University PhD viva process | गोंडवाना विद्यापीठात Ph. D. अधिसूचना आता Viva-Voce च्या दिवशीच

University PhD viva process

सिनेट सदस्य प्रा. निलेश बेलखेडे यांच्या प्रयत्नांना यश

University PhD viva process : गोंडवाना विद्यापीठाच्या संशोधक विद्यार्थ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. आता Ph. D. पदवी प्रदान करण्याची अधिसूचना (Notification) थेट Viva-Voce च्या दिवशीच प्रकाशित केली जाणार आहे. यामुळे संशोधन विद्यार्थ्यांना त्वरित प्रमाणपत्र मिळेल आणि ते सरकारी व खाजगी नोकरी भरती प्रक्रियेत त्वरित पात्र ठरू शकतील. PhD certificate verification

घुग्गुस शहरात शालेय विद्यार्थिनीसमोर विकृती

पूर्वी, गोंडवाना विद्यापीठात Ph. D. Viva-Voce झाल्यानंतर साधारणतः 15 दिवस ते एक महिना अधिसूचना जाहीर करण्यात विलंब होत असे. त्यामुळे या कालावधीत जर सहाय्यक प्राध्यापक पदासाठी भरती निघाली, तर संबंधित विद्यार्थी पात्र ठरत नव्हता आणि त्याला संधी गमवावी लागत होती.

या समस्येची दखल घेत, गोंडवाना विद्यापीठ सिनेट सदस्य तथा युवासेना विभागीय सचिव प्रा. निलेश बेलखेडे यांनी ही प्रक्रिया गतिमान करण्याचा ठराव मागील अधिसभेत मांडला. सिनेट सदस्य डॉ. प्रवीण जोगी यांच्या मार्गदर्शनाखाली हा ठराव मांडण्यात आला आणि तो सभागृहाने मंजूर केला. यामुळे आता Viva-Voce पार पडल्यानंतर लगेचच विद्यापीठ अधिसूचना प्रसिद्ध करेल आणि विद्यार्थ्यांना लगेच त्याचा लाभ मिळेल.

Ph. D. करणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांसाठी हा मोठा दिलासा आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयासाठी प्रा. निलेश बेलखेडे आणि डॉ. प्रवीण जोगी यांचे विद्यार्थी व प्राध्यापक वर्गाकडून मनःपूर्वक अभिनंदन व आभार मानले जात आहेत.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *