Category: ताज्या बातम्या

महाराष्ट्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व ताज्या बातम्या (Latest News) आणि ब्रेकिंग अपडेट्स वाचण्यासाठी रोज भेट द्या news34.in वर. राजकारण, समाजकारण, क्रीडा, गुन्हेगारी आणि आर्थिक घडामोडींचे त्वरित आणि विश्वसनीय कव्हरेज येथे उपलब्ध आहे. २४ तास सुरू असलेल्या घडामोडींची अचूक माहिती मिळवा, जेणेकरून कोणतीही मोठी बातमी तुमच्यापासून सुटणार नाही.

  • Irai river deepening Chandrapur project । पूर आता इतिहास? चंद्रपूरसाठी इरई नदी बनतेय सुरक्षा कवच!

    Irai river deepening Chandrapur project

    Irai river deepening Chandrapur project : चंद्रपूर, दि. 4 मे : चंद्रपूर शहराला 9 कि.मी. समांतर वाहणा-या इरई नदीच्या खोलीकरणाचे काम जिल्हा प्रशासनाच्यावतीने हाती घेण्यात आले आहे. या मोहिमेत शासनाच्या विविध विभागांचा सहभाग असून सामाजिक संघटना, लोकसहभाग आदींच्या माध्यमातून सदर मोहीम 45 दिवस निरंतर सुरू राहणार आहे. विविध यंत्रसामुग्रीच्या माध्यमातून सद्यस्थितीत नदीच्या खोलीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे. flood prevention Irai river Chandrapur

    घरकुल धारकांना रेती उपलब्ध होणार, सुधीर मुनगंटीवार ऍक्शन मोडमध्ये

    पुराचा वेढा कमी होणार

    चंद्रपूर शहर ते इरई – वर्धा नदी संगमापर्यंतच्या 17 कि.मी. लांबीत इरई नदी पात्रातील वाढलेली झाडेझुडपे, गाळ काढून नदी पात्राचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे नदी पात्राची पूर वहन क्षमता वाढण्यास मदत होईल व शहराला दरवर्षी पडणारा पुराचा वेढा कमी होईल, या उद्देशाने  25 एप्रिल 2025 रोजी राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते इरई नदी खोलीकरण अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. तीन टप्प्यात खोलीकरण करण्यात येणार असून पहिला टप्पा रामसेतू ते चौराळा पुल, दुसरा टप्पा माना टेकडी (लालपेठ कॉलरी) आणि तिसरा टप्पा इरई ते वर्धा नदी संगमापर्यंतचा आहे. benefits of Irai river deepening

    ५ हजार ६०० ब्रास गाळ बाहेर

    पहिल्या टप्प्यात राम सेतू ते चौराळा पुल दरम्यान अम्युझमेंट पार्कजवळ काम सुरू असून आतापर्यंत नदीपात्रातील 200 मीटर जागेतील 14 टीसीएम (अंदाजे 5600 ब्रास ) गाळ काढण्यात आला आहे. यासाठी 8 पोकलॅन मशीन, 15 हायवा / टिप्पर, 9 टॅक्टर, 2 जे.सी.बी. सद्यस्थितीत असले तरी ही यंत्रसामुग्री वाढविण्याचे जिल्हा प्रशासनाचे नियोजन आहे.

    flood prevention Irai river Chandrapur
    इरई नदी खोलीकरण: पहिल्या टप्प्यातील काम प्रगतीपथावर.
    शेतकऱ्यांना गाळ निशुल्क उपलब्ध

    सदर मोहिमेत जिल्हा परिषद, पोलीस प्रशासन, वन विभाग, चंद्रपूर महानगरपालिका, कृषी विभाग, पाटबंधारे विभाग, भूमि अभिलेख कार्यालय, जिल्हा खनिकर्म, प्रादेशिक परिवहन विभाग, पाटबंधारे विभाग, महाराष्ट्र प्रदुषण महामंडळ ही सर्व शासकीय कार्यालये, सीटीपीएस व डब्ल्युसीएल या खाजगी आस्थापना तर भारतीय जैन संघटना, नाम फाऊंडेशन व टाटा ट्रस्ट या स्वयंसेवी संस्थांचा सहभाग आहे. मोहिमेदरम्यान निघणारा सुपीक गाळ शेतक-यांना निःशुल्क उपलब्ध करून देण्यात येत आहे. मात्र त्यासाठी वाहनाची व्यवस्था शेतक-यांनी स्वत: करायची आहे.

  • minor assault company case । खंडणीचा खोटा गुन्हा? युवासेनेच्या सहारे यांनी उघड केली कंपनीची लबाडी!

    minor assault company case

    अल्पवयीन मुलाला कामावर घेऊन मारहाण; कंपनीचा घाणेरडा चेहरा उघड!

    minor assault company case : अल्पवयीन मुलाला कामावर ठेवत त्याला मारहाण केल्याप्रकरणात कावेरी सी ५ जेव्ही या कंपनीच्या प्रकल्प व्यवस्थापकावर दुर्गापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे सदर अल्पवयीन मुलाचे प्रकरण उचलल्याने याच कंपनीने युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र जिल्हा बाल संरक्षण समितीच्या आदेशानंतर प्रकल्प व्यवस्थापकावर गुन्हे दाखल झाल्याने सहारे यांच्यावर खंडणीचा खोटा गुन्हा दाखल केला असल्याचे कंपनीचे पितळ उघडे पडले आहे. Shiv Sena youth leader news

    गडचांदुरातील सट्टापट्टी वर पोलिसांची कारवाई, news३४ चा दणका

    डिसेम्बर २०२४ मध्ये अल्पवयीन मुलाला रोजगार देतो म्हणून तत्कालीन एचआर गिरी सिद्धापल्ली याने २० हजार रुपये घेत अल्पवयीन मुलाला कावेरी कंपनीत कामावर ठेवले. कावेरी कंपनी वेकोलीमध्ये माती उत्खनन करण्याचे काम करते. काही दिवसांनी प्रकल्प व्यवस्थापक व्यंकटेश रेड्डी रामण्णा रेड्डी हे सुट्टीवरून परतल्यावर रेड्डी यांनी अल्पवयीन मुलाला कार्यालयात बोलावून घेतले व त्याला शिवीगाळ व मारहाण करण्यात आली. हि बाब कुणाला सांगितल्यास जीवे मारून टाकू अशी धमकी त्या मुलाला दिली. minor abuse case in company

    अल्पवयीन मुलाला रेड्डी यांनी कामावरून कमी केली मात्र त्याला कामाचा मोबदला दिला नाही, याबाबत अल्पवयीन मुलाने जिल्हा बाल संरक्षण समितीकडे दाद मागितली होती. याबाबत मुलगा व त्याच्या आईचे बयान नोंदविण्यात आले, संपूर्ण प्रकरणाची शहानिशा केल्यावर जिल्हा बाल संरक्षण समितीने कावेरी कंपनीवर कायदेशीर कारवाई करण्यासंदर्भात आदेश दिला. district child protection committee action

    ३ मे ला जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर व हृदय संस्थेचे क्षेत्रीय अधिकारी शशिकांत मोकासे यांनी दुर्गापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. दुर्गापूर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम १२५, ३५१ (२), ३ (५), अल्पवयीन न्याय मुलांची काळजी व संरक्षण कायदा २०१५ कलम ७५, ७९, बालकामगार प्रतिबंध आणि विनियमन कायदा १९८६ कलम ३ (A), १४ अंतर्गत एचआर हेड गिरी सिद्धापल्ली व कावेरी कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक व्यंकटेश रेड्डी रामण्णा रेड्डी यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. Juvenile Justice Act

    नेमकं प्रकरण काय?

    अल्पवयीन मुलाला कावेरी कंपनीत कामावर रुजू केले, त्यानंतर त्याला व्यवस्थापक रेड्डी यांनी शिवीगाळ करीत मारहाण केली, पीडित मुलाच्या आईने न्यायासाठी शिवसेना युवासेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांचे दार ठोठावले, सहारे यांनी आई व मुलाला सोबत घेत कंपनी व्यवस्थापक रेड्डी यांना जाब विचारला असता तुम्हाला जे करायचं आहे ते करा असे सुनावले, सहारे यांनी कामगार आयुक्त व बाल संरक्षण समितीकडे तक्रार दाखल केली.

    तक्रार का दाखल केली म्हणून रेड्डी यांनी सहारे यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला, मात्र कंपनीच्या कर्मचाऱ्याने खंडणीचा कसलाही प्रकार घडला नसल्याचे हमीपत्र न्यायालयात सादर केल्याने रेड्डी यांची गोची झाली. यानंतर सहारे यांनी संबंधित विभागाकडे पाठपुरावा करीत अल्पवयीन मुलाला न्याय देण्यासंदर्भात प्रयत्न केले, अखेर ३ मे रोजी दुर्गापूर पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमांव्ये रेड्डी व सिद्धापल्ली यांच्यावर गुन्हे दाखल झाले. minor abuse case in company

    माझं राजकीय आयुष्य उध्वस्त करण्याचा प्रयत्न – विक्रांत सहारे

    अल्पवयीन मुलाला मारहाण प्रकरणात रेड्डी व सिद्धापल्ली यांच्यावर दाखल झालेले गुन्हे हा सत्याचा विजय आहे, आम्ही प्रकरण उचलले म्हणून माझ्यावर खंडणीचा खोटा गुन्हा दाखल केला मात्र आम्ही मागे हटलो नाही, सतत पाठपुराव्याचे फलित उशिरा का होईना अखेर मिळाले, माझं राजकीय आयुष्य उध्वस्त करण्याचा हा एक प्रयत्न होता, पण प्रयत्न फसला, याबाबत आता न्यायालयही लढाई आम्ही लढणार असून अल्पवयीन मुलाला न्याय दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही.

  • Chandrapur tiger attack update । चंद्रपूर जिल्ह्यात वाघाचा थरार; वर्षातील 13 वा बळी

    Chandrapur tiger attack update

    Chandrapur tiger attack update : चंद्रपूर जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्ष दिवसेंदिवस वाढत असून, या संघर्षाने काल गुरुवारी (1 मे) पुन्हा एक जीव घेतला. शौचासाठी गेलेल्या एका 30 वर्षीय युवकावर वाघाने अचानक हल्ला करून त्याचा जागीच बळी घेतल्याची धक्कादायक घटना घडली. मृतकाचे नाव दिवाकर बाबुराव जुमनाके असून तो चंद्रपूर तालुक्यातील चक पिंपळखुट येथील रहिवासी होता. man killed by tiger in forest

    इरई नदी खोलीकरणावर खासदार धानोरकर यांनी उपस्थित केले अनेक प्रश्न

    🔍 घटनास्थळाची माहिती:

    सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवाकर जुमनाके हे रात्री सुमारे 10 वाजता चक पिंपळखुट गावालगतच्या चिचपल्ली वनपरिक्षेत्रातील चंद्रपूर वनविभागाच्या कक्ष क्रमांक 1005 मध्ये शौचासाठी गेले होते. अंधार व वनक्षेत्राच्या सीमेवर वावरत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला. वाघाच्या हल्ल्यात दिवाकर यांचा जागीच मृत्यू झाला. tiger kills man near forest

    🛑 प्रशासनाची कारवाई:

    या घटनेची माहिती मिळताच पोलिस व वनविभागाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला व पुढील कारवाईसाठी तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.

    🧓 कुटुंबावर दुःखाचा डोंगर:

    या अनपेक्षित घटनेने दिवाकर यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. वनविभागाच्या वतीने तत्काळ मदतीच्या स्वरूपात ३० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे. स्थानिक ग्रामस्थांनि वाघाचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे.

    🐅 वाघाच्या हल्ल्याचा १३ वा बळी:

    ही घटना चालू वर्षात चंद्रपूर जिल्ह्यातील वाघाच्या हल्ल्यातील १३ वा बळी ठरली आहे. त्यामुळे जिल्ह्यात वाघांचा वावर वाढल्याची भीती नागरिकांमध्ये पसरली आहे. मागील काही महिन्यांपासून वाघांचे मानववस्तीत व मानवांचे जंगलात घुसण्याचे प्रमाण वाढले असून, त्यामुळे वनविभागावर नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी अधिक वाढली आहे.

    🗣️ स्थानिकांची मागणी:

    चक पिंपळखुट व परिसरातील ग्रामस्थांनी या घटनेनंतर वनविभागाकडे संतप्त भावना व्यक्त केल्या असून, या भागात वाघाचा वावर रोखण्यासाठी तत्काळ पिंजरा लावणे, नाईट पेट्रोलिंग वाढवणे आणि लोकजागृती करणे यासारख्या उपाययोजना राबवण्याची मागणी केली आहे.

  • NEET exam instructions for Chandrapur candidates । चंद्रपूर NEET परीक्षार्थींनो, प्रवेशपत्रासोबत काय न्यायचं?

    NEET exam instructions for Chandrapur candidates

    NEET exam instructions for Chandrapur candidates : चंद्रपूर – रविवार, दि. 4 मे 2025 रोजी जिल्ह्यातील 9 परीक्षा केंद्रावर NEET (UG) ची परीक्षा होणार असून जिल्ह्यातील 3619 विद्यार्थी या परिक्षेला बसणार आहेत.

    चंद्रपूरचे जिल्हाधिकारी राज्यात सर्वोत्कृष्ट

    नीट (यूजी) उमेदवारांसाठी सूचना : हे करा : प्रवेशपत्रात दिलेल्या परीक्षेचा योग्य पत्ता, केंद्र  गाठले आहे की नाही, यांची पडताळणी करा. मुख्य गेटवर आपले ओळखपत्र आणि प्रवेश पत्र दाखवा. कृपया तपासणी साठी  सुरक्षा कर्मचाऱ्याला सहकार्य करा. केंद्राबाहेर दर्शविलेल्या आसन योजनेसह आपला रोल नंबर, केंद्र क्रमांक, खोली क्रमांक तपासा. ॲडमिट कार्डची हार्ड कॉपी, पोस्टकार्ड साइज फोटो प्रिंट कॉपी सोबत ठेवा. केंद्रात पारदर्शक पाण्याच्या बाटलीला परवानगी आहे. केंद्रात प्रवेशाच्या क्रमाचे अनुसरण करा (बाण  चिकटवलेले). तपासणी, नोंदणी आणि बायोमेट्रिक मधून जा आणि परीक्षा कक्षात पोहोचा. परीक्षा केंद्रात सकाळी 11 ते दुपारी  1.30 वाजेपर्यंत उमेदवारांना प्रवेश आहे. NEET 2025 Chandrapur students reporting time

    हे करू नका : उमेदवारांना कोणत्याही परिस्थितीत परीक्षा केंद्रात  खालील वस्तू घेऊन जाण्याची परवानगी नाही. शिवाय, उमेदवाराने आणलेल्या कोणत्याही वस्तूच्या सुरक्षिततेसाठी परीक्षा केंद्र जबाबदार नाही.

    पाठ्यपुस्तकसामग्री मुद्रित किंवा लिखित, कागदांचे तुकडे, भूमिती/ पेन्सिल बॉक्स,प्लास्टिक पाऊच, कॅल्क्युलेटर, स्केल, रायटिंग पॅड, पेनड्राइव्ह, इरेजर, कॅल्क्युलेटर, लॉग टेबल, इलेक्ट्रॉनिक पेन/स्कॅनर इत्यादि कोणतीही स्टेशनरी वस्तू, मोबाइल फोन, ब्लूटूथ, इयरफोन, मायक्रोफोन, पेजर, हेल्थबँड इत्यादि कोणतेही कम्युनिकेशन डिव्हाइस, वॉलेट,गॉगल्स, हॅडबॅग्ज, बेल्ट कॅप इत्यादि इतर वस्तु कोणतेही घडयाळ/मनगटी घडयाळ, ब्रेसलेट, कॅमेरा इ. कोणतेही दागिने, कोणतीही खाण्यायोग्य  वस्तू उघडलेली किंवा पॅक केलेली वगैरे. मायक्रोचिप, कॅमेरा ब्लूटूथ डिव्हाइस इत्यादि संप्रेषण साधने लपवून अनुचित सांधनासाठी वापरली जाणारी इतर कोणतीही वस्तू. list of prohibited items NEET exam Chandrapur

    केंद्रात कोणत्याही उमेदवाराकडे प्रतिबंधित वस्तूपैकी कोणतीही वस्तू आढळल्यास ती अनुचित मार्गाचा वापर  मानली जाईल आणि संबंधित तरतुदींनुसार उमेदवारावर कारवाई केली जाईल. NEET exam day guidelines Chandrapur Maharashtra

    परीक्षा केंद्र व पार्किंग व्यवस्था : 1) केंद्रीय विद्यालय डब्ल्यूसीएल दुर्गापूर, चंद्रपूर (पार्किंग – शाळेच्या गेटसमोरील ग्राऊंडवर) 2) पी.एम. श्री. केंद्रीय विद्यालय ऑर्डनन्स फॅक्ट्ररी चांदा, भद्रावती (समोरील मार्केट परिसर) 3) गर्व्हमेंट कॉलेज आॉफ इंजिनियरींग, चंद्रपूर (वाहतुकीस अडथळा होणार नाही, अशा पध्दतीने पार्किंग करावी)

    4) डॉ. आंबेडकर कॉलेज ऑफ आर्ट, कॉमर्स ॲन्ड सायन्स, चंद्रपूर (चांदा क्लब ग्राऊंड) 5) नारायणा विद्यालय, पडोली चंद्रपूर (वाहतुकीस अडथळा होणार नाही, अशा पध्दतीने पार्किंग करावी)  6) इंदिरा गांधी गार्डन स्कूल, रामनगर चंद्रपूर (संत्रा मार्केट) 7) श्री. महर्षी विद्या मंदीर, चंद्रपूर (शाळेच्या गेटसमोरील ग्राऊंडवर) 8) माऊंट कार्मेल कॉन्व्हेंट हायस्कूल (वाहतुकीस अडथळा होणार नाही, अशा पध्दतीने पार्किंग करावी) आणि 9) राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनियरींग रिसर्च ॲन्ड टेक्नॉलॉजी, चंद्रपूर. (वाहतुकीस अडथळा होणार नाही, अशा पध्दतीने पार्किंग करावी) NEET exam day guidelines Chandrapur Maharashtra

  • Best district collector in Maharashtra 2025 । विनय गौडा ठरले महाराष्ट्रातील सर्वोत्तम जिल्हाधिकारी!

    Best district collector in Maharashtra 2025

    Best district collector in Maharashtra 2025 : राज्य शासनाच्या 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा मोहिमेत चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. हे राज्यातून सर्वोत्कृष्ट ठरले आहे. जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या नेतृत्वात 84.29 गुण मिळवत चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयाने राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला.

    विद्यार्थी-शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करणाऱ्या अडबाले यांना मोठी जबाबदारी

                मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून राज्यातील शासकीय कार्यालयांना शिस्त लावणे, नागरिकांची कामे जलदगतीने पूर्ण होणे आणि शासन-प्रशासन व नागरिकांमधील विश्वास वृद्धिंगत होणे या उद्देशाने 100 दिवसांची कार्यालयीन सुधारणा मोहिम हाती घेण्यात आली होती. या मोहिमेच्या पहिल्या टप्प्याचे मूल्यमापन महाराष्ट्र दिनी जाहीर करण्यात आले. यात उत्कृष्ट जिल्हाधिकारी कार्यालय श्रेणीत चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयाने बाजी मारली. तर द्वितीय क्रमांक जिल्हधिकारी कार्यालय, कोल्हापूर (गुण 81.14), तृतीय जिल्हाधिकारी जळगाव (80.86), चतुर्थ जिल्हाधिकारी अकोला (78.86) आणि पाचवा क्रमांक जिल्हाधिकारी नांदेड (66.86 गुण) यांनी पटकाविला. Vinay Gowda Chandrapur district achievements

    याबाबत बोलतांना जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयाला राज्यात प्रथम क्रमांक मिळाला, ही आपल्या सर्वांसाठी अतिशय अभिमानाची बाब आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी – कर्मचा-यांचे यात मोठे योगदान आहे. लोकांना अधिकाधिक चांगल्या सेवा कशा देता येईल, शासन त्यांच्यापर्यंत कसे पोहचले, याबाबत योग्य नियोजन करण्यात आले. तसेच शासनाच्या सुचनेप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील संकेतस्थळाचे अद्ययावतीकरण, तक्रार निवारण, अभ्यागतांसाठी सोयीसुविधा, ई-ऑफिस प्रणालीचा वापर, कृत्रीम बुध्दीमत्तेचा वापर करून अधिकार व कर्मचा-यांना प्रशिक्षण, गुंतवणूकीस प्रोत्साह आणि नाविन्यपूर्ण उपक्रमाचा यात समावेश होता, असे जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी सांगितले. Top performing districts in Maharashtra 2025

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून विजेत्यांचे अभिनंदन : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व विजेत्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. ते म्हणाले, गुणवत्ता मोहिम एक सुरवात आहे. भविष्यातील महाराष्ट्राच्या प्रशासनासाठी ही एक आदर्श कार्यपद्धती ठरेल. नागरिकांना जीवन सुखकर करण्यासाठी ही मोहिम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेचे चळवळीत रुपांतर होऊन नागरिकांना उत्तम सेवा देण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी काम करावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

    मुल्यांकन पध्दत : भारतीय गुणवत्ता परिषद (Quality Council of India)  मार्फत संकेतस्थळ अद्यावतीकरण व कार्यक्षमता, कार्यालयीन सोयीसुविधा, तक्रार निवारण व्यवस्था, गुंतवणूक अनुकूलता, नागरिकांसाठी सेवा सुलभता, तंत्रज्ञान वापर अशा दहा निकषांवर आधारित मूल्यमापन करण्यात आले आहे.

  • Sudhakar Adbale appointment news | सुधाकर अडबाले यांना राज्याच्या महत्त्वाच्या समित्यांमध्ये संधी

    Sudhakar Adbale appointment news

    Sudhakar Adbale appointment news : चंद्रपूर : नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार सुधाकर अडबाले यांची रोजगार हमी योजना समितीसह अन्‍य दोन समित्‍यांवर सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

    महावितरणच्या नाट्यकुंभाचा भव्य शुभारंभ

    आमदार सुधाकर अडबाले यांचे विधान परिषदेतील कार्य पाहता त्‍यांची ‘रोजगार हमी योजना समिती, इतर मागासवर्ग कल्‍याण समिती व कागदपत्रे सभागृहाच्या पटलावर ठेवणे’ या तीन समित्‍यांवर सभापती प्रा. राम शिंदे यांनी विधान परिषद सदस्‍यांमधून सदस्यपदी नियुक्ती केली आहे. Maharashtra legislative council committees

    आमदार अडबाले यांनी या नियुक्तीबद्दल समाधान व्यक्त केले असून, विद्यार्थी, शिक्षक, शेतकरी, मजूर आणि ग्रामीण जनतेच्या हितासाठी ही संधी उपयोगात आणणार आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

    आमदार सुधाकर अडबाले यांच्या नियुक्‍तीबद्दल म. रा. मा. शि. महामंडळाचे सरचिटणीस माजी आमदार व्‍ही. यू. डायगव्‍हाणे, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रांतीय अध्यक्ष अरविंद देशमुख, उपाध्यक्ष रमेश काकडे, जयप्रकाश थोटे, जयकुमार सोनखासकर, विजय ठोकळ, विभागीय कार्यवाह चंद्रशेखर रहांगडाले, बाळासाहेब गोटे, कोषाध्यक्ष भूषण तल्‍हार, जिल्‍हा, महानगर, तालुका पदाधिकारी, सदस्‍यांनी अभिनंदन केले आहे. 

  • Msedcl Employee Theater Competition । नाट्यकुंभ २०२५: महावितरणच्या कर्मचाऱ्यांचा कलाविष्कार

    Msedcl Employee Theater Competition

    Msedcl Employee Theater Competition : चंद्रपूर – विदर्भापासून कोकणापर्यंत सव्वा तीन कोटी वीजग्राहकांना वर्षातील प्रत्येक दिवस व दिवसाच्या प्रत्येक मिनिटाला महावितरणकडून सेवा दिली जाते. या सेवेत चांगले किंवा वाईट असे बरेच नाट्यपूर्ण अनुभव अधिकारी व कर्मचाऱ्यांना येतात. या नाट्यपूर्ण अनुभवांना समाजासमोर मांडण्यासाठी नाट्यकृतींमध्ये स्थान मिळावे अशी अपेक्षा महावितरणचे संचालक (मानव संसाधन) श्री. राजेंद्र पवार यांनी केले. corporate drama festival

    चंद्रपूर व गडचिरोली विभागाचे ३६ कर्मचारी ठरले ‘गौरवशाली कामगार’

    महावितरणच्य ‘नाट्यकुंभ २०२५’ या नागपूर प्रादेशिकस्तरीय आंतरपरिमंडलीय नाट्यस्पर्धेचे उद्घाटन आज, दि. २ मे रोजी संचालक श्री. पवार यांच्याहस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक श्री परेश भागवत, मुख्य अभियंते सर्वश्री सुहास रंगारी, दिलीप दोडके, राजेश नाईक, नाट्यस्पर्धेचे स्वागताध्यक्ष श्री हरीश गजबे, परिक्षक श्री विनोद दुर्गेपुरोहित, श्री जयदेव सोमनाथे, अँड चैताली बोरकुटे आदी मान्यवर उपस्थित होते. internal drama competition

    महावितरण फार मोठा परिवार आहे. आपल्या परिवारात अनेकजणांकडे उत्तम कलागुण आहेत. महावितरणचे दैनंदिन काम सांभाळून त्यांनी हे कलागुण जपले आहेत. नाट्यस्पर्धेमुळे आपल्यातील कलाकारांना आपली क्षमता सादर करण्याची संधी मिळते. अशा स्पर्धांमुळे महावितरणमध्ये अधिकारी व कर्मचा-यांमध्ये सुसंवाद वाढतो, टीम स्पिरिट बळकट होते. असे सांगताना श्री पवार पुढे म्हणाले की, महावितरणचे काम अखंड चालणारे आहे. विदर्भापासून कोकणापर्यंत पसरलेल्या महाराष्ट्राच्या विशाल भूमीवरील कोट्यवधी ग्राहकांना महावितरण सेवा देते. employee cultural event

    वर्षातील प्रत्येक दिवस आणि दिवसाच्या प्रत्येक मिनिटाला आपण लोकाना सेवा देत असतो. आपल्या कामातही अनेक नाट्यपूर्ण अनुभव येतात. आपल्या कामात जनतेची सेवा करताना आलेल्या नाट्यपूर्ण अनुभवांनाही आपण समाजासमोर मांडले पाहिजे. असेही ते म्हणाले.

    विदर्भाला नाट्यकलेची खूप मोठी परंपरा आहे. कालिदासापासून ते महेश एलकुंचवारांपर्यंत नाट्‌यकलेला उतम योगदान देणारे अनेक नाटककार विदर्भाच्या भूमीत झाले आहेत. रामटेकला कालिदास, भंडारा जिल्ह्यात भवभूती, वाशीमला राजशेखर, अंभोऱ्याला मुकुंदराज, रिद्धपूरला चक्रधर स्वामी या साऱ्यांनी नाट्यपरंपरेला बळ देणारे लेखन केले आहे. मराठीतील दोन दिग्गज नाटककार श्रीपाद कृष्ण कोल्हटकर व राम गणेश गडकरी या दोघांचेही आयुष्याच्या उत्तरार्धातील वास्तव्य विदर्भात होते. internal drama competition

    स्वातंत्र्यपूर्व काळातील वीर वामनराव जोशी यांचे ‘रणदुंदुभी’ हे नाटक महाराष्ट्रभर गाजले होते. झाडीपट्टी हा पूर्व विदर्भातील लोकप्रिय नाट्य प्रकार आहे, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्यातील झाडीप‌ट्टीला देखील सुमारे दीडशे वर्षांची दीर्घ परंपरा लाभली आहे. लोकसंस्कृतीचा भाग असलेली दंडार आणि नंतरची झाडीपट्टी हा विदर्भाचा अपूर्व ठेवा ठरला आहे. नागपूरच्या दलित रंगभूमीनेही उत्तम काम केले आहे. अशा या पूर्व विदर्भामध्ये समृद्ध नाट्य परंपरेच्या वातावरणात ही स्पर्धा होत असल्याचे त्यांनी सांगितले. msedcl employee theatre competition

    महावितरणचे काम है तांत्रिक स्वरुपाचे असते. पण केवळ तांत्रिक ज्ञान पुरत नाही. आपल्याला जनतेला थेट सेवा द्यायची असते. त्यामुळे लोकांशी व्यवहार करताना संभाषण कला उपयुक्त ठरते. काही वेळा काही अधिकारी संकट प्रसंगी नाट्यकलाही वापरतात. दररोज तांत्रिक कामे करतानाही आपले कलागुण जोपासणाऱ्या महावितरणच्या सर्व अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना श्री पवार यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या.

    internal drama competition

    आपल्या अध्यक्षीय भाषणात श्री परेश भागवत यांनी अशा स्पर्धांमुळे सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये संवाद वाढत असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हरीश गजबे यांनी केले.

    चंद्रपूर येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह, येथे आयोजीत करण्यात करण्यात आलेल्या या दोन दिवसीय नाट्य महोत्सवात महावितरणच्या चंद्रपूर, नागपूर, गोंदिया आणि अकोला परिमंडलांचे नाट्यसंघ सहभागी झाले आहेत. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ शनिवार, दि. ३ मे २०२५ रोजी सायंकाळी ५.३० वाजता महावितरणचे संचालक (संचालन) अरविंद भादिकर यांच्या शुभहस्ते पारितोषिक वितरण समारंभ पार पडेल. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक परेश भागवत असतील. त्यावेळी संचालक (वाणिज्य) श्री योगेश गडकरी, संचालक (वित्त) श्री अनुदिप दिघे आणि संचालक (मानव संसाधन) श्री राजेण्द्र पवार, संचालक (प्रकल्प) श्री प्रसाद रेशमे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. msedcl employee theatre competition

    या दोन दिवसीय नाट्य स्पर्धेत आज चंद्रपूर परिमंडलाने श्रीपाद जोशी लिखित ‘रंगबावरी’ तर नागपूर परिमंडलाने प्रदीप फाटक लिखित ‘ये रे घना’ चा नाट्यप्रयोग सादर केला, तर उद्या गोंदिया परिमंडल अतुल साळवे यांच्या ‘दि ॲनॉनीमस’ तर अकोला परिमंडल डॉ. चंद्रकांत शिंदे लिखित ‘सिकॅरिअस’ हे नाटक सादर करणार आहेत.

  • Warora city development । “वरोरा शहरातील समस्यांवर विशेष उपाययोजना, खासदार धानोरकरांच्या संघर्षाचे यश!”

    Warora city development

    Warora city development : चंदपूर : वरोरा शहरातील नागरिकांच्या विविध समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्यासाठी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी जिल्हा प्रशासनाकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी वरोरा शहरातील महत्त्वाच्या समस्या संदर्भात समिती गठीत करून समस्या मार्गी लावण्याचे निर्देश दिले. लवकरच या सरदर्भात अतिरिक्त जिल्हाधिकारी भेट देऊन समस्या मार्गी लावण्याकरिता कार्यवाही करणार आहे.

    गंभीर आजार आता चिंता नसावी, चंद्रपुरात मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे उदघाटन

    गुरुवारी खासदार धानोरकर यांनी जिल्हाधिकारी विनय गौडा यांची भेट घेऊन वरोरा शहरातील नागरिकांच्या समस्या लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना चर्चा केली. या चर्चेत त्यांनी तात्काळ गांधी सागर तलावाचे खोलीकरण, कोराडी नाल्या अंतर्गत वरोरा शहरातील सांडपाण्याचा प्रश्न, कासमपंजा नाल्याच्या पाण्यासाठी पर्यायी व्यवस्था आणि शहराच्या मध्यभागी असलेल्या गांधी तलावाचे नगर परिषदेला हस्तांतरण करून त्याचे सौंदर्यीकरण करण्याची मागणी केली होती.  Gandhi Sagar lake beautification

    यावेळी वरोरा नगरपरिषद मुख्याधिकारी विशाखा शेळके, गांधीसागर तलाव खोलीकरण समितीचे अध्यक्ष प्रवीण धनवलकर, प्रवीण सुराणा, मनीष जेठाणी यांची उपस्थिती होती.    

    गांधी सागर तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साठल्याने तलावाचे विद्रुपीकरण झाले आहे. तलावातील गाळ काढल्यास पाण्याच्या नवीन स्रोत निर्माण होऊन त्याचे   सौंदर्यीकरण करून नौका विहार सुरु केल्यास छोटे पर्यटन सुरु होईल. या संदर्भात खासदार धानोरकर यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत जिल्हाधिकाऱ्यांनी नाम फाऊंडेशन च्या माध्यमातून गांधी सागर तलावातील गाळ काढण्यासाठी तात्काळ परवानगी दिली. तसेच या तलावाचे सौंदर्यीकरण करण्याच्या संदर्भात आराखडा तात्काळ सादर करण्याचे आदेश मुख्याधिकारी नगर परिषद वरोरा यांना दिले. Warora tourism potential

    त्यासोबतच वरोरा येथील सांड पाण्याच्या प्रश्न सोडविण्यासाठी पाहणी करून तात्काळ अहवाल देण्याच्या सूचना देखील जिल्हाधिकारी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. सांडपाण्याच्या प्रश्न मिटल्यास अनेक शेतकऱ्यांना शेती करता येणार आहे. व पिकाचे नुकसान देखील टाळता येणार आहे. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सकारात्मक प्रतिसादाने शेतकरी व नागरिकाने आनंद व्यक्त करीत खासदार प्रतिभाताई धानोरकर यांचे आभार मानले आहे.  

  • SNDT Womens University Maharashtra Day 2025 । SNDT महिला विद्यापीठाचा महाराष्ट्र दिन कार्यक्रम ठरला ‘ज्ञान आणि संधींचा उत्सव’!

    SNDT Womens University Maharashtra Day 2025

    SNDT Womens University Maharashtra Day 2025 : बल्लारपूर – एसएनडीटी महिला विद्यापीठ मुंबई, महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञानसंकुल बल्लारपुर येथे  १ मे २०२५ रोजी महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.  कार्यक्रमाचे मुख्य पाहुणे एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठ, मुंबई चे आजीवन व विस्तार विभागाचे संचालक डॉ. प्रभाकर चव्हाण उपस्थित होते. Maharashtra Day 2025

    दूरदर्शी धानोरकर, दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांनी जातनिहाय जनगणनेची केली होती पहिली मागणी

    कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत, व विद्यापीठ गीत यांनी झाली. यावेळी ध्वजारोहण करण्यात आले आणि उपस्थितांनी राष्ट्रध्वजाला अभिवादन केले. एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठ मुंबई, बल्लारपूर आवाराचे संचालक  डॉ. राजेश इंगोले यांनी मुख्य पाहुण्यांचा सन्मानचिन्ह देऊन स्वागत केले.

    डॉ. प्रभाकर चव्हाण  यांनी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा देत आजच्या समाजात आजीवन शिक्षण आणि विस्तार विभागाच्या नवकल्पना याविषयी सखोल माहिती दिली. त्यांनी समाजासाठी उपयुक्त नवीन अभ्यासक्रम सुरू करण्याबाबत चर्चा केली, ज्यामध्ये वेगवेगळ्या सामाजिक संस्थांशी, बचत गटांशी एकत्रित काम करण्यावर भर देण्यात आला.

    woman empowerment

    कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. राजेश इंगोले यांनी विद्यापीठासाठी पुस्तके देणगी केल्याचा उल्लेख केला. या पुस्तकांनी मला केवळ शिकवलं नाही, तर घडवलंही. आज या पुस्तकांचं देणगी  करताना  माझी एकच आशा आहे – यातून विद्यार्थीही घडतील, प्रगल्भ होतील आणि समाजासाठी योगदान देतील तसेच, सहायक कुलसचिव डॉ.बाळू राठोड आणि  आवाराचे समन्वयक डॉ. वेदानंद अलमस्त यांनी देखील कार्यक्रमात मनोगत व्यक्त केले.

    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक प्राध्यापिका अपेक्षा पिंपळे यांनी केले. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष योगदान दिले.

  • Balu Dhanorkar contributions । जातनिहाय जनगणनेचा आवाज — दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांचे दूरदर्शी योगदान!

    Balu Dhanorkar contributions

    Balu Dhanorkar contributions : चंद्रपूर : स्वतंत्र भारतात आजवर जातनिहाय जनगणना न झाल्यामुळे देशात सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक धोरणांची आखणी करताना अनेक समाज घटकांना न्याय मिळत नव्हता. मात्र आता या अन्यायाचा शेवट करत केंद्र सरकारने अखेर जातीनिहाय जनगणना घेण्याचा ऐतिहासिक निर्णय जाहीर केला आहे. या मागणीचा पहिला आवाज चंद्रपूरचे लोकप्रिय दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांनी उठवला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या पहिल्याच भेटीत त्यांनी देशभर जातनिहाय जनगणना घेण्याची ठाम मागणी केली होती. त्यांनी ही मागणी संसदेत आणि माध्यमांतून सातत्याने मांडत ठेवली होती. Caste census in India 2025

    मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे चंद्रपुरात उदघाटन

    धानोरकर यांचा हा मुद्दा सामाजिक न्याय, समता आणि सर्वसमावेशक विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा होता. त्यांच्या मागणीकडे केंद्र सरकारने आज मान दिल्याने हा निर्णय सामाजिक न्यायाच्या दिशेने टाकलेलं ऐतिहासिक पाऊल ठरतो आहे.

    लोकसभेतील विरोधी पक्षनेते मा. राहुल गांधी यांनी देखील हा मुद्दा वेळोवेळी प्रभावीपणे संसदेत मांडला. त्यांच्या दूरदृष्टीमुळे आणि काँग्रेस पक्षाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अखेर केंद्र सरकारला हा निर्णय घ्यावा लागला. Caste-based census benefits

    या मागणीचा पुढे वारसा चालवत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी व विद्यमान खासदार प्रतिभा धानोरकर यांनी देखील लोकसभेत हीच मागणी ठामपणे मांडली होती.

    त्यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “जातीनिहाय जनगणना ही देशातील वंचित, मागास व उपेक्षित घटकांसाठी योजनांचे अचूक नियोजन करण्यासाठी अत्यावश्यक आहे. ही जनगणना सामाजिक न्यायाच्या दिशेने उचललेले महत्त्वाचे पाऊल ठरेल.”

    हा निर्णय केवळ काँग्रेस पक्षाच्या विजयाचा नाही, तर वंचित, मागास आणि कष्टकरी घटकांच्या हक्काच्या लढ्याचा महत्त्वपूर्ण टप्पा असल्याचे काँग्रेस नेत्यांनी म्हटले आहे.