Category: ताज्या बातम्या

महाराष्ट्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व ताज्या बातम्या (Latest News) आणि ब्रेकिंग अपडेट्स वाचण्यासाठी रोज भेट द्या news34.in वर. राजकारण, समाजकारण, क्रीडा, गुन्हेगारी आणि आर्थिक घडामोडींचे त्वरित आणि विश्वसनीय कव्हरेज येथे उपलब्ध आहे. २४ तास सुरू असलेल्या घडामोडींची अचूक माहिती मिळवा, जेणेकरून कोणतीही मोठी बातमी तुमच्यापासून सुटणार नाही.

  • Employment for acquired land farmers । खासदार प्रतिभा धानोरकर यांची गोवरी पौनी प्रकल्पग्रस्तांच्या नोकरीसाठी आक्रमक भूमिका

    Employment for acquired land farmers

    Employment for acquired land farmers : चंद्रपूर : राजुरा तालुक्यातील गोवरी पौनी विस्तार योजनेतील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रलंबित नोकरी व इतर महत्त्वाच्या मागण्यांसाठी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तातडीने बैठक आयोजित करण्याची प्रत्राद्वारे मागणी केली आहे. Challenges in land acquisition process

    चंद्रपुरात सेवा हक्क दिन कार्यक्रमाचे आयोजन

    गोवरी पौनी विस्तार योजनेमुळे विस्थापित झालेल्या शेतकऱ्यांच्या नोकरी आणि पुनर्वसनासारख्या समस्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. यासंदर्भात शेतकऱ्यांनी वारंवार पाठपुरावा केला, मात्र अद्याप त्यांच्या मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत. यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.

    खासदार प्रतिभा धानोरकर यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या विस्तृतपणे मांडल्या आहेत. यात प्रामुख्याने नोकरी संबंधीची प्रलंबित फाईल त्वरित मंजूर करणे, सर्व पात्र प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना दोन महिन्यांच्या आत नोकरी देणे, अधिग्रहित जमिनीच्या ठिकाणीच नोकरी उपलब्ध करणे आणि जोपर्यंत नोकरी मिळत नाही तोपर्यंत जमीन संपादनाची प्रक्रिया थांबवणे या प्रमुख मागण्यांचा समावेश आहे.

    याव्यतिरिक्त, नोकरी वाटपात कोणताही भेदभाव न करता सर्व पात्र शेतकऱ्यांना एकाच वेळी सामावून घेणे, शेतकऱ्यांशी चर्चा करताना वेकोलीच्या उच्च अधिकाऱ्यांनी उपस्थित राहणे, SOP चा मुद्दा रद्द करणे, कोरपना तालुक्यातील विरूर (गाडेगाव) येथील जमीन संपादन आणि मातीच्या ढिगाऱ्यांमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई करणे, तसेच सांगोळा येथील विशिष्ट सर्वे नंबर आणि वेकोलीच्या खाणकामामुळे होणाऱ्या समस्यांवर तोडगा काढण्याची मागणीही खासदार धानोरकर (mp pratibha dhanorkar) यांनी केली आहे.

    खासदार प्रतिभा धानोरकर यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांची गांभीर्याने दखल घेतली असून, जिल्हाधिकारी आणि वेकोलीच्या संबंधित अधिकाऱ्यांसोबत तातडीने बैठक आयोजित करण्याची मागणी केली आहे. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, असे आश्वासन खासदार धानोरकर यांनी दिले आहे. 

  • Service Rights Day । चंद्रपुरात सेवा हक्क दिन कार्यक्रम, मनपाने १३८ वार्डसखीना केले प्रशिक्षित

    Service Rights Day

    Service Rights Day : चंद्रपूर – कल्याणकारी राज्यामध्‍ये नागरिकांना शासनाच्या विविध सेवा उपलब्ध करून देण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. तसेच सदर सेवा विहित वेळेत मिळणे, हा नागरिकांचा हक्क आहे. त्यामुळे सर्व विभागांनी आपापल्या विभागाच्या अधिसुचित सेवा नागरिकांपर्यंत पोहचवाव्यात, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले. digital citizen services

    केंद्रीय गृहमंत्री अमित शाह राजीनामा द्या, कांग्रेसचे मागणी

    जिल्हा प्रशासन व चंद्रपूर महानगर पालिकेच्या वतीने नियेाजन सभागृह येथे आयोजित सेवा हक्क दिन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी नितीन व्यवहारे, मनपा आयुक्त विपीन पालिवाल, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, उपायुक्त मंगेश खवले आदी उपस्थित होते. chandrapur news

    शासन आणि प्रशासन लोकांसाठी काम करते, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, सेवा हक्क अधिनियम लागू होऊन आज दहा वर्षे पूर्ण झाली. नागरिकांना कल्याणकारी सेवा उपलब्ध करून देणे, हे शासन – प्रशासनाचे कर्तव्य आहे. या सेवा त्यांना वेळेत मिळण्यासाठी आपापल्या विभागाच्या अधिसुचित सेवा नागरिकांपर्यंत पोहचवा. लोकांना त्रास न होता सेवा मिळाल्या तर शासन-प्रशासनाची प्रतिमा उंचाविण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिका-यांनी उपस्थितांना सेवा हक्क दिनाची शपथ दिली. service day oath

    यावेळी आयुक्त विपीन पालिवाल म्हणाले, सेवा हक्क अधिनियम सकारात्मक स्वरुपाचा कायदा आहे. सेवा किती दिवसात दिल्या पाहिजे, याचे बंधन या कायद्यात आहे. सर्व सेवा ऑनलाईन देण्याचे नियोजन आहे. चंद्रपूर महानगर पालिकेतर्फे नागरिकांसाठी 70 सेवा अधिसुचित केल्या असून या सेवा चांगल्या पध्दतीने देण्याचा पालिकेचा मानस आहे.

    प्रास्ताविकात निवासी उपजिल्हाधिकारी कुंभार म्हणाले, प्रत्येक विभागाच्या अधिसुचित सेवा पारदर्शक पध्दतीने विहित कालावधीत मिळाव्या, हा या आयोजनामागचा उद्देश आहे. सर्व सेवांची माहिती जास्तीत जास्त लोकांना मिळणे आवश्यक आहे. वेळेत सेवा नाही दिली तर संबंधितांना 500 ते 5 हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो, असे त्यांनी सांगितले.

    कार्यक्रमाचे संचालन जिल्हा प्रकल्प प्रमुख विकास लालसरे यांनी तर आभार उपायुक्त मंगेश खवले यांनी मानले. तत्पुर्वी मान्यवरांच्या हस्ते चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या सेवांचे डीजीटल पध्दतीने लोकार्पण, महापालिकेच्या सेवा हक्क  कायदा वेबसाईटचे उद्घाटन तसेच सिटीजन चार्टर क्यूआर कोडचे उद्घाटन करण्यात आले.   

    सेवादूत योजनेचा शुभारंभ : सेवादूत योजनेसाठी चंद्रपूर महानगरपालिका व नाविन्य शहर स्तर या सामाजिक संस्थेसोबत करारनामा करण्यात आला आहे. त्यानुसार 138 वॉर्ड सखींना सेवादूत म्हणुन प्रशिक्षित करण्यात आले आहे. या वॉर्ड सखी सेवा हक्क कायदा पोर्टलवर भेट देऊन घरबसल्या ऑनलाईन सेवा कशा प्राप्त करता येईल, याचे प्रशिक्षण घरोघरी जाऊन देणार आहेत. sevadoot yojana

    अधिका–यांचा गौरव : महाराष्ट्र सेवा हक्क अधिनियम – 2015 च्या अनुषंगाने सन 2024-25 या वर्षात महानगरपालिका स्तरावर नागरिकांना सेवा देण्यात उत्कृष्ट कामगिरी बजाविल्याबद्दल अधिकारी – कर्मचा-यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.  यात शहर अभियंता विजय बोरीकर, सहायक आयुक्त शुभांगी सूर्यवंशी, विधी अधिकारी अनिलकुमार घुले, प्र. सहायक आयुक्त संतोष गर्गेलवार, आस्थापना विभाग प्रमुख नरेंद्र बोबाटे, स्वच्छता विभाग प्रमुख अमोल शेळके, संगणक विभाग प्रमुख अमुल भुते आणि महानगर पालिकेचे जनसंपर्क अधिकारी युधिष्ठिर रैच यांचा समावेश होता. 

    महसूल विभागातर्फे प्रमाणपत्राचे वाटप : सेवा हक्क दिनानिमित्त महसूल विभागातर्फे नागरिकांना विविध प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. यात तन्मय बेलगे, सुमीत भिसे, निसर्गा काटकर यांचा समावेश होता.

  • amit shah resignation demand । पहलगाम हल्ल्यानंतर काँग्रेसकडून अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी!

    amit shah resignation demand

    amit shah resignation demand : घुग्घूस : काश्मीर मधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथील मिनी स्वीटझरलँड म्हणून प्रसिद्ध पर्यटन स्थळ बैसरन व्हॅली येथे दिनांक 22 एप्रिल रोजी दुपारी तीन वाजताच्या जवळपास हिंदू धर्मीय पर्यटकांना धर्म विचारून आतंकवाद्याकडून गोळीबार करण्यात आला या भ्याड हल्ल्यात जवळपास 28 निष्पाप नागरिकांचा जीव गेला. congress protest news today

    त्या कंत्राटी कामगारांना मुनगंटीवार यांनी दिला न्याय

    या भयाड हल्ल्याचा घुग्घूस शहर काँग्रेस तर्फे काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यांच्या नेतृत्वात दिनांक 27 एप्रिल रोजी काँग्रेस कार्यालया समोरील चौकात पाकिस्तान पुरुस्कृत भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध करण्यात आला व या भ्याड हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना भावपुर्ण श्रद्धांजली अर्पित करण्यात आली.

    हत्याकांडाच षडयंत्र

    निषेध आंदोलनात सहभागी कार्यकर्त्यांनी पाकिस्तान मुर्दाबाद, निम का पत्ता कडवा है पाकिस्तान भडवा है,
    घोषणा दिल्या तसेच देशाच्या सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनाच्या रक्षणाची जवाबदारी मोदी सरकारची असतांना ही भरदिवसा आतंकवादी देशाच्या सिमेत प्रवेश करतात धर्माच्या आधारे नागरिकांचे वर्गीकरण करतात व नेमून हिंदू बांधवांचे जीव घेतात या देशाला हेतूपूर्वक गृह युद्धात झोकण्याचा उघड षडयंत्र स्पष्ट या हत्याकांडातून दिसून येत आहे
    ही पूर्णतः गृहखात्याचा बोगसपना असून गृहमंत्री अमित शाह यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेसने केली. home minister failure india

    पंतप्रधान यांना निवडणून रॅली महत्वाची


    तसेच देशाच्या प्रधानमंत्री यांनी विदेशातून येऊन सर्वात आधी काश्मीरला जाणे आवश्यक असतांना ते बिहार येथे प्रचार सभेला गेले याचा ही काँग्रेस तर्फे जाहीर निषेध करण्यात आला पुलवामा नंतर ही सर्वात भिषण व त्रासदायक हत्याकांड असल्यामुळे केंद्र शासनाने पाकिस्तान वर चुटूक चाटुक कारवाई न करता जन्माची अद्दल घडवावी अशी मागणी करण्यात आली. government failure in security

    याप्रसंगी काँग्रेस नेते सैय्यद अनवर, ज्येष्ठ नेते शामराव बोबडे, जिल्हा महासचिव अलीम शेख, नकोडा माजी उप सरपंच हनीफ शेख,सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष रोशन दंतलवार, इंटक उपाध्यक्ष शहजाद शेख,एन. एस. यु. आय. अध्यक्ष आकाश चिलका, तालुका उपाध्यक्ष सिनू गुडला, ज्येष्ठ नेते शेखर तंगडपल्ली,ज्येष्ठ नेते शेख शमिउद्दीन,बालकिशन कुळसंगे,महिला जिल्हा उपाध्यक्षा यास्मिन सैय्यद, शहर कार्याध्यक्ष दिप्ती सोनटक्के, जिल्हा सचिव दुर्गाताई पाटील, ज्येष्ठ नेत्या संध्या मंडल,शिल्पा गोहिल,मंगला उगे, दिपक पेंदोर,देव भंडारी,सुनील पाटील, कुमार रुद्रारप, अरविंद चहांदे, निखिल पुनघंटी, अभिषेक सपडी, कपिल गोगला, सुरज मिश्रा,संदीप कांबळे,दिपक कांबळे,अंकुश सपाटे, रंजित राखुंडे व मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.

    विषय सूची

  • OBC federation meeting in Goa । गोव्यात 7 ऑगस्ट 2025 रोजी होणारे ओबीसी महासंघाचे महत्त्वपूर्ण अधिवेशन!

    OBC federation meeting in Goa

    OBC federation meeting in Goa : राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या कार्यकारणी बैठक पत्रकार भवन पुणे येथे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ बबनराव तायवाडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. बैठकीला महासचिव सचिन राजुरकर , उपाध्यक्ष डॉ सुधाकर जाधवर,कार्याध्यक्ष प्रा शेषराव येलेकर, प्रा शरद वानखेडे, गुणेश्वर आरेकर , प्रकाश भागरथ, सुभाष घाटे , गोव्याचे अध्यक्ष मधु नाईक, किसान महासंघाचे प्रकाश साबळे, कर्मचारी महासंघाचे शाम लेडे, महिला महासंघाच्या अध्यक्षा ज्योतीताई ढोकणे, मध्यप्रदेशचा महिला महासंघाच्या अध्यक्षा रत्नमाल पिसे मंचावर उपस्थित होते. National OBC association India

    रेल्वे अतिक्रमण धारकांना मिळणार नवे घर, मुनगंटीवार यांचा पुढाकार

    ओबीसी महासंघाचे प्रथम महाअधिवेशन दिनांक 7 ऑगस्ट 2016 ला नागपूर येथे प्रचंड गर्दीत संपन्न झाले. या अधिवेशनामुळे महाराष्ट्र शासनाला क्रिमिलिअरची मर्यादा साडेचार लाख रूपयांवरून सहा लाखापर्यंत वाढवून देण्याचा निर्णय घ्यावा लागला होता. महिला महासंघाने 27 नोव्हेंबर 2016 ला ओबीसी महिला अधिवेशनाचे आयोजन केले होते. तसेच 8 डिसेंबर 2016 ला नागपूर येथील महाराष्ट्र राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या वेळी एका लाखापेक्षा जास्त ओबीसी लोकांनी मोर्चा काढून विधानसभेवर जबर धडक दिली होती. याचा परिणाम होऊन महाराष्ट्र सरकारला पहिल्यांदाच ओबीसी मंत्रालयाची स्थापना करावी लागली. OBC reservation policies India

    7 ऑगस्ट 2017 रोजी नवी दिल्ली येथील महासंघाच्या दुसऱ्या महाअधिवेशना नंतर क्रिमिलेअरची मर्यादा ही 6 लाखावरून 8 लाख रूपये करण्यात आली. देशातील सर्व ओबीसी समाजातील लोकांच्या एकत्रीकरण व एकजुटीचे हे फलित होते. या सोबतच भारत सरकारने प्रथमच नागपुरात पाचशे विद्यार्थ्यांचे वसतिगृह देण्यास मान्यता प्रदान केली आहे.

    7 ऑगस्ट 2018 रोजी मुंबई येथील नॅशनल स्पोर्टस् क्लब ऑफ इंडिया, वरली परीसर येथे तिसरे महाअधिवेशन घेण्यात आले होते. याचा परिणाम होऊन महाराष्ट्र राज्यात ओबीसी युवक व विद्यार्थ्यांसाठी “महाज्योती” नावाने विकास महामंडळ नंतर स्थापन करण्यात आले. याद्वारे ओबीसी विद्यार्थ्यांना युपीएससी, एमपीसीसी, पीएच.डी. एम. फिल, जेईई/नीट इ. व्यावसायिक वैमिानिक, सनदी लेखापाल (सीए) व कंपनी सचिव (सीएस) इत्यादी स्पर्धा परीक्षांच्या तयारी करण्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा व आर्थिक सहाय्य पुरविण्यात येत आहे. OBC caste-based census India 2025

    तसेच ओबीसी युवकांना रोजगारांच्या विविध संधी उपलब्ध होण्यासाठी मार्गदर्शन व आवश्यक आर्थिक सहाय्य पुरविण्यात येत आहे. जिल्हा आणि तालुका पातळीवर ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरू करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. ओबीसी विद्यार्थ्यांच्या पालकांच्या वार्षिक उत्पन्नाची मर्यादा ही 6 लाख रूपयाहून 8 लाख रूपये करण्यात आली आहे. राष्ट्रीय ओबीसी आयोगाला संवैधानिक दर्जा देण्यात आला आहे. शालेय विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना लागू करण्यात आली आहे. अशा अनेक मागण्या या आंदोलनामुळे मान्य झाल्या आहेत. 7 ऑगस्ट 2019 रोजी हैद्राबाद येथे महासंघाचे चौथे महाअधिवेशन घेण्यात आले होते. OBC reservation policies India

    याअधिवेशनाचाही परिणाम विविध राज्य आणि केंद्र सरकारवर पडून ओबीसी लोकांच्या समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन सरकार तर्फे देण्यात आले. पुढे 5 वे महाअधिवेशन 7 ऑगस्ट 2020 रोजी कोविड-19 प्रभावामुळे जागतिक पातळीवर ऑनलाईन पध्दतीने अमेरिकेहून घेण्यात आले होते, ज्यात संपूर्ण जग आणि भारतातील 5 कोटी पेक्षा जास्त ओबीसी बांधव सहभागी झाले होते. पुढचे 6 वे अधिवेशन 7 ऑगस्ट 2021 रोजी कोविडच्या प्रादुर्भावामुळे लंडनहून ऑनलाईन घेण्यात आले होते. या जागतिक पातळीच्या अधिवेशनालाही भारतासह जगातील इतर ओबीसी बांधवांनी भरपूर प्रतिसाद दिला होता. यानंतर 7 वे अधिवेशन दिल्ली येथे संपन्न झाले. 8 वे अधिवेशन तिरूपती आध्रपदेश व 9 वे अधिवेशन अमृतसर पंजाब येथे संपन्न झाले.


    केंद्र आणि विविध राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आणि त्या सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघ देशपातळीवर आंदोलन चालवित आहे. याचाच एक भाग म्हणून राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे दहावे महाअधिवेशन गोवा येथे 7 ऑगस्ट 2025 रोजी होत आहे. केंद्र सरकारने जातनिहय जनगणना करण्यात यावी, केंद्रात स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्यात यावे, क्रिमिलेअरची मर्यादा वाढविण्यात यावी व राज्याने
    बिहार राज्यात ज्याप्रमाणे ओबीसी प्रवर्गाची जात निहाय जनगणना करण्याचा निर्णय घेऊन जात निहाय जनगणना करण्यात येत आहे त्याच धर्तीवर महाराष्ट्र राज्यात सुद्धा ओबीसी प्रवर्गाची जात निहाय जनगणना करण्याचा निर्णय घेऊन ओबीसी प्रवर्गाची जातीनिहाय जनगणना करावी. OBC reservation policies India


    मराठा जातीचा ओबीसी संवर्गात समावेश करण्यात येऊ नये,
    ओबीसी, विजा भज व विशेष मागास प्रवर्ग समाजाचा रिक्त पदांचा अनुशेष त्वरीत भरण्यात यावा.
    गुणवंत मुलां-मुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी देण्यात येणारी शिष्यवृत्ती ५० विद्यार्थ्यांची संख्या वाढवून १०० विद्यार्थी करण्यात यावी. इत्यादी मागण्या मंजूर करून घेण्यासाठी 7 ऑगस्ट 2025 ला गोवा येथे सपन्न होत आहे ,बैठकीला राष्ट्रीय ओबीसी महासंघ व महासंघाशी संलग्नित संघटना राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघ, राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघ, राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघ, राष्ट्रीय ओबीसी अधिकारी-कर्मचारी महासंघ, राष्ट्रीय ओबीसी महिला अधिकारी-कर्मचारी महासंघ, व राष्ट्रीय ओबीसी वकील महासंघ इत्यादी संघटनांच्या सर्व पदाधिकारी उपस्थित होते . संचालन शकील पटेल तर आभार अर्जून दले यांनी केले

  • Railway land encroachment rehabilitation । रेल्वे अतिक्रमणधारकांसाठी मिळणार नव्या घरांचा ठराव, जाणून घ्या काय होणार?

    Railway land encroachment rehabilitation

    Railway land encroachment rehabilitation – चंद्रपूर : केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे झालेल्या चर्चेनुसार, चंद्रपूर शहरातील रेल्वे स्टेशन यार्ड, सावरकर नगर, रयतवारी आणि लखमापूर परिसरातील अतिक्रमणधारकांच्या पुनर्वसनासंदर्भात बैठक आयोजित करण्याची मागणी राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केली होती. या संदर्भात त्यांनी मध्य रेल्वेचे मुख्य महाप्रबंधक यांना पत्र पाठवून मुंबई येथे बैठक घेण्याची विनंती केली होती. चंद्रपूर शहर व परिसरातील रेल्वे अतिक्रमणधारकांना नवीन घरे उपलब्ध करून देण्याच्या संदर्भात मध्य रेल्वेचे मुख्य महाप्रबंधक श्री. धर्म वीर मीना यांच्यासोबत बैठक पार पडली. Chandrapur railway land dispute

    केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या निर्देशांनुसार ही बैठक घेण्यात आली. यामध्ये ९०० घरे हटविण्याचा रेल्वेचा मानस असल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळेच बैठक घेण्यात आली.

    चंद्रपूर शहरातील व आजूबाजूच्या भागातील २५ वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या नागरिकांचा निवारा हिरावला जाऊ नये, यासाठी सकारात्मक निर्णय घेण्याची विनंती आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी मध्य रेल्वेचे मुख्य महाप्रबंधक श्री. धर्म वीर मीना यांच्याकडे केली. या चर्चेवर सकारात्मक प्रतिसाद देत, रेल्वे विभाग नागरिकांच्या पुनर्वसनाबाबत संवेदनशील असून लवकरच योग्य निर्णय घेतला जाईल, असे मध्य रेल्वेचे मुख्य महाप्रबंधक श्री. धर्म वीर मीना यांनी आश्वासित केले. Railway station yard encroachment removal

    Chandrapur railway land dispute

    त्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना मुनगंटीवार यांच्यामुळे मिळाला न्याय

    मुंबई येथे पार पडलेल्या बैठकीत यावेळी मध्य रेल्वेचे मुख्य महाप्रबंधक श्री धर्म वीर मीना, डॉ. मंगेश गुलवाडे, अजय दुबे, अनिल डोंगरे,अमित निरंजने, राकेश बोमनवार, होमेश्वर नंदनवार, महेश झिटे सुभान पठाण आणि सुरेंद्र मंचलवार तसेच या महत्त्वपूर्ण बैठकीस जिल्हाधिकारी, नागपूरचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी झूमद्वारे उपस्थित होते.

    चंद्रपूर शहरात नवीन रेल्वे लाईन टाकण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. ही नवीन रेल्वे लाईन जिल्ह्याच्या विकासासाठी निश्चितच महत्त्वपूर्ण ठरणार आहे. मात्र, चंद्रपूर शहरातील सावरकर नगर, रेल्वे स्टेशन यार्ड, रयतवारी, लखमापूर या भागांतील रेल्वे विभागाच्या जमिनीवर गेल्या २५ वर्षांपासून काही मजूरांनी पक्की घरे बांधलेली आहेत. रेल्वे विभागाकडून या अतिक्रमणधारकांना अतिक्रमण हटविण्यासाठी नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत. चंद्रपूर शहराच्या चारही बाजूंनी विविध उद्योग सुरू असल्यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर मजूर वास्तव्य करत आहेत. त्यांनी रेल्वे विभागाच्या जागेवर पक्की घरे बांधली आहेत. या अतिक्रमणधारकांचे पुनर्वसन करून त्यांच्या राहण्यासाठी नवीन घरे उभारणे अत्यंत आवश्यक आहे. Chandrapur new railway line development

    आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात मुंबई येथे रेल्वेचे मुख्य महाप्रबंधक श्री. धर्म वीर मीना यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीमध्ये शिष्टमंडळ उपस्थित होते. यामध्ये. या बैठकीत चंद्रपूर रेल्वे स्टेशन वार्ड, सावरकर नगर, रय्यतवारी आणि लखमापूर परिसरातील अतिक्रमणधारकांच्या पुनर्वसनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

  • Sudhir Mungantiwar latest news । कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या न्यायासाठी सुधीर मुनगंटीवार यांचा यशस्वी संघर्ष

    Sudhir Mungantiwar latest news

    Sudhir Mungantiwar latest news : चंद्रपूर –  राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे ४५ कंत्राटी कामगारांना न्याय मिळाला आहे.चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयात ४५ कर्मचारी कक्ष सेवक म्हणून नियुक्त झाले आहेत. आ. श्री. मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांमुळे हे घडू शकले, अशी भावना व्यक्त करून कक्ष सेवकांनी त्यांचे आभार मानले आहेत. Chandrapur medical college jobs

    ताडोबा व्याघ्रप्रकल्पात मचाणीवरून निसर्गाचा अनुभव घ्यायचा आहे तर व्हा तयार

    शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, चंद्रपूर यांच्या अधिनस्त असलेल्या रुग्णालयात ४५ सुरक्षा कर्मचारी गत १० ते १५ वर्षापासून कंत्राटी तत्वावर कार्यरत होते. महाराष्ट्र सुरक्षा बल मार्फतीने नवीन सुरक्षा रक्षकांची भरती करण्यात आल्यामुळे उक्त ४५ कंत्राटी सुरक्षा रक्षकांना कामावरून कमी करण्यात आले होते, त्यामुळे त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. Contract workers appointment news

    या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेत, मे.स्मार्ट सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या मार्फतीने  सफाई कामगारांची भरती करण्यात येणार असल्याने या पदावर त्यांना सेवेची संधी मिळण्याची विनंती केली होती. याची दखल घेत आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी या सफाई कामगारांना सदर कंपनीमार्फत चंद्रपूरचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता यांना पत्राद्वारे कळविले होते. त्या अनुषंगाने योग्य कार्यवाही करून ४५ सुरक्षा कर्मचाऱ्यांना मे. स्मार्ट सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमार्फत कक्षसेवक पदावर नियुक्ती देण्यात आली असून त्यांना न्याय मिळाला आहे.

    कंत्राटी तत्वावर कक्षसेवक पदावर नियुक्ती मिळालेल्या गौरी उंदीरवाडे, रूपा येरगुडे, दीपक वर्मा, संध्या आडेकर, गुड्डू निमसरकार, पृथ्वीराज मरस्कोल्हे, ममता राठोड, अक्षय सुखदेवे, प्रेम बारसागडे, प्रियंका अमरपवार, विश्वनाथ उराडे आदींनी आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात येऊन त्यांचा सत्कार केला व आभार मानले

  • Tadoba Machan stay experience । बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी ताडोबामध्ये जंगलाची मचानीवरून सफर!

    Tadoba Machan stay experience

    Tadoba Machan stay experience : चंद्रपूर –  वाघ व इतर वन्यजींवाच्या हमखास दर्शनासाठी जगप्रसिद्ध असलेल्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामार्फत 12 मे 2025  ला बफर क्षेत्रात बुद्ध पौर्णिमेला निसर्ग अनुभव उपक्रम निसर्गप्रेमीसाठी राबविण्यात येणार आहे. Tadoba wildlife experience booking

    या उपक्रमासाठी बफर क्षेत्रातील चंद्रपूर, मूल, मोहर्ली, खडसंगी, पळसगाव व शिवणी या सहा वनपरिक्षेत्रातील 50 मचाणी सज्ज करण्यात आलेल्या आहेत. निसर्ग प्रेमीकरिता ताडोबातील वन्यजीवन मचाणीवर बसून अनुभवण्याची ही सुवर्ण संधी आहे.

    ताडोब्यातील वाघोबाला उन्हाचे चटके, सफारी वेळापत्रकात बदल

    या प्राणीगणनेमध्ये सहभागी होण्यासाठी 28 एप्रिल ते 5 मे 2025 या कालावधीत http://mytadoba.mahaforest.gov.in/ या संकेत स्थळावर बुकिंग सुरु होणार असून एकूण 100 निसर्गप्रेमी यामार्फत बुकिंग करू शकतात. सदर उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी प्रती व्यक्ती 4500 रुपये इतके शुल्क आकरण्यात येणार आहे. Machan stay Tadoba

    सहभागी होणाऱ्या पर्यटकांनी संकेतस्थळामार्फत 1500 रुपये अदा करून भरलेल्या रकमेची पावती सबंधित पर्यटन गेटला दाखवावी. उर्वरित रकमेमध्ये जिप्सी शुल्क  2 हजार रुपये, पर्यटन गेट ते मचाण प्रवास खर्च व मार्गदर्शक शुल्क  1 हजार रुपये इतके सबंधित पर्यटन गेटवर रोख स्वरूपात देण्यात यावे.

    सहभागी होणाऱ्या निसर्गप्रेमींनी शाकाहारी जेवणाची व पाण्याची व्यवस्था स्वतः करावी तसेच कॅमेरा व सर्चलाईटला सदर उपक्रमामध्ये परवानगी नाही. इतर माहितीकरिता वरील संकेत स्थळावर भेट देण्यात यावी.

    सदर उपक्रमाविषयी काही अडचणी असल्यास कार्यालयीन वेळेस श्री. सुमित कोहळे, 8421461698 (सहाय्यक पर्यटक व्यवस्थापक, उपसंचालक बफर कार्यालय, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प यांच्याशी संपर्क साधावा.

  • Dhanora dam project । धानोरा बंधाऱ्याच्या प्रकल्पाला गती! आमदार किशोर जोरगेवारांचा मोठा पुढाकार

    Dhanora dam project

    Dhanora dam project : चंद्रपूर तालुक्यातील अत्यंत महत्त्वाच्या धानोरा बंधाऱ्याच्या संदर्भात आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर यांच्या वतीने नागपूर येथे महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. या बैठकीस आमदार किशोर जोरगेवार यांच्यासह कार्यकारी संचालक श्री. राजेश सोनटक्के, मुख्य अभियंता श्री. रवी पराते, अधीक्षक अभियंता श्री. माधव कदम, कार्यकारी अभियंता वऱ्हाडे साहेब तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. Dhanora irrigation scheme

    ताडोब्यातील वाघांना उन्हाच्या झळा, सफारीचे वेळापत्रक बदलले

    या बैठकीत प्रस्तावित धानोरा बंधाऱ्याच्या कामाला गती देण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. बैठकीच्या सुरुवातीला धानोरा बंधाऱ्याच्या सद्यस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. प्रकल्पाच्या आगामी टप्प्यातील कामकाज, तांत्रिक अडचणी, डीपीआरच्या अंतिम प्रक्रियेबाबत सखोल चर्चा झाली. डीपीआर अंतिम करून लवकरच हाय पावर कमिटीकडे प्रस्ताव सादर केला जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. यावेळी भारतीय जनता पक्षाचे नेते प्रकाश देवतळे, मनोज पाल, कारण नायर आदींची उपस्थिती होती. 

    बैठकीत आमदार किशोर जोरगेवार यांनी प्रकल्पाच्या अंमलबजावणीत कोणतीही ढिलाई होऊ नये यावर जोर दिला. सर्व संबंधित अधिकाऱ्यांना कामाला गती देण्याच्या ठोस सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी यावेळी दिल्या. धानोरा बंधारा प्रकल्प हा केवळ सिंचनाची गरज भागवणारा प्रकल्प नसून, परिसरातील पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न सोडवणारा ठरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. Chandrapur irrigation project

    सदर बंधाऱ्याच्या कामाला गती देण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी सातत्याने प्रयत्न सुरू केले आहेत. सदर विषयावर अनेकदा अधिवेशनात आवाज उठवत त्यांनी या महत्त्वाच्या विषयाकडे सभागृहाचे लक्ष वेधले आहे. परिणामी, या प्रकल्पाच्या डीपीआरसाठी ५ कोटी रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला आहे.

    धानोरा बंधाऱ्याच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सिंचनाची सोय उपलब्ध होईल, तसेच गावकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर होईल. त्यामुळे या प्रकल्पाला वेळेत पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे आमदार किशोर जोरगेवार यांनी यावेळी सांगितले. ही बैठक अत्यंत सकारात्मक वातावरणात पार पडली असून कामाला गती देण्यासंदर्भातील अनेक मोठे निर्णय या बैठकीत घेण्यात आले. सदर बैठकीस संबंधित अधिकाऱ्यांचीही उपस्थिती होती.

  • Tadoba Safari Timing Change । उन्हाच्या झळांनी ताडोबा सफारीची वेळ बदलली; जाणून घ्या नवे वेळापत्रक

    Tadoba Safari Timing Change

    Tadoba Safari Timing Change : चंद्रपूर ताडोबा – 45 अंशापार गेलेल्या तापमानामुळे चंद्रपूर देशात हॉट ठरले आहे. येथील जन जीवन प्रभावित होत आहे. दिवसागणिक तापमानात वाढ होत असल्याने सर्वांनाच त्याचा फटका बसत आहे. वाढत्या तापमानापासून जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पलही सुटला नाही. प्रचंड वाढलेल्या तापमानामुळे पर्यटन सफारी प्रभावीत होऊ शकते त्यामुळे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प व्यवस्थापानाने सफारीच्या वेळेत बदल करून पर्यटकांना दिलासा दिला आहे. Tadoba safari timing


    देशातच नव्हे तर जगात चंद्रपर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प व्याघ्र दर्शनासाठी प्रसिध्द असे स्थळ आहे. त्यामुळे स्थानिक, देश विदेशातील पर्यटकांची येथे नेहमीच गर्दी असते. येथे सफारीकरीता बाहेरील पर्यटक मुक्कामी शुध्दा येतात. परंतु सध्या चंद्रपूरला उन्हाचा चांगलाच तडाखा बसला आहे. त्यापासून वन्यप्राणीही सुटले नाहीत.
    सध्या चंद्रपूर 45 अंशाच्या पार आहे. तर ब्रम्हपुरी 46 अंशाच्या घरात आहे. दरदिवशी तापमानात वाढ होत असल्याने जनजिवन प्रभावीत होत आहे.

    वाढत्या उन्हाच धोका लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने चंद्रपूरला नैसर्गीक आपत्ती जिल्हा म्हणून घोषीत केले आहे. दरवर्षी उन्हाळ्यामध्ये ताडोबात पर्यटकांची गर्दी बघायला मिळते. परंतु यावेळचा कडक उन्हाळा ताडोबातील पर्यटकांकरीता कठीण जात आहे. त्यामुळे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाने पर्यटकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ताडोबातील दुपारच्या सफारीच्या वेळात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. Tadoba temperature April

    प्रेमात अडथळा निर्माण, चंद्रपुरात झाली एकाची हत्या


    हा बदल 1 मे पासून करण्यात येणार होता, परंतु चंद्रपूरचे तापमान देशात हॉट ठरत आहे शिवाय तापमान 45 अंशाच्या पार गेल्याने गुरूवारपासूनच पर्यटन सफारीच्या वेळात बदल करण्यात आला आहे. सकाळची सफारी ही पूर्ववत वेळेतच सुरू आहे. परंतु दुपारी 2.30 ते 6.30 वाजता पर्यंत होणारी सफारी आता अर्धा तास उशिरा सुरू होणार आहे. म्हणजे 3.00 ते 7.00 वाजताची करण्यात आली आहे. ताडोबा व्यवस्थापनाने वेळेत बदल करण्याचा आदेश निर्गमित केला आहे.


    ताडोबाच्या कोअर व बफर झोनमध्ये विविध नावाने प्रसिध्द असे अनेक वाघ, वाघिणी आहेत. आपल्या रूबाबदार शैलीने ते पर्यटकांना आर्कषीत करतात. त्यामुळेच पर्यटक दरवर्षी ताडोबात पर्यटनांकरीता जावून वाघांचे दर्शन घेतात. ताडोबात वाघांची संख्या वाढल्याने आणि हमखास दर्शन होत असल्याने दरवर्षी उन्हाळ्यामध्ये पर्यटकांची चांगलीच गर्दी बघायला मिळते. स्थानिक, राज्यातीलच नाही तर देश विदेशाच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक् ताडोबा येऊन आपली पर्यटकनाची हौस भागवितात. मात्र यावेळी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासूनच चंद्रपूर तापायला लागले आहे. सुर्य चांगलाच कोपत असल्याने 45 अंशाच्या पार पारा गेला आहे. safari changed due to heatwave

    अंगाची लाही लाही होत आहे. जन जीवन विस्कळीत होत आहे. याच जिल्ह्यातील ब्रम्हपुरीचे तापमानही देशात केंद्रस्थानी आले आहे. उन्हाचा सर्वांनाच फटका बसत आहे. शिवाय हवामान खात्याने उष्ण लहरींचा इशारा दिल्याने येथील जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व शाळांचे वेळापत्रकात बदले करून 7 वे 11 वाजता केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना वाढत्या उष्णतेपासून दिलासा मिळाला.


    त्यापाठोपाठ ताडोबा व्यवस्थापनानेही वाढत्या उष्णतेमुळे दुपारच्या पर्यटन सफारीच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय घेऊन सफारीची वेळ अर्धातास केली आहे. त्यामुळे पर्यटकांची उन्हापासून सुटका होणार आहे. अनेक पर्यटकांनी तर बुकींग रद्द करून चंद्रपूरातील उन्हापासून स्वत:ची सुटका करून घेतली आहे. काही पर्यटक् “कडक उन्हात नको रे बाबा पर्यटन सफारी‘ म्हणून ताडोबात सध्यातरी येण्याचे टाळत आहेत.

  • skill training for forest villagers । चंद्रपूर वन अकॅडमीकडून ग्रामीण तरुणांसाठी सुवर्णसंधी – मिळणार नोकरी आणि कौशल्य प्रशिक्षण

    skill training for forest villagers

    skill training for forest villagers : चंद्रपूर –  पंतप्रधान यांच्या ‘स्किल इंडिया मिशन’शी सुसंगत राहून चंद्रपूर वन अकॅदमीने महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्प व संरक्षित जंगल परिसरातील गावांमध्ये राहणाऱ्या बेरोजगार तरुणांसाठी हाऊसकीपिंग व फूड अ‍ॅण्ड बेव्हरेज सेवा या आदरातिथ्य क्षेत्रातील प्रशिक्षणासाठी ही अभिनव योजना सुरू केली आहे. या अनुषंगाने ‘प्रथम’ या राष्ट्रीय पातळीवरील शिक्षण व व्यावसायिक प्रशिक्षण संस्थेसोबत सामंजस्य करार (MoU) करण्यात आला आहे. forest academy Chandrapur training

    इरई नदी खोलीकरणाची सुरुवात

    या करारावर अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा वन अकादमीचे संचालक एम. श्रीनिवास रेड्डी यांनी स्वाक्षरी केली. त्यांच्या नेतृत्वाखाली या प्रशिक्षण कार्यक्रमाचा कालावधी 60 दिवसांचा असून प्रशिक्षण, निवास, भोजन व नोकरीची व्यवस्था याचा संपूर्ण खर्च अकादमी आपल्या आंतरिक निधीतून करत आहे. ही योजना वनालगताच्या गावातील तरुणांना सक्षम बनवते, तसेच पर्यायी उपजीविकेच्या संधी उपलब्ध करून देऊन वनसंवर्धनालाही हातभार लावते. Skill India hospitality program

    मेलघाट व्याघ्र प्रकल्पाजवळील गावांतील 12 तरुणांचा आठवी हाउसकीपिंग बॅच 20 फेब्रुवारी ते 20 एप्रिल 2025 या कालावधीत प्रशिक्षणासाठी चंद्रपूर अकॅदमीत उपस्थित होती. आतापर्यंत हाऊसकिपिंग बॅचेस मध्ये एकूण 110 तसेच फूड आणि बेवरेज मधील एकूण 99 जणांना यशस्वीरित्या प्रशिक्षण करून थ्री, फोर, फाईव्ह स्टार हॉटेल्स, रिझॉर्टमध्ये नोकरी देण्यात आली आहे. तसेच  हाउसकीपिंग सहाय्यकाचे  दोन महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण करून त्यांना उदयपूर, लोणावळा, ताडोबा, चंद्रपूर या ठिकाणी जॉब प्लेसमेंट देण्यात आले. या प्रशिक्षण कार्यक्रमाचे संचालक एस के. गवळी  यांच्या हस्ते प्रशिक्षण  प्रमाणपत्र, जॉब ऑफर लेटर प्रदान करण्यात करण्यात आले व नेमणूकीच्या ठिकाणी जाण्यासाठी मुक्त करण्यात आले.

    forest academy Chandrapur training

    चंद्रपूर वन अकादमी मार्फत हा कार्यक्रम पुढील तीन वर्षात राबविण्यासाठी प्रथम एज्युकेशन फाउंडेशन मुंबई यांच्याशी दिनांक 24 एप्रिल 2025 रोजी समझोता केला असून त्या अंतर्गत वेगवेगळ्या पाच कौशल्य कामासाठी जसे की, फोर व्हीलर टेक्निशियन असिस्टंट इलेक्ट्रिशियन, वेल्डर, हॉस्पिट्यालिटी असिस्टंट व मल्टी फंक्शन ऑफिस असिस्टंट आणि  ब्युटीशियन अशा कौशल्य कामी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सदरचे प्रशिक्षण महिलांसाठी देखील उपलब्ध आहे. तरी त्याचा फायदा सर्व संबंधित गावातील तरुणांनी घ्यावा,असे आवाहन श्री. रेड्डी यांनी केले आहे.