Category: ताज्या बातम्या

महाराष्ट्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व ताज्या बातम्या (Latest News) आणि ब्रेकिंग अपडेट्स वाचण्यासाठी रोज भेट द्या news34.in वर. राजकारण, समाजकारण, क्रीडा, गुन्हेगारी आणि आर्थिक घडामोडींचे त्वरित आणि विश्वसनीय कव्हरेज येथे उपलब्ध आहे. २४ तास सुरू असलेल्या घडामोडींची अचूक माहिती मिळवा, जेणेकरून कोणतीही मोठी बातमी तुमच्यापासून सुटणार नाही.

  • Excise department corruption complaints । चंद्रपूर मद्य परवाने घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी – SIT कडून तक्रारी स्वीकारल्या जाणार!

    Excise department corruption complaints

    Excise department corruption complaints : चंद्रपूर जिल्ह्यातील मद्य परवाने मंजुर करतांना मोठ्या प्रमाणात झालेल्या गैरव्यवहार, अनियमितता व लाचखोरीच्या प्रकरणी तपास करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर पोलीस आयुक्त  संदिप दिवाण यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक (SIT) गठीत करण्यात आले आहे. Excise license scam investigation

    मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे चंद्रपुरात नवीन बसेस दाखल

     तपासाच्या अनुषंगाने 7 व 8 एप्रिल 2025 रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेत विशेष तपास पथक (SIT) अध्यक्ष  संदिप दिवाण हे तपास पथकासह चंद्रपूर विश्राम गृह येथे येत आहेत. Liquor license fraud investigation

    चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी उठविल्यानंतर (शासन अधिसूचना दिनांक 8 जून 2021 नंतर) जिल्ह्यात नुतनिकरण करून कार्यान्वीत करण्यात आलेल्या अबकारी अनुज्ञप्ती, नव्याने मंजुर करण्यात आलेल्या अबकारी अनुज्ञप्ती, नव्याने मंजुर करण्यात आलेल्या / इतर जिल्ह्यातून स्थलांतरीत होवून आलेल्या अनुज्ञप्ती (प्रकारानुसार : सीएल-3, एफएल-3, एफएलबीआर-2 इ.) या आक्षेपाबाबत आणखी काही तक्रारी असतील किंवा यातील आक्षेपाच्या अनुषंगाने काही माहिती असेल, अशा व्यक्ती / तक्रारदार हे त्यांचेकडील कागदपत्रांसह विशेष तपास पथकास (SIT) 7 व  8 एप्रिल रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेस चंद्रपूर विश्राम गृह येथे समक्ष येवून भेटु शकतात, असे निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार यांनी कळविले आहे. Chandrapur liquor permit scam

  • crushed sand for house construction । घरकुल प्रकल्पांसाठी नैसर्गिक वाळूला पर्याय – आता वापरा मजबूत आणि टिकाऊ क्रश सॅन्ड!

    crushed sand for house construction

    crushed sand for house construction : जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) व इतर घरकुलांची संख्या मोठी आहे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून गरीबांसाठी मोठया प्रमाणात घरकूले मंजूर करण्यात आली आहेत. परंतु सध्यास्थितीत वाळू उपलब्ध होण्यास अडचण असल्यामुळे वाळूला पर्याय म्हणुन क्रश सॅन्डचा वापर करणे हा उत्तम पर्याय होऊ शकतो. त्यामुळे लाभार्थ्यांनी घरकुलाच्या बांधकामाकरीता क्रश सॅन्डचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. crushed sand vs natural sand

    चंद्रपुरात एसटी बसेसचा लोकार्पण सोहळा

    ग्रामीण भागातील नागरिकांना स्वतःच्या घराचे अनन्यसाधारण महत्व आहे. त्यांचे हे स्वप्न पूर्ण करण्याकरीता जिल्हा परिषद प्रशासन पूर्ण प्रयत्नात आहे. काही वेळेस घरकूलाची कामे पूर्ण करण्यास विलंब होतो. त्यामुळे घरकुल बांधकामात येणा-या अडचणी दूर करण्याकरिता व लाभार्थ्यांच्या घराचे स्वप्न पूर्ण होण्याकरीता जिल्हा परिषदेतर्फे एकाच वेळी 30263 घरकुलाच्या भूमिपूजनाचा उपक्रम राबविण्यात आला. त्यात सर्व अधिकारी व कर्मचारी यांना सहभागी करून घेवून लाभार्थ्यांना येणा-या अडचणी समजून घेण्यात आल्या व लाभार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करण्यात आले. best sand for house construction

    क्रश सॅन्ड ही (कृत्रिम वाळू) असून हा नैसर्गिक वाळू (नदीतील वाळू) ला पर्याय म्हणून विविध बांधकामाकरिता वापरली जाते. ही खड्यांमधील कठीण खडक (बेसॉल्ट) फोडून व मशीनव्दारे बारीक पावडर तयार केली जाते. अशा वाळूचा वापर काँक्रीट मिश्रण जसे की, रेती, सिमेंट किंवा सिमेंट खडी व पाणी यांचे सोबत मिश्रण करून मजबूत काँक्रीट तयार करण्याकरीता होते. ही सॅन्ड बीम/कॉलम स्लॅब व विट जुडाई यासारख्या बांधकामाकरिता उपयुक्त आहे. प्लॉस्टरींग व विट बांधकामासाठी नैसर्गिक वाळूच्या उत्खननामुळे नदी व पर्यावरणाला होणारे नुकसान टाळण्यासाठी क्रश सॅन्ड हा पर्याय म्हणून वापरला जातो. क्रश सॅन्डची मजबूती ही नैसर्गिक वाळू पेक्षा जास्त असल्याने क्रश सॅन्ड वापरण्याबाबतचा तांत्रिकदृष्ट्या सल्ला ही देण्यात येतो. artificial sand for construction

    नैसर्गिक वाळूच्या तुलनेत क्रश सॅन्ड स्थानिक पातळीवर तयार होत असल्याने वाहतुक खर्च कमी असतो. तसेच पर्यावरणीय नुकसान कमी होते. क्रश सॅन्ड, बांधकामासाठी मजबूत, टिकाऊ व फायदेशीर पर्याय असून नैसर्गिक वाळुपेक्षा अनेक बाबतीत सरस आहे. सर्व गट विकास अधिका-यांच्या मार्फतीने सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच, पदाधिकारी तसेच घरकुल लाभार्थी यांची कार्यशाळा घेऊन क्रश सॅन्ड वापरण्याबाबत समुपदेशन करण्यात आले. त्याला घरकुल लाभार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद लाभला आहे. घरकुल लाभार्थ्यांनी वाळूऐवजी क्रश सॅन्डचा वापर करावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन व प्रकल्प संचालक गिरीष धायगुडे यांनी केले आहे.

  • OBC reservation protest India । “दिल्लीत ओबीसींचा लढा: जंतर-मंतरवर हजारोंची हुंकार!”

    OBC reservation protest India

    “मोदींना रेड्डींचा टोमणा: 10 वर्षांत ओबीसींसाठी काय केलं?”


    OBC reservation protest India : नवी दिल्ली: बीसी वेल्फेअर असोसिएशन तेलंगणा व आंध्र प्रदेश आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने 2 एप्रिल 2025 रोजी जंतर-मंतर, नवी दिल्ली येथे ओबीसी आरक्षणाच्या विविध मागण्यांसाठी विराट धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. या आंदोलनात देशभरातील हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते.

    परदेशात शिक्षण घेणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे हफ्ते रखडले

    प्रमुख मागण्या:

    • जातनिहाय जनगणना करावी.
    • केंद्रात ओबीसींचे स्वतंत्र मंत्रालय स्थापन करावे. OBC ministry formation
    • आरक्षणाची 50% मर्यादा हटवावी.
    • क्रिमिलियरची उत्पन्न मर्यादा 15 लाख रुपये करावी. creamy layer income limit
    • तेलंगणातील वाढवलेले 42 टक्के ओबीसींचे आरक्षण 9 व्या अनुसूचीमध्ये टाकावे.
    • संविधानाच्या कलम 243 डी (6) व 243 टी (6) मध्ये सुधारणा करून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींना 27 टक्के आरक्षणाचा कायदा करावा.
    • मंडल आयोग व स्वामीनाथन आयोगाच्या सर्व शिफारशी लागू कराव्यात.
    • शेतमजूर व शेतकऱ्यांना 60 वर्षानंतर पेन्शन योजना लागू करावी. farmers pension scheme India
    • महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांना संयुक्त भारतरत्न द्यावा.
    • ओबीसींसाठी लोकसभा व विधानसभा असे स्वतंत्र मतदार क्षेत्र स्थापन करावे.
    • केंद्र सरकारने वार्षिक अंदाजे बजेट तयार करताना एससी, एसटी प्रमाणे ओबीसींसाठी लोकसंख्येच्या प्रमाणात निधीची तरतूद करावी.
    • 2014 पासून केंद्रीय लोकसेवा आयोगाची प्रशासकीय सेवा परीक्षा पास करणाऱ्या परंतु नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र असताना त्याचा चुकीचा अर्थ लावून डीओपीटीने आयएएस होण्यापासून वंचित ठेवलेल्या 314 हून अधिक विद्यार्थ्यांना तात्काळ नियुक्त करावे.

    आंदोलनातील प्रमुख नेते:

    • तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी.
    • बीसी वेल्फेअरचे अध्यक्ष श्रीनिवास जाजुला.
    • राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे.
    • खासदार असोदिन ओवेसी.
    • खासदार सुप्रिया सुळे.
    • नरेंद्र पटेल, वर्षा गायकवाड, प्रतिभा धानोरकर ,श्याम कुमार बर्वे,प्रणिती शिंदे,खासदार कन्निमोडी , संसद विल्सन, संसद मनोज कुमार झा,पूर्व संसद हनुमंत आप्पा रेड्डी, कुमारी शैलजा,खासदार , पंजाब काँग्रेस प्रेसिडेंट अमरेंद्र सिंग राजा, सिने अभिनेता सुमन , सिने अभिनेत्री विजयंती.
    • तेलंगणातील लोकसभा आणि राज्यसभेचे खासदार.
    • राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर.
    • राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे पदाधिकारी इंद्रजीत सिंग, प्रकाश साबळे , प्रकाश भगरथ,महेंद्र ब्राह्मणवाडे, शिवप्रसाद शाहू , सतपाल सोखी , विक्रम गौड, मुकेश पुडके.
    • आंध्रप्रदेशचे अध्यक्ष शंकर अण्णा, क्रांती कुमार श्याम अण्णा.

    मुख्यमंत्र्यांचे भाषण:

    तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी आंदोलनात बोलताना सांगितले की, “आता हे आंदोलन देशव्यापी करण्यात येईल. पंतप्रधान मी ओबीसी आहे म्हणतात, परंतु 10 वर्षांपासून एकही योजना आणली नाही.” विविध माग्न्यनसाठी केलेल्या या आंदोलनात देशभरातून ओबीसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • Maharashtra Government Scholarship Delay । “शिष्यवृत्ती रखडली: परदेशात ओबीसी विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात!”

    Maharashtra Government Scholarship Delay

    शासनाने शिष्यवृत्ती लवकर अदा करावी आमदार जोरगेवार यांची मागणी

    Maharashtra Government Scholarship Delay : नागपूर विभागातील 16 आणि संपूर्ण महाराष्ट्रातील 76 ओबीसी विद्यार्थी परदेशात उच्च शिक्षण घेत आहेत. मात्र, शासनाच्या शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत मिळणाऱ्या आर्थिक मदतीचा दुसरा हप्ता अद्याप विद्यार्थ्यांना मिळालेला नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थी आर्थिक अडचणीत आले असून, परदेशी विद्यापीठांकडून शुल्क भरण्यासाठी दबाव वाढत आहे. OBC Overseas Scholarship Delay

    चंद्रपूर मनपा शाळेतील १७ विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले

    निधी वेळेवर न मिळाल्यास शिक्षणावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे सदर शिष्यवृत्ती तातडीने अदा करावी, अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्याकडे केली आहे.

    बुधवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी मुंबई मंत्रालयात बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांची भेट घेऊन सदर मागणी केली. राज्य शासनाकडून ओबीसी विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. ही योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. आठ लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांतील विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीमुळे शिक्षणासाठी मोठा आधार मिळतो. मात्र, निधी मिळण्यात झालेल्या दिरंगाईमुळे विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. Overseas Education Financial Aid OBC

    अनेक विद्यार्थ्यांना राहण्याचा खर्च भागवणे कठीण झाले आहे, तर काहींवर विद्यापीठाचे शुल्क भरण्यासाठी दबाव वाढला आहे. शिष्यवृत्तीचा निधी अद्याप न मिळाल्याने विद्यार्थ्यांचे भवितव्य संकटात सापडले आहे. वेळेवर शुल्क भरता न आल्यास काही विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द होण्याची भीती आहे, तर काहींना वैयक्तिक कर्ज काढण्याची वेळ आली आहे.

    या पार्श्वभूमीवर, राज्य सरकारने त्वरित निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांपुढे निर्माण झालेल्या अडचणी सोडवून रखडलेला निधी तात्काळ अदा करावा, अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्याकडे केली आहे.

  • Chandrapur Municipal School Success । “शिक्षक-विद्यार्थ्यांचा पराक्रम: एनएमएमएसमध्ये चंद्रपूरचे नाव उंचावले!”

    Chandrapur Municipal School Success

    Chandrapur Municipal School Success : चंद्रपूर महानगरपालिकेच्या पीएम श्री सावित्रीबाई फुले शाळेतील राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती ( एनएमएमएस ) परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या 20 विद्यार्थ्यांपैकी 17 विद्यार्थी हे केंद्राच्या गुणवत्ता यादीत झळकले आहेत. शहरातील एका शाळेतील सर्वात अधिक संख्येने या परीक्षेत उत्तीर्ण होण्याचा मान मनपा शाळेने मिळविला आहे. National Means-cum-Merit Scholarship Results

    चंद्रपूर ताडोबा सफारीसाठी लवकरचं क्रुझर सेवा, आमदार जोरगेवार यांचा पाठपुरावा

     
        जातीनिहाय आरक्षण असणाऱ्या विद्यार्थ्यांना शासनाच्या अनेक कल्याणकारी शिष्यवृत्ती योजनांचा दरवर्षी लाभ मिळत असतो. परंतु ग्रामीण भागातील आर्थिक दुर्बल घटकातील प्रतिभावंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी देशपातळीवर एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षा मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्सेस भारत सरकार नवी दिल्ली यांचे मार्फत घेण्यात येते. आर्थिक मागास विद्यार्थ्यांमधून प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांच्या प्रक्षेची जोपासना, तसेच त्यांचे 12 वी पर्यंत शिक्षण पूर्ण व्हावे हा या योजनेचा गाभा आहे. PM Shri Savitribai Phule School


         प्रज्ञावान विद्यार्थ्यांना दरमहा शिष्यवृत्तीच्या स्वरुपात आर्थिक मदत करण्यात येते. सदर शिष्यवृत्ती  सलग चार वर्षे म्हणजे 8 वी ते 12 वी पर्यंत मुलांना देण्यात येते. यापूर्वी शिष्यवृत्तीसाठी पात्र असणाऱ्या प्रतिभावंत विद्यार्थ्यांना प्रति वर्षासाठी बारा हजार याप्रमाणे चार वर्षासाठी 48 हजार रुपये मिळत होते. आता यात एक वर्ष वाढल्याने त्यात 12 हजार रुपयांची वाढ झाली आहे. तसेच याआधी पालकांच्या उत्पन्नाची मर्यादा दीड लाख रुपये होती. आता त्यात दोन लाखांनी वाढ झाल्याने साडेतीन लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या पालकांच्या मुलांना देखील ही शिष्यवृत्ती परीक्षा देता येत आहे.


         मनपा शाळेतील गुणवंतांमध्ये प्रज्वल निलेश वैरागडे,भूमिका पवन निखाडे,केसीकौर केवलसिंग भोयर,सोहम राजू सोरते,संस्कृती नितीन घोटेकर,श्रेयस सुनील दुर्योधन ,आरोषी संजय देवघरे,शौर्य प्रशांत आंबटकर,रिंपा विश्वजीत मजुमदार,माही नागनाथ निमगडे,वैष्णवी प्रशांत कंदीकुरवार,गणेश अनिल ठाकरे,वंश सचिन पवार,समीक्ष कैलाश गोदरवार,गौरव भारत नंदनवर,लोकेश ईश्वर जेंगठे,प्रशिल अमोल रामटेके या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

     
       आयुक्त विपिन पालीवाल यांच्या नेतृत्वात,अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपायुक्त मंगेश खवले यांच्या प्रेरणेने व मुख्याध्यापक नागेश नित,वर्ग शिक्षक जोगेश्वर मोहारे,विषय शिक्षक मंगेश अंबादे, सचिन रामटेके यांच्या प्रयत्नाने शाळेला यश प्राप्त झाले असुन सर्वांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. 

  • Chandrapur to Tadoba Transport । “ताडोबा सफारीसाठी चंद्रपूरहून थेट क्रूझर सेवा सुरू होणार?”

    Chandrapur to Tadoba Transport

    Chandrapur to Tadoba Transport : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प हा देशातील प्रमुख पर्यटनस्थळांपैकी एक असून, येथे दरवर्षी हजारो पर्यटक भेट देतात. मात्र, चंद्रपूर शहरातून थेट ताडोबा सफारीसाठी कोणतीही सार्वजनिक वाहतूक सेवा नसल्यामुळे स्थानिक पर्यटकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. या पार्श्वभूमीवर, चंद्रपूर शहरातून थेट ताडोबा मोहर्ली सफारी गेटपर्यंत क्रुझर सेवा सुरू करण्याची मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी मुंबई मंत्रालयात आयोजित बैठकीत वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे केली. Tadoba Safari Booking

    तहसीलदार व तलाठी अडकले लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात

    आमदार किशोर जोरगेवार यांच्या मागणीनंतर बुधवारी चंद्रपूर मतदारसंघातील विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी मुंबई मंत्रालयात वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत वन विभागासंदर्भातील विविध विषयांवर सकारात्मक चर्चा झाली असून, चंद्रपूरात वन पर्यटन वाढविण्याच्या दृष्टीने सरकार प्रयत्नशील असल्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले. Tadoba National Park Tour

    बैठकीत बोलताना आमदार जोरगेवार म्हणाले, सध्या सफारीसाठी येणाऱ्या पर्यटकांना मोहर्ली गेट पर्यंत पोहोचण्यासाठी खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागते. यामुळे वेळेचा आणि पैशाचा अपव्यय होत आहे. त्यामुळे चंद्रपूर शहरातून थेट क्रुझर सेवा सुरू झाल्यास स्थानिक आणि बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना मोठी सुविधा मिळेल. शिवाय, यामुळे पर्यटनाला अधिक चालना मिळेल आणि स्थानिक अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम होईल.

    तसेच, ताडोबा सफारीसाठी शनिवार आणि रविवारसाठी वाढीव शुल्क आकारले जाते, जे सामान्य पर्यटकांसाठी अडचणीचे ठरते. हे वाढीव शुल्क पूर्णपणे रद्द करून आठवड्याभरासाठी समान शुल्क ठेवण्याची मागणीही आमदार किशोर जोरगेवार यांनी केली. बुकिंग करूनही न येणाऱ्या पर्यटकांच्या ठिकाणी उपलब्ध असलेल्या पर्यटकांचे नाव बदलण्याची मुभा देण्यात यावी, तसेच चैत्र नवरात्र आणि श्री माता महाकाली महोत्सवाच्या काळात ताडोबा पर्यटकांसाठी विशेष बससेवा सुरू करावी, अशीही मागणी त्यांनी केली. Weekend Trip to Tadoba

    चंद्रपूरचा ऐतिहासिक वारसा समृद्ध असून, गोंडकालीन किल्ले त्याचे प्रमुख वैशिष्ट्य आहेत. याच वारशाचे दर्शन पर्यटकांना घडवण्यासाठी संजय पांडुरंग सब्बनवार यांनी गोंडकालीन किल्ल्याची लघुप्रतिकृती तयार केली आहे. ही प्रतिकृती 40×40 फूट लांबीची असून, यात किल्ल्याचे चार प्रवेशद्वार, पाच खिडक्या, संपूर्ण परकोट, बुर्ज आणि मिनारांचा समावेश आहे. हा प्रकल्प ऐतिहासिक जतनासाठी महत्त्वाचा असून, स्थानिक आणि पर्यटकांना गोंडकालीन वास्तुकलेची माहिती देणारा ठरेल. त्यामुळे या प्रतिकृतीसाठी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील मोहर्ली सफारी गेटजवळ जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी आमदार जोरगेवार यांनी वनमंत्री यांच्याकडे केली.

    दिवंगत ख्यातनाम काष्ठशिल्पकार मनोहर सप्रे यांच्या बांबू आणि लाकडाच्या शिल्पकलेचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचावा, यासाठी मोहर्ली सफारी गेट येथे कायमस्वरूपी प्रदर्शनी दालन स्थापन करण्याचीही त्यांनी मागणी केली. मनोहर सप्रे यांनी आपल्या कौशल्यातून बांबू आणि लाकडापासून अप्रतिम शिल्पकृती साकारल्या आहेत. त्यांच्या कलाकृतींचे जतन आणि प्रचार-प्रसार करण्यासाठी हे दालन महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केला.

    चंद्रपूरच्या पर्यटनविकासाला गती मिळावी आणि ऐतिहासिक वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचावा, यासाठी सरकारने लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली. या बैठकीला संबंधित अधिकाऱ्यांचीही उपस्थिती होती.

  • Ashish Shelar । महाकाली यात्रेसाठी विशेष सुविधा! चंद्रपूरमध्ये सांस्कृतिक मंत्र्यांसमोर महत्त्वपूर्ण मागण्या

    Ashish Shelar Minister for Information Technology of Maharashtra

    Ashish Shelar : महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या चंद्रपूर दौर्‍यानिमित्त भारतीय जनता पक्ष, चंद्रपूर विधानसभेच्या वतीने शासकीय विश्रामगृह, चंद्रपूर येथे श्री माता महाकालीची मूर्ती, अम्मा का टिफिन व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी विविध सांस्कृतिक आणि विकासविषयक मागण्यांवर चर्चा करण्यात आली. झाडीपट्टी रंगभूमीसाठी ५ कोटी निधी तसेच महाकाली यात्रेसाठी दरवर्षी २ कोटी रुपयांच्या निधीची तरदूत करण्याची मागणी करण्यात आली. Mahakali Yatra Chandrapur fund

    याप्रसंगी अजय जैस्वाल, भारतीय जनता पार्टीचे माजी शहराध्यक्ष दशरथ सिंग ठाकूर, माजी महानगर जिल्हाध्यक्ष तुषार सोम, माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार, प्रदीप किरमे, श्याम कनकम, पुरुषोत्तम राऊत, विठ्ठल डुकरे, पूनम तिवारी, शेखर शेट्टी, अमोल शेंडे, विश्वजित शहा, जितेश कुळमेथे, प्रतीक शिवणकर, करण बैस, सुमित बेले, हरमन जोसेफ, विनोद शेरकी, शशिकांत म्हस्के, विकास खटी, संजय निकोडे, अभिजित पोटे, राजू व्यंकटवार, कार्तिक बोरेवार, महेश गहुकर, संजय महाकालीवार, सुरेंद्र अंचल, रुपेश पांडे, ताहीर हुसेन, राकेश पिंपळकर, करण नायर, गुड्डू सिंग, मंगेश अहिरकर, अक्षय घोटेकर, नीलिमा वनकर, विमल काटकर, शालू कनोजवार आदी उपस्थित होते.

    झाडाखाली निवांत झोपला, मात्र दुसऱ्या दिवशी घडलं असा भयावह

    भारतीय जनता पक्ष, चंद्रपूर विधानसभेच्या वतीने झाडीपट्टी रंगभूमीच्या संवर्धनासाठी चंद्रपूर येथे रंगमंचाच्या बांधकामासाठी ५ कोटी निधी मंजूर करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. झाडीपट्टी रंगभूमी ही विदर्भातील लोककलेचा अनमोल ठेवा असून, या पारंपरिक नाट्यप्रकाराच्या जतन व प्रसारासाठी भक्कम पायाभूत सुविधा उभारण्याची आवश्यकता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. Chandrapur tourism festival funds

    ashish shelar in chandrapur

    तसेच, चंद्रपूरमधील श्री महाकाली माता यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी आवश्यक सुविधा आणि सुरक्षेसाठी दरवर्षी २ कोटी निधीची तरतूद करण्याची विनंती करण्यात आली. यात्रेदरम्यान भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने स्वच्छता, वाहतूक नियोजन तसेच सुरक्षाव्यवस्थेवर विशेष भर देण्याची गरज असल्यामुळे दरवर्षी हा निधी मंजूर करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

  • Ram Navami rally route | रामनवमी शोभायात्रेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज – जाणून घ्या महत्त्वाचे अपडेट्स!

    Ram Navami rally route

    Ram Navami rally route : आगामी काळात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सर्वधर्मीय सण उत्सवाचे आयोजन होणार आहे. त्या अनुषंगाने आज (दि.31) राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी रामनवमी शोभायात्रेनिमित्त जिल्हा प्रशासन आणि आयोजन समितीचा आढावा घेतला. Ram Navami celebrations guide

    एसी बसविण्याच्या नावाखाली चंद्रपुरात डॉक्टरची 35 लाखाने फसवणूक

    जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या बैठकीला जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, महानगरपालिका आयुक्त विपीन पालीवाल, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, अतिरिक्त पोलिस अधिक्षक रिना जनबंधू, उपविभागीय अधिकारी संजय पवार, तहसीलदार विजय पवार, आयोजन समितीचे अध्यक्ष योगेश भंडारी, उपाध्यक्ष डॉ. अशोक जिवतोडे, शैलेश बागला आदी उपस्थित होते.

    रामनवमी शोभायात्रेनिमित्त आयोजन समिती आणि जिल्हा प्रशासनामध्ये समन्वय रहावा, या उद्देशाने आजची आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे, असे सांगून पालकमंत्री डॉ. उईके म्हणाले, रामनवमी हा उत्सव सर्व भाविकांच्या श्रध्देचा आणि भावनेचा विषय आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाचे यासाठी संपूर्ण सहकार्य राहील. अतिशय उत्साहात आणि आनंदात रामनवमी साजरी करावी. रॅलीची वेळ वाढवून मिळण्याबाबत विचार-विमर्श करून आणि नियमानुसार निर्णय घेण्यात येईल. शासन – प्रशासनाच्या नियमांचे कुठेही उल्लंघन होणार नाही, याची दक्षता सर्वांनी घेणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले. Chandrapur festival events

    जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, जिल्ह्यात साज-या होणा-या सर्वधर्मीय सणांबाबत नुकतीच जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक घेण्यात आली. चंद्रपूर जिल्हा हा शांतताप्रिय जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्याचा हाच लौकिक कायम राहण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणेला आणि शांतता समितीच्या सदस्यांना सुचना देण्यात आल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.

    मनपा आयुक्त विपीन पालिवाल म्हणाले, शहरातील रस्त्यांची कामे युध्दस्तरावर सुरू असून शोभायात्रेपर्यंत रस्ता वाहतुकीसाठी मजबुत करून दिला जाईल. तसेच फॉगिंग मशीनने रस्त्यावरील धूळ खाली बसण्यासाठी पाण्याचे फवारे मारण्यात येईल. सोबतच रस्त्याची स्वच्छता आदी कामे मपनाने हाती घेतली आहेत.

    यावेळी आयोजन समितीच्या सदस्यांनी देखील सुचना केल्या. बैठकीला विश्वास माधशेट्टीवार, रोडमल गहलोत, डॉ.गोपाल मुंधडा, अजय वैरागडे, जीतेन्द्र जोगड़, रविन्द्र गुरुनुले, अमित विश्वास, आशिष मुंधडा, प्रवीण खोब्रागडे, सुहास दानी, विजय डोमलवार, लखनसिंग चंदेल, विवेक होकम आदी उपस्थित होते.

  • OBC caste census demand । ओबीसींच्या हक्कांसाठी एल्गार: जंतर-मंतरवर धरणे आंदोलन!

    OBC caste census demand

    OBC caste census demand :- राष्ट्रीय ओबीसी महासंघ आणि बीसी वेलफेअर असोसिएशन तेलंगणा, आंध्र प्रदेश यांच्या संयुक्त विद्यमाने 2 एप्रिल 2025 रोजी जंतर-मंतर, नवी दिल्ली येथे सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी हे देशव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे.

    चंद्रपूर दुचाकी चोरी प्रकरण, फिर्यादी ने लावला चोराचा शोध

    • प्रमुख मागण्या:
    • जातनिहाय जनगणना करण्यात यावी.
    • केंद्र सरकारमध्ये स्वतंत्र ओबीसी मंत्रालय स्थापन करावे.
    • आरक्षणाची 50% मर्यादा हटवावी.
    • 13 सप्टेंबर 2017 पासून प्रलंबित असलेली क्रिमीलेअरची मर्यादा वाढवावी.
    • तेलंगणातील वाढलेले 42% ओबीसी आरक्षण 9 व्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करावे.
    • संविधानाच्या कलम 243 डी (6) आणि 243 टी (6) मध्ये सुधारणा करून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींना 27% आरक्षणाचा कायदा करावा.
    • केंद्र सरकारच्या सर्व विभागांतील ओबीसी संवर्गातील राखीव 27% जागा पूर्णपणे भरण्यात याव्यात. मंडल आयोग आणि स्वामिनाथन आयोगाच्या सर्व शिफारशी लागू कराव्यात. ओबीसी शेतकरी आणि शेतमजुरांसाठी 60 वर्षानंतर पेन्शन योजना लागू करावी. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे. ओबीसी प्रवर्गासाठी लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांची निर्मिती करावी. ओबीसी प्रवर्गाचा ॲट्रॉसिटी कायद्यामध्ये समावेश करावा. कृषी क्षेत्रासाठी स्वतंत्र बजेट आणि स्मार्ट गाव योजना लागू करावी. नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीमध्ये एलएलबी आणि एलएलएमच्या ऑल इंडिया कोट्यामध्ये ओबीसी विद्यार्थ्यांना 27% आरक्षण द्यावे. केंद्र सरकारने वार्षिक अंदाजपत्रक तयार करताना एससी, एसटी प्रमाणे ओबीसी प्रवर्गाकरिता लोकसंख्येच्या प्रमाणात निधीची तरतूद करावी. OBC reservation in local bodies

    आंदोलनाचे आवाहन:

    राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर यांनी ओबीसी बांधवांना या देशव्यापी आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. ओबीसी समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी हे आंदोलन निर्णायक ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. National OBC Federation

  • Gudi Padwa celebration । चंद्रपुरात गुढीपाडव्याचा उत्साह: ढोल-ताशांच्या गजरात नववर्षाचे स्वागत!

    Gudi Padwa celebration

    Gudi Padwa celebration : हिंदू नववर्षाच्या स्वागताचा सोहळा म्हणून ओळखला जाणारा गुढीपाडवा उत्सव यंदाही चंद्रपुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. या प्रसंगी गुढी उभारून उपस्थित नागरिकांनी आनंदोत्सव साजरा केला. आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून भारतीय जनता पक्षाच्या वतीने या अभूतपूर्व सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. Hindu new year festival

       यावेळी भागवताचार्य संत श्री मनीष महाराज, तुषार सोम, दशरथ ठाकूर, रघुवीर अहिर, माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार, अनिल फुलझेले, रवी गुरनुले, कल्पना बगुलकर, प्रदीप किरमे, आशिष मासिरकर
    अजय जयस्वाल, बलराम डोडाणी, मिलिंद गंपावार, संजय बुरघाटे, अनिल टहलीयानी, पूनम तिवारी, विकास खटी, विनोद शेरकी, संजय निकोडे, अभिजित पोटे, सुप्रिया सरकार, सपना पाल, मंजुश्री कासनगोट्टूवार, श्रुती ठाकूर, रामकुमार आकेपल्लीवार, अमोल शेंडे, नकुल वासमवार, जितेश कुळमेथे, राजू जोशी, संजय महाकालीवार, राकेश बोम्मनवार, सुमित बेले, राम जंगम, ताहीर हुसेन, हर्षद कानमपल्लीवार, पिंटू धिरडे, मयूर बोकरे, शैलेश दिंडेवार, कल्पना शिंदे, शीतल रंगदळ, ऍड. राम मेंढे, ऍड. परमहंस यादव, मुन्ना जोगी, कालिदास धामनगे, राकेश नाकाडे आदींची उपस्थिती होती.

    चंद्रपुरात फिर्यादीनेच केला दुचाकी चोरीचा तपास

    गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर जगदंब ढोल ताशा आणि ध्वज पथक, स्वराज्य वाद्य पथक आणि ब्रह्मास्त्र ढोल ताशा पथक, यांच्या दमदार आणि जोशपूर्ण वादनाने सोहळ्याला विशेष उत्साह मिळाला. ठेका धरायला लावणाऱ्या ढोल-ताशांच्या गजरात संपूर्ण परिसर दणाणला. गुढीपाडवा उत्सवात विठ्ठल व्यायाम शाळेच्या कुशल खेळाडूंनी सादर केलेल्या नेत्रदीपक मल्लखांब प्रात्यक्षिकांनी प्रेक्षकांना थक्क केले.

    यावेळी बोलताना आमदार जोरगेवार म्हणाले की, गुढीपाडवा हा केवळ नववर्षाचा प्रारंभ नसून, नवीन संकल्प, नवीन उमेद आणि नव्या ऊर्जेचे प्रतीक आहे. गुढीपाडवा हा विजयाचा आणि चैतन्याचा उत्सव आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केल्यानंतर विजयाच्या प्रतीक म्हणून गुढी उभारली. आज आपणही ही गुढी उभारून समाजाच्या प्रगतीसाठी, शिक्षण, रोजगार आणि विकासासाठी कार्य करण्याचा संकल्प करत असल्याचे त्यांनी सांगितले. Marathi new year celebration

    marathi new year celebration

    रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्यात प्रजेचे राज्य होते. त्यांच्या विचारांतून समाजाला नेहमी प्रेरणा मिळत राहावी, यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याचा आपण संकल्प केला असून, वर्षभरात हा पुतळा तयार करणार असल्याचे आमदार जोरगेवार म्हणाले.

    आज कलाकारांनी आपली पारंपरिक कला सादर करून गुढीपाडव्याला एक वेगळीच शोभा आणली आहे. विठ्ठल व्यायाम शाळेच्या खेळाडूंनी सादर केलेले मलखांब प्रात्यक्षिक हे आपल्या ऐतिहासिक शारीरिक संस्कृतीचे प्रतीक आहे. अशा कला आणि परंपरांचे जतन करणे हे आपले कर्तव्य असल्याचे ते म्हणाले. या कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.