Category: ताज्या बातम्या

महाराष्ट्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व ताज्या बातम्या (Latest News) आणि ब्रेकिंग अपडेट्स वाचण्यासाठी रोज भेट द्या news34.in वर. राजकारण, समाजकारण, क्रीडा, गुन्हेगारी आणि आर्थिक घडामोडींचे त्वरित आणि विश्वसनीय कव्हरेज येथे उपलब्ध आहे. २४ तास सुरू असलेल्या घडामोडींची अचूक माहिती मिळवा, जेणेकरून कोणतीही मोठी बातमी तुमच्यापासून सुटणार नाही.

  • Suresh Chopane fossil research । चंद्रपूरच्या नदीत दडलं होतं रहस्य! वाचल्यावर विश्वास बसणार नाही!

    Suresh Chopane fossil research

    Suresh Chopane fossil research : चंद्रपुर तालुक्यात वर्धा-पैनगंगा नदीच्या पात्रात २५,००० ते १२००० वर्षादरम्यान विदर्भात विचलन करणारे आणि आज लुप्त झालेल्या दुर्मिळ स्टेगाडॉन हत्तीचे जीवाश्म चंद्रपूर येथील भूशात्र संशोधक प्रा.सुरेश चोपणे ह्यांनी नुकतीच शोधली आहे .महाराष्ट्रात अश्या प्रकारची अलीकडील प्लेईस्टोसीन काळातील मिळालेली हत्तीची ही दुर्मिळ जीवाश्म आहेत. डायनोसोर नंतर विशालकाय प्राण्यांची जीवाश्मे पहिल्यांदाच विदर्भात मिळाली आहेत. ह्या जीवाश्मा सोबतच पाषाणयुगीन अवजारे सुद्धा मिळाली आहेत. दुर्मिळ हत्तींचे जीवाश्मे आणि पाषाणयुगीन अवजारे एकाच ठिकाणी सापडणे सापडणे हे अतिशय महत्वाचे मानले जाते. Extinct elephant fossils Maharashtra

    चंद्रपूरचा कडक उन्हाळा, खासदार धानोरकर यांनी सुचवले उपाय

    ही जीवाश्मे प्लेईस्टोसीन काळातील आणि जवळ जवळ २५००० वर्शादरम्यान विदर्भात वास्तव्य करणाऱ्या स्टेगोडॉन गणेश हत्तीची ( Stegodon Ganesa) आहेत. .हत्तीच्या दातावरून ही लुप्त झालेल्या स्टेगाडॉन हत्तीची आहेत असे मत अनेक परदेशी संशोधक तसेच वाडिया इंस्टीट्युट ऑफ हिमालयन जीओलोजी चे निवृत्त प्राध्यापक आणि संशोधक अविनाश नंदा ह्यांनी व्यक्त केले आहे. हे हत्ती २३ ते २६ हजार वर्षापूर्वी विलुप्त झाले.आजचे आशियायी हत्तींचे हे पूर्वज होते. ह्याच ठिकाणी एलेफास नामाडीकस ( Elephas Namadicus) ह्या लुप्त झालेल्या हत्ती सदृश्य डोके सुद्धा आढळल्याने ह्या हत्तीं जीवाश्मांचे चे सविस्तर विश्लेषण करण्याची गरज असल्याचे मत संशोधक प्रा सुरेश चोपणे ह्यांनी व्यक्त केले आहे. Pleistocene fossils Vidarbha

    प्लेईस्टोसीन ह्या २ लाख ते ११,७०० वर्षाच्या कालखंडात भारतात हत्तींचे आणि पाषाण युगीन मानवांचे मोठ्या संख्येत वास्तव्य होते .ह्याच काळाच्या शेवटच्या कालखंडात हिमयुग होते.जेव्हा हे हिमयुग वितळले तेव्हा भारतात प्रचंड महापूर आले आणि ह्या महापुरात अनेक प्रजाती वाहून गेल्या.त्याच पुरातील गाळात ( अल्लुव्हींयम ) अनेक सजीवांचे पुरावे सापडतात.चंद्रपूर जिल्ह्यात सापडलेले हत्ती हे १५ फुट उंचीचे विशाल जीव होते आणि लुप्त झालेल्या हे स्टेगाडॉन हत्तींची ही जीवाश्मे महाराष्ट्रात प्रथमताच मिळाली आहेत अशी माहिती संशोधक पा सुरेश चोपणे ह्यांनी दिली.


    प्रा सुरेश चोपणे हे २०१९ ते २०२४ पर्यंत प्लेईस्टोन काळातील गाळात जीवाश्मे शोधत होते.त्यांना २०२०-२१ मध्ये प्रथमता चंद्रपूर तालुक्यात वर्धा आणि पैनगंगा नदी नदी पात्रात संगमाजवळ जीवाश्मे मिळाली .संपूर्ण कोरोना काळात चंद्रपूर तालुक्यातील वर्धा नदीवर सर्वेक्षण सुरु असतानाच २०२१-२२ मध्ये वरोरा तालुक्यातील वर्धा नदीपात्रात भागात विशाल काय येलीफास नामाडिकस सदृश्य हत्तींची जीवाश्मे आढळली .त्यांचे वर्धा नदीवरील संशोधन हे २०२४-२५ मध्ये पूर्ण झाले असून ही सर्व जीवाश्मे त्यांनि घरी स्थापन केलेल्या ,सुरेश चोपणे रॉक म्युझियम मध्ये संशोधन आणि शैक्षणिक कार्यासाठी त्यांच्या संग्रहालयात ठेवली आहेत.भूगोल,भूशास्त्र ,जीवशास्त्र आणि विज्ञान शाखेच्या संशोधक विध्यार्त्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे. Lost elephant species India


    मिळालेली जीवाश्मे – सापडलेल्या जीवाश्म अवशेषात हत्तीच्या मांडीची हाडे ,चर्वण करणारी दात (Molar) आणि डोक्याची कवटी ,छातीची हाडे अश्या अवयवांचा समावेश आहे.अजून हत्तीची दोन लांब सुळे दात मिळाली नसली तरी एक तुकडा मात्र मिळाला आहे. .गेल्या दोन-तीन दशकापासून ही जीवाश्मे नदीच्या पुरामुळे वाहून गेलेली असल्याने महत्वाचे पुरावे नष्ट झाली आहेत.परंतु अजूनही काही ठिकाणी सजीवांची जीवाश्मे जमिनीत दडलेली आहेत . सविस्तर उत्खननात ती बाहेर येवू शकतात. महाराष्ट्रात सिंधुदुर्ग,पुणे आणि सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी तसेच तेलंगाना मध्ये हत्त्तीची आशियायी हत्तींची जीवाश्मे मिळाली आहेत परंतु स्टेगोडॉन हत्तीची जीवाश्मे मिळण्याची ही महाराष्ट्रातील पहिलीच घटना आहे. Lost elephant species India

    Extinct elephant fossils Maharashtra


    पाषाण युगीन मानवाची अवजारे आढळली – ह्या संशोधनाचा महत्वाचा घटक म्हणजे ह्याच हत्तींच्या जीवाश्मा सोबत पाषाणयुगीन मानवानी बनविलेले दगडी अवजावरे सापडली आहेत. एकाच ठिकाणी हत्तींची जीवाश्मे आणि पाषाण युगीन अवजारे सापडन्यामुळे मानव हत्तींची शिकार करीत होते हे सिध्द होते तर मानवाच्या अति शिकारीमुळे आणि देखील हत्त्ती विलुप्त होण्यास मदत झाली असावी असे लक्षात येते. येथे मिळालेल्या अवजारात हात कुऱ्हाडी (हँन्ड एक्स), आणि इतर प्रकारची अवजारे प्रा सुरेश चोपणे ह्यांना आढळली असून ती प्रा सुरेश चोपणे त्यांच्या संग्रहालयात ठेवलेली आहेत.

  • Farmer ID registration online AgriStack scheme । “डिजिटल शेतीसाठी सरकारचा पुढाकार – शेतकऱ्यांना मिळणार खास ओळख क्रमांक”

    Farmer ID registration online AgriStack scheme

    Farmer ID registration online AgriStack scheme : कृषी क्षेत्राला डिजिटल युगात पुढे नेण्यासाठी केंद्र शासनातर्फे सुरू करण्यात आलेली ॲग्रिस्टॅक योजना चंद्रपूर जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलात आणली जात आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतकऱ्यांसाठी विविध सेवा आणि सुविधा उपलब्ध करून देण्याच्या हेतूने सदर योजना राबवली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जमीन नोंदी, पीक उत्पादन, बाजारपेठेतील संधी, शासकीय योजना तसेच आधुनिक तंत्रज्ञानाशी संबंधित माहिती डिजिटल पद्धतीने एकत्रित केली जाणार आहे. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीशी संबंधित निर्णय अधिक माहितीपूर्ण आणि सोप्या पद्धतीने घेता येणार आहेत. त्यामुळे शेतक-यांना आता फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आले आहे. digital farming solutions

    आनंदाची बातमी, शेतकऱ्यांना मिळणार मोफत गाळ, नोंदणी सुरु

    या योजनेंतर्गत राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा व त्यांच्या शेतांचा आधार संलग्न माहिती संच (फार्मर रजिस्ट्री), शेतकऱ्यांच्या शेतातील हंगामी पिकांचा माहिती संच (क्रॉप सोन रजिस्ट्री) व शेतांचे भू-संदर्भिकृत (जिओ रेफरन्स लँड पार्सल) यांचा माहिती संच एकत्रितरित्या तयार करण्यात येत आहे. त्यामधील शेतकऱ्यांचा माहिती संच तयार करण्यासाठी महसूल अधिकार अभिलेखातील शेतकऱ्याची आणि शेताची माहिती घेऊन त्यानुसार शेतकऱ्याचा आधार क्रमांक हा त्या माहितीशी जोडून प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या शेतांसह एकत्रितरीत्या शेतकरी ओळख क्रमांक (Farmer ID) देण्यात येत आहे. technology for better crop yield

    चंद्रपूर जिल्ह्यातील महसुल व कृषी विभाग तसेच स्थानिक प्रशासनाच्या समन्वयाने या योजनेच्या अंमलबजावणीसाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. शेतकऱ्यांच्या लाभासाठी डिजिटल शेती डेटाबेस तयार करून, शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाच्या मदतीने शेती उत्पादकता वाढविण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल. योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण तसेच मार्गदर्शन देण्याचे नियोजन करण्यात आले असून, त्यासाठी विशेष कार्यशाळांचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना संपूर्ण माहिती मिळणार असून, ते आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य प्रकारे वापर करून शेती व्यवसाय अधिक फलदायी करू शकतील. digital agriculture database

    ॲग्रिस्टॅक योजनेचे शेतकऱ्यांना होणारे फायदे :

    सरकारी योजनांचा जलद लाभ : शेतकऱ्यांची माहिती डिजिटल स्वरूपात संकलित केल्यामुळे अनुदान, पीक विमा, कर्ज आणि अन्य योजनांचा लाभ सहज मिळतो.

    शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर : हवामान अंदाज, माती परीक्षण आणि पीक उत्पादनाच्या सुधारित पद्धतींबाबत माहिती मिळते, ज्यामुळे उत्पादन वाढते.

    बाजारपेठेतील संधी : शेतकऱ्यांना बाजारभावाची अद्ययावत माहिती मिळते, तसेच डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे थेट विक्री करण्याची संधी मिळते.

    आर्थिक सुरक्षितता : थेट लाभ हस्तांतरण (DBT) प्रणालीमुळे शेतकऱ्यांना अनुदान आणि आर्थिक मदत थेट त्यांच्या बँक खात्यात मिळते.

    सुलभ नोंदणी प्रक्रिया : विविध योजनांच्या लाभ घेण्याकरीता शेतकऱ्यांना वारंवार कागदपत्रे सादर करण्याची गरज नसते, कारण त्यांची सर्व माहिती एकाच डिजिटल डेटाबेसमध्ये सुरक्षित ठेवली जाते.

    शेतीतील धोके कमी करणे : पीक विमा आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या योजनांचा लाभ सहज मिळतो, ज्यामुळे नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान भरून निघते.

    कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभाकरिता शेतकऱ्यांची ओळख पटविण्यासाठी अॅग्रिस्टॅक योजनेंतर्गत शेतकऱ्यांना देण्यात येणारा शेतकरी ओळखपत्र क्रमांक (Farmer ID) 15 एप्रिल, 2025 पासून अनिवार्य करण्यात आलेला आहे.

    शेतकऱ्यांना आवाहन : फार्मर आयडी नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांना अनुदान, पीक विमा, प्रशिक्षण आणि आधुनिक शेतीसाठी आवश्यक असलेल्या संसाधनांसाठी प्राधान्य दिले जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप शेतकरी ओळखपत्र क्रमांक साठी नोंदणी केलेली नाही, त्या शेतकऱ्यांनी तातडीने अॅग्रिस्टॅक पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी ग्राम कृषी विकास समिती, CSC, आणि क्षेत्रीय यंत्रणेची मदत घ्यावी. सर्व शेतकऱ्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. तथा जिल्हा प्रशासनाचे वतीने करण्यात आले आहे

  • free silt for farmers । “शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी! इरई नदीतून मोफत गाळ मिळवा – नोंदणी सुरू”

    free silt for farmers

    free silt for farmers : जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या संकल्पनेतुन व जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या पुढाकाराने जिल्हा प्रशासनाद्वारे इरई नदी खोलीकरण मोहीम जिल्ह्यातील सर्व नागरिकांच्या सहभागाने राबविण्यात येणार आहे. 25 एप्रिल ते 8 जून दरम्यान राबविल्या जाणाऱ्या या मोहिमेअंतर्गत नदीतील गाळ काढण्यात येणार आहे. हा सुपीक गाळ शेतकऱ्यांना निःशुल्क नेता येईल, मात्र वाहनाची व्यवस्था शेतक-यांना स्वत: करावी लागणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आली आहे. benefits of silt for farming

    चंद्रपूरचा कडक उन्हाळा खासदार धानोरकर म्हणतात….

    नद्या प्रदुषित झाल्याच्या पार्श्वभूमीवर मा. उच्च न्यायालयात दाखल जनहित याचिकेच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाद्वारे इरई नदी खोलीकरणासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. इरई नदीतील गाळ काढण्याची मोहीम 25 एप्रिल ते 8 जून दरम्यान 45 दिवस राबविण्यात येणार आहे. how to use river silt in agriculture

    या मोहिमेत जिल्हा परिषद, पोलीस प्रशासन, वन विभाग, चंद्रपूर महानगरपालिका, कृषी विभाग, पाटबंधारे विभाग, भूमि अभिलेख कार्यालय, जिल्हा खनिकर्म विभाग, प्रादेशिक परिवहन विभाग, पाटबंधारे विभाग, महाराष्ट्र प्रदूषण महामंडळ ही सर्व शासकीय कार्यालये, सीटीपीएस व डब्ल्युसीएल या खाजगी आस्थापना तर भारतीय जैन संघटना, नाम फाऊंडेशन व टाटा ट्रस्ट या स्वयंसेवी संस्थांचा सहभाग लाभणार आहे. 

    मोहिमेदरम्यान निघणारा सुपीक गाळ निःशुल्क नेण्यास शेतकऱ्यांना तहसील कार्यालयात तहसीलदार यांच्याशी अथवा मंडळ अधिकारी प्रवीण वरभे (9595453655) यांच्याशी संपर्क साधून नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

  • summer heat safety tips । चंद्रपूरचा कडक उन्हाळा! खासदार धानोरकरांचे ७ महत्वाचे उष्माघात प्रतिबंधक उपाय

    summer heat safety tips

    summer heat safety tips : चंद्रपूर जिल्ह्यात सध्या तापमानाचा पारा वाढला असून 40 अंश सेल्सीयस पुढे तापमान गेले आहे. यामुळे जिल्ह्यात नागरीकांच्या आरोग्यावर  उष्माघाताचा प्रकोप होऊ नये याकरीता खासदार धानोरकर यांनी प्रशासनाला सुचना केल्या आहेत. heatwave precautions

    घरकुल अनुदानात तब्बल ५० हजारांची वाढ

    विद्यार्थ्यांचे आरोग्य लक्षात घेता इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरु असलेल्या शाळांना तात्काळ उन्हाळी सुट्ट्या द्याव्यात. तसेच, शहरातील व तालुक्यातील प्रमुख रस्त्यांवर प्रशासनाच्या माध्यमातून पाणपोई ची व्यवस्था करण्यात यावी. ग्रामीण भागातील पाणी टंचाई करीता टॅंकर च्या संख्येत वाढ करणे, चंद्रपूर शहरातील पाणी पुरवठ्याकरीता टोल फ्री नंबर त्यासोबतच, दुपारी 12.00 ते 04.00 या कालावधी संपुर्ण ट्रॅफीक सिग्नल बंद ठेवणे.

    तालुक्यातील बाजाराच्या ठिकाणी व शहरातील वर्दळीच्या ठिकाणी आरोग्य यंत्रणेद्वारा चमु उपलब्ध करुन देण्यात यावी. त्यासोबतच सार्वजनिक स्थळे व शासकीय कार्यालयात थंड पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था करणे तसेच, चंद्रपूर शहरातील मुख्य रस्त्यांवर पाण्याची फवारणी करण्यासंदर्भात खासदार प्रतिभा धानोरकर यांनी प्रशासनाला सुचना केल्या आहेत.

    चंद्रपूर जिल्हा हा प्रामुख्याने मे महिन्यात जगात सर्वात उष्ण राहत असल्याने खासदार धानोरकर यांनी या सुचना केल्या आहेत. या सुचनांची प्रशासनाने तात्काळ दखल घेतल्यास नागरिकांना उष्माघातापासून बचाव करणे शक्य होणार आहे.

  • Bengali New Year celebration | बंगाली नववर्ष साजरा करताना चंद्रपूरमध्ये उमटलं सामाजिक सौहार्द!

    Bengali New Year celebration

    Bengali New Year celebration : बंगाली नववर्षाचा हा सण केवळ एक पारंपरिक उत्सव नाही, तर तो नवउद्यम, नवे स्वप्न आणि नवी आशा घेऊन येतो. आजच्या या सांस्कृतिक समारंभाने आपल्या चंद्रपूरात बहुजनता आणि विविधतेतील एकात्मतेचा सुंदर संदेश दिला आहे. बंगाली नववर्ष साजरा करणारा हा उत्सव केवळ तारखांचा बदल नाही, तर संस्कृती, ऐक्य आणि आनंदाचा अप्रतिम संगम असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. Pohela Boishakh event

    घरकुल अनुदानात आता 50 हजार रुपयांची वाढ

    चांदा पावर ऑफ युथ फाउंडेशन, चंद्रपूरच्या वतीने बंगाली कॅम्प येथे बंगाली नववर्ष ‘पोइला बैसाख’ सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार किशोर जोरगेवार बोलत होते. या प्रसंगी मंचावर मनोज पाल, भारतीय जनता पक्षाचे माजी शहराध्यक्ष दशरथसिंग ठाकूर, भाजप नेते प्रकाश देवतळे, माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार, बलराम डोडाणी, श्री माता महाकाली महोत्सव समितीचे सचिव अजय जयसवाल आदी मान्यवर उपस्थित होते. Bengali festival 2025

    यावेळी बोलताना आ. जोरगेवार पुढे म्हणाले की, चंद्रपूरात वास्तव्यास असलेला बंगाली समाज प्रामाणिक आणि कष्टकरी आहे. चंद्रपूरच्या विकासात या समाजाचे नेहमीच भरीव योगदान राहिले आहे. या समाजातून अनेक सामाजिक कार्यकर्ते पुढे आले आहेत. हा समाज नेहमी आमच्या पाठीशी उभा राहिला असून, या समाजातील प्रश्न सोडविण्यास आपण कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले. बंगाली कॅम्प, कृष्णा नगर या भागात आपण विकासकामे करत आहोत. पुढेही या भागाच्या विकासासाठी मोठा निधी देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. Bengali community

    संस्कृती ही आपली ओळख, आपला जन्मसिद्ध वारसा आहे. आज इथे नृत्य, गायन आणि फॅन्सी ड्रेस स्पर्धांमुळे आपण आपल्या सांस्कृतिक परंपरेला नवीन रूप दिले आहे. प्रत्येक कलाकाराने आपल्या कलादानातून भारतवासीयांच्या विविधतेचा अद्भुत मेळ घातला. सर्व समाजबंधूंनी एकत्र येऊन सण-उत्सव साजरे करणे हेच खरे बंधुत्वाचे प्रतीक आहे. चांदा पावर ऑफ युथ फाउंडेशनची ही जबाबदारी आणि दूरदृष्टी कौतुकास्पद आहे.

    स्थानिक कलाकारांनी दिलेली उत्स्फूर्त कला सादरीकरणे तरुणाईला नव्या आत्मविश्वासाची प्रेरणा देतात. या सांस्कृतिक कार्यक्रमांमधून तुमच्यातील प्रतिभेचा उजेड अधिक तेजस्वी बनवायला शिका. तुमचे कलारूपी बीज आज येथे रुजत आहे. आजचा हा दिवस केवळ साजरा करण्यासाठी नसून, आपल्याला एकत्र येऊन सामाजिक सौहार्द दृढ करण्याची आणि सांस्कृतिक वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याची प्रेरणा देणारा आहे, असेही यावेळी आमदार किशोर  जोरगेवार म्हणाले. या कार्यक्रमाला समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे वितरित करण्यात आली.

  • Gharkul Yojana subsidy update । घरकुल अनुदानात ५०,००० रुपयांची वाढ – सामान्य जनतेसाठी दिलासा!

    Gharkul Yojana subsidy update

    Gharkul Yojana subsidy update : सर्वांसाठी घरे या केंद्र सरकारच्या योजनेतून घरकुलाच्या लाभार्थ्यांना केंद्र व राज्य सरकार च्या माध्यमातून मिळणारे अनुदान अत्यल्प असल्याचे खासदार धानोरकर यांनी आमदार असतांना तसेच, लोकसभेत देखील मत व्यक्त केले होते.

    तर कामगारांना उष्माघाताचा धोका? हे उपाय एकदा वाचा

    घरकुलाच्या अनुदानात वाढ करण्याची मागणी त्यांनी विधानसभा तथा लोकसभेत केली होती. घरकुल अनुदानाच्या निधी वाढी संदर्भात त्यांच्या मागणीला यश प्राप्त झाले असून महाराष्ट्र राज्याच्या ग्राम विकास मंत्रालयाने या संदर्भात दि. 04 एप्रिल रोजी शासन निर्णय प्रसिध्द करुन समोरील टप्प्यातील घरकुलांना 50 हजार रुपये वाढीव निधी मंजुर केला आहे. Maharashtra PMAY-G subsidy increase

    या पैकी 35 हजार रुपये बांधकामाकरीता तर, 15 हजार रुपये हे सौर उर्जा यंत्र उभारणी करीता प्राप्त होणार आहे. खासदार धानोरकर यांनी या संदर्भात केंद्र व राज्य सरकारचे आभार मानले असून परंतु, सध्याची महागाई बघता 5 लक्ष रुपये एवढे अनुदान द्यावे असे देखिल मत व्यक्त केले.

    भविष्यात यासंदर्भात आपली मागणी रेटून धरण्याचे देखील सांगितले. खासदार धानोरकर यांच्या मागणीच्या यशामुळे सामान्य नागरीकांना थोड्याफार प्रमाणात का होइना, याचा फायदा होणार आहे. भविष्या या संदर्भात आपण घरकुल निधी वाढीची मागणी केंद्र सरकार कडे रेटून धरणार असल्याचे सांगितले.

  • Heat stroke prevention tips for workers । कामाच्या ठिकाणी उष्माघात? – ‘Heat Stroke Safety’ ची खबरदारी वाचाच!

    Heat stroke prevention tips for workers

    उष्णतेच्या लाटेत कामगारांसाठी “Heat Stroke Prevention Tips” अत्यंत गरजेच्या!

    चंद्रपूरसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाने उच्चांक गाठला असून, उन्हाच्या झळा अधिक तीव्र जाणवत आहेत. अशा परिस्थितीत मजूर, बांधकाम क्षेत्रात काम करणारे श्रमिक, तसेच बाहेरील वातावरणात काम करणाऱ्या व्यक्तींना “heat stroke” होण्याचा धोका अधिक आहे. त्यामुळे शासनाच्या सूचनेनुसार “heat stroke prevention” साठी काही महत्वाच्या टीप्स (tips for workers) पाळणं आवश्यक आहे. या लेखात आपण जाणून घेणार आहोत की उष्णतेच्या झळांपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे.

    Heat stroke prevention tips for workers : शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार उष्माघातामुळे होणाऱ्या मृत्युचे प्रमाण कमी करण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यात उष्माघात कृती आराखडा राबविण्यात येत आहे. वातावरणातील उष्णतेमुळे मानवी शरीरावर दुष्परिणाम होतो. त्यात काही लोकांचा बळी जातो. Summer safety tips for laborers

    उन्हाळ्यात वाढत्या तापमानाची झळ ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात जास्त जाणवते व याच कालावधीत इमारत बांधकाम व त्याच्याशी निगडीत कामे केली जातात. उष्णतेच्या दुष्परिणामापासून वाचण्याकरीता कामगार व मालक वर्गाने आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे आवाहन कामगार विभागाने केले आहे. Construction worker heat safety guidelines

    चंद्रपूर मनपाची हि सेवा महागली

    काय करावे : बांधकामाच्या ठिकाणी पिण्याच्या थंड पाण्याची व्यवस्था करावी. कामगाराने दुपारी 12 ते 4.30 वाजेपर्यंत भरउन्हात काम करू नये /करण्यास सांगु नये, त्या दृष्टीने कामगारांच्या कामाच्या वेळेचे नियोजन करावे. पहाटेच्या वेळेस जास्तीत जास्त कामाचा निपटारा करण्यात यावा.  तहान लागलेली नसतांना जास्तीत जास्त पाणी प्यावे. तसेच अन्य वेळी गोडताक, पन्हे, कोकम सरबत प्यावे. जेवणामध्ये ताजे अन्न, तांदळाची भाकरी, भाताची पेज, पालेभाज्या खाव्यात. उन्हामध्ये डोक्यावर टोपी, गॉगल व ओल्या कपड्यानी डोके मान व चेहरा झाकला जाईल याची खबरदारी घ्यावी. 

    प्रथमोपचार पेटीमध्ये ओआरएस पाऊच, जुलाब प्रतिरोधक औषधे मुबलक प्रमाणात राहिल, याची खबरदारी घ्यावी. गरोदर कामगार व आजारी कामगारांकडून कामे करून घेऊ नये. दुपारी 12 ते 4.30 या कालावधीत बांधकामाच्या आतील भागातील कामे करण्यात यावी.

    काय करू नये : कामगारांना दुपारी 12 ते 4.30 या कालावधीत शारिरीक श्रमाची कामे करण्यास सांगु नये.

    चहा, कॉफी, मद्य व कार्बोनेटेड थंड पेय घेऊ नये. शिळे अन्न व जंक फुड, तेलकट व तिखट पदार्थ तसेच आम्लवर्धक पदार्थ घेऊ नये.

  • ambulance price hike protest । चंद्रपूर मनपाची सेवा महागली – गरीबांच्या जखमेवर मीठ, आंदोलन पेटलं!

    ambulance price hike protest

    ambulance price hike protest : चंद्रपूर : १ एप्रिल २०२५ पासून चंद्रपूर महानगरपालिकेने ॲम्बुलन्स,शव वाहिका, पाण्याचे टँकर इत्यादी मूलभूत सेवांच्या दरात मोठी वाढ केली. या दरवाढीने संतप्त झालेल्या जनविकास सेनेने संस्थापक अध्यक्ष पप्पू देशमुख यांचे नेतृत्वात पुन्हा एकदा आयुक्तांच्या गाडीवर नोटांची उधळण करण्याचा प्रयत्न केला. मात्र आयुक्त व त्यांची गाडी नसल्याने यावेळी उपायुक्त मंगेश खवले यांच्या गाडीवर नोटा उधळण्यात आल्या.

    क्रिकेटवर ऑनलाईन सट्टा, पोलिसांनी केली एकाला अटक


    मनपा प्रशासन व आयुक्त विपिन पालीवाल यांना केवळ पैशाची भूक आहे हे दर्शविण्यासाठी जनविकास सेनेने पुन्हा एकदा ‘घे पैसा’ आंदोलन केले.आज १६ एप्रिल रोजी दुपारी १२ च्या दरम्यान गांधी चौकातील मनपा इमारतीसमोर ‘घे पैसा’ आंदोलन करण्यात आले. चंद्रपूर महानगरपालिका आता व्यापारी प्रतिष्ठान झाले असुन आयुक्त व्यापारी झाल्याची प्रतिक्रिया यावेळी देशमुख यांनी दिली. protest against ambulance charges


    २०० ऐवजी आता १ हजार रुपये भाडे…
    पेट्रोल-डिझेलचा खर्चही खाजगीपेक्षा जास्त

    शहराच्या हद्दीमध्ये यापूर्वी मनपाच्या ॲम्बुलन्सची सेवा निशुल्क होती. आता यासाठी ५०० रुपये भाडे आकारण्यात आले. मनपा हद्दीच्या बाहेर ॲम्बुलन्स व शव वाहिकेसाठी साठी २०० रुपये भाडे आकारण्यात येत होते. १ एप्रिल पासुन मनपा यासाठी २०० ऐवजी १००० रुपये म्हणजेच पाचपट भाडे आकारण्यात येणार आहे. खाजगी ॲम्बुलन्स व शव वाहिका चालक १५ किलोमीटर मागे एक लिटर पेट्रोल- डिझेलचा खर्च घेतात. मनपा ॲम्बुलन्ससाठी १० किलोमीटर मागे एक लिटर पेट्रोल व शव वाहिकेसाठी ८ किलोमीटर मागे एक लिटर डिझेल घेत असल्याने इंधनाचा खर्चही जास्त लागणार आहे.याचा मोठा फटका शहरातील तसेच आसपासच्या ग्रामीण भागातील गोरगरीब व गरजू लोकांना बसणार आहे. ambulance service hike

    protest against ambulance charges


    १०० गुन्हे दाखल झाले तरी घाबरत नाही..पप्पू देशमुख

    आयुक्त विपिन पालीवाल यांनी जनविकास सेनेच्या कार्यकर्त्यांविरुद्ध आजपर्यंत अनेक खोट्या तक्रारी दाखल केल्या.कार्यकर्त्यांविरुद्ध पोलिसात गुन्हे दाखल झाले. आमची लढाई ही चंद्रपूर शहरातील ४ लक्ष नागरिकांच्या हिताची लढाई आहे. पैशाच्या हव्यासापोटी मनपाच्या तिजोरीची लूट करणाऱ्या कोणत्याही घोटाळेबाज अधिकाऱ्यांना आम्ही सोडणार नाही.आयुक्तांनी १०० तक्रारी केल्या व १०० गुन्हे दाखल झाले तरी आम्ही घाबरत नाही. यासाठीच पुन्हा एकदा नोटांची उधळण केली. आयुक्तांनी १०० तक्रारी कराव्या. आम्ही एकच तक्रार करणार आणि आयुक्त पालीवाल सर्व घोटाळेबाजांसह जेलमध्ये जाणार हे त्यांनी लक्षात ठेवावे. ambulance charges hike India

    ambulance service hike


    दर आठवड्याला एक घोटाळा उघडकीस आणणार

    चंद्रपूर शहराची दुर्दशा करणाऱ्या महानगरपालिकेतील भ्रष्ट अधिकाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी जनविकास सेना दर आठवड्याला एक घोटाळा उघडकीस आणणार आहे. सोबतच एक लक्ष स्वाक्षऱ्यांचे उद्दिष्ट पूर्ण करून पुराव्यासह सर्व घोटाळ्यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्यात येईल. या तक्रारीच्या अनुषंगाने एसआयटी मार्फत चौकशी व कारवाई न झाल्यास न्यायालयात दाद मागणार असा इशारा देशमुख यांनी दिला आहे.

  • international academic collaboration । चंद्रपूर वन अकादमी आणि यु.के.च्या विद्यापीठात आंतरराष्ट्रीय शैक्षणिक सहकार्याचा नवा अध्याय!

    international academic collaboration

    शिक्षण (Education), संशोधन (Research) आणि प्रशिक्षण (Training) या क्षेत्रांमध्ये आंतरराष्ट्रीय सहकार्य (International Collaboration) वाढविण्याच्या दृष्टीने चंद्रपूर वन प्रशासन, विकास आणि व्यवस्थापन अकादमी (Chandrapur Forest Academy) आणि युनिव्हर्सिटी ऑफ वेस्ट इंग्लंड, ब्रिस्टल (University of the West of England – UWE, Bristol) यांच्यात एक महत्त्वपूर्ण सामंजस्य करार (Memorandum of Understanding – MoU) करण्यात आला आहे. या कराराचा उद्देश शैक्षणिक देवाणघेवाण (Academic Exchange), संयुक्त कार्यक्रम (Joint Programs), आणि शाश्वत वन संसाधन व्यवस्थापन (Sustainable Forest Resource Management) यासारख्या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवणे हा आहे. या उपक्रमामुळे प्रशिक्षणार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे ज्ञान (Global Knowledge Exposure), तांत्रिक कौशल्ये (Technical Skills) आणि विविध अभ्यासविषयांमध्ये संशोधनाच्या संधी (Research Opportunities) उपलब्ध होणार आहेत. ही भागीदारी म्हणजे चंद्रपूर वन अकादमीसाठी एक मैलाचा दगड (Milestone Collaboration) ठरणार आहे.

    international academic collaboration : शिक्षण, संशोधन आणि प्रशिक्षण या क्षेत्रांमध्ये परस्पर सहकार्य वाढवून शैक्षणिक देवाण-घेवाण आणि आंतरराष्ट्रीय समज दृढ करण्यासाठी चंद्रपूर वन प्रशासन, विकास आणि व्यवस्थापन अकादमी, (वन अकादमी) आणि युनिव्हर्सिटी ऑफ वेस्ट इंग्लंड (UWE) ब्रिस्टल यांच्यात एक सामंजस्य करार करण्यात आला आहे. forest research institute india

    ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न जीवावर बेतला, दोघांचा मृत्यू

    या अनुषंगाने युनिव्हर्सिटी ऑफ वेस्ट इंग्लंड, ब्रिस्टल येथील इकोसिस्टम सर्व्हिसेसचे सहयोगी प्राध्यापक डॉ. मार्क एव्हरार्ड यांनी 13 ते 15 एप्रिल दरम्यान चंद्रपूर वन अकादमीला भेट दिली. त्यांच्या या भेटीवेळी “Wildlife & Wetland Protection Foundation” चे शिवाजी चव्हाण सोबत होते. या भेटीचे समन्वयक म्हणून अकादमीतील प्राध्यापक एस. के. गवळी यांनी जबाबदारी पार पाडली. भेटीदरम्यान डॉ. मार्क एव्हरार्ड यांनी वन अकादमीचे संचालक एम. श्रीनिवास रेड्डी आणि अकादमीच्या प्राध्यापकांशी सविस्तर चर्चा केली. खालील क्षेत्रांमध्ये परस्पर सहकार्याचे मुद्दे निश्चित करण्यात आले. online faculty exchange programs

    1. ऑनलाईन व्याख्यानांचे आदानप्रदान : युनिव्हर्सिटी ऑफ वेस्ट इंग्लंड, ब्रिस्टल येथील प्राध्यापकांकडून चंद्रपूर वन अकादमीतील प्रशिक्षणार्थ्यांना ऑनलाईन व्याख्याने दिली जातील. तसेच चंद्रपूर वन अकादमीचे प्राध्यापक ब्रिस्टल विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन व्याख्याने घेतील.

    2. संयुक्त अल्पकालीन अभ्यासक्रम : दोन्ही संस्थांच्या सहभागाने संयुक्तपणे अल्पकालीन प्रशिक्षण कार्यक्रम चंद्रपूर वन अकादमीमध्ये आयोजित करण्यात येतील.

    3. आंतरराष्ट्रीय परिषदा आणि कार्यशाळा : चंद्रपूर वन अकादमीमध्ये युनिव्हर्सिटी ऑफ वेस्ट इंग्लंड, ब्रिस्टलच्या सहकार्याने आंतरराष्ट्रीय परिषदा, कार्यशाळा व परिसंवाद आयोजित केले जातील.

    4. संशोधन सहकार्य : महाराष्ट्र राज्य वन विभागाच्या संदर्भात महत्त्वाच्या संशोधन क्षेत्रांची ओळख पटवून, त्यामध्ये ब्रिस्टलच्या संशोधकांचे तांत्रिक व शैक्षणिक सहकार्य घेण्यात येईल.

    5. अभ्यासक्रम मान्यता : चंद्रपूर वन अकादमीमध्ये घेतल्या जाणाऱ्या निवडक अभ्यासक्रमांना ब्रिस्टलकडून मान्यता मिळविण्याची शक्यता तपासण्यात येईल.

    डॉ. मार्क एव्हरार्ड यांनी चंद्रपूर वन अकादमीतील प्रशिक्षण अभ्यासक्रमांची गुणवत्ता, अद्ययावत प्रशिक्षण सुविधा आणि वातावरण यांची प्रशंसा केली आणि दोन्ही संस्थांमधील भविष्यातील सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केले. या करारामुळे चंद्रपूर वन अकादमीतील शैक्षणिक आणि संशोधनात्मक कार्यक्षमता वाढीस लागेल आणि प्रशिक्षणार्थ्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवरील ज्ञान व अनुभव प्राप्त होण्यास मदत होईल, असे वन अकादमीचे संचालक एम. श्रीनिवास रेड्डी यांनी कळविले आहे.

  • Ambedkar Jayanti 2025 । डॉ. आंबेडकरांचे विचार म्हणजे आजच्या तरुणाईसाठी दिशादर्शक – आमदार जोरगेवार

    Ambedkar Jayanti 2025

    भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या Jayanti 2025 च्या निमित्ताने Chandrapur येथील आमदार किशोर जोरगेवार (Kishor Jorgewar) यांनी महामानवांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले. या विशेष दिवशी आमदार जोरगेवार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या Ambedkar thoughts for youth, Social Justice, आणि Indian Constitution वर भाष्य करत त्यांचे योगदान नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे महत्व अधोरेखित केले.

    Ambedkar Jayanti Celebration in Chandrapur या कार्यक्रमात भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी त्यांनी दिक्षाभूमी विकासासाठी मंजूर ५७ कोटी रुपयांच्या निधीचा उल्लेख करत, Vipassana Center in Bapupeth आणि शहरातील १७ बुद्ध विहारांमध्ये Study Rooms for Buddhist Students उभारण्याच्या उपक्रमांची माहिती दिली.

    डॉ. आंबेडकर यांचे विचार Social Equality, Dalit Upliftment, आणि Democracy in India या मूल्यांवर आधारित आहेत आणि आजही ते Inspirational Leader of India म्हणून स्मरणात आहेत.

    Ambedkar Jayanti 2025 : चंद्रपूर – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूर येथील त्यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून विनम्र अभिवादन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक न्याय, समानता आणि बंधुतेच्या मूल्यांवर आधारित समाजव्यवस्थेची उभारणी केली. त्यांनी दिलेले भारतीय संविधान हे आपल्या लोकशाहीचा मजबूत आधार असून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार म्हणजे सामाजिक परिवर्तनाची मशाल असल्याचे आमदार किशोर जोरगेवार म्हणाले.

    कुजलेल्या अवस्थेत चंद्रपुरात आढळला वाघाचा मृतदेह

       यावेळी भारतीय जनता पार्टीचे माजी शहराध्यक्ष दशरथसिंग ठाकुर,  अजय जयस्वाल, माजी नगर सेवक सुभाष कासनगोट्टूवार माजी नगर सेवक रवि गुरनुले, माजी नगर सेविका छबु वैरागडे, पुष्पा उराडे, खुशबु चौधरी, मनोज पाल, जितेश कुळमेथे, राजकुमार आक्कपेल्लीवार, प्रज्ञा बोरगमवार, रंजत ठाकूर, आटो असोसिएशनचे अध्यक्ष मधू राउत, प्रमोद शास्त्रकार, वंदना हातगावकर, सविता दंढारे, विश्वजीत शहा, तपोष डे, हरमन जोसेफ, दिगांबर चिमुरकर, करणसिंग बैस, सुबोध चिकटे, विमल कातकर, आशा देशमूख, निलिमा वनकर, अनिता झाडे, सोनाली आंबेकर, वैशाली मेश्राम, दुर्गा वैरागडे, दिक्षा सातपूते, चंपा बिश्वास, सुजाता कापसे, शालीनी राउत, सपना सातपुते, सविता ब्राम्हणे, भावना बारसागडे, सोनाली ईटनकर, सुषमा तपासे, हेमलता खोब्रागडे, कल्पना दुबे, सुप्रिया सरकार आदिंची उपस्थिती होती.
     यावेळी आ. जोरगेवार म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिक्षा दिलेल्या दिक्षाभुमीचा विकास करण्याचा आपला संकल्प पुर्ण होत असल्याचा आनंद आहे. येथे जवळपास 57 कोटी रुपयांचा निधी आपण उपलब्ध करुन दिला आहे. या कामाचे भुमिपूजन झाले असुन लवकरच या कामाला सुरवात होणार आहे. तर बाबुपेठ येथे आपण भव्य विपश्यना केंद्र तयार करत आहोत. शहरातील 17 बुध्दविहारांमध्ये आपण अभ्यासिका तयार करत असल्याचे ते यावेळी म्हणाले.
      आजच्या विकसित भारताची पायाभरणी ही बाबासाहेबांच्या दूरदृष्टीने घातली गेली असून, त्यांनी समाजातील वंचित, शोषित घटकांसाठी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांच्या कार्यातूनच हे घटक आज मुख्य प्रवाहात समाविष्ट झाले आहेत, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार हे आजही प्रेरणा देतात आणि सशक्त भारताच्या दिशेने मार्गदर्शन करतात असे ते यावेळी म्हणाले. याप्रसंगी आमदार किशोर जोरगेवार यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करत अभिवादन केले. यावेळी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
    kishor jorgewar chandrapur

           आमदार किशोर जोरगेवार यांच्या कार्यालयात आंबेडकर जयंती साजरी

     जैन भवन जवळील आमदार किशोर जोरगेवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात भारतीय जनता पार्टी चंद्रपूर विधानसभेच्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्सहात साजरी करण्यात आली. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करत अभिवादन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला बहाल केलेल्या संविधानामुळेच फुटपाथवर टोपल्या विकणा-या मातेचा मुलगा आमदार झाला असल्याचे ते यावेळी म्हणाले. आता समाजातील प्रत्येक दुर्लक्षित घटकाला न्याय देण्याचे काम आपण करत असल्याचे ते यावेळी म्हणाले.