आपल्या अधिकाराचा वापर करीत नाही.

    प्रशासन जर आपल्या नियमांनी चालायला लागणार त्यादिवशी उल्लंघनाचा खेळ कायमचा बंद झाल्याशिवाय राहणार नाही, आपल्या विभागातील कर्मचाऱ्यांसोबत हा प्रसंग घडला आणि नियमांचा वापर करीत कारवाई करण्यात आली. पोलिसांनी करायलाच हवं गुन्हेगारी संपुष्टात आणण्यासाठी जे प्रयत्न पोलीस विभाग करतात जर तेच प्रयत्न बे लगाम बार चालकांना नियमांचा पाठ शिकविण्यासाठी करावा लागला तर ते करायलाच हवे अन्यथा असे गुन्हे घडतच राहणार.

  • Coal mafia activities in Chandrapur | चंद्रपूर जिल्ह्यातील कोल माफियांवर निर्बंध लावा – आमदार किशोर जोरगेवार

    Coal mafia activities in Chandrapur

    Coal mafia activities in Chandrapur : शासनाने कर्नाटक एम्टा, अरविंदो यांसारख्या काही खाजगी कोळसा खाणींना परवाने दिले आहेत. या खाणींमध्ये मोठ्या प्रमाणात उत्खनन सुरू असून, येथील कोळसा खुल्या बाजारात विकला जात असल्याने कोळसा माफिया सक्रिय झाला आहे. परिणामी, असामाजिक कृत्ये घडत असून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे या परिस्थितीवर निर्बंध लावण्याची मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिवेशनात बोलताना केली आहे.

    चंद्रपुरातील हॉटेलमधील व्हेज बिर्यानीमध्ये आढळली अळी, युवासेनेची तक्रार

    चंद्रपूर जिल्ह्यात कोळसा खाणींचे जाळे मोठ्या प्रमाणावर पसरत आहे. मात्र, त्याचे दुष्परिणामही आता समोर येत आहेत. या खाणींमुळे प्रदूषण, जनजीवनावरील परिणाम आणि गुन्हेगारीचे प्रश्न निर्माण झाले आहेत.

    कोळसा खाणींच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी आणि शेती व्यवसायालाही मोठा फटका बसत आहे. याबाबत अनेक तक्रारी आ. किशोर जोरगेवार यांच्या कार्यालयात प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारी लक्षात घेऊन, त्यांनी यापूर्वीच वेकोलिच्या सीएमडी यांची भेट घेऊन हा विषय उपस्थित केला होता. मात्र, ठोस कार्यवाही न झाल्यामुळे, त्यांनी मुंबई येथे सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुन्हा एकदा हा मुद्दा सभागृहात मांडला. Coal mining impact on farmers

    अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रश्नोत्तराच्या तासात बोलताना आ. किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूर कोळसा खाणींमुळे निर्माण झालेल्या समस्यांकडे सभागृहाचे लक्ष वेधले. वेकोलीच्या वतीने अधिग्रहीत केलेल्या जमिनींचा मोबदला अद्याप दिला गेलेला नाही. तसेच, उर्वरित जमिनींची खरेदी होत नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. Kishor Jorgewar coal mining issues

    वेकोली प्रशासनाच्या मनमानी कारभारामुळे अनेक शेतकऱ्यांचे पांदण रस्ते अडवले जात आहेत, याकडेही त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले आणि यावर त्वरित कार्यवाही करण्याची मागणी केली. बंराज कोळसा खाणीने वनविभागाच्या जमिनीवर अतिक्रमण करून तिथून कोळशाचे उत्खनन सुरू केले आहे. या प्रकाराची तपासणी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आ. किशोर जोरगेवार यांनी यावेळी अधिवेशनात केली.

    तसेच, अरविंद खाणीस विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाची शासनाने दखल घ्यावी आणि स्थानिक जनतेच्या मागण्या ऐकून घेत ठोस निर्णय घ्यावा, अशीही त्यांनी अधिवेशनात जोरदार मागणी केली आहे .खाजगी कोळसा खाणींमुळे कोळसा माफिया सक्रिय झाला असून, अनेक ठिकाणी अवैध व्यवहार होत आहेत. या सर्व परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाने तातडीने कठोर पावले उचलावीत आणि कोळसा खाणींवर निर्बंध लागू करावे असे ते यावेळी बोलताना म्हणाले.

  • Protect Yourself from Heatwave | उष्णतेच्या लाटेचा प्रकोप! चंद्रपूर जिल्ह्यात नागरिकांसाठी तातडीचा इशारा

    Protect Yourself from Heatwave

    Protect Yourself from Heatwave : भारतीय हवामान खात्याकडून चंद्रपूर जिल्ह्यात एक दोन ठिकाणी 12 व 13 मार्च या दोन दिवसाकरिता उष्मा लाटेबद्दल सतर्कता वर्तवण्यात आलेली आहे. त्यामुळे नागरिकांनी याबाबत खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी केले आहे. Hot Weather Health Risks

    नागरिकांचे आरोग्य धोक्यात, चंद्रपूर शहरातील व्हेज बिर्याणी मध्ये मिळाली अळी, तक्रार दाखल मात्र कारवाई नाही

    उष्ण लाटेपासून संरक्षणासाठी खालील उपाययोजना प्रभावी ठरू शकतात: Extreme Heat Protection Tips

    • करावयाचे उपाय:
    • पुरेसे पाणी प्या: शरीरातील पाण्याची पातळी संतुलित ठेवण्यासाठी नियमितपणे पाणी पिणे आवश्यक आहे.
    • डोके झाका: घराबाहेर पडताना टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करून डोके आणि चेहरा सूर्यप्रकाशापासून संरक्षित करा.
    • दुपारी बाहेर जाणे टाळा: दुपारी 12 ते 4 वाजेदरम्यान घराबाहेर जाणे शक्यतो टाळावे, कारण या वेळेत तापमान उच्च असते.
    • घरातील पडदे वापरा: थेट सूर्यप्रकाश रोखण्यासाठी घरातील पडद्यांचा वापर करा, ज्यामुळे घरातील तापमान नियंत्रित राहील.
    • हलके आणि सच्छिद्र कपडे घाला: हलके, पातळ आणि सच्छिद्र सुती कपडे परिधान करा, ज्यामुळे शरीराला शीतलता मिळेल.
    • टाळावयाचे उपाय:
    • अतिकष्टाची कामे करू नका: उन्हात अत्याधिक शारीरिक श्रमाची कामे करण्याचे टाळा, ज्यामुळे उष्माघाताचा धोका वाढतो.
    • विशिष्ट पेये टाळा: दारू, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड थंड पेये घेण्याचे टाळा, कारण ही पेये शरीरातील पाण्याची पातळी कमी करू शकतात.
    • उच्च प्रथिनयुक्त आणि शिळे अन्न टाळा: अशा अन्नाचे सेवन टाळा, ज्यामुळे शरीरातील उष्णता वाढू शकते.
    • लहान मुले आणि पाळीव प्राणी वाहनात ठेवू नका: बंद असलेल्या आणि पार्क केलेल्या वाहनात लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना सोडू नका, ज्यामुळे त्यांना उष्माघाताचा धोका आहे.
    • गडद आणि जाड कपडे घालू नका: गडद, घट्ट आणि जाड कपडे परिधान करण्याचे टाळा, ज्यामुळे शरीरातील उष्णता वाढते.
    • अनवाणी चालू नका: चप्पल न घालता अनवाणी उन्हात चालण्याचे टाळा, ज्यामुळे पायांना इजा होऊ शकते.
  • Chandrapur police news | चंद्रपूर जिल्हा पोलीस दलात फेरबदल करा – आमदार किशोर जोरगेवार यांची विधानसभेत मागणी

    chandrapur police news

    chandrapur police news : चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी उठल्यानंतर गुन्हेगारीने अक्षरशः कहर केला आहे. ड्रग्स, क्रिकेट सट्टा आणि संघटित गुन्हेगारीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. 7 मार्च रोजी चंद्रपूर शहरात एका बारमध्ये झालेल्या भांडणात पोलीस कर्मचारी दिलीप चव्हाण यांची हत्या झाली, तर समीर चाफले गंभीर जखमी झाले. या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. त्यानंतर घुग्गुसमध्येही अशीच घटना घडली.

    कांग्रेस नेते राजू रेड्डी यांच्या घरावर गोळीबार, पोलिसांनी केला खुलासा

    या पार्श्वभूमीवर, आमदार किशोर जोरगेवार (mla kishor jorgewar) यांनी विधानसभेत चंद्रपूर जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित केला. जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस दलात तातडीने फेरबदल करण्याची मागणी त्यांनी केली.

    • गुन्हेगारीत वाढ
    • दारूबंदी उठल्यानंतर जिल्ह्यात संघटित गुन्हेगारी वाढली आहे.
    • ड्रग्स आणि क्रिकेट सट्ट्याचे प्रमाण वाढले आहे.
    • 2024 मध्ये हत्या आणि गोळीबाराच्या घटनांनी जिल्हा हादरला आहे.
    • पोलीस दलात प्रामाणिक आणि तडफदार अधिकाऱ्यांची कमतरता जाणवत आहे.
    • पोलीस अधिकारी चांगल्या पोलीस ठाण्यांसाठी लॉबिंग करतात, पण गुन्हेगारी नियंत्रणासाठी प्रयत्न करत नाहीत.
    • काही पोलीस कर्मचाऱ्यांची मुलेही गुन्हेगारीत गुंतलेली आहेत.
    • आमदार जोरगेवार यांच्या मागण्या
    • चंद्रपूर जिल्हा पोलीस दलात तातडीने फेरबदल करावा.
    • गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी.
    • स्थानिक गुन्हे शाखेत नुकताच बदल झाला, पण जिल्हा स्तरावरही बदल आवश्यक आहे.
    • जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी.
  • Raju Reddy Congress Leader News । घुग्गुसमध्ये गोळीबाराची घटना खोटी? पोलिसांचा मोठा खुलासा

    Raju Reddy Congress Leader News

    Raju Reddy Congress Leader News : चंद्रपूर: घुग्गुस येथील काँग्रेस शहराध्यक्ष राजू रेड्डी यांच्या घरी 9 मार्च 2025 रोजी गोळीबार झाल्याची अफवा पसरली होती. मात्र, पोलिसांना प्राथमिक तपासात असे कोणतेही पुरावे सापडले नसल्याचे स्पष्ट केले आहे.

    घटना कशी उलगडली?
    9 मार्च रोजी रात्री चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यानंतर भारताच्या विजयाचा जल्लोष सुरू असतानाच, घुग्गुसमध्ये राजू रेड्डी यांच्या घरी गोळीबार झाला अशी बातमी पसरली. माहिती मिळताच पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव, आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे घटनास्थळी दाखल झाले होते. ghuggus shooting incident

    2 किलोमीटर वर पोलीस स्टेशन तरीसुद्धा वाळू तस्करी जोमात

    गोळीबाराच्या अफवेचा पर्दाफाश
    पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता, पहिल्या मजल्यावर किरायाने राहणाऱ्या अनुपसिंग चंदेल यांच्या पोर्चमध्ये रिकाम्या काडतुसाचा केस आढळून आला. मात्र, सीसीटीव्ही फुटेज किंवा इतर कोणत्याही पुराव्यांमध्ये गोळीबार झाल्याचे संकेत आढळले नाहीत. gunfire news in maharashtra

    पोलिसांचा पुढील तपास सुरू
    भारतीय हत्यार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी, रिकामा काडतुस केस तिथं कसा आला? याचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे. पोलीस अधिक्षकांनी जनतेला गोळीबारासंदर्भात अफवा न पसरवण्याचे आवाहन केले आहे.

  • MHT CET free mock test । NEET व MHT-CET परीक्षेपूर्वीच्या तयारीची खात्री करा – युवासेनेच्या मोफत टेस्टमध्ये सहभागी व्हा

    MHT CET free mock test

    MHT CET free mock test : शिवसेना युवासेना दरवर्षी महाराष्ट्रभर आरोग्य, रोजगार आणि शैक्षणिक क्षेत्रात महत्वपूर्ण उपक्रम राबवत असते. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि त्यांना उच्च शिक्षणाच्या दिशेने मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने, यावर्षी एक महत्वपूर्ण उपक्रम राबवला जात आहे.

    शंभूराजेंचा अवमान, चिमूर शहरात तणाव

    राज्यातील वैद्यकीय, अभियांत्रिकी, फार्मसी तसेच विधी महाविद्यालयात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी NEET आणि MHT-CET सराव परीक्षा (Mock Test) मोफत आयोजित केली जात आहे. या सराव परीक्षेमुळे विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वी स्वतःच्या तयारीचा आढावा घेण्याची संधी मिळेल तसेच परीक्षेतील अडचणी समजून त्यावर मात करता येईल. NEET mock test free

    yuva sena chandrapur
    मार्गदर्शन करताना युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे

    सराव परीक्षेचे महत्व आणि उद्दिष्टे:

    1. वास्तविक परीक्षेचा अनुभव: विद्यार्थ्यांना परीक्षेच्या स्वरूपाची कल्पना येईल, ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढेल.
    2. वेळ व्यवस्थापन कौशल्य: विद्यार्थ्यांना ठराविक वेळेत प्रश्न सोडवण्याची सवय लागेल, जे अंतिम परीक्षेत उपयुक्त ठरेल.
    3. स्वतःच्या तयारीचा आढावा: या सराव परीक्षेमुळे विद्यार्थ्यांना आपली बलस्थाने आणि दुर्बलता ओळखता येतील.
    4. स्पर्धात्मक परीक्षेची मानसिक तयारी: परीक्षेचा तणाव कसा हाताळावा याचे मार्गदर्शन मिळेल.
    5. शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी संधी: महाराष्ट्रातील ग्रामीण तसेच शहरी भागातील विद्यार्थ्यांना हा उपक्रम मोठ्या प्रमाणात फायदेशीर ठरेल. NEET mock test online free

    परीक्षा कोणांसाठी आहे?

    • १२ वी विज्ञान शाखेतील विद्यार्थी
    • NEET आणि MHT-CET परीक्षेसाठी तयारी करणारे विद्यार्थी
    • वैद्यकीय, अभियांत्रिकी, फार्मसी आणि विधी महाविद्यालयात प्रवेश घेऊ इच्छिणारे विद्यार्थी

    विद्यार्थ्यांसाठी संधी – मोफत सराव परीक्षा

    शिवसेना युवासेनेच्या माध्यमातून आयोजित या मोफत Mock Test मध्ये विद्यार्थ्यांना परीक्षेच्या संपूर्ण स्वरूपाचा अनुभव घेता येणार आहे. परीक्षेतील प्रश्नांचा दर्जा, गुणांकन पद्धती आणि निकालानुसार मिळणारे परामर्श हे सर्व घटक विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासाची योग्य दिशा ठरविण्यास मदत करतील. MHT CET mock test with solution

    पालक आणि शिक्षक यांच्यासाठी आवाहन

    विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे सर्व पालक, शिक्षक आणि मार्गदर्शकांनी या परीक्षेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे. तुमच्या जवळच्या विद्यार्थ्यांना ह्या परीक्षेची माहिती द्या आणि त्यांच्या भविष्यासाठी मोलाची साथ द्या.

    तुम्हाला काय करायचे आहे?

    • १२ वी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना ह्या परीक्षेबद्दल माहिती द्या.
    • इच्छुक विद्यार्थ्यांनी वेळेत नोंदणी करून परीक्षा द्यावी.
    • जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ही संधी उपलब्ध करून द्या.
    yuva sena maharashtra

    शिवसेना युवासेनेच्या या उपक्रमामुळे राज्यातील अनेक विद्यार्थी परीक्षेच्या दडपणाशिवाय योग्य तयारी करू शकतील. NEET आणि MHT-CET Mock Test हे त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी एक महत्वाचे पाऊल ठरेल. सदर आयोजन यशस्वीरीत्या पार पडावे व अधिकाधिक विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा यासाठी युवासेना चंद्रपूर जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे, विभागीय सचिव निलेश बेलखेडे, शहर प्रमुख शहाबाज शेख यांनी चंद्रपूर, राजुरा व बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात बैठक घेत कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे निर्देशित केले आहे.

    सदरील आयोजन युवासेना विभागीय सचिव निलेश बेलखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येत आहे, मागील वर्षी सुद्धा मॉक टेस्ट चा हजारो विद्यार्थ्यांनी लाभ घेतला होता. नोंदणी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी https://yuvasenacet.com या संकेतस्थळाला भेट द्यावी.

  • CSTPS workers police verification rule । वारंवार पोलिस व्हेरिफिकेशनचा त्रास संपणार, आमदार जोरगेवार यांची मध्यस्ती यशस्वी

    CSTPS workers police verification rule

    CSTPS workers police verification rule : चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रातील कामगारांसाठी दर सहा महिन्यांनी पोलिस व्हेरिफिकेशन जमा करण्याची अट घालण्यात आली होती. मात्र, ही अट अन्यायकारक असल्याचे स्पष्ट करत आमदार किशोर जोरगेवार यांनी महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या अधिकाऱ्यांना तातडीने पुनर्विचार करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर येथील कामगारांना आता दोन वर्षांनी एकदाच पोलिस व्हेरिफिकेशन द्यावे लागणार आहे.


        कामगार, शेतकरी आणि स्थानिक नागरिकांच्या विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी हिराई विश्रामगृह येथे आमदार किशोर जोरगेवार यांच्या अध्यक्षतेखाली सीएसटीपीएसच्या अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीला मुख्य अभियंता विजय राठोड, उप मुख्य अभियंता श्याम राठोड, उप मुख्य अभियंता अमित बंकर, उप मुख्य अभियंता नितीन रोकडे, प्रभारी उप मुख्य अभियंता अशोक उमरे, अधीक्षक अभियंता महेश राजूरकर, कल्याण अधिकारी दिलीप वंजारी, उपमहाव्यवस्थापक (मानव संसाधन) नंदकिशोर चन्ने,  यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे माजी नगर सेवक सुभाष कासनगोट्टूवार, माजी महानगर अध्यक्ष दशरथसिंग ठाकूर, प्रकाश देवतळे, एमआयडीचे सचिव संदीप बांटीया भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष रघुविर अहिर, कामगार संघटनेचे हेरमन जोसेफ, करण नायर, अमोल शेंडे, विश्वजित शहा, छोटा नागपूर उपसरपंच ऋषभ दुपारे, कार्तिक बोरवार उपस्थिती होती. Kishor Jorgewar workers meeting Chandrapur


        सीएसटीपीएस येथील कामगारांच्या विविध मागण्यांवर या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. सीएसटीपीएस प्रशासनाकडून दर सहा महिन्यांनी पोलिस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट सादर करण्याचा नियम लागू करण्यात आला होता, त्यामुळे अनेक वर्षांपासून कामगारांना वारंवार त्रास सहन करावा लागत होता. ही अट कामगारांसाठी अडचणीची ठरत असल्याने, सदर नियम बदलण्याचे निर्देश आमदार किशोर जोरगेवार यांनी दिले. त्यामुळे आता कामगारांना दर दोन वर्षांनी एकदाच पोलिस व्हेरिफिकेशन सादर करावे लागणार आहे. याशिवाय, यापूर्वी कामगारांना एक महिन्याचे गेट पास देण्यात येत होते, मात्र आता त्याची मर्यादा वाढवून तीन महिने करण्यात आली आहे. या निर्णयामुळे कामगारांवरील अनावश्यक बोजा हलका होणार असून त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. Chandrapur power plant employment news

    वाघाच्या हल्ल्याने हादरले मूल, सलग दोन दिवस दोघांचा बळी



    या बैठकीत तिरुपती कन्स्ट्रक्शन कंपनी आणि अमोल बाबा कन्स्ट्रक्शन कंपनीच्या युनिट ८ व ९ बेल्ट ऑपरेटर यांना १९ टक्के वेतनवाढ अद्याप मिळाली नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे दि. १८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत थकीत वेतन भागविण्याच्या सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी दिल्या. तसेच नवीन टेंडर लागू झाल्यानंतरही वेतनवाढ लागू न झाल्याने जानेवारी महिन्यापासून वाढीव वेतन देण्याची मागणी कामगारांनी केली होती. यावरही बैठकीत सविस्तर चर्चा झाली.
    कुणाल एंटरप्रायझेसच्या कर्मचाऱ्यांना वेतन न मिळणे, फक्त ५०% वेतन देणे आणि पीएफ संदर्भातील तक्रारी यासारख्या गंभीर विषयांवरही या बैठकीत चर्चा झाली. CSTPS environmental issues and solutions

    या प्रकरणाची चौकशी करून तातडीने योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या. युनिट ८ आणि ९ मधील बेल्ट ऑपरेटर व बंकर ऑपरेटर यांना त्यांच्या कौशल्यानुसार वेतन मिळावे, यासाठी आवश्यक ती पावले उचलण्याचेही या बैठकीत ठरविण्यात आले.


    द्वारका लेआउट आणि राऊत लेआउटमधील पावसाळी पाणी तुंबण्याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सिमेंट काँक्रीट आणि आरसीसी बॉक्स बांधणीच्या प्रस्तावावर विचार झाला. तसेच सीएसटीपीएसमधून वाहणाऱ्या नाल्यांची पावसाळ्यापूर्वी स्वच्छता व खोलीकरण करण्याच्या सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
    पर्यावरणीय दृष्टिकोनातून प्रदूषण नियंत्रण, कार्बन उत्सर्जन कमी करणे, फ्लाय ऍश व्यवस्थापन आणि स्थानिक भागात राख पडल्यामुळे होणारे आरोग्य व शेतीवरील परिणाम यावर उपाययोजना करण्याचे निर्देश आमदार किशोर जोरगेवार यांनी दिले. स्थानिक विकास आणि रोजगाराच्या अनुषंगाने, सध्या कार्यरत असलेल्या कामगारांपैकी स्थानिक व बाहेरून आलेल्यांचे प्रमाण स्पष्ट करण्यासाठी माहिती संकलित करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच कौशल्य विकास कार्यक्रम प्रभावीपणे राबवण्यावर भर देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. Chandrapur power plant employment news


    ही बैठक कामगार हक्क, पर्यावरण संरक्षण आणि स्थानिक विकास यांसाठी महत्त्वाची ठरली असून, बैठकीत घेतलेल्या निर्णयांची तातडीने अंमलबजावणी करण्यात येईल, असे सीएसटीपीएसच्या अधिकाऱ्यांच्या वतीने सांगण्यात आले आहे. या बैठकीला सीएसटीपीएसमधील कामगार, शेतकरी बांधव आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.ही बैठक कामगार हक्क, पर्यावरण संरक्षण आणि स्थानिक विकास यासाठी महत्त्वाची ठरली असून, बैठकीत घेतलेल्या निर्णयांची तातडीने अंमलबजावणी करण्यात येईल, असे सीएसटीपीएसच्या अधिकाऱ्यांच्या वतीने सांगण्यात आले आहे. या बैठकीला सीएसटीपीएसमधील कामगार, शेतकरी बांधव आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • Chandrapur police murder । चंद्रपुरात पोलिसांसमोर पोलिसाची हत्या, थक्क करणारं कारण आलं समोर

    Chandrapur police murder

    Chandrapur police murder चंद्रपूर ८ मार्च (News३४) : 2 लहानपणाचे पोलीस मित्र बिअर पिण्याचा बेत आखतात मात्र काही वेळातच या मित्रांपैकी एकाचा निर्घृण खून होतो. ही हादरवणारी घटना चंद्रपूर शहरातील पठाणपुरा जवळील पिंक पॅराडाईज बार जवळ 7 मार्चला घडली.

    मृतक पोलीस कर्मचारी दिलीप चव्हाण मोटर परिवहन विभागात कार्यरत होता, तर राजुरा पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत संदीप चाफले हे या हल्ल्यात गंभीर जखमी झाले.

    37 वर्षीय पोलीस कर्मचारी संदीप चाफले हे 26 फेब्रुवारी पासून वैद्यकीय कारणापासून रजेवर होते, त्यांचं घर हे चंद्रपुरातील पठाणपुरा जवळ आहे.
    26 फेब्रुवारी पासून समीर चाफले आपल्या घरी चंद्रपुरात राहत होते, दिलीप चव्हाण सोबत ते रोज भेटत होते.
    7 मार्च दिलीप व समीर नेहमीप्रमाणे भेटले, मात्र हा दिवस मैत्रीचा शेवट होता असे दोघांनाही वाटले नव्हते.
    आज आपण बिअर प्यायची असा बेत दोघांनी आखला. आणि पठाणपुरा येथील पिंक पॅराडाईज बार मध्ये दोघे बिअर पिण्यासाठी गेले. Police officer killed in Chandrapur

    चंद्रपूर हादरलं, बार समोर खुनी तांडव


    बार मध्ये समीर च्या लहान भावाचे मित्र भेटले होते, हाय हॅलो केल्यानंतर नितेश जाधव (समीर च्या लहान भावाचा मित्र) याचे बारच्या काउंटरवर ड्रिंक च्या पैश्याबाबत बोलणे सुरू होते.
    त्यावेळी नितेश ला समीर ने कशाला हुज्जत करतो पैसे देऊन टाक असे म्हणाला मात्र नितेशचा मित्र अक्षय शिर्के हा समीर ला शिवीगाळ करू लागला. तू बार चा मॅनेजर आहे काय? असे म्हणत समीर ला अश्लील भाषेत आई-बहिणीवरून शिविगाळी केली, शिव्या कशाला देत आहे या शब्दात दिलीप चव्हाण ने मध्यस्ती केली यावरून दिलीप व अक्षय मध्ये झटापट झाली. Dilip Chavan murder case


    वाद वाढत असताना समीर ने आपण बार च्या बाहेर बोलू असे सांगितले, व नितेश, समीर, दिलीप व अक्षय हे बाहेर आले, त्या दरम्यान अक्षय ने आपल्या मित्राला कॉल करीत सामान घेऊन ये असा बोलला.
    नितेश, समीर व दिलीप हे तिघे बोलत असताना अक्षय ने गल्लीत या असा दम दिला.
    त्यावेळी अनोळखी युवकाने अक्षयला धारदार हत्यार दिले, काही समजायच्या आत अक्षय ने दिलीप व समीर वर सपासप वार केले. Crime in Chandrapur city


    दिलीप च्या हातावर, छातीवर व पाठीवर व समीर च्या हातावर वार केला, अचानक घडलेल्या या घटनेमुळे समीर ने दिलीप ला उचलत बाजूला केले, नागरिक व समीरच्या पत्नीने दोघांना दुचाकीवर जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी दिलीप ला मृत घोषित केले.
    शहरात पोलीस कर्मचाऱ्याची हत्या झाली ही बाब वाऱ्यासारखी पसरली, पोलीस अधीक्षक घटनास्थळी दाखल झाले, पोलिसांनी या प्रकरणात अक्षय शिर्के, नितेश जाधव व यश समुद या तिघांना अटक केली.

  • Vinay Gowda GC initiatives । “जिल्हाधिकारी विनय गौडा यांचा आश्रमशाळांना दौरा, विद्यार्थी आणि गावकऱ्यांशी संवाद”

    Vinay Gowda GC initiatives

    Vinay Gowda GC initiatives :  राज्य शासनाच्या सात कलमी कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी बुधवारी आश्रमशाळा तसेच अंगणवाडी येथे भेट देऊन चिमुकल्यांशी संवाद साधला. यावेळी चंद्रपूरचे तहसीलदार विजय पवार, एकात्मिक आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार आदी उपस्थित होते.

    महाकाली यात्रेसाठी १ कोटींचा निधी द्या – सुधीर मुनगंटीवार

    जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी चंद्रपूर तालुक्यातील इंदपवार आदिवासी आश्रम शाळा बोर्डा येथे भेट देऊन आश्रमशाळेची पाहणी केली. तसेच विद्यार्थी व कर्मचारी यांचेशी संवाद साधला. तसेच आदिवासी आश्रम शाळा बोर्डा येथे सुरू असलेल्या नवीन बांधकाम इमारतीची पाहणी केली. विद्यार्थ्यार्थ्यांची अभ्यासाच्या प्रगतीबाबत चौकशी केली. Vinay Gowda GC initiativ

    तसेच मौजा पाहामी येथील अंधारी नदीवर सुरू असलेल्या नवीन उडान पुलाची पाहणी करून जिल्हाधिका-यांनी बांधकामाबाबत आढावा घेतला. यावेळी त्यांनी अंधारी नदीपासून दीड किलोमिटर अंतरावर असलेल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात वसलेल्या पाहामी गावात जाऊन गावातील नागरीकांची भेट घेतली. सदर भेटीदरम्यान पहामी येथील अंगणवाडी केंद्रातील सेविकेशी व शिकत असलेल्या विद्यार्थ्याशी संवाद साधून व्यवस्थेचा आढावा घेतला. District Collector school visit

    जिल्हाधिकारी प्रथमच गावात आल्याने सर्व गावकरी भारावून गेले. यावेळी कोळसा ग्रामपंचायतीचे सरपंच माधुरी वेलादी, पोलीस पाटील भिमराव सोयाम, अंगणवाडी सेविका माया सोयाम तसेच गावातील अन्य नागरीक उपस्थित होते.