Category: ताज्या बातम्या

महाराष्ट्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व ताज्या बातम्या (Latest News) आणि ब्रेकिंग अपडेट्स वाचण्यासाठी रोज भेट द्या news34.in वर. राजकारण, समाजकारण, क्रीडा, गुन्हेगारी आणि आर्थिक घडामोडींचे त्वरित आणि विश्वसनीय कव्हरेज येथे उपलब्ध आहे. २४ तास सुरू असलेल्या घडामोडींची अचूक माहिती मिळवा, जेणेकरून कोणतीही मोठी बातमी तुमच्यापासून सुटणार नाही.

  • Irai River Deepening in Chandrapur । चंद्रपूरकरांसाठी अभिमानाचा क्षण – इरई नदी खोलीकरण मोहिमेची भव्य सुरुवात!

    Irai River Deepening in Chandrapur

    Irai River Deepening in Chandrapur : चंद्रपूर शहराच्या प्रवेशद्वारावरच इरई नदीचे दर्शन होते. शहराला 9 कि.मी. समांतर वाहणारी ही नदी एकप्रकारे चंद्रपूर शहराचे नाक आहे. त्यामुळे ती सुंदरच असायला पाहिजे. इरईचे खोलीकरण आणि सौंदर्यीकरण करणे हे केवळ एका व्यक्तिचे काम नव्हे तर यात शासन आणि प्रशासनासह सर्व लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटना, नागरिकांचेसुध्दा योगदान असणे आवश्यक आहे. त्यामुळेच लोकसहभागातून आणि सर्वांच्या सहकार्यानेच इरई नदीचा चेहरा मोहरा बदलण्याचा आपला मानस आहे, असे विचार राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी व्यक्त केले. Irai river cleaning project

    “बौद्धगया महाविहाराची सुटका हवीच! चंद्रपूरातून हजारोंचा शांतता मोर्चा”

    जिल्हा प्रशासनद्वारे इरई नदी खोलीकरण अभियानाचा शुभारंभ करताना ते बोलत होते. यावेळी आमदार सुधीर मुनगंटीवार, आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपायुक्त मंगेश खवले, औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता विजय राठोड, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार आदी उपस्थित होते. local river restoration campaign

    इरई नदी खोलीकरणाच्या कामाचे जिल्हा प्रशासनाने उत्तम नियोजन केले आहे, असे सांगून पालकमंत्री डॉ. उईके म्हणाले, लोकसहभागातून हे खोलीकरण अभियान नक्कीच यशस्वी होईल. ही आपली नदी आहे, हे आपले अभियान आहे, अशी भावना प्रत्येक नागरिकांनी ठेवावी. तसेच या अभियानाबद्दल जास्तीतजास्त जनजागृती करावी, जेणेकरून लोकांचा यात मोठ्या प्रमाणात सहभाग. या नदीचे खोलीकरण आणि स्वच्छता ही दोन्ही कामे हाती घेण्यात येईल. आजपासून 45 दिवस हे अभियान निरंतर चालणार आहे. प्रत्येक दिवसाचे जिल्हा प्रशासनाद्वारे नियोजन करण्यात आले आहे.

    विरोधकांनी इरई नदीच्या अभियानात सहभाग घ्यावा : केवळ नावासाठी विरोध करून इरई नदी स्वच्छ होणार नाही. त्यामुळे विरोधकांनी सुद्धा या अभियानात सामील व्हावे. नदीच्या खोलीकरण अभियानाबद्दल कोणीही शंका – कुशंका मनात आणू नये. आपल्या जिल्ह्याची बदनामी होणार नाही, याचीसुद्धा दक्षता घ्यावी. इरई नदीच्या खोलीकरणातून चंद्रपूरचा सन्मान वाढेल, अशी अपेक्षा पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी व्यक्त केली. यावेळी पालकमंत्री डॉ. उईके यांनी, मंत्री म्हणून त्यांना मिळणारे वेतन आणि भत्ता असे एकूण 5 लक्ष रुपयांचा धनादेश इरई नदीच्या खोलीकरण अभियानासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला. Chandrapur river deepening

    इरई नदीच्या 17 कि.मी. साठी दीर्घकालीन उपाययोजना करा – आमदार सुधीर मुनगंटीवार

    पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या नेतृत्वात लोकसहभागातून इरई नदी खोलीकरणाचा शुभारंभ होत आहे, हा अतिशय आनंदाचा क्षण आहे. नदी खोलीकरणासाठी वेगवेगळ्या स्त्रोतांतून निधी गोळा होईल. मात्र अधिकारी आणि कर्मचारीसुध्दा आपले वेतन देतात, ही अभिमानाची बाब आहे. नद्यांबाबत नागरिकांमध्ये गंभीरता असावी. मंत्री असताना जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांच्या सहकार्यातून आपण राज्यात 108 नद्यांच्या पुनरुज्जीवनाचे काम हाती घेतले होते.

     इरई नदीमध्ये ओव्हर बर्डन जास्त जमा होत असल्यने डब्ल्यूसीएल आणि सीटीपीएस यांचे योगदान महत्त्वाचे आहे. इरई नदीच्या 17 कि.मी.साठी दीर्घकालीन उपाययोजना करणे आवश्यक आहे. पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब जमिनीत जिरवण्यासाठी उत्तम नियोजन व्हावे, तसेच हे अभियान निरंतर चालावे. पर्यावरण तज्ज्ञांचीसुद्धा एक स्थायी स्वरूपाची समिती यासाठी गठित करावी, असे आमदार श्री. मुनगंटीवार म्हणाले. यावेळी त्यांनी आपला एक महिन्याचा पगार या अभियानासाठी देत असल्याचे जाहीर केले.  Irai River Deepening in Chandrapur

    संपूर्ण क्षमतेने नदीचे खोलीकरण अभियान राबवावे – आमदार किशोर जोरगेवार

    नद्यांच्या काठावर मानवी वस्ती वसली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात इरई, झरपट, वैनगंगा, वर्धा या नद्या वाहतात. पहिल्या टप्प्यात इरई नदीचे खोलीकरण व त्यानंतर सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे. हे संपूर्ण अभियान प्रशासनाने पूर्ण क्षमतेने राबवावे, असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. पुढे ते म्हणाले, जिल्हा प्रशासनाने कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले आहे. 17 किलोमीटरची जीवनवाहिनी असलेल्या या नदीवर आणखी तीन ते चार बंधारे बांधण्याचे नियोजन करावे. तसेच धानोरा बॅरेज प्रकल्प आगामी काळात पूर्ण करण्यात यावा. इरई नदी पूर संरक्षण भिंतीचा प्रस्ताव शासन स्तरावर मार्गी लावावा, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी त्यांनी 2 लक्ष 55 हजार रुपयांचा धनादेश अभियानासाठी पालकमंत्र्यांकडे सुपुर्द केला. Irai River Deepening in Chandrapur

    Irai river cleaning project

    यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा म्हणाले, आज अतिशय महत्त्वकांक्षी कामाचा शुभारंभ होत आहे. चंद्रपूर शहरात पावसाळ्यात दरवर्षी पूर परिस्थिती निर्माण होते. इरई नदी ही चंद्रपूरची लोकवाहिनी आहे. त्यामुळे तिला वाचवणे आपले कर्तव्यच आहे. 17 कि.मी.च्या तीन टप्प्यात एकूण 5 लक्ष ब्रास गाळ, वाळू मिश्रित गाळ नदीतून काढण्याचे नियोजन आहे. शेतकऱ्यांना हा गाळ मोफत देण्यात येईल. त्यामुळे त्यांची शेती सुपीक होण्यास मदत होईल. घरकुल लाभार्थ्यांना या नदीतील वाळू मोफत देण्यात येणार आहे तर शासकीय व इतर कंत्राटदारांना अल्प दरात वाळू मिळेल, असे त्यांनी सांगितले. Irai River Deepening in Chandrapur

    प्रास्ताविकात मनपा आयुक्त विपीन पालीवाल म्हणाले, नदी असलेली शहरे ही भाग्यवान असतात. विकासाच्या भारामुळे इरई नदी घुसमटत आहे. त्यामुळे खोलीकरणाचा आज शुभारंभ करण्यात आला. यासाठी पालकमंत्र्यांनी दोन महिन्यांपूर्वीच आराखडा तयार केला आणि लोकसहभागाने हे अभियान राबविण्याच्या सूचना केल्या. या अभियानात शासन – प्रशासन, यांच्यासोबतच लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटना व सर्वांचा सहभाग आवश्यक आहे. चंद्रपूर महानगरपालिकेला नुकतेच 8 लक्ष रुपयांचे दोन पुरस्कार मिळाले असून दोन्ही पुरस्काराची रक्कम या अभियानासाठी देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

    तत्पुर्वी मान्यवरांच्या हस्ते खोलीकरणाच्या यंत्रसामुग्रीचे उद्घाटन आणि नदीच्या पात्रात कुदळ मारून खोलीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन रिध्दी उईके यांनी तर आभार अधिक्षक अभियंता प्रवीण झोड यांनी मानले.

  • Bodhgaya Mahavihar in Chandrapur protest । बोधगया आमचा आहे! चंद्रपूरच्या रस्त्यावर गगनभेदी घोषणा

    Bodhgaya Mahavihar in Chandrapur protest

    Bodhgaya Mahavihar in Chandrapur protest : बिहार मधील बौद्धगया महाबोधी महाविहाराच्या मुक्ततेसाठी चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व बौद्ध विहार आणि बौद्ध मंडळांच्या सहकार्याने, न्याय्य मागण्यांसाठी समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा आणि आंबेडकर चळवळीतील विविध राजकीय, सामाजिक आणि धार्मिक संघटनांच्या पुढाकाराने शुक्रवार 25 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता चंद्रपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत भव्य शांतता मोर्चा काढण्यात आला.

    आपल्या परिसरात अनधिकृत बालगृह आहे काय? तात्काळ करा तक्रार

    रखरखत्या उन्हात नागरिक या शांतता मोर्च्यात हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते, आम्हाला आमचे पवित्र स्थळ परत करा अश्या घोषणा या शांतता मोर्च्यात करण्यात आल्या.

    बौद्धगयेचा महाविहार हे बौद्धांचे एकमेव जागतिक दर्जाचे धार्मिक स्थळ आहे. ते बौद्धांच्या नियंत्रणाखाली नाही ही चिंतेची बाब आहे. त्या वेळी अनागरिक धर्मपाल यांनी बौद्ध मठ हिंदू भिक्षूंच्या नियंत्रणातून मुक्त करण्यासाठी प्रयत्न केले. लहान-मोठे आंदोलनही झाले. बुद्धगया महाविहार हिंदू च्या नियंत्रणातून मुक्त होईपर्यंत बौद्धांना संघर्ष करावा लागेल. भंते सुरई ससाई यांनी बुद्धगया महाविहाराच्या मुक्तीसाठी 9 टप्प्यांत आंदोलन केले. आता भारतीय भिक्खू संघाने 12 फेब्रुवारीपासून चळवळ सुरू केली आहे. त्याला अनेक राष्ट्रांकडून पाठिंबा मिळत आहे. या मुद्द्याबाबत, केवळ भारतातच नाही तर जगभरात, जागरूक लोक रस्त्यावर येऊन शांततेने निषेध करत आहेत. bodhgaya temple controversy

    हा जागतिक वारसा बौद्धांच्या ताब्यात द्यावा आणि 1949 चा बीटी कायदा रद्द करावा. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र स्पर्शाने चंद्रपूर जिल्हा पवित्र झाला आहे आणि बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या प्रेरणेतून आंबेडकरी चळवळीचे मुख्य केंद्र आहे. या पार्श्वभूमीवर, भिक्खू संघ आणि बौद्ध लोकांच्या उपस्थितीत बोधगया महाविहाराच्या मुक्तीसाठी एक नवीन मुक्ती चळवळ सुरू करण्यात आली आहे. बौद्धांच्या अस्मिते च्या मागणीसाठी चंद्रपूर जिल्ह्यात बौद्ध आंबेडकरवादी रस्त्यावर उतरून हजारो लोक शांतता मोर्चात सहभागी झाले.

  • vulture conservation project Maharashtra । ताडोबात गिधाडांची दुसरी तुकडी दाखल, प्रकल्पाचा नवा टप्पा

    vulture conservation project Maharashtra

    vulture conservation project Maharashtra : चंद्रपूर:पूर्णपणे नामशेष होत असलेल्या संकटग्रस्त प्रजातीला पूर्नस्थापित करण्याकरीता पांढऱ्या पाठीच्या गिधाडांची (Gyps bengalensis) दुसरी तुकडी आज गुरूवारी (24एप्रिल) ला जटायू संवर्धन प्रकल्प अंतर्गत ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोळसा वनपरिक्षेत्रातील बोटेझरी येथील प्री-रिलीज पक्षीगृहात सोडण्यात आली. पांढऱ्या पाठीचे हे गिधाडे हरियाणामधील गिधाड संवर्धन प्रजनन केंद्र (VCBC) येथून स्थानांतरित करण्यात आले आहेत. Tadoba vulture release news

    जननी शिशु योजना ठप्प होण्याच्या मार्गावर, खासदार धानोरकर यांनी घेतली दखल


    या दुसऱ्या तुकडीत पाच गिधाडांचा समावेश असून त्यामध्ये तीन नर व दोन मादी आहेत. प्रत्येक गिधाडाचे स्वतंत्र ओळख क्रमांक व वय नोंदवलेले आहे. नर गिधाडांमध्ये F24 (वय ६ वर्ष), N16 (वय 2 वर्षे) आणि N77 (वय 1.4 वर्षे) यांचा समावेश आहे, तर z.25 (वय 6 वर्ष) व z 34 (वय 3 वर्षे) मादी गिधाडे आहेत.
    हा प्रकल्प महाराष्ट्र वन विभाग व बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (BNHS) यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत आहे. पक्षीगृहात सोडण्यात आलेली गिधाडे सध्या चांगल्या प्रकृतीत असून, त्यांच्या वर्तणूक व हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे. Jatayu vulture project India

    Tadoba vulture release news


    ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोळसा वनपरिक्षेत्रातील बोटेझरी येथील प्री-रिलीज पक्षीगृहात ही दुसरी तुकडी सोडण्यात आली आहे. या आधी 2024 मध्ये 10 गिधाडांची पहिली तुकडी सोडण्यात आली होती, ज्यापैकी दोन गिधाडे n 10 आणि j 74 जिवंत आहेत. सध्या या परिसरात पांढऱ्या पाठीच्या गिधाडांची नैसर्गिक लोकसंख्या अस्तित्वात नाही. त्यामुळे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये सुरु असलेला हा प्रकल्प संवर्धनाच्या दृष्टीने एक महत्वाचे पाऊल ठरत आहे. या परिसरातून पूर्णपणे नामशेष झालेल्या या अत्यंत संकटग्रस्त प्रजातीला पुन्हा स्थापन करण्याचे उदिष्ठ्य या उपक्रमामागे आहे.


    प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) श्रीनिवास राव, BNHS चे अध्यक्ष प्रविणसिंह परदेशी, BNHSचे संचालक किशोर रिठे आणि ताडोबाचे क्षेत्र संचालक डॉ. प्रभू नाथ शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. डॉः श्रवण सिंह, डॉ. काझवीन उमीगर, हेमंत बाजपेयी, मयंक बर्डे, मनन महादेव, कोळसाचे वनपरिक्षेत्र अधिकारी रुंदन काटकर व त्यांच्या चमूने गिधाडांची सुरक्षित वाहतूक व पक्षीगृहात सोडण्याची प्रक्रिया पूर्ण केली.

  • unregistered child hostel complaint । आपल्या परिसरात अनधिकृत छात्रावास आहे का? तात्काळ 1098 वर फोन करा

    unregistered child hostel complaint

    unregistered child hostel complaint : आपल्या परिसरात अनाधिकृत छात्रावास, अनाधिकृत बालगृह/ बालकांचे निवासी संस्था सुरु असल्याची माहिती मिळाल्यास तात्काळ 1098 या टोल फ्री नंबरवर तसेच महिला व बाल विकास विभागाला माहिती द्यावी, असे आवाहन महिला व बाल विकास आयुक्त नयना गुंडे यांनी केले आहे.

    रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी गौडा यांची ग्रामीण भागात भेट

    परिसरात अनाधिकृत बालगृह व छात्रावास सुरु असेल तर तात्काळ टोल फ्री नंबर 1098 ला माहिती द्यावी व  बाल शोषण रोखण्याकरीता सहकार्य करावे. पुणे जिल्ह्यात आळंदी आणि ठाणे जिल्ह्यात खडवली येथे विनापरवाना, अनाधिकृत बालगृह, छात्रावास आणि अनाथालय चालवण्यात येत असल्याच्या बातम्या विविध प्रसार माध्यमातून समोर आल्या आहेत. या ठिकाणी बालकांना इच्छा नसताना ठेवले जाते व त्यांचे शारिरीक, मानसिक आणि लैंगिक शोषण झाले आहे. हे प्रकरण खुप गंभीर आहे. illegal child shelter report

    बाल न्याय (बालकांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 व संशोधित अधिनियम 2021 आणि महाराष्ट्र राज्य बाल न्याय नियम 2018 चे उल्लंघन आहे. या अधिनियम मधील कलम 42 नुसार अशा संस्थाना आवश्यक मान्यता व नोंदणी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. विना नोंदणी प्रमाणपत्र बालगृह/संस्था चालविणाऱ्या व्यक्तीला एक वर्ष कारावास आणि कमीतकमी 1 लाख रुपये दंड किंवा दोन्ही होऊ शकते.

                 त्यामुळे नागरिकांना आपल्या परिसरात व क्षेत्रात असे अनाधिकृत बालकांच्या संस्था/बालगृह व छात्रावासबाबत माहिती मिळाल्यास तात्काळ जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जिल्हा बाल संरक्षण कक्ष व चाईल्ड हेल्पलाईन टोल फ्री नंबर 1098 वर माहिती देवून बालकांचे शोषण थांबविण्यास मदत करावी, असे आवाहन आयुक्त नयना गुंडे आणि जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी दिपक बानाईत यांनी केले आहे. childline 1098 India

  • district collector visit updates । जिल्हाधिकाऱ्यांचा पोंभुर्णा दौरा: भर उन्हातही विकासकामांचा आढावा

    district collector visit updates

    district collector visit updates : राज्य शासनाच्या 100 दिवस कृती आराखड्यांतर्गत जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. हे जिल्ह्यातील विविध ठिकाणी क्षेत्रीय भेटी देऊन विकासकामांची पाहणी करीत आहे. गत आठवड्यापासून जिल्ह्यात उन्हाचा तडाखा चांगलाच बसत असला तरी त्याची पर्वा न करता भर उन्हात जिल्हाधिका-यांनी पोंभुर्णा तालुक्यात भेट देऊन मजुरांशी संवाद साधला.

    कंपोस्ट खड्डा भरू, आपलं गाव स्वच्छ ठेवू, चंद्रपूर जिल्हापरिषदेचे अभियान

    23 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी पोंभुर्णा तालुक्यातील मौजा घनोटी तुकूम येथील मजगी कामाची पाहणी केली. यावेळी तेथे कामावर असलेल्या कामगारांशी त्यांनी संवाद साधला आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच त्यांना मार्गदर्शन सुध्दा केले. यावेळी जिल्हाधिका-यांनी तालुक्यातील विविध विकासकामांना भेटी देऊन प्रगतीचा आढावा घेतला. employment under MGNREGA

    क्षेत्रीय भेटीदरम्यान मौजा आंबेधानोरा येथे अंगणवाडी केंद्राला भेट देऊन पाहणी केली. तसेच तलाठी कार्यालयाची तपासणी करून मार्गदर्शन केले. यानंतर जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी मौजा उमरी पोतदार येथील नवीन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीला भेट देऊन पाहणी केली. तसेच बळीराजा शेत पाणंद रस्ताच्या कामाला भेट दिली.

    पोंभुर्णा येथील ग्रामीण रुग्णालयास भेट देऊन जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी वैद्यकीय अधिका-यांसोबत रुग्णालयातील वार्ड, भरती असलेले रुग्ण, त्यातील यंत्र सामुग्री, औषध उपलब्धता व इतर आरोग्य विषयक सोई सुविधाबाबत तपासणी करून आढावा घेतला. तसेच पोंभूर्णा येथील महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे अगरबत्ती प्रकल्पाची सुध्दा त्यांनी पाहणी केली. मौजा चिंतलधाबा येथील ग्रामपंचायत क्रीडांगण काम, मनरेगा अंतर्गत 650 वृक्ष लागवड केलेल्या कामास भेट देऊन मार्गदर्शन केले. government health facility inspection

    employment under MGNREGA

    सदर दौ-याच्या वेळी गोंडपिपरीचे उपविभागीय अधिकारी रविंद्र माने, तहसीलदार रेखा वाणी, गटविकास अधिकारी विवेक बेल्लालवार, जि.पं.बांधकाम उपविभागीय अभियंता श्रीमती जोशी, पोलीस निरिक्षक राजकमल वाघमारे, नायब तहसिलदार रामकृष्ण उईके, मंडळ अधिकारी दिनकर शेडमाके व सुरेंद्र चिडे यांच्यासह गटशिक्षण अधिकारी, विस्तार अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, सरपंच, सहा.कार्यक्रम अधिकारी, तांत्रिक सहाय्यक, ग्रामरोजगार सहाय्यक व गावातील नागरीक उपस्थित होते.

  • Chandrapur Shiv Sena woman leader । उद्धव ठाकरेंचा विश्वास! वर्षा ठाकरे यांच्या खांद्यावर चंद्रपूर महिला आघाडीची जबाबदारी!

    Chandrapur Shiv Sena woman leader

    Chandrapur Shiv Sena woman leader : भद्रावती – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा, चिमुर, राजुरा या विधानसभेकरिता जिल्हा महिला संघटकपदी वर्षा राजेश ठाकरे यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. Shiv Sena women’s wing Chandrapur

    बालकांचे हृदय वाचविण्यासाठी आमदार जोरगेवार यांचा पुढाकार

    शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा नेते आमदार आदित्य ठाकरे, शिवसेना नेते संजय राऊत, आमदार भास्कर जाधव, माजी खासदार विनायक राऊत, चंद्रपूर-आर्णी लोकसभा क्षेत्राचे संपर्क प्रमुख आमदार संजय देरकर, माजी महापौर किशोरीताई पेडणेकर, जिल्हा संपर्क प्रमुख प्रशांत कदम, रंजनाताई नेवाळकर, जिल्हा संपर्क प्रमुख महिला आघाडी सुषमाताई साबळे, युवासेना हर्षल काकडे यांच्या मार्गदर्शनात सदर नियुक्ती करण्यात आलेली आहे. Varsha Thackeray appointment

    शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे वरोरा, राजुरा व चिमूर विधानसभा क्षेत्राचे जिल्हाप्रमुख रवींद्र शिंदे यांच्या कार्याने दिवसेंदिवस पक्षाचे संघटन मजबूत होत असून पक्षाचे जनहितार्थ कार्य वाढीस लागले आहे. पक्षात इनकमिंग वाढली असुन अनेक प्रस्थापित व नवीन चेहरे पक्षात प्रवेश घेत आहे. सोबतच पक्षातील सक्रीय पदाधिकारी व कार्यकर्ते यांना पदांच्या स्वरूपात बहुमान मिळत आहे. Women leaders Shiv Sena

    वर्षा ठाकरे या गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय आहेत. त्यांनी राजकारणात विविध पदे भूषविली आहेत. वर्षाताई ठाकरे यांनी शिवसेना महिला आघाडीच्या भद्रावती तालुका अध्यक्ष, कुचना ग्राम पंचायत सरपंच, संजय गांधी निराधार योजना समिती सदस्य, भद्रावती तालुका नागरी सह. पत संस्थेच्या संचालक, आदी पदे भूषविली आहेत. त्यांनी पाटाळा पुलाकरीता आंदोलन केले आहे. त्यावेळी पोलीस प्रशासनाने विविध कलमा अंतर्गत गुन्हा नोंद केला होता. मात्र प्रशासनाने आंदोलनाची दखल घेत पुलाची दुरुस्ती करुन नागरीकांकरीता सुरक्षा व्यवस्था बहाल केली. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची नियुक्ती झालेली आहे.

    वर्षा राजेश ठाकरे यांच्या जिल्हा महिला संघटकपदाच्या नियुक्ती साठी सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे. जिल्हाप्रमुख रवींद्र शिंदे, पूर्व विदर्भ सचिव नीलेश बेलखेडे, संदीप रियाल (पटेल) युवासेना महाराष्ट्र राज्य विस्तारक,मनीष जेठानी युवासेना विस्तारक, मायाताई नारळे उपजिल्हा संघटीका वरोरा विधानसभा,वरोरा तालुका महिला आघाडी प्रमुख सरला मालोकर, आशाताई ताजने, तालुकाप्रमुख नंदू पढाल,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भास्कर ताजने, खेमराज कुरेकर, रोहन कुटेमाटे, ज्ञानेश्वर डुकरे माजी नगराध्यक्ष, नितीन पिपरे,

    आश्लेषा जीवतोडे उपसभापती बाजार समिती भद्रावती , प्रमोद वाघ,, राजुरा तालुका प्रमुख संदीप वैरागडे,कोरपणा तालुका प्रमुख डॉ प्रकाश खनके, गोडपिपरी तालुका प्रमुख सुरज माडूरवार, जिवती तालुका प्रमुख रमेश जाधव, भद्रावती शहर प्रमुख घनश्याम आस्वले, माया टेकाम भद्रावती शहर संघटीका , शीला आगलावे उपतालुका महिला आघाडी , भावना खोब्रागडे भद्रावती महिला आघाडी समन्वयक,माजी नगरसेवक पंकज नाशिककर, नंदू टेमुर्डे, अभिजीत पावडे, शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सर्व विंगचे पदाधिकारी आदींनी अभिनंदन केले आहे.

  • Geological survey Chandrapur । ब्रेकिंग न्यूज: चंद्रपूरच्या मातीत मौल्यवान धातूंचा खजिना!

    Geological survey Chandrapur

    चंद्रपूरमध्ये खजिन्याचा डोंगर! प्लॅटिनम, क्रोमियम आणि सोनं प्रथमच आढळले!

    Geological survey Chandrapur : चंद्रपूर जिल्हा हा अनेक व्यावसायिक खानिजानी समृध्द असल्याचे आपल्याला माहित असतानाच आता मौल्यवान खनिजे आणि धातू सुद्धा चंद्रपूर जिल्ह्यात आढळल्याने जिल्ह्याचे नाव देशात उंचावले आहे.जिल्ह्यातील सावली तालुक्यात क्ऱोमियम, प्लाटीनम आणि अल्प प्रमाणात सोने ह्या मौल्यवान धातुसाहित अनेक महत्वाचे धातू केवळ चंद्रपूर जिल्ह्यात आढळले असल्याची माहिती भूशास्त्र विभागाच्या सर्वेक्षणाच्या आधारे भूशास्त्र अभ्यासक प्रा सुरेश चोपणे ह्यांनी दिली आहे. Gold found in Chandrapur

    पहलगाम मध्ये अडकलेले चंद्रपूरचे पर्यटक, आमदार जोरगेवार मदतीसाठी सरसावले


    सावली-पाथरी नावाने ओळखला जाणारा ह्या ब्लॉकला ( CL-MH-04) सर्वेक्षण करण्यासाठी मिनिस्ट्री ऑफ माईन तर्फे मान्यता देण्यात आली आणि डिसेंबर २०१६ ते मार्च २०१७ पर्यंत ह्याचे सर्वेक्षण करण्यात आले होते.ह्यां अंतर्गत १६० वर्ग किमी येवढ्या भूभागाचे G-4 पद्धतीचे टोपोग्राफीकल सर्वेक्षण करायचे होते. हे सर्वेक्षण MECL ला देण्यात आले..ह्यात केवळ जमिनीवरील खडक आणि मातीचे नमुने गोळा केल्या गेले असून ते नागपूर आणि कानपूर येथील प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आली. Chandrapur chromium reserves

    Chandrapur chromium reserves

    दुर्दैवाची बाब अशी की ह्या परिसरात जंगल आणि वन्यजीव असल्याने सर्वेक्षण चमूला पूर्ण भागाचे नमुने गोळा करता आले नसून व्यावसाईक खाणी सुरु करायच्या असतील तर पुढे भूगर्भात बोअरहोल पद्धतीने सर्व भागात सर्वेक्षण केल्या जाणे महत्वाचे असल्याचे चमूने सांगितले. कारण धातूंचे मोठे साठे भूगर्भात जास्त असण्याची शक्यता त्यांनी वर्तविली. मिनरल एस्कप्लोरेशन कोर्पोरेशन लिमिटेड तर्फे एक प्राथमिक सविस्तर अहवाल प्रसिद्ध करून शासनाला २०१८ मध्ये सादर करण्यात आला.प्रा सुरेश चोपणे ह्यानि सुद्धा २१/४/२०२५ रोजी सावली तालुक्यातील धातू आढळनाऱ्या गावांना भेटी देवून पाहणी केली. Archean rocks Maharashtra


    भौगोलिक दृष्ट्या सावली-पाथरी भूभाग हा बस्तर क्रेटोन चा भूभाग असून इथे ३०० कोटी वर्षादरम्यानाचे आर्कीयन काळातील आणि १५० कोटी वर्शापुर्विच्या प्रोटेरोझोईक काळातील खडक आहेत आणि ह्यांच खडकात मौल्यवान असे प्लाटीनम ,क्रोमियम,सोने आणि इतर अनेक धातू आढळले आहेत, ज्यामध्ये पल्लाडीयम,इरीडीयम,रोडियम, रुथेनियम, ओस्मियम,सोने ह्या धातूंचे अंश मिळाले आहेत.सर्वाधिक ( ९५० ppb )प्रमाण प्लाटीनम आणि क्रोमियम चे आढळले तर उर्वरित सोने आणि इतर धातूंचे प्रमाण कमी आढळले. चंद्रपूर साठी महत्वाची बाब म्हणजे प्लाटीनम आणि क्रोमियम चे साठे देशात चंद्रपूर वगळता कुठेच सापडले नाहीत,परंतु पुढील सविस्तर सर्वेक्षणात चंद्रपूर जिल्ह्यात आढळण्याची शक्यता भूशास्त्र विभागाने व्यक्त केली आहे.

    Proterozoic rocks Chandrapur


    देशात महत्वाचे मानले जाणारे मौल्यवान धातू केवळ चंद्रपूर जिल्ह्यात आढळल्याने आणि जिल्ह्याच्या विकासाठी शासन आंनी प्रशासनाने प्रयत्न करावे.भविष्यात लवकरात लवकर भूगर्भीय सर्वेक्षण होण्यासाठी लोकांनी, लोकप्रतिनिधी आणि मंत्री महोदयांनी पुढाकार घ्यावा अशी विनंती प्रा सुरेश चोपणे ह्यांनी केली आहे.

  • Chandrapur tourists stuck in pahalgam । पहलगाममध्ये अडकले चंद्रपूरचे पर्यटक; कर्फ्यू, भीती आणि मदतीची प्रतीक्षा!

    Chandrapur tourists stuck in pahalgam

    “घरी परतायचंय… पण कर्फ्यूने अडवलं” – पहलगाममध्ये अडकलेल्या चंद्रपूरकरांची व्यथा

    Chandrapur tourists stuck in pahalgam : २२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीर मध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या हल्ल्यात २६ नागरिकांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील ६ पर्यटकांचा समावेश आहे, राज्यासह चंद्रपूर शहरातील ७ पर्यटक आजही पहलगाम मध्ये अडकले असून सध्या ते दहशतीच्या सावटात असून अजूनही त्यांना प्रशासनातर्फे कसलीही मदत मिळालेली नाही. Pahalgam attack Maharashtra tourists

    राज्यातील पर्यटकांना विशेष विमानाने परत आणा – खासदार धानोरकर

    देशातील नंदनवन समजल्या जाणाऱ्या काश्मीर मधील पहलगाम मध्ये पर्यटकांवर दहशतवाद्यांचा भ्याड हल्ला झाला होता, या घटनेने संपूर्ण देश हादरून गेला, घटनेनंतर पहलगाम मध्ये कर्फ्यू लावण्यात आला आहे. विविध राज्यातील प्रशासन आहे. Pahalgam shooting incident 2025

    चंद्रपूर शहरातील ७ नागरिक सध्या पहलगाम मध्ये अडकलेले आहे, यामध्ये तेजस्विनी गाडीवान, अजय गाडीवान, वर्षा गाडीवान, अंकित नगराळे, रितेश नळे, शिल्पा नळे, स्पर्श नळे यांचा समावेश आहे. १६ एप्रिल रोजी सदर नागरिक काश्मीरच्या मार्गे रवाना झाले होते, तिथे पोहचल्यावर त्यांनी आधी वैष्णोदेवीचे दर्शन केले. त्यानंतर काश्मीर मधील निसर्गाचा आनंद घेण्यासाठी ते पहलगाम मध्ये पोहचले. पहलगाम मधील शबाना पॅलेस मध्ये गेले, २२ एप्रिल रोजी ज्याठिकाणी दहशतवादी हल्ला झाला तिथे चंद्रपुरातील नागरिक फिरायला गेले होते, यावेळी त्यांनी घडलेला प्रसंग कथन केला. Pahalgam attack Maharashtra tourists

    काय घडलं?

    आम्ही सर्व हॉर्स रायडींग करीत असताना अचानकपणे लोक सैरावैरा पळू लागले, तितक्यात गोळीबाराचा आवाज आला, आम्ही तात्काळ कार पार्किंगकडे धाव घेतली, त्यावेळी आम्हाला माहिती मिळाली कि हा दहशतवादी हल्ला होता. आम्ही तात्काळ हॉटेलकडे जाण्याचा प्रयत्न केला मात्र वाहन न मिळाल्याने आम्ही सर्व ५ किलोमीटर पायदळ चालून हॉटेलमध्ये पोहचलो. त्याचदिवशी आम्हाला या हल्ल्यात अनेकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. आम्ही सर्व घाबरून आहो. याबाबत आम्ही चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर व आमदार किशोर जोरगेवार यांच्याशी संपर्क साधला असून त्यांनी प्रशासनाला याबाबत कळविले आहे.

    चंद्रपुरातील प्रशासनाने आमच्याशी संपर्क साधला असून अद्यापही आम्हाला काही मदत मिळाली नसल्याची त्यांनी खंत व्यक्त केली आहे. २३ एप्रिलला त्यांच्या परतीची ट्रेन होती मात्र पहलगाम मध्ये सध्या कर्फ्यू लागल्याने आम्ही हॉटेलमध्ये थांबलेलो आहोत.

    याबाबत न्यूज ३४ तर्फे प्रशासनाला चंद्रपुरातील पर्यटकांच्या परतीबाबत विचारणा करण्यासंदर्भात संपर्क साधला असता कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. चंद्रपुरातील नागरिक दहशतीखाली असून प्रशासनाने तात्काळ त्यांना पहलगाम मधून सुखरूप बाहेर काढत चंद्रपुरात परत येण्यासंदर्भात लवकर प्रयत्न करावे अशी भावना पर्यटकांनी व्यक्त केली आहे.

  • Pratibha Dhanorkar on Pahalgam attack । “आपल्या लोकांना परत आणा!” – पहलगाम घटनेनंतर धानोरकरांचा भावनिक आग्रह

    Pratibha Dhanorkar on Pahalgam attack

    Pratibha Dhanorkar on Pahalgam attack : 22 एप्रिल 2025 रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील काही पर्यटकांचा मृत्यू झाल्याच्या आणि काही नागरिक जखमी झाल्याच्या दुर्दैवी घटनेमुळे महाराष्ट्रात शोक आणि भीतीचे वातावरण पसरले आहे. या हल्ल्यात डोंबिवली येथील तीन पर्यटकांचा मृत्यू झाला असून पुण्यातील एक पर्यटक जखमी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. MP demands rescue flight

    बाबुपेठ मधील भंगार दुकान पेटले

    याव्यतिरिक्त, आणखी काही मराठी पर्यटक पहलगाम आणि आसपासच्या परिसरात अडकले असण्याची शक्यता आहे. त्यांना सुखरूप महाराष्ट्रात परत आणण्याकरिता विशेष विमान उपलब्ध करून देण्याची मागणी खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नागरी विमान राज्यमंत्री मुरलीधर मोहोड यांच्याकडे केली आहे. 

                     या पार्श्वभूमीवर, खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच नागरी विमान राज्यमंत्री मुरलीधर मोहोड यांना पत्र लिहून पहलगाम येथे अडकलेल्या महाराष्ट्रातील सर्व पर्यटकांची तातडीने माहिती घेण्याची आणि त्यांना विशेष विमानाने महाराष्ट्रात परत आणण्याची व्यवस्था करण्याची मागणी केली आहे.

                    खासदार प्रतिभाताई धानोरकर आपल्या पत्रात म्हटले आहे की, या दुःखद घटनेमुळे महाराष्ट्रातील नागरिक चिंतेत आहेत. त्यामुळे, राज्य शासनाने तातडीने कार्यवाही करून पहलगाम मध्ये अडकलेल्या आपल्या बांधवांना सुरक्षितपणे परत आणणे आवश्यक आहे. राज्य सरकार या मागणीची दखल घेऊन लवकरात लवकर योग्य उपाययोजना करेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. Special flight for stranded tourists

    प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र 

    पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी दुःख व्यक्त केले आहे. या हल्ल्यात निष्पाप पर्यटकांना जीव गमवावा लागला, ज्यात महाराष्ट्रातील काही नागरिकांचाही समावेश आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र दुःखात आहे.  “या हल्ल्यातील पीडित कुटुंबीयांना केंद्र आणि राज्य सरकारने तातडीने आर्थिक मदत करण्याची मागणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केली आहे. Pahalgam tourist safety

                         खासदार धानोरकर यांनी या अमानुष हल्ल्याचा तीव्र निषेध केला असून, केंद्र सरकारकडे तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, “दहशतवाद्यांनी केलेल्या या भ्याड हल्ल्यामुळे देशातील नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. केंद्र सरकारने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन या हल्ल्यामागे असलेल्या दोषींना शोधून काढले पाहिजे आणि त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे.”

                         त्यांनी पुढे सांगितले की, “या हल्ल्यातील पीडित कुटुंबीयांना केंद्र आणि राज्य सरकारने तातडीने आर्थिक मदत आणि आवश्यक ती सर्व मदत पुरवावी. तसेच, भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे.”

                   खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी या संदर्भात केंद्र सरकारला पत्रव्यवहार करणार असल्याचेही सांगितले. त्यांनी या दुःखाच्या प्रसंगी पीडित कुटुंबाच्या दुःखात सहभागी असल्याचे म्हटले आहे.

  • Chandrapur RTO office timing । चंद्रपूर RTO ऑफिसचा वेळ बदलला! उष्माघात टाळण्यासाठी बदललेले तास जाणून घ्या!

    Chandrapur RTO office timing

    Chandrapur RTO office timing : चंद्रपूर, दि. 22 एप्रिल :  चंद्रपूर जिल्ह्यातील वाढते तापमान लक्षात घेता जनतेला उष्माघाताचा त्रास होऊ नये, याकरिता प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे देण्यात येणाऱ्या खालील सेवांच्या वेळेत पुढीलप्रमाणे बदल करण्यात येत आहे. Chandrapur transport department news

    चंद्रपूर मनपाचा राज्यात गौरव

    योग्यता प्रमाणपत्र देण्याकरिता बाबूपेठ – बल्लारपूर बायपास रोड येथील ब्रेक टेस्ट ट्रॅकवर होणारी वाहन तपासणी (पासिंग) तसेच कार्यालयात होणारी पक्की अनुज्ञप्ती चाचणी (Driving Test) 23 एप्रिल पासून सकाळी 7 ते दुपारी 12 वाजेपर्यंत व दुपारी 4 ते 6.30 वाजेपर्यंत करण्यात येत आहे. ज्या अर्जदारांनी वाहन 4.0 या वाहनप्रणालीवर यापुर्वी वेळा घेतल्या असल्यास त्यांनी देखील सदर वेळेत उपस्थित राहून कामे करून घ्यावी. इतर कामकाज पुर्वीप्रमाणेच होईल.

    तरी सर्व वाहन मालकांनी व चालकांनी याची नोंद घ्यावी,  असे प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी कळविले आहे.