Category: ताज्या बातम्या

महाराष्ट्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व ताज्या बातम्या (Latest News) आणि ब्रेकिंग अपडेट्स वाचण्यासाठी रोज भेट द्या news34.in वर. राजकारण, समाजकारण, क्रीडा, गुन्हेगारी आणि आर्थिक घडामोडींचे त्वरित आणि विश्वसनीय कव्हरेज येथे उपलब्ध आहे. २४ तास सुरू असलेल्या घडामोडींची अचूक माहिती मिळवा, जेणेकरून कोणतीही मोठी बातमी तुमच्यापासून सुटणार नाही.

  • PM Internship Scheme 2025 । टॉप 500 कंपन्यांमध्ये इंटर्नशिप! 31 मार्चपर्यंत नोंदणी करा, भविष्य घडवा!

    PM Internship Scheme 2025

    PM Internship Scheme 2025 : पंतप्रधान रोजगार आणि कौशल्य विकास पॅकेज अंतर्गत पंतप्रधान इंटर्नशिप योजना केंद्रीय अर्थसंकल्पात जाहीर केली आहे. या योजनेची उमेदवारांनी नोंदणी करण्याचा कालावधी 31 मार्च 2025 पर्यंत आहे. नोंदणीसाठी pminternship.mca.gov.in.  या वेबपोर्टलवर उमेदवारांनी नोंदणी करावी. या योजनेअंतर्गत देशातील टॉप 500 कंपन्यामध्ये इंटर्नशिपची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

    कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय अंतर्गत पाच वर्षात एक कोटी तरुणांना रोजगारक्षम बनविण्यासाठी इंटर्नशिपची संधी उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. प्रत्येक इंटर्नसाठी वार्षिक 66 हजार रुपये देण्यात येणार आहे. दरमहा 5हजार रुपये आर्थिक सहाय्य दिले जाणार असून कंपनी त्यांच्या सीएसआर निधीतून 500 रुपये व केंद्र सरकार 4500 रुपये देणार आहे. नियुक्तीच्या वेळी उमेदवारांना एकरकमी 6 हजार रुपये अनुदान दिले जाईल. Prime Minister Internship India

    चंद्रपुरात भव्य रोजगार मेळावा, ९०० च्या वर नोकऱ्या उपलब्ध

    भारत सरकार प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत या शिक्षणार्थीसाठी विमा कवच देखील दिले जाणार आहे. ज्या उमेदवारांचे वय 21  ते 24 वर्ष असून कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी, पुर्णवेळ शिक्षण किंवा रोजगार नसलेले बेरोजगार तरुणांसाठी ही संधी आहे.

    चंद्रपूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त उमेदवारांनी सदर योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त भैयाजी येरमे यांनी केले आहे.

  • Chandrapur CDCC bank SIT inquiry । चंद्रपूर जिल्हा बँकेत ‘एसआयटी’ चौकशी! भ्रष्टाचाराची पाळेमुळे खणून काढणार

    Chandrapur CDCC bank SIT inquiry

    Chandrapur CDCC bank SIT inquiry : चंद्रपूर २५ मार्च (News३४) – चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेतील भ्रष्टाचाराची एसआयटी चौकशी करण्यात येणार आहे. सोमवारी (२५ मार्च) विधासभेत राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या लक्षवेधीवर गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी माहिती दिली.

    लक्षवेधीच्या माध्यमातून आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेतील भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित केला. यापूर्वी सदर भ्रष्टाचार प्रकरणाबाबत आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीसोबत राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेतली होती. bank employee recruitment scams

    चंद्रपूर जिल्ह्यातील क्रिकेट बुकींची पळवाट, धंदा मात्र कायम

    लक्षवेधी मांडताना आज आमदार श्री. मुनगंटीवार म्हणाले, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत भ्रष्टाचार इतक्या मोठ्या प्रमाणात वाढला आहे की त्याची कल्पनाही न केलेली बरी. ग्राहकांच्या खात्यातून पैसे गायब होतात. नोकरभरतीमध्ये पैसे खाल्ले जातात. आरक्षण हद्दपार केले जाते. तरीही कारवाई होत नाही. customer account hacking recovery

    १७ मार्च २०२५ ला सुप्रीम कोर्टानेने जो निकाल दिला, त्यानुसार ज्या खातेधारकांची चूक नसताना पैसे काढले जात असतील तर त्यावेळी बॅंकेने त्वरीत त्यांचे पैसे भरून द्यायचे असतात. यामध्ये पैसे खाता आले नाही, म्हणून फायर वॉल करण्यात आली नाही. सर्वस्वी चूक ही बॅंकेचे भ्रष्ट अधिकारी, कर्मचारी व संचालकांची आहे. भ्रष्टाचार किती खालपर्यंत पोहोचला आहे, याची कल्पना यावरून यावी की, यांचे रक्त जर पॅथॉलॉजीमध्ये तपासायला गेले तर रक्ताच्या थेंबातून हिमोग्लोबीन सापडणार नाही. तर फक्त भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचारच सापडेल, असे आ.सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

    मालमत्ता कराची कर चुकवेगिरी करणाऱ्यांचे नावे चंद्रपूर मनपाने केले जाहीर

    पुढे म्हणाले, आज संविधानावर आपण चर्चा करणार आहोत. संविधानाने, न्यायालयाने आणि शासनानेही सांगितले आहे की आरक्षण असले पाहिजे. पण चंद्रपूर जिल्हा बॅंकेमध्ये आरक्षण धुडकावून लावण्याचा महाप्रताप संचालक मंडळाने केला आहे. दिव्यांग, महिला, अनुसूचित जाती, अनुसूचित जमातींचे आरक्षण असले पाहिजे. पण यांपैकी कुणालाही आरक्षण दिले गेले नाही. जी नोकरभरती केली, त्यामध्ये आर्थिक व्यवहार झाला अशी माहिती मिळाली. परीक्षा केंद्रावर गोंधळ घातला. पैसे खाऊन नोकरभरती केल्यामुळे काही संघटनांनी उपोषण केले. त्यानंतरही भ्रष्ट लोकांना पाझर फुटला नाही. या प्रकरणात एसआयटीची चौकशी लावणार का, असा प्रश्न आमदार मुनगंटीवार यांनी केला. district cooperative bank corruption

    एसआयटी लावताना त्याची कार्यकक्षा ठरवली गेली पाहिजे. यामध्ये आमच्या सर्व सदस्यांसोबत चर्चा झाली पाहिजे. तेव्हा कुठे ‘दूध का दूध, पानी का पानी’, होईल.ही चौकशी लावताना मुख्यमंत्र्यांच्या परवानगीने लावा, असेही आ . मुनगंटीवार म्हणाले. customer fund transfer fraud

    गृहराज्यमंत्री म्हणाले एसआयटी लावणार
    आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रश्नांना उत्तर देताना गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर म्हणाले, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे खाते हॅक करून ३३ ग्राहकांचे ३ कोटी ७० लाख ६४ हजार रुपये एका अज्ञान व्यक्तीने हरियाणाच्या खात्यात वळते केले. यासाठी आणि नोकरभरतीत झालेल्या भ्रष्टाचारप्रकरणी एसआयटी लावण्यात येईल. आमदार मुनगंटीवार यांच्या सुचनेप्रमाणे मुख्यमंत्र्यांच्या परवानगीने ही चौकशी लावण्यात येईल.

  • Compensation laws for contract workers । कामगारांच्या कुटुंबांसाठी लढा: 50 लाखांचा कायदा होणार का?

    Compensation laws for contract workers

    Compensation laws for contract workers : मुंबई येथे सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात चंद्रपूर मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे आमदार किशोर जोरगेवार यांनी कर्तव्यावर असताना अपघातात मृत्यू झालेल्या कंत्राटी कामगारांच्या कुटुंबीयांना 50 लाख रुपयांची आर्थिक मदत मिळावी यासाठी स्वतंत्र कायदा करण्याची मागणी केली. अनेक वेळा अपघातामुळे कुटुंबाचा एकमेव कमावता सदस्य गमावल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर आर्थिक संकट येते. अशा परिस्थितीत मोठ्या संघर्षानंतरच त्यांना योग्य मदत मिळते. त्यामुळे या संदर्भात कायदेशीर तरतूद असणे अत्यंत आवश्यक असल्याचे यावेळी बोलतांना आमदार जोरगेवार यांनी म्हटले आहे. Worker safety laws in India

    चंद्रपूर शहरातील धुळीने व्यापारी झाले त्रस्त

    मुंबई येथे सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात चंद्रपूर मतदारसंघाचे आमदार किशोर जोरगेवार यांनी मतदारसंघातील विविध विषयांकडे  सभागृहाचे लक्ष वेधले. अधिवेशनाच्या प्रत्येक सत्रात आमदार किशोर जोरगेवार यांनी लक्षवेधी सूचना, प्रश्नोत्तर, पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन, औचित्याचा मुद्दा अशा विविध संसदीय आयुधांचा प्रभावी वापर करत मतदारसंघातील प्रश्न मांडले आहे. Contract worker death benefits

    प्रश्नोत्तराच्या तासात आमदार किशोर जोरगेवार यांनी कामगारांचा विषय सभागृहात मांडत कर्तव्यावर असताना अपघातात जीव गमावलेल्या कंत्राटी कामगारांच्या आर्थिक मदतीचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी कामगार मंत्री आकाश पुंडकर यांना विचारणा करताना सांगितले की, त्यांच्या दिलेल्या पहिल्या उत्तरात 49 हजार आणि 50 हजार रुपये तर दुसऱ्या उत्तरात 12 लाख आणि 7 लाख रुपयांची मदत केल्याचे सांगितले आहे. या मदतीत तफावत का असा प्रश्न आमदार किशोर जोरगेवार यांनी उपस्थित केला.

    एका कामगाराला न्याय मिळवून देण्यासाठी लोकप्रतिनिधींना अनेकदा रस्त्यावर उतरावे लागते, आंदोलन करावे लागते. त्यानंतरच संबंधित कंपनी व्यवस्थापन आर्थिक मदतीसाठी पुढाकार घेते. ही परिस्थिती बदलण्यासाठी आणि कोणत्याही मृत कामगाराच्या कुटुंबाला आर्थिक असुरक्षिततेचा सामना करावा लागू नये यासाठी आवश्यक कायदा करणे गरजेचे आहे, असे यावेळी आमदार जोरगेवार यांनी सांगितले. On-duty death compensation policy

    याआधी लोकप्रतिनिधींनी एकत्रितपणे लढा देत सिद्धपल्ली येथील एका कामगाराच्या कुटुंबाला 70 लाख, तर रॉयल मेटल येथील मृत कामगाराच्या कुटुंबाला 50 लाख रुपयांची मदत मिळवून दिली होती. परंतु, प्रत्येक वेळी मृत कामगारांच्या कुटुंबीयांना मदत मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो, ही बाब दुर्दैवी असल्याचे आमदार जोरगेवार म्हणाले. जर हा कायदा अस्तित्वात आला, तर कोणत्याही कुटुंबाला मदतीसाठी संघर्ष करावा लागणार नाही आणि त्यांना आपसूकच आवश्यक आर्थिक मदत मिळेल, असेही त्यांनी यावेळी सभागृहात बोलताना स्पष्ट केले.कामगार हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. कोणत्याही उद्योग, व्यवसाय आणि देशाच्या प्रगतीसाठी कामगारांचा मोठा वाटा असतो. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेची आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या भविष्यासाठी सरकारने गांभीर्याने विचार करून हा कायदा करावा, अशी आग्रही मागणी आमदार जोरगेवार यांनी कामगार मंत्री आकाश पुंडकर यांच्याकडे अधिवेशनात बोलतांना केली आहे.

  • Chandrapur industrial fire | चंद्रपूरच्या एमआयडीसी परिसरातील लकी पेट्रोलियम कारखान्यात भीषण आग

    Chandrapur industrial fire

    Chandrapur industrial fire : चंद्रपूर: शहरालगत असलेल्या एमआयडीसी परिसरात आज (सोमवार) दुपारी १२ वाजता लकी पेट्रोलियम या तेल शुद्धीकरण करणाऱ्या कारखान्यात भीषण आग लागल्याची घटना घडली. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी या दुर्घटनेत कारखान्यातील संपूर्ण तेलसाठा आणि उपकरणे जळून खाक झाली आहेत. Lucky Petroleum fire incident

    चांगल्या कामासाठी सुधीर मुनगंटीवार नेहमी पुढेच – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    ज्वलनशील साठ्यामुळे आगीने घेतले रौद्र रूप
    लकी पेट्रोलियम कारखान्यात मोठ्या प्रमाणात ज्वलनशील पदार्थ साठवलेले असल्याने आगीने काही क्षणांतच भयानक रूप धारण केले. परिसरात धुराचे प्रचंड लोट पसरले होते, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आणि अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. Industrial fire accident

    सुदैवाने जीवितहानी टळली
    या आगीत मोठे आर्थिक नुकसान झाले असले तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, आगीचे नेमके कारण काय होते याचा तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे. या दुर्घटनेमुळे एमआयडीसी परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

    स्थानिक प्रशासन आणि अग्निशामक दलाच्या तातडीच्या कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला. मात्र, अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी औद्योगिक सुरक्षेच्या दृष्टीने अधिक कडक उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.

  • Eknath Shinde Gayatri Pariwar | सुधीर मुनगंटीवार चांगल्या कामात नेहमीच पुढे – उपमुख्यमंत्री शिंदे

    Eknath Shinde Gayatri Pariwar

    Eknath Shinde Gayatri Pariwar : चंद्रपूर – गायत्री परिवारातर्फे आज प्रज्वलित करण्यात आलेल्या दिव्यांच्या उजेडाने आपल्या आयुष्यातील अंधःकार निश्चितच नाहीसा होईल, असा मला विश्वास आहे. मनामध्ये रोज होणाऱ्या राम आणि रावणाच्या युद्धात केवळ रामच विजयी झाला पाहिजे ही गायत्री परिवाराची शिकवण राष्ट्रनिर्माणासाठी कायमच लाभदायक ठरली आहे, असे प्रतिपादन राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

    मुंबई येथील मुलूंडमध्ये गायत्री परिवारच्या वतीने दिव्य अखंड दीप महायज्ञ तसेच दिव्य ज्योती कलश पूजनचे आयोजन करण्यात आले. आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांची उपस्थिती होती. सोबत उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे यांचीही विशेष उपस्थिती होती. यावेळी डॉ. चिन्मय पंड्या, आमदार मिहिर कोटेचा आदिंची उपस्थिती होती. Gayatri Pariwar Mumbai Events

    बल्लारपुरात सिने स्टाईल चोरी, थेट वर्कशॉप ची भिंतच फोडली

    प्रभू रामाने रावणाशी एकदा युद्ध केले. पण आज या समाजातील प्रत्येकाच्या मनात दररोज राम आणि रावण दोघेही आहेत. त्यांच्यात रोज युद्ध होते. आज आपल्या मनातील राम आणि रावणाच्या युद्धात रामच जिंकला पाहिजे. गायत्री परिवार हेच शिकवतो, असेही आ. श्री. मुनगंटीवार म्हणाले. Sudhir Mungantiwar Speech

    आ. श्री. मुनगंटीवार म्हणाले, ‘संपूर्ण जग जिंकणाऱ्या सिकंदरने सांगितले होते की, माझा मृत्यू होईल तेव्हा कफन पेटीच्या बाहेर माझे दोन्ही हात काढा. लोकांना समजू द्या, बघू द्या की, ज्या सिकंदराने जग जिंकलं, तोही रिकाम्या हाताने जात आहे. पण ते विदेशी ज्ञान आहे. आपले ज्ञान त्यापेक्षाही व्यापक आहे. ते शिकवतं की शरीर नष्ट होणारे वस्त्र आहे. आत्मा अमर आहे. आत्मा मरत नाही, जळत नाही, कापला जात नाही. आत्मा कधी रिकाम्या हातानी येत नाही आणि रिकाम्या हाताने जातही नाही. आत्मा मागच्या जन्माचे संस्कार घेऊन येतो. पुढच्या जन्मात हेच संस्कार घेऊन जातो.’ धन शेवटच्या श्वासापर्यंत कामी येईल. पण धर्माचा संस्कार पुढच्या जन्माच्या पहिल्या श्वासापासून कामी येईल, असेही विचार आमदार श्री. मुनगंटीवार यांनी मांडले.

    मनाच्या समाधानासाठी रामराज्य
    शाळेत शिकत असताना शिक्षक सांगायचे की, रामराज्य आले पाहिजे. महात्मा गांधीजीही सांगायचे की, रामराज्य आले पाहिजे. तेव्हा मला प्रश्न पडला की, पिझा हट, आजच विज्ञान, संगणक हा झगमगाट तर तेव्हा नव्हता. मग कशाला हवे रामराज्य? हाच प्रश्न मी शिक्षकांना विचारला की रामराज्य कशाला? तेव्हा शिक्षक म्हणाले, झगमगाट हा वरवरच्या समाधानासाठी आहे. पण मनाच्या समाधानासाठी रामराज्यच आवश्यक आहे, असेही आ. श्री. मुनगंटीवार म्हणाले. Ram Rajya Mental Peace

    चांगल्या कामात सुधीरभाऊ कायम पुढे – उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे
    छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रातील गडकिल्ले, मंदिरांच्या संवर्धनात आमचे सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी मोठे काम केले आहे. मागच्या वर्षीही नवी मुंबईत अश्वमेध यज्ञाचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये सरकारच्यावतीने आम्हीही योगदान दिले. सुधीरभाऊंनी तेव्हाही हिरीरीने सहभाग घेतला आणि भव्यदिव्य अश्वमेध यज्ञ आयोजित केला. त्याचे कर्ताधर्ता आमचे सुधीरभाऊ होते. चांगल्या कामांत ते नेहमी पुढे असतात, या शब्दांत श्री. एकनाथजी शिंदे यांनी आ. श्री. मुनगंटीवार यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले.

  • University PhD viva process | गोंडवाना विद्यापीठात Ph. D. अधिसूचना आता Viva-Voce च्या दिवशीच

    University PhD viva process

    सिनेट सदस्य प्रा. निलेश बेलखेडे यांच्या प्रयत्नांना यश

    University PhD viva process : गोंडवाना विद्यापीठाच्या संशोधक विद्यार्थ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. आता Ph. D. पदवी प्रदान करण्याची अधिसूचना (Notification) थेट Viva-Voce च्या दिवशीच प्रकाशित केली जाणार आहे. यामुळे संशोधन विद्यार्थ्यांना त्वरित प्रमाणपत्र मिळेल आणि ते सरकारी व खाजगी नोकरी भरती प्रक्रियेत त्वरित पात्र ठरू शकतील. PhD certificate verification

    घुग्गुस शहरात शालेय विद्यार्थिनीसमोर विकृती

    पूर्वी, गोंडवाना विद्यापीठात Ph. D. Viva-Voce झाल्यानंतर साधारणतः 15 दिवस ते एक महिना अधिसूचना जाहीर करण्यात विलंब होत असे. त्यामुळे या कालावधीत जर सहाय्यक प्राध्यापक पदासाठी भरती निघाली, तर संबंधित विद्यार्थी पात्र ठरत नव्हता आणि त्याला संधी गमवावी लागत होती.

    या समस्येची दखल घेत, गोंडवाना विद्यापीठ सिनेट सदस्य तथा युवासेना विभागीय सचिव प्रा. निलेश बेलखेडे यांनी ही प्रक्रिया गतिमान करण्याचा ठराव मागील अधिसभेत मांडला. सिनेट सदस्य डॉ. प्रवीण जोगी यांच्या मार्गदर्शनाखाली हा ठराव मांडण्यात आला आणि तो सभागृहाने मंजूर केला. यामुळे आता Viva-Voce पार पडल्यानंतर लगेचच विद्यापीठ अधिसूचना प्रसिद्ध करेल आणि विद्यार्थ्यांना लगेच त्याचा लाभ मिळेल.

    Ph. D. करणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांसाठी हा मोठा दिलासा आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयासाठी प्रा. निलेश बेलखेडे आणि डॉ. प्रवीण जोगी यांचे विद्यार्थी व प्राध्यापक वर्गाकडून मनःपूर्वक अभिनंदन व आभार मानले जात आहेत.

  • Lok Adalat Case Resolution India । “लोक अदालतीने बदलले आयुष्य: एका दिवसात १३४० प्रकरणांचा निकाल!”

    Lok Adalat Case Resolution India

    Lok Adalat Case Resolution India : विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार तसेच प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा अभीश्री देव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अध्यक्षतेखाली 22 मार्च रोजी चंद्रपूर जिल्हा न्यायालय व सर्व तालुक्यातील न्यायालयामध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते.

    ६० वर्षाचा घरफोड्या अखेर चंद्रपूर पोलिसांच्या ताब्यात

    सदर लोक अदालतीमध्ये प्रलंबीत न्यायालयीन प्रकरणे एकुण 9447  व दाखलपुर्व प्रकरणे 15842 ठेवण्यात आली होती. त्यापैकी प्रलंबीत न्यायालयीन प्रकरणांपैकी 774 प्रकरणे तर दाखलपुर्व प्रकरणांपैकी 366 अशी एकूण 1340 प्रकरणे निकाली काढण्यात आली. प्रलंबीत प्रकरणांमध्ये मोटार वाहन अपघात नुकसान भरपाई प्रकरणे 25 निकाली काढण्यात आली असुन नुकसान भरपाई रक्कम 2 कोटी 19 लाख 55 हजार रूपये वसुल करण्यात आली. Chandrapur District Court News

    निकाली प्रकरणांपैकी एका प्रकरणात 45 लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात आली. तसेच भुसंपादनाची एकुण 6 प्रकरणे निकाली काढण्यात आली. यात नुकसान भरपाईची रक्कम 42 लाख 17 हजार रूपये मंजुर करण्यात आले. धनादेश प्रकरणांपैकी 125 प्रकरणे निकाली काढण्यात आली. कामगार व औद्योगीक न्यायालयातील एकुण 3 प्रकरणे निकाली काढण्यात आली. Benefits of Lok Adalat

    chandrapur district Court news

    चंद्रपूर जिल्हयातील सर्व न्यायालयात लोक अदालत यशस्वी होण्यासाठी सर्व न्यायाधीश, सर्व वकील, सर्व न्यायालयीन कर्मचारी, पोलीस कर्मचारी यांनी सहकार्य केले, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव सुमित जोशी यांनी दिली.

  • Maharashtra state lottery revenue । केरळच्या धर्तीवर महाराष्ट्रातही लॉटरी? सुधीर मुनगंटीवार यांची महत्त्वपूर्ण सूचना

    Maharashtra state lottery revenue

    महाराष्ट्राच्या अर्थवाढीसाठी केरळ मॉडेल! सुधीर मुनगंटीवार यांचा मोठा प्रस्ताव!


    Maharashtra state lottery revenue : केरळच्या धर्तीवर महाराष्ट्राला देखील लॉटरीच्या माध्यमातून उत्पन्न वाढविता येऊ शकते, यासंदर्भात राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री श्री. अजित पवार यांचे विधानसभेत लक्ष वेधले. श्री. अजित पवार यांनी या सूचनेचे स्वागत केले, तसेच केरळच्या लॉटरीचा अभ्यास करण्यासाठी नेमण्यात येणाऱ्या समितीचे अध्यक्ष आ. श्री. सुधीर मुनगंटीवार असतील, असे सभागृहात घोषित देखील केले. state lottery revenue generation

    युवकाच्या हत्येनं हादरलं चंद्रपूर

    आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी फर्निचर क्लस्टरसाठी ७५ कोटी रुपयांचा निधी आवश्यक असल्याचा मुद्दा सभागृहात अनुदानावरील चर्चेदरम्यान मांडला होता. त्यावर निधीबाबत असमर्थता दर्शविण्यात आली. त्यामुळे आ. श्री. मुनगंटीवार यांनी सरकारला महाराष्ट्राचे उत्पन्न कसे वाढवता येईल, याबाबत सूचना केल्या. उत्पन्न वाढवल्यास विकास साधणारी, रोजगार देणारी कामं थांबविण्याची गरज पडणार नाही, असे आ. श्री. मुनगंटीवार म्हणाले. त्याचवेळी त्यांनी केरळच्या धर्तीवर लॉटरीतून उत्पन्न वाढवण्याची सूचना केली. ही सूचना अर्थमंत्री अजित पवार यांनी सकारात्मकपणे घेतली आणि त्या कमिटीचे अध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांना करणार असल्याची घोषणा केली. Kerala lottery revenue model

    जुनी पेन्शन योजना लागू होणार? आमदार अडबाले यांचा पाठपुरावा

    लॉटरीच्या माध्यमातून केरळचे २०२३-२४ चे उत्पन्न १२ हजार ५२९ कोटी आहे. केरळ पॅटर्न राबवल्याने राज्यातील उत्पन्न वाढत असेल तर नक्कीच त्या दृष्टीने विचार करायला हवा. यासाठी आमदारांची एक समिती करावी, ती केरळला पाठवावी. ही समिती केरळ लॉटरीचा अभ्यास करेल आणि त्याचा अहवाल देईल, अशी सूचनाही आ. श्री. मुनगंटीवार यांनी केली. त्यानंतर श्री. अजित पवार यांनी या संदर्भात लवकरात लवकर समिती स्थापन करण्यात येईल आणि या समितीचे अध्यक्ष आ. श्री. सुधीर मुनगंटीवार असतील, अशी घोषणा सभागृहात केली. Lottery for state revenue growth

    १२ एप्रिल १९६९ ला महाराष्ट्र राज्य लॉटरी सुरू झाली. साप्ताहिक, मासिक पद्धतीने गुढीपाडवा, गणपती यावेळी लॉटरी काढली जाते. राज्याचे सन २०२३-२४ चे एकूण उत्पन्न २४ कोटी ४३ लाख ६१ हजार आहे.  बक्षीस, जीएसटी सर्व जाऊन ३ कोटी ५१ लाख ६६ हजार १६३ रुपये राहतात. त्यामुळे या विभागाने अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. मी स्वतः जीएसटीच्या ३५ बैठकांमध्ये सदस्य होतो. त्यामुळे इतर राज्यांमधील चांगली धोरणे आपण स्वीकारायला हवीत, असेही आ. श्री. मुनगंटीवार म्हणाले. how lotteries fund state projects

    गरीब आणि मध्यमवर्गीय लोक मोठ्या प्रमाणात लॉटरी खरेदी करतात. त्यामुळे लॉटरीतून मिळालेला पैसा गरिबांच्या उत्थानासाठी खर्च करता येईल, असा विचार केरळ सरकारने केला. त्यानुसार त्यांनी अंमलबजावणीही केली, त्यामुळे आपणही यादृष्टीने अभ्यास करण्याची गरज आहे, असे आ. श्री. मुनगंटीवार म्हणाले. मी अर्थमंत्री असताना देशात ११ हजार ९७५ कोटी रेव्हेन्यू सरप्लस बजेट मी दिले. २ हजार ७२ कोटी रेव्हेन्यू सरप्लस बजेट दिले. त्यामुळे हे शक्य आहे, हे मला माहिती आहे. राज्याचे उत्पन्न वाढवण्याचे नवनवीन मार्ग शोधावे लागतील, असेही आ. श्री. मुनगंटीवार सभागृहात म्हणाले.

  • Research workshop 2025 | सरदार पटेल महाविद्यालयात पार पडली संशोधनाविषयी राष्ट्रीय स्तरावरील कार्यशाळा

    Research workshop 2025

    Research workshop 2025 : चंद्रपूर – आज आपल्या भागात प्रदूषणासह कॅन्सरसारख्या महाभयंकर आरोग्यविषयक गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. संशोधनातून त्या समस्यांची उत्तरे शोधली गेली पाहिजे. संशोधन हे समाजाभिमुख आणि मानवी मूल्यांना महत्व देणारे असावे, समाजहितासाठी संशोधन केल्यास अनेक चांगल्या गोष्टी साध्य करता येत असल्याचे प्रतिपादन गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी येथे बोलताना केले. Academic research methods

    राज्यात जुनी पेन्शन योजना लागू होणार?

    येथील सरदार पटेल महाविद्यालयाच्या ‘इन्स्टिट्यूशन ऑफ हायर लर्निंग,रिसर्च अँड स्पेशलाइज स्टडीज’ (संशोधन केंद्र) व गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्टेपिंग इनटु रिसर्च प्रिसिंक्ट : मेथॉडॉलॉजी, पब्लिकेशन अँड पेटंट्स’ या विषयावर राष्ट्रीय स्तरावरील एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन सरदार पटेल महाविद्यालयात करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या उद्घाटनाप्रसंगी आभासी पद्धतीने उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते.

    कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अरविंद सावकार पोरेड्डीवार हे होते, तर यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष सुदर्शन निमकर, ‘स्पोर्ट्स सायकॉलॉजी असोसिएशन ऑफ इंडिया’चे अध्यक्ष डॉ. अनिल करवंदे, मुंबई येथील डॉ. होमी भाभा विद्यापीठाच्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’चे प्रोफेसर डॉ. सेल्वी जोस, नागपूर येथील ‘लेक्स रेगिया एलएलपी’ कंपनीच्या सर्वेसर्वा तथा सिनियर आयपीआर अटर्नी डॉ. उशोषि गुहा, गोंडवाना विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. जयेश चक्रवर्ती, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एम. काटकर, प्राचार्य राजीव वेगिनवार व उपप्राचार्य डॉ. स्वप्नील माधमशेट्टीवार, संशोधन केंद्र समन्वयक डॉ. रक्षा पी. धनकर हे प्रामुख्याने उपस्थित होते. Research publication guidelines

    आपल्या अध्यक्षीय भाषणातून बोलताना अरविंद सावकार पोरेड्डीवार म्हणाले की, करोना काळात त्यावर मात करण्यासाठी संशोधनातून लस निघाली. त्यामुळे भारताचे नाव जगात पुढे गेले. आज गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यात बांबू मुबलक प्रमाणात आहे. पण संशोधनामुळे बांबूला जागतिक पातळीवर पोहोचता आले आहे. आज बांबूपासून इथेनॉल बनवले जात असून आसाममध्ये त्याचा कारखाना प्रगतीपथावर असल्याचे सांगत समाजासाठी संशोधन करा असा सल्ला त्यांनी यावेळी दिला. PhD research methodology
    कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना प्राचार्य डॉ. पी. एम. काटकर यांनी महाविद्यालयाच्या व संशोधन केंद्राच्या वाटचालीचा यशोदायी प्रवास विशद केला.
    संचालन प्रा. शीतल बोरा, तर आभार प्रदर्शन डॉ. रक्षा पी. धनकर यांनी केले.

    कार्यशाळेच्या समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.एम.काटकर हे होते, तर यावेळी नागपूर येथील शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ. तपन दत्ता व समन्वयक डॉ. रक्षा पी.धनकर हे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी या कार्यशाळेत सहभागी विद्यार्थी, शिक्षक व अभ्यासकांनी सदर कार्यशाळा संशोधनकर्त्यांसाठी फलदायी ठरल्याचे आवर्जून नमूद केले. प्रास्ताविक डॉ. रक्षा पी.धनकर, संचालन संशोधक विद्यार्थ्यांनी रिता टेकाडे, तर आभार प्रदर्शन डॉ कविता रायपुरकर यांनी केले. या कार्यशाळेला प्राध्यापक, शिक्षक, पदव्युत्तर विद्यार्थी व संशोधकांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    तांत्रिक सत्रात तज्ञांचे मार्गदर्शन-
    मुख्य भाषणात डॉ. अनिल करवंदे म्हणाले की, संशोधन समस्यांचे उत्तर आहे. संशोधनाची नेमकी प्रक्रिया समजावून सांगत त्यांनी संशोधनात आपल्या मूळ कामाचे संरक्षण ‘कॉपीराईट’ कायद्यान्वये केले जात असल्याचे नमूद केले. तांत्रिक सत्रात तज्ज्ञ प्रोफेसर डॉ. सेल्वी जोस यांनी संशोधनाच्या विविध शास्त्रीय पाय-या स्पष्ट करून संशोधनाद्वारे कसे नवे सिद्धांत आपल्याला मांडता येतात याची माहिती देत त्यांनी संशोधकांनी आपले ज्ञान दैनंदिन ‘अपडेट’ केले पाहिजे, असे आवाहन केले.

    डॉ. उशोषि गुहा यांनी संशोधनासंदर्भात ‘क्रिएटिव्ह’चे अधिकार काय असतात आणि आपल्या कल्पना ह्या कशा आपण संरक्षित करू शकतो याकडे लक्ष वेधून त्यांनी अलीकडे वापरले जाणारे ‘पेटंट’,’ट्रेडमार्क’ व ‘कॉपीराईट’ या संदर्भात विस्तृत माहिती दिली . डॉ. तपन दत्ता यांनी संशोधनाकरिता लागणारे विविध ज्ञानाचे स्त्रोत कसे घ्यावेत, हे स्त्रोत घेताना कोणत्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे आणि संशोधकानी स्त्रोत घेतल्याची शास्त्रीय मांडणी प्रबंधात कशी करावी यावर प्रकाश टाकला. Academic research methodology

    सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अरविंद सावकार पोरेड्डीवार, कार्याध्यक्ष आ. किशोर जोरगेवार, उपाध्यक्ष सुदर्शन निमकर, सगुणा तलांडी, सचिव प्रशांत पोटदुखे, सहसचिव कीर्तीवर्धन दीक्षित, कोषाध्यक्ष संदीप गड्डमवार, सर्वोदय शिक्षण मंडळाचे कार्यकारी सदस्य राकेश पटेल, सुरेश पोटदुखे, चंद्रशेखर वाडेगावकर, जीनेश पटेल यांनी उपरोक्त उपक्रमाबद्दल शुभेच्छा दिल्यात.

  • old pension scheme for teachers in Maharashtra | शिक्षकांसाठी आनंदाची बातमी! जुनी पेन्शन योजना लवकरच लागू होणार?

    old pension scheme for teachers in Maharashtra

    old pension scheme for teachers in Maharashtra : चंद्रपूर 20 मार्च (News३४) : जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबत वित्त विभागाने दि. २ फेब्रुवारी २०२४ रोजी शासन निर्णय काढला. यावर शालेय शिक्षण विभागाने स्‍वतंत्र शासन निर्णय न काढल्याने शिक्षक – कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीची भावना असल्याने तात्काळ शालेय शिक्षण विभागाने स्‍वतंत्र शासन निर्णय काढून शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार सुधाकर अडबाले यांनी शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. old pension scheme latest news

    चंद्रपूर जिल्हा पर्यटनाच्या बाबतीत क्रांती करणार – आमदार जोरगेवार

    मुंबई येथे सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेब यांची आमदार सुधाकर अडबाले यांनी भेट घेतली. यावेळी आयुक्त (शिक्षण) सचिंद्र प्रताप सिंह उपस्थित होते.

    दि. ०१.११.२००५ पूर्वी पदभरती जाहिरात/अधिसूचना निर्गमित झालेल्‍या प्रकरणी शासन सेवेत दि. ०१.११.२००५ रोजी किंवा त्‍यानंतर रूजू झालेल्‍या शासकीय अधिकारी / कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्यात आली आहे. परंतु, जिल्हा परिषद /  खासगी अनुदानित / अंशतः अनुदानित शाळेत कार्यरत शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सदर शासन निर्णय लागू झालेला नाही. old pension scheme for government employees

    त्यामुळे वित्त विभागाने दि. २ फेब्रुवारी २०२४ रोजी काढलेल्‍या दि. ०१.११.२००५ पूर्वी पदभरती जाहिरात/अधिसूचना निर्गमित झालेल्‍या प्रकरणी शासन सेवेत दि. ०१.११.२००५ रोजी किंवा त्‍यानंतर रूजू झालेल्‍या शासकीय अधिकारी / कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबतचा शालेय शिक्षण विभागाने स्‍वतंत्र शासन निर्णय काढण्याबाबत आमदार सुधाकर अडबाले यांनी शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांना निवेदन दिले. teacher pension scheme update

    तसेच नगर परिषद भंडारा येथील बऱ्याच वर्षांपासून संच मान्यता दुरुस्ती प्रकरण व विदर्भातील ज्या संच मान्यता दुरुस्ती प्रकरणे प्रलंबित आहेत, त्या तात्काळ दुरुस्ती करण्याबाबत आमदार सुधाकर अडबाले यांनी आयुक्त (शिक्षण) सचिंद्र प्रताप सिंह यांच्याशी सकारात्मक चर्चा केली.