Category: ताज्या बातम्या

महाराष्ट्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व ताज्या बातम्या (Latest News) आणि ब्रेकिंग अपडेट्स वाचण्यासाठी रोज भेट द्या news34.in वर. राजकारण, समाजकारण, क्रीडा, गुन्हेगारी आणि आर्थिक घडामोडींचे त्वरित आणि विश्वसनीय कव्हरेज येथे उपलब्ध आहे. २४ तास सुरू असलेल्या घडामोडींची अचूक माहिती मिळवा, जेणेकरून कोणतीही मोठी बातमी तुमच्यापासून सुटणार नाही.

  • Chandrapur political situation । आता रंगत येणार! चंद्रपुरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका; राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरू!

    Chandrapur political situation

    Chandrapur political situation : येत्या ४ महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थेबाबत निवडणूक कार्यक्रम जाहीर करा असा आदेश आज सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. आजची राजकीय परिस्थिती वेगळी असल्याने एकाच पक्षाचे झालेले २ भाग या निवडणुकीत रंगत आणणार आहे. मागील ३ वर्षांपासून चंद्रपूर जिल्ह्यातील महानगरपालिका व जिल्हा परिषद व नगरपालिका मध्ये प्रशासक बसल्याने निवडणूका आरक्षण मुळे लांबणीवर गेली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. Political parties Chandrapur municipal corporation election

    चंद्रपूर ॲक्शन मोडमध्ये! शालेय वाहतुकीतील धोके टाळण्यासाठी कडक उपाययोजना!

    चंद्रपूर जिल्ह्यात १ महानगरपालिका, जिल्हा परिषद, ८ नगरपालिका व १५ पंचायत समित्या आहे.

    चंद्रपूर महानगरपालिकेत पक्षीय बलाबल मध्ये भाजपची आघाडी होती, १७ प्रभागात ६६ नगरसेवकांची सदस्य संख्या असलेल्या महानगरपालिकेत भाजप ३६, कांग्रेस १२, राष्ट्रवादी कांग्रेस २, शिवसेना २ , बसपा ८, मनसे २ व अपक्ष ४ अशी सदस्यसंख्या होती. राज्यातील राजकीय उलथापूलथीमध्ये नगरसेवक विविध पक्षात दाखल झाले आहे. Chandrapur district council election political analysis

    चंद्रपूर जिल्हा परिषद एकूण जागा ५६, पक्षीय बलाबल भाजप ३३, कांग्रेस २० इतर ३.

    चंद्रपूर जिल्ह्यात एकूण नगरपालिका ८ आहे ज्यामध्ये बल्लारपूर, राजुरा, वरोरा, भद्रावती, चिमूर,मूल,ब्रह्मपुरी व नव्याने घुग्गुस नगरपालिकेचा समावेश झाला आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ५ भाजप तर १ जागेवर कांग्रेसचे विजय झाला असून भाजपसाठी सध्याची परिस्थिती अनुकूल आहे. चंद्रपूर महानगरात नागरिक पाणी समस्येने त्रस्त असून यावर अजूनही तोडगा निघालेला नाही त्यामुळे चंद्रपुरात निवडणूक अटीतटीची होणार अशी चिन्हे आहे.

    राजकीय स्थिती

    चंद्रपूर शहरात भाजपची सध्याची परिस्थिती बिकट अवस्थेत आहे, भाजपच्या २ आमदारांमध्ये विधानसभा क्षेत्रावरून कोल्ड वार सुरु आहे, मात्र आमदार किशोर जोरगेवार भाजपची नैया पार लावणार अशी चित्रे आहे. चंद्रपुरात अमृत व भूमिगत गटार योजनेच्या खोदकामावरून नागरिक प्रचंड नाराज आहे. रस्ते बनल्यावर वारंवार ते खोदल्या जात असून वाहतुकीची समस्या बिकट परिस्थितीमध्ये जात आहे त्यामुळे धुळीचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

    शिवसेना व राष्ट्रवादी कांग्रेस चे विभाजन झाल्यावर पाहल्यांदा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत दोन्ही शिवसेना व राष्ट्रवादी आमने सामने येणार, विशेष बाब म्हणजे या दोन्ही पक्षाची परिस्थिती जिल्ह्यात पूर्णतः मजबूत नाही..परिस्थिती जैसे थे आहे.

  • OBC overseas scholarship । परदेशात शिक्षणाचं स्वप्न? ओबीसी विद्यार्थ्यांसाठी सरकार देणार शिष्यवृत्ती!

    OBC overseas scholarship

    OBC overseas scholarship : चंद्रपूर : इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत राज्यातील विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांनी पदव्युत्तर पदवी, पदव्युत्तर पदविका व पीएचडी अभ्यासक्रमासाठी क्यूएस रँकिंग (जगभरातील 200 च्या आत विद्यापीठांची क्रमवारी) अंतर्गत परदेशातील शैक्षणिक संस्थांमध्ये सन 2025-26 मध्ये प्रवेश घेतलेल्या 75 विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.

    शी बॉक्स पोर्टल मध्ये नोंदणी केली का?

    या शिष्यवृत्तीसाठी शाखानिहाय, अभ्यासक्रमनिहाय जागा उपलब्ध आहेत. त्यासाठी पात्र विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

    इच्छुक विद्यार्थ्यांनी www.obcbahujankalyan.maharashtra.gov.in किंवा https://.obcbahujankalyan.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरून अर्ज डाऊनलोड करावा तसेच परिपूर्ण व आवश्यक कागदपत्रासह 17 मे 2025 रोजी सायंकाळी 6.15 वाजेपर्यंत सक्षम किंवा पोस्टाने सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, चंद्रपूर येथे दोन प्रतित सादर करावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहायक संचालक आशा कवाडे यांनी केले आहे.

  • SHE BOX portal for sexual harassment complaints । कंपन्यांनो सावधान! महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी नियम; SHE BOX वर नोंदणी बंधनकारक!

    SHE BOX portal for sexual harassment complaints

    SHE BOX portal for sexual harassment complaints : चंद्रपूर : जिल्ह्यातील प्रत्येक खाजगी आस्थापना जिथे 10 किंवा त्यापेक्षा अधिक कर्मचारी (महिला व पुरूष मिळून) कार्यरत आहे, अशा ठिकाणी, महिलांचे लैंगिक छळापासून सरंक्षण (प्रतिबंध, मनाई आणि निवारण) अधिनियम, 2013 अंतर्गत तक्रार समिती स्थापन करून याबाबतची माहिती SHE BOX PORTAL वर नोंदविणे बंधनकारक आहे. sexual harassment complaints at workplace

    १२ वी नंतर काय? चंद्रपूर मनपाने आणिली शिका व कमवा योजना, जाणून घ्या

    आजच नोंदणी करा

    प्रत्येक खाजगी आस्थापना, कंपनी, एम.आय.डी.सी. मॉल, शैक्षणिक संस्था, दुकाने, बँक, अशासकीय संस्था, ट्रस्ट, सोसायटी, उत्पादक, पुरवठा, वितरण व विक्री, करमणुक, क्रीडा संकुले, प्रेक्षागृहे, आरोग्य सेवा देणारे आदींनी त्यांच्या आस्थापनेवर तक्रार समितीची स्थापना करावी तसेच व त्याबाबतची माहिती पोर्टलवर नमुद करावी. सदर माहिती नोंदविण्याकरीता https://shebox.wcd.gov.in या संकेतस्थळावर जाऊन होम स्क्रीनवर दाखविल्याप्रमाणे Private Head Office Registration या Tab वर click करावे. आवश्यक सर्व माहितीचा तपशील भरून Submit या Tab वर click करून अंतर्गत तक्रार समितीची माहिती नोंदविता येईल.

    अन्यथा ५० हजारांचा दंड

    अधिनियमातील कलम 26 मध्ये जर एखाद्या मालकाने अ) अंतगर्त तक्रास समिती स्थापन केली नाही ब) अधिनियमातील कलम 13, 14 व 22 नुसार कार्यवाही केली नाही क) या अधिनियमातील व नियमातील विविध तरतुदीचे व जबाबदाऱ्याचे पालन न केल्यास मालकास 50 हजार रुपयेपर्यंत दंड होऊ शकतो. तसेच हा प्रकार पुन्हा घडल्यास आस्थापनेचा परवाना रद्द, दुप्पट दंड अशी तरतुद आहे.

    करीता सर्व, खाजगी आस्थापनांनी अंतर्गत तक्रार समिती स्थापना करून त्याबाबतीची माहिती SHE BOX PORTAL वर भरण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी केले आहे. याबाबत काही तांत्रिक अडचण असल्यास दूरध्वनी क्रमांक. 011-23388074  किंवा ई मेल – techsupport-shebox@gov.in येथे संपर्क करावा, असे महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

  • local body election OBC quota । स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा! ओबीसी आरक्षणावरील सस्पेन्स संपला!

    local body election OBC quota

    local body election OBC quota : स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुकीबाबत चार आठवड्या नोटिफिकेशन काढा आणि चार महिन्यांच्या आत निवडणूक घ्या आज सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाचे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सचिन राजुरकर यांनी स्वागत केले आहे.

    चंद्रपूर मनपात शिका व कमवा योजना, १२ वी नंतर काय? वाचा हि महत्वाची बातमी

    पूर्वीची स्थिती कायम राहणार

    सुप्रीम कोर्टाने आज दिलेल्या निकालात 1994 ते 2022 पर्यंत जी ओबीसी आरक्षणाची स्थिती होती, त्यानुसारच स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणू घ्या राज्य सरकारला आणि राज्य निवडणूक आयोगने दिलेल्या कार्यकाळात कार्यवाही करावी ओबीसींच्या जागा कमी होत्या हा याचिकाकर्त्यांचा दावा होता, त्यावर कोर्टाने 2022 पूर्वीची स्थिती कायम राहील असे निर्देश दिले. Supreme Court verdict on OBC reservation in local self-government

    आयोगाचा तो रिपोर्ट आहे त्याच्यात याचिकाकर्त्यांचं म्हणणं होतं की, 2022 मध्ये जो रिपोर्ट आलाय त्याच्यात ओबीसी सीट हे कमी केले आहेत, त्यामुळे आधीच्या परिस्थितीनुसार 2022 ची आधीची परिस्थिती होती 1994 ते 2022, त्या परिस्थितीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या जातील. असे आदेश दिल्याने ओबीसी समाजाला न्याय देणारा आहे.

    या पूर्वी 4 मार्च 2021 विकास गवळी व्हर्सेस सुप्रिम कोर्टाच्या निकालात अनुसूचित जाती जमाती लोकसंख्येच्या प्रमाणात उरलेल्या जागा 50 %मर्यादेत ओबीसींना होत्या त्या मुळे बाटिया कमिशन च्या इम्पेरिकल डाटा सुप्रिम कोर्टात सादर केल्या नंतर स्थानिक स्वराज संस्थेतील 34000 जागा ओबीसींच्या कमी झाल्या होत्या आजच्या निकालाने 3 वर्षा पासून रकडलेल्या स्थानिक स्वराज संस्थेतील निवडणुका पूर्वी प्रमाणेच घ्याव्या लागणार आहेत.

  • WCL Job Clearance Chandrapur । प्रकल्पग्रस्तांना मोठा दिलासा! ८४ नोकरी प्रस्तावांतील अडथळे दूर

    WCL Job Clearance Chandrapur

    हंसराज अहिर यांच्या प्रयत्नांना यश; चंद्रपूरच्या ९ प्रकल्पग्रस्तांची अपील जिल्हाधिकाऱ्यांकडून मान्य

    WCL Job Clearance Chandrapur :  चंद्रपूर – दि.११ एप्रिल २०२५ रोजी जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांचेकडून बल्लारपूर क्षेत्र यु, जी टू ओ.सी.धोपटाळा प्रकल्पातील तुकडेबंदी कायदा १९४८, अवहेलना फेरफार प्रकरणात,9 प्रकल्पग्रस्तांची अपील मान्य करण्यात आली असून यानुसार या प्रकल्पातील स्थगित असलेल्या ८४ नोकरी प्रस्तावातील मंजुरीची अडचण दूर झाल्याचे, रवीभवन नागपूर येथिल बैठकीत  सी.एम.डी,नागपूर यांनी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर,यांना सांगितले. Tukdebandi WCL Jobs Impact

    चंद्रपूर महानगरपालिकेत शिका व कमवा योजना


             यु जी टू ओसी धोपटाळा प्रकल्पातील नोकरी प्रस्ताव मंजुरी प्रक्रिया सुरु असताना, 9 सातबारा धारकांच्या विरोधात बल्लारपूर वेकोली प्रबंधनाने उच्च न्यायालय, नागपूर, येथे तुकडेबंदी अवहेलना प्रकरणात फेरफार रद्द करण्याबाबत दि. २० जुलै २०२२ रोजी याचिका दाखल केली होती.याबाबत ओबीसी व अन्य प्रकल्पग्रस्तांनी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाकडे तक्रार दाखल केली होती.याची दखल घेत हंसराज अहिर, यांनी तात्काळ बैठक व सुनावणी घेवून प्रबंधानाला शेतकऱ्यांच्या  हक्काच्या  नोकऱ्यांना  विरोध न करण्याच्या सूचना दिल्या. 84 WCL Jobs Approved


            सदर प्रकरणे महसूल अधिकारी यांच्या आदेशाने निकाली काढण्यात यावीत असा आदेश उच्च न्यायालयात पारित झाल्यानंतर, उपविभागीय अधिकारी, राजुरा यांचेकडे प्रबंधानाकडून अपील दाखल करण्यात आली.
          हे प्रकरण उपविभागीय अधिकारी यांचेकडे विचाराधीन असताना,या विषयावरील वेकोली अंतर्गत सर्वच नोकरी प्रस्तावांची मंजुरी थांबून ठेवण्याच्या सूचना, वेकोली मुख्यालयाकडून    क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आल्या.जिल्हधिकरि चंद्रपूर यांचकडे या विषयाबाबत मागासवर्ग आयोगाचे माध्यमातून दि. ११/०७/२०२४ व दि. २०/०२/२०२४ रोजी जनसुनावणी घेण्यात आली.या प्रकरणात जिल्हाधिकारी, चंद्रपुर देतील तो निर्णय मान्य करण्याचे वेकोली प्रबंधानाने सुनावणी दरम्यान आश्वस्त केले होते. Collector Clears WCL Jobs


          या प्रकरणात उपविभागीय अधिकारी राजुरा यांनी ८४ प्रकल्पग्रस्तांचे झालेले फेरफार नीयमितीकरण योग्य आहे असा आदेश प्रकल्प ग्रस्तांच्या बाजूने दि. २४/०९/२०२४ रोजी पारित केला.त्यानुसार बल्लारपूर क्षेत्राकडून नोकरी प्रस्ताव मुख्यालयाला मंजुरी हेतू पाठविण्यात आले परंतु वेकोली मुख्यालयाने, अन्यायकारक भूमिका घेत, याच प्रकल्पातील 9 सातबारा धारकांच्या बाबतीत जिल्हाधिकारी चंद्रपुर यांचेकडील दाखल अपीलचा निकाल लागेपर्यंत सदर ८४ व  या विषयावरील अन्य नोकरी प्रस्ताव थांबविण्याच्या सूचना सर्व क्षेत्रीय कार्यालयांना दिल्या.

    Hansraj Ahir WCL Job Issue


          दिनांक ११ एप्रिल २०२५ रोजी जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचेकडून 9 प्रकल्पग्रस्तांच्या, सातबारा नियमितीकरणाबाबत पारीत झालेल्या उपरोक्त आदेशानुसार सर्व ८४ प्रकल्पग्रस्तांचे नोकरी प्रस्ताव मंजुरीकरिता सादर करण्याच्या,वेकोली मुख्यालयाच्या तसेच वेकोलीला बाध्य करणाऱ्या=जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांच्या निर्णयाप्रती आनंद व्यक्त करीत प्रकल्प्ग्रस्तानी हंसराज अहिर यांच्या निवासस्थानी जावून न्याय मिळवून दिल्याबद्दल आभार व कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी प्रकाल्प्ग्रस्तानी अहिर यांचा शाल श्रीफळ व पुष्प्गुच्ह देवून आनंद साजरा केला.
    यासोबतच नवीन तुकडेबंदी सुधारणा कायदा,२०२४ राज्य सरकार कडून पारित झाल्याने या कालावधीतील सर्व प्रकल्पग्रस्तांना सुद्धा न्याय मिळवून देण्याचा निर्धार अहिर यांनी या वेळी व्यक्त केला.

  • copper pipe theft in Chandrapur । कॉपर पाईप चोर टोळी जेरबंद, चंद्रपूर पोलिसांचे यश!

    copper pipe theft in Chandrapur

    copper pipe theft in Chandrapur : चंद्रपूर शहरात चोरीचे वाढते प्रमाण हे डोकेदुखी बनली आहे, यावर नियंत्रण यावे यासाठी पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेला निर्देशित करीत चोरीच्या गुन्ह्यांचा उलगडा करण्यासाठी आदेशित केले.

    गांधी चौकात भाजपचा जल्लोष

    स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय माहिती मिळाली कि रेकॉर्डवरील गुन्हेगाराने मोठ्या प्रमाणात कॉपर पाईप ची चोरी करीत सदर माल घरामागे लपून ठेवला आहे.

    पोलिसांनी आरोपी २७ वर्षीय गोलू उर्फ सुमोहित चंद्रशेखर मेश्राम, १९ वर्षीय राहुल रतन रॉय, २१ वर्षीय सुंदरम संजय तिवारी व २९ वर्षीय कमलेश दादुभाई गुप्ता राहणार आरोपी अष्टभुजा व श्यामनगर यांना ताब्यात घेत चौकशी केली असता चोरीचा माल जप्त करण्यात आला. police solve copper theft case Chandrapur

    सदर कॉपर पाईप हे चंद्रपुरातील निर्माणाधीन मेडिकल कॉलेज येथे सुरु असलेल्या बांधकाम येथील ऑक्सिजन आउटलेट कॉपर पाईप चोरी केल्याचे निष्पन्न झाले सदर गुन्ह्यात चोरी झालेला कॉपर पाईप व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण १ लक्ष ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

    सदरची यश्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले, मधुकर सामलवार, सुनील गौरकार, पोलीस कर्मचारी सुभाष गोहोकार, सतीश अवथरे, रजनीकांत पुठ्ठावार, दीपक डोंगरे, प्रशांत नागोसे, किशोर वाकाटे, शशांक बदामवार यांनी केली.

  • man dies due to electric wire । सायलवरून जाताना चाकात अडकला मृत्यू, चंद्रपुरात भयावह दुर्घटना

    man dies due to electric wire

    man dies due to electric wire : चंद्रपूर: आकाशवाणी पासून जगन्नाथ बाबा नगर कडे जाणाऱ्या रस्त्यावर काल रविवार दिनांक 4 मे रोजी सायंकाळी 6.30 वाजताच्या सुमारास विजेच्या जिवंत तारेला स्पर्श झाल्यामुळे रस्त्यावरून सायकलने जाणाऱ्या एका 60 वर्षीय इसमाचा जागीच मृत्यु झाला. प्रभाकर गणपत क्षीरसागर असे मृतकाचे नाव असुन ते दाताळा येथील रहिवासी होते.

    शॉर्ट सर्किट आणि मृत्यू


    सविस्तर असे की जगन्नाथ बाबा नगर येथील ए 65 क्रमांकाच्या खांबावरून उच्च दाबाची 11 केव्ही विजेची तार जाते. काल सायंकाळी 5.30 च्या सुमारास मोठे वादळ आले. परंतु त्याच्या 1 तास आधीच जवळपास सायंकाळी 4.30 वाजताच्या सुमारास शॉर्ट सर्किट सारखा आवाज झाला व ही 11 केव्हीची तार तुटून रस्त्यावर पडली.

    ७ मे रोजी महावितरणचा लकी ड्रॉ

    काही स्थानिक नागरिकांनी विज वितरण कंपनीला याची तातडीने ऑनलाईन तक्रार केली.4 वाजून 59 मिनिटांनी तक्रार केल्याची नोंद आहे. सायंकाळी 6.30 वाजेपर्यंत महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी विज पुरवठा बंद केला नाही. पडलेली तार सुद्धा उचलली नाही. तक्रारकर्त्याच्या मोबाईलवर मात्र सायंकाळी 6 वाजता तक्रारीचा निपटारा झाल्याचा ऑनलाइन मेसेज महावितरणकडून पाठविण्यात आला. electricity department negligence case

    सायकलच्या चाकात विजेचा तार अडकला


    यादरम्यान जनता महाविद्यालयात कंत्राटी तत्वावर सुरक्षा रक्षक असलेले दाताळा येथील रहिवासी प्रभाकर गणपत क्षीरसागर सायकलने सायंकाळच्या ड्युटीवर चालले होते. रस्त्याने जात असताना सायकलच्या चाकात विजेचा तार अडकून ते पडले व तारेला स्पर्श झाला.11 केव्हीच्या तारेला स्पर्श झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
    वडगाव प्रभागाचे माजी नगरसेवक जनविकास सेनेचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. live wire accident due to storm

    नागरिकांचे आंदोलन

    देशमुख यांनी रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आसिफ राजा तसेच रामनगर विज वितरण कार्यालयाचे सहाय्यक अभियंता कुणाल पाटील यांना घटनास्थळी पाचारण केले. यावेळी मृतकांचे कुटुंबीय तसेच दाताळा व जगन्नाथबाबा नगर मधील रहिवाशांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. नुकसान भरपाईचे लेखी आश्वासन दिल्याशिवाय मृतदेह उचलणार नाही अशी भूमिका उपस्थित नागरिक व मृतकाच्या कुटुंबीयांनी घेतली. अखेर सहाय्यक अभियंता पाटील यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर मृतदेह सामान्य रुग्णालयात हलविण्यात आला.

    महावितरणच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा – जनविकास सेनेची मागणी


    नागपूर व दाताळा मार्गाला जोडणाऱ्या या रस्त्याने हजारो नागरिक तसेच शाळकरी विद्यार्थी ये-जा करतात. अशा वर्दळीच्या रस्त्यावर दीड तास 11 केवी विजेची जिवंत तार पडून राहणे अत्यंत धोकादायक आहे. यासाठी वीज वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी सर्वस्वी जबाबदार असून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा तसेच मृतकाच्या कुटुंबीयांना 1 कोटी रुपयांची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी केली आहे.

  • mahadiscom drama competition winners । चंद्रपूरच्या ‘रंग बावरी’ने मारली बाजी; महावितरण नाट्यकुंभात सहा प्रथम पुरस्कार!

    mahadiscom drama competition winners

    mahadiscom drama competition winners : चंद्रपूर, दि. 5 मे 2025: महावितरणच्या नागपूर प्रादेशिक आंतरपरिमंडलीय नाट्यस्पर्धेत चंद्रपूर परिमंडलाच्या ‘रंग बावरी’ या नाटकाने उत्कृष्ट अभिनयासह सर्वोत्कृष्ट नाटकाचा मान पटकावला. दोन दिवस रंगलेल्या या नाट्यकुंभ-2025 मध्ये ‘रंग बावरी’ने विविध गटांमध्ये तब्बल सहा प्रथम पुरस्कारावर आपली मोहोर उमटवली. अकोला परिमंडलाच्या ‘सिकॅरिअस’ या नाटकाने उपविजेतेपद मिळवले. mahadiscom natya spardha 2025 results

    ७ मे रोजी महावितरणचा लकी ड्रा

    या स्पर्धेतील विजेत्या कलाकारांना महावितरणचे संचालक (संचलन) अरविंद भादिकर आणि संचालक (प्रकल्प) प्रसाद रेशमे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक परेश भागवत, मुख्य अभियंता सर्वश्री सुहास रंगारी, दिलीप दोडके, ज्ञानेश कुलकर्णी, राजेश नाईक आणि स्वागताध्यक्ष हरिश गजबे यांच्यासह नाट्य परिक्षक विनोद दुर्गेपुरोहित, जयदेव सोमनाथे, अँड. चैताली बोरकुटे यांसारखे मान्यवर उपस्थित होते. sicarius drama play review

    जय – पराजय हा स्पर्धेचा भाग

    या सोहळ्यात बोलताना संचालक अरविंद भादिकर यांनी नाट्य कलाकारांचे कौतुक केले आणि स्पर्धेनंतरही त्यांनी एकमेकांशी संवाद कायम ठेवण्याचे आवाहन केले. अपयश आले तरी निराश न होता प्रयत्न सुरू ठेवण्याचा संदेश त्यांनी दिला. संचालक प्रसाद रेशमे म्हणाले, “जय-पराजय हा स्पर्धेचा भाग असला तरी, कलाकारांनी आपली कला सादर करताना मिळवलेला आनंद आणि रसिकांना दिलेला आनंद हेच त्यांचे खरे पारितोषिक आहे.” स्पर्धेचे अध्यक्ष तथा प्रादेशिक संचालक परेश भागवत यांनी नाटकांच्या माध्यमातून केवळ आनंदच नव्हे, तर अनेक अनुभव मिळाल्याचे मत व्यक्त केले. chandrapur mahadiscom drama winner

    कर्मचाऱ्यांनी आपली कला जोपासली

    नाट्यकुंभ-2025 चे उद्घाटन महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांच्या शुभहस्ते झाले होते. यावेळी बोलतांना त्यांनी महावितरणमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन कामातील या अनमोल अनुभवांना नाट्यकृतींच्या माध्यमातून समाजासमोर आणावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. महावितरण एक मोठा परिवार आहे आणि या कुटुंबातील सदस्यांमध्ये अनेक उत्कृष्ट कलागुण दडलेले आहेत. दैनंदिन कामाचा व्याप सांभाळूनही कर्मचाऱ्यांनी आपली कला जोपासली आहे, हे कौतुकास्पद आहे. ‘नाट्यकुंभ’ सारख्या स्पर्धांमुळे या कलाकारांना त्यांची प्रतिभा सादर करण्याची संधी मिळते. यासोबतच, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये सुसंवाद वाढतो आणि सांघिक भावना अधिक दृढ होते, असे मत त्यांनी व्यक्त केले. आपल्या भाषणातून राजेंद्र पवार यांनी विदर्भातील नाट्य परंपरेचाही विशेष उल्लेख केला. mahadiscom natya spardha 2025 results

    chandrapur mahadiscom drama winner

    चंद्रपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता हरिश गजबे यांनी निर्मिती केलेल्या, श्रीपाद जोशी लिखित आणि संध्या चिवंडे दिग्दर्शित ‘रंग बावरी’ या नाटकाने रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. तर, अकोला परिमंडलाचे मुख्य अभियंता राजेश नाईक निर्मित, डॉ. चंद्रकांत शिंदे लिखित आणि नितीन नांदुरकर दिग्दर्शित ‘सिकॅरिअस’ या सस्पेन्स थ्रिलर नाटकाने प्रेक्षकांना खिळवून ठेवले. नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके निर्मित, प्रदीप फाटक लिखित आणि हेमराज ढोके दिग्दर्शित ‘ये रे घना’ आणि गोंदिया परिमंडलाचे मुख्य अभियंता सुहास रंगारी निर्मित, अतुल साळवे लिखित व राजेंद्र गिरी दिग्दर्शित ‘दि ॲनॉनिमस’ या नाटकांनाही रसिकांचा चांगला प्रतिसाद लाभला.

    या नाट्यस्पर्धेसाठी अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर आणि गोंदिया परिमंडलातील वरिष्ठ अधिकारी आणि नाट्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    नाट्यस्पर्धेचे विजेते

    स्पर्धेचा अंतिम निकाल:
    • सर्वोत्तम नाटक:
    o प्रथम: ‘रंग बावरी’ (चंद्रपूर परिमंडल)
    o द्वितीय: ‘सिकॅरिअस’ (अकोला परिमंडल)
    • दिग्दर्शन:
    o प्रथम: संध्या चिवंडे (‘रंग बावरी’)
    o द्वितीय: नितीन नांदुरकर (‘सिकॅरिअस’)
    • अभिनय (पुरुष):
    o प्रथम: गणेश राणे (रघुपती – ‘सिकॅरिअस’)
    o द्वितीय: सुमित खोरगडे (सुभाष – ‘ये रे घना’)
    • अभिनय (स्त्री):


    o प्रथम: रोहिणी ठाकरे (नेहा – ‘रंग बावरी’)
    o द्वितीय: स्नेहांजली तुंबडे (स्मिता – ‘ये रे घना’)
    • नेपथ्य:
    o प्रथम: रमेश सानप (‘रंग बावरी’)
    o द्वितीय: गजानन जैवाल (‘दि ॲनॉनिमस’)
    • प्रकाश योजना:
    o प्रथम: प्रकाश खांडेकर (‘रंग बावरी’)
    o द्वितीय: विवेकानंद वाध (‘सिकॅरिअस’)
    • पार्श्वसंगीत:
    o प्रथम: राकेश बोरोवार (‘रंग बावरी’)
    o द्वितीय: योगेश सोनुने (‘सिकॅरिअस’)
    • रंगभूषा-वेशभूषा:
    o प्रथम: पौर्णिमा कदम (‘सिकॅरिअस’)
    o द्वितीय: आनंद जैं (‘दि ॲनॉनिमस’)
    • उत्तेजनार्थ पारितोषिक:
    o सामली सायंकाळ (मेधना – ‘रंग बावरी’)
    o अमित पेढेकर (डॉ. विध्वंस – ‘ये रे घना’)
    o नावेद शेख (जरासंघ – ‘दि ॲनॉनिमस’)
    o संतोष पाटील (इन्स्पेक्टर कश्यप – ‘सिकॅरिअस’)

  • mahadiscom lucky draw 2025 । ७ मे रोजी ‘महावितरण लकी ड्रॉ 2025, स्मार्टफोन आणि स्मार्टवॉच जिंका!

    mahadiscom lucky draw 2025

    mahadiscom lucky draw 2025 : महावितरणच्या लकी डिजिटल ग्राहक योजनेचा दुसरा लकी ड्रॉ ऑनलाईन पध्दतीने दि. ७ मे २०२५ रोजी काढण्यात येणार आहे. यातून प्रत्येक उपविभाग स्तरावर एक प्रमाणे पहिल्या क्रमांकाकरिता 29 विजेत्या ग्राहकांना स्मार्ट फोन बक्षिस म्हणून दिला जाणार आहे. तर प्रत्येक उपविभागात प्रत्येकी दोन प्रमाणे दुसऱ्या क्रमांकासाठी 58 विजेत्या ग्राहकांना स्मार्ट फोन व प्रत्येकी दोन प्रमाणे तिसऱ्या क्रमांकासाठी 58 विजेत्या ग्राहकांना स्मार्ट वॉच बक्षिस म्हणून दिले जाणार आहे. online bill payment reward scheme

    चंद्रपुरात वारंवार येणारा पूर इतिहासजमा होणार

    पहिला लकी ड्रॉ दि. ७ एप्रिल २०२५ रोजी काढण्यात आला असून विजेत्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले आहे. यापुढील लकी ड्रॉ जून २०२५ या महिन्यात काढण्यात येणार आहेत.महावितरणने ऑनलाईन वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांचा टक्का वाढविण्याच्या हेतूने लकी डिजिटल ग्राहक योजना सुरू केली आहे. या योजनेसाठी ऑनलाईन पध्दतीने वीज बिल भरणा करणारे सर्व लघुदाब वीज ग्राहक पात्र ठरणार आहेत. १ जानेवारी ते ३१ मे २०२५ या कालावधीत सलग तीन वा तीन पेक्षा अधिक वीज बिले भरणाऱ्या ग्राहकांना या संधीचा फायदा होणार आहे.

    लघुदाब वीजग्राहकांसाठी योजना

    ही योजना महावितरणच्या अशा लघुदाब चालू (एल टी- लाईव्ह) वीजग्राहकांसाठी लागू असून, ज्यांनी ०१ एप्रिल २०२४ पूर्वी मागील एक वर्ष म्हणजे ०१.०४.२०२३ ते ३१.०३.२०२४ या कालावधीत एकदाही वीज देयकाचा ऑनलाईन भरणा केलेला नाही किंवा ऑनलाईन वीज देयक भरणा पर्याय वापरलेला नाही. अधिक माहितीसाठी महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळास www.mahadiscom.in भेट द्यावी.ग्राहक रांगेत उभे राहण्यापेक्षा वेळ, श्रम व पैशांची बचत करीत डिजिटल पध्दतीने वीज बिल भरणा करण्यास प्राधान्य देत आहेत. electricity bill payment reward in Maharashtra

    ऑनलाईन वीजबिल भरून जिंका आकर्षक बक्षिसे

    ग्राहकांना डिजिटल पध्दतीने वीज बिलाचा भरणा करता यावा, यासाठी महावितरणकडून संकेतस्थळ, महावितरण मोबाईल ॲपची सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून दिलेली आहे. ग्राहकांना देय रक्कमेवर ०.२५ टक्के डिजिटल वीज बिल भरणा सूट दिली जाते. परिणामी सध्या राज्यात ७० टक्के हून अधिक वीज ग्राहक ऑनलाईन पध्दतीने वीज बिलाचा भरणा करीत आहेत. हे प्रमाण वाढविण्यासाठी ग्राहकांना प्रोत्साहन देण्यासाठी लकी डिजिटल ग्राहक योजना राबविण्यात येत आहे. mahadiscom smartphone reward scheme

    या योजनेच्या कालावधीत ग्राहकाने नेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, यूपीआय, वॉलेट, कॅश कार्ड, एनएसीएच, क्यूआर कोड, एनईएफटी, आरटीजीएस इ. ऑनलाईन वीज बिल भरणा पर्याय वापरून लकी ड्रॉ महिन्याच्या अगोदर दरमहा एकप्रमाणे सलग तीन किंवा तीन पेक्षा जास्त महिने वीज बिल भरणे आवश्यक राहील. अधिक माहितीसाठी महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळास www.mahadiscom.in भेट द्यावी.

  • Urjanagar development meeting Sudhir Mungantiwar । ऊर्जानगरचा विकास आता सुपरफास्ट! मुनगंटीवारांनी घेतला बैठकांचा धडाका!

    Urjanagar development meeting Sudhir Mungantiwar

    Urjanagar development meeting Sudhir Mungantiwar : चंद्रपूर, दि. 4 : ऊर्जानगर परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक सुविधा आणि प्रस्तावित प्रकल्पांवर महत्त्वपूर्ण बैठक चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता विजय राठोड यांच्यासमवेत राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी हिराई विश्रामगृह येथे घेतली.

    इरई नदीचा कायापालट! चंद्रपूर होणार पूरमुक्त?

    विकासात्मक प्रकल्प राबवा

    यावेळी परिसरातील नागरिकांसाठी मूलभूत सुविधा, पर्यावरण संवर्धन, सांस्कृतिक आणि क्रीडाविषयक प्रकल्प राबवण्याबाबत सविस्तर चर्चा करुन ठोस कार्यवाही करण्याचे श्री. मुनगंटीवार यांनी सूचित केले.ऊर्जानगरच्या सर्वांगीण विकासासाठी केलेली सर्वसमावेशक चर्चा निर्णायक ठरणार, असा विश्वास आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. CSIR fund Urjanagar RO machine repair

    याबैठकीला मुख्य अभियंता विजय राठोड,रामपाल सिंग,अनिल डोंगरे, हनुमान काकडे आदिंची उपस्थिती होती.

    आरओ मशीन त्वरित दुरुस्तीसाठी सीएसआर निधीतून आवश्यक आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात यावे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला विद्युत कनेक्शन देण्याची गरजही अधोरेखित करण्यात आली.

    csir fund urjanagar ro machine repair

    वसाहतीचे नूतनीकरण

    ऊर्जानगर वसाहतीच्या नूतनीकरणाची आवश्यकता लक्षात घेऊन वसाहतीच्या सुधारणेसाठी नियोजनबद्ध कामे हाती घ्यावी. नाट्यगृहाच्या उभारणीसाठी 2 एकर जागा त्वरित उपलब्ध करून द्यावी. तसेच परिसरातील युवकांसाठी अत्याधुनिक जिम उभारण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या. यासोबतच, पर्यावरण संवर्धनासाठी 2 लाख कडुलिंबाची झाडे ऊर्जानगर परिसरात लावण्याबाबत योग्य कार्यवाही करण्याचे निर्देशही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.या भेटीत झालेली ही सर्वसमावेशक चर्चा ऊर्जानगर परिसराच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारी ठरणार आहे.