Sudhakar Adbale appointment news | सुधाकर अडबाले यांना राज्याच्या महत्त्वाच्या समित्यांमध्ये संधी

Sudhakar Adbale appointment news

Sudhakar Adbale appointment news : चंद्रपूर : नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार सुधाकर अडबाले यांची रोजगार हमी योजना समितीसह अन्‍य दोन समित्‍यांवर सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

महावितरणच्या नाट्यकुंभाचा भव्य शुभारंभ

आमदार सुधाकर अडबाले यांचे विधान परिषदेतील कार्य पाहता त्‍यांची ‘रोजगार हमी योजना समिती, इतर मागासवर्ग कल्‍याण समिती व कागदपत्रे सभागृहाच्या पटलावर ठेवणे’ या तीन समित्‍यांवर सभापती प्रा. राम शिंदे यांनी विधान परिषद सदस्‍यांमधून सदस्यपदी नियुक्ती केली आहे. Maharashtra legislative council committees

आमदार अडबाले यांनी या नियुक्तीबद्दल समाधान व्यक्त केले असून, विद्यार्थी, शिक्षक, शेतकरी, मजूर आणि ग्रामीण जनतेच्या हितासाठी ही संधी उपयोगात आणणार आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

आमदार सुधाकर अडबाले यांच्या नियुक्‍तीबद्दल म. रा. मा. शि. महामंडळाचे सरचिटणीस माजी आमदार व्‍ही. यू. डायगव्‍हाणे, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रांतीय अध्यक्ष अरविंद देशमुख, उपाध्यक्ष रमेश काकडे, जयप्रकाश थोटे, जयकुमार सोनखासकर, विजय ठोकळ, विभागीय कार्यवाह चंद्रशेखर रहांगडाले, बाळासाहेब गोटे, कोषाध्यक्ष भूषण तल्‍हार, जिल्‍हा, महानगर, तालुका पदाधिकारी, सदस्‍यांनी अभिनंदन केले आहे. 

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *