महाराष्ट्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व ताज्या बातम्या (Latest News) आणि ब्रेकिंग अपडेट्स वाचण्यासाठी रोज भेट द्या news34.in वर. राजकारण, समाजकारण, क्रीडा, गुन्हेगारी आणि आर्थिक घडामोडींचे त्वरित आणि विश्वसनीय कव्हरेज येथे उपलब्ध आहे. २४ तास सुरू असलेल्या घडामोडींची अचूक माहिती मिळवा, जेणेकरून कोणतीही मोठी बातमी तुमच्यापासून सुटणार नाही.
Caste Validity Certificate Chandrapur : ७ एप्रिल २०२५ चंद्रपूर – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून 11 एप्रिल ते 1 मे या कालावधीत सामाजिक न्याय पर्व अभियान अंतर्गत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, चंद्रपुर मार्फत विशेष मोहिमेव्दारे जात वैधता प्रमाणपत्र वाटप करण्यात येणार आहे. तसेच त्रुटीपूर्तता व अर्ज सुध्दा स्वीकारण्यात येईल.
सत्र 2024-25 मध्ये प्रवेशित इयत्ता 12 वी विज्ञान शाखेतील (12th Science Caste Certificate Verification) ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापपावेतो जात प्रमाणपत्र पडताळणी करीता अर्ज दाखल केलेला नाही. तसेच व्यावसायीक अभ्यासक्रमास सीईटी देऊन 2025-26 मध्ये प्रवेश घेऊ इच्छीत असणा-या (तंत्रशिक्षण पदविका अभ्यासक्रमाचे अंतिम वर्षाला प्रवेशीत असणारे ज्यांना अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचे थेट व्दितीय वर्षाला प्रवेश घ्यावयाचे आहे) विद्यार्थ्यांनी सामाजिक न्याय पर्वाच्य विशेष मोहिमेत सहभागी व्हावे व जात प्रमाणपत्राची पडताळणी करुन घ्यावी.
15 ते 17 एप्रिल व 21 ते 25 एप्रिल 2025 दरम्यान त्रुटीपुर्तता शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ज्यांनी जात प्रमाणपत्र पडताळणीकरीता अर्ज दाखल केले आहे, परंतु अपुर्ण पुराव्याअभावी ज्यांची प्रकरणे त्रुटीमध्ये आहेत, त्यांनी वरील दिनांकास किंवा त्यापुर्वी सादर केलेल्या अर्जाची सद्यस्थिती जाणून घ्यावी, असे समितीचे उपायुक्त डॉ. सिध्दार्थ गायकवाड यांनी कळविले आहे.
Mahavitaran lucky draw winners list : चंद्रपूर:- महावितरणच्या लकी डिजिटल ग्राहक योजनेचा पहिला लकी ड्रा ऑनलाईन पध्दतीने दि. ७ एप्रिल २०२५ रोजी काढण्यात आला. या लकी ड्रॉतून पहिल्या क्रमांकाचे 29 तर दुसऱ्या क्रमांकासाठी 58 व तिसऱ्या क्रमांकासाठी 58 विजेते जाहिर करण्यात आले. विजेत्या ग्राहकांची यादी महावितरणच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. Mahavitaran lucky draw first prize winners
प्रत्येक उपविभाग स्तरावर एक या प्रमाणे पहिल्या क्रमांकाकरिता 29 विजेत्या ग्राहकांना स्मार्ट फोन बक्षिस म्हणून दिले जात आहे. तर प्रत्येक उपविभागात प्रत्येकी दोन प्रमाणे दुसऱ्या क्रमांकासाठी 58 विजेत्या ग्राहकांना स्मार्ट फोन व प्रत्येकी दोन प्रमाणे तिसऱ्या क्रमांकासाठी 58 विजेत्या ग्राहकांना स्मार्ट वॉच बक्षिस म्हणून दिले जात आहे. यापुढील लकी ड्रॉ मे व जून २०२५ या महिन्यात काढण्यात येईल.
महावितरणने ऑनलाईन वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांचा टक्का वाढविण्याच्या हेतूने लकी डिजिटल ग्राहक योजना सुरू केली आहे. या योजनेसाठी ऑनलाईन पध्दतीने वीज बिल भरणा करणारे सर्व लघुदाब वीज ग्राहक पात्र ठरणार आहेत. १ जानेवारी ते ३१ मे २०२५ या कालावधीत सलग तीन वा तीन पेक्षा अधिक वीज बिले ऑनलाईन पध्दतीने भरून योजनेच्या लाभाची संधी ग्राहकांना उपलब्ध करण्यात आली आहे.
ही योजना महावितरणच्या अशा लघुदाब चालू (एल टी- लाईव्ह) वीजग्राहकांसाठी लागू असून, ज्यांनी ०१ एप्रिल २०२४ पूर्वी मागील एक वर्ष म्हणजे ०१.०४.२०२३ ते ३१.०३.२०२४ या कालावधीत ऑनलाईन वीज देयक भरणा पर्याय वापरलेला नाही. अधिक माहितीसाठी महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळास www.mahadiscom.in भेट द्यावी. (How to check Mahavitaran lucky draw results) ग्राहक रांगेत उभे राहण्यापेक्षा वेळ, श्रम व पैशांची बचत करीत डिजिटल पध्दतीने वीज बिल भरणा करण्यास प्राधान्य देत आहेत. ग्राहकांना डिजिटल पध्दतीने वीज बिलाचा भरणा करता यावा, यासाठी महावितरणकडून संकेतस्थळ, महावितरण मोबाईल ॲपची सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून दिलेली आहे. Mahavitaran lucky draw prizes
ग्राहकांना देय रक्कमेवर ०.२५ टक्के डिजिटल वीज बिल भरणा सूट दिली जाते. परिणामी सध्या राज्यात ७० टक्के हून अधिक वीज ग्राहक ऑनलाईन पध्दतीने वीज बिलाचा भरणा करीत आहेत. हे प्रमाण वाढविण्यासाठी ग्राहकांना प्रोत्साहन देण्यासाठी लकी डिजिटल ग्राहक योजना राबविण्यात येत आहे.
या योजनेच्या कालावधीत ग्राहकाने नेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, यूपीआय, वॉलेट, कॅश कार्ड, एनएसीएच, क्यूआर कोड, एनईएफटी, आरटीजीएस इ. ऑनलाईन वीज बिल भरणा पर्याय वापरून लकी ड्रॉ महिन्याच्या अगोदर दरमहा एकप्रमाणे सलग तीन किंवा तीन पेक्षा जास्त महिने वीज बिल भरणे आवश्यक राहील. अधिक माहितीसाठी महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळास www.mahadiscom.in भेट द्यावी. जनसंपर्कअधिकारी, महावितरण, चंद्रपूर
महावितरण लकी ड्रॉ: विजेत्यांच्या यादीत तुमचे नाव आहे का?
Maharashtra public service rights : महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत नागरिकांना विहित मुदतीत व कालमर्यादेत सेवा देणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्व शासकीय विभागांनी लोकसेवा हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी दिले. Maharashtra citizen services act
नियोजन भवन येथे आज (दि.7) आयोजित बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, शासकीय कार्यालयांनी त्यांच्याकडे प्रलंबित असलेल्या तक्रारी निकाली काढून त्याचा अहवाल सादर करावा. लोकसेवा हक्क आयोगाद्वारे विहित केलेल्या नमुन्यात सुचना फलक सर्व कार्यालयांनी दर्शनी भागात प्रकाशित करावे. या कायद्याविषयी नागरिकांना माहिती होण्यासाठी व्यापक प्रचार आणि प्रसार मोहीम राबवावी.
जिल्ह्यातील पाच हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायत कार्यालयात मॉडेल ‘आपले सरकार सेवा केंद्र’ उभारावेत. त्यात सर्व प्रकारच्या अधिसूचित सेवा नागरिकांना एकाच ठिकाणी मिळणे अपेक्षित आहे. ज्या सेवा ऑनलाईन आहेत, त्या ऑनलाईन पध्दतीनेच देण्यात याव्या. तसेच संबंधित विभागाने त्यांच्याकडे असलेल्या एकूण तक्रारींपैकी 90 टक्क्यांपेक्षा जास्त तक्रारी निकाली काढणे बंधनकारक आहे, याची सर्व विभाग प्रमुखांनी नोंद घ्यावी, असे निर्देशही जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी दिले.
बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार व इतर विभाग प्रमुख उपस्थित होते.
“प्रत्येक तक्रारीचा निकाल आता बंधनकारक! प्रशासन सज्ज”
kishor jorgewar land donation : जेव्हा पक्ष नव्हता, सत्ता नव्हती आणि संधीसुद्धा नव्हती, अशा काळात या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी पक्षाचा झेंडा खांद्यावर घेतला. त्यांनी केवळ विचारांवर विश्वास ठेवून, रात्रंदिवस झटून पक्षाचे बीज रुजवले. त्यांच्या निष्ठा, समर्पण आणि निःस्वार्थ सेवेमुळेच आज भारतीय जनता पक्ष देशातील सर्वात मोठा पक्ष झाला आहे. आज पक्षाच्या स्थापना दिनी होत असलेला ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान केवळ औपचारिकता नाही, तर ही आपल्या अंतःकरणातील कृतज्ञतेचे खरे प्रतीक आहे असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त, भारतीय जनता पक्ष चंद्रपूर विधानसभा विभागाच्या वतीने श्री माता कन्यका सभागृहात ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या सन्मान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात पक्षाच्या शेकडो ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना आमदार जोरगेवार बोलत होते. BJP senior workers honor ceremony
यावेळी राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर (hansraj ahir), भाजपच्या ज्येष्ठ नेत्या शोभा फडणवीस, ज्येष्ठ नेते रमेशचंद्र बागला, विजय राऊत, माजी महानगराध्यक्ष दशरथसिंह ठाकूर, माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार, प्रकाश देवतळे, अशोक जिवतोडे, अजय जयस्वाल, तुषार सोम, रघुवीर अहिर, मनोज पाल, राजेंद्र अडपेवार, माजी नगरसेवक देवानंद वाढई, माजी नगरसेविका वनिता डुकरे, वंदना हातगावकर, सविता दंढारे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
यानंतर बोलताना आ. जोरगेवार म्हणाले, पक्षासाठी निष्ठेने आणि समर्पण भावनेने काम करणाऱ्या आपल्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान करण्याचा हा पवित्र प्रसंग आहे. या माध्यमातून पक्षाच्या वाटचालीत योगदान दिलेल्या प्रत्येक व्यक्तीला आपल्या आदरभावनेचा नम्र नमस्कार करण्याचा हा सोहळा आहे. भारतीय जनता पक्ष ही केवळ राजकीय संघटना नसून एक विचारधारा आहे. Political leaders honoring ceremony
राष्ट्रवाद, पारदर्शक प्रशासन, विकासाची निष्ठा आणि समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचा निर्धार, या विचारधारेचे बीज आपल्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी पेरले, जपले आणि रुजवले. त्यांच्यामुळेच आज पक्ष देशात आणि राज्यात बळकटपणे उभा आहे. पक्षासाठी केवळ निवडणुकीत नव्हे, तर प्रत्येक संकटात, प्रत्येक लढ्यात खंबीरपणे उभे राहणारे हे ज्येष्ठ कार्यकर्ते आपल्यासाठी आदर्श आहेत. BJP foundation day celebrations
भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस हा संघर्ष, समर्पण आणि निष्ठेची आठवण करून देणारा दिवस आहे. आज आपण ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान करतो आहोत. ते केवळ कार्यकर्ते नसून पक्षाच्या मूळ पाया आहेत. त्यांनी पक्ष नसताना झेंडा घेतला, जनतेपर्यंत विचार पोहोचवले, अनेक वेळा संघर्ष केला. त्यांचे योगदान कधीही शब्दांत मावणारे नाही. सत्ता असो वा नसो, कार्यकर्त्यांनी पक्षासाठी खांद्याला खांदा लावून काम केले आहे. त्यांचा समर्पणभाव खरोखर वंदनीय आहे असेही ते यावेळी बोलताना म्हणाले. Veteran BJP workers felicitation
यावेळी बोलताना राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांनी ज्येष्ठ कार्यकर्ते हे पक्षाची खरी ताकद आहेत. त्यांच्या त्यागातूनच हा पक्ष उभा राहिला आहे व पुढे जात आहे, असे सांगितले. तर ज्येष्ठ नेत्या शोभा फडणवीस यांनी आयोजनाचे कौतुक करताना जनसंघापासूनच कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. आणीबाणीच्या काळात कारागृह सोसले. हाच पक्ष जुन्या कार्यकर्त्यांच्या विचारांवर उभा राहिला आहे. हा पक्ष नेत्यांचा नसून कार्यकर्त्यांचा असल्याचे सांगितले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते सर्व ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यांना भोजनासाठी मानाच्या पंगतीत बसवून आदरभाव व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लाईव्ह संबोधन कार्यकर्त्यांना दाखवण्यात आले. पक्षाचा झेंडा लहरवून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. स्वर्गवासी कार्यकर्त्यांना यावेळी नमन करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. श्याम हेडाऊ यांनी केले. या कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. BJP foundation day celebrations
पक्षाच्या भवनासाठी एक एकर जागा – आमदार किशोर जोरगेवार यांची घोषणा भाषणात बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले, शहरात पक्षाचे कार्यक्रम घेण्यासाठी स्वतःच्या हक्काचे भवन नाही, ही खंत आहे. त्यामुळे मी स्वतःच्या मालकीची एक एकर जागा भारतीय जनता पक्षाच्या भवनासाठी देण्याची घोषणा करतो. यामध्ये कार्यकर्त्यांच्या निवासाचीही सोय करू असे ते म्हणाले.
pratibha dhanorkar on gondia ballarshah railway : खासदार प्रतिभा धानोरकर या चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्राच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध असल्याचे दिसुन येत आहे. खासदार धानोरकर यांनी निवडून आल्यानंतर 18 जुलै 2024 रोजी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव तसेच, महाप्रबंधक दक्षिण-पुर्व-मध्ये रेल्वे यांना पत्र पाठवून गोंदिया-बल्लारशहा रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाची मागणी केली होती. त्या मागणी ला यश प्राप्त झाले असून 04 एप्रिल 2025 रोजी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत सदर मार्गाच्या दुहेरीकरणासाठी 4819 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. railway development chandrapur
खासदार प्रतिभा धानोरकर यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील रेल्वे समस्या संदर्भात वारंवार आढावा घेऊर चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील रेल्वे समस्या दुर करण्याच्या संदर्भात रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली होती. खासदार म्हणून निवडून आल्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील रेल्वे चे जाळे मजबूत करण्यासंदर्भात त्यांनी आपले मत व्यक्त केले होते.
बल्लारशा -गोंदिया रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासाठी देखील मा. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी वरील प्रकल्पा संदर्भात सकारात्मक असल्याचे आश्वासन दिले होते. खासदार धानोरकर यांच्या मागणीला यश आल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसह गडचिरोली, भंडारा, गोंदिया येथील नागरीकांना देखील याचा लाभ होणार आहे. या संदर्भात खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केंद्र सरकार व रेल्वे मंत्री यांचे आभार मानले आहे. railway line doubling benefits
गोंदिया-बल्लारशाह रेल्वे मार्ग दुहेरीकरणाला 4819 कोटींचा निधी मंजूर!
pregnancy weight monitoring : जिल्ह्यातील माता मृत्यू आणि कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी जिल्ह्याच्या आरोग्य विभागाने नाविन्यपूर्ण “वेट स्टिकर “योजना उपक्रम मा. विवेक जॉनसन , मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.चंद्रपूर यांचे विशेष मार्गदर्शनाखली व डॉ.अशोक कटारे, जिल्हा आरोग्य अधिकारी जि.प.चंद्रपूर यांचे विशेष नियोजनाखाली राबविण्यात येणार व सदर उपक्रमाचा शुभारंभ जिल्हास्तरावरुन मान्यवरांच्या शुभहस्ते दि. 7 एप्रिल 2025 रोजी जागतिक आरोग्य दिनी करण्यात येणार आहे. Chandrapur district pregnancy monitoring program
गरोदर मातांचे मृत्यू हे योग्य आहार न घेतल्याने व बाळंतपणात वजनाचे लक्ष्य साध्य न झाल्याने होत असल्याचे निदर्शनास दिसुन आले आहे. याकरीता गरोदरपणाची नोंदणी झाल्याबरोबर उंची आणि वजन सूत्रानुसार ( बीएमआय ) गरोदर मातेच्या घरी दर्शनी भागात गरोदर मातेचे अपेक्षित असलेले वजन “वेट स्टिकर” च्या सजवलेल्या आकड्यात लावण्याचे निश्चित करण्यात आले आहे. rural pregnancy care programs
चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या आर्थिक वर्षात 22 माता मृत्यूची नोंद झालेली आहे. गरोदर मातांना आपले वजन किती वाढले पाहिजे याबाबतचे लक्ष्य निर्धारित करण्यासाठी अशा पद्धतीच्या उपक्रमाची योजना आखण्यात आली आहे. गरोदर मातेचे वजन योग्य नसल्यास वेळे आधी प्रसुती, गर्भपात व माता बालमृत्यू ओढविण्याचा जास्त संभव असतो. हे टाळण्यासाठी बाळंतपणाच्या तिसऱ्या महिन्यापासून स्थानिक प्रा.आ. केंद्र ,आरोग्य उपकेंद्रातील आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर यांच्या मार्फत ठराविक काळात वजनाची नोंदणी केली जाते. मात्र गरोदर मातेचे कुटुंब वजनाबाबत फारसे गंभीर नसतात. त्यांच्यात जनजागृती व्हावी असा दृष्टीकोन ठेउन व जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधुन सदर उपक्रम राबविण्यात येत आहे. Awareness campaigns to reduce maternal deaths in Maharashtra
यावर्षी जागतिक आरोग्य संघटनेने दिलेले घोषवाक्य “आरोग्यदायी सुरवात, आशांदायी भविष्य ” साधण्यासाठी अशा पद्धतीने वेट स्टिकर उपक्रम राबविण्याचे नियोजन आरोग्य विभाग, जि.प.चंद्रपूर यांनी केले आहे. या संपूर्ण उपक्रमात जिल्हा आरोग्य अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी ,प्राथमिक आरोग्य केद्र व आरोग्य उपकेंद्र स्तरावरील आरोग्य विभागील कर्मचारी यांचा सहभाग राहाणार आहे . यामुळेच कार्यक्रमाची व्याप्ती व गुणवत्ता वाढणार आहे. यावर्षी जिल्ह्यातील 25 हजार गरोदर मातांच्या घरी जाउन ,कुटुंब सभा घेउन स्टिकर लावून याबाबतचे फायदे सांगितले जाणार आहे. तरी गावातील जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.
“जागतिक आरोग्य दिनानिमित्त चंद्रपूर जिल्ह्यातून आरोग्य क्षेत्रात नवा संदेश!”
Protection wall collapse near CSTPS due to rain : चंद्रपूर – वन संपत्तीने वेढलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात अनके वन्यप्राणी वावरतात, वन्यक्षेत्रातून हे प्राणी आता बाहेर निघत आहे कारण जिल्ह्यात वन्यक्षेत्राची व्याप्ती दिवसेंदिवस कमी होत आहे. आजची चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात मानव वन्यजीव संघर्ष वाढलेला आहे, हे हल्ले कमी व्हावे यावर अजूनही प्रशासनाने ठोस पाऊले उचलली नाही. ग्रामीण भागासह आता शहरातही वन्यप्राणी सहज आपले दर्शन देऊन जातात. wall collapse due to rain
शहरातील सीएसटीपीएस वीज केंद्र परिसरात अनेक वन्यप्राण्यांचा वावर आहे, या परिसरात अनेक अनुचित घटना सुद्धा घडलेल्या आहे. सीएसटीपीएस ला लागून असलेले राष्ट्रवादी नगर व वृंदावन नगर या भागात वीज केंद्रातून भ्रमंती करीत अनेक वन्यप्राणी रात्रीच्या सुमारास येतात, ते प्राणी येऊ नये यासाठी संरक्षण भिंत बांधण्यात आली मात्र २ दिवसांपूर्वी चंद्रपुरात आलेल्या अवकाळी पावसामुळे संरक्षण भिंतीचा तब्बल ५० मीटर पर्यंतचा भाग कोसळला.
यामुळे वृंदावन व राष्ट्रवादी नगर मधील नागरिक दहशत मध्ये आलेले आहे, कारण संरक्षण भिंतीमुळे वन्यप्राणी या भागात येऊ शकत नव्हते मात्र भिंत कोसळल्याने वन्यप्राणी अगदी सहजपणे या भागात येऊ शकतात. नागरिकांनी याबाबत वीज केंद्राला माहिती देत संरक्षण भिंतीचे पुन्हा बांधकाम करावे यासाठी निवेदन सुद्धा दिले मात्र अजूनही नागरिकांच्या मागणीची दखल घेण्यात आली नाही. forest animals entering city
संरक्षण भिंत कोसळल्याने परिसरात राहणारे अनेक कुटुंब दहशतीमध्ये आले आहे. यामुळे वीज केंद्र व्यवस्थापनाने नागरिकांच्या सुरक्षेसाठी तात्काळ उपाययोजना करण्याची गरज आहे अशी प्रतिक्रिया वृंदावन नगर वासियांनी दिली आहे.
POSH Act compliance checklist : कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई आणि निवारण) अधिनियम, 2013 अंतर्गत जिल्हयातील ज्या कार्यालयाच्या आस्थापनेवर दहा किंवा दहा पेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत आहेत, अशा प्रत्येक कार्यालयामध्ये अंतर्गत तक्रार समितीची स्थापन असणे अनिवार्य आहे.
समितीमध्ये कार्यालयातील वरिष्ठ महिला कर्मचारी अध्यक्ष असावी. महिलांच्या प्रश्नांशी बांधील असलेल्या किंवा ज्यांना सामाजिक कार्याचा अनुभव व कायद्याचे ज्ञान आहे, अशा कर्मचाऱ्यांमधून किमान दोन सदस्य, तसेच अशासकीय संघटना किंवा लैंगिक छळाशी संबंधित प्रश्नांशी परिचीत असलेली व्यक्ती यामधील एक सदस्य असावा. समितीमध्ये किमान 50 टक्के सदस्य महिला राहतील व समितीचा कार्यकाल हा तीन वर्षाचा राहिल. Internal Complaints Committee formation
निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा अधिकारी, (पीओएसएच) ॲक्ट यांचे आदेशान्वये सदर अधिनियमात दिल्याप्रमाणे बाल विकास प्रकल्प अधिकारी व नगर परिषदेच्या मुख्याधिका-यांना नोडल अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले असून त्यांच्या कार्यक्षेत्रात अधिनियमांतर्गत तक्रार करण्यास काही अडचण जात असल्यास संपर्क साधावा.
ज्या कार्यालयात दहा पेक्षा कमी कर्मचारी कार्यरत आहेत किंवा मालकाविरुध्द तक्रार आहे, अशा कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी स्थानिक तक्रार समिती किंवा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, चंद्रपूर यांच्याकडे आपली तक्रार नोंदवावी. सदर अंमलबजावणीत कोणी कसुर केल्यास 50 हजार रूपयांपर्यंत दंडात्मक कारवाईची तरतुद कायद्यात नमुद आहे. Steps to establish Internal Complaints Committee
ज्या आस्थानेवर दहा किंवा दहा पेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत आहेत, अशा प्रत्येक कार्यालयाने अंतर्गत तक्रार समिती स्थापन केल्याची महिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी,जुना कलेक्टर बंगला, आकाशवाणीच्या मागे, सार्ई बाबा वार्ड, चंद्रपूर येथे किंवा disttwcdocha@gmail.comdisttwcdocha@rediffmail.com या संकेतस्थळावर येथे सादर करावी, असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी कळविले आहे.
Tadoba Andhari Tiger Reserve safari : चंद्रपूर शहरातील पर्यटकांना ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प सफारीसाठी थेट सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी लवकरच क्रुझर सेवा सुरू होणार आहे. महिन्याभरात ही सेवा कार्यान्वित करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, या संदर्भात आमदार किशोर जोरगेवार यांनी वन विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांसोबत बैठक घेतल आहे. विशेष म्हणजे मुंबई येथे वन मंत्री गणेश नाईक यांची भेट घेत आमदार किशोर जोरगेवार यांनी सदर मागणी केली होती. तर गुरुवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. Tadoba jungle safari
या बैठकीला बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र चिचपल्ली संचालक, अशोक खडसे संचालक, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे वनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक डॉ. प्रभुनाथ शुक्ला, एफडीसीएम चंद्रपूर प्रदेश प्रादेशिक व्यवस्थापक सुमित कुमार, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प बफरचे उपसंचालक कुशाग्र पाठक, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प कोरचे उपसंचालक आनंद रेड्डी येल्लू, मध्य-चांदा वनविभागाच्या उपवनसंरक्षक श्वेता बोडू, विभागीय वनअधिकारी प्रशांत खाडे, विभागीय वनअधिकारी सचिन शिंदे आदिंची उपस्थिती होती.
ताडोबा हे देशभर प्रसिद्ध असलेले व्याघ्र प्रकल्प असून, येथे देश-विदेशातील पर्यटक मोठ्या संख्येने भेट देतात. मात्र, चंद्रपूर शहरातून ताडोबाला जाण्यासाठी थेट सार्वजनिक वाहतूक सुविधा उपलब्ध नसल्याने पर्यटकांना आणि स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर क्रुझर सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव आमदार जोरगेवार यांनी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्यासमोर मांडला होता. Tadoba tourism
या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर आमदार जोरगेवार यांनी वन विभागाच्या अधिकार्यांसोबत बैठक घेत क्रुझर सेवेच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक कार्यवाहीबाबत चर्चा केली. या बैठकीत स्कूझरच्या मार्गाची आखणी, वेळापत्रक, तिकीट दर, बुकिंग व्यवस्था आणि इतर तांत्रिक बाबींवर सविस्तर विचारविनिमय करण्यात आला. स्कूझर सेवा सुरू झाल्यास पर्यटकांना शहरातून ताडोबाला जाण्यासाठी सुविधा मिळणार आहे.
पर्यटन विकासाच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार असून, पर्यटकांना प्रवासासाठी सहज सुविधा उपलब्ध झाल्यामुळे ताडोबाला भेट देणार्या पर्यटकांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे स्थानिक व्यवसायालाही चालना मिळणार आहे. यासंदर्भात आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगितले की, “ताडोबा हा चंद्रपूरच्या पर्यटन क्षेत्रातील एक महत्त्वाचा ठिकाण आहे. पर्यटकांना अधिक सोयीस्कर प्रवास सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी क्रुझर सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही सेवा महिन्याभरात सुरू होईल. Tadoba forest safari
वन विभागाने या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखवला असून, महिन्याभरात ही सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने अंतिम तयारीला वेग देण्यात आला असल्याचे ते म्हणाले. सोबत बुकिंग करुन वेळेवर न येणा-या पर्यटकांच्या ठिकाणी दुस-या पर्यटकांना ताडोबा सफारी दिली जाणार आहे, संजय सब्बनवार यांनी तयार केलेली 40×40 फूट लांबीची गोंडकालीन किल्ल्याची लघुप्रतिकृती ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात ठेवली जाणार आहे. तर दिवंगत ख्यातनाम काष्ठशिल्पकार मनोहर सप्रे यांनी बांबूपासून साकारलेले काष्ठशिल्पांसाठी वन विभागाद्वारे प्रदर्शनी दालन उभारून दिल्या जाणार आहे. आदी निर्णय सदर बैठकीत घेण्यात आले आहे.
पर्यटकांसाठी खुशखबर! चंद्रपूरहून थेट ताडोबा जंगल सफारीची सेवा
Gondwana University Shivaji Maharaj statue : गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली सिनेट सदस्य तथा युवासेना पूर्व विदर्भ सचिव प्रा. निलेश बेलखेडे यांनी गोंडवाना विद्यापीठाच्या गडचिरोली येथील परिसरात तसेच चंद्रपूर येथे होऊ घातलेल्या विद्यापिठाच्या उपकेंद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा करावा तसेच चंद्रपूर येथील गोंडवाना उपकेंद्राच्या परिसरास छत्रपती शिवाजी महाराज परिसर असे नाव द्यावे यासाठी ठराव पाठविला होता. University campus historical statues
परंतु विद्यापीठ प्रशासनाने चुकीचे कारण देऊन हा प्रस्ताव नामंजूर केल्या गेला आहे त्यामुळळे आपण हा ठराव अधिसभेत मांडू शकत नाही संदर्भात पत्र पाठविले त्यामुळे निलेश बेलखेडे यांनी संपर्क करून आणि आपला प्रस्ताव आणि आपण पाठविलेले खारीज पत्र यामध्ये विसंगता असून पुन्हा एकदा वाचावा आणि मला प्रस्ताव मांडू द्यावा ही विनंती केली असता विद्यापीठ प्रशासनाने कुठलेही यावर उत्तर दिलें नाही.त्यामुळे निलेश बेलखेडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये कुलगुरू व प्रशासन हे महाराज विरोधात आहेत की काय असा प्रश्न उपस्थित केला होता व यापुढे ठराव न घेतल्यास आक्रमकपने भूमिका घेऊन शिवसेना च्या पद्धतीने आंदोलनाचा पवित्रा घेणार अशी भूमिका मांडली होती. Gondwana University latest updates
छत्रपती शिवाजी महाराज हे अखिल मानव जातीची प्रेरणा म्हणून जगभर प्रसिद्ध आहे. व्यवस्थापन, नियोजन, पर्यावरण, मानवी मूल्य, युद्धनीती, राजनीति भाषा विकास कला विकास इत्यादी क्षेत्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रचंड मोठे कार्य असून आज देखील ते जगभरातील लोक अभ्यास करतात. महाराष्ट्रातील बहुतांश विद्यापिठात महाराजांचा पुतळा उभारला गेला असून अश्या छत्रपती शिवरायांची अखंड प्रेरणा गो़डवाना विद्यापीठातील विद्यार्थी, प्राध्यापक ,कर्मचारी व इतर सर्वच घटकांना सातत्याने मिळत राहावे म्हणून गोंडवाना विद्यापीठाच्या गडचिरोली येथील परिसरात तसेच चंद्रपूर येथे होऊ घातलेल्या उपकेंद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा करावा तसेच चंद्रपूर येथील गोंडवाना उपकेंद्राच्या परिसरास छत्रपती शिवाजी महाराज परिसर असे नाव देऊन आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरव वाढवावा याकरिता हा ठराव मांडला होता. Shivaji Maharaj legacy in Maharashtra
यानंतर प्रा.बेलखेडे यांनी 24 मार्च 2025 च्या विद्यापीठ सिनेट च्या बैठकीमध्ये विद्यापीठ परिनियम कायदा अंतर्गत कामकाजादरम्यान सभागृहाचे नियम किंवा प्रथागत प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने लागू केल्या गेल्या आहेत किंवा दुर्लक्षित केल्या गेल्या आहेत याबद्दल पॉईंट ऑफ ऑर्डर घेऊन हा विषय मांडला असता कुलगुरू यांनी परवानगी दिली आणि अधिसभेमध्ये गडचिरोली विद्यापीठ अडपेली येथील मुख्य केंद्रआणि चंद्रपूर बाबुपेठ येथील उपकेंद्र येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळा उभारण्यात येईल हा प्रस्ताव सिनेट मध्ये सर्वानुमते मान्य करण्यात आला आणि उपकेंद्र परिसराला नाव देण्याचा संदर्भात प्रस्ताव राज्य सरकार कडे पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळा उभारण्यात येणार या निर्णयामुळे संपूर्ण शिवप्रेमी,विद्यार्थी,युवक- युवतीनी आनंद व्यक्त करीत सर्व स्तरावरून युवासेना सचिव, सिनेट सदस्य प्रा. निलेश बेलखेडे यांचे आभार मानून अभिनंदन करत आहेत.