महाराष्ट्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व ताज्या बातम्या (Latest News) आणि ब्रेकिंग अपडेट्स वाचण्यासाठी रोज भेट द्या news34.in वर. राजकारण, समाजकारण, क्रीडा, गुन्हेगारी आणि आर्थिक घडामोडींचे त्वरित आणि विश्वसनीय कव्हरेज येथे उपलब्ध आहे. २४ तास सुरू असलेल्या घडामोडींची अचूक माहिती मिळवा, जेणेकरून कोणतीही मोठी बातमी तुमच्यापासून सुटणार नाही.
पालकमंत्र्यांच्या हस्ते चंद्रपुरात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे उद्घाटन
mukhyamantri sahayata nidhi kaksh : चंद्रपूर, दि. 1 मे : प्रशासकीय इमारतीच्या पहिल्या माळ्यावर स्थापन करण्यात आलेल्या मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष व धर्मदाय रुग्णालय मदत कक्षाचे राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते आज (दि.1) उद्घाटन करण्यात आले. Charitable hospital assistance program
यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार किशोर जोरगेवार, आमदार सुधाकर अडबाले, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग यांच्यासह कक्ष प्रमुख कथा वैद्यकीय अधिकारी डॉ. कविश्वरी कुंभलकर, समाजसेवा अधीक्षक भास्कर शेळके, वरिष्ठ लिपिक दीपक शेळके आदी उपस्थित होते.
पालकमंत्री डॉ. उईके म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष व धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष स्थानिक स्तरावर स्थापन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व रुग्णांना या कक्षाची माहिती झाली पाहिजे. गरीब रुग्णांना मुंबईला यासाठी चकरा मारा लागू नये म्हणून, स्थानिक पातळीवरच मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून उपचाराची सुविधा उपलब्ध झाली आहे. प्रशासकीय इमारतीच्या पहिल्या माळ्यावर हा कक्ष उभारण्यात आला असून जनतेमध्ये याची जास्तीत जास्त जनजागृती करावी, असे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी सांगितले.
मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष व धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष स्थापनेचा उद्देश : समाजातील गरीब गरजू रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे, निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांना धर्मदाय रुग्णालय अंतर्गत उपचार मिळवून देणे, महात्मा ज्योतिबा फुले /आयुष्यमान भारत योजना तसेच इतर जनआरोग्य योजनांची माहिती रुग्णांना देणे व त्यांना संदर्भित करणे, आरोग्य संबंधित योजनेमध्ये समाविष्ट होऊ न शकणा-या रुग्णांना मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत मदत करणे.
Caste based census India 2025 : चंद्रपुर : केंद्र सरकार जातीनिहाय जनगणना करणार आहे. याबाबत केंद्राने कॅबिनेट बैठकीत हा मोठा निर्णय घेतला आहे. घोषणा होताच काही वेळातच चंद्रपूर शहरात विद्यार्थी व राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी आज (दि.३० एप्रिल) ला एकच जल्लोष केला व केंद्र सरकारच्या निर्णयाचे स्वागत करीत अभिनंदन केले. Caste census benefits India
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार जातीनिहाय जनगणना करणार आहे. आज (दि.३० एप्रिल) ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी झालेल्या कॅबिनेट बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या निर्णयाची माहिती दिली आहे. स्वतंत्र भारतात १९५१ साली पहिली जनगणना करण्यात आली होती. तर २०११ साली यूपीए सरकारच्या काळात अखेरची जनगणना झाली होती. मागील अनेक वर्षांपासून राष्ट्रीय ओबीसी महासंघ व देशातील इतर ओबीसी संघटनाच्या माध्यमातून जातिनिहाय जनगणना करण्यात यावी ही आग्रही मागणी होती. Caste survey news India 2025
अखेर केंद्र सरकारने आता जातीनिहाय जनगणना करण्याची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर चंद्रपूर शहर व जिल्ह्यात विदर्भवादी ओबीसी नेते, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय समन्वयक तथा भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. अशोक जीवतोडे यांच्या नेतृत्वात एकच जल्लोष करण्यात आला. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करुन जल्लोषात केंद्र सरकारचे स्वागत केले.
कॅबिनेट बैठकीतील या महत्त्वाच्या निर्णयाची माहिती देताना मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले, “सामाजिक रचनेचा विचार करून आणि संविधानातील स्पष्ट तरतुदी लक्षात घेऊन मोदी सरकारने हा निर्णय घेतला आहे. आज, दिनांक ३० एप्रिल २०२५ रोजी केंद्र सरकारने पुढील जनगणनेत जातीनिहाय जनगणना समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. हे सरकार आपल्या समाजाच्या व देशाच्या मूल्यांप्रती व हितसंबंधांप्रती कटीबद्ध आहे. हा निर्णय देखील सर्व समाजघटकांच्या कल्याणासाठी घेण्यात आला आहे.
या निर्णयाचा ओबीसी सह इतर सर्वच प्रवर्गातील जातींना फायदा होणार आहे. जातनिहाय जनगणना झाल्यास संविधानाने दिलेल्या अधिकार व हक्कांचे खऱ्या अर्थाने प्रत्येक जातीपर्यंत लाभ पोहोचतील, असे डॉ. अशोक जीवतोडे यावेळी म्हणाले.
child marriage prevention pledge : चंद्रपूर जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनात दिनांक 30 एप्रिल 2025 रोजी बुधवार, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय सभागृहात बालविवाहमुक्त शपथविधी कार्यक्रम पार पडला. जिल्हा महिला व बाल विकास विभाग, जिल्हा बाल संरक्षण कक्ष व “Access to Justice for Children” प्रकल्पाच्यावतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. stop child marriage campaign
अक्षय तृतीयेसारख्या पवित्र दिवशी चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व धर्मगुरूंनी अल्पवयीन मुला-मुलींचे विवाह न लावण्याची प्रतिज्ञा केली. ही बाब सामाजिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण टप्पा मानली जात आहे. child protection awareness 2025
अध्यक्षीय भाषण – श्री. दीपक बानाईत (जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी)
श्री. बानाईत यांनी “रेड झोन” मधील मुलींचा उल्लेख करताना सांगितले की अशा मुलींच्या बाबतीत विशेष काळजी घ्यावी लागते:
शिक्षण अर्धवट सोडलेल्या
स्थलांतरित कुटुंबातील
सामाजिक दबावामुळे लग्नाला प्रवृत्त होणाऱ्या
लैंगिक अत्याचारग्रस्त किंवा प्रेमसंबंधात गुंतलेल्या मुली
या सर्व घटकांचा विचार करून त्या मुलींना समुपदेशन व मार्गदर्शन देणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
प्रमुख पाहुणे ॲड. क्षमा बासरकर यांचे मार्गदर्शन
बालकल्याण समितीच्या अध्यक्षा ॲड. क्षमा बासरकर यांनी स्पष्ट केले की:
बालविवाह हा मुलांच्या अधिकारांचे उल्लंघन आहे
बालिका शारीरिक, मानसिकदृष्ट्या तयार नसतात
बालविवाहामुळे गर्भधारणा, पोषण, आरोग्य यासंबंधी गंभीर समस्या निर्माण होतात
धर्मगुरूंनी विवाह लावताना जन्मप्रमाणपत्राची खात्री करणे आवश्यक आहे
कायद्याचा दंडक – श्री. काशिनाथ देवगडे यांचे स्पष्टीकरण
रुदय संस्था गडचिरोलीचे संचालक श्री. काशिनाथ देवगडे यांनी सांगितले:
बालविवाह ठरविणे, घडविणे, प्रोत्साहन देणे हा गुन्हा आहे
दोषींना २ वर्षांपर्यंत सक्त मजुरी व १ लाख रुपये दंड होऊ शकतो
बालविवाह झाल्यास POSCO कायद्यांतर्गतही गुन्हा दाखल होऊ शकतो
स्त्री गुन्हेगारांना कैदेपासून सूट असते
🤝 धर्मगुरूंसोबत संवाद सत्र – श्री. अजय साखरकर
जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मा. अजय साखरकर यांनी उपस्थित धर्मगुरूंसोबत थेट संवाद साधला व बालविवाह प्रतिबंधासाठी त्यांची भूमिका स्पष्ट केली. विवाह करताना वयाची खात्री करणे, समाजात जागृती करणे व कायदेशीर परिणाम समजावणे यावर भर देण्यात आला.
🎙 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व समारोप
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. शशिकांत मोकाशे सर यांनी केले. कार्यक्रमाचा समारोप धर्मगुरूंना धन्यवाद देऊन करण्यात आला.
school enrollment process : चंद्रपूर – विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे हे शिक्षकांचे कर्तव्य आहे. स्पर्धेच्या या युगात आपला विद्यार्थी कसा समोर जाईल, याचा गांभिर्याने विचार करून शिक्षकांनी अध्यापनाचे कार्य करावे. आजच्या युगात इंग्रजी शाळांचे प्रस्त वाढले असतांना, जिल्हा परिषदेच्या शाळेतसुध्दा विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण आणि उज्वल भविष्य मिळू शकते, असा विश्वास पालकांना देऊन विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढविण्यासाठी सर्व शिक्षकांनी संकल्प करावा, अशा सूचना राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात शिक्षण विभागाचा आढावा घेताना ते बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग, शिक्षणाधिकारी (प्राथ.) अश्विनी सोनवणे, राजेश पाताळे (माध्य.), अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे तसेच इतर अधिकारी उपस्थित होते. school enrollment process
शाळेतील मूलभूत सुविधांसाठी शासन निधीची कमतरता पडू देणार नाही, असे सांगून पालकमंत्री डॉ. उईके म्हणाले, जि.प. शाळांतील विद्यार्थी पटसंख्या का कमी होत आहे, याची कारणमिमांसा होणे आवश्यक आहे. या कारणांचा शोध घेऊन शिक्षण विभागाने पाऊले टाकावीत. पटसंख्या वाढविण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावे. त्यांच्या पाल्यांची गुणवत्ता आणि उज्वल भविष्य आम्ही घडू शकतो, असा विश्वास पालकांना द्या. शैक्षणिक क्षेत्रात असलेल्या ‘असर’ आणि ‘नॅस’ या उपक्रमांचा आधार घेऊन शिक्षण विभागाने प्रयत्न करावे. importance of quality education
शाळेमध्ये शिक्षकांची समिती तयार करून अध्यापनाकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. त्यासाठी शिक्षकांची शिक्षकांकडूनच पडताळणी करा. नवनवीन संशोधन करा. आगामी शैक्षणिक क्षेत्रात शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे अतिशय चांगल्या पद्धतीने स्वागत होण्यासाठी आतापासून नियोजन करा. शैक्षणिक उपक्रमांतर्गत दर 15 दिवसांनी पालकांच्या उपस्थितीत दर्जेदार चावडी वाचन उपक्रम राबवा. ज्या शाळांमध्ये इंटरनेट कनेक्शन आणि विद्युत पुरवठा वारंवार खंडित होतो, त्यासाठी जिल्हा नियोजन समिती मधून निधी देण्यात येईल. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळेत येण्याजाण्याचा त्रास होऊ नये, यासाठी मानव विकास अंतर्गत बसेसचे योग्य नियोजन करा. public school improvement strategies
गाव स्तरावरील शाळांना भेटी द्या : शिक्षण विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांनी गाव स्तरावरील शाळांमध्ये भेटी देऊन नियमितपणे आढावा घ्यावा. ज्या शाळांमध्ये सीसीटीव्ही लावण्यात आले आहे, ते खरंच सुरू आहेत का, शाळेतील तक्रार पेटींचा उपयोग होतो का, याची पडताळणी करावी. सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती योजनांची माहिती विद्यार्थ्यांच्या पालकांपर्यंत पोहोचवा, अशा सुचना पालकमंत्री डॉ. उईके यांनी दिल्या. parent-teacher engagement programs
मानव विकास अंतर्गत 7445 विद्यार्थीनींना सायकलचे वाटप : चंद्रपूर जिल्ह्यात सर्व व्यवस्थापनाच्या एकूण 2461 शाळा असून यापैकी 1549 शाळा जिल्हा परिषदेच्या आहेत. जिल्ह्यात एकूण विद्यार्थी संख्या 3 लक्ष 61 हजार 687 आहे. सखी सावित्री समिती, विद्यार्थी सुरक्षा समिती आणि तक्रार पेटी उपलब्ध असलेल्या शाळांची संख्या 2461 आहे. 475 शाळांमध्ये सीसीटीव्ही लावण्यात आले असून जिल्हा परिषदेच्या 549 शाळांमध्ये सीसीटीव्ही उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. तसेच जिल्ह्यात अपार आयडीचे काम 87 टक्के पूर्ण झाले आहे. मानव विकास अंतर्गत ग्रामीण भागातील 7445 मुलींना सायकलचे वाटप करण्यात आल्याची माहिती शिक्षण विभागाने बैठकीत दिली.
WCL job updates for project affected : चंद्रपूर : राजुरा तालुक्यातील गोवरी पौनी विस्तार योजनेतील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रलंबित नोकरी व इतर महत्त्वाच्या मागण्यांसाठी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या प्रयत्नांना यश आले असून, जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी त्यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत. या निर्णयामुळे गोवरी पौनी प्रकल्पग्रस्तांच्या नोकरीचा प्रश्न मार्गी लागला आहे. project affected people news
बैठकीत उपस्थिती
यावेळी बैठकीत जिल्हाधिकारी विनय गौंडा, भुसंपादन अधिकारी जथाडे, वेकोलि बल्लारपूर क्षेत्राचे क्षेत्रीय महाप्रबंधक इलियास हुसेन, राजुरा नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष तथा काँग्रेस नेते अरुण धोटे, राजुरा काँग्रेस तालुका अध्यक्ष रंजन लांडे,माजी पंचायत समिती सभापती कुंदाताई जेणेकर यासह प्रकल्पग्रस्त व शेतकरी उपस्थित होते.
या योजनेमुळे विस्थापित झालेल्या शेतकऱ्यांच्या नोकरी आणि पुनर्वसनासारख्या समस्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होत्या. यासंदर्भात शेतकऱ्यांनी वारंवार पाठपुरावा केला, मात्र अद्याप त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नव्हत्या. यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी होती. district collector order on jobs
खासदार धानोरकर यांचा पाठपुरावा
खासदार प्रतिभा धानोरकर यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. या निवेदनात त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या विस्तृतपणे मांडल्या होत्या. यात प्रामुख्याने नोकरी संबंधीची प्रलंबित फाईल त्वरित मंजूर करणे, सर्व पात्र प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना दोन महिन्यांच्या आत नोकरी देणे, अधिग्रहित जमिनीच्या क्षेत्राचा ठिकाणीच नोकरी उपलब्ध करणे आणि जोपर्यंत नोकरी मिळत नाही तोपर्यंत जमीन संपादनाची प्रक्रिया थांबवणे या प्रमुख मागण्यांचा समावेश होता. pending farmer job files cleared
पात्र शेतकऱ्यांना सामावून घेणार
यावेळी, नोकरी वाटपात कोणताही भेदभाव न करता सर्व पात्र शेतकऱ्यांना एकाच वेळी सामावून घेणे, वेकोलि द्वारा नोकरी देताना स्थानिक ठिकाणी नोकरी देण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. तसेच महिला, दिव्यांग व्यक्ती तसेच वैद्यकीय कारण जाणून स्थानिक स्थरावर त्यांना रुजु संदर्भात चर्चा करण्यात आली. वेकोलिने नोकरी सरदर्भातील अन्य क्षेत्रात पोष्टीग करण्यासंदर्भात SOP करण्या करण्यात आली आहे, त्यामध्ये बदल करण्या संदर्भात चर्चा करण्यात आली.
तात्काळ निर्णय होणार
त्यासोबतच कोरपना तालुक्यातील विरूर (गाडेगाव), खैरगाव, टाकळी, चिखली येथील सेक्शन ४ व ७ मध्ये नाव असून सुद्धा सेक्शन ९ च्या अधिग्रहण मध्ये सुटलेली आहे. अशा शेतकऱ्यांची शेती अधिग्रहित करण्या संदर्भात चर्चा करण्यात आली. त्यावर वेकोलि वणी क्षेत्राचे महाप्रबंधक संचालन पिशा रोडी यांनी सांगितले कि, भूमी अधिग्रहण संदर्भाने पत्र वेकोलि मुख्यालय येथे महाप्रबंधक भूराजस्व यांच्याकडे पाठविले असून या संदर्भात तात्काळ निर्णय घेण्यात येईल.
शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान
तसेच यावेळी मातीच्या ढिगाऱ्यांमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई करणे, तसेच सांगोळा येथील विशिष्ट सर्वे नंबर आणि वेकोलीच्या खाणकामामुळे होणाऱ्या समस्यांवर तोडगा काढण्याची मागणीही खासदार धानोरकर यांनी केली होती. या सर्व मागण्या मंजूर झाल्यामुळे आज आलेले प्रकल्पग्रस्त व शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले. यावेळी सर्वानी खासदार प्रतिभाताई धानोरकर यांचे आभार मानले.
akshaya tritiya marriage : चंद्रपूर – ३0 एप्रिल रोजी अक्षयतृतीया हा सणआहे. यादिवशी मोठ्या प्रमाणात सामुहिक विवाहसोहळे तसेच वैयक्तिक विवाह आयोजित केले जातात. यामध्ये बालविवाह सुध्दा मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता असते. राज्यामध्ये बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 कार्यान्वित असून महाराष्ट्र शासनाने बालविवाह प्रतिबंध नियम 2022 तयार केले आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गत 5 वर्षात 68 बालविवाह थांबविण्यात आले असून 9 एफआयआर दाखल करण्यात आले आहे. यावर्षी सुध्दा जिल्हा प्रशासन बालविवाह रोखण्यासाठी सज्ज असून गावात बालविवाह होणार नाही, याची दक्षता सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका व सुजान नागरिकांनी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. child marriage act 2006
बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006 संपूर्ण राज्यात लागू करण्यात आला आहे. त्यानुसार बालविवाह आयोजित करणे अजामीनपात्र गुन्हा आहे. बालविकास प्रकल्प अधिकारी(नागरी) हे शहरी भागाकरिता बालविवाह प्रतिबंधक अधिकारी असून, ग्रामसेवक हेग्रामीण भागाकरिता प्रतिबंधक अधिकारी आहे. त्यांना सहायक म्हणून अंगणवाडी सेविका आहेत. गावामध्ये सरपंचांच्या अध्यक्षतेखाली ग्राम बालसंरक्षण समित्या गठित आहे. पोलिस पाटील, आशावर्कर हे त्यासमितीचे सदस्य आहेत व अंगणवाडी सेविका सदस्य सचिव आहेत. त्यामुळे गावात बालविवाह तसेचबालकांच्या संबंधित कोणतीही अघटित घटना होणार नाही, याबाबत खबरदारी घेणे आवश्यक आहे.
तर होऊ शकतो कारावास आणि दंड : बालविवाह झाल्यास विवाह लावणारे भटजी, मौलवी, पादरी, भंतेजी, तसेचमंडपवाले, कॅटरिंग, वाजंत्री विवाह सोहळयात सहभागी होणारी वऱ्हाडी मंडळी, मंगल कार्यालय मालक, वरवधुचेआई–वडील हे बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 अन्वये दोन वर्षाचा सश्रम कारावासाच्या शिक्षेस तसेच एक लाख रुपयापर्यंत दंडाच्या शिक्षेस पात्र असू शकेल. child marriage punishment in India
बालविवाहा बद्दल माहिती देण्याचे आवाहन : ग्रामीण अथवा नागरी क्षेत्रात कुठेही बालविवाह होत असल्यास महिला व बालविभाग अंतर्गत चाईल्डलाईन टोल फ्री क्र.1098 (24तास), जिल्हा बालसंरक्षण कक्ष 7972059274, संस्था क्षेत्रीय अधिकारी 7304583054, असेस टू जस्टीस फॉर चिल्डेन प्रकल्प जिल्हा समन्वयक 9112796463 या क्रमांकावर, जवळचे पोलिस स्टेशन, गावातील ग्रामसेवक अंगणवाडी सेविका, बालविकास प्रकल्प अधिकारी (शहरी/ग्रामीण) यांना त्वरीत माहिती द्यावी. report child marriage India
चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी बालविवाह राखण्याबाबत जागृत राहावे. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल. असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौड़ा जी.सी. यांनी केले आहे.
regional drama competition : चंद्रपूर : विद्युत पुरवठा अविरत ठेवणारे महावितरण आता कला क्षेत्रातही आपली प्रतिभा सादर करण्यासाठी सज्ज झाले आहे. महावितरणच्या नागपूर प्रादेशिक स्तरावरील आंतर परिमंडलीय नाट्य स्पर्धेचे आयोजन चंद्रपूर परिमंडलाच्या यजमानपदाखाली येत्या २ आणि ३ मे २०२५ रोजी प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह, चंद्रपूर येथे करण्यात आले आहे. या दोन दिवसीय नाट्य महोत्सवात महावितरणच्या चंद्रपूर, नागपूर, गोंदिया आणि अकोला परिमंडलांचे नाट्यसंघ आपले कला कौशल्य सादर करणार आहेत. government cultural programs
दैनंदिन जीवनात प्रकाशाची ऊर्जा देणाऱ्या महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये कलागुणांना व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने दरवर्षी या नाट्य स्पर्धेचे आयोजन केले जाते. यावर्षीच्या स्पर्धेचे उद्घाटन महावितरणचे संचालक (प्रकल्प) प्रसाद रेशमे यांच्या हस्ते शुक्रवार, दि. २ मे २०२५ रोजी सकाळी ९ वाजता होणार आहे. तर, शनिवार, दि. ३ मे २०२५ रोजी सायंकाळी 7.00 वाजता महावितरणचे संचालक (संचालन व मानव संसाधन) अरविंद भादिकर यांच्या शुभहस्ते पारितोषिक वितरण समारंभ पार पडेल. या दोन्ही कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक परेश भागवत असतील. msedcl drama competition
या महत्त्वपूर्ण सोहळ्याला संचालक (वाणिज्य) योगेश गडकरी व संचालक (वित्त) अनुदिप दिघे आणि संचालक (मा.सं.) राजेंद्र पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. तसेच, संचालक (वन प्रबोधिनी) चंद्रपूर, एम. श्रीनिवास रेड्डी, गोंदिया परिमंडलाचे मुख्य अभियंता सुहास रंगारी, नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके, अमरावती परिमंडलाचे मुख्य अभियंता ज्ञानेश कुलकर्णी आणि अकोला परिमंडलाचे मुख्य अभियंता राजेश नाईक यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
या दोन दिवसीय नाट्य स्पर्धेत शुक्रवार, दि. २ मे २०२५ रोजी सकाळी ११ वाजता चंद्रपूर परिमंडल श्रीपाद जोशी लिखित ‘रंगबावरी’ हे नाटक सादर करेल. सायंकाळी ४.३० वाजता नागपूर परिमंडलाचा प्रदीप फाटक लिखित ‘ये रे घना’ चा नाट्यप्रयोग रंगणार आहे. शनिवार, दि. ३ मे २०२५ रोजी सकाळी १० वाजता गोंदिया परिमंडल अतुल साळवे यांच्या ‘दि ॲनॉनीमस’ या नाटकाद्वारे आपली कला सादर करेल, तर दुपारी ३ वाजता अकोला परिमंडल डॉ. चंद्रकांत शिंदे लिखित ‘सिकॅरिअस’ हे नाटक घेऊन येत आहे. office drama competition
अभिनय, संवाद, संगीत, प्रकाश योजना, नेपथ्य आणि दिग्दर्शन यांसारख्या नाट्य घटकांसाठी ही प्रादेशिक स्तरावरील आंतरपरिमंडलीय नाट्यस्पर्धा अत्यंत चुरशीची ठरणार आहे. चंद्रपूरमधील रसिकांसाठी ही स्पर्धा एक उत्कृष्ट नाट्य मेजवानी असेल यात शंका नाही. नाट्यस्पर्धेचा स्वागताध्यक्ष आणि महावितरणच्या चंद्रपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता हरिश गजबे यांनी नाट्यप्रेमी रसिकांना या निःशुल्क आणि दर्जेदार नाट्यकृतींचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आग्रहाचे निमंत्रण दिले आहे.
Satyashodhak vivah : चंद्रपूर – सुसा : आता लग्न म्हटलं तर हुंडा, भव्य दिव्य सजावट आणि रोशनाई, डीजे, बँड बाजा, दाग दागिने, पंचपक्वान्न याचा प्रचंड ट्रेंड निर्माण झालेला आहे. यासाठी अतोनात खर्च करण्याची परंपरा पूर्णता रुजली असतानाही चंद्रपूर जिल्ह्यातील सुसा या गावात कमीत कमी खर्चाचा सत्यशोधक विवाह सोहळा 28 एप्रिल 2025 ला पार पाडला. या लग्नात आगाऊ खर्च टाळून नवरदेवाने गावातील शिवारस्ते बांधले. तर गावातील आणि इतर नातेवाईकांनी सोबतच मित्रांनी लग्नानिमित्त जोडप्याला झाडांचा आहेर आणण्यात आला. simple village wedding
सुसा गावातील श्रीरंग गणपत एकुडे यांचा मुलगा श्रीकांत आणि यवतमाळातील मोझर या गावचे गोपीकिसन गरमडे यांची मुलगी अंजली यांचा विवाह पार पडला. नवरदेव असलेले श्रीकांत एकुडे हे उच्चशिक्षित असून त्यांचे शिक्षण एम एस सी ऍग्री पर्यंतचे झाले असून ते परिसरातील प्रगतशील शेतकरी आहेत. सोबतच सामाजिक संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवत असतात. जेव्हा त्यांनी लग्न करण्याचा विचार केला तेव्हा त्यांची फक्त एकच अट होती. ती म्हणजे लग्न हे नोंदणी पद्धतीने किंवा सत्यशोधक पद्धतीने करायला मुलगी आणि कुटुंब तयार असावे.
चंद्रपूर जिल्ह्यातील प्रगतिशील आणि कृषीभूषण पुरस्कार प्राप्त शेतकरी सुरेश गरमडे यांच्या मध्यस्थीने हा योग जुळवून आणला. जेव्हा सुरेश गरमडे यांनी प्रस्ताव मुलगी अंजलीच्या वडिलांकडे ठेवला तेव्हा त्यांनी निर्णय घ्यायला थोडा वेळ घेतला. घरच्यांसोबत बोलून त्यांनी होकार कळवला. वधू मुलीची मानसिक कुचंबना करणाऱ्या लग्न जोडण्याच्या पारंपारिक पद्धतीला बाजूला सारत मुला मुलींच्या चर्चा व संवादाच्या माध्यमातून आधुनिक प्रगतशील विचाराने लग्न जोडण्यात आले. no cost wedding celebration
लग्नात कोणताही अवाढ्यव्य खर्च करायचा नाही. हुंडा, भव्य दिव्य सजावट आणि रोशनाई, डीजे, बँड बाजा, दाग दागिने, पंचपक्वान्न या गोष्टी शंभर टक्के टाळायच्या. हेच पैसे सर्वांना उपयोगी अशा ठिकाणी वापरायचे हे दोन्ही कुटुंबाचे ठरले. Satyashodhak vivah
शेतकऱ्यांच्या सोयीसाठी केले 2 हजार फूट शिवार रस्त्याचे काम पावसाळ्यात शिवार रस्त्यांची अवस्था फारच वाईट होती. शेतकऱ्यांना तर सोडा जनावरांनाही जाणे शक्य होत नाही. म्हणून श्रीकांतने लग्न खर्चातून बचत करत अतिशय अडचणीच्या असणाऱ्या दोन शिवार रस्त्याचे खडीकरण केले. यामुळे आता शिवारातील शेतकऱ्यांना पावसाळ्यात सुद्धा ये- जा करता येणार आहे. शेतकऱ्याचे उत्पादनाला योग्य भाव न मिळाल्यामुळे व नैसर्गिक आपत्तीमुळे आर्थिक परिस्थिती बेताचीच असते. तरीपण कर्ज काढून लग्न थाटामाटात करण्याची परंपरा आजही कायम आहे. परंतु या युवा शेतकऱ्याने या परंपरेला बाजूला सारत शेतकरी हिताचाच विचार करत 2000 फुटापेक्षा जास्त लांबीचे शिवार रस्त्याचे खडीकरण केले. यामुळे शेतकऱ्यांना दळणवळण करणे सोयीचे झाले आहे.
शेतात केली विविध फळझाडांची लागवड सत्यशोधक विवाह सोहळा असल्याने आहेर पद्धत ठेवायची नव्हती. आणि नाही कुठल्या कुलर, कपाट, फ्रिज, सोफा, भांडे यासारख्या महागड्या वस्तू सुद्धा हव्या होत्या. परंतु सृजनशील असलेल्या श्रीकांतने सर्व नातेवाईकांसमोर फळझाडं भेटवस्तू स्वरूपात देण्याचा संकल्प बोलून दाखवला. आणि आश्चर्य म्हणजे नातेवाईक आणि मित्रांनी सुद्धा या संकल्पनेला प्रतिसाद देत तब्बल 90 पेक्षा जास्त फडझाड भेट स्वरूपात दिली. यामध्ये 36 प्रकारच्या विविध फडझाडांचा समावेश आहे. Satyashodhak vivah
विदर्भात पिकत असलेल्या फळझाडासोबतच स्टारफ्रूट, वॉटर एप्पल, चकोत्रा, मलबेरी, लिची, रबर, अशा फडझाडांचा सुद्धा समावेश आहे. तर चारोळी कवट, बेल, मोह या जंगली फळझाडांचा सुद्धा समावेश आहे. सोबतच पावसाळ्यामध्ये विविध वेली, रानभाज्या, औषधी वनस्पती यांची त्या ठिकाणी लागवड करण्याचा संकल्प आहे. यामुळे त्यांचे शेतामध्ये 1600 स्क्वेअर मीटरचे एक फ्रुट फॉरेस्टच निर्माण होणार आहे. या लग्नाची पंचक्रोशीत सकारात्मक व नकारात्मक चर्चा होत आहे. कर्ज काढून लग्नात वारेमाप खर्च करून स्वतःच भविष्य गहाण ठेवणाऱ्या लोकांसाठी या विवाहाने आदर्श ठेवला आहे. त्यामुळे विवाहाचे कौतुक सुद्धा होत आहे. या समारंभाप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. fruit forest farming
“शेतकऱ्यांनी अगोदर स्वतःचा आणि स्वतःच्या शेतीच्या विकासाचा विचार केला पाहिजे. सरकार किंवा समाजव्यवस्था शेतकऱ्यांचा विचार करत नाही ही वस्तुस्थिती असताना शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनीच पुढाकार घ्यायला पाहिजे. म्हणून मी शिवार रस्ते तयार केले. तसेच भविष्यात आपले लोकं जंगलाचं अस्तिव राहील का? जंगली झाडं फळं पुढील पिढीला पाहायला चाखायला मिळेल का? हे माझ्या समोर प्रश्न निर्माण झाले होते. म्हणून मी माझ्या शेतातच नातेवाईकांच्या मदतीने फ्रुट फॉरेस्ट तयार करण्याचं ठरवले. याला ते विरोध करतील पण माझे मित्र आणि नातेवाईक यांनी उत्स्पूर्त प्रतिसाद दिला. याचा मला भरपूर आनंद आहे. यामुळे लग्नसंस्थेत नवीन व्यवस्था निर्माण व्हावी अशी आशा आहे.” — श्रीकांत एकुडे.
How to become Mathadi Board member Chandrapur : उच्च न्यायालयाच्या प्राप्त निर्देशानुसार, माथाडी अधिनियमाच्या कलम 6 अन्वये चंद्रपूर – गडचिरोली जिल्हा माथाडी व असंरक्षित कामगार मंडळ गठीत करण्याचे शासनाचे नियेाजन आहे. या मंडळावर सदस्य म्हणून कामगार/मालक प्रतिनिधी यांची नेमणुक करण्याकरीता इच्छुक पात्र व्यक्तीकडून 10 मे 2025 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत. Maharashtra Mathadi Act Section 6 recruitment
कार्यरत इच्छुक मालक आस्थापना त्यांच्या असोसिएशन्स व मालकांचे प्रतिनिधित्व करू इच्छिणा-या व्यक्ती तसेच असंरक्षित कामगार, त्यांच्या संघटना व असंरक्षित कामगारांचे प्रतिनिधीत्व करू इच्छिणा-या कामगारांनी आपले अर्ज / नामानिर्देशीत व्यक्तीबद्दलच्या शिफारशी, संबधितांचे पूर्ण नाव, पत्ता व चारित्र्य पडताळणी दाखला तसेच माथाडी कामगार क्षेत्रातील कार्य, अनुभव इत्यादी तपशिलांसह 10 मे 2025 पूर्वी प्राप्त होतील अशा पध्दतीने सादर करावेत.
मंडळास प्राप्त झालेल्या अर्ज व शिफारशीमधुन योग्य त्या व्यक्तीची निवड करून मंडळ सदस्यपदी नेमणुक करण्याचा अधिकार शासनाला आहे. कोणत्याही व्यक्तीचा अर्ज, नामनिर्देशित व्यक्तीची शिफारस कोणतेही कारण न देता नाकारण्याचा अधिकार शासनाकडे राहील, असे चंद्रपूर – गडचिरोली जिल्हा माथाडी व असंरक्षीत कामगार मंडळ, चंद्रपूर यांनी कळविले आहे.
How to get free soil from Irai River project : चंद्रपूर – जिल्हा प्रशासनाच्या वतीने चंद्रपूर शहराची जीवनदायिनी असलेल्या इरई नदीचे खोलीकरण अभियान सुरू करण्यात आले आहे. 25 एप्रिल रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी आज (दि. 28) कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. Vinay Gowda review of Irai River cleaning progress
जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीला उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू, अतिरिक्त जिल्हाधिकारी नितीन व्यवहारे, मनपा आयुक्त विपीन पालिवाल, अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नुतन सावंत, तहसीलदार विजय पवार व इतर अधिकारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, इरई नदी खोलिकरण अभियान 45 दिवस चालणार असून या कामासाठी जिल्हा प्रशासनाने वेगवेगळ्या समित्यांचे गठन केले आहे. यात नियेाजन समिती, गौन खनीज /साठा विल्हेवाट समिती, निधी / यंत्र सामुग्री उपलब्धता समिती, खोलीकरण क्रियान्वयन समिती, यंत्रसामुग्री दर निश्चिती, लागणारे इंधन व वंगण खर्च समिती, भरण करावयाच्या जागा निश्चिती व नियोजन समिती, प्रचार – प्रसार व जनजागृती समिती यांचा समावेश आहे. District administration initiatives for Irai River rejuvenation
प्रत्येक समित्यांनी आपापले काम अतिशय गांभिर्याने करणे आवश्यक आहे. नदीच्या खोलिकरणातून काढण्यात आलेला गाळ शेतक-यांना नि:शुल्क उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी शेतक-यांना वाहनाची व्यवस्था स्वत: करावी लागेल. तर व्यावसायिक कामासाठी निश्चित करण्यात आलेली रॉयल्टी व आवश्यक शुल्क भरणा करून वाळू किंवा वाळूमिश्रीत गाळ नेता येणार आहे. ज्यांना खोलिकरणातून गाळ, किंवा वाळू न्यायची आहे त्यांच्या कागदपत्रांची पुर्तता करण्यासाठी एसओपी तयार करावी, अशा सुचना जिल्हाधिका-यांनी दिल्या.